दहा वर्षांपूर्वी, नवर्याचं अमेरिकेला 'सह' यायचं नक्की झालं नि तर्हेतर्हेच्या शेर्यांना, सल्ल्यांना जणू ऊत आला.
'नशीब काढलं हो पोरीनं...' ( म्हणजे? भारतात संसार करणारे सगळे फुटक्या नशिबाचे की काय?)
'आता काय, मज्जाच मज्जा तुमची...तिथे सारी कामं रोबोट करतात म्हणे.( हा रोबोट म्हणजे मीच हे इथे आल्यावरच कळलं.)
'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले)
'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?)
'हं... तशीही तिला नटायमुरडायची आवड... आता काय.. एकदम मॉडर्न बनून येईल.' (हे ऐकून माझा उगाचच अमेरिकेच्या रस्त्यांवरून सगळ्या बिपाशा, प्रियंका वगैरेच फिरत असतात असा समज व्हायला लागला.)
तर इकडे यायचं नक्की झालं नि एक मोठ्ठा यक्षप्रश्न उभा ठाकला माझ्या समोर. म्हणजे खरंतर नवर्याच्याही समोर. अमेरिकेत यायचं म्हणजे कार चालवता आलीच पाहिजे.
नवर्याचं बालपण नागपुरात नि त्यानंतरचं वास्तव्य मुंबापुरीत झाल्याने दुचाकी शिवाय कुठलं वाहन चालवायची त्याला सवयच नव्हती. अमेरिकेत जायचं तर इंटरनॅशनल लायसन्स हे हवंच. तशी अटच होती मुळी नेमणूकपत्रात.
मग अर्थातच नव्वद टक्के भारतीय जे करतात ते करणं आलं. म्हणजे एजंट गाठणं.
'होऊन जायल सायेब. उद्याला या गिरगावातल्या हापिसात.'
'पण मला नुसतं लायसन्स नकोय. गाडी चालवायला पण शिकायचीय.' इति नवरा.
'चालेल की. तिथल्या सायबानं विचारलं की फकस्त रिवर्स घेता येईल न तुमाला?'
'अरे बाबा, मला स्टार्ट पण करता येणार नाही.'
'होऊन जायल सायेब. उद्याला दीड हजार रुपये घेऊन या की बास... गाडीची नंतर बी करता यील प्राक्टीस'
असे अनेक विनोदी संवाद झाल्यावर, घाईघाईने काही लेसन्स घेऊन, शेवटी 'लायसेन' मिळालं एकदाचं.
उभयतांपैकी एक चक्रधर झाला म्हटल्यावर खुशीतच विमानात बसले मी. भारतात साताठ वर्षं केलेल्या नोकरीचा खूप कंटाळा आलेला... त्यात एच फोर व्हिसा असल्याने गेल्यागेल्या पूर्णवेळ गृहिणीचा रोल करावा लागेल ही कल्पना होतीच. त्या सार्या सुखस्वप्नांमधे गाडी चालवावी (च)लागेल या भयाण विचाराला थारा नव्हता.
आल्याआल्या काही दिवस तर एकदम मजेत गेले. नवं अपार्टंमेंट, ते सजवणं, नवीन नवीन ओळखी, ते वीकेंडला मॉल्स मधे फिरणं.. सुरुवातीला बरं वाटलं. पण नवर्याचा प्रोजेक्ट जोमानं सुरू होऊन तो कामाला जुंपल्या गेला नि एकटेपणा माझ्या मनाला भिडायला सुरुवात झाली.
'अहो, आज जरा लवकर याल का? ग्रोसरी करायचीय.'
'बघतो ग. आज कठीण आहे. खूप काम आहे...'
'ते तर रोजच असतं हो. पण कणीक, तेल नि तांदूळ तिन्ही संपत आलंय.'
मी तेल संपले, तूप संपले या चालीवर...
'अन रोज रोज कसा हो उशीर होतो तुम्हाला?'
'मग ? मी काही एल आय सी त नाहीये म्हटलं. पाच वाजले की साहेबाच्या पुढे फाईल फेकायला...'
असे अनेक सुखसंवाद रोजच झडू लागले.
आता मग हळूहळू शेजारपाजार्यांशी ओळखी व्हायला लागल्या त्यातून इथे बरेच 'इंडियन्स' आहेत नि त्यातल्या बहुतेक बायकांना अजून आपल्यासारखीच गाडी चालवता येत नाही हे 'नोलेज' प्राप्त झालं. एक मात्र नवीन नवीन का होईना चालवायला शिकली. मग सगळ्यांची तिच्याशी दाट मैत्री झाली हे सांगायला का हवं?
