पुण्यातील वाहतुकः समस्या आणि उपाय

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
28 Apr 2010 - 2:22 pm

पुण्यातील वाहतुक समस्येवर वसंत व्याखानमालेत आपले सदीप ब्याखान देण्याचा मान यावेळी पथमच वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त श्री मनोज पाटील यांना मिळाला. पुण्यातील वाहतुक हा संवेदनशील नागरिकाचा चिडचिड करण्याचा विषय आहे. मनोज पाटलांनी ही समस्या अतिशय संयतपणे कोणावरही टीका न करता व पुणेकर नागरिकांच्या मनातील भाषेत मांडली.सांगलीतील वालचंद कॊलेज मधुन संगणक शास्त्राची पदवी घेउन सुरवातीला त्याच कॊलजे मधे लेक्चरर म्हणुन असलेले मनोज पाटील नंतर पोलिस खात्यात आले. पुण्यात त्यांना अचानकच वाहतुक उपायुक्त पद गळ्यात पडले. तेव्हा त्यांना अनेक हितचिंतकांनी सल्ला दिला उत्तम मार्ग म्हणजे काहीच न करणे. आहे तसेच चालू ठेवा व दिवस ढकला. पुणेकर नागरीक इंटलेक्च्युअल असल्याने काही करायला जाल तर टीकेचे धनी व्हाल. पुर्वीचा वाहतुक शाखेचा अनुभव नसलेल्या पाटीलांनी आपली कारकीर्द या पार्श्वभुमीवर चालू केली.सेव्ह पुणे ट्रेफिक या चळवळीचे हर्षद अभ्यंकर यांची भेट झाल्यावर त्यांनी सुरवातीला थोडा पोलिसी अहंपणा दाखवल्याची चुक त्यांनी मान्य केली व टीका सकारात्मक पणे घेण्यास सुरवात केली या बद्द्दल त्यांनी अभ्यंकरांचे आभार मानले.येथुनच आत्मपरिक्षण व वाहतुक परिक्षण चालू झाले. कुठल्याही योजना राबवताना यंत्रणेतील इनर्शिया हा भाग बदलाला विरोध करतो ही बाब जाणवल्याचे पाटील आवर्जुन सांगतात. त्यावरुन आम्हाला आमच्या क्रयशासन या उपक्रमावरील लेखाची आठवण आली.
वाहतुक पोलिसांचे काम खरे तर वाहतुकी संदर्भात असेलेली व उपलब्ध कायदा व सुव्यवस्था पाहणे ही आहे. याबद्दल पाटील म्हणतात कि हे म्हणजे ताप येतो या लक्षणावर क्रोसीन देणे एवढीच आरएमपी डॊक्टरसारखी आहे.मूल गंभीर समस्येला एन्टिबायोटिक्स देण्याचा अधिकार नाही. शहराच्या भौगोलिक क्षेत्रातीपैकी दहा टक्के क्षेत्र तरी रोड वाहतुकिस उपलब्ध हवे. पुण्यात ते ६.५ % आहे मुंबईत ११.५ % आहे दिल्लीत १३.५ टक्के आहे व चंदीगढ ला ते १८.५ टक्के आहे. पुण्यात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुरेशी नसल्याने लोक खाजगी वाहनाचा वापर करतात. २००१ मधे असलेली ९ लाख वाहन संख्या २००५ मधे १४ लाख झाली व २०१० मधे ती २६ लाख झाली. तरी या आकडे वारीत परराज्यातुन आलेल्या मिलिट्री व विद्यार्थांच्या गाड्यांची नोंद नाही. ही संख्या मुंबईतील खाजगी वाहनांपेक्षा जास्त आहे
आपल्या सदीप व्याखानात पाटीलांनी रस्त्याच्या वर्गीकरणावर लेक्ष वेधले. १) arterier roads 2) subartierer roads 3) collector roads 4) local roads अशा वाह्तुक शास्त्राच्या नुसार हे वर्गीकरण आहे खर्‍या अर्थाने जरी ते शहरात नसले तरी अर्टिरिअर रोड या प्रकारावरच जास्त लक्ष केंद्रित असते कारण त्या रसत्यावरुन जास्तीत जास्त वाहतुक जात असते.व्याखानाचा भर हा लो बजेट ट्राफिक मॆनेजमेंटवर होता. त्यामुळे नगरनियोजनात काय असावे व काय आहे याकडे केंद्रबिंदु नव्हता. रस्ता दुभाजक योग्य ठिकाणी पंक्चर करणे वा पंक्च्रर न करणे. सिग्नल ला टायमर लावणे, बस स्टॊप अगदी चौकाजवळ न ठेवतात थोडे अंतर ठेउन हलवणे, रिक्षाला सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा देणे, रेल्वे स्टेशन बस स्टॆंड यावर त्यांना राखीव जागा ठेवणे, शाळेने आपल्या उपलब्ध पार्किंगचा वापर पालकांना करु देणे, राईट टर्न बंद करुन समोरासमोर वाहतुकीला प्राधान्य देउन बहुसंख्याची सोय प्रथम पाहणे, पार्किंग चे रेट टेलिस्कोपिक पद्धतीने लावणे, कोंडी टाळण्याकरिता रस्ता वाहता ठेवणे, कमी अंतरासाठी वाहन न चालवणे, पुण्यात थांबणारी रेल्वे केवळ पुणे जंक्शन ला न थांबवता पिंपरी ला ही थांबवणे असे उपाय हे उपलब्ध पर्यायात कमी खर्चाचे व परिणामकारक असतात.जी वाहने पुण्यात फक्ते अपरिहार्यतेमुळे येतात त्यांना जर बायपास दिले तर ते शहरात येणार नाहीत.
कारवाई चे प्रमाण वाढवल्यावर अपघात कमी होतात ही नोंद मात्र त्यांनी सांगितली. वाहतुक पोलिस असेल तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती दिसुन येते. ट्राफिकॊन सारख्या योजना च्या यशापयशावर ते फारसे बोलले नाहीत. अर्थात ती योजना राबवण्यासाठी जनमानसिकता तशी लागते हे अप्रत्यक्षपणे सांगितले.नवीन नवीन तंत्रज्ञानासोबत काही बदल हे कायद्यात करावे लागतील ते भविष्यात दिसुन येतील.वाहतुक सुधारण्याची मागणी जनते कडुन आली पाहिजे म्हणजे त्यावर काम करणे सोपे जाते.कार्यक्रम संपल्यावर जवळ जवळ सर्व प्रश्नांना उत्तरे दिली त्यामधे प्रामुख्याने स्थानिक वाहतुक समस्यांचा उल्लेख होता. पुण्यात चारचाकी मधे सीट बेल्ट लावण्याच्या नियमाबद्दल त्यांनी छान उत्तर दिले. ते म्हणाले कि मुंबईत काटेकोर नियम पाळणारे लोक पुण्यात आल्यावर काहीही चालते अशा भावनेतुन वाहतुकिकडे पाहतात. तसेच शहरात जरी २०-२५ वेग असला तरी हमरस्त्यावर गेल्यावर वेग वाढतो तिथे तो सीट बेल्ट नंतर लावत नाही. अगोदर पासुनच असलेला केव्हाही चांगले.तिसर म्हणजे कारवाले म्हणजे पैसेवाले मोठे लोक म्हणुन वाहतुक पोलिसाकडे दुर्लक्ष असते ते या मुळे कमी झाले.
असा हा सुंदर कार्यक्रम संपला तेव्हा हे खात "आपल" वाटल. संपल्यावर सीआयडीत काम करताना असलेले श्री प्रकाश शहा जे आता फरासखाना वाहतुक विभागाचे पोलिस निरिक्षक आहेत ते भेटले त्यांच्याशी गप्पा झाल्या. इतर सहकार्‍यांशी भेट होउन खात्यातील स्मृतीला जरा उजाळा मिळाला. नेहमी प्रमाणे कार्यक्रमाचे रेकॊर्डिंग बसल्या बसल्या केले आहे. ऐका.

