माझा नांदुरमध्यमेश्वरचा विचका+पचका झाल्यावर ईरेला पेटुन भिगवणची मोहीम हाती घेतली. नेटवर बसुन नेटाने सगळी माहीती घेतली. तसच काही मित्रांशी सल्ला मसलत पण केली. (भिगवणला देखिल एक धराणावरच बॅक वॉटरच पाणी साठुन झालेल मोठ तळ आहे व तिथे खुप पानपक्षी येतात.) अचानक ३० जानेवारी २०१०, शनिवारी अनपेक्शीत रीत्या ४.३० वाजताच घरी यायला मिळाल आणि भिगवणचे विचार उफ़ाळुन आले. संध्या.५ /५.१५ च्या सुमारास घरुन एस.टी. स्टँडला फ़ोन लावला आणि माझ्या नेहमीच्या हुकमी चाली खेळलो.
ट्रींगट्रींग...........ट्रींगट्रींग..........ट्रींग..........ट्रींग........ट्रींगट्रींग :-C
समोरुन = हॆलो .वंदना डेपो
मी = जयहिंद , वागळे पोलिस स्टेशन कान्स्टेबल साळुंखे बोलतोय. आजच्याला अरजंट मधी तपासाला भिगवनला जायचय किती वाजता गाड्या हाईत?
समोरुन = (अतिजलद आणि घाईच्या स्वरात) जयहिंद सहेब ५.३० नंतर ६ तेच्या नंतर७ आनी मग लास गाडी ११ ची हाय साहेब.
मी=(थोडासा हुकमी आवाज आणत) जरा थांबा साहे$$ब सगळ सविस्तर लिहुन घेतो आन ते टायमिंग तेवड २४च्या हिशोबान सांगा बरं. :)]
मी(कागद पेन तयार ठेउन)= हं सांगा. १७.३० नंतर
समोरुन = नंतर १८ ..नंतर १९ वाजता तेच्या नंतर २२ वाजता. पन साहेब तीच टायमिंग सारख माग पुढ होतय बर का!
मी = धन्यवाद साहेब. या कधी तरी पोलिस स्टेशनला च्या पानी घेउया म्हंजी वळखबी हुईल. जयहिंद. :D
याल मी खोट बोलण समजत नाही. सामान्य नागरिक म्हणुन आलेल्या अनुभवनंतरच ते शहाण पण आहे. ~X( नाही तर एस.टी. डेपोतुन येवढी ४/५ मिनटे सविस्तर माहीती आभावानेच मिळत असावी! एक दोन तिरसट (कावलेल्या आवाजातली) वाक्य तुमच्यावर फ़ेकुन फ़ोन दाण दिशी आदळला जातो. रिक्शा वाले खुप वेळेस भाडे नाकारुन त्रास देतात. गेल्या काही वर्षात मला अजिबात त्रास नाही , कारण मी आधी झटकन रिक्शात बसतो येणार का बाबा? वगैरे तुच्छ विचारणा करत बसत नाही. आणि हुकुम देतो "नौपाडा पोलेस स्टेशन" घर जवळ आल की जरा राईट घे/घ्या, जरा लेफ़्ट हां हां बस ईथेच सोडा. पैसे द्यायचे घरी जायच. डोक्याला ताप नाही. अवांतर आहे पण हा माझा स्वभाव आहे >:)
असो. घरा जवळुन डेपो चालत १०/१५ मिनीटावर, आत्ता वाजले ५.४०, म्हणजे ६ ची बस शक्य नाही अजुन सॅक भरायची होती. खायची व्यवस्था ई.विचार करुन ७ म्हनजे १९ वाजता ची बस मनाशी नक्की केली. सॅक भरताना विचार चालु होता. पुण्या पासुन भिगवण ९१ कि.मी. ईथुन पुणा ३.३० तास तिथुन अजुन २ तास म्हणजे एकुण प्रवास साडेपाच तासांचा. भिगवण अंदाजे १२.३० ला येईल .ओक्क्के!! :?
हिरव्या एशियाड डब्याने प्रवास चालु झाला. पनवेलला बाहेरुन न जाता आतमधे स्टेंड वरुन गाडी जाणार म्हटल्यावर चपापलो. सगळ प्लॅनिंग बोंबलणार. २/४ मिनटच चरफ़डलो :T आणि परत झोपी गेलो (|: . हायवेवर जेवायला थांबल्यावर वाहक आणि चालकाशी गप्पा मारत भिगवणविषयी माहीती काढली.गवात लॉजची सोय नसावी हे लक्शात आल. पुढे ३५ कि.मी. वर बारामतीला जाव की नाही ? झुरका + चहा घेत विचार केला :W आणि भिगवणलाच उतरायच ठरवल. आदळत, आपटत रात्री २.१५ला भिगवण स्टँडला उतरलो. कंट्रोलर कडे परत एकदा गावत राहण्या विषयी चौकशी केली.गावत एकच लॉज आहे आणि ते ईथुन(स्टेंडपासुन) ३ कि.मी. आहे समजल्यावर स्टँड्वरच झोपायच ठरवल.(राती बेरातील अनोळख्या गावात कशाला रीस्क घ्या? :/ ३/४ तासांचाच तर प्रश्न होता. स्टेंडवर कसं अधुनमधुन गाड्या येत असतात. चहावाला, वडेवाला, स्टाफ़ ई. वर्दळ असते ना ! मग काही टेंशन येत नाही. सोबत माहागडा कॅमेरा आणि उधारीच्या लेन्सची पण भिती होती.) रद्दी पेपर बाकड्यावर अंथरला तोंडाला, हाताला ओडोमास लावल आणि सॅक उश्याला घेउन झोपलो. I)
थंडीचे दिवस असल्याने पहाटे हवेत गारवा खुप होता. स्टँडवरच ब्रश केला अंघोळीची गोळी खाउन चहा+बिस्कीट ब्रेक फ़ास्ट घेतला आणि भटकंतीला सुरवात केली तो पर्यंत ७ वाजात आले होते.
सुर्योद्य आणि सुर्यास्ताचे फोटो काढायची मजा थंडीतच येते. आकाशात लाल+शेंदरी रंगछटा खुप छान येतात.(सोनसकाळ)
हे खाली आहे ते चक्रवाक बदक. सायेबेरीयातुन हिमालय मार्गे स्थलांतर करतात हे पक्षी. #:S
मला तर ह्या बदकिणबाईच वाटतात. बघाना डोळ्यात काजळ घालुन कश्या चालल्या आहेत?
अजुन जवळुन फोटो घेण्यासाठी होडी वाल्याला जरा तिच्या जवळ बोट न्यायाला सांगितली. बहुतेक माझी सलगी आवडली नसावी
चक्क उडण छु
पाण पक्ष्यांबरोबरच किट्कांवर जगणारे ईतरही बरेच पक्षी होते. त्या पैकी हा वेडाराघु
नाव माहित नाही पण स्थानिक लोकं "पिवळी चिमणी" म्हणुन ओळ्खतात
बगळे बुवा / बगला भगत
टेकऑफ च्या तयारित बगळे बुवा
हाय फ्लाय
ह्या पक्ष्याच्या पायाशी निट बघीतल तर छोटस चुंबळ केल्यागत घरट दिसेल त्या मधे ४ अंडी होती. हे घरट तरंगत्या पाण्यात उगवणा-या वेळी आणि गवतात बांधल होत. आमची बोट घरट्या जवळ येताच जोरजोरत ओरडत आक्रमक पवित्रा घेतला होता. X(
ह्यची चोच बघा. ( नाव माहीत नाही :S )
सँड्बर्ड
हा बगळा पाणवनस्पती / झाडी झुडपां मधे स्वतःला येवढ्या बेमालुमपणे झाकुन घेतो की अवघ्या काही फुटावर आपण गेल्यावर लक्षात येत अणि तो पर्यंत हा उडुन देखिल जातो.
कॅमेरा निकॉन डि९० + लेन्स निकॉन ७०-३००
कमश:
प्रतिक्रिया
31 May 2010 - 10:11 pm | प्रभो
मस्त रे दाद्या....लै भारी...
31 May 2010 - 10:19 pm | मनिष
सही....काय झूम आहे का चेष्टा राव? कुठला कॅमेरा? आणि लेन्स किती रेन्जची?
31 May 2010 - 10:21 pm | शिल्पा ब
सग्ळे सग्ळे फोटो छान आलेत...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
31 May 2010 - 10:27 pm | मदनबाण
मस्त फोटु... :)
मदनबाण.....
Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower
31 May 2010 - 10:38 pm | रामदास
सुंदर फोटो बघाण्याचा दिवस आहे. आधी जेजूरीनी तबीयत खूष झाली .आता भिगवणचे फोटो नशा वाढवत आहेत. अभिनंदन.
31 May 2010 - 11:23 pm | डावखुरा
परत एकदा रामदासरावांशी सहमत... :)
सर्व छायाचित्रे उत्तमच ----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
31 May 2010 - 11:23 pm | डावखुरा
परत एकदा रामदासरावांशी सहमत... :)
सर्व छायाचित्रे उत्तमच ----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
31 May 2010 - 10:44 pm | आळश्यांचा राजा
खास!
आळश्यांचा राजा
31 May 2010 - 10:52 pm | टारझन
मस्त फोटु जैपाल सायेब !! क्लास ~!!
-
31 May 2010 - 11:11 pm | अनिल हटेला
लै भारी फोटोज....:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
31 May 2010 - 11:39 pm | इन्द्र्राज पवार
फोटोबद्दल तर प्रश्नच नाही... पण प्रवासाच्या सुरुवातीपासुनचे वर्णन हा देखील एक सुंदर फोटोच आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
31 May 2010 - 11:43 pm | श्रावण मोडक
व्हाया पुणेच ना? ओके... लक्षात ठेवतो. :)
एसटीची ट्रीक लिहिली कशाला जाहीररित्या? एखाद्या एसटीवाल्याने वाचली तर पुढच्या वेळेस मात्रा चालायची नाही ना!
फटू भारीच. पुढचा भाग केव्हा?
1 Jun 2010 - 9:28 am | jaypal
>>व्हाया पुणेच ना?
होय व्हाया पुणेच, सोलापुर रोड ने
>>एखाद्या एसटीवाल्याने वाचली तर पुढच्या वेळेस मात्रा चालायची नाही ना!
जल्ला मेला हाय काय न नाय काय त्या कॉन्स्टेबलला प्रमोशन देउन फौजदार करायचा. ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 May 2010 - 11:58 pm | हुप्प्या
वेड्या राघूनंतर दुसरा फोटॉ आहे तो खाटिक पक्षी (श्राईक).
राखाडी रंगाचा, चोचीत फट दिसणारा आहे एशियन ओपनबिल स्टॉर्क, म्हणजे चोच अर्धवट उघडी असणारा करकोचा आहे. बहुधा वयाने लहान असल्यामुळे रंग थोडा जास्त विटका आहे.
1 Jun 2010 - 9:32 am | jaypal
माहिती पुर्ण प्रतिसादा बद्दल धन्यवाद. :-)
मला वाटत श्राईक नंतर आहे तो वटवट्या आहे का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
1 Jun 2010 - 3:23 am | पाषाणभेद
फोटो बाकी नेहमीप्रमाणे मस्तच.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
1 Jun 2010 - 5:05 am | नंदू
जयपालजी,
सर्वच फोटो आवडले. वरून तिसरा मात्र विशेष जास्त.
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
नंदू
1 Jun 2010 - 5:59 am | सहज
भारी लेख, भारी फोटो.
अजुन येउ द्या.