रोज दुपारी सगळ्यांचे नवरे कामावर गेले की धीरे धीरे एकेकजण छान तय्यार होऊन घराबाहेर पडू लागली. गाडीवालीच्या घरी सगळ्यांनी जमायचं नि भरपूर चकाट्या पिटत गाडीत कोंबायचं स्वतःला. इतक्या निरनिरळ्या प्रांतातल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या नि सवयींच्या बायका....पण केवळ गाडी नि शॉपिंग या धाग्यांनी एकमेकांशी घट्ट बांधल्या जायच्या. कोण म्हणतं बायका बायकांच्या वैरी असतात म्हणून्?साफ खोट्टंय...'
'ए आज इंडियन जाते है हा (इथे इंडियन म्हणजे इंडियन स्टोअर्स) मेरेको पुर्रे महिने की ग्रोसरी करनी है.'
'याने की एकेक बोरा चावल दाल और सांबार मसाला इतनाही ना?' (एका मराठमोळीने काढलेला चिमटा)
'और मॉल भी जाते है रे... मेरे पास काली जीन्स नही है. कितने दिनों से लेनी है...'
'ये क्या पहनके तो आयी है तू.'
'ए केमार्ट नही वॉल्मार्ट जायेंगे. उधर झिप्लॉक बॅग्ज पचास सेंट से सस्ता है.'
अशा अनेक सूचना, बडबड ऐकत गाडी चालवणं म्हणजे कौतुकच. पण ही मैत्रीण ते काम सफाईनं पार पाडत असे. ती लग्नानंतर दोन वर्षं सासवा, चुलतसासवा अशा एकत्र कुटुंबात राहिलेली असल्याने तिच्या सहनशीलतेचं गमक काय हा प्रश्न पडायला नको.
तर या सगळ्या मजेशीर कॅरेक्टर्स सोबत (त्यात मी पण आलेच) एकदाची खरेदी पुरी व्हायची. पण एक दोन वर्षातच कोणाचे 'पाव भारी' तर कोणाच्या बोटाशी चिमुकले आल्यानं या बाजारातल्या ट्रीपा कमी होऊ लागल्या. त्यात आमच्या 'ड्रायवर' चे ही दिवस भरत आले. मग पुन्हा नवर्याचं डोकं खाणं आलंच.
मग धीरे धीरे नवर्यानं प्रस्तावना सुरू केली.
'आता तू पण शिकून घे बरं गाडी....'
माझ्यासाठी ही सूचना म्हणजे पोटात गोळा आणणारी. लहानपणापासून मी वाहन चालवायच्या बाबतीत कच्चं लिंबूच. सगळया बहिणी, मैत्रिणी मस्त लूना वा कायनेटिक वर भुर्र जायच्या तेव्हा मी मात्र कोणाच्या तरी मागे ओढणी सांभाळत बसलेली असायची.
खूप लहान असताना मी एका मैत्रिणीचा वाईट्ट अॅक्सिडेंट बघितलेला होता त्यात माझ्या भीतीचं मूळ असावं असं घरातल्यांना उगाचच, माझ्या प्रेमापोटी वाटायचं पण मी तशी त्या बाबतीत भित्रीच.
'गाडी शिकायलाच हवी का पण? मी बसची चौकशी करते त्यापेक्षा....'
'काहीतरीच काय? इथे काय इंडियासारखं नाहीय. एकटदुकटं बस स्टॉप वर उभं रहाणार का तू? इथे फारसं कोणी बस बीस घेत नाही...'
'मग आपण शनिवारी रविवारीच करू या ना ग्रोसरी.....' माझा एक दुबळा प्रयत्न.
'पण मी म्हणतो इतकं घाबरायला काय होतंय तुला... मी शिकवेन की. नाहीतर इंस्ट्रक्टर कडे जा.'
ही नवर्याची एक युक्ती. दोन ऑप्शन्स दिले की एक तरी बायको उचलते हे त्याला एव्हाना ठाऊक झालेलं.
पण यातले दोन्ही पर्याय मला धडकी भरवणारेच असल्याने मी एकालाही हात लावत नाही.
'त्यापेक्षा भारतात गेले की शिकेन ना... आत्ता जाऊ दे.'
मी असा ठाम नकार दिल्याने वैतागलेल्या नवर्यानं माझं बरंच बौद्धिक घेतलं. 'आजकी नारी' ला या बाबतीत कसं घाबरायला नको याची वारंवार गीता वाचून झाली. अगदी
'कृष्ण म्हणे बा अर्जुना,
हा कसला रे भेकडपणा....' या चालीवर...
पण मी पक्का निर्धार केलेला. मी कसली ऐकतेय? फारच भुणभुण लावली नवर्यानं की..
' जा हो, कांदेबटाटे घेऊन या बरं. मस्त बटाटेवडे करते. कालचे लाडू आहेतच सोबत...' असा फतवा काढायची मी. काय बिशाद तो पुन्हा दिवसभर तरी गाडीचं नाव काढेल?
