त्या तरल भावना, नाहीच आम्ही कधी पाहिल्या
ज्या लिहिल्या आम्ही, विडंबितच डायरेक्ट झाल्या-
ह्या तरल कवितेला मुजरा व हे त्याचे रुप-
ती-
शिजली कोबी सारी, पाणी ते टाकून दे
जीवघेणा दर्प सारा, बंद नाक करुन घे...
जेव नाही तर मुस्काडीत मारीन तुझिया
घरचे खावे, तूच बोले, मुकाट्याने खाऊन घे..
उसळ नको तर हवे काय रे तुला गिळायला
स्वैपाकाला आईला, तुझ्या बोलावून घे..
नेहमीचंच झालंय हे तुझे मी तरी काय करु?
रात्रीचे शिळे न्याहरीला, खायची तयारी करुन घे..
तो-
हात जोडूनी म्हणतो, असले हे बोलणे नको
तुझे ते खाणारा नवरा नवा करुन घे..
तुझा तो तोरा, रोज ती, लाखोली मला का
गे धरणी माये, दुभंग अन मला पोटात घे..
पोहे तुझ्या हातचे, खाल्ले होते मीच ना
पसंत तुला केले मी, प्रायश्चित्त मला करु दे..
प्रतिक्रिया
14 Jan 2010 - 11:28 pm | अविनाशकुलकर्णी
अफलातुन.......दादा लई झकास...
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
15 Jan 2010 - 4:13 pm | मदनबाण
आ रा रा... कच्चा माल भारी असला की त्याची इडंबने लयं भारी असतात !!! ;)
(आयोडेक्स)... ;)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
15 Jan 2010 - 8:27 pm | अमृतांजन
एकदम ब्येस बोललासा!