अंदाज अपना अपना

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
30 Jun 2010 - 10:07 pm

णमस्कार्स लोक्स ,

शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.

मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता. रात्री घरात सगळे झोपले होते आणि मी मावसभावांबरोबर हा चित्रपट पाहात होतो. " आवाज करु नका रे , नाही तर टिव्ही बंद करा ... काकांना फर्स्टशिप आहे ! " अशी कडक तंबी मावशीने दिली होती. पण माझं हसु काही केल्या थांबतंच नव्हतं !! मावशीने साताठ वॉर्नींग दिल्या .. मावसभाऊ गप्प बघ म्हणुन वैतागले पण माझं हसणं काही आवरंतंच नव्हतं !! शेवटी टिव्ही बंद केला गेला. पण तरीही माझं हसणं थांबत नव्हतं .. मधेच मला खळखळुन हसु येत होतं ;) तर असा हा अफलातुन सिनेमा !! चित्रपटाच्या सुरुवाती पासुन ते "द एंड" येई पर्यंतंच नव्हे तर त्यानंतरही हा चित्रपट अगदी मनमुराद मणोरंजण करतो .. "राजकुमार संतोषी" ह्या अतिषय हुषार डिरेक्टरचे उपकार मानावे तेवढे थोडकेच!

हे काही चित्रपट परिक्षण नव्हे. ह्या चित्रपटाणे माझ्या लाईफ मधला बराच काळ मला जो अफलातुन आणंद दिला त्याबद्दल काहीबाही खरडणं ह्याला परिक्षण म्हणता येणार नाही , नव्हे .. आम्ही ह्या चित्रपटाचं परिक्षण करण्याची लायकीच राखत नाही. .. कोदांच्या लेखाला प्रतिक्रीया देतांना जसं कोणत्या वाक्यावर लिहु कोणत्या वाक्याला सोडु असं व्हावं तसंच "अंदाज अपना अपना" चा कोणता सिन हायलाईट करु न कोणता नको असं होतं !! तेंव्हाचे सलमान-आमीर आजसारखे निगरगट्टं आणि कडकलेले दिसत नव्हते. एकदम "क्युट" वगैरे म्हणता येतील असे चेहरे आणि कैक क्युट एक्स्प्रेशन देऊन बनवलेला ह्युमर ह्याला आजही तोड नाही. ह्या चित्रपटा आधी आणि नंतरही बाप सिनेमे येऊन गेले असतील , पण माझ्यासाठी तरी "अंदाज अपना अपना" च्च !
आमिर खान, सलमान खाण ने धुम तर केलीच्चे , पण शक्ति कपुर चा "क्राईम मास्टर गोगो" , परेश रावलचा डब्बल धमाका "पत्ते बिछवणारा , गेम बजाने वाला तेजा" आणि "वेळेचा पक्का शब्द मोजुन मापुन बोलणारा रामगोपाल बजाज" , विजु खोटे चा "हाथ को आया मुह ना लगा वाला स्मार्ट बॉय रॉबर्ट" , ड्युप्लिकेट लॉयन अर्थात शेहजाद खान चा "प्लान के मुताबिक चालणारा भल्ला" हे एकसे बढकर एक बाँब आहेत ...... आणि हे कमी की काय म्हणुन मेहेमुद , अमर-प्रेम चे पप्पा लोक , आणि पोलिस ठेशणातला फेव्हरिट इणिस्पेक्टर पण उरली सुरली कसर काढुन टाकतात. मी पामर काय ष्टोरी सांगणार? ती तर सर्वांना माहितीच असेल (तोंडपाठही असेल)
जुहीची स्वप्न पाहाणारा आमिर खान जेंव्हा "आयला ! जुही !!" म्हणतो तेंव्हा खुदकन हसु फुटतं !! :) ह्या डायलॉगचा उपयोग मी आमची म्याडम आमच्यावर रागवली की करतो , अतिशय प्रभावी उपाय...

