पहिला पाऊस
आमची पहिली भेट
ती आडोशाला उभी
मी तिच्या बाजूला
तिचा तो त्रासिक चेहरा
आणि माझं मिश्कील हास्य
अचानक ओळख निघणं
एकत्र छ्त्रीत जाणं
तिचं ते भिजल्यानं कुडकुडणं
अन् माझं तिच्या स्पर्शानं शहारणं
तिचं घर येणं
मला निरोप देणं
यावेळी, तिचा तो हसरा चेहरा
आणि माझं उसनं हास्य
प्रतिक्रिया
18 Jun 2010 - 11:52 pm | शुचि
माझी प्रतिक्रिया काय झाली?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jun 2010 - 12:02 am | टारझन
माझा उपप्रतिसाद काय झाला ?
कवतिक वाटे मला| ध्याना नसे ही मना ||
कोण उडवी प्रति सादा|| व्यनि त दे खुलासा ||
19 Jun 2010 - 1:10 am | शुचि
असो ! कविता आवडली.
>> यावेळी, तिचा तो हसरा चेहरा
आणि माझं उसनं हास्य>>
छानच : )
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jun 2010 - 5:53 am | चित्रा
चांगली कविता.