तर असे दिवस जात होते. या अवधीत दोन तीन घरं, नि राज्यं बदलून झाली. पण प्रत्येक ठिकाणी कुणीतरी बेस्ट फ्रेंड भेटायचीच मला. 'मै हूं ना ' म्हणणारी. दुपारी कधी ग्रोसरी, तर कधी शॉपिंग ला घेऊन जाणारी. संध्याकाळी फिरायचा मूड आला तर नवरा आहेच तयार हक्काचा.
'या... या तुझ्या जिवलग मैत्रिणींमुळेच तू गाडी शिकत नाहीयेस. किती दिवस... छे, वर्षं झाली इथे येऊन आपल्याला....'
'अहो, माझ्या नशिबी किनई राजयोगच आहेत. त्याला काय करायचं? माझे बाबा पण लग्नाआधी हेच सांगायचे आईला...' मान वेळावत मी म्हणून टाकायची.
अगदी फारच हातघाईवर आलं प्रकरण, तर बायकांचं नेहमीचं अस्त्र उपसायचं.
मग काय, अगदी सिनेमातल्यासारखा--
'यह क्या... तुम्हारी आंखों मे पानी?' असा डायलॉग नसला तरी
'रडू नकोस.. रडू नकोस बाई. तुझं(च)खरं..' असं नवर्याला म्हणावंच लागायचं.
बरेच दिवस गेल्यावर... माझ्या रडण्याभेकण्याकडे लक्ष द्यायचं नाही हे ठरवून नवर्यानं माझं एका ड्रायव्हिंग स्कूल मधे नाव घातलं.
'हे बघ, तीन दिवसांचा कोर्स आहे फक्त. नंतर मी शिकवेन तुला वीकेंडला....' असंही ठासून सांगितलं.
पहिल्या दिवशी ती बाई आली शिकवणारी... नि मी तिच्याकडे बघतच बसले.
एकदम पॉश ड्रेस, पायात उंच टाचांचे बूट, सुरेख रंगवलेली लांबसडक नखं...एकदम 'अहा' होती दिसायला. पण गाडी शिकवायला सुरुवात झाली नि गाडीशीच काय, या बाईशीही आपलं जमणं कठीण हे कळलंच मला.
गाडी सुरू करण्यातलं माझं अगाध ज्ञान नि रिव्हर्स घेणं नामक भयचकित करणारा प्रकार पाहून शेवटी तिनं गाडी दिली सुरू करून.
कशीबशी डुगडुगत काढली बाहेर रस्त्यावर नि बाई ओरडली... 'टर्न टर्न टर्न.. टर्न द व्हील...'
'अग हो बये, पण टर्न म्हणजे किती?' मी मनात.
या सार्या गोंधळात राईट टर्न म्हणजे जागच्या जागेवर घेतलेला यू टर्न झाला. त्यानंतरचे तीनही दिवस बाईनं मला शुकशुकाट नसलेल्या रस्त्यावर नेऊन गाडी शिकवायचा सपशेल अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी ती नि मी दोघीही थकलो. तिनं माझ्या गाडी चालवण्याबद्दल केलेल्या कॉमेंट्स ऐकून नवराही प्रचंड थकला नि गाडीचं नाव काढेनासा झाला.
अशीच पाच वर्षं गेली अमेरिकेतली. या अवधीत मुलं झाली.. नि मग काय. कित्ती कित्ती बिझी झाले मी बाई.
'वेळ तरी आहे का काही शिकायला?' हे पालुपद एकदोनदा म्हटलं की झालं.
गाडीचा विषय मग मागेच पडला.
पाच वर्षांनी परत भारतात जायचं ठरलं नि कोण आनंद झाला मला. अगदी एकटी असताना भांगडाच करून घेतला मी. आता कशाला गाडी शिकावी लागणार होती मला? तसंही पुण्यामुंबईच्या ऑटो नि टॅक्सीवाल्यांचं पोट माझ्यामुळेच भरतं हे माझ्या सासर माहेर दोन्हीकडचे नेहमीच म्हणतात. चालायचंच. लोकांचा उद्धार करायचा तर असं काहीबाही ऐकून घ्यावंच लागणार की.
भारतात आल्यावर गाडी शिकायची गरज नव्हतीच. घरची गाडी, ड्रायव्हर, ... नि नाक्यानाक्यावर उभे असणारे रिक्शा, ऑटोवाले या सार्यामुळे खरेदी, नातेवाईकांच्या भेटी अगदी सुरळीत होत होत्या. अगदी एक दिवस कुटुंबासोबत असताना ड्रायव्हरला उतरायला लावून घराजवळच्या मोकळ्या मैदानावर मी पण गाडी चालवून बघितली.
'लई झ्याक चालवता बगा तुमी म्याडम' इति ड्रायव्हर.
मी उगाचच फुलून गेले. पण घरी येताना ड्रायव्हर चहा प्यायला गेल्यावर...
'उगाच फुशारून जाउ नकोस. तो काय सांगतोय? तू जे केलंस त्याला गाडी चालवणं म्हणत नाहीत...' अशा दुष्ट शब्दात नवर्यानं माझी पार हवाच काढून टाकली.
