जयवी ताईंची सुंदर 'रुतावे कुठे' गझल वाचली आणि विडंबनाची कंड जाणवली ;) माझा एक प्रयत्न
न कवीस कळले लिहावे कुठे
कविता कुठे अन् चर्चा कुठे
उशाला ठेवली रात्री पुस्तके तरी
घुसते का ज्ञान डोक्यामध्ये कुठे
ठरवुनी जमावे अश्रु लोचनी
मालिका बघुनी रडावे कुठे
मनी वंचना, हास्य गालावरी
अशा बोलण्याने फसावे कुठे
पुरस्कार पाहुनी थकलो अता
नव्या 'पद्मा' ची पातळी कुठे
हिमेशी नाक चोंदले का कधी
नाकातुनी गाणे ऍकवावे कुठे
सुरा पिउनी चालवणे गुन्हा
किती निष्पाप ही मारावे कुठे
विडंबनाने कोपला कवी जर का
विडंबकाने मग पळावे कुठे
चेतन