सोनिया गांधी : एक चरित्र

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
22 May 2010 - 10:14 am

भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल.

अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि. 'रशिद किडवई" हे सोनियांच्या घरापर्यंत बर्‍याचदा जाऊ शकणार्‍या व्यक्तींपैकी एक. अश्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिले आहे हे बघुन त्यातील माहिती केवळ "सोनियास्तुती" नसेल अशी अपेक्षा होती आणि ती काहि अंशी पूर्ण झाली.

सोनिया गांधींचे बालपण, कॉलेज, राजीव गांधीचा जीवनात प्रवेश, इंदीरा गांधींबरोबरचे संबंध, संजय गांधींबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, मनेका गांधींचा प्रवेश, राजीव गांधींबरोबरच्या त्यांच्या गप्पा , राहूल गांधी - प्रियांकाचा प्रवेश, राजकीय घडामोडी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य परदेशी स्त्रीचा एका खंडप्रा:य देशाची नेत्री म्हणून केलेला प्रवास ह्या पुस्तकात खूप सुंदर मांडला आहे.

पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोनियांच्या चरित्राबरोबरच पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील कॉंग्रेसचा प्रवासही नीट समोर येतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास बर्‍याचदा वाचला जातो. त्याच बरोबर हा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासही तितकाच रोचक व नाट्यापूर्ण घटनांनी भरलेला व भारलेला आहे. आणिबाणी असो वा मंडल आयोग, संजय गांधींची "मारूती" असो वा नसबंदी, बाबरी मशीद असो वा भारताने लढलेली युद्धे किंवा त्यांनी केलेला पंतप्रधानपदाचा (तथाकथित) त्याग ह्या व अश्या अनेक प्रसंगांतून बदलता देश, बदलती काँग्रेस, बदलते राजकारण व त्यातून राजकारणापासून जाणिवपूर्वक दूर असणार्‍या व पतीनिधनानंतर तर राजकारणापासून पूर्ण संबंध तोडणार्‍या एका स्त्रीचा प्रवास अतिशय रोचक आहे. हा नुसता सोनिया गांधींचा प्रवास नसून त्यांच्या परदेशी संस्कारांना देशी संस्कारात ढाळण्याचा देखील प्रवास आहे, तो "गोरी बहु" ते "देसी बिटीया" ते "मॅडम" असा प्रवास आहे, तो अवखळ मुलगी, ते मनस्वी प्रेयसी, ते एकनिष्ठ पत्नी, लाडकी सून व खेळकर वहीनी, ते आई, ते विधवा, ते काँग्रेस अध्यक्षा असा विस्मयकारक प्रवास आहे.

गांधी घराण्याबद्दल, किंवा सोनिया गांधींबद्दल तुम्हाला आदर असो किंवा राग असो, त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते. आणि हे पुस्तक त्या उत्सुकतेला बराच न्याय देते. त्यामुळे एका निराळ्या स्त्रीचे निराळे व अतिशय रोचक चरीत्र वाचण्यासाठी हे पुस्तक सुचवतो.

वाङ्मयराजकारणआस्वाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 May 2010 - 10:19 am | प्राजु

...त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते.

हे मात्र १००% खरं!
पुस्तक मिळालं तर नक्की वाचेन.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

आळश्यांचा राजा's picture

22 May 2010 - 11:48 am | आळश्यांचा राजा

खरंय.

आळश्यांचा राजा

मदनबाण's picture

22 May 2010 - 12:10 pm | मदनबाण

त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते.

खरयं...
बाई पॉवरबाज हाय...सगळ्यांना कसं मुठीत ठेवल हाय तिने...भल्या भल्यांना जे जमेना व झेपेना..ते सर्व मॅडम सहज करताना दिसत हायेत...
विदेशीच्या नावाने विरोध करणार्‍यांची नरडी कशी सुकी पडली हे आता काही वेगळे सांगायला नको... ;)
भारतात सध्या दोनच रिमोट कंट्रोलधारी व्यक्तीमत्व मला दिसतात...ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे :--- चॅनल शिवसेना आणि सोनिया गांधी :--- चॅनल कॉग्रेस.
गचकन बटन दाबले की पटकन चित्र बदलते बघा... ;)
पुस्तक नक्कीच वाचनीय असेल...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

बाई पॉवरबाज हाय...सगळ्यांना कसं मुठीत ठेवल हाय तिने...

