आणखीन एक इडियट...
माझा जन्म झाल्यानंतर पहिलं मिनिटभर आमच्या पिताश्रींनी कौतुकाने स्वत:च्या काळ्याभोर, गुबगुबीत मिशांवर ताव मारला. त्या मिनिटभरांत माझा चेहेरा न्याहाळण्याऐवजी प्रथम मी मुलगा असल्याचा पुरावा न्याहाळला. खरं तर सोनोग्राफी व गर्भजल चिकित्सेनंतर त्यांनी नर्सला मिठाईच्या पुड्यातून दिलेल्या गांधीजींची चित्रं छापलेल्या कागदांमुळे 'पुढची अपॉईंटमेंट कधी, मंडेला की फ्रायडेला?' या प्रश्नाला खणखणीत, 'नक्की मंडेला या साहेब. मंडेलाच.' असं उत्तर मिळालं होतं. पण आमचे पिताश्री म्हणजे पक्के चार्वाकवादी. त्यात वकील. त्यांना शब्दप्रमाण मान्य नव्हतं. आपल्या डोळ्यांनी खात्री करून घेतल्याशिवाय ते कशावरही विश्वास ठेवत नसत. आता ते पुराव्यानिशी शाबीत झाल्यामुळे मिशांवरचा ताव अंमळ हळुवार झाला होता. तसे ते हळवे झाले असतील यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही, पण आईने 'संपली एकदाची कटकट' ही भावना न आठवता, 'आज हे जरा अंमळ हळवे झाले' हे लक्षात ठेवलं यातच सगळं आलं. त्यामुळेच पुढच्या मिनिटात ते काय बोलताहेत हे आई लक्ष देऊन ऐकत होती. काहीतरी भावनेने ओलं झालेलं त्यांच्या तोंडून यायची इतक्या वर्षांची इच्छा म्हणून तिने जिवाचे कान करून ते शब्द ऐकले. 'हा इंजिनिअर होणार'. आईने एक निश्वास सोडला, व निदान या बाळंतवेदनातून सुटले यावरच समाधान मानून घेतलं. स्वप्नांच्या झुंबराचा चुराडा होताना त्यातले काही लोलक जपण्यावर आनंद मानायला एव्हाना ती शिकली होतो. ही घटना २०१० ची.
अशी सोळा-सतरा वर्षं गेली. पृथ्वी जवळपास पाव डिग्रीने अधिक तापली होती. व नवीन तंत्रज्ञानाने जे शोध लागले होते, जी भाकितं केली होती त्यावरून लोक जोपर्यंत आपल्या दुष्कर्मांचं प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत हे संकट टळणार नाही हे सिद्ध झालं होतं. सुदैवाने आमच्याकडे सततच उष्मा असल्यामुळे व लोकांना इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न भेडसावत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही सरावलो होतो. मला गेल्या तीन महिन्यात अभ्यासाशिवाय कसलाच विचार करायला वेळ मिळाला नव्हता. जेईईचा निकाल लागेपर्यंतचे काही आठवडे थोडे उंडारायला मिळाले तेवढेच. पण आजचा दिवस सोक्षमोक्ष लावण्याचा होता. माझी रॅंक काय येईल याची काळजी होती. मला फिजिक्स किंवा कॉंप्युटर सायन्सला जायचं होतं. त्यासाठी पन्नास ते दीडशे मध्ये रॅंक आली तरी चालण्यासारखं होतं. मी तसा श्रद्धाळू वगैरे नाही, पण रिझल्ट बघितला तो देवाचं नाव घेत. बघितला आणि इतकी वर्षं देवाला विसरल्याची त्याने मला शिक्षा दिली हे पटलंच.
