इंटर व्ह्यु

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
14 Jun 2010 - 11:27 pm

"येउ का आत सर?"
या. बसा.
"पंधरा दिवसांनी येतेय"
चौदा.
"आज तुमचे एच. आर. नाहीत का"?
नाही.
"भेटायची उत्सुकता होती".
ते खंडाळ्याला गेले आहेत.
"परत केंव्हा भेटतील".
सांगता येणार नाही. एका खाजगी कंपनी ने 'रेन फॉरेस्ट' कापुन रिसॉर्ट बनवला. हे गेलेत झाडे लावायला. पंधरा दिवसात १०००० झाडे लावायचा संकल्प सोडला आहे त्यांनी. खंडाळ्याच्यावर सुमारे २००० फुटावर.
"हम्म"
तुम्ही इंटरव्ह्यु नंतर मला न भेटताच निघुन गेलात.
"I was not myself. मॅरॅथॉन धावल्यासारखे झाले."
असे काय झाले? मला पण खुप उत्सुकता आहे.
"तुम्हाला रिपोर्ट आला नाही."
He reports to none. फक्त जाताना एक बंद एनवलप देउन गेले. तुम्ही आल्यावर उघडायाची सुचना देउन.
"बघता के ते उघडुन? कारण तसेच एक एनवलप मला देउन ठेवलेय त्यांनी".
आपण इंटरव्ह्यु बद्द्ल बोलुया.
"खरे सांगु सर. मी स्वतः इतके इंटरव्ह्यु घेतलेत माझ्या करियर मधे.
हा एक वेगळाच अनुभव होता."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Please come in. Have a seat. Any time during this communication you feel like taking a break do not hesitate to say so.
"O.K"
तुम्ही पी.एच.डी. केली आहे बीहेवीयरल सायन्स मधे. सहा वर्षाचा एच.आर चा अनुभव आहे तुम्हाला. पण तुमचा इंटरव्ह्यु घेणार्‍याचे शिक्षण फक्त १२वी पास आहे असे सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?
"तसे असले तर त्याला सबळ कारण असेल."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
"माझ्या उत्तरावर ते अगदी लहान मुलासारखे निर्व्याज हसले.कदाचित मला रिलॅक्स करण्याकरता केलेला अभिनय असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मी सावध झाले."
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
समजा तुमची नेहेमीची गाडी थोडक्यात चुकली. आणि पुढची गाडी नेमकी अर्धा तास उशीरा आली तर?
"मला ह्या सिच्युएशन चा अनुभव नाही. त्या मुळे ह्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही".
मिलिटरी डिसिप्लीन्ड डॅड?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्यानंतर असेच प्रश्न ते विचारत गेले. मी न सांगताच माझे सर्व आयुष्य जवळ जवळ उघडे झाले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
२००७ मधे तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती जवळ जवळ बुडीत गेली होती. तुम्ही ते काम सोडुन मोठ्या पगारावर सहज जाउ शकला असता. पण तसे न करता जवळ जवळ त्याच पगारावर दोन वर्षे काम तुम्ही केलेत. आणि आज कंपनी फायद्यात आल्यावर, पगार दुप्पट झाल्यावर दुसरा जॉब शोधत आहात. का?
क्रमशः

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Jun 2010 - 11:33 pm | टारझन

हा लेख कुठुन सुरू झाला .. आणि कुठे संपला समजले नाही ... मी रँडमली ओळी वाचल्या .. तेंव्हा थोडा समजला (असे मला वाटले)

बाकी षिर्षकात " इंटर व्यु" मधली स्पेस हृदयाला भीडली :)

- (टॉप व्ह्यु) टारझन

नितिन थत्ते's picture

15 Jun 2010 - 3:08 pm | नितिन थत्ते

सहमत. :O

कोण कोणाशी कशाविषयी बोलत आहे हे नक्की कळलं नाही.
:(
नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

14 Jun 2010 - 11:33 pm | शिल्पा ब

लेख आवडला..पुढचा भाग लवकरच टाका.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2010 - 3:07 am | इंटरनेटस्नेही

बाकी षिर्षकात " इंटर व्यु" मधली स्पेस हृदयाला भीडली

असेच म्हणतो..!