आमच्या सायटीवर मी आणि माझे दोन कलीग मिळुन पुर्ण "अंदाज अपना अपना" चा माहौल तयार करतो, सगळ्यांचेच डायलॉग्ज पाठ असल्याने त्यांची लिंक कधीही लागते आणि आमच्या क्युब मधलं वातावरन हास्यलाटांनी ओसांडुन वाहतं !! कधी कधी ब्यांकेची बोर लोकं आमच्याकडे भुवया वर करुन कपाळाला आठ्या पाडुन बघतात , बट हु केयर्स ?
"ये तेजा तेजा क्या है ... ये तेजा तेजा " क्राईम मास्टर गोगो गोज फॉर अ टोज !! =))
"सुनो सुनो दुनिया के लोगो .. सब से बडा है मिस्टर गोगो " भोळ्या सलमान खाणचा शिघ्रकवी काय जागृत होतो ?
"तेजा मै हुं मार्क इधर है " ह्या डायलॉग मधे तुम्ही म्हणाल विनोदी ते काय ? पण चित्रपट पहाताना लोटपोट व्हावं इतकं खतरणाक त्याचं टायमिंग आहे
"लाख लाख के पचास चेक होयेंगे सर " ह्या स्मार्ट बॉय रॉबट च्या मेंदुंच कौतुक वाटतं..
"ये वास्को दा गामा की गन है " ह्यावरच्या "किस के मामा की गन है " ह्या तेजा च्या पंच वर मी केवळ मरायचा बाकी राहातो.
पोलिस ठेषणातला पाच मिंटाचा सिनही काय कमी नाही ... रोडवर मारपिट करण्याच्या कारणावरुन तुरुंगाचं ओपनींग करायला आणलेल्या अमर-प्रेम इनिस्पेक्टरच्या डोक्यावर ज्या मिर्‍या वाटतात त्याला उपमा नाही =))
"सर आप शकल से गधे उल्लु के पठे लगते हो लेकीन आप हो नही " , " सर चाय मे शक्कर कम है " काय लिहु काय नको ?
लॉजमालकाला "रामानंद सागर च्या रामायणातला राम-भरत मिलणाचा " सिन आठवतो तेंव्हा माझ्या गालांना वात आलेला असतो ..
"क्राईम मास्टर गोगो .. आखे निकाल के गोटिया खेलुंगा ... आया हुं कुछ ना कुछ तो लुट के जाऊंगा .. खानदानी चोर हुं मै मोगँबो का भतीजा .. " इत्यादी गोगो के कारनामे म्हणजे अगदी कहर आहे कहर.
मी इथे कितीही लिहीलं तरी त्यात पिक्चर पहाण्याची सर येणार नाही , तसा माझा आग्रह ही नाही ...

पण मी कधी निराश वैगैरे असलो की हा चित्रपट जरुर पाहातो, मित्रांच्या घोळक्यात असलो की अंदाज अपना अपना चे संवाद आपोआप एका मागोमाग ओठांवर येतात. ह्या चित्रपट बहुतेक ९३-९४ मधे आला असावा... त्या वेळी जेंव्हा ह्यायले विनोद लिहीले गेले तेंव्हा तर ते एकदम फ्रेश असावेत , जे मला आजही तितकेच फ्रेश वाटतात .. निखळ मनोरंजण करतात ...

तेंव्हा .. ज्यांनी "अंदाज अपना अपना" पाहिलाय त्यांना पुन्हा एकदा उजळणी झालीच असेल , ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा .. आणि ज्यांनी हा पिक्चर पाहिला पण त्यांना हा पिक्चर अगदी कॉमन वाटला त्याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

30 Jun 2010 - 10:24 pm | सुमीत भातखंडे

काय लिवलय राव. एकदम मनातलं.
हा ही एक असाच अफलातून सीन

संपूर्ण पिक्चरच भारीये. कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही.

आनंदयात्री's picture

1 Jul 2010 - 10:33 am | आनंदयात्री

हेच म्हणतो !!
एकच नंबर लेख .. लै आवडला .. पुन्हा पुन्हा वाचला ..
आमचा टारु छान लिहतोच यात वाद नाही.

गणपा's picture

30 Jun 2010 - 10:25 pm | गणपा

एकदम भन्नाट चित्रपट आहे.
साला ३ तास फुल टाईम पास.
आम्ही पण याची गणती केव्हाच सोडली आहे
असाच अजुन एक जुना चित्रपट म्हणजे 'जाने भी दो यारो'.

उल्हास's picture

1 Jul 2010 - 1:43 am | उल्हास

एकदम भन्नाट चित्रपट आहे.
साला ३ तास फुल टाईम पास.
आम्ही पण याची गणती केव्हाच सोडली आहे
असाच अजुन एक जुना चित्रपट म्हणजे 'जाने भी दो यारो'.

असेच म्हणतो

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 12:34 pm | छोटा डॉन

फुल्ल्टु लेख आणि फुल्ल्टु पिक्चर ...
किती वेळा पाहिला ह्याचा खरोखर हिशोब नाही.

खाली बर्‍याच जणांनी वेगवेगळे सीन्स लिहले आहेत.
त्यात आमचेही २ पैसे....

जेव्हा सलमान रविनाला घेऊन जत्रेला का कुठे चालला असतो तेव्हा आमिर एक टांगेवाला बनुन तिथे हजर होतो.
"अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न मुन्न्ना, अपनी बहेन को कहां लेके जा रहो हो मुन्न्ना, अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न "
लै लै हसलो होतो आणि आजही हसतो.

आणि त्यानंतरचे अप्रतिम गाणे ...
"एल्लो एल्लो, एल्लो जी सनम हम आ गये, आज फिर दिल ले के ...."
एकच नंबर, केवळ क्लास !!!

मस्त लेख रे टार्‍या, मजा आली साला !