'काय रॅंक आली रे?' पिताश्रींनी त्यांच्या करड्या आवाजाच्या प्रेमळ छटेत विचारलं. आता त्यांची एकेकाळची काळीभोर मिशी आवाजाप्रमाणेच करडी झाली होती. चेहेऱ्यावर मिश्र भाव होते. माझ्या चेहेऱ्यावरची निराशा लपवली तरी खोटं बोलणाऱ्या साक्षीदाराला पकडावं तशी त्यांनी ती पकडली होती.
'तीस' मी शक्य तितका आनंद दाखवण्याचा प्रयत्न करत म्हटलं.
'हम्म्म. म्हणजे चेन्नईला नाही मिळणार बहुतेक.' कुठच्या आयायटीत कुठचं डिपार्टमेंट चांगलं आहे, कुठचे प्रोफेसर आहेत इतकंच काय पण होस्टेल्स कशी आहेत हेही त्यांना तोंडपाठ होतं. गेलं वर्षभर त्यांनी याचा गाढा अभ्यास करण्यासाठी एक माणूस नेमला होता. व तो दिवसभर संस्थळांवर चकाट्या पिटत नाही याची खात्री करण्यासाठी ते संध्याकाळी त्याची उलटतपासणी घेत... शिवाय तज्ञांचे सल्ले घेत असतच.
'नाही.' मला चेन्नईला जायची अजिबात इच्छा नव्हती. ती आंडुगुंडू भाषा, तिथला उन्हाळा (ग्लोबल वार्मिंगमुळे अधिकच कडक झालेला) आणि पाण्याचे हाल सहन करायचे नव्हते. शिवाय मुंबईतला सगळा सेटप सोडून जायचं म्हणजे वैतागच. पण माझी रॅंक पंधराच्या आत आली असती तर तिथे जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पिताश्रींनी आपल्या सखोल अभ्यासातून ठरवलं होतं की चेन्नईचं डिपार्टमेंट बेस्ट. आणि त्यांनी ठरवलं की त्याच्याविरुद्ध करायची माझी टाप नव्हती.
'तरी पहिला प्रेफरन्स टाक तिकडे, बिघडत काही नाही. यु माइट गेट लकी...' मी मुकाट्याने मान हलवली. पण त्यांनाही ते अशक्य वाटत असल्याचं जाणवलं.
'बरं दुसरा दिल्लीचा आणि तिसरा मुंबईचा टाक. दिल्ली एन. इ. डिपार्टमेंट इज सेकंड बेस्ट, यु नो.'
'पण दिल्ली मिळेल की नाही माहीत नाही. चेन्नईला पंधरा सीट्स आहेत आणि दिल्लीला वीस त्यामुळे....'
'आय नो, आय नो. बट यु नेव्हर नो. काही यडपट असतात - हाय रॅंक असूनही इलेक्ट्रिकल, कॉंप्युटर सायन्स किंवा इव्हन फिजिक्स घेणारे.' त्यांनी हे ज्या स्वरात म्हटलं त्यापुढे मला माझी स्वप्नं सांगायचा धीरच झाला नाही.
अशा रीतीने मी मुंबईच्या एन. इ. डिपार्टमेंटमध्ये दाखल झालो. निदान दिल्लीच्या वाढलेल्या तपमानात जावं लागलं नाही, व मुंबईचा सेटप टिकून राहिला हे त्यातल्या त्यात समाधान. तेवढेच दोन लोलक मला जपायला मिळालेले. ही गोष्ट चार वर्षापूर्वीची. म्हणजे २०२७ सालची.
