तुझे निरंतर चित्र काढतो...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Nov 2009 - 12:31 am

....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र-
गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!!

(या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय? )

भुजबळांच्या स्वप्नातील तो महाराष्ट्र असा असेल...
-राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी हाती घेतलेल्या कायदा व सुव्यवस्थाविषयक कार्यक्रमांना अधिक गती देण्याबरोबरच नक्षलवाद व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम करण्यात येईल.
(मागच्या सरकारच्या स्वप्नाचा उत्तरार्ध...)
-राज्यातील सर्व प्रमुख शहरे किमान चारपदरी रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहेच. आता त्यापुढे जाऊन वाड्या, तांडे, पाडे यांसह ५०० लोकवस्तीपर्यंतची व त्यावरील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्याचे ठरविले आहे.
-गरीबांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये किंमतीची २७५ चौ. फुटांची घरे बांधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून येत्या पाच वर्षांत दहा लाख घरे बांधण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
-मुलींना पदवीपर्यंतचे, तर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार आहोत. (!!... )
मुलींची भ्रूणहत्या थांबावी म्हणून मुलगी जन्माला येताच तिच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवून ती उपवर होईल तेव्हा एक लाख २५ हजार रुपये मिळतील, अशी `माहेर योजना` आम्ही राबविणार आहोत.
-आज निराधारांसाठी, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना सुरू आहेत. त्यांची व्याप्ती वाढवून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ६५ वर्षांवरील प्रत्येक गरजू स्त्री-पुरूषाला आजीवन सहाशे रुपये पेन्शन दरमहा देण्याची योजना आमच्या विचाराधीन आहे.
-दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आम्ही २५ किलो धान्य ३ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना आरोग्यपत्रिकाही देणार आहोत. अशा आरोग्यपत्रिकाधारक नागरिकांना हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, ब्रेन ट्यूमर इत्यादी दुर्धर आजारांवरील उपचार व सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याची तरतूद असणार आहे.
-राज्यातील शेतमजुरांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे तसेच विविध प्रकारच्या कारागीरांचेही बचतगट स्थापन करण्यात येतील. या बचतगटांना विविध उद्योगांसाठी ४ टक्के दराने कर्ज देण्याचे आम्ही ठरविले आहे.
-मागासवर्गीयांच्या उत्थान कार्यक्रमाचीही कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-`सुजल महाराष्ट्र, निर्मल महाराष्ट्र` अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सर्वांना वैयक्तिक नळजोडण्या देण्याचा निर्धार आघाडी शासनाने केला आहे.
-परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी चैत्यभूमी स्मारक परिसरात जमीन उपलब्ध करून त्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी `चैत्यभूमी विकास प्राधिकरण` स्थापन करण्याचेही आम्ही ठरविले आहे.
(यापेक्षा आणखी काही हवे???)
(टीप : काहीतरी `विनोदी' लिहावे, असा विचार मनात आला, म्हणून सहज महाराष्ट्र शासनाच्या `महान्यूज' या पोर्टलवर चक्कर मारली. आणि, चक्क, किती कॊपी करू अन किती नको, एवढा `मसाला' हाती आला... तोच चिकटवला आहे. त्यामुळे, यातील कोणताही विनोद माझा नाही... अधिक तपशीलासाठी किवा मनोरंजनासाठी तुम्हीही मधूनमधून तेथे चक्कर मारा... )

विनोदमाध्यमवेध

प्रतिक्रिया

विकास's picture

20 Nov 2009 - 1:09 am | विकास

प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुश्यंति जंतवः |
तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरीद्रता ||

शेखर's picture

20 Nov 2009 - 1:44 am | शेखर

तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरीद्रता ||

१००% सहमत...