मॅकमामा

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
27 May 2010 - 6:47 am

अखेरीस मॅकमामा गेला. तसे बरेच दिवस आजारीच होता म्हणा! सुटला बिचारा!
मॅकमामाला जग दुसर्‍याच नावानं ओळखायचं, पण माझ्यासाठी तो मॅकमामाच. त्याच्या गालफडावर खूप आधी थोडसं मास होतं तेंव्हापासून ते तीसेक वर्षं खप्पड झालेल्या गालफडांवर दाढी वाढवून ती लपवण्याच्या त्याच्या प्रयत्नांतून ते अखेरीस लिव्हरला सूज आल्यानं पुन्हा त्याची गालफडं पुन्हा पुरीसारखी टम्म झाली तोपर्यंत माझ्या दृष्टीने तो कायम मॅकमामाच होता. 'मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार' या न्यायाने त्याने कधी मला आणि त्याच्या इतर भाच्यांनाही लंगोटीचा तुकडाही दिला नाही. पण तरी मॅकमामा तो मॅकमामाच. कधी विचारलं तर आपल्या चिरकट आवाजात खेकसायचा, 'रांडिच्यांनो, हिथे जॉकॉफिक्या आन व्ह्यायपीच्या फ्रेंच्याबिंच्या बाजारात आल्या, आणि तुम्ही आजून लंगोटीतनं बाहेर पडत नाही. कदी मोठे होनार का आयुष्यभर कुनाची मुती लांब जात्ये या शर्यती लावत र्‍हानार, आं?' मामा होत अमराठी, पण मराठी बोलायचा झोकात. भाषा अगदी मराठी माणसासारखी रांगडी, पण स्वभावही अगदी मराठी माणसासारखा. मामा आमच्यावर खेकसायचा, पण आमचे लाडही करायचा. स्वभाव त्याचा कोकणातल्या फणसासारखा, वरुन काटेरी पण आतून रसाळ आणि गोड. आमच्यातल्या दामल्यांच्या गोर्‍यागोमट्या विनूवर त्याचा फार जीव. विनूला तो सारखा मांडीवर बसवून घ्यायचा. त्याचे गोबरे गाल कुस्करायचा. मग मधे काहीतरी झालं वाटतं. एकदा विनूचे बाबा मामाच्या घरी आले आणि त्यांनी मामाला भोसड भोसड भोसडला. तेंव्हापासून विनू मामाच्या घरी यायचा बंदच झाला . मामाच कधीकधी आमच्यापैकी कुणाला तरी 'त्या विन्यानं शाळा बदलली की काय रे भडव्या..' असं विचारायचा आणि मांड्या खाजवत दातात अडकलेले गुटख्याचे कण थू थू थू करत थुंकायचा. (थांक यू, दळव्यांनु! ) अशा वेळी मराठी माणसासारखंच त्याच्या वरकरणी कठोर दिसणार्‍या रंगरुपात खळखळणारं निर्मळ असं पाणी दिसायला लागायचं! (थ्यांक यू, भाईकाका!)
चेंबूरच्या अगदी गरीब वस्तीत मॅकमामाच्या दोन खोल्या आहेत. त्यातल्या बाहेरच्या खोलीतल्या एका कुरकुरणार्‍या खाटेवर मॅकमामा सदैव पडून असायचा. मधूनच आपलं कळकट बनियन वर करुन आपलं केसाळ खपाटीला गेलेलं पोट खाजवायचा आणि आपल्या किरट्या आवाजात मामीला शिव्या घालायचा. मामा-मामीचं नातं असं काही औरच होतं. ते एकमेकाशी बोलायचे ते फक्त भांडणापुरतेच, पण त्यांच्या मनात बाकी एकमेकाबद्दल सागराइतकं अथांग प्रेम होतं. 'तुला उचलला चौघानी, गोळा आला तुला पटकीचा, जाळला तुला तडातडा वढ्याच्या काठावर...' असं काहीतरी आतल्या खोलीत मामी पुटपुटत असायची. आपल्याला मूलबाळ नाही याचं शल्य तिला मनात कुठेतरी टोचत असावं. 