पिताश्री सोडायला आले, होस्टेलपर्यंत व माझं समाधान करून दिल्यासारखं सांगत होते. 'अरे मुंबईचं डिपार्टमेंटदेखील काही वाईट नाही. आणि तुमची पहिलीच बॅच आहे. संपूर्ण भारतामध्ये. खरं तर संपूर्ण जगामध्ये. एमायटी आणि स्टॅनफर्डमध्येसुद्धा डिपार्टमेंट्स पुढच्या वर्षी सुरू होणार आहेत. आणि इथले डिपार्टमेंट हेड, चंद्रधारे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. दोन वर्षं काम केलंय त्यांच्याबरोबर मी. दॅट टाईम ओन्ली ही वॉज...' आमच्या पिताश्रींनी केलेली देशसेवा हा त्यांचा वीक पाईंट आहे. ते हळवे नाही झाले तरी खूप बोलके होतात. अशा वेळी अभ्यासाची सबब काढणं उत्तम हे मी शिकलो होतो.....(बऱ्याच वेळाने) '...तीच करिअर मी पुढे करायला हवी होती असं वाटतं. आय लुक्ड सो डॅशिंग इन द युनिफॉर्म...' हे पालूपद आलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.
गेल्या चार वर्षांत मला नको असलेल्या विषयाचा मी मन लावून अभ्यास केला. न करून सांगतो कोणाला. घरी आल्यावर वीकेंडचा एक दिवस माझ्या नोट्स तपासणं, काय शिकवलं याचा आढावा घेणं वगैरे चालूच असायचं. होस्टेलवर तर पहिल्याच रात्री ऐन रॅगिंगच्या मध्ये येऊन त्यांनी सीनिअर्सना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे मला मित्र वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. मैत्रिणी कराव्या म्हटलं तर दर मुलामागे सरासरी एक अष्टमांश मुलगी. त्यामुळे आपल्या वाट्याला नक्की कधी कुठचं अंग येईल याची खात्री नाही. त्यात डिपार्टमेंट हेड पिताश्रींचे मित्र. आणि मोठ्ठे डिटेलवार रिपोर्ट लिहिण्याबद्दल नावाजलेले. त्यामुळे झक मारत क्लासेस अटेंड करायला लागलेच. जरा कुठे एखाद्या मिडटर्मला यायला उशीर झाला की मला ऑफिसमध्ये बोलवून प्रेमळ सल्ले देत. मनाने चांगले गृहस्थ पण सारखं तेच तेच बोलायचे. माणूस सहन करून करून किती करणार?
त्यात अभ्यास म्हणजे वैतागाचा. नवीन टेक्निकं, नवीन एक्स्परिमेंट्स, रीडिंग्ज, रेकॉर्डिंग्ज, प्रेडिक्शन्स.... हे सगळं अगम्य टर्मिनॉलॉजीत. शिकून किती घ्यायचं, 'मग' किती मारायचा, किती लक्षात ठेवायचं... नाही म्हटलं तरी ज्ञानाला कसली आलीय मर्यादा. हे करताना माझ्या काही होस्टेल मेट्सची मला असूया वाटायची. ते आपले माझे आवडीचे फिजिक्सचे प्रयोग, साउंड वेव्ज, इलेक्ट्रीक करंट्स, सर्किट्स वगैरे विषयी बोलायचे. क्लासिकल मेकॅनिक्स, प्रोग्रामिंगचे वगैरे क्लासेस घ्यायचे. मला वाटायचं मला हे करता यावं. पण वडिलांच्या इच्छेपुढे काहीच करता येत नव्हतं. त्यात गंमत म्हणजे ते सर्व माझ्याकडे थोड्या विचित्र नजरेने बघायचे. एन. इ. च्या नावावरनं, माझ्या पॅंटवरनं वगैरे जोक करायचे. पण या सर्वामागे मी एकतर त्यांच्यातला हायेस्ट रॅंकर म्हणूनचा राग असायचाच. पण त्याचबरोबर आमच्या डिपार्टमेंटची असूया व काहीशी भीतीही त्यांना वाटायची बहुतेक.