1 Jun 2010 - 9:39 am | आशिष सुर्वे
jaypal भौ.. भन्नाट छायाचित्रे!
कुठला बरं कॅमेरा?
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
1 Jun 2010 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अवांतर आहे पण हा माझा स्वभाव आहे <<
ब्येष्ट!
फोटोतर त्याहून ब्येश्ट!
अदिती
1 Jun 2010 - 10:23 am | येडाखुळा
jaypal , निकॉन ७०-३०० म्हणजे मस्तच..थोड्या tight frames अजून सुंदर दिसतील..सहीच....
1 Jun 2010 - 10:40 am | चक्रमकैलास
दादा आम्हाला परत एकदा डच्चु दिलात... :W ....छान फोटो आलेत.....
--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
1 Jun 2010 - 1:15 pm | संजा
जयपालजी,
सर्वच फोटो आवडले.
पुढील भागाची वाट बघतोय.
संजा
1 Jun 2010 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार
जयपाला, फोटु एकदम अप्रतिम रे.
डोळे सुखावले बघ. फक्त त्या स्मायली टाळता आल्या तर खरच खुप छान लिखाण दिसेल असे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Jun 2010 - 1:55 pm | मस्त कलंदर
छानच फोटो..!!!!
बाकी, त्या बसच्या किश्शाबद्दल माझा अनुभव वेगळा आहे.. एकदा बेस्ट बसेस बद्दल चौकशी करायची होती. तेव्हा मला जस्टडायलवाल्यांनी माहिम बस डेपोचा नं देऊन तिथे विचारायला सांगितलं.. नि आश्चर्य म्हणजे तिथला माणूस जराही घाई न करता, अगदी सौजन्यपूर्ण बोलला. बोलणं संपल्यावर मी दोन मिनिटं तशीच फोन धरून होते.. कानांवर विश्वासच बसत नव्हता!! :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jun 2010 - 2:09 pm | jaypal
पण एस. टी. महामंडळ जरा अवघडच असत. :-(
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
1 Jun 2010 - 5:54 pm | satish kulkarni
अचानक ठरवलेले बेत हमखास यशस्वी होतात आणि मजा देतात...
1 Jun 2010 - 8:34 pm | स्वाती२
मस्त फोटो!
1 Jun 2010 - 11:12 pm | पक्या
जयपाला, सुरेख फोटो रे...सर्वच.
त्यातही बगळ्याचा प्रतिबिंब दिसत असलेला आणि उडतानाचा (टेक ऑफ च्या तयारीतला) फार आवडला.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
2 Jun 2010 - 10:02 am | पिंगू
आज सकाळी सकाळी डोळ्यांना भारी दर्शन झालं.. सुरुवात अतिशय भारी आणि शेवट नयनरम्य........
- पिंगू
2 Jun 2010 - 11:27 am | Manoj Katwe
स्टँडवरच ब्रश केला अंघोळीची गोळी खाउन चहा+बिस्कीट ब्रेक फ़ास्ट घेतला
हि गोळि कुठे मिळाते ते साण्गा ना राव
बाकी फोटो म्हणजे एकदम बेस्ट.
3 Jun 2010 - 1:36 am | बेसनलाडू
आवडली.
(पक्षीनिरीक्षक)बेसनलाडू
3 Jun 2010 - 5:02 am | चित्रा
भ्रमंतीचे कौतुक वाटते.
3 Jun 2010 - 6:40 am | धनंजय
तिसरे चित्र अतिशय आवडले. (स्वतःच्या वेगळ्या धाग्यात द्यायला हवे होते.)
पक्ष्यांची चित्रेही आवडली.
3 Jun 2010 - 8:31 am | भानस
जयपाल सगळेच फोटो मस्त आहेतच.... त्यातही चक्रवाक बदक, पिवळी चिमणी व बगला भगत बेष्टच.
3 Jun 2010 - 8:36 am | भाग्यश्री कुलकर्णी
फोटो फार छान आहेत.