'भाईर शेन खाऊन खाऊन नको ती बीमारी घेतली आन घरच्या जमिनीला घालायला पानीबी न्हाई आता मुडद्याकडं' असं काहीतरी ती म्हणत असायची. लहानपणी आम्हाला काही कळायचं नाही. मी आपला मामासमोरच्या शेवचिवड्याचा बकाणा भरायचो. मामाही समोरच्या ग्लासातला ओल्ड मंकचा मोठा घोट घ्यायचा आणि ब्रिस्टॉल पेटवत 'छिनाल साली...' असं काहीतरी बरळायचा. मामीचं खरं नाव काय हे लहानपणी आम्हाला कधीच कळालं नाही. कधी मामाची गंमत करायची म्हणून आम्ही त्याला विचारायचो, 'मामा, मामा, आपल्या मामीचं नाव काय रे?' त्यावर तो एकदम तिरसटायचा . 'ढुंगणात दात आले काय रे तुला?' तो खाका चोळत वसकन ओरडायचा. ' नाव नको काढूस त्या रांडेचं..' तो ढास आवरत केकाटायचा. (थ्यांक्यू अगेन , दळव्यांनु!)
मग आम्ही मुलं मोठी झालो , आणि हळूहळू हरीतात्यांची, आपलं मॅकमामाची चेष्टाही करायला लागलो. (थांक यू, ...पण जाऊ द्या!) आमच्यातल्या सद्या पवाराचे बाबा मिल्ट्रीत होते. सद्या लहापणापासून तर महिन्याला कागदात बांधलेली कसली तरी लांबडी बाटली मामाला आणून द्यायचा आणि मामी चहाच्या डब्यातले सुट्टे रुपये सद्याला देता देता शिव्या घालायची. 'हितं पोटात गोळा झाला तर डाक्टरला दाखवायला पयसा न्हाई, आणि तू गाडवाचं मूत पी मुडद्या' असे काहीसे तिचे शब्द असायचे. आम्ही कॉलेजल्या गेल्यापासून तर सद्या मामाच्या नावाखाली त्याच्या बाबांकडून बाटली उचलायचा आणि होस्टेलवर स्वतःच पार्टी करायचा. असं पाचसहा महिने झालं तेंव्हा पैसे मागायला सद्याचे बाबा एकदा स्वतःच मामाच्या घरी आले. तेंव्हा या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला आणि सद्याच्या बाबांनी सद्याला (मिल्ट्रीच्या) बुटांनी तुडवला. हे सगळं चालू असताना मामा खाटेवर बसून छाती चोळत खोकत सगळ्या जगाला शिव्या घालत होता.
मग शेवटीशेवटी मामाकडे जाताना मीच ओल्ड मंकची हाफ घेऊन जायचो. मला बघताच मामाच्या पडक्या दातांच्या चेहर्‍यावर हसू उमटायचं. खोलीत एक कसला तरी कुंद, मळमळायला लावणारा दर्प साठलेला असायचा. 'गिल्लास घे, गिल्लास घे रे सायबा..' मामा खोकत म्हणे. मला नोकरी लागल्यापासून तो 'सायबा' म्हणायला लागला होता. ' अरे, जरा गंभीरपणे वागायला शीक, लोक साहेब म्हणून बघणार तुझ्याकडे..' असंच त्याला म्हणायचं असावं ( थ्यायुभा!) . मग मी त्याला आतल्या खोलीतला एखादा कळकट ग्लास आणून देत असे. मामा मग त्यात हावरेपणानं बाटलीतला एक मोठा पेग भरत असे आणि त्यात होय की नव्हे इतके पाणी घालून मोठा घोट घेऊन खोकत जगाला शिव्या देत छाती चोळत असे.
असा हा मॅकमामा शेवटी परवा गेला. आता कुणासाठी मी ओल्ड मंक विकत घेणार आणि कुणाला शेवचिवड्याची पुडी देणार? (माझा ब्रँड वेगळा आहे). देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं. न मागता दिली होती, न सांगता परत नेली!