एका स्त्री ने पॉवरबाज होण चुकीचे आहे का ? कि एका स्त्रीने सगळ्याना मुठीत ठेवण चुकीचे आहे ????

इंदिरा गांधी , राणी लक्ष्मी बाई , रजिया सुलतान देखील स्रीयाच होत्या .

आंबोळी

टारझन's picture

23 May 2010 - 2:00 pm | टारझन

वर आंबोळ्यानं अधोरेखित केलेला शब्द खरंच खुप क्लेषदायक आहे ... एवढ्या मोठ्या आणि कर्तबगार स्त्री ला असं चार चौघात "बाई" म्हणनं ? ? ?? किती कष्ट पोचले माझ्या आत्म्याला .... :(

इंदिरा गांधी , राणी लक्ष्मी बाई , रजिया सुलतान देखील स्रीयाच होत्या .

हा शब्द काळजाला भिडला !!

- (काँग्रेस च्या अगाध प्रतिभेचा फॅन) पंजा

विसोबा खेचर's picture

22 May 2010 - 12:22 pm | विसोबा खेचर

सर्वभौम भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती कोण असावेत, हे ठरवण्याचे सर्वाधिकार एका इटालियन स्त्रीच्या हाती आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे..

तात्या.

तिमा's picture

22 May 2010 - 2:31 pm | तिमा

सर्वभौम भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती कोण असावेत, हे ठरवण्याचे सर्वाधिकार एका इटालियन स्त्रीच्या हाती आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे..

पण ते अधिकार संपूर्ण भारतीय बनावटीच्या लालू, मुलायम, माया, ममता इत्यादिंच्या हाती नाहीत हे सुध्दा आपले भाग्यच!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भारद्वाज's picture

22 May 2010 - 2:39 pm | भारद्वाज

अचूक मत.

मनिष's picture

22 May 2010 - 2:48 pm | मनिष

सहमत!

संताजी धनाजी's picture

22 May 2010 - 5:30 pm | संताजी धनाजी

खरय
- संताजी धनाजी

वाहीदा's picture

22 May 2010 - 5:50 pm | वाहीदा

खरेच या बाबतित भाग्यवान आहोत आपण !!
अगदी खरे बोललात साहेब तुम्ही :-)
~ वाहीदा

विसोबा खेचर's picture

23 May 2010 - 10:18 am | विसोबा खेचर

पण ते अधिकार संपूर्ण भारतीय बनावटीच्या लालू, मुलायम, माया, ममता इत्यादिंच्या हाती नाहीत हे सुध्दा आपले भाग्यच!

लालू, मुलायम, माया, ममता ही मंडळी नालायक आहेत हे मान्य..परंतु ती भारतीय आहेत, आपली आहेत.

तात्या.

शिल्पा ब's picture

23 May 2010 - 10:34 am | शिल्पा ब

म्हणजे देश फक्त आपल्या भारतीयांनीच बुडवावा असे काही धोरण आहे का?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

डावखुरा's picture

22 May 2010 - 4:32 pm | डावखुरा

धन्यवाद ऋषिकेष पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल....

प्राजुतै च्या मताशी सहमत...तर....

[...त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते.]>

तिरशिन्गराव एकदम अचुक टिपलंत हं... :> (पण ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे हे ही तितकेच खरे... #:S #:S )
पण विनोद बुद्धीला दाद..हहपुवा
=)) =)) =)) =)) =)) =))
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

भडकमकर मास्तर's picture

22 May 2010 - 6:00 pm | भडकमकर मास्तर

पुस्तकाची ओळख उत्सुकता निर्माण करणारी आहे...
तिरशिंगरावांची कॉमेन्ट ब्येस्ट...
अवांतर : हल्ली कसं, सगळा वेळ याच्यापेक्षा ते बरं त्याच्यापेक्षा ह्ये बरं असंच करण्यात जातो.. इलाज नाही

ऋषिकेश ,
(अवांतर : )
रशिद किडवई हे पद्मश्री नैना लाल किडवई यांचे पति आहेत का ?
~ वाहीदा

