काय योगायोग पहा मागच्य २ दिवसात १०-१२ गाड्यांवर लिहिलेले वाचले "राजे पुन्हा जन्माला या."
पहिल्या २-३ वेळा वाचले तेव्हा जास्त लक्ष दिले नाही म्हटले चला आपल्यासारखे अनेक शिवभक्त आहेत. पुन्हा २-३ वेळा वाचले तेव्हा मन शेखचिल्ली सारखे रम्य स्वप्नात रमून गेले.....
अह्हाहा
शिवचरित्रात वाचलेले चित्र डोळ्या समोर उभे राहिले. स्वराज्याचा प्रत्येक नागरिक राजनिष्ट आणि देशभक्त. आया बहीनी सुरक्षीत असतिल त्यांची छेड काढणार~यांचे हात कलम केले जातिल. प्रत्येक जण सकाळी देवपुजाकरताणा राजाच्या दिर्घायुष्याची प्रार्थणा करत असेल. राजांच्या एका हाकेवर देशभारातला सगळा तरून जीव द्यायला तयार होईल. आता राजांकडे गणिमी काव्यात तरबेज असलेल्या मावळ्यांबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतिल आपला २०-२५ मावळा सगळी अदिलशाही उलथून टाकेल. दिल्लीचे तख्त...... ती कटु आठवण झाली की गाढ झोपेत एखादे रम्य स्वप्न पाहत असताना कोणी तरी तोंडावर थंड पाणि टकूण उठवावे आणि आपण दचकूण जागे व्हावे तसे झाले. (नाही तरी आजकाल पहाटे पहाटे एखादे सुखद स्वप्न पडत असतानाच अलार्म वाजतो).
आजच्या एकंदर परिस्थीतीचा विचार करता वाटले आज खरेच राजांची गरज आहे. पण मावळे कुठे आहेत?
म्हणुन राजांना प्रार्थना करावीशी वाटते.
राजे खरेच तुम्ही जन्माला या.. पन गेल्या जन्मी तुम्हाला मावळ्यांच साथ होती ह्या जन्मी मतदारांची साथ घ्यावी लागेल. तुम्ही सवंगड्यांच्या घरी कांदा भाकरी खाऊण त्यांची मने जिंकलीत.. पण राजे इथे तसे चालनार नाही. इथे मतदारांना चांगल्या एखाद्या हॉटेलात झणझणीत चिकन मटनाची सोप्य करावी लागेल. तेवढ्यावर भागणार नाही त्यासाठी पाचक द्रव्य म्हणजे आम्ही त्याल व्हीस्की, रम वोडका अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखतो. ते पण द्यावे लागेल.. तेवढ्यावर भागले तर आम्चे नशीब नाह्ही तर तुम्हाला कशा कशाची सोय करावी लागेल ते सांगायची सुद्धा आम्हाला लाज वाटते. तुमचा तानाजी मालुसरे पोराचे लग्नकार्य अर्धवट सोडून अर्ध्यारात्री कामगिरिवर गेला. इथे साधे मतदान करायला तुम्हाल कामगीरी अर्धवट सोडून मतदारासाठी गाडी पाठवावी लागेल. तेवढे करूण त्यांचे मत आपल्या(म्हणजे तुमच्चा) पदरात पडेल याची काही गॅरंटी नाही. तशा काही सोयी पण आहेत म्हणा. इथे तुम्हाला करंगळी वैगैरे कापून स्वराज्याची शपत वैगैरे घेण्याची गरज नाही. थोड खिसा ढिल्ला करा..म्हणजे??? चुकलं बरं का म्हाराज!! आम्ची भाश्या लई बिगडली बगा.
