एका शाळकरी मुलाचा निबंध

वैदेहीजी's picture
वैदेहीजी in जनातलं, मनातलं
13 May 2010 - 12:21 pm

एकदा एका प्राथमिक विभागातल्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याना एक निबंध लिहायला दिलीला असतो. निबंधा चा विषय असतो "देवाने मला काय बनवावे ?" त्यादिवशी घरी निबंधवह्या तपासताना ती एक निबंध वाचते आणि भावूक होवून जाते. तिचे पती आपया बायकोला असे भावूक होऊन रडताना बघतात आणि तिला रडण्याचे कारण विचारतात

ती काही न बोलता समोरची वही उचलून दाखवते . ते निंबंध वाचतात जो खालील प्रमाणे असतो

" देव बाप्पा ! मला जादूने जर काय बनवणारच असशील तर "टीव्ही" बनव . मला त्याची जागा घ्याची आहे. मला टीव्ही सारखा जीवन हवय. त्याचे माझ्या कुटुंबां मधील जे अढळ पद आहे ते मला हवाय . असे होऊ शकेल का कि मी जे म्हणतोय ते सर्व लोक ऐकताहेत , काहि प्रश्न ना विचारता .... काही हि व्यत्यय किंवा नवीन कारण ना सांगता !!

माझी लोकांनी तशीच काळजी घेतली पाहिजे जशी एक दिवस टीव्ही बिघड्ल्यावर घेतली जाते . बाबा किती हि थकलेले असताना माझ्या समोर येवून अर्धा तास जरी बसले तर किती मजा येयील आणि आई हि किती हि टेन्शन मध्ये असली तरी ते विसरायला माझ्या कडेच धाव घेईल . निंदान काही वेळ तरी मी त्याना त्यांचा थकवा टेन्शन विसरा यला मदत करीन.

माझ्या कडे दुर्ल क्ष होणार नाही . लहान मुले माझ्या बरोबर बसण्यासाठी भांडतील... मोठी माणसे जेंवन पटा पट आवरून माझे बोलणे निदान दिवसभरातील काही तास तरी एन्जॉय करतील . हि भावना च किती छान असते जेव्हा सगळी माणसे आपली काम सोडून आपल्या भोवती गोळा होवून आपले म्हणणे ऐकतात. तेव्हा देवा काहीही कर पण एक दिवसा साठी तरी मला टीव्ही बनव

ते वाचून पती म्हणाले "अरेरे ! बिचार पोर ! आपल्याच तालात असणारया पालकांचे किती हे दुर्लक्ष !! "
ती असहाय पणे वर बघून म्हणते " हा निबंध आपल्या बाळाचा आहे !"

मला मेल ने आलेल्या इग्रजी गोष्टी चा स्वैर अनुवाद

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

13 May 2010 - 12:37 pm | पांथस्थ

छान आहे. पण ह्या इ-मेल मधुन येणार्‍या गोष्टी बरेचदा जास्तच "सेंन्टी" मारतात.

बाय द वे, आज कालची बाळे सुद्धा टीव्ही समोरच असतात (अर्थात पालकांचे अनुकरण) हाच निबंध वृद्धकाळात पालकांना लिहावा न लागला म्हणजे मिळवली :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर