त्रुटी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
4 Jun 2010 - 8:09 am

"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का?
हो.
"वयोमानाप्रमाणे जरा सबुरी घ्या की".
बर.
"मुलाचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असेल ना?"
हो.
"कितीचा जॉब मिळाला?"
अजुन मिळायचा आहे.
"क्काय?"
परिक्षा संपुन आताशी महीना तर झाला.
"पण तो यु.डी.सी.टी.मधला ना?"
हो.
"कँपस मधे जॉब मिळाला नाही?"..
जास्त कुणी आले नाहीत.
"क्काय सांगताय? मला तर वाटले की कँपस मधे कमीत कमी पन्नास साठ चा जॉब मिळाला असेल."
वर्षाला का महीन्याला?
"काय चेष्टा करताय सर? युडीसीटीवाल्याला वर्षाला पन्नास?"
शक्यता नाकारता येत नाही.
"कठीण आहे. हीच तर आपल्या शिक्षण प्रणाली ची त्रुटी आहे. मर मर अभ्यास करुन प्रिमियम इन्स्टीट्युटमधे प्रवेश घ्यायचा आणि जॉब नाही?"
चालतय हो. मिळायचा तेंव्हा मिळेल. जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले.
"काय बोलताय सर, निदान युडीसीटी बद्दल तरी असे बोलु नका".
(आयला रे त्या युडीसीटी च्या)
अहो तुम्ही म्हणताय त्या सर्व पेशवेकालीन गोष्टी. कँपस, प्रिमियम वगैरे. आणि जरा झळ पोचु दे की. पुढे उपयोग होतो.
"मग सध्या काय करतोय?"
इतर सर्व पदवी धारकांसारखे सीव्ही पोस्ट करतोय. बाकी वेळ झोपा काढतोय.
"अरेरे."
त्यात अरेरे करण्यासारखे काय?
"तुम्ही काही हालचाल करताय की नाही".
नाही बॉ.
"कमाल आहे."
त्याच तो बघेल.
"अहो पण पालक म्हणुन काही जबाबदारी?"
हो ना. गाडी दिली की मजा करायला.
"अहो मी ते बोलत नाहीये. जॉब मिळायला काही मदत.?" त्याची जागा त्याने स्वतः शोधायची. खुपच अडल तर मग बघु.
"अडायची वाट का बघताय? जेवढा लवकर मार्गी लागेल तेवढ बरे. पुढचे सग़ळे सुरळीत."
पुढचे?
"लग्न वगैरे..."
म्हणजे तुम्ही कुठली मुलगी सुचवताय की काय?
"आता जॉब नाही म्हणजे बोलणच खुंटले की".
अस म्हणताय. बर बर. आजपासुनच बघायला सुरु करतो. मिळाला की पे पॅकेज लगेच तुम्हाला कळवतो.
हो हो लगेच कळवा.

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

रामदास's picture

4 Jun 2010 - 8:15 am | रामदास

नको तिथे नको तेव्हा.. असा काहीतरी एक लेख आला होता तो वाचा.

सहज's picture

4 Jun 2010 - 8:22 am | सहज

नुकतेच वाचनात आलेले त्यात लेख नंबर ३ ...

विप्रंचे लेखन नेहमीच विचारात गुंतवते....

मला एकानी माझ्या त्याच परिस्थितीत (पहीले शिक्षण संपल्यावर) असताना सांगीतले होते, "हाच वेळ एन्जॉय कर मग काय आहेच आयुष्यभर"....

चिलॅक्स! शुभेच्छा.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2010 - 1:44 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या माहीतीतल्या एकाला जॉब नसताना त्याच्या हितचिंतकाने सल्ला दिला होता की आताच लग्न कर आणि हनिमून उरकुन टाक.एकदा जॉब लागल्यावर रजा मिळण्यासाठी मारामार !

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता जी नोकरी करते आहे ती थोडी उशीरा सुरू करण्याचं हेच कारण होतं! अर्थात तेव्हा मला ही नोकरी मिळणार याची ९९% खात्री होती!

(पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात) अदिती

नंदन's picture

5 Jun 2010 - 2:27 am | नंदन

>>> मला एकानी माझ्या त्याच परिस्थितीत (पहीले शिक्षण संपल्यावर) असताना सांगीतले होते, "हाच वेळ एन्जॉय कर मग काय आहेच आयुष्यभर"....

--- सहमत आहे. अशाच परिस्थितीत असताना केलेली मनसोक्त भटकंती एरवी कधी जमली नसती असं आता वाटतं. मास्तर, लेख मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शुचि's picture

4 Jun 2010 - 8:24 am | शुचि

वयोमान वगैरेनी सुरुवात करतात कशाला हे शिंचे?
सुरुवात सबुरीने घ्या की आणि शेवट - काहीतरी हालचाल करा की.
छान विरोधाभास आणलाय लेखात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विनायक पाचलग's picture

4 Jun 2010 - 8:57 am | विनायक पाचलग

गॉट द मेसेज व्हॉट आय वाँट ....

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

विनायक प्रभू's picture

4 Jun 2010 - 11:29 am | विनायक प्रभू

माझे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 1:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))

बिघडवल. =))
वेताळ

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 8:59 am | चतुरंग

लै दिसांनी आला लेख मास्तुरे!
आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या मुलांची काळजी जास्त असते की काय असे वाटते कधीकधी.
आमचे चिरंजीव तिसरीत जातील आता पण आत्तापासूनच - "लक्ष देताय की नाही त्याच्या सायन्स आणि मॅथ्सवर? उगाच लँग्वेजेस मधे फार काही करु देऊ नका हां, पुढे त्याचा तसा काही उपयोग नसतो!"
"तुम्ही स्वतः इंजिनिअर ना? मग लेकाला काय इंजीनिअरच करणार असाल!"
आता इतकी वर्ष आधी त्यानं काय करावं हे मी कोण आणि कसा ठरवणार? आता त्याचं खेळायचं वय आहे ते त्याला छान एन्जॉय करुदेत की, पण नाही लोकांची खोड जात नाही!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 9:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकांना बर्‍या या गोष्टी लक्षात रहातात, पुढे भोचकपणा करण्यासाठी! मला रोजची तारीख आणि वार नाही धड आठवत!

अदिती

समंजस's picture

4 Jun 2010 - 10:26 am | समंजस

छान मास्तर :)
बर्‍याच दिवसानंतर तुमचा लेख वाचायला मिळाला. नक्कीच भरपुर बिझी आहात तुम्ही :)


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मस्त कलंदर's picture

4 Jun 2010 - 10:35 am | मस्त कलंदर

बर्‍याच दिवसांनी लेख आला तुमचा.. ;)
बाकी, लोक भोचकपणा करायचे सोडायचे नाहीतच.. मस्त सुटी मिळालीय.. एंजॉय कर म्हणावं.. नंतर आहेच सगळं!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

4 Jun 2010 - 10:57 am | निखिल देशपांडे

मास्तर ईज बॅक..
खुप दिवसांनी मास्तरांचा लेख तोही नेहमीप्रमाणे विचार करायला लावणार...

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2010 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का?

अजून येऊ द्या...!

- दिलीप बिरुटे

अवलिया's picture

4 Jun 2010 - 1:01 pm | अवलिया

अरे मास्तुरे....

*संपादित - प्रत्येक ठिकाणी संपादकांवर चिखलफेक करु नये हि विनंती
संपादक *

--अवलिया

गणपा's picture

4 Jun 2010 - 1:34 pm | गणपा

वा वा वा मास्तर बर्‍याच दिवसांनी लेख आला वाचनात तुमचा.

अश्या चोंबड्या माणसांच्या वार्‍यालाही उभे राहु नये.
आपली तर कवटई सरकते अशी माणस भेटली तर, सरळ वाटेला लावतो आपण त्यांना.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2010 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते

उद्बोधक.....

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

4 Jun 2010 - 3:11 pm | नितिन थत्ते

लेखात "गाडी दिली आहे की" असे वाचले. त्यावरून आठवले.

मी शाळेत असल्यापासून आमच्या घरी स्कूटर होती (लॅम्ब्रेटा- माहिती आहे का कुणाला ही?).

तर मी नोकरीला लागल्याच्या सुमारास वडिलांनी ती वापरणे बंद केले होते. मग काय मला बरेच होते. मी ती वापरू लागलो.

मी ती स्कूटर वापरतो हे पाहून वडिलांनी ती विकून टाकायचे ठरवले. मी त्यांना "कशाला विकताय? मी वापरतोय की!!!" असे म्हटले.
तेव्हा "तुला वापरायला तू नवीन स्कूटर तुझी तू घे" असे वडिलांनी सांगितले.

त्यावेळी मला राग आला. कारण नवीन नोकरी असल्याने स्कूटर घेण्याएवढे पैसे माझ्याकडे नव्हते.

आज मागे वळून पाहताना वडिलांनी योग्य तोच धडा मला शिकवला/घालून दिला असे वाटते. कारण त्या निमित्ताने का होईना मी काही ठराविक रक्कम शिल्लक ठेवू लागलो.
इथल्या सदस्यांना याबद्दल काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

नंतर फ्लॅट घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी मला 'मदत' केलीच. पण शक्य असूनही फ्लॅट घेऊन दिला नाही. तोपर्यंत मी शहाणा झालो होतो.

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 8:31 pm | चतुरंग

मुलांना स्वावलंबी करण्याचा मार्ग म्हणजे जबाबदार्‍या घ्यायला लावणे. स्वतः एखाद्या गोष्टीच्या सगळ्या टप्प्यातून गेल्याशिवाय त्यातले त्रास कळत नाहीत आणि ती गोष्ट मग जपली जाते!

लँब्रेटा माहीत आहे. ह्या स्कूटरच्या पुढल्या चाकावरचा पत्रा हा मुख्य चासीला जोडलेला असल्याने तो हँडलसोबत वळायचा नाही बाकी बजाज स्कूटर्सचा वगैरे वळायचा त्यामुळे मी एकदा गोंधळून गेलेलो आठवते आहे. ;)

चतुरंग

रामदास's picture

4 Jun 2010 - 9:13 pm | रामदास

लँब्रेटाला किक मारल्यावर फ्लशची साखळी ओढल्यासारखा आवाज यायचा.

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 9:16 pm | चतुरंग

बरोब्बर एकदम फिट्ट उपमा!! ;)

चतुरंग

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 10:36 pm | स्वाती२

+२ सहमत!
आमच्याकडे पण लेकाला आयती गाडी मिळणार नाहिये. नव्या अ‍ॅपल लॅपटॉप साठी तो दोन वर्ष पैसे साठवत होता.

रेवती's picture

5 Jun 2010 - 3:33 pm | रेवती

अरे वा! छानच!
बरं झालं सांगितलस.
आमच्या मुलाने एकदा विचारलं कि आपण गरिब आहोत का?
एखादी वस्तू जी बाकिच्यांकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणजे आपण पुअर आहोत असा त्याचा समज होता.;)

रेवती

jaypal's picture

5 Jun 2010 - 1:59 am | jaypal

एपीआय लॅम्ब्रेटा हीला बघतच आम्ही मोठे झालो.
lam
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

5 Jun 2010 - 9:51 am | पाषाणभेद

ही होय लँब्रेटा ? आमी तर हिला लांबरेटा असं म्हनायचो बाबा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

रेवती's picture

5 Jun 2010 - 3:35 pm | रेवती

आमच्या लँब्रेटाचा रंग नीळा आणि पांढरा होता.

रेवती

धनंजय's picture

5 Jun 2010 - 5:15 am | धनंजय

कॉलेजात माझी लँब्रेटा होती. जुनी, रंग उडालेली वगैरे. कधीकधीच किक मारली की सुरू व्हायची. पण मग छान चालायची. अनेक किलोमीटर खेचत नेलेली आहे! मजा होती.

प्रभो's picture

4 Jun 2010 - 6:45 pm | प्रभो

मास्तर, उत्तम लेख...