------
छोटा डॉन

शिल्पा ब's picture

30 Jun 2010 - 10:29 pm | शिल्पा ब

मस्त पिच्चर है ... अमीर खान यकदम गोजिरवाणा दिसतो यात..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रामदास's picture

30 Jun 2010 - 10:31 pm | रामदास

तू पी ले जानी .....
हा या गाण्यातला निरोप आहे.
त्या खेरीज "लाखो मुर्गीयोंके लाखो अंडे । मै ब्रेड भी बनाउंगा ....हमारा बजाज" या डायलागचा उल्लेख न केल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ
ए लो जी सनम हम आ गये आज फिर दिल लेके....हे गाणे म्हणावे.

टारझन's picture

30 Jun 2010 - 10:43 pm | टारझन

तेच तर म्हणतोय मालक. .. काय वेचु न काय सोडु अस्सं होतंय ...
"मै पोल्ट्रि खोलुंगा .. लाखो मुर्गीया पालुंगा .. लाखो मुर्गीया करोडो अंडे देगी .. उनके कई करोड ऑम्लेट... वो खाने के लिये पांव भी मै ही दुंगा .. मै बेकरी भी खोलुंगा ..... ऑम्लेट का राज्जा ब्रेड का बादशा तेजा .. " प्रत्येक वाक्यापरत हसण्याचे ठसके वाढत वाढत जातात ....
म्युजिक बद्दल काय बोलावं .. ह्या पिक्चर मधे ज्या प्रकारची गाणी आणि म्युजिक आहे ते आणखी कुठल्याच पिक्चर मधे ऐकलं नाही ... गाणी पण लै भारी हो ...
"दो मसताने चले जिंदगी बनाने ... " पासुन "इल्लो इल्लो ... "
"र्रिली" म्हणणारी क्युट क्युट करिश्मा आणि "लिजिये ऑरेंजेस खाईयेना " म्हणणारी गोडगोड रविना .. च्यायला नाव ठेवायला कुठे जागाच नाही :)

मोहन's picture

30 Jun 2010 - 10:49 pm | मोहन

छान पिक्चरची आटवण दिल्या बद्दल धन्यवाद. आमीर खानचे विनोदी पिक्चर्स फारच आवडतात.

मोहन

प्रभो's picture

30 Jun 2010 - 10:36 pm | प्रभो

हॅहॅहॅ..लै भारी पिक्चर....

हापिसवरून एक किस्सा आठवला...माझी जुनी TL ... लैच सोज्वळ.....तिला तिच्या नवर्‍याने एका दिवसात ३ वेळा 'मुसाफिर' दाखवला... :D आणी तिच्याकडून डायलॉक पाठ करून घेतले. तिने ह्याविषयी हपिसात आम्हाला सांगितल्यावर मी आणी तिच्या नवर्‍याने संगनमत करून तिला हापिसात पण मुसाफिरवरून पिडायला सुरुवात केली.... =)) =)) =))

जेन's picture

30 Jun 2010 - 10:49 pm | जेन

खूपच छान मूवी आहे........
आप तो दानी हो ........घ्यानी हो.......अंतरयामी हो.....आप तो स्वामी हो......शक्तीमान हो........बुद्दीमान हो......बलकी आप तो पुरुष ही नही...........
महापुरुष हो.........महापुरुष.........

जे.पी.मॉर्गन's picture

1 Jul 2010 - 6:32 pm | जे.पी.मॉर्गन

गोगोजी आपका घागरा !??!!!!

अडगळ's picture

30 Jun 2010 - 10:54 pm | अडगळ

मेरे दुकान के सामने अपनि दुकान लगा दी ?
ये मेरी नही , आप ही कि दुकान हे मालिक.

मेघवेडा's picture

30 Jun 2010 - 10:57 pm | मेघवेडा

"हॅपी बर्थ डे रॉबर्ट!"

"सर आपने बताया नही आज मेरा बर्थडे है!"

=)) =)) =))

टारझन's picture

30 Jun 2010 - 11:15 pm | टारझन

=)) =)) =))
याद्दाष्त परत आल्याचा प्रुफ देण्यासाठी
"मै ये गया .. यु यु यु ... यहा से यहा गया ये मारा .. ये ये ये .. औए ये गोल ... "
=))

मेघवेडा's picture

30 Jun 2010 - 11:18 pm | मेघवेडा

"कैसे नौकर है इस घर मे.. पेहले ले नही रहे थे अब दे नही रहे हैं!"

=)) =))
=))

घाटावरचे भट's picture

1 Jul 2010 - 12:18 am | घाटावरचे भट

"बदतमीज़ लडकी, सोफे पे चढती है...."
- ठाकूर अमर सिंग

शुचि's picture

30 Jun 2010 - 10:58 pm | शुचि

मी नाही पाहीलाय :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

उपास's picture

30 Jun 2010 - 11:15 pm | उपास

जीवन व्यर्थ आहे मग :) बघ्घायलाच हवा...
उपास मार आणि उपासमार

मराठे's picture

1 Jul 2010 - 7:47 am | मराठे

इथे ऑनलाईन बघता येइल. जरूर बघा.

