ऑड्री ट्रुश्के साठी ट्विटरोत्तरे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
15 May 2018 - 10:43 pm

लेखाची पूर्वतयारी स्टेज - लेखाचे काम पीसीवर चालू आहे पण काही ट्विटर एम्बेड करून ठेवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून लेख चालू केला आहे . लेख वाचनासाठी अंमळ काही दिवसांच्या उशिराने आले तर अगदी चालण्या सारखे आहे.

Audrey Truschke या कुणी आमेरीकन स्त्री इंडॉलॉजीस्ट आहेत . गुगल ट्रान्सलेटरवर त्यांच्या नावाचे उच्चारण मला ऑड्री ट्रुश्के असे ऐकु आले तर मराठी लेखन ऑड्रे ट्रस्कके असे दिले गेले , नावाच्या मराठी लेखनात काही सुधारणा गरजेची असल्यास जाणकारांनी सांगावे.

ऑड्री ट्रुश्के या भारत अथवा हिंदू समर्थक नसल्यामुळे त्यांचे काही लेखन दुखावणारे असू शकते . त्यांच्या समर्थनाचा या लेखात काही प्रश्न येत नसला तरीही भावना सहज दुखावतील आणि चुकून काही उलटे सुलटे लिहिले जाईल अशा संवेदनशील व्यक्तींनी इथून पुढे ह्या लेखाचे वाचन टाळल्यास उत्तम असेल . मुद्देसूद लेखाच्या पूर्वतयारी चालू आहे . काही ट्विटर व इतर लेखातील निसटत्या बाजूंचा उहापोह लेखातून करणारा आहे . सध्या पूर्वतयारी साठी त्यांची ट्विटरे / दुवे इथे कॉपी करत आहे .

एप्रिलच्या ४ आणि ५ तारखेस फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण, चर्चा भाग -१ आणि २ असे दोन भाग मी लिहिले, एका मिपाकरांनी मी तिसरा भाग लवकरात लवकर टाकावा अशी विनंती केली , लेखन तयार झाले पण लेख मोठा झाला असल्याने सर्व संदर्भ तपासून व्यवस्थित करण्या साठी वेळ घेत आहे .

एकूणच संस्कृत ग्रंथांचा आवाका बराच मोठा असतो . आपल्याकडून काही तथ्याची उणीव राहू नये असे वाटत असते . तर अजून त्या लेखावर शेवटचा हात फिरवणे बाकी आहेच . त्यासाठी काही गुगल शोध करताना ऑड्री ट्रुश्के यांचा एक गेल्या महिन्या पासून चालू असलेला ट्विटर वरून इंग्रजी वृत्त माध्यमात पोहोचलेला वाद अचानक दृष्टोत्पत्तीस पडला .

इतर स्त्रीवादींना अभिप्रेत रामायण विषयक भूमिकेचा उहापोह माझ्या तिसऱ्या भागासाठी लिहिलेला होताच त्यात नेमका ऑड्री ट्रुश्के यांनी ओढवून घेतलेला नवा वाद समोर आला . तो वाद काय ते त्या बद्दल लिहिताना सांगेन . ऑड्री ट्रुश्के यांच्या निसटत्या बाजू कडे बऱ्या पैकी भारतीयांनी लक्ष वेधले पण काही उरलेल्या बाजू चा उहापोहाचा पुढे मनोदय आहे . पण त्यासाठी संदर्भ गोळा करणेही मोठे काम आहे त्यातील एक काम त्यांच्या विविध ट्विटर ची नोंद घेणे आहे . आणि सध्या फक्त ट्विटरची नोंद घेतोय -कारण ते एम्बेड करावयाचे आहेत . लेखाचे लेखन माझ्या पीसीवर पूर्ण झाल्यावर इकडे टाकून धागा वर काढेन . तूर्तास प्रतिसाद द्यावे वाटले तरी शक्यतो व्यनि ने कळवावे हि नम्र विनंती

टेस्टीन्ग

इतिहास

प्रतिक्रिया

माहितगार's picture

15 May 2018 - 10:52 pm | माहितगार

लेख अद्ययावत करताना पुर्नसंपादनात अडचण एरर येतोय

मनो's picture

16 May 2018 - 3:00 am | मनो

Audrey Truschke यांचे अनेक लेख वाचले आहेत. औरंगझेबाच्या उदात्तीकरणाचे प्रयत्न त्या करत असतात. त्यांचे सर्व लेख इथे आहेत.
http://audreytruschke.com/

माहितगार's picture

16 May 2018 - 9:00 am | माहितगार

औरंगझेब आपल्या अभ्यासाचा विषय असावा, पण त्यांचे प्रथम दर्शनी दिसणार्‍या विरोधाभासां कडे लक्ष वेधणे हा माझा उद्देश आहे. उदा त्यांच्या एका लेटेस्ट ट्वीट मध्ये त्या "Lahore Literary Festival's 3rd edition held in New York - "It is indeed, a ‘safe place for dangerous ideas’" असे म्हणतात, ईश्वर/ प्रेषित निंदकांसाठी Lahore Literary Festival' सारखे ठिकाण खरेच सुरक्षीत असू शकते ? - गेले वर्ष ते गेली अनेक दशके पाकीस्तानात ईश्वर/ प्रेषित निंदकांसाठी काय स्थिती आहे ?- पण एक विशीष्ट चष्मा चढवून जे सर्वसाधारण पणे सहिष्नूणू नाहीत त्यांना सहिष्णू दाखवायचे आणि जे सर्वसाधारणपणे सहिष्णू असण्याची अधिक शक्यता आहे त्यांना असहिष्णू दाखवायचे हा विरोधाभास ठरत असावा.

