मस्तानी

झुम्बर's picture
झुम्बर in जे न देखे रवी...
17 Apr 2010 - 5:38 pm

चार घोडे चार हत्ती
त्यांच्या मागून चंद्रबत्ती
मेणा हवे संगे डोलतो
त्यातून गोरा हात डोकावतो

नितळ कांती हातावरती
बोटे नाजूक निमुळती
नखामध्ये खेळे जास्वंदी
आकार त्याचा कुसुम्बी

मेणा अचानक थांबतसे
"काय झाले?" ती हळूच पुसे
मधुर तो आवाज तिचा
नाद मुरलीचा भासतसे

कांचन सोने फिके पडे
अशी ती गौर सौंदर्या
हिर्याचेही तेज निमाले
अशी तिची कर्पूर चर्या

मुखडा जणू आभाळी
चंद्र पौर्णिमा उधळतो
नयनाचे दोन दिवे
नक्षत्र साक्षात्कार घडवितो

धनुष्याची जणू प्रत्यंचा
असा भुवईचा बाक झोकदार
वळण सफाई अशी तिची की
ढंग भासे छबीदार

नाक चाफेकळी नाजूक नथनी
जणू जडावली रत्न कोंदणी
ओठांचा तलम पडदा लाल
झाकून टाके दंतकळी

हनुवटी निमुळती अशी
तलवार जणू ती लखलखती
त्यावर उमटे खळी नाजुकशी
चांदणी नभी जशी चमचमती

डौल मोराचा मान मिरविती
वक्षी रतीचा भास असे
संगमरमरी कटी नितळसी
लावण्यावर साज दिसे

अशी मोहक रमणी मायेने
फुरसदिने घडवली असे
घेवूनी कुंचला सौंदर्याचा
पिंड तिचा सजलासे

कायेला तिच्या रंग देण्या
इंद्रधनु हे वापरले
गळ्यात तीचिया देवाने
जणू मधुगंध फुलांचे ओतिले

तिच्या मादकतेचे तेज जणू
सौदामिनीने मढले असे
तिच्यातील नाजूक मार्दव हे
जाई जुई चा अर्क असे

तिला भेटला असा मर्द की
कुर्बान तिने केली जवानी
माय अश्या प्रेमकहाणीची ती
बाजीरावाची मस्तानी
बाजीरावाची मस्तानी

अनुजा(स्वप्नजा)

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

17 Apr 2010 - 6:22 pm | मीनल

कविता मोठी आहे. पण मस्तानी चे सौंदर्य या कवितेच्या शब्दाशब्दातून ओंथबते आहे.
वर्णन आवडले तसेच उपमा आवडल्या.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

मदनबाण's picture

17 Apr 2010 - 6:59 pm | मदनबाण

हेच म्हणतो म्या... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शुचि's picture

17 Apr 2010 - 8:17 pm | शुचि

अप्रतिम शब्दचित्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

sur_nair's picture

19 Apr 2010 - 5:58 am | sur_nair

साक्षात डोळ्यासमोर मस्तानीच उभी राहिली बरं

पक्या's picture

19 Apr 2010 - 12:10 pm | पक्या

सुंदर कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

झुम्बर's picture

19 Apr 2010 - 1:20 pm | झुम्बर

आभार मन्ड्ळी
पन +१ म्हन्जे?

झुम्बर's picture

19 Apr 2010 - 3:28 pm | झुम्बर

लखनवी जरी काठ
वेल बुट्टी शोभतसे
तिचे तलम वस्त्र हे
सौंदर्याची परिसीमा असे

वस्त्रहुनी तलम अशी ही
कांती तिजला लाभली असे
ती गिळता हे पान मगाई
गळा ही लाल लोभस दिसतसे

तिने चढवली आभूषणे ही
तीही फिकी तिच्यापुढे
मोत्यंची चमक कोवळी
नयनी तीचिया वसतसे

सोन्याचाही तिच्या पुढती
टिकाव क्षणभर लागत नसे
तिची पूर्ण काया ही सुन्दर
सुवर्ण ओतून घडली असे

सर्वांगावर नक्षी सुंदर
सौंदर्याची फिरली असे
अशी ती नाजूक रम्या
नाचण्या पुण्यात उत्सुक असे

अनुजा(स्वप्नजा)

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Apr 2010 - 5:09 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान आहे कविता ...
"तरिही मस्तानी मुस्लिम होती ना ? अन मुस्लिम नथनी घालतात का ?"

binarybandya™

झुम्बर's picture

19 Apr 2010 - 5:23 pm | झुम्बर

हो म्हन्जे काय घालतात ते....
आनि मस्तानी बुन्देल खन्ड्चि होति ....
ती घलत होतिच ...