ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
31 May 2010 - 12:59 pm

बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.

येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी. चित्रपटातील एका दृष्यात म्हणल्याप्रमाणे जणु काही शेळी आणी सिंहाची प्रेमकाहाणी.

इसाबेला स्वान (पण हिला मात्र आपली ओळख फक्त बेला अशी करुन द्यायला आवडते) हि एक १७ वर्षाची अल्लड तरुणी. तीच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा थोडीशी वेगळी, एकटे राहायला आवडणारी, थोडिशी अबोल, लाजरी-बुजरी, गर्दी टाळणारी तरुणी. फिनिक्स सारख्या स्वच्छ सुर्यप्रकाशातल्या शहरात आपल्या आईजवळ वाढलेली बेला, आईने वडिलांशी घटस्फोट घेउन एका बेसबॉल प्लेयरशी लग्न केल्यानंतर पुन्हा एकदा आपले वडिल चार्ली स्वान ह्यांच्याकडे वॉशींग्टनच्या फोर्क्स शहरात राहायला येते. फोर्क्स हे तसे लहानसे आणी पावसाळी शहर. बेलाचे वडील चार्ली हे तिथले पोलिस अधीकारी.

नविन शाळेतील मुले मुली ह्या अल्लड सुंदर बेलाशी दोती करण्यासाठी खुप उत्सुक आहेत पण बेला अजुनही आपल्याच एकट्या जगात गुरफटलेली आहे. नाही म्हणायला आल्या आल्या तीची गाठ फोर्क्स मधले जुने रहिवासी आणी वडिलांचे मित्र असलेल्या बिली आणी त्यांचा तीच्याच वयाचा मुलगा जेकब ह्यांच्याशी पुन्हा एकदा पडते. लहानपणी एकत्र घालवलेले दिवस दोघेही अजुन विसरलेले नाहीत.

हळुहळु शाळेतल्या एका छोट्याश्या ग्रुपमध्ये बेल रमुन जाते. तीचे मित्र देखील तिच्यासारखेच सरळमार्गी. ह्या मित्रांबरोबर एकदा कँटीनमध्ये बसलेली असताना बेलाची नजर एडवर्ड कलिन आणी त्याच्या कुटुंबातील इतर मुलांवर जाते. कलिन कुटुंबिय हे सतत एकत्र राहणारे व इतर विद्यार्थांपासून कायम चार हात दुर राहणारे आहे हि नविन माहिती तीला मित्र मैत्रीणींकडून समजते. एडवर्ड कलिन ह्या देखण्या आणी रुबबदार तरुणाकडे ती पाहाताचक्षणी आकर्षीत होते.

शास्त्राच्या पहिल्याच तासाला बेलाची जागा एडवर्डच्या शेजारीच येते. एडवर्ड मात्र बेलाला पाहिल्याबरोब्बर अस्वस्थ वाटायला लागतो. काही वेळातच तो एखादी दुर्गंधी येत असल्यासारखा चेहरा आणी नाक आक्रसायला लागतो. तास संपता संपता तो पटकन उठुन बाहेर देखील पडतो, इकडे बेला मात्र स्वतःच त्या दुर्गंधीचे मुळ असल्यासारखी अस्वस्थ होते. वर्गाबाहेर पडताना बेलाला एडवर्ड आपला क्लास चेंज करता येईल का ह्याची चौकशी करताना दिसतो आणी तीच्या रागात अजुनच भर पडते.

एडवर्ड येवढ्या कटुपणाने वागुन देखील बेला मात्र त्याच्याच विचारत अजुनच गुरफटली जायला लागते. त्यांतर काही दिवस बेलाला एडवर्डचे दर्शनच घडत नाही आणी एक दिवस तो अचानक वर्गात तिच्या आधी उपस्थीत असतो. ह्यावेळी मात्र एडवर्ड स्वतःहुन आपली ओळख करुन देतो आणी अगदी छान वागतो. पण त्या छान वागणुकीतही बेलाला एक गुढ डूब जाणवतच राहते. एक दिवशी बर्‍याच दुर उभा रहुन बेलाचे निरिक्षण करणार्‍या एडवर्डकडे बेला टक लावुन पाहात असतानच तिच्या मित्राचा गाडीवरचा ताबा सुटतो आणी त्याची गाडी भरधाव वेगाने बेलाच्या दिशेने यायला लागते. त्याची गाडी आणी स्वतःच्या गाडी मध्ये बेला चिरडणार येवढ्यात अचानक एडवर्ड क्षणार्धात तीथे अवतरतो आणी एका हाताने तो गाडी थांबवुन बेलाच जिव वाचवतो. त्याचा वेग आणी ताकद बघुन बेला आश्चर्यचकीतच होते.

