घरोघरी तीच………..

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जनातलं, मनातलं
27 May 2010 - 1:53 pm

सगळ्याच्याच घरोघरी घडणारे नेहमीचे प्रसंग ! फक्त शब्दांत व्यक्त केलेत !
अश्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. कदाचित रटाळहि वाटेल. तरीही लिहिण्याचे धारिष्ट केले

घरोघरी तीच………..

मी ऑफिसला निघालेलो.
आधीच उशीर झालेला
त्यामुळे मी गडबडीत.
ती बाल्कनीत उभी पण माझ्या डोक्यांत फक्त ऑफिस.आणि ऑफिस..
मी गाडीला किक मारतो अन घाईने निघून पण जातो.
ऑफिसांत आल्याआल्या तिचा फोन
"जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” .

ती मला लाडात विचारते " आज काय आहे ? "
" कुठे काय बुवा ! दारारोजचेच रुटीन आणि काय असणार ! "
"काहीच कसं रे लक्षांत नाही राहत तुझ्या ?"
"अगं पण सांग तरी काय ते "
ती गाल फुगवून निघून जाते
मी मख्ख !
मी ऑफिसला जायची तयारी करण्याच्या विचारांत
" पप्पा काहीच कसं लक्षांत नाही हो तुमच्या ?” आज मम्मीचा वाढदिवस नाही का ”?
माझी लगेच ट्यूब पेटते. अरे बापरे ! मी स्वतःला दोष देतो.
सालं आजकाल असं का होते समजत नाही ?
"अगं ऐकल का ? माझी आज सुटी आहे बरं का ! तुझा वाढदिवस नाही का आज “
तिचा प्रतिसाद शून्य !
"आज मस्त संध्याकाळी पिक्चर टाकू अन बाहेरच जेवण करू या “
"आम्हीपण येणार बरं का पप्पा ”
मी खुणेनेच निखील अन सोनुला तिला समजावण्याची खूण करतो
अखेर तिचा रुसवा कमी आणि मी हु ssश्य !

हाच सीन पुन्हा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण !.
माझा वेन्धळेपणा म्हणा किंवा ऑफिसच्या तणावामुळे म्हणा असे प्रसंग कधीतरी घडतातच

तिला गजरा खूप आवडतो अन मी आणायला नेहमीच विसरतो
" तो संतोष पहा. दररोज अगदी न चुकता बायकोसाठी गजरा आणतो अन तुम्ही " ?
"अग आता आपलं काय नवीन लग्न झालय" ?
"पण मी म्हणते गजरा आणण्याचा आणि नव्या जुन्या लग्नाचा काय संबंध? बायको वर प्रेम असावे लागते त्यासाठी “

तिची नेहमीच अपेक्षा असते की नवीन किंवा तिच्या आवडीची साडी नेसली म्हणजे कधीतरी मी म्हणावं
"आज तू खूप छान दिसते ह्या साडीत हं ” !
किंवा कधीतरी म्हणावं
“ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे “.
पण असं बोलणं कधी जमलंच नाही सालं आयष्यात !
आता माझे अन तिचेही केस रुपेरी झालेले ………….

मात्र
सान्निध्यात ती असते तेव्ह्ना काही वाटत नाही ,
नसली तर मात्र ? ? ?
दिवस सरता सरत नाही
अन रात्रीचाही दिवस होतो,

निरंजन वहाळेकर

जीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

27 May 2010 - 2:07 pm | पर्नल नेने मराठे

आमच्या घरी..

* "जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” .

मी पोळ्या करत काहीतरी बोलत असते तर तो पार ऑफिसपाशी पोहोचत आलेला असतो. मला हे अर्ध्या तासाने लक्शात येते. :T

* हाच सीन पुन्हा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण !.

सकाळीच बर्याच फोनवर मी थ्य्यन्कु म्हणाले कि ह्याला लक्शात येत.
मग हा म्हणतो, पैसे घे न तुला काय हवे ते घे. 8|

* तिला गजरा खूप आवडतो अन मी आणायला नेहमीच विसरतो

एवढे केस नाहियेत डोक्यावर्..आणलान तरी देवाला वहावा लागेल. :>

* "आज तू खूप छान दिसते ह्या साडीत हं ” !
ह्याला बायकोचा ड्रेस दुसरिने घातला तरी कळायचे नाही. /:)

* मात्र
सान्निध्यात ती असते तेव्ह्ना काही वाटत नाही ,
नसली तर मात्र ? ? ?

घरात पसारा बघवत नाही ~X(

चुचु

मस्त कलंदर's picture

27 May 2010 - 3:44 pm | मस्त कलंदर

;;)
मुमु

आवशीचो घोव्'s picture

29 May 2010 - 8:02 am | आवशीचो घोव्

अवांतर : पर्नल जी, आपल्या नावाचा अर्थ काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर!

शुचि's picture

27 May 2010 - 3:21 pm | शुचि

रटाळ नाही आहे खूप छान आहे.
प्रेम नुसतं हृदयात असून काय उपयोग ते नित्य दरवळलं पाहीजे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2010 - 3:25 pm | बिपिन कार्यकर्ते

छान.

बिपिन कार्यकर्ते

मनीषा's picture

27 May 2010 - 3:28 pm | मनीषा

अतिशय सुरेख मनोगत .

आणि चुचुतै (का मामी? ..तिच ती एच आर वाली ) चे अनुभव ही :S

स्पंदना's picture

28 May 2010 - 3:07 pm | स्पंदना

मी शुची शी सहमत.

(जरा बायकोचा कान द्या इकडे मी तिला कान मंत्र देते)

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अरुंधती's picture

28 May 2010 - 10:20 pm | अरुंधती

आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग करून घेण्याची हीच तर संधी अस्ते ना भाऊ! ते गूगल क्यालेंडर, मोबाईलमधली रिमाईन्डर्स/ अलार्म्स कशासाठी असतात मग? त्यात सेट करून ठेवायच्या त्या त्या तारखा अन व्हायचं बिनघोर......
हापिसातल्या बॉसचा वाढदिवस न चुकता लक्षात ठेवला जातो, मग घरातल्या बॉसचा का नको? :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/