टारझन's picture

4 Jun 2010 - 9:05 pm | टारझन

=)) बसवला ऑटोत ..
भेंडी ... मास्तर मला वाटलं मधल्या काळात पोर्‍याच्या ईंटरव्यु चा अभ्यास घेत बसलेत असं मला उगा स्वप्ण पडत होती .. बरं झालं लै दिवसांनी का होईना मास्तर ने हातात घेतली ... लेखणी हो :) आणि लिहीते झाले ... तुमच्या हाताला धरुन अजुन काही जणांना लिहायला शिकवलंत तर मराठी ला मोलाची मदत होईल =))

असो ... डु यु गॉट द मेसेज यु वाँटेड ?

अवांतर : एखाद्या रैवारी ठाण्याला येऊ म्हणतो मास्तर , तुम्ही बोलवणार की डायरेक्ट येऊ ? जेवायच्या टायमाला ? ;)

- टारायक टॅबु

लै भारी!
सुरवातीच्या काळातला त्रास, माणसाला ज्यास्त कोंपीटिटीव्ह बनवतो!
(स्वानुभव).

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 11:15 pm | चतुरंग

आणि वाईट परिस्थिती आली तर तोंड कसं द्यायचं ह्याची तयारी होते. आधी चांगल्यातून मग वाईटात गेलात तर हाल फार होतात कारण माहितीच नसते!
(पुण्यात माझा मित्र त्याच्या दहा वर्षे वयाच्या मुलाला अधून मधून त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स यूनिट मधे घेऊन जात असे. टेबले पुसून ठेवणे, सोल्डरिंगचे साहित्य साफ करुन ठेवणे, टेबलावरची इतर उपकरणे नीट ठेवणे, फाईल्स आणि इतर कागदपत्रे नीट लावून ठेवणे अशी कामे त्याच्याकडून करुन घेई. कस्टमरशी बोलणी चालू असताना त्याला सोबत ठेवत असे. घरचा धंदा आयताच अशी मुलांची भावना होता कामा नये हा उद्देश.)

चतुरंग

Atlas Shrugged मधला Francisco D' Anconia आठवला!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

4 Jun 2010 - 11:44 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
- जॉन गाल्ट.

शानबा५१२'s picture

4 Jun 2010 - 11:09 pm | शानबा५१२

बाकी ह्या लोकांना अस बोलुन काय भेटत असेल??
किंवा काही लोक जाणीवपुर्वक नाही करत अस मला वाटत तेव्हा एखाद्याशी असलेल्या संबंधावरुन निष्कर्ष काढावेत अस मला वाटत उगाच गैरसमज नकोत.

प्रियाली's picture

4 Jun 2010 - 11:18 pm | प्रियाली

काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का?

खूप खूप महिन्यांनी वाचला आपला लेख. मी एकदम बिझी होते. वाचन अशक्य होते म्हणून. चक्क क्रिप्टिक नाही. ;) मस्त जमला आहे...

इतरांची (चांभार)चौकशी करणे हा मानवाचा स्वभाव आहे असे वाटते. ते करून उणी दुणी काढली की स्वतःची दु:खे, वंचना क्षणभर विसरल्यासारखे होत असावे.

बायदवे, घरात गाडी [चार चाकी] आहे म्हणून चालवायला दिली आहे की नावावर करून टाकली आहे? उगीच माझीही चौकशी हं! ;) ह. घ्या.

धनंजय's picture

5 Jun 2010 - 5:16 am | धनंजय

जमून आला आहे.

श्रावण मोडक's picture

5 Jun 2010 - 10:39 am | श्रावण मोडक

कालपासून निवांतपणा मिळत नव्हता. आत्ता वाचला. टिपिकल मास्तर.

रेवती's picture

5 Jun 2010 - 3:38 pm | रेवती

सरांचा लगेच कळलेला लेख आवडला.
आता मुलाचे कॉलेजातले पुस्तकी धडे संपून आयुष्यातले धडे सुरु झाले असे म्हणायला हवे.

रेवती

दत्ता काळे's picture

5 Jun 2010 - 3:48 pm | दत्ता काळे

मुलांकडून नेहमी काहीतरी घरकाम करून घ्यावे, म्हणजे त्यांची निर्णयक्षमता वाढते आणि यथायोग्य जबाबदारीची जाणीव व्हायला लागते.