विण

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
7 Jun 2010 - 10:56 pm

कुठे आहेस?
आज भेटतोस का?
घरी नको.
पण नक्की भेट.
तुझ्याकडे काय आहे?
शिवास चालेल.
आज लुढके पर्यंत पिणार आहे.
घरी पोचवायची जबाबदारी तुझी.
Am I crashing?
may be.
meet me and find out.
You are the crash specialist.
बायकोला सांगुन येतोय.
तुझ्याबरोबर असलो तर तीला काळजी नसते.
आधीच्या क्रॅशेस मधे तुच संभाळले आहेस हे तीला माहीत आहे.
.........................................................................................

जवळ जवळ एक वर्षाने भेटतोयस रे.
गेली ३० वर्षाची आपली मैत्री.
अगदी बिनओझ्याची.
कधी जास्त न भेटता मैत्रीची घट्ट विण.
शेवटी तु म्हणाला होतास तेच खरे झाले.
बायको अक्षरशः कोसळलीय.
दाखवत नाही.
पण विझलेले डोळे सर्व काही सांगताहेत.
हे असे का होते?
तु म्हणाला होतास,
मुलाच्या १०व्या वाढदिवसाला.
"सोड हे 'माझा, आपले,.
तस काही नसते"
अगदी खरे बोलला होतास तु.
पण हे असे का?
नेमके काय चुकले आमच्या दोघांचे?
तु नीट तपास केला होतास.
काही"अ‍ॅक्सीडेंट" ची व इतर शक्यता पण तपासुन बघीतली होतीस तु.
तसे काहीच नव्हते.
उत्तर कधीच मिळाले नाही.
तो असा का हे आजपर्यंत कळले नाही.
घरात कायम घुम्यासारखा.
बाहेर मात्र जोवियल.
तु सांगितल्या प्रमाणे अगदी लहानपणापासुन जवळ घेउन नाते विणायचा प्रयत्न केला.
पण तेवढ्यापुरताच फरक. परत परिस्थीती तशीच.
एकूलत्या एक मुलाच्या प्रेमाला कायम तरसलो बघ आम्ही दोघे.
माझे सोड.
पण तीला पण प्रेम मिळाले नाही.
आमचे काय चुकले ते कधीच त्याने सांगितले नाही.
इतक्या वेळा विचारले.
फक्त खांदे उडवुन उत्तर टाळतो.
ठीक आहे.
निदान डोळ्यासमोर तरी होता.
मुंबईच्या कॉलेज ची अ‍ॅड्मिशन सोडुन तो गोव्याला गेला तेंव्हाच तु म्हणाला होतास,
give him the desired space.
पण एवढ्या मोठ्या पगाराची मुंबईतील नोकरी सोडुन एक साध्या कंपनीत नोकरी ती सुद्धा जमशेदपुरला?
फक्त आमच्यापासुन दुर जाण्याकरता.
माझे काही नाही रे.
मी कामधंद्यात स्वतः ला गुंतवीन.
बायकोचे काय करु?
Some dysfunctions have no answers असे तु म्हणतोयस ते पटायचे कसे?
हे असे का रे?
हा एवढा पैसा, इस्टेट काय कामाची रे?
त्याला नको आहे ती.
येशील घरी?
तीला समजावशील.
तीला ह्यातुन बाहेर काढायला तु सांगशिल ते करेन.
तु असा प्रश्नार्थक चेहेरा करु नकोस?
काय करु ते सांग?
.........................................................................................
?????????????????

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

Pain's picture

7 Jun 2010 - 11:01 pm | Pain

पैसा आणि इस्टेटीचे मी पाहतो...बाकीचे येथील तज्ञ लोक बघून घेतील :>

रामदास's picture

7 Jun 2010 - 11:01 pm | रामदास

भुईसुरुंग पेरायचे कंत्राट मिळाले आहे का ?
आताच पालक जर्रा दम घेत आहेत तोपर्यंत आणखी किती धक्के द्यायचा विचार आहे.?

अभी खायी ठोकर सम्हलने न पाये
के फिर खायी ठोकर सम्हलते सम्हलते.

रेवती's picture

8 Jun 2010 - 5:32 pm | रेवती

भुईसुरुंग पेरायचे कंत्राट मिळाले आहे का ?
असेलही, पण म्हणून तरी विप्र मिपावर येताहेत हे काय कमी!;)

रेवती

टारझन's picture

7 Jun 2010 - 11:09 pm | टारझन

मास्तर , तुम्ही ज्यांची मदत केलीये , त्या लोकांना एकदा पहायची इच्छा आहे :)
एक ण्युट्रल व्यक्ति म्हणुन !!

- ण्युट्रल

रेवती's picture

8 Jun 2010 - 5:33 pm | रेवती

होय तर!
तेवढाच सुट्टीचा सदुपयोग!;)

रेवती

श्रावण मोडक's picture

7 Jun 2010 - 11:10 pm | श्रावण मोडक

इट्स मास्तर, अगेन! बट दॅट टू इज लाईफ!!!

प्रभो's picture

7 Jun 2010 - 11:12 pm | प्रभो

मास्तर, सामान्यांना पहिल्या वाचनात कळेल असं कधी लिहिणार तुम्ही??
तु असा प्रश्नार्थक चेहेरा करु नका?
काय करु ते सांगा? ;) तुम्हाला _/\_

शिल्पा ब's picture

7 Jun 2010 - 11:16 pm | शिल्पा ब

हि गोष्ट आहे का कविता का अजून काही?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रियाली's picture

8 Jun 2010 - 12:06 am | प्रियाली

काकांनी चाल लावली तर कविता म्हणून खपवता येईल. ;)

मास्तरांची क्रिप्टिक लिहिण्याची सवय गेलेली दिसते हा माझा भ्रम होता.

चतुरंग's picture

8 Jun 2010 - 12:18 am | चतुरंग

आधीचा चेंडू सरळ आला म्हणून हा सुद्धा सोपा असेल असे वाटले तर हा "दूसरा" निघाला! ;)

(:?)चतुरंग

रानी १३'s picture

8 Jun 2010 - 1:56 pm | रानी १३

आधीचा चेंडू सरळ आला म्हणून हा सुद्धा सोपा असेल असे वाटले तर हा "दूसरा" निघाला!

पण मस्त होता!!!!! :)

सहज's picture

8 Jun 2010 - 2:01 pm | सहज

इतकेच म्हणायचे होते ना!

बाकी लेख हळु हळु समजेल अशी समजुत आहे माझी.

वेताळ

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 2:57 pm | नितिन थत्ते

शरदिनीतैंची कविता आणि मास्तरांचा लेख एकदा वाचून कळला तर काय खरं नाय.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jun 2010 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख मलातरी समजला. या लेखाला क्रिप्टिक म्हणण्यासारखं नाही वाटलं काही... पण मास्तराच्या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 3:05 pm | नितिन थत्ते

-माझं आपलं काही नसतं
-अ‍ॅक्सिडेंटची शक्यता वगैरे...

या दोन गोष्टी कळल्या नाहीत.

नितिन थत्ते

विनायक प्रभू's picture

8 Jun 2010 - 10:40 pm | विनायक प्रभू

कमाल आहे ब्वॉ तुमची.
अक्सिडेंट म्हणजे काय ते कळु नये?

गणपा's picture

8 Jun 2010 - 3:19 pm | गणपा

मास्तर डोक्याशी भुंगा सोडुन जातात.
मग दिवस भर तो भुंगा गोंगावत रहातो. :(
शेवटच्या प्रश्नाच उत्तर कठीण आहे .

- नापास गण्या

अवलिया's picture

8 Jun 2010 - 7:34 pm | अवलिया

चालु द्या !

--अवलिया

पिवळा डांबिस's picture

8 Jun 2010 - 10:25 pm | पिवळा डांबिस

मास्तर, अजून किती भिंतीवर डोकं आपटून घेणार आहांत?
अहो हा भिकार*ट समाज बदलणार नाही हो!!!