एडवर्डकडून अर्थातच ह्या सगळ्याचा काहीच खुलासा तीला मिळत नाही. पण आता एडवर्ड कायम संकटात सापडलेल्या बेलाच्या सुटकेसाठी क्षणार्धात हजर व्हायला सुरुवात होते. कलिन्स कुटुंबाविषयी नाना अफवा कानावर पडतच असतात आणी कायम थंडगार शरीर असलेल्या, आपोआप डोळ्याचा रंग बदल जाणार्‍या एडवर्ड विषयीचे गुढ वाढतच असते. पुस्तके आणी इंटरनेटच्या मध्यमातुन कलिन्स कुटुंबीय, एडवर्डच्या शारीरीक अवस्था, सवयी ह्याची माहिती काढण्याचा बेला प्रयत्न करते. बेलाच्या प्रयत्नांना यश येते पण मिळालेल्या यशाने आनंद होण्याऐवजी बेलाला धक्काच बसतो. एडवर्ड हा कोणी सामान्य तरुण नसुन तो एक व्हँपायर आहे हे बेलाच्या लक्षात येते.

बेलाने मिळवलेल्या माहितीला एडवर्ड दुजोराच देतो आणी पहिल्यांदाच बेलाला आपले खरे स्वरुप दाखवतो. एडवर्ड आणी त्याचे कुटुंब हे काहीशे वेगळ्या प्रकारचे व्हँपायर्स असतत. मानवां ऐवजी जंगली जनावरांच्या रक्तावर ते आपली तहान भागवत असतात. एडवर्ड स्वतःची ओळख शाकाहारी व्हँपायर अशी करुन देतो. येवढे सगळे कळुनही बेला घाबरली नसुन उलट आपल्या अधिक जवळ आलेली बघुन एडवर्ड आश्चर्यचकीत होतो. तो तीला आपल्यापासून दुर राहण्याचा सल्ला देतो. तीच्या मानवी गंधापासून तो स्वतःला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. बेला मात्र आपल्या प्रेमावर ठाम असते. शेवटी एडवर्डला तीच्या प्रेमाचा स्विकार करायलाच लागतो.

एडवर्ड आता बेलाची आपल्या कुटुंबीयांशी देखील ओळख करुन देतो. त्याचे कुटुंबीय देखील बेलाचा आनंदाने स्विकार करतात. पण त्याच बरोबरीने त्यांचे सत्य उघड झाले तर काय हल्लकल्लोळ माजेल ह्याची देखील बेलाला जाणीव करुन देतात. बेलाच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद भरुन जातो.

एक दिवशी एडवर्ड बेलाला आपल्या कुटुंबीयांसमावेत बेसबॉल खेलण्यासाठीघेउन जातो आणे तिथेच ह्या दोघांच्या जीवनाला एक अनपेक्षीत वळण लागते. त्या ठिकाणी त्यांची गाठ एका मानवी रक्ताने तहान भागवणार्‍या दुसर्‍या व्हँपायर कुटुंबाशी पडते. ह्या कुटुंबातील जेम्स आता बेलाच्या मानवी गंधाने वेडापीसा होतो आणी तीच्या रक्तासाठी तिच्या जीवावर उठतो.

कुटुंबातल्याच एक मानलेल्या बेलाच्या जीवाची जबाबदारी आता संपुर्ण कलिन्स कुटुंब उचलते आणी जेम्सला संपवायचा निर्णय घेते. पुढे जे काय घडते त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यातच खरी मजा आणी उत्कंठा आहे.

एकुणच अजब म्हणावी अशी हि प्रेमकाहाणी प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवी.

स्टेफनी मेयर ह्या लेकीखेच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. ह्याच कथाकथानचे पुढचे भाग तीने 'न्यू मून', 'एक्लिप्स' आणि 'ब्रेकिंग डॉन' ह्या नावानी लिहिले आहेत. ह्यातील 'न्यू मून' ह्या पुढील भागावरील चित्रपट अर्थातच 'ट्वायलाईट भाग २ न्यू मून' देखील प्रदर्शीत झाला आहे. बेला आणी एडवर्डच्या जीवनात आलेले नविन वादळ त्यात चित्रीत करण्यात आले आहे. ह्या भगाविषयी लवकरच लिहितो.

कलामौजमजाचित्रपटमाध्यमवेधआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

31 May 2010 - 1:09 pm | अमोल खरे

बाकीच्या भागांविषयी पण लवकरच लिही.

