मधे कुठल्याशा ऑनलाईन पेपरमधे - "संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ "लंडन गॅझेट" या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला" ही बातमी वाचली होती. तेव्हापासून ""लंडन गॅझेट" च्या साईटवर याची ऑनलाईन आव्रुत्ती मिळत्ये का ते बघायचं ठरवलं होतं पण कामाच्या व्यापात विसरून गेलो. आज थोडी हुडका-हुडकी केल्यावर ही आव्रुत्ती सापडली.
मराठ्यांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्या-संदर्भात, त्यावेळी त्या भागात कार्यरत असलेल्या कोणा इंग्लीश अधिकार्यानी (English President residing at Suratte) पाठवलेल्या पत्राच्या आधारे छापलेल्या या बातमी वरून, त्याकाळी शिवाजी महाराजांचा देशभर असलेला दबदबा आणि मुघल आणि इंग्रजांमधे असलेली मराठ्यांची दहशत लक्षात येते. बातमी तशी चार ओळींचीच. पण त्या ओळीसुद्धा खूपकाही सांगतात.
Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey
हे वाचायला मिळाल्यावर काय वाटलय हे शब्दात सांगण कठीण आहे. कोणाला दाखवू नी कोणाला नाही अशी अवस्था झाली होती. माझे सगळे कलीग्स अमराठी. त्यामुळे उत्साहानी त्यांना हा दुवा दिला तरी त्यांचा थंड प्रतिसाद. ठरवून ठेवलेलं की घरी आल्या-आल्या इथे हा दुवा डकवायचा. सगळ्यांनी जरूर वाचा.
जय महाराष्ट्र
प्रतिक्रिया
8 Apr 2010 - 8:16 am | प्रकाश घाटपांडे
आदुगर आमी चुकुन शिवाज दी रिगल अस वाचल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Apr 2010 - 8:21 am | पाषाणभेद
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
मागच्या जन्मी मी शिवाजीराजांकडे सैनिक म्हणून असायला हवा होतो.
9 Apr 2010 - 3:08 pm | टारझन
:)
-कोथरुडभेद
8 Apr 2010 - 8:34 am | स्पंदना
इन्ग्रज द लूटर्स , रॉबर्स.
अस खवळत ना रक्त!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
9 Apr 2010 - 2:52 pm | अप्पा जोगळेकर
इन्ग्रज द लूटर्स , रॉबर्स.
अस खवळत ना रक्त.
अहो ते शिवाजीचं कौतुक कशाला करतील ? बाकी त्यांना शिव्या देऊन मनाचं समाधान होणार असेल तर गोष्ट वेगळी. शून्यातून विश्वं उभं करणारा शिवाजी आणि हजारो मैलांवरून इथे येऊन आपल्यावर राज्य करणारे इंग्रज हे दोघेही कर्तृत्ववान यात शंका नाही.
8 Apr 2010 - 2:33 pm | भारद्वाज
कालनिर्णय २०१० च्या नोव्हेंबर महिन्याच्या मागच्या बाजूला मा. बाबासाहेब पुरंदरे यांचा "दिल्लींद्रपदलिप्सवः" नावाचा सुरेख लेख आहे.
तो आपण सर्वांनी जरूर वाचावा. त्यातील थोडासा भाग असा:
पोर्तुगालच्या ऐतिहासिक दफ्तरखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी एक अत्यंत महत्वाचा कागद इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांना सापडला. त्यातील मोलाचा मजकूर पुढीलप्रमाणे-
"रायगडावर एकदा राहुजी सोमनाथ पतकी या सुभेदाराने शिवाजी महाराजांना सहज म्हटले की,"महाराज, आपण अनेक गडकोट जिंकले. काही नव्याने बांधले. अनेक बंदरे व जलदुर्गही काबीज केले. विस्तीर्ण प्रदेशही जिंकला. आता आपण पुढे काय आणि किती जिंकणार आहोत? आपले एकूण उद्दिष्ट तरी काय?"
महाराज उत्तरले," राहुजी, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण भागापर्यंतचा अवघा मुलुख सोडवावा, त्याप्रमाणेच सर्व महातीर्थक्षेत्रे मुक्त करावीत, असा आपला मानस आहे." =D> :applause:
हा संवाद राहुजीने एका पोर्तुगीज राजकीय वकिलाशी बोलताना त्याला सांगितला. त्या वकिलाने तो लिस्बनला लिहून पाठविला. शिवाजीराजा कसा आहे आणि त्याची केवढी प्रचंड राष्ट्रीय महत्वाकांक्षा सक्रीय आहे, हे पोर्तुगीज राजसत्तेला निक्षून कळावे, हाच हेतू हे पत्र लिहिण्यामागे त्या वकिलाचा होता हे उघड दिसते.
पुढे या लेखात म्हटले आहे.....
"इतिहास काळातीलच राजस्थानी पंडित रत्नाकर याने शिवाजी महाराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे. हा पंडित म्हणतो की, हा शिवाजीराजा कसा आहे? तर तो आहे, 'दिल्लींद्रपदलिप्सवः'! हा शिवाजीराजा दिल्लीश्वराच्या सिंहासनाचीच आकांक्षा धरतो आहे!" .......
...........शिवाजी महाराजांनी उराशी प्रचंड महत्वाकांक्षा धरली होती. पण आपल्याला शून्यातूनच ब्रम्हांडाचा आकार गाठावयाचा आहे हे ते जाणून होते. छावा प्रथम लहानच असतो पण त्याच्या बाळलीला छाव्याच्याच असतात. कालशः आणि क्रमशः त्याचा सिंह होतो. महाराजांची झेप अशीच वाढत गेली ,विचारांची आणि आचारांचीही ! अणूरेणूहूनही थोकडा, पुढे आकाशाएवढा झेपावत होता.
थोडक्यात...शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा गगनाला भिडत होती...आणि आताचे आपले नेते ....काय म्हणावं त्यांच्याबद्दल (अमिताभला घाबरणारे ??????) :lol: ....
जय भवानी.. जय शिवाजी...
सेवेतला एक मावळा
8 Apr 2010 - 3:08 pm | कानडाऊ योगेशु
जय भवानी जय शिवाजी!!!!!!!
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार नमन!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
9 Apr 2010 - 12:55 am | फारएन्ड
जबरी!
9 Apr 2010 - 9:31 am | नीलकांत
जय शिवाजी ! :)
9 Apr 2010 - 2:36 pm | मदनबाण
जय भवानी जय शिवाजी !!!
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
9 Apr 2010 - 2:45 pm | शानबा५१२
जय भवानी.. जय शिवाजी...
I'll never compromise
No F***ing way!
16 Jul 2012 - 9:18 pm | मन१
शिवभक्तांना आणि ऐतिहासिक रेफरन्स शोधणार्यांना कमाचा धागा.