तर अशा तुरळक गोष्टी वगळता गाडीशिवाय माझं आयुष्य अगदी मज्जेत चाललं. होतं. पण एक दिवस नवरा घरी आला तोच हातातलं पत्र फडकावत...
'चला, तयारी करा. परत जायचंय यू एस ला आपल्याला....'
ज्या गोष्टीला आपण भयंकर घाबरतो ती गोष्ट फार दिवस दूर ठेवता येत नाही हे सत्य मला तेव्हाच कळून चुकलं.
मग जायच्या आधी गाडी भारतातच शिकायचं ठरवलं. नातेवाईकांचीच ड्रायव्हिंग स्कूल असल्यानं फारसा प्रश्न नव्हता.
'मला की नाही खूप भीती वाटते. आधी ग्राऊंडमधेच शिकवाल का?' मी इंस्ट्रक्टरला आवाजात शक्य तितका नम्रपणा आणून..
'अशा ग्राऊंडमदी शिकणार्याना मी शिकवत नाय...' सौजन्याची ऐशी तैशी.
तेवढ्यात माझ्या सुदैवानं वहिनीच आल्या बाहेर.
'ए, तिला घाबरवू नकोस रे उगाच. ती म्हणते तसंच शिकव...'
मालकांची नातेवाईक म्हटल्यावर काय करेल बिचारा? मुकाट्यानं रोज मला मैदानात घेऊन जायचा. तिथे अर्थातच माझ्या ड्रायव्हिंगला नि त्याच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव नसल्याने तो काल्पनिक सिच्युएशन निर्माण करून बघायचा.
जसं....' समजा समोरून ट्रक येतोय म्याडम तर बाजूनं घेऊन दाखवा गाडी' वगैरे....
एकदा त्याच्या नि माझ्या नशीबानं एक बकरी बसली होती ग्राऊंडमधे.
'चला... बकरीच्या अगदी बाजूनं सफाईनं घ्या म्याडम. बकरी उठली नाय पायजे.'
बकरी बेंबाटत उठली हे सांगायला नकोच.
तर हाही प्रयत्न फसला.
परत आल्यावर काही दिवस मी टंगळमंगळ करून बघितली. पण आता मुलं मोठी झाल्याने त्यांचे क्लासेस नि इतर अॅक्टिविटीज साठी मला ड्रायव्हिंग येणं अगदी जरुरीचं होऊन बसलं. मग शेवटी नवर्याबरोबर गाडी शिकायचं नक्की झालं.
पहिल्याच दिवशी तो मला घराजवळच्या पार्किंग लॉट मधे घेऊन गेला. माझ्या डोक्यात 'गॉडफादर' मधला अल पसिनो जसा रोमँटिक स्टाईलनं आपल्या बायकोला गाडी शिकवतो नि तिनं लाडिकपणे व्हील कुठेही फिरवलं तरी मुळ्ळीच रागावत नाही तसं काही काही येत होतं. पण कसलं काय...
गाडी कशीतरी रस्त्यावर काढली नि 'उजवीकडे वळ' असा नवर्यानं आदेश दिला. हे म्हणजे त्या पहिल्या शिक्षिका बाईंसारखंच झालं. किती वळवायचं पण? ते नको सांगायला? त्यातच माझा नवरा नागपुरी असल्यानं अर्धवट सूचना देण्यात महा हुशार. 'त्याचं ते हे करून टाक जरा...' या वाक्याला खरंतर काही अर्थ आहे का? पण अशी वाक्यं तो अगदी सर्रास वापरतो.
तर झोकात मी व्हील फिरवलं नि दुसर्या क्षणाला गाडी फूटपाथवर चढून fire hydrant ला ठोकण्याच्या तयारीत.
'अग ब्रेक.... ब्रेक..' असं पतिदेव ओरडेपर्यंत अगदी इंचभर अंतरावर येऊन थांबले मी.
तिरप्या डोळ्यांनी नवर्याकडे बघितलं. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला नि एवढंच म्हणाला.. 'लेट्स स्विच साइड्स....'
त्यानंतर बरेच दिवस सकाळच्या वेळी त्या पार्किंग लॉट मधे खालील वाक्यं... अर्थातच कुठल्याही क्रमाने ऐकायला येत होती.
'अग हळू जरा... रेस कारची ड्रायव्हर आहेस का तू?'
'पण तुम्हीच तर अॅक्सिलेटर म्हणालात....'
'मी लाख म्हणालो. तुला समजायला नको?'
'काय करतेयस तू? काही कळतंय की नाही तुला?'
'ते कळत असतं तर तुमच्याकडून शिकायला कशाला बसले असते?'
एकदा तर दोन्ही मुलं मागे बसलेली असताना आमचा 'लेसन' सुरू होता. मुलगी आपल्या भावाकडे वळून विचारती झाली...