मी-सौरभ's picture

1 Jul 2010 - 8:45 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

उपास's picture

30 Jun 2010 - 11:13 pm | उपास

संवादांचं टायमिंग एकदम म्हणजे एकदम हुच्च ह्या सिनेमातलं..
अजून एक आवडता विनोदी चित्रपट म्हणजे अंगूर.. पन अंदाज अपना अपना त्याहूनही काकणभर सरसच (कदाचित ह्या पिक्चरबरोबर लहानपणाची नाळ जुळलेय म्हणून असेल..)
लगे रहो टारझनभाय..
उपास मार आणि उपासमार

Pain's picture

30 Jun 2010 - 11:21 pm | Pain

ये फिरौती कि रकम है या मय्यत का चंदा =)) =))

टारझन's picture

1 Jul 2010 - 12:11 am | टारझन

च्यामायला तु कोण ?

- (गोविंदा) टारझन

सविता's picture

30 Jun 2010 - 11:23 pm | सविता

नेहमी मिसळपाव वर वाचनमात्र असणारी मी... आज मात्र माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाबद्दल लिहिलंत.. की ही प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मला लॉगिन करणे मस्ट झाले.

असो... शब्द न शब्दा शी सहमत आहे...

"सॉरी सर.. गलती से मिसटेक हो गया"....

"ढॉकि टि की ढॉ... बंदूक मे सिर्फ एक ही गोली थी" वरचा शक्ती कपूर चा डान्स...

महापुरूष.....

वा वा वा...परत बघायलाच हवा आता....

सविता.
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2010 - 11:32 pm | कानडाऊ योगेशु

..तेजा मै हू क्युंकी ..मै ही तेजा हू!
..तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है..
..क्राईम मास्टर गोगो आया हूं तो कुछ ना कुछ तो लेके ही जाऊंगा..

(मला सुनिल शेट्टी,परेश रावल चा १-२-३ पण फार आवडला होता.
तुषार कपूर-इशा देवोल,तनिषा-उपेन पटेल चे सीन फास्ट फॉरवर्ड केले तर उरलेला चित्रपट चांगली करमणुक आहे.)

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन's picture

30 Jun 2010 - 11:38 pm | टारझन

.तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है..

क्या राबट .. गलती शे मिष्टेक हो गया क्या ? ते " तेजा मै हु .. मार्क इधर है" असं बजाज सांगत असतो =))

बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..." नंतर प्रत्येक गोष्टीचं अनेकवचन लावनारा विलन पण लै भारी .. "बैन दा टकास.. " "डेरिंग्जबाज आदमी" "एक ऐसा बम बनाओ.. एक ऐसा बम बनाओ... जो फटे .. " =)) टू कुल ... बट णॉट अ‍ॅज कुल अ‍ॅज अंदाज अपना अपना ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2010 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll

१-२-३ पण खल्लास.
"केल्विन क्लीन क्लीन बोलके खुराना का माल देता था."
"पापा फटां?"

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

वपाडाव's picture

14 Feb 2011 - 6:11 pm | वपाडाव

बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..."

पापा, बम झारखण्ड में रिमोट केरला में, कैसे फटेगा पापा???
लास्टच्या सीनमध्ये,
सुनील शेट्टी : "मेरा लेफ्ट या आपका लेफ्ट?"
पिन्तोस : "अब तो तू ये भी नाहि पूछ सकता क्यू की हम सब एक डीरक्षण में बैठे है !!!"

आणखी लै आहेत, तुर्तास एवढ्यातच समाधाण माणा....

प्रशान्त पुरकर's picture

1 Jul 2010 - 5:21 pm | प्रशान्त पुरकर

अन्दाज अपना अपना सहिच आहे.... कुणि The Angrez बघितला आहे का ? हाहि असाच एक भन्नाट चित्रपट आहे...

एथे बघता येइन... http://www.youtube.com/watch?v=Tgq8qLe-RsI&feature=related

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2010 - 5:47 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा. मस्तं आठवण करून दिलीत. :)
"ए सलीम तू दरवाजा मार".
"माँ की किरकीरी"
"डांलरां डांलरां"

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

Dipankar's picture

1 Jul 2010 - 5:57 pm | Dipankar

चारमीनार के गली गली से घुमके आयेला है

गणपा's picture

2 Jul 2010 - 4:43 pm | गणपा

मागे चुकुन आख्खा चित्रपटांचा फोल्डरच डिलीट झाला.
त्यात हा आणि इअतर बरेच गेले. कहींची नावच आठवत नव्हती.
हा आता परत उतरवुन घ्यायला हवाच :)

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 12:06 am | मेघवेडा

आणि माझा सर्वात आवडता ड्वायलॉक (त्यातल्या त्यात..) आनंद अकेला उर्फ धमरूचा :

"जी ये है, नवाब नूरअली निजामुद्दिन बरकतअली ऊर्फ बडेमियाँ,
और ये है अमिरअली अस्लीलअली असली ऊर्फ छोटेमियाँ,
और मै हूं ढमरू ढैमूरलंग तुर्र्र्र्र्र्रुप!"