खिसा महणजे बघा आमच्यात कनाई इज्यारीला एक फट पडलेली असती त्याला आतुन एक पिशवी असती. तेच्यात आमी पैक ठिवतो त्येला खिसा म्हणत्यात. त्यातलं थोडं पैकं खर्च करायचं आन कनाय आमच्या पल्याडल्या गल्लीत एक छापखाना हाय(तुमच्या पायाची आन म्हाराज त्येच्या कडनं म्या कमीशन घेत न्हाही. खोटं बोललॊ तर तुमच्या पायात काटा घुसंल) त्यो पगा एका घटकंत सताट हजार पान जस्शीच्या तशी छापतंय.. त्येचा एकेक बंडल कार्यकर्त्यास्नी दीऊन वाटाया लावायचे.. कार्यकर्ते??? म्हन्जे बगा तुमच्या टायमाला कसं तानाजी, धनाजी, संताजी, व्हतं तसं. त्ये तर ढिगानं मिळत्यात.. तो कस??? असं बगा हितं कनाई पर्त्येक पंचक्रोशीत एक फौजदार असतोय त्येला हामी इन्स्पेक्टर म्हणताव. त्यो काय करतो गावगल्ल्यातनं मडर/ हाप मडर आवं मडर मंजी .... ते काय म्हणत्यात ते.... वद..शिरछेद...आनी हाप मडर मंझी निस्त हात पाय कलम केलेला.... केलेले कावळे पकडून आत टाकतो. म्हण्जे जेलात टाकतो.. तुमच्या टायमाला तुरुंगकोठडी व्हत्याना त्येलाच आमी जेल म्हंतो. त्येला तोडपानी करून चांगला बगून एकादा गुंड निवडायचा. म्हण्जे ज्यनी साताट मडरी केल्या आसतीन त्येला सोडवायचा. चांगलं खायाप्याया घालून पोसायचा. त्येची अजुन बी काही नाद असत्याल तर त्ये बी पुरवायचे.... पन ह्ये बाकी काई कामाचे नस्त्यात बर्का फक्त कुनाचा मडर हाप मडर करायचा असंल तर त्येला तल्वार म्यानातनं भाईर काडल्यावनी भाईर काडायचा. नीट्ट काम कॠन आला तर परत पोसायचा. एकांच्या फौजदारान पकडला तर परत तोडपानी करून भाईर काडायचा. आनि जर का त्यो लई शाना झाला तर त्येला फौजदाराकडंच पडू द्यायचा..
आन स्वराज्य स्थापन करायचं तर लई सोप्प हाय. निस्ता एक पक्श स्थापन करायचा. त्येचा एक नवा झंडा अस्तोय एक चिन्ह अस्तंय. पन ह्या येळेला जरा त्रास हुयील बगा तुमचा भगवा बाकीच्या लोकानी आदीच रजीस्टर केलाय. तुमचा फोटु पन साताट गटचे लोक लावत्त्यात. आन अजुन एक लक्शात ठिवा
असं दाडी लावून तुमचा त्यो मुघुट बिगुट घालून फोटू कादू नका. न्हाय तर तुमाला लोय डॉक्टर अमोल कोल्हे समजती.. डॉक्टर म्हंजे वैद्य.. आन एक तर दवापाणी करा म्हणत्यान न्हाय्तर सभेत भाषन करा म्हणत्याल.. आन जर सम्जा तशी वेळ आली तर स्वराज्य आन तुमच्या गेल्या जन्माच्या गोष्टि हिता आज्याबात काडू नका.. न्हाय्तर हित हाकनाक मारामर~या व्हतील. मंजे बगा हितं ४ लोकनी जे काय लिवून ठिवलंय ते खरं की खोटं हा आधीच संवेदनशिल विषय हाय. आता तुम्ही बोलणार म्हण्जे कोणतरी एक खरा आण एक खोट आसं हुयिल आन ईनाकारण राजकारणचं कारण हुयील अन मग निमीअर्दी जनता नाराज हुयिल.. नायतरी बनगुडे.. पुरंदरे ह्या महान वक्त्यांनी त्येचा ठेका ग्येतलाय. वक्ट्यांनी???????? अवं अवं अवं असं कसं म्हनन मी वक्ट्यांनी नाय व.. क.. त्या .. नी. म्हण्जे चार लोकात जो गोष्ट सांगूण कई तरी उपदेश करतो आण इलोक ते सभेच्या भाईर गेल्यावर इसरत्यात त्या लोकास्ची वक्ते म्हनत्यात.