Go To FileFactory.com

समाजविचारबातमी

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2010 - 3:28 pm | राजेश घासकडवी

घाटपांडेसाहेब,

काही प्रश्न हे फक्त तक्रार करण्यासाठी असतात... त्यावर उपाय वगैरेची चर्चा करणं यापेक्षा 'हे सगळे कसे हरामखोर (रस्ते अडवून बसतात, उगीचच नको असताना गाड्या खरेदी करतात, लाच खातात, बेशिस्त ड्रायव्हिंग करतात...) बरबादी करतात' असं म्हणण्यासाठी असतात.

या प्रश्नाची कोणी कुंडली मांडलेली आहे का?

राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2010 - 3:43 pm | प्रकाश घाटपांडे

वसंत व्याखान मालेतील श्रोते टिपिकल पुणेरी जेष्ठ नागरिक आहेत. एक जेष्ठ डॊक्टर प्रश्नाची चिठ्ठी न देता शेवटी प्रश्न विचारताना त्यांना व्याखानच द्यायचे होते हे जाणवले. संयोजकानी वेळेच्या मर्यादेची जाणीव करुन दिल्यावर तण तण करीत होते.
ज्योतिषात याची प्रश्न कुंडली मांडली तर उत्तर काय येईल?
हॆहॆहॆ
नेपोलिएन प्रश्नावलीत उत्तर येउ शकते कि बाळंतिणीस देवाला जाण्यास चांगला दिवस.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

इंटरनेटस्नेही's picture

28 Apr 2010 - 4:50 pm | इंटरनेटस्नेही

रेकोर्डिंग छानच.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.