वेदश्री's picture

31 May 2010 - 1:18 pm | वेदश्री

क्या बात है! अजब प्रेमकहाणी आवडली. :)

सहज's picture

31 May 2010 - 1:27 pm | सहज

अनुभवली आहे. मला दोन्ही भाग आवडले आता युयुत्सु व अदिती या दोघांपेक्षा जास्त आतुरतेने एक्लिप्सची वाट पहात आहे. ;-)

टिपीकल टिनएज हॉलीडे मुव्ही असे वाटले होते पण मस्त टिपी झाला. याचे कारण या कथा लिहणारी एक बाई आहे हे असावे का?

कथा व मांडणी छान भारी त्यामुळेच बाकी सगळे दुय्यम असुनही इंटरेस्ट टिकून राहीला.

प्रभो's picture

31 May 2010 - 9:39 pm | प्रभो

सहजरावांशी सहमत...
परिक्षण मस्त !!

स्वाती दिनेश's picture

31 May 2010 - 1:33 pm | स्वाती दिनेश

मस्त रे परा,
हा सिनेमा आणि बाकिचे भागही बघायला हवेच असे तुझे रसग्रहण वाचल्यावर वाटते आहे,
स्वाती

Dhananjay Borgaonkar's picture

31 May 2010 - 2:01 pm | Dhananjay Borgaonkar

चांगला आहे हा सिनेमा. शेवटची फाईट तर लै भारी आहे.
बेला पण बेस्ट आहे.खुप innocent वाटते. :P

भडकमकर मास्तर's picture

31 May 2010 - 2:07 pm | भडकमकर मास्तर

एकूणच व्हॅम्पायर , मानवी गंध, शाकाहारी असले तरी प्राण्यांचे रक्त पिणारे वगैरे प्रकारांची भीती वाटते... :&

दोन दिवसांत तीन वेळा ट्वायलाईट पाहणार्‍या परापासून त्याच्या क्याफेत जाणार्‍या मंडळींनी जपून राहावे असे सांगावेसे वाटते... #:S
#:S

ता.क. .. परा, मानवी गंधाविषयी तुझे मत काय आहे???

नितिन थत्ते's picture

31 May 2010 - 2:34 pm | नितिन थत्ते

मस्त ओळख.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2010 - 4:10 pm | बिपिन कार्यकर्ते

भारी... मारतो क्याफेत चक्कर.

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

31 May 2010 - 4:13 pm | छोटा डॉन

ह्या पिक्चरचे दोन्ही भाग भारी होते.
त्यातला पहिल्या भागाचे मस्त परिक्षण केले आहेस, दुसर्‍या भागाची वाट पहात आहे.

पटकन येऊदेत ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शानबा५१२'s picture

31 May 2010 - 7:37 pm | शानबा५१२

खुप दीवसांनी mobile मधल wattpad च version update केल तर 'featured work' मधे vampire आणि love,romance ह्याच विषयावर जास्त लिहल होत.मी बोललो काय साल्या एकाच विषयावर लिहलय....... कारण मी crime story शोधत होतो.........हे आता मला कळल त्या लेखकांवर कसल भुत चढलेल ते!!
आम्हाला आमच्या आवड्त्या कथा ज्या चित्रपटामुळे नाही भेटु शकल्या त्या चित्रपटाचा आम्ही निषेध करतो!!

आणि अशा पकाउ विषयाला रोचक रुप दील्याबद्द्ल 'परा' ह्यांचे आभार.....तुमच्या मुळे त्या चित्रपटाला आजुन प्रेक्षक भेटतील.

The Dark Knight पण भलताच गाजला पण तोही मला download करुन बघावसा नाही वाटला........सांगायचा भाग हा की.......हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.

शेणबा,श्यानबा,कोदा,ज्ञानबा,शिवबा,कडबा.............ई.

साभार...........
प्रणयकथेतील खाजकुमार!
(आता फिट्टुस झाल............you can stop or you can continue!)

*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!

इन्द्र्राज पवार's picture

31 May 2010 - 4:45 pm | इन्द्र्राज पवार

मी चित्रपट पाहिला.... आणि "व्हँपायर" या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित चित्रपटदेखील किती काव्यात्मकरित्या घेता येतात याचे सुंदर उदाहरण म्हणजे "ट्वायलाईट". निव्वळ ते कॉलेज, तो परिसर, कॅन्टिन, क्लासरूम, बेलाचे अन्य मित्रमैत्रिणीबरोबर समुद्रकिनार्‍यावर पिकनिकला जाणे, आणि एडवर्डचा तिथे येण्यास ठाम नकार....त्यामुळे बेलाचा गोंधळ.... या सर्व गोष्टींचे इतक्या सुंदररितीने चित्रीकरण झाले आहे की, हा एक भयपट आहे हे लक्षातच येत नाही.
("बेला" पात्रासाठी तरी सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा...!)

(राजकुमार ~~ जेकब आणि त्याच्या वडिलांकडून "बेला" ला वेळीच सावध करण्याचे प्रयत्न.... याबद्दल लेखात उल्लेख केला असता तर चालले असते असे मला वाटते.... अर्थात त्यामुळे बेलाच्या निर्णयात काही फरक पडत नाही ही गोष्ट अलाहिदा...! एनी वे... नाईस रिपोर्टिंग !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 May 2010 - 4:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्कंठा जागृत झाली.

अदिती

मिसळभोक्ता's picture

1 Jun 2010 - 8:23 am | मिसळभोक्ता

अच्छा अच्छा.

काही शब्द मराठीतून काढून टाकावेत. तुम्हाला काय वाटते ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मीनल's picture

31 May 2010 - 7:13 pm | मीनल

बघायला हवा.
पण अमानवी `अवतार` ने मात्र निराशा केली.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अमोल केळकर's picture

31 May 2010 - 7:16 pm | अमोल केळकर

मस्त माहिती आणि चित्रे ही

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

हर्षद आनंदी's picture

31 May 2010 - 7:34 pm | हर्षद आनंदी

मुव्हीज वर थोडासा चित्रपट पाहीला.. पण बाहेर जावे लागल्याने बाकीचा नाही बघता आला, म्हणुन लगेच त्याच रात्री डी-व्हीडी आणुन २ वेळा पाहीला..चित्रपटाची कल्पना भन्नाट आहे.

"प्रेम" आणि प्रेमासाठी सारे काही.. मग तो रक्तपिपासु व्हंपायर का असेना!!

बॅकग्राऊंडवर बेला सांगत असते...

I never given much thought on how to DIE..
.
.
.
.
.
.
but DIE in place of someone I LOVED seems better way to DIE!

आणि फ्रंटला तो हरीणाचा शॉट्!!

त्या क्षणापासुन चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या बॉल डान्स पर्यंत.. वाटत हा प्रवास संपुच नये!!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

स्वाती२'s picture

31 May 2010 - 7:36 pm | स्वाती२

मस्त ओळख. इथल्या मिडल्स्कूलर्स मधे खूप पॉप्युलर आहेत या सिरीजमधली पुस्तकं.

अम्रुताविश्वेश's picture

31 May 2010 - 8:38 pm | अम्रुताविश्वेश

मी सुद्धा दोन्ही भाग बघितले आहेत. तिसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत आहे.
छान परीक्षण.

:)

आवशीचो घोव्'s picture

31 May 2010 - 8:48 pm | आवशीचो घोव्

एडवर्ड बेलाकडे का आकर्षित होतो याचं कारण तुम्ही दिलं नाहीत.
चारच दिवसांपूर्वी न्यू मून पाहिला. एक्लिप्स पुढच्या महिन्यात येतोय. :)

फटू's picture

31 May 2010 - 9:30 pm | फटू

आतापर्यंत पोस्टरवरुन हॅरी पॉटर टाईपचा वाटत होता म्हणून पाहणं टाळत होतो. तुझ्या या परीक्षणाने चित्रपट पाहावा असं वाटू लागलं आहे.

निदान बेलासाठी तरी ;)

फटू

मदनबाण's picture

31 May 2010 - 9:36 pm | मदनबाण

छान परिक्षण...

मदनबाण.....

Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower

टारझन's picture

31 May 2010 - 9:47 pm | टारझन

मस्त परिक्षण रे !! तु पेपरात लिहायला लाग ... पुढारी वगैरे "आकडे" छापुन येणार्‍या पेपरांत तुझे हे परिक्षण छापुन आले तर त्या पेपरची सुद्धा इमेज सुधारेल . :)

तेव्हा घरात बघीतले होते खरे.
मी ,टीनएजर्सनी वाचायचे पुस्तक असेल म्हणून कव्हर बघून बाजूला ठेवून दिले होते.आता वाचावे म्हणतो.
काही सिनेमे परीक्षण वाचून बघीतले होते आणि बर्‍याच वेळ सिनेमापेक्षा परीक्षण चांगले वाटले होते.यावेळी तसेच होवो.
संधी मिळाली तर सिनेमा बघीन.मला डायलाग कळत नाहीत.सब टायटलवाला सिनेमा मिळतो आहे का ?