दिवस चालले होते. दर सेमिस्टरला मी टॉपर असल्याची पिताश्री खात्री करून घेत. अभ्यासाचं लोड पण वाढतच होतं. फिल्ट ट्रिप्ससाठी साउथला सतत जावं लागत असे. सेमिनारसाठी मी 'एन. इ. बेस्ड मेथडॉलॉजी टू डिटरमिन/प्रेडिक्ट एअरक्राफ्ट फेल्युअर रेट्स' हा चंद्रधारेंनी दिलेलाच विषय निवडला होता. बीटीपी (बीटेक प्रोजेक्ट) साठी देखील तेच गाईड म्हणून निवडणं भाग होतं. 'एन. इ. अॅप्रोच फॉर नॉन रेडार बेस्ड फॉर्मेशन इव्हॅल्युएशन' याखाली मी चांगली दीडशे पानं टंकली. चंद्रधारेंना भरून आलं होतं. व त्यांच्या रेकमेंडेशन्समुळे मला जशी मोटरसायकल दुसऱ्याच वर्षी मिळाली होती, तशीच स्टॅनफर्डमध्ये फेलोशिपदेखील चालून आली होती. मी फक्त रीत म्हणून अॅप्लाय करावं इतकी अट होती. तिथे गेलो नाही, तर वेगवेगळ्या कन्सल्टिंग फर्म्समधून तुम्ही या अव्वाच्या सव्वा पगाराला आमच्याकडे काम करायला तयार आहात का अशी पृच्छा करणारी पत्रं, ताजमधल्या इव्हेंट्सना बोलावून तोच पगार सव्वाच्याही दीडपट करण्याची वैयक्तिक आश्वासनं यामुळे अजून आयायटीच्या बाहेर अजून पडलो नाही, तरी दोन पिढ्यांची निश्चिंती पहिल्या पाच वर्षातच होणार असण्याने मी हवेत तरंगायला लागलो होतो.
पण फिजिक्स, कॉंप सायन्स सोडून दिलं याची खंत अजूनही पोटात होती. शेवटी आपण ज्ञान कशासाठी घेतो? उपयोगासाठी की ज्ञानाच्या हव्यासासाठी? कदाचित एन. इ. मुळे फिजिक्समधल्याच दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला असता तो शोधून काढताना मला हेच शिकावं लागलं असतं. मी आत्ता शिकलो ते काय वाईट झालं? कदाचित पुढे थोडं फिजिक्सवर भर देऊन दोन्ही डगरींवर पाय ठेवता येईल की. आता हळुहळू सर्वच जगभरच एन. इ. डिपार्टमेंट्स तयार होत असली तरी मी पहिला ग्रॅज्युएट म्हणून माझी वट होतीच. हे सगळं मला नकोसं थोडंच होतं? पण काही केल्या मनातली रुखरुख जात नव्हती. हे सगळं स्वत:ला कारणं देणं वाटत होतं.
शेवटी कॉन्व्होकेशन झालं. सतत १०.० सीपीए ठेवल्याने गोल्ड मेडल मिळालं. बाबा त्यादिवशी पहिल्यांदा रडले. फोटो, मुलाखती, शिक्षणमत्र्यांच्या हातनं सत्कार, डायरोच्या बंगल्यावर चहासाठी आमंत्रण, दिवे, पार्ट्या, पूर्वी भाव न देणाऱ्या पोरींचे फोन्स... सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर ब्लर आहे. ते घडत होतं. मी योग्य तिथे हसत होतो. काही चुकीचं बोललो नाही... एवढंच आठवतंय.
आत्ता मी बसलोय माझ्या खोलीत. एकटाच. काय गमावलंय याचा विचार करत. कारण ते कधीच निश्चित नसतं. काय मिळवलंय हे दिसत असतं. माझ्या समोर ते मला दिसतंय. एक सर्टिफिकेट. सोनेरी, नक्षीदार, सन्माननीय अक्षरातलं. त्यावर माझं नाव. आजची २०३१ सालची तारीख. खाली चंद्रधारे उलाटेंची सही.
मध्ये लिहिलेलं... हॅज बिन कॉन्फर्ड ... बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ नाडी इंजिनिअरिंग....
माझ्या विचारांचे धागे धागे होत चाललेले...
प्रतिक्रिया
5 Apr 2010 - 11:09 pm | शुचि
=)) =)) =))
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ नाडी इंजिनिअरिंग
ह ह पु वा ....... हापीसात जावसं नाय वाटते!!! लय भारी मजा आली!!! शब्द अपुरे!!! ........... अस वटतया सुट्टी मारून ह्यो लेख "सेलेब्रटे" करावा =))
_____________________________
>> स्वप्नांच्या झुंबराचा चुराडा होताना त्यातले काही लोलक जपण्यावर आनंद मानायला एव्हाना ती शिकली होतो. >>
क्या बात है!!!!! काय लिहीता घासकडवी साहेब वा!!
_____________________________
वडीलंचं व्यक्तीचित्रण देखील प्रभावी झालय :) .... सोमवार का शुक्रवार? मुलगा का मुलगी या असल्या बाबीत अधिक रस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
5 Apr 2010 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
गुरूजी (तुम्ही शिष्या माना वा मानू नका, मी तुम्हाला गुरूच मानणार!), महान आहात!
नावाचं विडंबन तर अगदी हुच्चच!!! (एखाद दुसरं उद्गारचिन्ह कमी असेल तर माफी.) तुम्ही कुठला धागा कुठे जोडाल आणि कोणाला दोर्या लावाल काही सांगता येत नाही.
अदिती
5 Apr 2010 - 10:44 pm | धनंजय
२०२७-२०३१ काळात मुंबई आयआयटीमध्ये मुलींचे प्रमाण फक्त नवमांश (८ मुले+अष्टमांश १ मुलगी = ९ पैकी एक मुलगी)!
ऐकून भविष्याबद्दल काळजी वाटते ;-)
6 Apr 2010 - 1:46 am | अनामिक
पुरुष २०२७ पर्यंत जास्तं उत्क्रांत झाले (आणि माकडीणींच्या पुढे गेले) असल्याने असे घडले असावे का?
-अनामिक
6 Apr 2010 - 8:05 am | राजेश घासकडवी
ते नक्कीच बरं आहे. ३५ पैकी १ मुलगी हे प्रमाण मी पाह्यलेलं आहे....
5 Apr 2010 - 10:54 pm | पाषाणभेद
माननिय रारा. राजेश घासकडवी सो.
नमस्कार अन आशिर्वाद.
तुम्ही आम्हाला लहान हो. म्हणून आशिर्वाद दिले. राग मानू नका. पण मानाने फार मोठे हो तुम्ही.
आताच तुमचा लेख वाचला. माझ्या होणार्या मुलाच्या मुलाचे प्लानिंग आम्ही आताच केलयं. त्याची नाडी परिक्षा आताच केली व त्यात असे सागण्यात आले की सन २०४० च्या दरम्यान आकाशस्थ वाहनांच्या इंडश्ट्रीला भरपूर नोकर्यांची संधी असणार आहे. त्यास्तव तुम्ही त्या पतवंडाला या एन. ई च्या कोर्स साठी अॅडमिशन घेण्यासाठी मध्यस्थी कराल काय? मी पैशाची साठवणूक आताच चालू केलीय. तरी तुम्ही तुमचे वजन खर्च कराल ही आशा आहे. काय आहे की आजकाल या एन.ई. (नॅनो इंजिनियरींग नाही हो) ला फार भाव आलाय म्हणे. आमच्या वेळी नव्हतं असं काही. असो.
बाकी काय असणार आमच्याकडे.
खुशाली कळवत रहा.
कळावे.
तुमचा हितचिंतक,
पाषाणभेद दगडफोडे
ता.क.: तुमच्या कॉलेजचे फाउंडर कोण हो? आमच्याच काळातले होते का ते? ओळखीचे निघाले तर थोडे पैसे तरी वाचवीन म्हणतो. कसें?
उलट टपाली कळावे.
