अनुभव: अनोळखी आपुलकी

वसंत वडाळकर_मालेगांव's picture
वसंत वडाळकर_मालेगांव in जनातलं, मनातलं
24 Apr 2010 - 1:51 pm

(मी मूळचा रहाणारा नांदुर्‍याचा! मी काही काळाकरता कोकणात गुरांचा डॉक्टर म्हणून नोकरीला होतो.
आता रिटायर झालेलो आहे.त्यावेळी मला आलेला एक आपुलकीचा साधा अनुभव येथे सांगतो.)

ते होते १९६५ साल.
जुलै महिना. चौदा तारीख.
कोकणात गेल्या सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता...
पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
रात्रीचे दहा वाजले होते. मी झोपण्याच्या तयारीत होतो. तोच दारावर थाप पडली.
"डॉक्टर साहेब आहेत काय?"
मी दरवाजा उघडला. समोर ५-६ जण उभे होते. एकाच्या हातात गसबत्ती होती. सर्वांच्या अंगावर घोंगड्या होत्या. मांडीला अर्धे धोतर.
"आत या!"
सर्वजण घोंगड्या झटकून आत आले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.
"काय काम आहे?" मी विचारले. त्यातला एक जण सांगू लागला, "डॉक्टरसाहेब! या माहादूच्या बैलाची व शेजारच्या बैलाची झुंज झाली. त्यामध्ये याच्या बैलाचे शिंग तुटले व खुप रक्तस्त्राव झाला. बैल जमीनीवर पडला. उठत नाही, चारा खात नाही! तुम्हाला घ्यावयास आम्ही आलो आहोत."
मी आवश्यक ती तयारी करून त्यांच्याबरोबर जायला निघालो.
समोर तीघेजण, मध्ये मी व मागे तीघेजणं!
पाऊस सारखा पडत होता. मी छत्री व रेनकोट घेतला होता.
मजल दरमजल करत आम्ही निघालो. कारण तेरा चौदा कि.मी. वर त्याचे घर होते.
एकच नदी. आम्ही पाच्-सहा जण ओलांडत निघालो.
पाच सहा घरे असलेल्या वाडीवर रात्री दोन वाजता पोहोचलो.
बैल बसलेला होता.
आवश्यक तो औषदोपचार केला. चार्-पाच सलाईन लावल्या.
बैल उठून उभा राहीला.
सकाळचे चार वाजले.
रात्रभर जागरण!
त्यांनी मला सरपंचांकडे आरामाला नेले.
मी तेथे आराम केला.
पुन्हा दहा वाजता बैल पहाण्यास गेलो. बैल चारा खात होता. पुन्हा योग्य तो उपचार केला, व त्यांना मी म्हणालो, "आता आपण निघू!"
तव्हा ते म्हणाले, "तुम्ही एकटेच आहात.तुम्ही आता जेवण करून घ्या व नंतर आपण निघू!"
मी हो म्हणालो.
आम्ही बारा-साडेबारा वाजता जेवण केले. पाऊस सारखा पडत होता. तीन्-चार वाजता निघायचे ठरल्यावर मी पुन्हा सरपंचांकडे आराम करण्यास निघालो.
मी व सरपंच गप्पा मारत बसलो होतो. ...

.... तोच एक बाई रडत रडत सरपंचाकडे आली व घाबरत म्हणाली, "डॉक्टरला चुकून खाऊ घातले ....."
मी ताडकन उभा राहीलो व म्हणालो, "काय खाऊ घातले?..."
ती म्हणाली, "एका टोपलीत गव्हाचे पीठ होते व एका टोपलीत नागली चे पीठ होते. चुकून नागलीच्या पीठाच्या पोळ्या करून डॉक्टरांना खाऊ घातल्या."
माझा जीव भांड्यात पडला.
डॉळ्यातून आसू आले.
मी म्हणालो,"मावशी, नागलीच्या पीठाच्या पोळ्या किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या काय! शेवटी दोन्ही अन्नच! तुमच्या कडचे जेवून मी तृप्त झालो."
ती म्हणाली," पण माझा मुलगा मला सारखा बोलतो आहे की तू डॉक्टरला मुद्दाम नागलीच्या पीठाच्या पोळ्या खाऊ घातल्या!"
... मग मी त्या मुलाला समजावले.
आजही मला ही अनोळखी आपुलकी आठवते.
--- रिटायर्ड - डॉ. वसंत वडाळकर (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी)

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच हृद्य आठवण!!!

बिपिन कार्यकर्ते

चित्रा's picture

25 Apr 2010 - 9:49 pm | चित्रा

असेच म्हणते.

पक्या's picture

24 Apr 2010 - 2:07 pm | पक्या

छान आठवण.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

अमोल केळकर's picture

24 Apr 2010 - 5:26 pm | अमोल केळकर

मस्त आठवण !!

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वेताळ's picture

24 Apr 2010 - 5:49 pm | वेताळ

खेड्यात खुपच सरळ साधी लोक अजुनही राहतात.

वेताळ

शुचि's picture

25 Apr 2010 - 12:57 am | शुचि

आठवण आवडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

चिन्मना's picture

25 Apr 2010 - 1:57 am | चिन्मना

साधी पण हृद्य आठवण !

बैलाच्या शिंगातून रक्त येते हे माहित नव्हते. माझा असा समज होता की (नखांसारखेच) त्यांत रक्तवाहिन्यांचे जाळे नसते.

नागली म्हणजे काय?
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

मदनबाण's picture

25 Apr 2010 - 3:42 am | मदनबाण

आठवण वाचुन अगदी तो काळ अनुभवल्या सारखा वाटला...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

प्रमोद देव's picture

25 Apr 2010 - 8:42 am | प्रमोद देव

मोजक्याच शब्दात मांडलेली आठवण आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2010 - 12:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोजक्याच शब्दात मांडलेली आठवण आवडली.

अजून येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

25 Apr 2010 - 9:44 pm | प्रभो

सुंदर आठवण!

विसोबा खेचर's picture

25 Apr 2010 - 11:55 pm | विसोबा खेचर

डॉक्टरसाहेब,

छान आठवण. अजूनही अश्याच काही हृद्य आठवणी असतील तर लिहा प्लीज..

तात्या.

बेसनलाडू's picture

25 Apr 2010 - 11:59 pm | बेसनलाडू

(अनुभवोत्सुक)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

26 Apr 2010 - 12:30 am | आनंदयात्री

छान आठवण आहे काका. अजुन येउ द्या आठवणी अश्या.