मी एक शेतकरी !

अश्फाक's picture
अश्फाक in जनातलं, मनातलं
7 Apr 2010 - 9:15 pm

सकाळ मधे एक बातमी आली आहे,

यंदाचा मार्च जरा जास्तीच 'कडक' वाटला का?

नक्कीच. आणि ते खरे देखील आहे. देशातील बहुतांश भागात यंदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे. उन्हाच्या तीव्र चटक्‍यांपासून एप्रिलमध्येही सुटका होणार नाही. उलट, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे

या बातमी वर एक खास प्रतिक्रिया आप्ल्याशी वाटावी (share) वाट्ली म्हणुन,

On 4/7/2010 8:02 PM मी एक शेतकरी said:
पगारदार लोक्कांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, व्यावसायिकांनी आपले दुकाने सोडू नयेत, राजकारण्यांनी आपले महाल ए.सी. सोडू नयेत. मी एक शेतकरी.. उन्हात राब्ण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळेच रंग काळा पडल्यामुळे माझी ओळख तुम्हाला लगेच होते. संध्याकाळी थकून आल्यावर हात पाय धुउन जेवण व पाणी पिऊन झोपही छान लागते ..तुम्हाला लागते का हो अशी झोप ..इतर पेय पिऊन .पैश्याचा गादीवर .चला शेयर करूया छानसा उन्हाळा .. निसर्गरम्य उन्न्हाळा !!

सो जाते है फूटपाथ पे अखबार बिछाकर !
मजदुर कभी नीन्द कि गोली नही खाते!!
munawwar rana.

समाजजीवनमानअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

8 Apr 2010 - 5:05 am | सुचेल तसं

अंतर्मुख करणारा प्रतिसाद!!!

पाषाणभेद's picture

8 Apr 2010 - 6:05 am | पाषाणभेद

प्रतिक्रीया देणार्‍याने शालजोडीतले हाणले.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

बबलु's picture

8 Apr 2010 - 12:09 pm | बबलु

सो जाते है फूटपाथ पे अखबार बिछाकर !
मजदुर कभी नीन्द कि गोली नही खाते!!

फार छान आणि अगदी बरोबर.

यावरून अभय बंगांच्या "माझा साक्षात्कारी ह्र्दयरोग" पुस्तकातला एक संदर्भ आठवला....
"पूर्वी लोक दिवसभराच्या श्रमानंतर विश्रांती घ्यायचे... आता दिवसभराच्या विश्रांतीनंतर (बैठे काम) लोकांना Exercise करावा लागतो". :)

वक्त वक्त की बात है |

....बबलु

बबलु's picture

8 Apr 2010 - 12:12 pm | बबलु

सो जाते है फूटपाथ पे अखबार बिछाकर !
मजदुर कभी नीन्द कि गोली नही खाते!!

फार छान आणि अगदी बरोबर.

यावरून अभय बंगांच्या "माझा साक्षात्कारी ह्र्दयरोग" पुस्तकातला एक संदर्भ आठवला....
"पूर्वी लोक दिवसभराच्या श्रमानंतर विश्रांती घ्यायचे... आता दिवसभराच्या विश्रांतीनंतर (बैठे काम) लोकांना Exercise करावा लागतो". :)

वक्त वक्त की बात है |

....बबलु

बेभान's picture

8 Apr 2010 - 12:24 pm | बेभान

४० दिवसाचा जलप्रलय घडवून सारी पृथ्वी पाण्याखाली आणल्याचा उल्लेख बायबलमधे आहे. त्यानंतर देवाने जलप्रलय न करण्याचे वचन दिले पण पुढचा प्रलय हा पाण्याचानसून आगीचा आहे हे ही सांगण्यास तो विसरला नाही. बाकी जाणकार यावर प्रकाश टाकतीलच अशी आशा आहे.
आपण सेल्फ डिस्ट्रक्शन कडे अगदी वेगाने निघालो आहोत हे नक्की.
असो..हे थांबवणं जरी शक्य नसलं तरी वसुंधरेवरच्या होणा-या अन्यायावर आपण हे तरी नक्की करु शकतो.
नमॊस्तु प्रिय दत्तायै तुभ्यम् दॆवि वसुन्धरॆ।
त्वम् माता सर्वलॊकानां पादस्पर्शं क्षमस्वमॆ ॥
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यम्‌ पादस्पर्शम्‌ क्षमस्वमे ।।

अरुंधती's picture

8 Apr 2010 - 2:34 pm | अरुंधती

सो जाते है फूटपाथ पे अखबार बिछाकर !
मजदुर कभी नीन्द कि गोली नही खाते!!........

खरोखर माझ्यासारख्या उन्हावर कुरबुरणार्‍यांच्या श्रीमुखात लगावणारी वाक्ये.....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आळश्यांचा राजा's picture

8 Apr 2010 - 5:29 pm | आळश्यांचा राजा

ओरीसामध्ये या दिवसांत सर्व (सरकारी) कार्यालये सकाळी सात ते एक या वेळेतच चालतात. इथले शेतकरी, तसेच मजूर हे बारा-एक च्या पुढे काम करत नाहीत. कुणी या वेळेनंतर एखाद्याला राबवून घेतले तर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसा जी आर निघतो. यासाठी व्यापक प्रसिद्धी होते. नियंत्रण कक्षांचे जाळे पसरलेले असते.

बाय द वे - इथे एवढी आळशी माणसे आहेत की हिवाळ्यात देखील सगळे दुपारी ताणून देतात.

आळश्यांचा राजा