हितं गड बिड जिकायची पद्धत नसती.. आजकाल गडावर जवान पोरी पोरं जात्यात त्याला लॉज आन लाज परवड्त नाय म्हनून... लॉज??? मंजी धर्मशाळेचा अधुनीक परकार. अन लाज ठिवल्याव माज कसा उतरंल. तशी लई बी वंगाळ अवस्ता नाय कदि मंदी एकादं मंडळ गडावर जाऊन त्या पोरापोरीनी लिवलेली नावं पुसतं आणि मस्त पैकी हवेशीर जेवं करूण कचरा तिथंच टाकून यत्यात. पुना आनि त्ये साप करायला एकादं मंडळ जातं आन तित एकादा बोर्ड लवून जातं.. बोर्ड??? म्हण्जी पाटी न्हाय्तर फलत.. ते तर आता लय गमतीचा ईशय हाय पुन्यात म्हंजे तुमच्या पुनवडीत वं लाल्म्हालाच्या आजुबाजू.. आन तिकडं कदी गेलाच तर नदी च्या कडंन जा इरूद्द बाजूनं गेलातर उजं माझ्या गालावर गनपती काड्चान. तितं तिकिट बिकीट चालु व्ह्ययच्या आत एकदा बगुन या.. हितं फकस्त मतदारसंग जिकायचे असत्यात........
प्रतिक्रिया
24 Nov 2009 - 1:06 pm | अमृतांजन
कल्पना खूप आवडली. भाषाही खूप नैसर्गिक आणि ओघवती वाटली.
24 Nov 2009 - 1:26 pm | रविंद्र गायकवाड
धन्यवाद
24 Nov 2009 - 1:47 pm | मधु मलुष्टे ज्य...
राजेंच्या विचाराला जन्म द्यायला हवा. राजेंनी त्यांचे काम केले आहे. एवढं करुन दिले तरी आपण परत महाराजांना बोलवायचे.
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
24 Nov 2009 - 2:18 pm | श्रद्धा.
वा मस्तच कल्पना आहे रवी......
24 Nov 2009 - 6:22 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच कल्पना...
binarybandya™
25 Nov 2009 - 2:55 pm | रविंद्र गायकवाड
धन्यवाद बंडोबा आणि श्रद्धा
25 Nov 2009 - 5:37 pm | सूहास (not verified)
जरासे वेगळे !! गुड वन !!
सू हा स...
15 Jan 2010 - 3:01 pm | रविंद्र गायकवाड
धन्यवाद सुहास
16 Jan 2010 - 1:13 am | अविनाशकुलकर्णी
राजे पुन्हा जन्माला या.".हे वाक्य गाडीवर वाचले कि रविंद्र चि नक्कि आठवण येणार....लै भारी लिवल हाय...१००/१००
17 Jan 2010 - 8:19 am | हर्षद आनंदी
बघा, विचार करा!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
17 Jan 2010 - 10:07 am | रविंद्र गायकवाड
तुम्ही कुटुंब नियोजन/कल्याण विभाग. किंवा Family Planning Awareness \वैगैरे चे स्वयंसेवक आहत काय?
तुम्ही असे बोलल्यावर पहिला विचार तोच आला..
17 Jan 2010 - 11:01 am | jaypal
जन्माला यावा पण दुस-याच्या घरात--------- या अर्थी तस म्हणताहेत ते (जन्माला येतो पण तुमच्या घरी चालेल आपल्याला ?)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 Jan 2010 - 12:07 pm | रविंद्र गायकवाड
होय त्याच अर्थी मी पण बोललो.. आपल्या घरात शिवाजी जन्माला येऊ नये म्हणून धास्तीने नसबंदी करून घेतील लोक. ह्या अर्थाने विचारले की तुम्ही कुटुंब नियोजन संस्थेत आहात काय?
17 Jan 2010 - 1:28 pm | मी-सौरभ
रवीजी,
लै भारी.....
अवांतरः आपला हा लेख वाचून राजे परत यायच रद्द करणार हे नक्की...
-----
सौरभ :)
शिवाजी महाराज की जय....