'व्हाय आर दे फाइटिंग?'
'ओ, अवर पेरेंट्स नेव्हर फाइट. दे अर्ग्यु...' इति चिरंजीव.
कालांतरानं आपण ऑफिसात कितीही लोकांना ट्रेनिंग देत असलो तरी घरचा विद्यार्थी फारच मठ्ठ नि नाठाळ आहे ही नवर्याला खात्री पटली नि त्याने माझा नाद सोडला.
आता पुन्हा इंस्ट्रक्टर शोधणं आलं.
यावेळी 'बाई' नसून 'बुवा' होता. पण ह्या वयस्कर बुवानं मात्र आपलं काम चोख बजावलं. त्यानं पहिल्याच दिवशी सांगून टाकलं की तो शाळेत तीस वर्षं शिकवत होता नि त्याच्या दोन टीन एजर मुलींनाही त्यानंच गाडी शिकवलीय. त्यामुळे त्याच्यात भरपूर सहनशक्ती आहे.
तर शेवटी त्याच्याकडून एकदाची गाडी शिकले मी. अर्थात त्याच्या सहनशक्तीचा पुरेपूर वापर करून घेतला. इतका की माझ्यानंतर माझ्या एका मैत्रिणीनं त्याला फोन केला तेव्हा तो आता फारच जास्त फी आकारतो हे पण कळलं. काय करेल बिचारा...
तर आता मी अगदी मजेत गाडी चालवते. 'मॉलमधे ने' म्हणून सारखी बायकोची कटकट नसल्यानं नवरा खूषच खूष. इतका की त्या भरात क्रेडिट कार्डाची बिलं वाढलीयत हे त्याच्या फारसं लक्षातही येत नाही.
त्यातून त्यानं जरा कुरकुर केलीच तर 'अहो ते हे घ्यायचं होतं...' म्हणून मी त्याला गप्प करून टाकते.
क्लासेसना जाते. मैत्रिणींकडे जाते. मराठी मंडळात जाते.
अन हो, एखादं नवं कपल आलं भारतातून अमेरिकेत की त्यांना जेवायला बोलावते. नि जाताना आवर्जून सांगते नव्या मैत्रिणीला...'गाडी येत नाही? का..ही काळजी नको करूस ग. मै हूं ना....'
-समाप्त.
प्रतिक्रिया
1 Feb 2010 - 3:35 am | स्वाती२
मस्त!
1 Feb 2010 - 9:42 pm | टारझन
धमाल लेखन .. काही वाक्यांना दाद घेऊन गेलात .. सगळं कसं फ्लॉलेस आणि चोक्कस !
अजुन लेख यावेत आपले :)
विशेषतः हे वाक्य काळजाला भिडले :)
- कॅडबरी
1 Feb 2010 - 3:41 am | शुचि
वाक्यावाक्याला हसत होते.
>>'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले)
'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?)>> =)) =))
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
1 Feb 2010 - 4:26 am | मस्तानी
धमाल लिहिलं आहे तुम्ही ... असं " में हुं ना " मी पण बऱ्याचदा म्हणते आणि काही प्रसंग प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने मजा आणखी वाढली वाचनातली ...
1 Feb 2010 - 5:13 am | प्रियाली
लेख आवडला. ज्या बायकांना गाडी चालवता येत नाही त्यांनी हा लेख वाचून नवर्याकडून गाडी शिकून घ्यायची चूक कधीही करू नये.
बाकी, लोकांना शांतपणे गाडी वगैरे शिकवणारे नवरे बायकोला गाडी शिकवताना फार वचावचा करतात असा अनेकांचा अनुभव आणि स्वानुभव आहे.
असो. अमेरिकेत गाडी चालवणे फार सोपे आहे. मला आल्याबरोबर २ महिन्यांत जमले कारण ... मी नवर्यासह दोनदा गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा तुझ्याकडून गाडी शिकणार नाही असे जाहीर केले. त्याच्या मित्राने गाडी शिकवली. मला पहिल्या फटक्यात लायसन मिळाले.
1 Feb 2010 - 7:22 am | विंजिनेर
मिसळपाववर स्वागत.
धमाल लिहिलंय तुम्ही! =))
अशाच लिहित्या रहा!
1 Feb 2010 - 8:39 am | प्राजु
अभिनंदन!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
1 Feb 2010 - 10:57 am | सुप्रिया
धमाल लेख. मजा आली वाचायला.
1 Feb 2010 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते
जब्बरदस्त!!! एकदम खिळवून ठेवणारं लेखन. लिहिण्यात आणि टंकनातही सफाई आहे. आता पदार्पणातच डब्बल सेंचुरी मारली आहेत तुम्ही. या पुढच्या तुमच्या प्रत्येक इनिंग्जकडून हीच अपेक्षा असणार ब्वॉ... तेव्हा... पुलेशु!!! :)
बिपिन कार्यकर्ते
1 Feb 2010 - 4:50 pm | स्वाती२
कार्यकर्ते, निलांबरी माबोच्या सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांचे लेखन म्हणजे मेजवानीच. मी बरीच वर्ष त्यांची पंखा आहे. त्यांच्या लेखांनी मिपा बहरणार हे नक्की!