पाभे/ दफो
5 Apr 2010 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
(बिना नाडी नाही गोडी)
5 Apr 2010 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
-दिलीप बिरुटे
5 Apr 2010 - 11:21 pm | चतुरंग
केवळ हुच्च!! <०()8=<
(एवढ्या धमाक्यातही हे वाक्य खरोखरंच काळजाला भिडले ..
स्वप्नांच्या झुंबराचा चुराडा होताना त्यातले काही लोलक जपण्यावर आनंद मानायला एव्हाना ती शिकली होतो.
क्या बात है!!)
(तुमानीचिया नाडी सोडताहे|
असा सर्व जालावरी कोण आहे||)
जय जय नाडीवीर अनर्थ!!
चतुरंग
5 Apr 2010 - 11:26 pm | नंदन
असेच म्हणतो. हुच्च लेख! करडी मिशी/आवाज हे निरीक्षणही मस्त.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Apr 2010 - 12:01 am | Nile
सहमत!
लै म्हणजे लैच भारी लेख! जबर्या!
6 Apr 2010 - 12:40 am | घाटावरचे भट
क आणि ड आणि क!!!
6 Apr 2010 - 1:18 am | प्रभो
नादलेस लेख
6 Apr 2010 - 10:21 am | प्रकाश घाटपांडे
म्हनुनच आमी तुमानी चे पेशल विल्याष्टिक डिजाईन केले व्हते!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
5 Apr 2010 - 11:35 pm | शशिकांत ओक
...मी तसा श्रद्धाळू वगैरे नाही
आपण ज्ञान कशासाठी घेतो?
ऱाजेशजी ,
नाडीचे इंजिनियरिंग आपल्या व येथील काही लोकांच्या मनात इतके भिनले आहे. या विपरीत आकर्षणाने अनेकांची झोप उडवली नाही तर नवल नाही. आणखी येऊ द्यात.
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
5 Apr 2010 - 11:45 pm | डावखुरा
कसंय आता वाचुनही न वाचल्यासारखे झालेय.......
१) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ नाडी इंजिनिअरिंग....
माझ्या विचारांचे धागे धागे होत चाललेले... ~X( ~X(
(शेवटी मुख्य मुद्दा लक्षात आला) ~X(
२) माझा जन्म झाल्यानंतर पहिलं मिनिटभर आमच्या पिताश्रींनी कौतुकाने स्वत:च्या काळ्याभोर, गुबगुबीत मिशांवर ताव मारला. त्या मिनिटभरांत माझा चेहेरा न्याहाळण्याऐवजी प्रथम मी मुलगा असल्याचा पुरावा न्याहाळला.
=)) =)) =)) =)) हहपुवा..... :)
"राजे!"
6 Apr 2010 - 1:04 am | मुक्तसुनीत
आल इज वेल ! ;-) लय भारी !
6 Apr 2010 - 2:28 am | प्राजु
क--- ह---र!!!!!
धन्य आहात. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
6 Apr 2010 - 4:56 am | पंगा
हमें तो भाई इस्टोरी एकदम बकवास लगी| मरे घोडे़ को पीट पीट के अपना ही चमडा़ बना लेने वाली, वह भी किसी तीसरे की आइड़िया सस्ते में उधार ले के| अरे गुरु, ज़रा टापिक तो कुछ अच्छा वाला चुन लेते! नाड़ी-वाला टापिक तो अब बिल्कुल घिसा-पिटा हो चुका है|
(अरे ओ 'थ्री ईड़ियट्स' की इस्टोरी लिखने वाले, जरा यहाँ आओ तो| देखो तो, तुम्हारी अच्छी-खासी इस्टोरी की खींच-तान के कैसी चुइंगम बना दी है इन डुप्लिकैट इस्टोरी वाले साहब ने| क्या करें, औरिजनैल्टी का ज़माना ही नहीं रहा आजकल|)
खै़र, जब तक बिकती है, बेचते रहियो, गुरु| यह नाड़ी-वाला फारम्यूला अच्छा-खासा मिल जो चुका है, तो चूँस चूँस के निकाल लो उस का रस जी भर के, जितना चूँस के निकाल सको उतना। फिलहाल इस फारम्यूले की चलती है, तो बना दो नाड़ी पे जितनी चले उतनी इस्टोरियाँ| और बना लो अपनी रैटिंग। वह अंग्रेज़ी में कहावत है न, कुछ "मैक है व्हाइल दि सन शाइन्स" कर के, बिल्कुल वैसे|
- पंडित गागाभट्ट
6 Apr 2010 - 5:06 am | पाषाणभेद
आरं ए बाबा, वरलं लिवेल काय बी समजलं नाय पग. मराठीत लिव की जरा. का उगा पंगा घेतूया? ऑं? आन काय रे ए तुला हिंदीत टायप करता येतयं, मराठी लेखबी वाचतूया आन तुला मराठी वाक्य टायप करता येत नाय व्हय रे?