ऋषिकेश's picture

22 May 2010 - 7:58 pm | ऋषिकेश

होय तेच ते.. नैना लाल किडवईंवरही एक सुंदर पुस्तक चाळलं होतं मागे एका मित्राकडे.. नाव विसरलो

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सोम्यागोम्या's picture

22 May 2010 - 8:08 pm | सोम्यागोम्या

>>एका खंडप्रा:य देशाची नेत्री म्हणून केलेला प्रवास
कुठलंही संवैधानिक पद त्या भूषवित नाहीत त्यामुळे वरील वाक्य चुकीचे आहे असे वाटते. एका खंडप्रा:य देशाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्री असं म्हणा हवं तर.

ऋषिकेश's picture

22 May 2010 - 11:05 pm | ऋषिकेश

कुठलंही संवैधानिक पद त्या भूषवित नाहीत

त्या खासदार आहेत (व कॅबिनेट दर्जा ही आहे) जे संवैधानिक पद आहे.
त्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षाही आहेत, पण ते संवैधानिक पद नाहि

बाकी, प्रतिक्रीयेबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सोम्यागोम्या's picture

23 May 2010 - 4:10 am | सोम्यागोम्या

आम्ही आमची चूक कबूल करतो. पण खासदार म्हणजे देशाच्या नेत्या नव्हे ! त्या मतदार संघाच्या नेत्या आहेत. तुम्ही तुमची चूक दुरुस्त करायला तयार नाहीत. पुन्हा सांगावेसे वाटते त्या देशाच्या नेत्या नसून एका पक्षाच्या नेत्या आहेत.

पण खासदार म्हणजे देशाच्या नेत्या नव्हे ! त्या मतदार संघाच्या नेत्या आहेत. तुम्ही तुमची चूक दुरुस्त करायला तयार नाहीत. पुन्हा सांगावेसे वाटते त्या देशाच्या नेत्या नसून एका पक्षाच्या नेत्या आहेत.

मग भारतात देशाचा नेता / देशाच्या नेत्री कोणास म्हणावे? आपल्याकडे संपूर्णदेश मिळून कोणाही एका व्यक्तीस आपला नेता घोषित करत नाहि. आपले सध्याचे पंतप्रधान तर निवडणूकही लढवत नाहित मग तेही देशाचे नेते नाहित का? खासदारांना बर्‍याचदा राष्ट्रीय नेते म्हणतात त्या अर्थी सोनिया गांधी राष्ट्रीय नेत्या नव्हेत का?

बाकी इथे सोनिया विषय समांतर असला तरी नेता कोणास म्हणावे हा अवांतर मुद्दा असल्याने या विषयावर हा माझा या धाग्यावरचा शेवटाचा प्रतिसाद.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सोम्यागोम्या's picture

23 May 2010 - 9:02 pm | सोम्यागोम्या

>>मग भारतात देशाचा नेता / देशाच्या नेत्री कोणास म्हणावे?
पंतप्रधानांना. पंतप्रधान हे पद भूषविणारी व्यक्ति देशाचा नेता असते.

>> खासदारांना बर्‍याचदा राष्ट्रीय नेते म्हणतात त्या अर्थी सोनिया गांधी राष्ट्रीय नेत्या नव्हेत का?
राष्ट्रीय नेत्या हा शब्द देशाच्या नेत्या याहून वेगळा आहे तिथे स्तर या अर्थाने तो शब्द वापरला जातो. (उदा. प्रादेशिक नेता राष्ट्रीयस्तरावरील नेता) तुम्ही आता शब्द फिरवत आहात. देश सोडून राष्ट्रीय म्हणायला लागलात.
प्रत्येक खासदार हा देशाचा नेता नव्हे, जसे की संघातील प्रत्येक खेळाडू हा कप्तान नव्हे.

>>बाकी इथे सोनिया विषय समांतुम असला तरी नेता कोणास म्हणावे हा अवांतर मुद्दा असल्याने या विषयावरठरहा माझा या धाग्यावरचा शेवटाचा प्रतिसाद.

सांगितलेल्या मुद्द्यवर समंजस पणे चर्चा करायची की अवांतर म्हणून निघून जायचे हे तुमचं तुम्हीच ठरवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> प्रत्येक खासदार हा देशाचा नेता नव्हे, जसे की संघातील प्रत्येक खेळाडू हा कप्तान नव्हे. <<
प्रत्येक खासदार संसदेत घेतल्या जाणार्‍या निर्णयांमधे भाग घेतो आणि बरेचसे निर्णय संपूर्ण देशासाठी असतात, उदा: देशाचा, रेल्वेचा जमाखर्च, महिला आरक्षण इ.
संघातला प्रत्येक खेळाडू हा देशाचा प्रतिनिधीच असतो, कप्तान मॅनेजर म्हणून त्याला काम जास्त आणि पगार जास्त येवढंच!

ॠ, पुस्तकओळख आवडली. स्वतः पैसे देऊन हे पुस्तक घेईन असं नाही, मिळालं तर सोडणारही नाही.

अदिती

अरुंधती's picture

22 May 2010 - 8:10 pm | अरुंधती

हम्म्म वाचायला हवं एकदा हे पुस्तक! तशी आंतरजालावरही बरीच माहिती उपलब्ध आहे. पण ह्या पुस्तकातील माहिती नक्कीच अधिक तपशीलवार असेल! ऋषिकेश, पुस्तक परिचयाबद्दल धन्स! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

धनंजय's picture

22 May 2010 - 8:11 pm | धनंजय

पुस्तक ओळख आवडली

शिल्पा ब's picture

22 May 2010 - 9:55 pm | शिल्पा ब

काँग्रेजी लोकांना त्यांचा नेता गांधीच पाहिजे असतो...आपल्यातलाच एखादा पुढे जाण्यापेक्षा गांधी नेहरू बरा असेच धोरण असते....भले त्याची पात्रता असो वा नसो...बाकी बाई सुरुवातीच्या राजकारण प्रवेशातील दिवसांपेक्षा खूपच प्रगल्भ झाल्या असे वाटते.... कॉंग्रेस अध्यक्षा म्हणून जबाबदारी चांगली वठवत आहेत....बाकी लालू, मुलायम, मायावती, ममता इ. थोर नेते भारताचे भवितव्य ठरवत नाहीत हे भाग्यच म्हणायचे...तिमा शी सहमत...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

विजुभाऊ's picture

23 May 2010 - 8:05 pm | विजुभाऊ

काँग्रेजी लोकांना त्यांचा नेता गांधीच पाहिजे असतो
असेच काही नाही.... पारटी विथ अ डिफरन्स वाले भाजपीयन्स.. ज्या संजय गान्धी ना आयूष्यभर आनि मेल्यानन्तरसुद्धा शिव्या घातल्या
त्यांच्याच आयडीयॉलॉजीवर चालणारे वरूण गांधी भाजपीयन्स चे एक प्रमुख नेते आहेत. हे भाजपा चे दुर्दैव की त्यांचा संधीसाधू स्वभाव हे कळत नाही. मुख्य म्हणजे संघ परीवार या बाबतीत मिठाची गुळणी धरून आहे.
याला योगायोग किंवा काव्यगत न्याय म्हणवत नाही.

आंबोळी's picture

24 May 2010 - 9:16 am | आंबोळी

>>त्यांच्याच आयडीयॉलॉजीवर चालणारे वरूण गांधी भाजपीयन्स चे एक प्रमुख नेते आहेत. हे भाजपा चे दुर्दैव की त्यांचा संधीसाधू स्वभाव हे कळत नाही.
मला तरी हे काट्याने काटा काढण्यासारखे वाटतय... संधीसाधूपणा म्हणायलाही हरकत नाही... पण राजकारणात जर तुम्हाला संधी साधता येत नसेल तर तुम्ही टिकणारच नाही... आणि टिकूही नये.

आंबोळी

टारझन's picture

23 May 2010 - 2:22 am | टारझन

काडी लावा त्येजायला सगळ्यांना !!! बाकी "सोनिया गांधी" बद्दल कसलीही उत्सुकता नसलेला कठिण भारतीय मी सापडलो =))

:) च्यायला आपुण देशातलं काय बदलु शकत नाय .. देश बदलुन पाहु =))

llपुण्याचे पेशवेll's picture

24 May 2010 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll

मी दुसरा. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

स्वप्निल..'s picture

25 May 2010 - 12:41 am | स्वप्निल..

मी नंबर ३ :)

आंबोळी's picture

25 May 2010 - 9:07 am | आंबोळी

कौल काढावा काय?

आंबोळी

chipatakhdumdum's picture

23 May 2010 - 2:45 am | chipatakhdumdum

भारत खंड:प्राय, लोकसंख्येने की काय ? एरिआ बघितली तर सहारा वाळवंट भारताच्या दुप्पट आकाराच आहे. श्याटभर पेपरात हल्ली नगरसेवक सुद्धा दिग्गज राजकारणी म्हणून वर्णिले जातात, चालू द्या, मिसळपाव चा संध्यानंद का होउ नये ?

ऋषिकेश's picture

23 May 2010 - 7:31 pm | ऋषिकेश

सहारा वाळवंट एका देशात नाहि. आणि देशांच्या विस्तारात आपण जगात ७वे आहोत.. तेव्हा आपला विस्तार मलातरी खंडःप्राय वाटतो.

बाकी सोनिया गांधीही जर तुमच्या दृष्टीने दिग्गज राजकारणी नसतील तर म्या पामर काय बोलणार म्हणा ;)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चिरोटा's picture

23 May 2010 - 11:26 am | चिरोटा

अश्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिले आहे हे बघुन त्यातील माहिती केवळ "सोनियास्तुती" नसेल अशी अपेक्षा होती आणि ती काहि अंशी पूर्ण झाली.

पुस्तक वाचनिय असेल. चरित्रात त्यांच्याकडून्,राजीव गांधींकडून्,इंदिरा गांधींकडून ज्या राजकिय चुका झाल्या त्याविषयी माहिती आहे का? उ.दा.इंदिरा गांधींनी आणिबाणी लादणे? कारण सोनिया गांधी ह्या सर्व घटनांच्या साक्षीदार आहेत.ह्या अशा सर्वच घटनांचे सोनिया गांधींनी समर्थन केले नसावे अशी अपेक्षा आहे.
भारतिय लोकांनी लिहिलेली बहुतांशी (आत्म)चरित्रे ही वरील बाबतीत कमी पडतात असा अनुभव आहे.पाश्चिमात्य लोकांसारखे सर्व गोष्टी खुल्या मनाने कबूल करणे आपल्याला जमत नाही.म्हणूनच पुपुल जयकर ह्यांनी लिहिलेले इंदिरा गांधींचे चरित्र असो वा आणि कुठ्ले,तेवढी वाचनिय होत नाहित.

P = NP

ऋषिकेश's picture

23 May 2010 - 7:08 pm | ऋषिकेश

यात आणिबाणिच्या वेळचे घरातील वर्णन आहेच.. मात्र त्यावेळी सोनिया गांधी जराही राजकीय मते देत नसत व त्या राजकीय दृष्ट्या पूर्ण "पॅसिव" होत्या. पुढे राजीवगांधी पुढे येऊन लढू लागले तेव्हा त्या त्यांच्या बरोबर असत.. मात्र तरीही स्वतःची मते देत नसत (किंबहुना त्यांना ती नसतच.. बहुदा याचे कारण त्यांना देश, त्याचा इतिहास वगैरेचे ज्ञान सासूकडून, नवर्‍याकडून हळुहळू मिळू लागले होते.. त्यावर मत व्यक्त करण्याइतका अभ्यास त्यांचा नसावा (असा माझा तर्क) ).
बाकी पुस्तकाचे म्हणाल तर माझ्याही मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हे पुस्तकही देत नाहि. म्हणूनच अपेक्षा काहि अंशी पूर्ण होते.

ऋषिकेश
-----------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुपुल जयकर लिखित इंदिरा गांधींच्या चरित्रात आणीबाणीवर अगदी सडकून नसली तरीही बर्‍यापैकी टिका आहे; संजय गांधींच्या हातात रिमोट कंट्रोल असण्यावरही टीका आहे. हे चरित्र वाचून इंदीरा गांधींचा चांगलाच राग आला होता.

अदिती

विकास's picture

24 May 2010 - 8:45 pm | विकास

पुस्तक परीचय आवडला. सोनीयांच्या बाबतीत माझी काय मते असू शकतील या संदर्भात येथे अनेकांची मतांतरे होणार नाहीत, ;) पण याचा अर्थ पुस्तक वाचू नये असा नक्की नाही. म्हणूनच ऋषिकेशशी सहमत. जेंव्हा मिळू शकेल तेंव्हा घेऊन, नक्कीच वाचेन.

"इंदिरा गांधींचे अखेरचे दिवस" असे मराठीत भाषांतरीत केलेले पीसी अ‍ॅलेक्झँडर यांचे पुस्तक वाचले होते. त्यात राजीव गांधी यांनी (इंदिरा हत्येनंतर) राजकारणात जाऊ नये म्हणून सोनीयांनी खूप गयावया केल्याचे त्यात सांगितले होते. राजीवजींच्या निधनानंतर, जेंव्हा त्यांनी राजकारणात येण्याचे नाकारले तेंव्हा त्यांचे सगळ्यांनीच कौतुक केले होते कारण त्या त्यांच्या याच विचाराशी प्रामाणिक होत्या...

सोनीया आवडणार्‍यांचे अथवा सोनीया समर्थन करणार्‍यांचे दोन प्रकार आहेत असे मला वाटते:

जे काँग्रेसी आहेत त्यांना काँग्रेस ही गांधी नामक एका खांबाच्या तंबू शिवाय तगू शकणार नाही याची खात्री आहे. एका अर्थी हे दुर्दैव आहे की काँग्रेस कुणालाच गांधी घराण्याव्यतिरीक्त "देशाचा नेता" समजू शकत नाही. शास्त्री आणि राव अपवाद म्हणता येतील. पण सिंग ह्यांना कोणी (स्वतः सिंगसकट) काँग्रेसमन नेता समजतो असे वाटत नाही. तरी देखील, तो काँग्रेसजनांचा "अंतर्गत" मुद्दा झाला.

दुसरे आहेत ते प्रतिक्रीयात्मक आहेत. म्हणजे विशेष करून भाजपाने विरोध केला म्हणून सोनीया समर्थन करणारे. अर्थात हे प्रत्यक्ष तसे घडत नाही अथवा मुद्दामूनही ते कायम घडते असे म्हणायचे नाही, पण प्रतिक्रियात्मक नक्कीच असते. नाहीतर जेंव्हा सोनीयांनी राजकारणात येयचे ठरवले (त्यांनी आणि काँग्रेसजनांनी) तेंव्हा नक्की काय गुणवत्ता आहे असा प्रश्न पडला असता, जो त्यांच्या जागी असलेल्या अ-गांधी व्यक्तीसंदर्भात विचारला जाऊ शकतो.

बाकी मला सोनीयांच्या बाबतीत (यात आरोप करण्याची इच्छा नाही) काही खटकणार्‍या गोष्टी ज्यांचा उल्लेख काँग्रेसलिखीत सोनीया चरीत्रात होण्याची शक्यता नाही :-) :

  1. युपिए सरकारच्या वेळेस त्यांनी पंतप्रधान होण्यापासून त्याग केल्याचा गवगवा झाला. मात्र त्याच सोनीयांनी आधी स्वतःच्या (पंतप्रधान होण्यासाठीच्या) नावाला स्वतःच राष्ट्रपतींना सादर केलेल्या पत्रात, इतर खासदारांप्रमाणेच अनुमोदन कसे दिले होते?
  2. चीनने सोनीया गांधींना ऑलिंपिक्सच्या वेळेस रेड कार्पेट वेलकम दिले होते, जे राष्ट्रप्रमुखालाच देतात. वास्तवीक हे आंतर्राष्ट्रीय शिष्ठाचाराला धरून नव्हते किंबहूना चीनचे भारताविषयीचे एकंदरीत धोरण बघता, खोडसाळपणा होता. मॅडमच्या हे लक्षात आले नाही का?
  3. त्याही आधी... राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि नंतर विरोधी पक्षात असताना सावली सारख्या कायम पाठीशी असलेल्या सोनीया, या केवळ त्याच वेळेस, म्हणजे श्री पेरंबदूरला कशा गेल्या नाहीत? त्याच काय पण काँग्रेसचा एक वरीष्ठ नेता हा त्या वेळेस राजीव गांधींच्या अवतीभवती नव्हता. हे काँग्रेसी संस्कृती लक्षात घेता जरा जरा जास्तच होते. त्या योगायोगाला अजून एक योगायोग होता, तो म्हणजे त्याच सुमारास राजीव गांधींनी, लोकांशी शेकहँड करत बोट सुजले म्हणून स्वतःच्या बोटातील वेडींग रींग काढली होती (संदर्भ मार्क टली: डिफीट ऑफ ए काँग्रेसमन).

असो.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ऋषिकेश's picture

24 May 2010 - 11:21 pm | ऋषिकेश

काँग्रेसलिखीत सोनीया चरीत्रात होण्याची शक्यता नाही

:) अंदाज अचूक आहे.. याही चरित्रात हे तीनही मुद्दे येत नाहित.

*मात्र त्या पेरांबुदूरला का गेल्या नाहित ते दिले आहे.. मात्र कारण आता विसरलो*

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

इन्द्र्राज पवार's picture

23 May 2010 - 9:44 pm | इन्द्र्राज पवार

"...पण ते अधिकार संपूर्ण भारतीय बनावटीच्या लालू, मुलायम, माया, ममता इत्यादिंच्या हाती नाहीत हे सुध्दा आपले भाग्यच!..."

१०० टक्के सहमत.... आणि असली दळभद्री लोक आपल्यावर राज्य करतील या भयानेच बहुतांशी मतदार आजपर्यन्त "बैलजोडी....गायवासरू....हाताचा पंजा" यावर आपल्या पसंदीची मोहोर उमटवितो.... मध्यंतरी दुसर्‍या वाटेला तो जरूर गेला, पण तोही अनुभव घेतल्यानंतर "गड्या आपुला गावच लई बरा..." म्हणत पंज्याच्याच पंखाखाली आला....आणि आता आज तर तो "सोनिया" मध्ये "इंदिरा" पाहतोय.... त्यांनी सांगितल्यानंतर उद्या "प्रियांका" मध्येही पाहील.

पुस्तक परिक्षण छानच झाले आहे... इतके की पुस्तक लागलीच मिळवावे, जे मी करेन.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पाषाणभेद's picture

23 May 2010 - 9:56 pm | पाषाणभेद

राजीव गांधी यांच्याशी लग्न झाले नसते तर त्यांना इतके मोठे होता आले असते का? किंवा राजीव गांधींचे आडनाव राजीव शर्मा/ मिश्रा/ गुप्ता/ चतुर्वेदी आदी असते तर काय झाले असते?
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 May 2010 - 11:25 pm | डॉ.प्रसाद दाढे

राजकारणी (पक्षी: सध्याचे, न की लालबहाद्दूर शास्त्रीजी)
ह्या प्राण्यांबद्दल प्रचंड तिडिक आणि कमालीचा तिरस्कार असल्याने हे चरित्र मी विकत नक्कीच घेणार नाही;
कदाचित चाळून बघेन (तेव्हढ्यानेही बीपी वाढेलच)
स्वतः पुढील संधी नाकारून मनमोहनसिंगांना पंतप्रधान केल्यामुळे
सोनिया गांधींचे तेव्हा बरेच कौतूक झाले होते आणि अनेकांना त्यांच्यातल्या मुरब्बी राजकारण्याचा साक्षात्कार झाला होता. पण
गोम अशी होती की सोनिया पंतप्रधान झाल्या असत्या तर विरोधी
पक्षांना त्यांच्या विदेशीपणाचे आयते कोलित मिळाले असते अन पुढिल निवडणूकीत काँग्रेसला त्याचा फटका बसू शकला असता. व्हेअर अ‍ॅज
सोनियांनी पंतप्रधानपद नाकारल्याने त्यागी प्रतिमाही बनली
अन मनमोहनसारख्या मवाळ माणसाच्या हातात पद ठेवल्याने
रिमोट गांधी घराण्यात शाबूत राहिला.
माझा अंदाज असा आहे की ही चाल सोनियांना अर्जुनसिंगसारख्या त्यांच्या तेव्हाच्या निकटवर्ती सल्लागारांनीच सुचविली असणार.
असो. भारतातली संस्थाने अठ्ठेचाळीस साली खालसा झाली खरी
पण गांधी संस्थान मात्र भारतीयांच्या बोकांडी कायमचेच बसले
आहे. अन नुसतेच गांधी संस्थान नव्हे तर खासदारापासून
ते नगरसेवकापर्यंत सर्वच नेत्यांनी धृतराष्ट्रासारखे लायकी
असो वा नसो (ती नसणे हेच क्वालिफिकेशन आहे म्हणा) आपल्या मुलांना वा पुतण्यांना सत्तेतले पद द्यायला लावले आहे.
बाळासाहेब- उद्धव, शरद पवार- अजित पवार, सुप्रिया सुळे, नारायण
राणे- नितेश इ इ
मरू दे, कोळसा उगाळावा तितका काळाच आहे