1 Feb 2010 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त. वाट बघतोय.
बिपिन कार्यकर्ते
1 Feb 2010 - 9:51 pm | टारझन
न विचारता केलेल्या खुलाश्याबद्दल न विचारता केलेले धन्यवाद :)
कोण कुठे लिहीतो आणि कोण कुठे सिद्धहस्त आहे ह्या पेक्षा कोण कसे लिहीतो ह्याला जास्त महत्व असते :)
- स्वेटर२
1 Feb 2010 - 2:03 pm | स्वाती दिनेश
मिपा वर स्वागत! पुराण धमाल लिहिले आहे, आवडले.:)
स्वाती
1 Feb 2010 - 2:05 pm | अश्विनीका
असंच म्हणते. एकदम धमाल लेखन. विनोदी शैली छान जमली आहे.
- अश्विनी
1 Feb 2010 - 2:09 pm | समंजस
=))
=))
=))
(लिहायलाच हवं का ?....:) )
1 Feb 2010 - 2:40 pm | प्रमोद देव
आणि तुमच्या गाडीच्या वेगा इतकेच गतिमान! ;)
खरंच! पहिल्या पदार्पणातच शतक ठोकलंत.
पुलेशु.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
1 Feb 2010 - 3:24 pm | sneharani
मस्त मजेशीर लिखाण.....
मजा आली वाचायला.!
लिहीत रहा....
1 Feb 2010 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुसखुशीत लेखन, वाचायला मजा आली. :)
मिपावर स्वागत आहे...!!!
-दिलीप बिरुटे
1 Feb 2010 - 5:12 pm | मेघवेडा
चौफेर फटकेबाजी का काय म्हणतात ती काय याच्यापेक्षा वेगळी असते??
मस्त लेख .. मजा आली!
पुलेशु!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
1 Feb 2010 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार
'चला... बकरीच्या अगदी बाजूनं सफाईनं घ्या म्याडम. बकरी उठली नाय पायजे.'
बकरी बेंबाटत उठली हे सांगायला नकोच.
=)) =)) =)) =))
संपुर्ण पुराणच एकदम शॉल्लेड !!
नीलांबरीतै खुप दिवसांनी खदखदुन हसलो. अतिशय सुरेख लिखाण केले आहेत.
मिपावर स्वागत आणी पु ले शु .
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Feb 2010 - 5:24 pm | ऋषिकेश
सुप्पर लेख.. मजा आली
ऋषिकेश
------------------
1 Feb 2010 - 9:44 pm | टुकुल
पुढील लिखाणाची वाट पाहत आहे...
--टुकुल
1 Feb 2010 - 6:05 pm | स्वानन्द
एकदम छान, हलकंफुलकं लिखाण. मजा आली वाचताना.. :)
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
1 Feb 2010 - 6:43 pm | नीलांबरी
सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद.
स्वाती, 'सिद्धहस्त' वगैरे जरा जास्तच होतंय ग. 8>
1 Feb 2010 - 6:52 pm | मीनल
अगदी सर्वांचाच हा अनुभव.
पण उत्तम लिहील आहे पुराण.
प्रत्येक वाक्याला हसू आणलस.
अग, होळी अंकात दिल पाहिजे होतस.
तिथल्यासाठी परफेक्ट होत.
अजून लिही.
मीनल.
1 Feb 2010 - 9:05 pm | रेवती
हा हा हा!
मस्त पुराण!
प्रियालीताई म्हणते तसं नवर्याकडून गाडी कध्धी शिकू नये, फार रागवारागवी होते. मीही इंस्ट्र्क्टरकडूनच शिकले. आधी नवर्यानं शिकवली तेंव्हा दोनदा लायसन्स न घेता परत आले. नंतर मात्र मिळालं.
रेवती
1 Feb 2010 - 9:35 pm | बिपिन कार्यकर्ते
खुद के साथ बातां: जळ्ळा मेला पुरूषांचा जन्म... एवढं राबा, वेळ काढून शिकवा पण काही कौतुक आहे का कोणाला... परमेश्वरा... आता तूच बघ बाबा.
परवाच असं कोणीतरी म्हणत होतं. चॅटवर. ;)
बिपिन कार्यकर्ते
1 Feb 2010 - 10:09 pm | चतुरंग
मलाही शेअर केला होतास ना तो चॅट तू! पक्कं आठवतंय मला. :D
"घर का इंस्ट्र्क्टर ड्रायवर बराबर! " अशी म्हणंच आहे बिका ;)
(इंस्ट्रक्टर-ड्रायवर)चतुरंग
1 Feb 2010 - 10:09 pm | नीलांबरी
धन्यवाद लोक्स.
ज्यांनी खरडवहीत प्रतिक्रिया दिल्यात त्यांनापण. मला कुणाच्याच खरडवहीत लुडबुडायची परवानगी नाहीय. नवीन मेंबर असल्याने असेल कदाचित. तर त्या सर्वांनाही धन्यवाद बरं का.
------------------------------------
आयुष्याच्या रंगपटावर
ऊन पावसाची बरसात असते.
कधी खेळ संपलेला भासतो,
ती स्वप्नपूर्तीची सुरुवात असते.
1 Feb 2010 - 10:15 pm | चतुरंग
मी 'हिचे' घेतलेले पहिले ड्रायविंग लेसन्स अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले! (मी अतिशय उत्तम शिक्षक आहे हा अभिमान कायमचा गळून पडलाच शिवाय मी अतिशय चिडखोर आहे असे लेबल लागले ते निराळेच! ~X( )
'चला... बकरीच्या अगदी बाजूनं सफाईनं घ्या म्याडम. बकरी उठली नाय पायजे.'
बकरी बेंबाटत उठली हे सांगायला नकोच.
हा हा हा!! हे लई भारी ..मला वाटलं "बकरी परत कधीच उठली नाही" असं लिहिताय की काय!! :D
(बळीचा बकरा)चतुरंग
1 Feb 2010 - 10:22 pm | टारझन
=)) =)) =)) =))
चतुरंग आणि चिडखोर ... =)) जर चतुरंगही चिडखोर झाले असतील तर मागच्या सिटवर बसुन तो सुसंवाद आणि ती स्थिती पहाण्यात "रिस्क घेऊन" अंमल मौज आली असती =))
(बळी तो कान पिळी मधला बळी) टारझन
1 Feb 2010 - 10:42 pm | भानस
एकदम धमाल झालेय ग. :)
1 Feb 2010 - 10:43 pm | सुमीत भातखंडे
मस्त अनुभवकथन
2 Feb 2010 - 12:01 am | श्रावण मोडक
वा!
2 Feb 2010 - 5:20 pm | प्रकाश घाटपांडे
अशी शिकनारी मान्स त्यातुन बाया गाडि चालवित आसतीन तर आमी आदुगरच लांब पळतो. कवा आंगाव येतीन काय नेम नाई ब्वॉ.
अवांतर- मंबईला यका बाईनी दारु पेउन गाडी चालवली व्हती तव्हा पोलिसांना ठोकारल व्हत. तिनी म्हने पाय ब्रेकवर ठुवायाची आयवजी आक्षिलेटरवरच पाय ठुल्ता!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
2 Feb 2010 - 5:56 pm | ज्ञानेश...
अतिशय उत्तम विनोदी लिखाण. =D>
खूप आवडले !
2 Feb 2010 - 6:14 pm | मि.इंडिया
झकास .........खूप हसलो.
प्रदीप
13 Feb 2010 - 12:15 pm | मदनबाण
झक्क्कास्स्स्स...
मिपावर स्वागत... :)
आपल्या लेखानाची वाट पाहत आहे.
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
13 Feb 2010 - 3:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही लिहलय.
13 Feb 2010 - 9:20 pm | अनिल हटेला
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
झक्कास !!
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
14 Feb 2010 - 7:49 am | लवंगी
खूप दिवसांनी इतकी हसले असेन.. एकदम हलक-फुलक धमाल लेखन.. मी आजपासून तुमची पंखा... पुढच्या लेखाची वाट पहाते..
9 Mar 2010 - 2:01 pm | आमोद
अतिशय छान!!
9 Mar 2010 - 4:56 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 May 2010 - 1:10 pm | सुरी सुरी
सुरी ....
12 May 2010 - 1:38 pm | कानडाऊ योगेशु
दे धडक बेधडक लिहिले आहे.
वाचताना जाम मजा आली...
(बायको कडुन गाडी शिकलेला..) योगेश
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
12 May 2010 - 2:01 pm | sagarparadkar
मस्तच लिखाण ... हसून हसून पुरेवाट ... सर्व प्रसन्ग डोळ्यान्पुढे उभे राहिले...
(मी अतिशय उत्तम शिक्षक आहे हा अभिमान कायमचा गळून पडलाच शिवाय मी अतिशय चिडखोर आहे असे लेबल लागले ते निराळेच!)
मला हाच अनुभव "कोम्पुटरचे सामान्यज्ञान" शिकवताना आला ... एक विरुद्ध पाच मतानी माझे नसलेल्या गर्वाचे हरण केले गेले ...
मग कार शिकवण्याची हिम्मतच झाली नाही.
बायको आणि मुलीच्या नशिबात कायमचाच 'राजयोग' लिहिला असावा बहुतेक, आणि माझ्या नशिबात कायमचाच 'चतुश्चक्रकटिकाचालनयोग' ... किवा 'सारथ्ययोग' असावा ...
