ज्वालामुखी आणि इतिहास

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
16 Apr 2010 - 2:01 pm

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.

सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.

सर्वात नुकताच झालेला असा सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

पर्मिअन एक्स्टींशन

सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास फार अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रे (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रे मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.

द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

संदर्भ
१. पर्मिअन एक्स्टींक्शन
२. टोबा इरप्शन

३.जर्नल ऑफ जीओफीजीकल रीसर्च

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

II विकास II's picture

17 Apr 2010 - 8:04 am | II विकास II

चांगला लेख.

विकीवरसुध्दा बरीच माहीती आहे. जिज्ञासुंची अवश्य वाचावी. ••••

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

मदनबाण's picture

17 Apr 2010 - 8:14 am | मदनबाण

छान माहिती...
समुद्रात जाणारा लाव्हा प्रवाह :---
http://mazeyoutube.blogspot.com/2010/01/blog-post_27.html

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

बेभान's picture

19 Apr 2010 - 5:36 pm | बेभान

माहितीबद्दल आभार.