फटू's picture

31 May 2010 - 11:23 pm | फटू

इंग्रजी चित्रपटांमधले संवाद न कळण्याची समस्या काका लोकांनाही सतावते तर. मी आपला उगाचच मनाशीच खट्टू होत होतो की आपल्यालाच इंग्रजी चित्रपटांचे संवाद कसे कळत नाहीत...

फटू

भडकमकर मास्तर's picture

31 May 2010 - 11:57 pm | भडकमकर मास्तर

स्टार मूव्हीज, एचबीओ, झीस्टुडिओवर सध्या इन्ग्रजी सबटायटलसहित दाखवतात...
ते बरे पडते...

आवशीचो घोव्'s picture

1 Jun 2010 - 12:06 am | आवशीचो घोव्

http://www.opensubtitles.org/
http://www.subscene.com/
http://www.subtitlesource.org/
http://www.allsubs.org/

या दुव्यांवरून हव्या त्या चित्रपटाचे subtitles तुम्ही उतरवू शकता.

आळश्यांचा राजा's picture

31 May 2010 - 10:53 pm | आळश्यांचा राजा

बघायला पाहिजे. आपल्याला आवडतात असले सिनेमे. काय लहान पोरांसारखे असले सिनेमे बघतो या टिप्पण्या (बायकोच्या, आणखी कुणाच्या!) कानाआड करून परत परत या प्रकारचे सिनेमे बघण्यात मस्त मजा आहे.

(तुम्हा पुण्यात राहणार्‍या लोकांचं बरं आहे बाबा. छान थेटरं आहेत असले छान सिनेमे बघायला! )

आळश्यांचा राजा

चिन्मना's picture

1 Jun 2010 - 5:53 am | चिन्मना

चांगले परीक्षण. आजच नेटफ्लीक्स् वर चित्रपटाचे दोन्ही भाग क्यू मध्ये टाकले आहेत. परीक्षण आणि प्रतिक्रियांवरून चांगले असतील असं वाटतंय.

चिन

उत्तम परिक्षण पण तेवढाच बकवास आणि भंगार चित्रपट.
Typical teenage lovestory. Action, thriller, suspense वगैरेची आवड असेल तर अजिबात बघु नका.
मी वेअरवुल्फ आणि व्हँपायरसाठि पाहिले आणि पस्तावलो
. ~X(

इतका फ्रस्ट्रेट मी फक्त "जानी दुश्मन" पाहिल्यानंतर झालो होतो.

कथेमधे अनेक loose ends/अपुर्ण भाग असून तिच्या प्रेमळ आणि समजूतदार वडिलांसारखेच त्यांना फाट्यावर मारण्यात येते.
२ तासापैकी एकुण action चा भाग ४-५ मि. असेल. कदाचित वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बाईने लिहिल्यामुळे असेल पण प्रेमकथेला ९५-९७% महत्व ? आवरा. ज्यांना टीनएज लव्हस्टोरिज आवडतात त्यांच्यासाठी पर्वणी. बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही X(

खरे action/ game originated आवडणार्‍यांसाठी :
नविन आलेला प्रिन्स ऑफ पर्शिया चांगला आहे. अतिशय वेगवान. कुठेही आपण झक मारली किंवा डोक्यावरचे केस उपटावे असे वाटत नाही.

फटू's picture

1 Jun 2010 - 12:33 pm | फटू

बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही

आम्ही ईंजिनीयरींगला असताना सुमडीत बी ग्रेडचे पिच्चर पाहायलो जायचो. बराच वेळ आता येईल तसला सीन मग येईल अशी खुप वेळ वाट पाहायचो. पण तसले सीन काही यायचे नाहीत. उगाच आपली लहान मुलांची समजूत घालावे असे छोटे मोठे सीन मात्र खुप असायचे. :P

फटू

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 Jun 2010 - 9:02 am | डॉ.प्रसाद दाढे

उत्तम परिक्षण! पण मास्तर म्हणतो तसे परापासून जरा
जपूनच राहिले पाहिजे.. चिलखत- जिरेटोप घालूनच त्याच्या नखांचा
सामना करावा लागेल.
उत्कंठा निश्चितच वाढली आहे..

नंदन's picture

1 Jun 2010 - 12:07 pm | नंदन

सहमत आहे, उत्तम परीक्षण.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2010 - 11:10 am | निखिल देशपांडे

परा नक्की पाहणार रे चित्रपट
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!