=)) =)) =))

तो 'तुर्र्र्र्र्र्रुप'चा उच्चार लिहिणं केवळ अशक्य आहे! =)) इथे बघा १:४० पासून!

आणि हे सगळं चालू असताना रॉबर्ट बोटं मोजत असतो! आणि शेवट म्हणतो.. "इतने सारे नाम? बाकी लोक किधर है?"

=)) =))

नंदन's picture

1 Jul 2010 - 12:10 am | नंदन

>>> इतने सारे नाम? बाकी लोक किधर है?"
--- एक नंबर! हाच ड्वायलाक स्किझोफ्रेनिक लोकांसाठी पण वापरता येईल असं काल एका चर्चेत वाटून गेलं होतं ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही असंच वाटलं होतं, कालच्या एका चर्चेत!

गेल्या दशकातचा पाहिला तरीही 'अंदाज अपना अपना' मी बराच उशीरा पाहिला. बर्‍याच लोकांनी म्हटल्याप्रमाणे चिक्कार वेळा पाहिला आहे. माझा त्यातला आवडता सीन म्हणजे आमिर आणि सलमान बसमधे पहिल्यांदा भेटतात आणि एकमेकांना टेपा टाकत असतात तो!

अदिती

नि३'s picture

1 Jul 2010 - 12:03 am | नि३

" मै तेजा हु क्युकी मेरा नाम तेजा है"

---नि३.

नंदन's picture

1 Jul 2010 - 12:12 am | नंदन

पिच्चर आहे, राव. दुर्दैवाने थेटरात लागलं होतं तेव्हा म्हणावा तसा गल्ला जमवता आला नाही. वर बहुतेक डायलॉग्ज आले आहेतच - पण अजून दोन म्हणजे -
"सर, चाय में शक्कर डालनेका टाईम हो गया?"
"गोगोजी, आपका घागरा"

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

1 Jul 2010 - 12:21 am | घाटावरचे भट

प्रासंगिक विनोदही भरपूर आहेत. उदा.

"राबर्ट, मॅडम को आराम करना है और हमें बहुत सारा काम. कमॉन, फॉलो मी" असे भल्लाने म्हटल्यावर रॉबर्ट त्याच्या आधी तिथून निघून जातो हा सीन झकासच...

बाकी ड्वायलॉक तर आहेतच -
"ये वास्को डि गामा की गन है"
"किसके मामा की गन है???"

सहज's picture

1 Jul 2010 - 6:26 am | सहज

कैसी बात कर रहा है, दो दोस्त एकही प्याली चाय...

बाल काटे भी है और पता भी नही चलता...

सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार! :X

टारझन's picture

1 Jul 2010 - 7:23 am | टारझन

सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार!

घ्या !!! स्स्साला ! काय एकेकाचं णशिब आहे ... कोणाचा "असा" पहिला चित्रपट "अंदाज अपना अपना" ठरतो .. आमचा "तारे जमीन पर" होता =))

कोणाचा "असा" पहिला चित्रपट

आमचा रीलीज होतो की नै "असा" सिनेमा ते कळत/समजत/उमजत नाहीये....
किती व्हालेन्तैन आले नि गेले... आम्ही की असा सिनेमा पाहू नै शकलो...

अविनाशकुलकर्णी's picture

1 Jul 2010 - 7:28 am | अविनाशकुलकर्णी

ए लो जी सनम हम आ गये आज फिर दिल लेके.....गाण्याने ओ.पी नय्यर ची याद ताजी केली....

चित्रा's picture

1 Jul 2010 - 8:12 am | चित्रा

सिनेमा पहायला हवा.
आवडले रसग्रहण..

दिपक's picture

1 Jul 2010 - 9:37 am | दिपक

भन्नाट हाच शब्द.. कितीवेळा पाहिला ह्याची गणतीच नाही. कधी बोर झालो तर मोबाईलनेट युट्युबवर त्याचे एकेक सीन पाहत असतो.

तेजा:गोगो! हिरे इन लोगो के पास है!

अमर: अंकल अंकल!

अमरप्रेम:नमस्ते अंकल नमस्ते!

तेजा: ऎ मे अंकल नही हु मे तेजा हु तेजा!

अमर: तेजा?? लेकीन तेजा के गाल पर तो मार्क है??आ क्यु रॉ्बर्ट?

रॉबर्ट:हा हा, मार्क होना चाहिये!

तेजा:कौनसा मार्क रे कहा का मार्क यार!

अंकल:मे तेजा हु क्योंकी मेरा नाम तेजा है!

तेजा: तेजा मे हु सफेद रामु, मै! मे हु तेजा यार!

अंकल:रामु सुधर जा.. तेजा मे हु!

तेजा:अबे तेजा मे हुं!

अंकल:तेजा मे हुं मार्क इधर हैi!