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

सहज's picture

15 Jun 2010 - 6:28 am | सहज

वाचतोय.

लवंगी's picture

15 Jun 2010 - 7:31 am | लवंगी

डोक्यावरुन गेला 8|

श्रावण मोडक's picture

15 Jun 2010 - 8:46 am | श्रावण मोडक

या लेखनाच्या शीर्षकात ती स्पेस टाकल्याने लेख वाचला जाईल, असे मास्तरांना वाटत असावे का? तसे नसेल तर ती केवळ टायपो मानण्याजोगी स्थिती आहे असे म्हणता येईल का? नसल्यास मास्तरांच्या या खोडीवर होणारी टीका अनाठायी म्हणता येणार नाही हे बरोबर ना?
मास्तर मध्यंतरी लिहित नव्हते. पुन्हा लिखाण सुरू झाले हे चांगले म्हणावे की या स्पेससारखी खोड कायम आहे याचे वैषम्य वाटून घ्यावे?
मास्तर, या असल्या स्पेसमध्ये काय अडकून पडलाहात कळत नाही. याच्याहीपलिकडं बरंच काही असतं आणि अलीकडंही असतं. आणि तुमच्याक़डं असणाऱ्या प्रसंगांमध्ये ते खूप असतं. त्याकडं नीट लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला या उचापती करण्याची गरज नाही.
पंचायती सोडवण्याचा उद्योग करणाऱ्यानं करून ठेवलेली ही एक पंचाईतच आहे.

सहज's picture

15 Jun 2010 - 9:00 am | सहज

तुमचा इंटरव्ह्यु घेणार्‍याचे शिक्षण फक्त १२वी पास आहे

श्रामो ह्या वाक्यावरुन मी इंटर झालेल्या व्यक्तीचा पॉइंट ऑफ व्हू असा अर्थ घेउन वाचत आहे. हे क्रमशः आहे त्यामुळे कथा शेवट होइपर्यंत मास्तरांना बोलणार नाही. :-)

श्रावण मोडक's picture

15 Jun 2010 - 9:13 am | श्रावण मोडक

जरा वाट पहा हो. मी इतका मोठा झालेलो नाहीये. 'मोठे व्हा' हे मला लागू होतंय म्हटलंय मी इतरत्र. :)
च्यायला, या सहजकाकांची सकाळ आहे वाटतं अजून. कोणी भेटलं नाही जणू... ;)

विनायक प्रभू's picture

15 Jun 2010 - 10:05 am | विनायक प्रभू

श्रामो तुम्ही माझे पर्सनल 'चित्रगुप्त' आहात का हो?
पण मी इंटर्व्ह्यु घेउन तुमची अपॉइंट्मेंट केल्याचे आइच्यान आठवत नाही हो.
असो.
जरा वाट बघा.
मग निर्णयास पोचा.
मी मधे लिहिणे बंद केले होते?
आता अकाउंटंट पण ची पोस्ट आहे का?
असो.

श्रावण मोडक's picture

15 Jun 2010 - 3:48 pm | श्रावण मोडक

श्रामो तुम्ही माझे पर्सनल 'चित्रगुप्त' आहात का हो? नाही, पात्रता नाही.
पण मी इंटर्व्ह्यु घेउन तुमची अपॉइंट्मेंट केल्याचे आइच्यान आठवत नाही हो. असे झालेच नसल्याने ते न आठवणे स्वाभाविकच की गुरूजी.
असो. असोच.
जरा वाट बघा. ओके.
मग निर्णयास पोचा. जी आज्ञा सरकार.
मी मधे लिहिणे बंद केले होते? मी म्हटलं की, "मास्तर मध्यंतरी लिहित नव्हते." पुन्हा लिखाण सुरू या शब्दांमुळे तुम्ही लिहिणं बंद केलंत असा अर्थ निघत असल्यास दिलगीर आहे.
आता अकाउंटंट पण ची पोस्ट आहे का? क्रिप्टिक. कळ्ळंच नाय.
असो. बरं... :)

सोम्यागोम्या's picture

15 Jun 2010 - 8:47 am | सोम्यागोम्या

अनुभव चांगला, पण एक पानाचं पुस्तक वाचल्यासरखं वाटलं ! पुढचे खंड येऊ देत.