समाजअनुभव

प्रतिक्रिया

II विकास II's picture

27 May 2010 - 7:49 am | II विकास II

बरेच दिवसांनी चांगले वाचायला मिळेल. संजोपकाकांचे जुने लेखन वाचले आहे. काका, ह्या पेक्षा कडक माल काढु शकतात.

मिभोकाकापण कधी लेखमौन सोडतात त्याची वाट बघतोय.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

शुचि's picture

27 May 2010 - 7:53 am | शुचि

विनू प्रकरणाची संदिग्धता मनास फार, खूप चटका लावून गेली - लेखकाचं यश.
वेगळ्याच सामाजीक स्तरावरील २ व्यक्तींचे खूप प्रभावी व्यक्तीचित्रण. भाषा वातावरणनिर्मीतीस पोषक.
व्यक्तीचित्रण हटके आहे, आवडलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन's picture

27 May 2010 - 9:03 am | टारझन

हा प्रतिसाद वाचुन "संजोपकाकांचे" तोंड कसे झाले असेल ते इमॅजिन करतोय
=)) =)) =))

बाकी हल्ली काका लोकांनी मागणी भरपुर .. आणि तुम्ही मामा लोकांवर लेख लिहीताय हे पाहुन डोळे पाणावले

-(अस्थि-दंत विमा एजंट) टारझन
ण्यु पॉलीसी: आम्ही ढुंगणाच्या दातांचेही विमे उतरवतो .

मनिष's picture

27 May 2010 - 9:26 am | मनिष

हेच म्हणतो. नलीमावशीचा spoof आवडला, पण वो बात नही.

मिभो नींही आता गॅसुद्दीन शमसुद्दीन सारखे काहितरी लिहावे.

छोटा डॉन's picture

27 May 2010 - 3:55 pm | छोटा डॉन

>>हा प्रतिसाद वाचुन "संजोपकाकांचे" तोंड कसे झाले असेल ते इमॅजिन करतोय

=)) =)) =)) =)) =))
१००% सहमत.
मी पण प्रतिसाद वाचुन हसुन हसुन येडा झालो ...

च्यायला आता कुठल्याहे लेखाला असेच प्रतिसाद द्यावेत.
लेखकाची सॉलिड चिडचिड होईल ;)

अवांतर :
सन्जोपराव, चांगला जमला आहे लेख.
समयोचीतही म्हणता येईल ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रभो's picture

27 May 2010 - 6:43 pm | प्रभो

=)) =)) =))

अप्पा जोगळेकर's picture

27 May 2010 - 8:29 am | अप्पा जोगळेकर

छान जमलंय. थोडंसं जयवंत दळवी ष्टाईल. 'सारे प्रवासी घडीचे' मधे पण एक कॅरॅक्टर आहे असं. काय बरं त्याचं नावं ? आठवत नाहीये.

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 1:57 pm | इन्द्र्राज पवार

"....'सारे प्रवासी घडीचे' मधे पण एक कॅरॅक्टर आहे असं. काय बरं त्याचं नावं ? .."

बहुतेक तुम्ही "जिवा शिंगे" किंवा "दादू गुरव" बद्दल बोलत आहात.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्पंदना's picture

27 May 2010 - 9:13 am | स्पंदना

लिखाण ओघवत आहे. =D>

त्यांच्यात दिवस करतात का हो?नाही ते ओल्ड मंक च नका विसरु नाही तर कावळा नाही शिवायचा. नाही तुमचा फार जीव दिसतो त्यांच्या वर ..आणि त्यांचा ओल्ड मंक वर.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

निस्का's picture

28 May 2010 - 2:15 am | निस्का

:)

नि...

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2010 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ.. रावसाहेब चालूद्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2010 - 10:08 am | बिपिन कार्यकर्ते

हा आमचा .. , याच्यावर आमचा भारी जीव.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

27 May 2010 - 10:17 am | ऋषिकेश

हॅ हॅ हॅ
;)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

आंबोळी's picture

27 May 2010 - 10:25 am | आंबोळी

आवडल....

आंबोळी

विसोबा खेचर's picture

27 May 2010 - 10:41 am | विसोबा खेचर

छान लिहिलं आहेस रे संजूमामा :)

तात्या.

प्रदीप's picture

27 May 2010 - 10:58 am | प्रदीप

चहूकडे (डोळ्यातून आलेल्या धारांमुळे!) अशी गत झाली बघा हे वाचून.....

काही थ्यांक्यू राहून गेले आहेत असे वाटते:

मामा-मामीचं नातं असं काही औरच होतं. ते एकमेकाशी बोलायचे ते फक्त भांडणापुरतेच, पण त्यांच्या मनात बाकी एकमेकाबद्दल सागराइतकं अथांग प्रेम होतं.

इथे एक. सबंध लेखात हे सागराइतके प्रेम कसे होते ते काही समजले नाही, तरीही.

आणि

देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं. न मागता दिली होती, न सांगता परत नेली!

ह्या टाळीघेऊ वाक्यावरही!!!

पहिल्याच वाक्यावर अडखळलो होतो!! ज्याच्या तथाकथित 'जंक' वगैरे खाण्यावर काही वर्षे काढलीत, त्याचा कारभार एकदम गुंडाळला की काय अशी भीति वाटून गेली. तसे काही नाही हे कळल्यावर हायसे वाटले!! तेव्हा ह्या लेखातून तसे काही तुम्ही सांगत नाही आहात, ह्याबद्दल सन्जोप रावांना माझ्यातर्फे थ्यांक्यू!!

निरन्जन वहालेकर's picture

27 May 2010 - 11:13 am | निरन्जन वहालेकर

अतिशय ओघवती भाषा व वाचनास भाग पाडणारी लेखनशैली !
मजा आली वाचायला ! अजून असेच काहीतरी येवू देत. आम्ही वाट पाहतो

शैलेन्द्र's picture

29 May 2010 - 2:14 pm | शैलेन्द्र

"अजून असेच काहीतरी येवू देत. आम्ही वाट पाहतो"

असेच काही येणं इतर कच्च्या मालावर अवलंबुन आहे हो... कच्चा माल मागवा ना थोडा..

चेतन's picture

29 May 2010 - 2:31 pm | चेतन

लगे रहो सुसुभाय ;)

मृगनयनी's picture

27 May 2010 - 11:21 am | मृगनयनी

'हितं पोटात गोळा झाला तर डाक्टरला दाखवायला पयसा न्हाई, आणि तू गाडवाचं मूत पी मुडद्या' असे काहीसे तिचे शब्द असायचे.

हे वाक्य काळजाला भिडलं! ;) ;) ;) डोळेपाणवले......

कोणी असं करू शकेल का? या कल्पनेनेच मळमळलं !

बाकी विडंबन छान आहे... अजून येऊ देत... राव'जी! :)

टीप : "दामल्यांचा विनु" लहानपणी जास्तच गोंडस आणि ग्गोग्गोड्ड दिसत असावा... याबद्दल शंका नाही! ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दत्ता काळे's picture

27 May 2010 - 11:34 am | दत्ता काळे

मॅकमामा डोळ्यासमोर उभा राहीला.

इरसाल's picture

27 May 2010 - 11:55 am | इरसाल

नशीब मला वाटले हे पण लालीमावशी सारखे म्याक्मोहन बद्दलचे प्रकरण आहे

स्वाती दिनेश's picture

27 May 2010 - 12:04 pm | स्वाती दिनेश

म्याकमामा वाचताना सर्केश्वरांचा ग्यासुद्दिन आठवला,
फक्कड जमून आला आहे लेख,
स्वाती

नितिन थत्ते's picture

27 May 2010 - 12:23 pm | नितिन थत्ते

संजोपमामांना म्याकमामाचं यवढं कवतिक का बुवा? लेखांवर लेख?

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2010 - 2:27 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो, त्या दोघांचं ठरलंय आपापसात, की एकमेकांना त्रास नाही द्यायचा. म्हणून कवतिक करत असतील. :D

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 3:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण निमित्त मात्र चुकीचं शोधलं असं वाटत आहे. असो.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2010 - 3:21 pm | बिपिन कार्यकर्ते

बाडिस. निमित्त खटकतंय.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

27 May 2010 - 12:58 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... भारी.

शुचि's picture

27 May 2010 - 2:12 pm | शुचि

सन्जोपराव drove most compelling point home - जीवन समृद्ध करणारी माणसं ही किती अनपेक्षित स्तरांतून येतांत, जर आपल्या मनाची कवाडं उघडी असतील.
सुरेख लिखाण!!!!
=D> =D>

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मिसळभोक्ता's picture

28 May 2010 - 12:56 am | मिसळभोक्ता

अरे ह्या अशा (म्हंजे कशा, ते विचारू नका) प्रतिसादांना आवरा रे !

पण संजोपराव, तीर निशानेपे म्हणतात तसंच लिखाण.

पुतण्याच्या छातीतून आरपार, आणि काका ठार !