तेजा:भाड मे गया मार्क, मे इधर हुं ना यार!

अंकल:मे तेज हुं मार्क इधर हैii!!!

गोगो: खामोश !!!!

अंकल:मे हुं तेजा!

गोगो:ये तेजा तेजा क्या है... ये तेजा तेजा??

तसाच अमोल पालेकरचा गोलमाल, गोंवीदाचा दिवाना मस्ताना, दुल्हेराजा, हेराफेरी.. वगैरे....

मी_ओंकार's picture

1 Jul 2010 - 10:36 am | मी_ओंकार

अब और एक कन्फ्युजन..... 'अंकल' कौन है?

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jul 2010 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

=)) =))

ज ह ब र्‍या रे टार्‍या !

मस्तच लिहिले आहेस, अगदी झ का स ...

ऑर्कूट जॉईन केल्या केल्या पहिली कम्युनिटी कुठली जॉईन केली असेल तर ती 'अंदाज अपना अपना' आणि त्यानंतर 'अशी हि बनवा बनवी'. आजही ह्या अंदाज अपना अपना कम्युनिटीची सभासदसंख्या ३६०००+ आहे, ह्यातच सगळे आले.

बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ?? :?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

1 Jul 2010 - 12:59 pm | टारझन

बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ??

हा सिन पोलिस ठेशणातला आहे बे :) अमरप्रेम मिळुन इनिस्पेक्टरचं बौद्धिक घेत असतात. च्यावाला चहा घेउन येतो तेंव्हा अमिर खान आधिच तो कप उचलुन घेतो :) आणि म्हणतो .. "ए क्या चाय लाया रे ? ... सर इसमे शक्कर कम है .."
आठवलं का ? :)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jul 2010 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार

येस येस धन्यु धन्यु :)

आत्ता पुर्ण संवाद लिहिलास तेंव्हा ट्यूब पेटली बघ :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

1 Jul 2010 - 11:41 am | स्वाती दिनेश

किती वेळा पाहिला हा सिनेमा त्याचा काऊंट ठेवणं सोडलं होतं..
मूड फ्रेश करायची गरज असेल तेव्हा कुठूनही पहायला सुरू केला हा सिनेमा तरी काम होऊन जातं,:)
टारु, आता परत एकदा उगाचच पहायलाच हवा..
छान लिहिलं आहेस.
स्वाती

मैत्र's picture

1 Jul 2010 - 1:03 pm | मैत्र

काही बेस्ट डायलॉग्ज :
आयला गोविंदा... च्या मायला तू कौन..

पप्पा लोक पण लै भारी -

देवेन वर्मा..
- मैंने लोगोंके सर मुंडवा के तुझे पाला पोसा डराया धमकाया...
- तू जब जब खूश हुआ ... मेरे साथ कुछ बुरा ही हुआ है..
- मैं बेटीयो को चूडीया पहना रहा हूं... आप माँओ को पहना रहे हो..

जगदीप
- लालाजी के पांचसौ रुपये देने है आज.
- कभी कभी भीड में यूं खडे दिखायी देते है.

मेहमूद - वाह वाह स्टुडिओ
- क्या थोबडा है .. वाह ... थू थू थू थू... नजर ना लग जाये
- अरे हां सुब्बु ... सुभाष घई...

बस मध्ये भेटल्यावरची फेका फेकी...
- देखूंगा देखूंगा अकाऊंटस देखूंगा.
- चूसा हुआ आम :)
- बंदर के सर पे तरबूज
- सर्कस का रिटायर्ड बंदर

ऐसे नही ऐसे नही...
दो दोस्त एक प्याली में चाय पियेंगे...

लॉज मालक -
- अंधी बहन और विधवा माँ
-रात में दो से तीन के बीच में पानी आता है.. नहा लेना
- बोलो नहीं सुनते रहो
- पास में कब्रस्तान है.. वहाँसे कंप्लेंट नहीं आनी चाहिये
- बत्ती किस लिये चाहिये.. फटा फट कपडे बदलो और सो जाओ.. किसी को कुछ देखना दिखाना है क्या..
- ये हमें टिले पे मिला तो हमने इसका नाम टीलू रख्खा है
- आप कितने अच्छे है डॉक्टर
- प्लॅन के मुताबिक
- मैने पी लिया भल्ला .. अभी तुम पियो..
- वो दोनों पपलू टपलू

बेस्ट गाणं - ये रात और ये दूरी .. तेरा मिलना है जरुरी.
के दिल मेरा धक धक बोले..
शेवटी ते कारंजं बंद पडतं :)

इंन्स्पेक्टर - टिकू तलसानिया ..
रिबन कापून उदघाटन करायला लावतो लॉकअपचं.

माझ्या मित्राची आवडती लाइन होती जी तो नेहमी वापरायचा टार्‍याच्या क्युबिकल सारखी -
ए बोल ना... ए बोल ना. रवीनाजी प्रेम कुछ कहना चाहता है.
ए बोल ना.

- उनका एक एक सवाल.. हमारे दो दो जवाब..

टार्‍या एक नंबर.. धन्यवाद.

सहज's picture

1 Jul 2010 - 1:12 pm | सहज

इंन्स्पेक्टर - टिकू तलसानिया ..
रिबन कापून उदघाटन करायला लावतो लॉकअपचं.

आणी कहर त्यावेळी पार्श्वसंगीत पापा कहते है बडा नाम करेगा! :-)

नंदन's picture

1 Jul 2010 - 1:17 pm | नंदन

>>> आणी कहर त्यावेळी पार्श्वसंगीत पापा कहते है बडा नाम करेगा!
--- अगदी. अजून एक रिअल/रील लाईफ रेफरन्स म्हणजे शोले पिक्चरबद्दल बोलताना आमिर सलमानला उद्देशून 'इसके बाप ने लिखी है' (सलीम) म्हणतो ते :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

1 Jul 2010 - 4:26 pm | टारझन

आय होप यु आल यंजाईड धिस धागा :)

नॉट लास्ट बट नॉट लिस्ट टू ... आमिर खान जेंव्हा कटींगचं दुकान विकतो , त्याच्या णेक्स्ट दिवशी , त्याच्या बापाला ज्याने दुकान विकत घेतलं तो म्हणतो मै यहा "चुडीयोंका दुकान खोलुंगा चुडीयोंका " ह्यात "चुंडीयोंका" या शब्दाचा उच्चार वाखाणन्या जोगा आहे. बाकी "इन मजबुत कंधोंका सहारा ना होता तो " म्हणताना अमिर खाणची छाती काय भरुन येते =)) =))

मैत्र's picture

1 Jul 2010 - 1:17 pm | मैत्र

- अमरः ये लो अपना अपना ग्लास...
रॉबर्ट : अपना अपना ग्लास?
अरे लो. अजीब आदमी है. पहले दे नहीं रहा था, अब ले नहीं रहा है
- पाया .. कबाब -- ये ले घोडे का जुलाब
- सर ऐसा किजीये आप बीच में आ जाइये (त्या मोपेडवर ते बजाज ला घेऊन येण्यासाठी जातात - जेव्हा तेजा येतो)
-नमस्ते नमस्ते... अबे चूप ... शादी में आये हो क्या ...(गोगोजी - आपका घागरा नंतर)
-सुनो सुनो दुनिया के लोगों.. सबसे बडा है मिस्टर गोगो

एक सही सीन -
आमीरचा - 'झकास..' तो ज्या पद्धतीनं म्हणतो :)
प्रेमः अमर ... गोली.. इसमें गोली नही है..
प्रेम जेव्हा त्या न बांधलेल्या रोप वर चढतो ... सलमानला वाईट भोंदू दाखवला आहे. त्यानंतर दोघांनी परत एकत्र काम केलं नाही बहुतेक.

खरं आहे टार्‍या की कितीही लिहिलं तर पिक्चर पाहण्याची सर नाही. आणि कितीही वेळा पाहिला तरी तितकाच सही वाटतो.
आठवला की मूड बदलून जातो.

अनुप कोहळे's picture

1 Jul 2010 - 1:20 pm | अनुप कोहळे

अहमद भाई ची सीगारेट स्वतःच्या बिडी ने चालाखी करून बदलणारा अमर ग्रेटच...
हा सीन रवीना एअरपोर्ट च्या सीन नंतर आहे....

ऋचा's picture

1 Jul 2010 - 1:23 pm | ऋचा

=)) =)) =))

टार्‍या काय सही विषय काढलास....
अल्टी पिक....

ढाक चिकी ढाक चिकी ढाक चिकी ढा.......................

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

तुकाम्हणे's picture

1 Jul 2010 - 1:37 pm | तुकाम्हणे

शब्द अपुरे पडतात, खरे आहे.. जबराट पिक्चर आहे. पण हा पिक्चर न आवडलेल्या लोकांना पण मी भेटलो आहे. टाऱ्याच्या भाषेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

योगी९००'s picture

1 Jul 2010 - 4:55 pm | योगी९००

हा लेख वाचल्यावर तु-नळी वर पुन्हा पाहिला आणि तितकाच हसलो..

माझे काही आवडते डॉयलॉग..

१) सलमान : अरे इनका अंकल है, इनको फिकर नही तो अपनेको काहे का फिकर..?

२) करिश्मा जेव्हा अंकल लापता आहे असे सांगते तेव्हा..
सलमान : कही किडनॅप तो नही हुए?

३) सलमान : तुमजो कहती हो की तुम तुम नही..तुम वो हो......(मस्त मस्त)

४) आमिर : तुम महान हो....बल्की मै कहता हु की तुम पुरुषही नही...

५) शक्तिकपूर : सगळेच डॉयलॉग..

६) भल्ला : टाईमबॉम्ब मे टाईम बिलकूल कम है..