अवलिया's picture

15 Jun 2010 - 11:57 am | अवलिया

छान !

--अवलिया

वेताळ's picture

15 Jun 2010 - 12:07 pm | वेताळ

पुढे उत्सुकता लागुन राहिली आहे.
वेताळ

शशिधर केळकर's picture

15 Jun 2010 - 12:14 pm | शशिधर केळकर

सुरुवात तर छान झाली. पण आणखी एक पान चालले असते.

मास्तर तुमचा क्रमशः चा हा पहिलाच प्रयोग आहे का? प्रथम वाचून झाल्यावर क्रमशः कडे लक्षच गेले नव्हते. आहे त्यातच काही सुफळ संपूर्ण समजते का असे पाहात होतो. प्रतिक्रिया वाचल्यावर कळले, की अजून येणे बाकी आहे, आणि हायसे वाटले! तरी एकंदरीत विषयाकडे बघता, क्रमशः ही ३-४ च्या वर जातील असे वाटत नाही, नाही?

(चिकित्सक) शशिधर

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2010 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

व्ह्युतोय..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

15 Jun 2010 - 1:36 pm | गणपा

वाचतोय मास्तर.
काही काही हाती लागतय.

जागु's picture

15 Jun 2010 - 2:53 pm | जागु

एवढ्या लवकर क्रमश का टाकला ? बर आता पुढच येउद्यात लवकर.

ज्ञानेश...'s picture

15 Jun 2010 - 3:01 pm | ज्ञानेश...

पुढे वाचण्यास उत्सुक आहे.

स्वानन्द's picture

15 Jun 2010 - 3:40 pm | स्वानन्द

कामाच्या लोड मुळे आधीच डोकं बधीर झालंय. विरंगुळा म्हणून वाचायला गेलो तर आणखी भंजाळलो !

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

गणपा's picture

15 Jun 2010 - 7:52 pm | गणपा

>> विरंगुळा म्हणून वाचायला गेलो तर आणखी भंजाळलो !
=)) =))
शब्द काळजाला भिडला.

प्रभो's picture

15 Jun 2010 - 6:50 pm | प्रभो

वाचतोय..

धमाल मुलगा's picture

15 Jun 2010 - 7:05 pm | धमाल मुलगा

२००७ मधे तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती जवळ जवळ बुडीत गेली होती. तुम्ही ते काम सोडुन मोठ्या पगारावर सहज जाउ शकला असता. पण तसे न करता जवळ जवळ त्याच पगारावर दोन वर्षे काम तुम्ही केलेत. आणि आज कंपनी फायद्यात आल्यावर, पगार दुप्पट झाल्यावर दुसरा जॉब शोधत आहात. का?

लय लय भारी!
मास्तर, ह्या विषयावर एकदा सविस्तर चर्चा करायचीये आपल्याशी. अशी मनोवृत्ती असणं चांगलं की वाईट?

गणपा's picture

15 Jun 2010 - 7:49 pm | गणपा

>>ह्या विषयावर एकदा सविस्तर चर्चा करायचीये आपल्याशी
आट्टल पुणेकर ;)
(अट्टल बेवडा च्या चालीवर वाचावे)

संदीप चित्रे's picture

15 Jun 2010 - 7:24 pm | संदीप चित्रे

ते 'क्रमशः' चे घोंगडं कशाला भिजत ठेवलयत?
पुढचा/चे भाग कधी?