पंडित गागाभट्ट आमच्या राजेंच्या राज्याभिषेकाला आले होते अन तु त्यांचेच नाव घेतले म्हणून सोडून द्यावे लागते आहे. नाहितर...
( मागं बी तुला सांगेल व्हतं.बाबा आता तरी मराठीतच लिही, बोल, चाल, जेव, झोप, कर, इ.)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
6 Apr 2010 - 5:10 am | शुचि
http://misalpav.com/node/11566#comment-183840
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
6 Apr 2010 - 5:22 am | पाषाणभेद
तेच तर पाहतोय मी कधीपासून त्याचे वागणे. तुमच्याच धाग्यावर त्याने हे लिहीले आहे. म्हणजे त्याला समजते की येथे हिंदीला फाट्यावर मारले जाते ते. तरीही त्याचे चालूच आहे.
अवांतर: तुम्हीही तुमची वरची स्वाक्षरी हिंदीतच लिहीली आहे बरं का. ती सुधरवून घ्या आधी. उगाच 'लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण' व्हायचे नाहितर. (आमचे नाव बदनाम होते हो.)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
6 Apr 2010 - 5:28 am | शुचि
त्या महादेवी वर्मांच्या सुरेख ओळी आहेत. असू द्या हो स्वाक्षरी चालते कंच्या बी भाषेत ;)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
6 Apr 2010 - 4:47 am | पिंगू
नाडी वाचकाचा डिप्लोमा सुरु करायचा म्हन्तुया आपल्या आशिर्वादाने!!!!!
6 Apr 2010 - 8:27 am | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
याच कॉपी राईट प्रोटेक्ट करुन घ्या! एवढा गहन विषय या वयात मांडण हे नाडीमहर्षींच्या आशिर्वादाशिवाय शक्य नाही.
फलज्योतिष चिकित्सा मंडळा तर्फे बेस्ट नाडियट अवॉर्ड
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Apr 2010 - 9:33 am | महेश हतोळकर
एखाद्या निपूण हॉकीपटूने मैदानभर ड्रिबलींग करावी आणि एक जब्बरदस्त स्कूप मारून गोल करावा असे वाटले.
झकास. आजून येऊद्या.
6 Apr 2010 - 10:19 am | मनिष
जहापना....तुस्सी ग्रेट हो! :)
6 Apr 2010 - 10:01 am | गोगोल
मला कितीतरी वेळ वाटत होत की एन ई म्हणजे नॅनो इंजिनियरिंग ... पण शेवटी मस्त रहस्यभेद केला आहे. बाकी आय आय टी लाइफ आणि अडमिशन प्रोसेस चे निरीक्षण केवळ जबरदस्त!!
6 Apr 2010 - 10:04 am | प्रमोद देव
:)
6 Apr 2010 - 11:13 am | बद्दु
मज्जा आली.
6 Apr 2010 - 12:27 pm | अस्मी
सॉ-ल्लि-ड
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
6 Apr 2010 - 12:31 pm | समंजस
झक्कास!!! :)
6 Apr 2010 - 5:27 pm | पारंबीचा भापू
राजेशभाऊ, लेख मस्त जमला आहे. वाचायला मस्त मजा आली.