(अवांतरः कॅथोलिक चर्च चे "ते" प्रकरण झाल्यापासून, काही व्यक्तिचित्रांतला "बालपणीचा काळ सुखाचा" री-एव्हॅल्युएट करने आवश्यक आहे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 3:19 pm | इन्द्र्राज पवार

"....देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं..."

खरंय... आणि विशेष म्हणजे देवाकडे आपण न मागताच सहजगत्या अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि कशाचीही अपेक्षा न करता शेतात पोपट नाचविल्यागत आपले जीवन अशा आठवणींनी हिरवेगार करून निघून जातात.

सुंदर !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रकाश घाटपांडे's picture

27 May 2010 - 4:33 pm | प्रकाश घाटपांडे

कदी मोठे होनार का आयुष्यभर कुनाची मुती लांब जात्ये या शर्यती लावत र्‍हानार, आं?'

अंमळ जीवन शिक्शन मंदिराची आठवन आली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शैलेन्द्र's picture

27 May 2010 - 7:36 pm | शैलेन्द्र

हे वाक्य र्‍हद्याला जावुन भिदुन परत आले..:-)

अभिज्ञ's picture

27 May 2010 - 8:36 pm | अभिज्ञ

मध्यंतरी केसु शेठचा तडका अनुभवला अन आता रावसाहेब,,,
तात्या देखील नवीनच फार्मात आलेले दिसतात.
तात्या,केसु,सन्जोपराव ह्यांचे एकामागोमाग धागे येताना पाहून मिपावरचे पुर्वीचे दिवस आठवले.
आता मिभोंनी देखील आपली लेखणी म्यानातुन काढावी अन मिपावरचे पुर्वीचे दिवस पुनःस्थापित करावेत असे सांगावेसे वाटते.
गेला बराच काळ इथल्या जनतेने नुसत्याच पिठल्या भाकरी वर दिवस काढलेत. काहि दिवस तर तेहि मिळत नव्हते.
आता ह्या ज्येष्ठ मंडळींना नम्र विनंती कि आता हे भरलेले ताट नेहमी असेच भरलेले राहो व सगळयांना त्याचा आनंद घेता येवो.

रावसाहेब,टायमिंग चुकले असले तरी लेख चांगला झालाय हे सांगायला नकोच.

(उपाशी) अभिज्ञ

--------------------------------------------------------
निगेटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

फटू's picture

27 May 2010 - 9:34 pm | फटू

तुम्ही आणि तुमचा मॅकमामा यापैकी कोकणातलं कोण आहे?

- फटू

हुप्प्या's picture

27 May 2010 - 9:52 pm | हुप्प्या

अनपेक्षित विषयावरील विडंबन. पण मजा आली.

नशीब म्याक मोहनच्या नावाचा उल्लेख नाही. नाहीतर त्याच्या कुटुंबियानी अब्रूनुकसानीचा खटला भरला असता ;-).

मुक्तसुनीत's picture

29 May 2010 - 6:18 am | मुक्तसुनीत

आवडलेल्या पोस्ट्स वर आवर्जून प्रतिसाद दिले जातात; नावडलेल्या पोस्ट्स ना उजवी घालून पुढे जाता येते हा नेहमीचा रिवाज झाला. इथे हा रिवाज मोडून कटुता पदरी पाडून घेण्याचा धोका स्वीकारतो आहे.

या प्रस्तुत धाग्यावर ज्या मूळ धाग्याचे विडंबन आहे (असे मला वाटते) त्या मूळच्या धाग्यावर रक्तानात्याच्या माणसाच्या निधनाबद्दलचे विचार आहेत. त्या प्रसंगाच्या गांभीर्याशी तादात्म्य न पावणे अगदी सहज शक्य आहे. मात्र त्याची इतकी अभिरुचीविहिन चेष्टा बरोबर नाही.

असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2010 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळच्या धाग्यावर रक्तानात्याच्या माणसाच्या निधनाबद्दलचे विचार आहेत. त्या प्रसंगाच्या गांभीर्याशी तादात्म्य न पावणे अगदी सहज शक्य आहे. मात्र त्याची इतकी अभिरुचीविहिन चेष्टा बरोबर नाही.

सहमत आहे...!

-दिलीप बिरुटे

डॉ.श्रीराम दिवटे's picture

29 May 2010 - 3:22 pm | डॉ.श्रीराम दिवटे

उत्तम चित्रण
आवडले.