12 May 2010 - 3:37 pm | श्रीराजे
नीलांबरी, मिपावर तुमचे स्वागत..!
तुमचे लिखाण आवडले...असेच अजुन लेख वाचायला मिळु देत...
12 May 2010 - 8:15 pm | शिल्पा ब
मस्तच!!!!!! अगदी खुदखुदून हसले मी ...
=)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 8:55 am | डॉ.प्रसाद दाढे
खूप सुंदर लेखन! वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे पदार्पणातच
शतक ठोकले आहे!
चतुरंगरावांसारखेच माझेही बायकोला ड्रायव्हिंग शिकवतांना
अनेकदा बी.पी वाढले होते. दुपारच्या वेळेला तमाम कॉलनीला फुकटात दादला अस्तुरीचा कलगी-तुरा बघायला मिळायचा.
गंमत म्हणजे मी बारा वर्षांचा असतांना माझ्या बावीस वर्षाच्या मावसभावाला व्यवस्थित गाडी शिकविली होती.
असो, लेख उत्तम जमला आहे.. शुभेच्छा!
14 May 2010 - 12:52 pm | अमोल केळकर
मस्त लिहिले आहे
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
20 Mar 2013 - 6:41 am | शुचि
धागा वर आणते आहे.
20 Mar 2013 - 2:17 pm | बॅटमॅन
वा मस्त लिहिलंय!
22 Mar 2013 - 2:06 pm | दिव्यश्री
मस्त लेख....
पहिल्यान्दाच वाचला, खुप आवडला.
खर म्हणजे प्रत्येक बायको आपल्या नवर्याला व्यवस्थित ओळखत असते,तेव्हा अशी 'रिस्क'घ्यायचीच कशाला +))
22 Mar 2013 - 9:06 pm | एस
एका मित्राने सांगितलेला हा किस्सा - ह्याच्या गाडीला मागून ठोकर बसली, म्हणून हा उतरला आणि मागच्या गाडीपाशी गेला. सारथ्य करणारे हात महिलेचे होते म्हणून फक्त मान डोलावत काही न बोलता परत फिरला. त्या बाई निघाल्या 'स्त्रीमुक्तीवादी' (मित्राचा शब्द). त्यांनी ह्यालाच फैलावर घेतले. "हा बरोबर आहे म्हणजे काय? आम्हां स्त्रियांना तुम्ही काय समजता?" वगैरे वगैरे... भरपूर काही ऐकवल्यावरच त्याची सुटका झाली.
असाच मलाही एका कन्यकेला कोपरापासून नमस्कार करावा लागला होता. ती माझ्या नशिबाने स्त्रीमुक्तीवाली नसून मुक्त स्त्री निघाली. ज्या बेधडकपणे गाडी चालवत ती माझ्या गाडीसमोर आली होती त्याच बेपर्वाईने जणू काही झालेच नाही अशी मला रस्त्यातच 'टाकूनिया बाई गेली' आणि मघाशी करकचून दाबलेले ब्रेक्स मी का दाबले या विचारांनी मला वेड लागायची पाळी आली...
22 Mar 2013 - 9:22 pm | आतिवास
मजा आली. अतिशय सहज स्वाभाविक शैलीतला लेख. सगळे प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले :-)
22 Mar 2013 - 10:53 pm | सान्वी
खुप आवदला लेख...
26 Mar 2013 - 5:15 pm | चिगो
खुसखुशीत लेख.. आता नागपुरकर आणि ड्रायव्हींगचा उल्लेख आलाच आहे, तर हे बघा..त्यातल्या हिंदी + शिव्यांवरुन ते नागपुरच असेल असे पटते.. ;-)
("आपलं ते हे जे.."ची भाषा न कळणारी मुंबईकर बायको असलेला नागपुरकर) चिगो
26 Mar 2013 - 5:28 pm | मन१
पण हे पूर्वी नजरेतून कसे काय सुटले बुवा?
6 Mar 2015 - 2:25 pm | यसवायजी
.
7 Mar 2015 - 3:48 am | रुपी
मस्त .. मजेदार लेख!
7 Mar 2015 - 7:38 am | श्रीरंग_जोशी
खुमासदार लेखनशैली खूप आवडली.
मिपावर पुनश्च सक्रीय व्हावे ही विनंती.
7 Mar 2015 - 11:53 am | पिवळा डांबिस
लिखाण म्हणून बरं विनोदी आहे.
पण हे अनुभव सिलेक्टिव्ह डेमोग्राफिकला (एच४) कदाचित ठीक असावेत...
परंतु हे जनरलायझेशन नव्हे.....
माझ्या पहाण्यात हायवेवर ७०-८० मैलांच्या वेगाने कार/एसयूव्ही धावडवणार्या, आणि त्यात आनंद घेणार्या, अनेक मराठी मुली आहेत.
त्यातली एक तर आमच्या घरातच आहे!!!!!
:)