दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली
झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली
अशाच काही क्षणी येते आठवण तुझी
माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली
मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श
नभासही सार्या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष
अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली
तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली
त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत
तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं
तेंव्हापासून माझं आणी पावसाचं
आहे वेगळं असं एक नातं
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 11:57 pm | मदनबाण
अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली
तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली
झकास्स्स... ;)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
24 Nov 2009 - 12:53 am | शाहरुख
सभ्यतेच्या चौकटीत राहून तरल श्रुंगाराची उत्कट अनूभुती देणारी हळूवार परंतु सशक्त कविता !!
24 Nov 2009 - 1:24 am | शेखर
ऑनसाईट ला एकटे आले की बर्याच तरल भावनाना शब्द फुटतात.
बाकी कविता एकदम मस्त...
24 Nov 2009 - 8:23 am | चित्रा
कविता चांगली आहे, चित्रदर्शी आहे.
पण पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? !
24 Nov 2009 - 9:31 am | विजुभाऊ
पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? !
यालाच म्हणायचे कोडजोड्या ...... आय टी ची देन आहे ही. डॉट कॉम व्यवसायातून रीकरिंग खाते....
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
24 Nov 2009 - 9:53 am | विशाल कुलकर्णी
हे कोरडं भिजणं थांबवून खरंखुरं कधी भिजणार ते सांगा राव? ;-)
मस्त रे !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Nov 2009 - 10:09 am | सहज
नही सामने ये अलग बात है!!
24 Nov 2009 - 11:08 am | फ्रॅक्चर बंड्या
तेंव्हापासून माझं आणी पावसाचं
आहे वेगळं असं एक नातं
भारी...
binarybandya™
24 Nov 2009 - 11:12 am | jaypal
एका केशरी संध्याकाळी,
घाबरत घाबरत
धरला होता तुझा हात.
थरथरुन शहारला तो ,
जणु गवताच पात.
मउ लुसलुशीत,
कोवळा कोवळा.
तु बिलगलीस,
अन मी झलो होतो,
बावळा, बावळा. --------- जयपाल
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Nov 2009 - 11:12 am | अवलिया
हम्म... खुप एकटं वाटतयं काय रे तिकडे ???
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 11:29 am | sneharani
सुंदर ...
तेंव्हापासून माझं आणी पावसाचं
आहे वेगळं असं एक नातं
आवडली.
24 Nov 2009 - 12:33 pm | गणपा
तुझा लवेरिया अजुन बरा नाही का झाला.
आता विठोबाच्या देशात आहेस तर तिथेच एखदी चांगली डागदरीण शोध....;)
24 Nov 2009 - 2:52 pm | धमाल मुलगा
हेच्च म्हणतो.
(अधिक माहितीसाठी श्री.Nile ह्यांना संपर्क करावा ;) )
बाकी, ब्यांक-रिकरिंग सोडुन कविता झ्यांटॅम्याटिक रे! :)
चालु दे तुझा कारखाना, आम्ही आहोत तुझ्या कविता वाचायला :)
(ह्याची सेटलमेंट पूनममध्ये करावी लागेल हे आपल्याला ज्ञात असेलच ;) )
24 Nov 2009 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय धमाल मुलगा ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना नवकवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते.
ह्या वाक्यानी कविता हृदयाला भिडली आहे. अशीच खाती उघडत रहा.
©º°¨¨°º© हमाल मुलगा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Nov 2009 - 3:55 pm | सूहास (not verified)
माननीय परिकथेतील राजकुमार ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना प्रेमकवितेतील व कवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते.
त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत
तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं
ह्या वाक्यानी कविता मस्तकाला भिडली आहे. अशीच माथी फोडत रहा.
©º°¨¨°º© कपाल फुटला ©º°¨¨°º©
हानतय पर्या आज
24 Nov 2009 - 2:22 pm | श्रावण मोडक
भापो.
24 Nov 2009 - 2:53 pm | सूहास (not verified)
मरायला आलय तेज्यायला !!
सू हा स...
24 Nov 2009 - 10:07 pm | टारझन
आहाहा !! काय सुंदर काव्य आहे श्री प्रभो .. आज वाचन सुरू केल्यापासून एक से एक सुंदर धागे वाचावयास मिळत आहे .. बहुदा गॉगल काढल्याचा परिणाम :)
असो ,.,. सुंदर काव्याने आनंद मिळाला !
- टारझन
24 Nov 2009 - 10:24 pm | लवंगी
तीलापण आवडेल
25 Nov 2009 - 9:11 am | प्रभो
सर्व वाचकांचे आणी प्रतिसादकांछे आभार..
पूनममधेही काही जणांसाठी आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 10:44 am | विसोबा खेचर
मस्तच कविता..!
तात्या.