(वार्धक्य)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
26 Nov 2009 - 12:55 pm

गिरीश भाउंचं वार्धक्य पाहुन मिपावर काहिजणांना अचानक आलेल्या वार्धक्याबद्दल वाईट वाटलं

तरी ते लवक परत तरुण व्हावेत ही संत तात्याबा चरणी प्रार्थना ;)

असो..

************************
************************

नडलो तुला पिळुन, राजरोस मनुष्या
हे तुला विडंबन, आता सोस मनुष्या

बुधवारचा अन् शनिवारचा उतारा झाला
टंकलेस शब्द किती भरघोस मनुष्या

वाचक टवाळ 'बनले', झिंगुन नाचले
घातला प्रतिसादांचा ऐसा हैदोस मनुष्या

टेकले सगळ्यांनी हात, अन निर्ढावलेही
सह्या विडंबयचास, आता नुसतेच +१ मनुष्या

आता कुजकेच उरले, मालक ओळखुन आहे
सह्यांचे झमेले, झाले रे, ओस मनुष्या

सुधारण्याची काहाणी, नव्याने लिही पाहू
टोमण्यांचा नको रे अफसोस मनुष्या

अमर्याद लेख प्रसव ही आंस नाही
पण लेखन निव्रुत्ती तरि सोड रे मनुष्या

************************
************************

हास्यअद्भुतरसविडंबन

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Nov 2009 - 4:16 pm | धमाल मुलगा

बर्‍याच मोठ्या काळानंतरचं चेतनचं पुनरागमन एकदम दणदणीत!!

चेतन's picture

26 Nov 2009 - 4:54 pm | चेतन

धन्यवाद धम्या

अवांतरः टेम्पररी वार्धक्य आलेले लोक ज्युस सेंटरामधे पपईज्युस पित बसलेत
;)