बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती!!

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
21 Apr 2010 - 9:07 am

हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.

आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...
या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.

तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा स्कॅन माझ्या ब्लॉगवर टाकलाय (इथे फोटो टाकणं जाम वैतागवाडी!!). वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/04/blog-post.html

हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.

'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.

चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.

तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.

याला काय म्हणायचं?

नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.

चित्रपटअनुभव

प्रतिक्रिया

II विकास II's picture

21 Apr 2010 - 9:10 am | II विकास II

नीधप बरोबर पुर्ण सहमत.
तुम्ही योग्य ती कारवाई करालच ही अपेक्षा.

नीधप's picture

21 Apr 2010 - 9:21 am | नीधप

संदीप सावंतांनी लोकसत्तामधे फोन केलेला आहे.
बघू उद्या परवा स्पष्टीकरण आणि अपोलॉजी येतंय का ते.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2010 - 9:39 am | निखिल देशपांडे

बघू उद्या परवा स्पष्टीकरण आणि अपोलॉजी येतंय का ते.

बातमीच्या खाली प्रतिक्रिया नोंदवायची सोय आहे... तिथे पण लिहिण्यात यावे
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

नीधप's picture

21 Apr 2010 - 9:42 am | नीधप

सगळ्यात आधी ते केलेलं आहे.
तुमचा मेसेज तपासून मग आम्ही प्रसिद्ध करू असा मेसेज येतो.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2010 - 9:51 am | निखिल देशपांडे

ओह्ह...
माझ्या कडुन कॉमेन्ट पोस्टच होत नाहिए.. :(
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

Nile's picture

21 Apr 2010 - 9:25 am | Nile

इंटरनेटच्या जमान्यात असल्या चुका करणार्‍यांच खरंच कौतुक आहे!

प्रकाश घाटपांडे's picture

21 Apr 2010 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे

आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?

मलाही हा अनुभव आहे. दै. प्रभातच्या इंटॅलिजंट पुणे मधे माझ्या फलज्योतिषावरील चिकित्सेचा आढावा घेतला. टेलीफोनिक इंटरव्ह्यु व ब्लॉग या आधारे ते लिखाण केले.तेव्हा माझा उल्लेख त्याने महेश असा केला. संबंधित पत्रकाराने ते लिखाण प्रसिद्ध व्हायच्या अगोदर मला दाखवले त्याही वेळी त्याने महेश घाटपांडे अशी चुक केली होती. मी ती परत दुरस्त करायला सांगितले. नंतर प्रसिद्ध झाले तेव्हा परत माझे नाव महेश असेच आले होते. वारंवार सांगुनही अशी चुक झालीच होती. पण मी ती योग्य नसली तरी क्षम्य मानतो. संबंधीत पत्रकाराला काव्यात रस असल्याने असे घडले असावे असा तर्क मी केला.
पोलिस खात्यात रँकच्या बाबत अशा चुका नेहमीच होतात.
एक विनोद सांगतात. खेड्यातील एका आजींचा नातु आयपीएस होतो व जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस अधिक्षक म्हणुन काम करतो. भेटायला आजीकडे येतो. नातेवाईक आजीला सांगतात कि तुझा नातु पोलिसात साहेब झाला. आजी नातवाला अशिर्वाद देते" अजुन मोठा हो! लवकरच फौजदार होशील ."
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मिसळभोक्ता's picture

21 Apr 2010 - 9:57 am | मिसळभोक्ता

आजचे युग हे "ब्रेकिंग न्यूज युग" आहे. पहिल्यांदा बातमी कोण देतो, हे अधिक महत्त्वाचे. सर्वात अचूक बातमी कोण देतो, ह्याला अजीबात महत्त्व नाही.

हे ब्रेकिंग न्यूज चे लोण टीव्ही वरून वर्तमानपत्रांत पोहोचले आहे.

त्यामुळे फॅक्टचेकिंग ही दुय्यम बाब गणली जाते, हे स्पष्ट आहे.

वर्तमानपत्रात आलेले सगळेच खरे नसते, हे दैनिक लोकमतने पूर्वीच सिद्ध केले आहे. आता सगळीच वर्तमानपत्रे त्यांच कित्ता गिरवताहेत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रमोद देव's picture

21 Apr 2010 - 10:04 am | प्रमोद देव

आजच्या जमान्यात बहुदा प्रुफं तपासत नसावेत...किंवा जाणीवपूर्वक आणि सोयिस्कररित्या दूर्लक्ष करत असावेत...अशा तर्‍हेच्या चुकीच्या गोष्टी मुद्दाम छापून आणण्याबाबत काही लोकांचा छुपा उद्देशही असू शकतो...
नीरजा,मला वाटतंय की ह्यात लोकसत्तेबरोबरच अरूण नलावडे ह्यांचीही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी योग्य त्या दूरूस्तीसाठी आग्रह धरला पाहिजे आणि झालेल्या(झाली असेल तर....मुद्दाम केली असल्यास मग प्रश्नच उद्भवत नाही.) चुकीबद्दल लोकसत्तेने जाहीर माफी मागायला हवी.

चिरोटा's picture

21 Apr 2010 - 10:28 am | चिरोटा

बर्‍याचश्या गोष्टींमध्ये असा निष्काळजीपणा दिसतो.मिडिया,पत्रकारही त्याला अपवाद नाहीत्.बातमी काहीतरी करुन अपलोड करायची एवढेच ध्येय असते.रविवारचा सामना बघा-"ह्या शतकातले महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन..." असा उल्लेख आहे.म.टा. तर बघायलाच नको.
भेंडी
P = NP

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Apr 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्दैवाने तुम्ही एकटेच नाहीत एवढंच मी सांगू शकते.

जी.एम.आर.टी. बांधली गोविंद स्वरुप आणि त्यांच्या टीमने एन.सी.आर.ए. मधून, आजही एन.सी.आर.ए.च जी.एम.आर.टी. चालवते, देखभाल करते, पण नाव येतं आयुकाचं! त्यांच्याकडून कधी अशा बातम्यांचं खंडन झालेलं मी तरी पाहिलेलं नाही.

अदिती

मितभाषी's picture

21 Apr 2010 - 12:00 pm | मितभाषी

लोकसत्ताने माफी मागायला हवी.
मी बातमीच्या खाली प्रतिक्रिया दिली पण ती प्रकाशीत होत नाही.

भावश्या.

जयवी's picture

21 Apr 2010 - 12:05 pm | जयवी

नी........खरंच........सारखी सारखी तीच चूक कशी काय होऊ शकते ?
नक्कीच मनस्ताप होत असणार.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2010 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते

संतापजनक तर आहेच, विशेषतः हे नेहमी होत असेल तर नक्कीच. पण इथे केवळ बेजबाबदारपणाच कारणीभूत असावा असे वाटते. आजकाल वार्ताहरांमधे अभ्यासाचा अभाव असतो हे नेहमीच ठळकपणे जाणवते.

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2010 - 12:32 am | भडकमकर मास्तर

लोकसत्ताची चूक आहेच...
पण ज्यांना उगीच श्रेय मिळतंय त्यांनीही लवकर खंडन करायला हवे असे वाटते...
( किंवा ते खंडन करत नाहीत म्हणूनच हा लेख जालावरच्या विविध संस्थळावर टाकण्याची वेळ आली असावी , असे प्रथमदर्शनी दिसते .... एकूण घडतंय ते फारसं बरं नाही असं वैयक्तिक मत..)

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 12:44 am | चतुरंग

काम करणार्‍या माणसांसाठी मनस्तापदायक आहे हे नक्की! :(

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 12:47 am | अक्षय पुर्णपात्रे

नक्कीच बेजबाबदार. पण 'श्रेय उपटण्याची वृत्ती' हे शीर्षकात खटकले. श्री नलावडे यांनी स्वत: दिग्दर्शक असल्याचा आव आणला आहे का? तसे नसल्यास श्रेय उपटण्याचा प्रयत्न कोण करतंय? वृत्तपत्रे भलत्याच व्यक्तिस श्रेय देत आहेत, असे म्हणावे.

कारण खूपसे पत्रकार 'उचलली लेखणी, लावली कागदाला' कॅटेगरीतले असतात म्हणून ;)
जोक्स अपार्ट -- तुझा संताप समजतोय

नीधप's picture

22 Apr 2010 - 11:03 am | नीधप

लोकसत्ताच्या आजच्या छापील आवृत्तीत स्पष्टीकरण आहे.
"अनवधानाने अरूण नलावडे यांचे नाव दिग्दर्शक म्हणून छापले गेले. 'श्वास' चे दिग्दर्शक संदीप सावंतच आहेत. "

वेल हे ही नसे थोडके.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/