फ्लॅशबॅक

jaypal's picture
jaypal in जनातलं, मनातलं
5 Apr 2010 - 9:30 pm

निव्वळ वासाने/गंधाने सुद्धा मी नास्टालजिक होतो. कुणाला मातीचा वास, तर कुणाला फ़ुलांचा वास आवडतो. कुणाला फ़ळांचा आवडत असेल तर कुणाला आजुन कश्याचा वास/गंध आवडत असेल. मला खुप विविध गंध आवडतात. पेट्रोल च्या धुराचा, फ़टाक्याच्या धुराचा. कुठेही व कधीही फ़टाक्याच्या धुराचा वास आला की लगेच मला माज़्या बालपणाच्या दिवाळीची आठवण येते. मुसळधार पावसात आडोश्याला म्हणुन बंद दुकानच्या पायरीशी उभ -हाव आणि कुठुनतरी जळत्या सिगरटेचा वास यावा. या पावसाळ्यात भिजताना तर खुप भास होतात आल/गवती चहाचा नाही तर कांदाभजीच्या तळणाचा खमंग वास हमखास गारुड घालतात मनावर. दुस-या दिवशी सकाळी उशीला येणारा गज-याचा गंध असुदे कींवा न्हाल्यानंतर येणारा शिकेकाईचा गंध खुळ लावतो जिवाला.

तसच काहीस वळिवाच्या सरीनंतर येणा-या म्रुदगंधाची धुंदी मला माझ्या गावतल्या शिवारावर घेउन जाते. नांगरलेल्या जमिनीवर तो ढेकळांचा जत्था आणि त्या पहील्या पावसाच्या सरीनंतर (मिठीत विरघळावा तसा) अलगद विरघळणारा तो काळ्या मातीचा गोळा. त्या मिलनाचा आसमंत भरुन आणि भारुन टाकणारा सुवासीक दरवळ. मी खरोखरीच हरवुन जातो स्वत:ला आणि भानावर आल्यावर एका समाधी अवस्थेची त्रुप्ती झळाळते डोळ्यात.

काल रविवारी एका मित्रासाठी नेटवरुन लहान बाळांचे फ़ोटो डाउनलोड करत होतो. मला (लहानपणापासुनच) लहान बाळांची खुप आवड. चाळीतली बरीच मुल फ़ेरफ़टका मारुन आणायला माझ्याच खांद्यावर असत. त्यातच बोनसची भर म्हणजे आमच्या शेजारील मावशी पाळणाघर चालवत असत. तर ते फ़ोटो डाउनलोड करताना नकळत परत एकदा "त्या" गंधाने झपाटलं तो म्हणजे दुपट्याला येणारा दुधाचा,पावडरचा,तेलाचा,काजळाचा ई.चा. संमीश्र वास. त्या आठवणितल्या वासानेच मला अस हातात तान्ह बाळ असल्याचा भास होतहोता. त्या एका वासाच्या आठवाने किती बाळं झरझर डोळ्यासमोरुन गेली म्हणुन सांगु. (आज त्या पैकी काहींची लग्ने झाली असुन आता त्यांची बाळे माझी खेळणी झाली आहेत.) त्यांना न्हाउ, खाउ घालण्यापासुन, लंगोटे बदलण्या पर्यंत सर्व गोष्टी मी आनंदाने केल्या होत्या त्याची ही सव्याज परत फ़ेडच होती जणु.

या वासाच्या आठवणी मला एकदम फ़्लॆशबॆक मधे घेउन जातात. त्या मधे पुतण्यांचा जन्मापासुन ते माझ्या मुलाच्या जन्मा पर्यंतच्या सगळ्या गोष्टी/घटना लख्ख आठवतात. त्यांना वाटी चमच्याने दुध पाजल्यावर ढेकर येण्यासाठी पाठीवर हालके हालके धपाटे मारत फ़े-या मारणारा मी दिसतो. वहिनींचा आर्जव आठवतो "आहो भावजी जरा याला झोपवाना" भावजी लगेच सेवातत्पर :D . त्याला मांडिवर घेउन जोजवण खाली ठेवताना जरा जरी हालचाल जोरात झाली की ट्यां,
मग मांडीला मुंग्या येइपर्यंत जोजवण चालुच, पण त्यात सुद्धा समाधान होतं. खांद्यावर निवांत डोक ठेवुन ती बाळं किती निरागसपणे झोपतात नाही? आपल्याला पण जरा जोरात हालाचाल करायचा मग धिर होत नाही. घरातल बाळ आजारी असेल तर आख्ख घर आजारी असल्याचा भास होतो मला. आज पण माझ्या मुलाला झोप लागे पर्यंत बाबाच्या हाताची उशी लागते.
एका वासाच्या निमीत्ताने असा सगळा आठव जागा होतो आणि मग भानावर आल्यावर बघतो तर काय मुलगा हासत म्हणत असतो"आई बाबा हारवले बघ परत एकदा"
लेखन हा माझा प्रांत नाही म्हणुन लेखन/विचार कदाचित विस्कळीत वाटतील. पण तुम्हा सर्वांसाठी मनापासुन एकच प्रार्थना करीन "तुमच्यातले लहान मुल सदैव हासर राहुदे आणि त्याच्यासारखीच शांत+चिंतामुक्त झोप तुम्हाला लाभुदे"

bay

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

5 Apr 2010 - 10:06 pm | शुचि

लेख आवडला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!

