कविता होताना!

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
3 Jun 2010 - 7:02 pm

"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....
कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?"

असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले. मी एकटीच का वैतागायचं पण लोकांनाही पकवू असं म्हणून जे झालं ते स्टेटसमधे टाकलं ते असं
"अचानक इथे हे असे काय झाले
रेखीले पान माझे विखरून गेले.....

माझा फेबु डिस्प्ले गंडलाय अचानक...."

लोकांना वाटणार मी कविता पाडतेय. लोक वाचणार आणि शेवटची ओळ वाचून त्यांचा पचका होणार. फालतू जोक म्हणून लोक चरफडणार इत्यादी इत्यादी वाटून मला जामच मजा आली. कसलं काय.. कोणी ढुंकून सुद्धा पाह्यलं नाही माझ्या स्टेटसाकडे. माझ्या विनोदाची फुलं अशी पार चुरगळली गेली... (इथे कमालीचे नाटकी हुंदके!)

पण तसं नव्हतं. मैत्रिणीला तरी वाटलं होतं मला कविता होतेय म्हणून. म्हणून तर हे फर्मान.
मला तर काडीचं काही सुचत नव्हतं. पण बेटी सांगायची ते आठवलं.
"शब्दखेळ करत रहा. त्यातूनच येईल एखादी भली कविता."
म्हणलं चला खेळून बघू शब्दखेळ. लगे हाथो मैत्रिणीच्या फर्मानाला मान पण दिल्यासारखं होईल.. :)

गप्पा पाऊस आणि ढगाच्याच चालू होत्या. केला शब्दखेळ...

"कसला ढग न कसलं काय...
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय! "

मैत्रिण हसली आणि बहुतेक मला मनातल्या मनात कोपरापासून हात जोडून गप्प बसली.
इथे माझ्या डोक्याला किल्ली बसली होती ना पण. शब्दखेळ पुढे सुरू केला.

जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्‍यात कायच सापडत नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

कोपरा न कोपरा लख्ख केला
डोक्यामध्धे कायच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

असं काहीतरी निघालं डोक्यातून बाहेर. भली अशी नाही पण कविता तर झाली. बांध तर फुटला. तुम्हीही पकलात. सध्या मला इतकंच पुरे आहे.:)

कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते... :)

-नी

कविताअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 7:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच!
शेवटची ओळ ह्रुदयाला भिडली! ;-)

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2010 - 7:30 pm | llपुण्याचे पेशवेll

शेवटची ओळ मनालाही भिडली. ;)
*संपादित*

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

अवलिया's picture

3 Jun 2010 - 7:27 pm | अवलिया

छान लेख !

बाकीचे उडाले का प्रतिसाद?

--अवलिया

नीधप's picture

3 Jun 2010 - 7:30 pm | नीधप

उडालेले दिसतात. मी काही तक्रार बिक्रार केली नव्हती हा!!
तुम्ही पकलात तर मला दोन घटका करमणूक आणि नाही पकलात तर तुम्हाला करम़णूक इतकाच हेतू आहे या खरडण्याचा...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

अवलिया's picture

3 Jun 2010 - 7:34 pm | अवलिया

हा हा हा
अहो तुम्ही तक्रार केली असो किंवा नसो.... नानाचे प्रतिसाद दिसले की उडवा असा खास आदेश आहे म्हणे. बाकी आम्ही सुध्दा केवळ करमणुक या हेतुनेच येत असतो पण संपादकांना आवडत नाही. असो. आज ब-याच महिन्यांनी आलो होतो जरा मस्ती करायला, वाटलं संपादक बदलले असतील ;)

पण नाही. असो. त्यांची मर्जी. चालु द्या त्यांचे... नाही का?

बाकी तुमचे लेखन छान आहे हो... अंमळ हेवा वाटतो .. आपण असे लिहु शकत नाही याचा :)

--अवलिया

अरुंधती's picture

3 Jun 2010 - 7:46 pm | अरुंधती

<< उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय >>

शब्दखेळ आवडला! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

3 Jun 2010 - 8:11 pm | टारझन

व्यक्तिगत मजकुर संपादित

टारझन ह्या सभासदाला ताकिद देण्यात येत आहे की मिपाच्या लेकीसुणांच्या धाग्यावर संपादित होण्यासारखे प्रतिसाद देण्यात येऊ नये, बाकी ठिकाणी हतकत नाही .
संपादन करुन जाता जाता : लेख छाण आहे.

-आधीमधीचा लुडबुडकर्ता

शुचि's picture

3 Jun 2010 - 8:15 pm | शुचि

=))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

बेसनलाडू's picture

3 Jun 2010 - 8:20 pm | बेसनलाडू

(खेळकर)बेसनलाडू

मेघवेडा's picture

3 Jun 2010 - 9:21 pm | मेघवेडा

छान! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2010 - 9:56 pm | पिवळा डांबिस

ताई, तुम्ही त्रिफळाचूर्ण घेऊन बघा!
रोज रात्री, गरम पाण्यातून!
सांगा, काही फरक पडला तर!!!
(ह. घ्या!)
:)
बाकी,
लोकांना वाटणार मी कविता पाडतेय. लोक वाचणार आणि ..... वाचून त्यांचा पचका होणार. फालतू ....म्हणून लोक चरफडणार इत्यादी इत्यादी. कसलं काय.. कोणी ढुंकून सुद्धा पाह्यलं नाही माझ्या स्टेटसाकडे. ...... फुलं अशी पार चुरगळली गेली... (इथे कमालीचे नाटकी हुंदके!)

अगाई गं! अगदी काळजाला भिडलं!
"मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे" ची आठवण झाली!!!!
:)

टारझनपणा (स्वारी, टारगटपणा) करून जाताजाता: लेख छाण आहे!!

नीधप's picture

4 Jun 2010 - 11:18 am | नीधप

हा हा हा सिडॉ....
थेन्कू हो!!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

शाहरुख's picture

4 Jun 2010 - 9:25 pm | शाहरुख

मला माझ्या पहिल्या वहील्या काव्यपुष्पाची आठवण झाली.. ओढून ताणून अर्ध्या तासात पाडली होती कविता.

वाचून मजा आली तिच्यायला !!

कवी शाहरुख

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 9:27 pm | चतुरंग

काव्यसुमनाची वाट बघतोय आम्ही! होऊन जाऊ देत शारुखभाई! ;)

काव्यतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jun 2010 - 8:30 am | प्रकाश घाटपांडे

कविता होते म्हणजे प्रसते ना?
आमच्या मनात कविता प्रसवणार्‍या कविता या सिझेरियन डिलिव्हरी
आणि प्रसणार्‍या कविता नेचरल डिलिव्हरी अशी कल्पना आहे. असो 'मोकळ' झाल्याशी मतलब! मोकळ होण सुखद असत याच्याशी अगदी शत्रू सुद्धा सहमत होईल
कशाचे काय नी कशाचे काय?
शब्दाळलेल्या अंकात वर्तुळाचा 'पाय'

हॅहॅहॅ आमी बी कवी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.