पुर्ण पिक्चर पाहिल्यावर असे वाटते की सलमान खानला लोकांनी जास्त पसंत केले व त्याने जास्त हशा मिळवला. या कारणामुळेच अमिरखानने नंतर त्याच्याबरोबर कधीही काम केले नाही.

खादाडमाऊ

मराठे's picture

1 Jul 2010 - 6:05 pm | मराठे

देवेन वर्मा (अमर का बाप) चा डायलॉग
"पुलिसभी यही कहेगी । वो देखो अमर का बाप जा रहा है ।"

कच्चा पापड पक्का पापड's picture

1 Jul 2010 - 6:12 pm | कच्चा पापड पक्क...

शेवटी सलमान आणि आमीर दोघ हात वर करुन (hands up) शक्ति कपुर च्या मागे चालत जात असतात.
कच्चा पापड

कच्चा पापड पक्का पापड's picture

1 Jul 2010 - 6:18 pm | कच्चा पापड पक्क...

http://www.youtube.com/watch?v=sxHSQaKFJVk
हि लिक आहे कशी टाकायची
कच्चा पापड

हुप्प्या's picture

2 Jul 2010 - 6:10 am | हुप्प्या

शोलेच्या पोस्टरसमोर आमिर खान आणि सलमान उभे असतात. सलमान खान शोलेविषयी काहीतरी म्हणतो आणि आमिर खान म्हणते "हां तेरे बापने लिखी है ना ये पिक्चर". मग सलमानचे खवळणे, "मेरा बाप बीच मे मत ला" वगैरे.

सलमानच्या बापानेच जावेदच्या जोडीने ह्या सिनेमाची पटकथा लिहिलेली असल्यामुळे ह्या प्रसंगाची गंमत वाढली.

Pain's picture

2 Jul 2010 - 10:50 am | Pain

अगर मेरे बेवकूफ बेटेको और बेवकूफ बनाने की कोशीश की ना...

दो दोस्त एक प्याले मैं चाय पिते है, इससे प्यार बढता है |
अबे रख! जा..

=)) =))

स्पंदना's picture

2 Jul 2010 - 12:31 pm | स्पंदना

"वो देख तेरी भाभी"
अछ्चा तु माधुरी के साथ शादी करनेवाला है?
"भाभी होगी तेरी, शादी होगी मेरी"

लास्ट्च्या फाइट मध्ये" कुर्सी नही, कुर्सी नही"
"घुटना नही, घुटना नही"

सुन्दर पिक्चर!
थँक्स टारभाऊ.

निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका(योगेश२४ यांच्या परवानगीने)

संजा's picture

2 Jul 2010 - 3:22 pm | संजा

माझा मित्र बापाशी भांडण करुन घर सोडुन माझ्या घरी आला होता. जरा रीलॅक्स व्हावे म्हणुन जवळ असलेल्या थेटर वर गेलो तर हा पिक्चर लागला होता.
सगळ टेन्शन विसरुन ३ तास भन्नाट हसलो होतो दोघं.
भारी पिक्चर.

संजा

मी-सौरभ's picture

2 Jul 2010 - 4:33 pm | मी-सौरभ

एक नं. टोपिक

-----
सौरभ :)

सामने दिखायी दे रही है! (सलमान)

जगदीपः सामने पुलीस स्टेशन है और समशान घाट है. कौनसी मंझील है बेटा तुम्हारी?

"घोडे का जुलाब" खाल्यानंतरचे सलमान चे एक्स्प्रेशन केवळ अप्रतीम!!!

संदीप चित्रे's picture

3 Jul 2010 - 1:14 am | संदीप चित्रे

फक्त हसणं सुरू राहतं असा सिनेमा.
'अंदाज....'ची आठवण करून दिल्याबद्दल धन्स रे मित्रा.
हा लांब वीकांत सत्कारणी लावता आला तर बघतो आता :)

दैत्य's picture

14 Feb 2011 - 8:13 pm | दैत्य

अब्बूजान!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Feb 2011 - 10:17 pm | निनाद मुक्काम प...

ह्या शिनेमात सलमान ने आमीर ला खाल्ला आहे काही प्रसंगात ( डार्क हॉर्स )
बाकी अजून परेश रवेल चा ''पत्ते आणि गेम चे डायालोग
डायालोग (किंवा त्यांचा पहिल्यांदा ह्या दोघांना भेटण्याचा प्रसंग नामसे हि ......)
करिश्मा तिलू अगदी गोड आवाजात म्हणते .
गाणी जुन्या चालीची धीमी होती .( बाला सुब्रामान्यं आणि सलमान हे बेस्ट )
हा सिनेमा आणि साराभाई कितीही वेळा पहिले तरी ....
वाव्वा प्रोडकशन कि चाय
माधुरी जुही
दोनो चलेगी
चलेगी कुद कुद के चलेगी .
माझा आवडता सुरमा भोपाली
व त्याची मेहमूद बरोबर जुगलबंदी
'' अबे बहोत पुराना पापी हे तू ''