ती....

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in जनातलं, मनातलं
5 Mar 2010 - 10:58 am

भगवंताने दिली आहे ती माझ्यासाठी, माझी आहे ती.. नक्कीच तुमच्या कडेही असेलच ती.. प्रत्येकाकडे असतेच ती; तिचे अस्तित्व ती नसली तरी असते, सतत अवती भोवती जाणवत असते... मनाच्या गाभार्‍यात, खोल कुठेतरी काळजात ती आहे हा विश्वास असतो.. एक अनामिक ओढ असते! एक अनाकलनिय हुरहुर, एक न सांगता येणारी उर्मी.. भर उन्हात एक झुळुक गारव्याची

ही म्हणजे जणु देव्हार्‍यातली समई, स्वतः जळुन प्रकाश वाटणारी, नमस्कार करणार्‍याला दिशा दाखवुन नामानिराळी राहणारी.. भक्ताची नाळ देवाशी जोडुन देणारी!!

किती रुपे तिची, प्रत्येक रुपात नविन असते ती!
कधी अवखळ निर्झराप्रमाणे निरागस, कधी मिलनासाठी आतुर झालेली, एखाद्या वावटळी सारखी बेभान, कधी खोल डोहाप्रमाणे समजंस आतमध्येही भलेही वादळ असेल पण वर निखळ शांतता, कधी जीवनदायिनी!! हीचे रौद्ररुप सुध्दा प्रलोभनीय, अविस्मरणीय... तीचे वर्णन करायला शब्द्कोष अपुरे पडतात.

ही राधा ही असते आणि मीरा ही..
ही जिजा आणि हिरकणी पण असते, हिला कोणीच थोपवु शकत नाही, अंधार भिववु शकत नाही, दरीची खोली हिच्यासाठी किरकोळ असते.. पोटचा पोर लोक-कल्याणासाठी, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात झोकुन देऊन आयुष्यभर त्या आगीत कण कण जळण्याची किमया हिलाच साधु शकते..

ही आनंदीबाई असते आणि फुल्यांची सावित्रीसुध्दा असते
ही निवेदिता पण असते आणि टेरेसा पण.. परदेशात जाऊन तिथल्या माणसांनी झिडकारलेल्यांना आपले म्हणुन "आईपण" निभावणे "मदर" लाच जमते!

कुठुन येते हे देवपण, कुठुन पाझरते तीच्या मनात सार्‍या जगाला सामावुन घेणारी माया??
शांत, तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी, बुध्दीजीवी तरी काळजीपोटी दारामागे भांडे उपडे घालणारी, सतत लेकरा-मुलांसाठी झटणारी.... काय आहे हे न ऊलगडाणारे कोडे, कधी परमेश्वरालातरी कळेल का ही??

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

5 Mar 2010 - 11:40 am | शैलेन्द्र

छान मुक्तक....

पण ती काय किंवा तो काय, समाजात आपल्यासाठी झिजणारे अनेक असतात, ज्याक्षणी लिंगनिरपेक्ष("ती" एक बाब सोडुन) समाज अस्तित्वात येइल तेंव्हा रोजचाच दीवस हा प्रत्येक चांगल्या स्त्री आणि पुरुषाचा असेल.

शुचि's picture

5 Mar 2010 - 5:34 pm | शुचि

हर्षद आपल्याला "कुंडलिनी" म्हणायचय का? ..... मी "ती" च्या जागी "कुंडलिनी" शब्द घालून पाहीला आणि अर्थ लागतोय.
फार सुंदर मुक्तक आहे. "पाडलेल" नसून स्फुरलेलं आहे.
मला ते खूप महत्त्वाचं वाटतं.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शुचि's picture

6 Apr 2010 - 12:30 am | शुचि

हर्षद साहेब ,
check this out -
http://www.devipress.com/soft-moon-shining/sample-poems.html

फार सुंदर आहेत या कविता. मला यांचीआठवण झाली तुमची कविता वाचून.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!