भापू
6 Apr 2010 - 6:33 pm | बेभान
मला तर किव Albert Einstein, Michael Maestlin, Isaac Newton यांसारख्या लोकांची करावी वाटते. रद्दीच्या (पट्टीचे भाव आकाशाला- शकाळ शनिवार ६-एप्रिल-२०३०)भावात गेले बिचारे.
नक्कीच पश्चाताप होत असणार यांच्या आत्म्यांना..त्यांची पट्टी पडली नसल्याचा.
=))
बाकी लेख अगदी वंटास..अगदी हिरोशिमा, नागासाकी नंतरचा ई-न्युक्लियर अॅटॅक. (हॅट्स ऑफ/मुज-याची स्मायली)
6 Apr 2010 - 7:48 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही आहे एकदम.
6 Apr 2010 - 8:12 pm | सुमीत भातखंडे
फर्मास लेख.
हहपुवा .
6 Apr 2010 - 8:58 pm | चित्रगुप्त
तुमच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत...
मानलं बुवा....
तुम्ही जे जे काही लिहिता, केवळ अप्रतिम.....
असेच लिहीत रहा........
6 Apr 2010 - 9:18 pm | चित्रगुप्त
सापडला..... तुमच्या कॉलेजचा फोटो नाडीतच सापडला....
7 Apr 2010 - 10:53 am | स्पंदना
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
लेख फारच छान आहे. काय शिकले तुम्हि तुमच्या कोर्सात? नाडिचि गाठ कशी मारायची? नाहि मी नविन आहे. आणि पामराला आत्त्ता पर्यन्त फक्त ***नाडिने धोका दिला आहे.
7 Apr 2010 - 10:51 am | वेताळ
एकदम झक्कास आहे लेख. खुपच दिवसानी खुप दर्जेदार विनोदी लेख वाचायला मिळाला. ;) :D
____/\__________और भी आने दे.
वेताळ
7 Apr 2010 - 11:07 am | स्वानन्द
बस करा ना राव. किती खेचाल एखाद्याची?
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
7 Apr 2010 - 1:10 pm | श्रावण मोडक
:)
बाय द वे तो लोलक हा शब्द काही तरी आठवण देण्याचा प्रयत्न करतोय. काही संदर्भ तुटक-तुटक लागल्यासारखे वाटताहेत...!
7 Apr 2010 - 8:41 pm | सुधीर काळे
घासकडवी-जी,
अतीशय वाचनीय व चमचमीत लेख! तुमची लेखनशैली खरंच फार 'झक्कास' आहे. पुढच्या वेळी फ्रेमाँटला आलो कीं नक्की भेटेन.
सध्या मी माझ्याच "फसवणूक" प्रकल्पात बुडून गेलेलो असल्याने बाकीचे वाचायला सवड मिळत नाहीं त्यामुळे हा लेखही वाचयला जवळ-जवळ मुकलोच होतो. पण नशीबाने वाचावासा वाटला व मजा आली.
असे किती चांगले लेखन वाचायला मी मुकतोय्/चुकतोय् हाही विचार मनात चुकचुकून गेला!
असो. तुमचे लेखन अजून येऊ दे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
7 Apr 2010 - 4:48 pm | झकासराव
=)) =)) =))
उच्च्च!!!!!!!!
10 Apr 2010 - 5:11 pm | भोचक
राजेशजी, मस्त लिहिलंय. अगदी 'नाड्या' ओढणारा लेख.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
10 Apr 2010 - 7:35 pm | अक्षय पुर्णपात्रे
असेच म्हणतो. नाड्या 'आवळणारा' लेख.
10 Apr 2010 - 6:38 pm | सुवर्णमयी
वा! छान लेख. आवडला.
11 Apr 2010 - 10:07 am | आनंदयात्री
आली. मस्त लेख.