कंजूस's picture

16 May 2018 - 1:01 pm | कंजूस

बरेच लाइक्स मिळत आहेत ट्विटसना.

माहितगार's picture

16 May 2018 - 5:32 pm | माहितगार

१) लाईक्स (अनेक गोष्टींनी प्रभावित असू शकतात) आणि ' ससंदर्भ समतोल तथ्य आणि तर्कसुसंगतता ' यांचा मेळ जमेलच याची खात्री प्रत्येक वेळी देता येत नाही.

२) लाईक्स मिळणार्‍या गोष्टीन्ची खास करुन ज्यांचे चष्मे एकरंगी असतात त्यांची निरपेक्ष चिरफाड अधिक गरजेची असावी . असो प्रतिसादासाठी आभार.

लेखाच्या प्रतिसादांच्या अपेक्षा काय आहेत ते बाजूला ठेवू. त्या टुश्के बाइंना काही सांगायचं आहे ते औरंगझेब पुस्तकात /लेखात लिहिलं आहे म्हणतात.
पुढचा एक स्टेटस/ट्विट संभाजीला कसं मारलं याबद्दल आहे.
लढाई जिंकल्यावर अथवा शत्रुला हरवल्यावर अथवा विरोधकांचे दमन केल्यावर अथवा विश्वासघात केलेल्या लोकांना कशा शिक्षा देत हे आपण भूमध्य समुद्राच्या आसपासच्या भागांत पाहतो.
काही जणांनी समर्थन करण्याचं कारण त्यामध्ये दिसतय.
आता या बाईंचा प्रयत्न जुन्या ऐतिहासिक घटनांना ( औरंगझेबसंबंधी) पाठिंबा देण्याचा असावा.

माहितगार's picture

16 May 2018 - 9:45 pm | माहितगार

होय मी मुख्यत्वे रामायण विषयक टिका हँडल करणार आहे, औरंगझेब-संभाजी महाराज विषय सखोल हाताळण्या साठी लागणारी साधने माझ्याकडे नाहीत आणि त्यांचे ते पुस्तक वाचले नाही तरी त्यांच्या एकतर्फी व्हाईटवॉश दृष्टीकोणाचा पुरेसा परिचय आहे आणि त्यांच्याच संबंधीत एका लेखातील संबंधीत विरोधाभास -एकांगी दृष्टीकोण- मिपा लेखच्या माध्यमातून उघडा पाडण्याचा / निसटत्या बाजू मांडण्याचा मनोदय आहे.

रामायणाविषयी शंका, आक्षेप इत्यादी इथेसुद्धा बरेच असावेत. परंतू ते चर्चेत घेण्याचं प्रयोजन राहात नाही कारण त्या कथेला मिळणारं आदराचं स्थान. भारताबाहेर बाली,सुमात्रा वगैरे ठिकाणी होणारे नाट्याविष्कार.

माहितगार's picture

17 May 2018 - 9:52 am | माहितगार

माझं लेखन पूर्ण होण्या आधी, हे कसे कळेल .

कंजूस's picture

17 May 2018 - 1:57 pm | कंजूस

**इथेसुद्धा** म्हणजे मिपा साइट अथवा मिपाकरांना नाही, लाहोर नव्हे, भारतात असं म्हणतो.

त्याचे उत्तर अंशतः दुसर्‍या एका धाग्यावरील या प्रतिसादात आहे उर्वरीत शंकेची लेख पूर्ण करताना दखन घेईन मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार.

माहीतगारसाहेब डोन्ट माइंड पण मिपावर याआधि पिराताईनी, सध्या समर्पकनी लाईव्ह वृत्तांताची स्टाईल चांगल्या तर्हेने वापरलेली आहे. अगदी मिपाची टेक्निकल मर्यादा सांभाळून सुध्दा. पण एखादा धागा काढतानाच टेस्टिंग साठी, एम्बेड करण्यासाठी, प्रतिसाद इथे न देता व्यनितून द्या, अजून लिखाण पूर्ण व्हायचे आहे, लेख मोठा आहे, हे संदर्भ गोळा करणे आहे अशी कारणे देऊन, असे विविध प्रयोग वाचकांवर करण्याऐवजी पूर्ण अभ्यास करुन लिहिलेला पूर्ण लेख तुमच्या व्यनि मध्ये सेव्ह होऊ शकतो. एकदा पूर्ण झाला असे वाटल्यावर तुम्हास हव्या त्या पध्दतीने प्रकाशित करु शकता. कारण बोर्डावर धागा दिसला की वाचक वाचणारच. तुमच्या अशा हेतूंची कल्पना सगळ्या वाचकांना येणार नाही कींबहुना अशा पध्दतीचे प्रयोग करुच नये असे मला व्यक्तीशः वाटते.
तसदीबद्दल क्षमस्व.

माहितगार's picture

17 May 2018 - 3:13 pm | माहितगार

__/\__