टारझन's picture

23 May 2010 - 11:38 pm | टारझन

माझा अंदाज असा आहे की ही चाल सोनियांना अर्जुनसिंगसारख्या त्यांच्या तेव्हाच्या निकटवर्ती सल्लागारांनीच सुचविली असणार.

अंदाज कसला ? ठाम मत आहे ते आमचे. सल्लागार जर संपावर गेले , तर एक पाऊल टाकणे देखील जमणार नाही बाईंना.
बाईंच्या "अगाध प्रतिभे"चा एक किस्सा बाळासाहेबांनी सांगितलेला. बाई तेंव्हा नविन नविन होत्या. कोणाकडुन तरी (नेहमीप्रमाणे) भाषण लिहुन आणलेलं , हिंदी भाषण इंग्रजी लिपीत लिहीलं होतं ... मे महिण्याचे दिवस पाहुन ते भाषण आधीच लिहीलेलं होतं ...
आणि अचानक सभेच्या वेळी पाऊस सुरू झाला .. बाईंनी भाषण वाचायला घेतलं ...
"आप इतनी कडी धुप मे बैठे हय ... " (त्यानंतर पब्लिक ला हसु की रडु ते कळेनासं झालं होतं)
तर अशा ह्या हुष्षार सोनिया गांधी !! त्यांच्या नावामागे जर "गांधी" नसतं तर त्या आज "दिसतात तेवढ्या" यशस्वी झाल्या असत्या का ? असा एक रोचक विचार मनात येतो .. इतकंच ..

- डॉ.प्रतिसाद झाडे

आंबोळी's picture

24 May 2010 - 9:21 am | आंबोळी

हाहाहा... टार्‍या किस्सा जबरीच रे....
एकदा मी आणि मित्र टिव्ही वर बाईंचे भाषण ऐकत होतो.... बाईंनी एक जोरदार वाक्य वाचले.... आणि वाक्य सम्पल्यावर पॉज घेउन टेबलावर २ दा हात आपटला...
मित्र लगेच म्हणाला "ते बघ.... त्या वाक्या नंतर कंसात (टेबलावर हात आपटा) असे लिहिले असणार...."
आमच्या हातात कॉफी नसल्याने आमचा धमु होता होता वाचला....

आंबोळी

ऋषिकेश's picture

24 May 2010 - 7:13 pm | ऋषिकेश

टार्‍या म्हणतो तो किस्सा फेमस आहेच.. अजूनही काहि ऐकले आहेत..
बाकी हे पुस्तक त्यांच्या हिंदीच्या अभ्यासावरही कमेंट करते.. त्यांच्या मजेशीर चुका दिल्या नसल्या तरी त्या मजेशीर चुका करत इतके पुस्तकातही दिले आहे. मात्र हे हिंदी शिक्षण खूप आधी झाले होते. सोनियांच्या सासूबाईंनी जेवणाच्या टेबलावर हिंदीच बोलायचे असा नियम केला होता. त्यामुळे राजकारणात येण्याआधी सासूबाईंची मर्जी संपादन करण्यासाठी सोनिया हिंदी शिकल्या होत्या. (त्याचा फायदा पुढे मनेका गांधीपेक्षा झुकते माप मिळण्यात झाला)

आमच्या हातात कॉफी नसल्याने आमचा धमु होता होता वाचला....

हे लय आवडले ;)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

आमचे कोल्हापुरचे परम मित्र मा. इन्द्रराज पवार साहेब ज्यावेळी ते पुस्तक त्याच्या खाजगी वाचनालयात उपलब्द करतील त्यावेळी त्यांचेकडुन आम्ही वाचावयास घेवुन येवु.

वेताळ