आडवाटंनं जाता जाता

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
6 Apr 2010 - 2:25 pm

मंडळी, परवापासून तुमी लावन्या वाचू वाचू कटाळला असाल. तवा एक युगलगीत ऐका. हिरो आन हिरवीन आपले त्येच हायती. पन ती काय आता लावनी म्हनत नाय. तवा ऐका जरा कान देवून त्ये काय म्हनत्यात त्ये. उगा आडकाठी आनू नका त्येंच्यात म्हंजे झालं.

आडवाटंनं जाता जाता

ती:
आडवाटंनं....आडवाटंनं....आडवाटंनं....
आडवाटंनं जाता जाता तू रं मला अडिवलं
तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||

ती:डोईवरी असतांना गवताचा भारा
मनामधी त्या इचारांना नको देवू थारा
चालतांना रं...चालतांना रं...चालतांना रं....
पाऊल माझं अडलं... ||१||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||

तो: रानी तू ग माझी आलीस या ग रानी
तू अन मी आपन दोघं, तिसरं नाय कुनी
कुना सांगू नगं...कुना सांगू नगं...कुना सांगू नगं...
इथं काय घडलं... ||२||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||

ती:तुझ्या प्रितसागरात पडले मी मासोळीवानी
नाही मनात माझ्या, तुझ्या वाचून दुसरं कोनी
जवळी तू घेता...जवळी तू घेता...जवळी तू घेता...
भान जगाचं मला पडलं... ||३||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०४/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकवितामौजमजा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

6 Apr 2010 - 2:45 pm | प्रमोद देव

दफो खेबूडकर...युगुलगीत मस्त हाय.

sur_nair's picture

7 Apr 2010 - 7:59 am | sur_nair

लय भारी. जरा चालबील लावून पोस्ट करा म्हणजे मजा येईल.