पाषाणभेद's picture

5 Apr 2010 - 10:24 pm | पाषाणभेद

"या वासाच्या आठवणी मला एकदम फ़्लॆशबॆक मधे घेउन जातात"

लय भारी.
आजूनबी कुठं राकेलचा वास आला का मला माझ्या मामाचं किराना दुकान आठवतं. राकेल इकायचं लायसन व्ह्तं त्याच्याक.
लय भारी लेख बरं का. कुठं दडवून ठेवेल व्हता इतके दिस?

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

बद्दु's picture

6 Apr 2010 - 11:18 am | बद्दु

फोटो सुन्दर..बाळ्या गोड हसतोय्...क्युट...

दिपक's picture

6 Apr 2010 - 11:39 am | दिपक

छान प्रकटन रे जयपाल. चित्राचा उपयोगही नेहमीप्रमाणे उत्तम.
येऊदे अजुन असेच लिखाण. :)

स्वाती दिनेश's picture

6 Apr 2010 - 12:32 pm | स्वाती दिनेश

प्रकटन आवडले.
स्वाती

प्रमोद देव's picture

6 Apr 2010 - 12:38 pm | प्रमोद देव

वि’जय’ असो.
मस्त लिहिलंय.

राजेश घासकडवी's picture

6 Apr 2010 - 3:05 pm | राजेश घासकडवी

वासांची दुनिया ही अदृश्य, त्यामुळे काहीशी गूढ. त्यांचा स्मृतीशी असलेला संबंध नेहेमीच स्पष्ट असेल असं नाही. या वासामुळे ही आठवण आली असं बऱ्याच वेळा सांगता येत नाही. पण चित्रांइतकीच त्यांच्यात ती शक्ती असते. तुम्ही तर चित्रांनी वास जागृत होण्याचं सांगताय. वा.

जाता जाता...अगदी लहान मुलांच्या टाळूला एक वेगळाच वास येतो. तोही अवर्णनीय.

अरुंधती's picture

6 Apr 2010 - 4:07 pm | अरुंधती

गंधांची ती अद्भुत दुनिया.... प्रत्येक वासाची काही खास आठवण असते. आणि एरवी हव्या त्या वेळेला गोठणारा किंवा फेल होणारा मेंदू बरोब्बर त्या गंधाच्या खुणांनी जागा होतो आणि आपल्याला एका स्मृतिविश्वाची सफर घडवून आणतो! 8>

छान लिहिलंय.... आणि त्याहीपेक्षा मी त्या उसळणार्‍या उत्साही बाहुल्या आणि हसर्‍या बाळाच्या प्रेमात पडले! लई झ्याक!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

6 Apr 2010 - 4:27 pm | टारझन

बरोबर आहे ... कोणाला कसले वास आवडतात तर कोणाला कसले वास आवडतात ...
काहींना वास मारायला ही आवडतं !
लेख मात्र भारी झाला आहे हो .. क्लास एकदम :)

-(मुंबैचा व्हाईसराय) राज्यपाल

संजा's picture

6 Apr 2010 - 5:07 pm | संजा

खुप मोठ्ठा हो बाळा.

संजा

jaypal's picture

7 Apr 2010 - 10:57 am | jaypal

३ इडियट्स मधला संवाद आठवला. "बडी मुष्कीलसे ये अ‍ॅटिट्युड पाया है"
तेंव्हा मी तुम्हला मैत्रीचा सल्ला देइन की तुम्हीच जरा लहान होउन बघा काय मजा अस्ते ती ? उगाच मोठेपणा मिरवण्यत काय हाशिल ? :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

संजा's picture

8 Apr 2010 - 2:37 pm | संजा

सल्ल्याबद्दल आभारी आहे. पण मला सांगा मोठ झाल्यानंतर तूम्हाला कधी वास आला नाही ? कधी वास घेतला नाही ?

jaypal's picture

7 Apr 2010 - 10:45 am | jaypal

प्रतिसाद कर्त्यांचे आभार :-)
*****************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

संदीप चित्रे's picture

8 Apr 2010 - 9:25 pm | संदीप चित्रे

पहिल्याच परिच्छेदापासून मनात वेगवेगळ्या गंधांचा उत्सव सुरू झाला.
>> दुस-या दिवशी सकाळी उशीला येणारा गज-याचा गंध असुदे कींवा न्हाल्यानंतर येणारा शिकेकाईचा गंध खुळ लावतो जिवाला.
>> तसच काहीस वळिवाच्या सरीनंतर येणा-या म्रुदगंधाची धुंदी मला माझ्या गावतल्या शिवारावर घेउन जाते. नांगरलेल्या जमिनीवर तो ढेकळांचा जत्था आणि त्या पहील्या पावसाच्या सरीनंतर (मिठीत विरघळावा तसा) अलगद विरघळणारा तो काळ्या मातीचा गोळा. त्या मिलनाचा आसमंत भरुन आणि भारुन टाकणारा सुवासीक दरवळ.

भ-न्ना-ट !!!

चतुरंग's picture

8 Apr 2010 - 9:30 pm | चतुरंग

लै खास!! =D>

(मृद्गंधप्रेमी)चतुरंग

अनिल हटेला's picture

9 Apr 2010 - 12:29 am | अनिल हटेला

स्सह्हीच !!
जयपाल राव चित्रदर्शी लिखान येउ द्यात अजुन....:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

मदनबाण's picture

9 Apr 2010 - 1:02 pm | मदनबाण

मस्त लेख... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अमोल केळकर's picture

9 Apr 2010 - 1:49 pm | अमोल केळकर

खुप छान

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा