बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

यश पालकर's picture
यश पालकर in जनातलं, मनातलं
20 Nov 2017 - 1:41 pm

बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत . संजय मिश्रा असेच गेली अनेक वर्षे सिनेमा क्षेत्रात असून सुद्धा लोकांना आठवत नसेल पण गेली २-३ वर्षे संजय यांनी एक हाती सांभाळलेले सिनेमे वाखाणण्याजोगे आहेत .बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली गेली हे आकडे फुगवून सांगता येतील पण करोडो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण खूप जिकरीचे काम आहे . प्रत्येकवेळी आपल्या कामाने लोकांच्या अपेक्षा उंचावत जाणे हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते .

संजयचा जन्म ६ ऑक्टोबर १९६३ साली झाला. त्याचे बरेचसे बालपण बनारस मध्ये गेले . त्याच्या घरात सरकारी नोकरीचा वारसा होता . त्याचे आजोबा जिल्हा दंडाधिकारी आणि वडील माहिती आणि दूरसंचार विभागात कार्यरत होते संजयची आजी पटना रेडिओ स्टेशन वर गाणे गात असे आणि तिचाच जास्त प्रभाव संजयवर पडला . संजयच्या वडलांना सुद्धा कलासाहित्यामध्ये रुची होती आणि त्यानिमित्त घरी होणाऱ्या मैफिलींमुळेच आपणही ह्यात काहीतरी करावे असे संजयला वाटू लागले. दहावीच्या परीक्षेत संजय दोन वेळा नापास झाला. त्यानंतर त्याने NSD बद्दल ऐकलं आणि त्यामध्ये प्रयत्न करायचे ठरवले . NSD मध्ये शेवटच्या वर्षाला असताना इरफान खान आणि संजय दोघेही एकत्र होते .

१९९१ मध्ये मुंबईमध्ये आल्यावर त्याला कुणी अभिनेता म्हणून घेतील असे त्याला वाटत नव्हते म्हणून कॉमेडियन ,खलनायक असे रोल करायला सुद्धा तो तयार होता पण त्यापैकी एकही रोल त्याच्या पदरात पडत नव्हता . त्यामुळे त्याने पडद्यामागच्या अनेक साऱ्या भूमिका केल्या कॅमेरा ते कला दिग्दर्शन ह्या सगळ्यामध्ये त्याने काम केले . काही दिवस वडापाव खाऊन तो राहिला हि गोष्ट तो अनेकदा अभिमानाने सांगतो . घराची आठवण आली कि अंधेरी स्टेशनवर जाऊन राजधानी एक्सप्रेसला पाहून रडत असे . त्यावेळी त्याचे आईवडील दिल्लीमध्ये स्थायिक होते .उमेदीच्या काळात अनुभवाने तो खूप काही शिकत गेला आणि हाच सारा अनुभव त्याला त्याच्या सगळ्यात उत्तम अशा "आँखो देखी " सिनेमा मध्ये कामी आला .१९९१ मध्ये आलेली चाणक्य मालिका त्याच पडद्यावरच पाहिलंच काम होते . पहिल्या सीनसाठीच त्याने २८ टेक घेतले .तो एखादी स्क्रिप्ट खूप खोलात जाऊन वाचत असे आणि त्यामुळेच त्याच्या मनात असलेला चाणक्य मधला रोल आणि दिग्दर्शकाच्या मनातला रोल ह्यात खूप सारी तफावत होती . त्यानंतर स्क्रिप्ट वाचणे त्याने थांबवून जे काही दिग्दर्शक सांगेल ते करण्याचे ठरवले .
Sanjay

ऑफिस ऑफिस सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी संजयला पोटदुखीचा त्रास आणि त्याला दाखल करावं लागलं . १५ लिटर पाणी त्याच्या पोटामधून काढण्यात आलं आणि ह्यावेळी त्याच्या वडिलांनी खूप साथ दिली . रोज त्याचे वडील त्याच्या सोबत फिरायला जात . ह्याच दरम्यान पाटणा हॉस्पिटलचे डीन संजयकडे आले आणि त्याच्या पत्नीला संजयला भेटायचे आहे असे सांगितले .संजय त्याची स्थिती नसतानासुध्दा त्यांना भेटायला गेला . त्यांनी संजय बघून एक हास्य दिले . त्या मृत्यूच्या दारात उभ्या होत्या . एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात उभं असताना आपल्याला भेटावसं वाटणं हे ऑस्करपेक्षा मोठी गोष्ट आहे असं संजयला वाटत होत .त्यानंतर संजयच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्या नंतरच्या दुःखात तो पूर्णपणे कोलमडून गेला होता .त्यानंतर मुंबईला जाण्याऐवजी ऋषिकेशला निघून गेला . तिथे एका धाब्यावर तो ऑम्लेट बनवण्याचं काम करत होता .तिथल्या सरदार मालकाने त्याला ओळखले नाही पण तिथे येणारे ग्राहक त्याला ओळखत आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेत.

रोहीत शेट्टीने त्याला पुन्हा सिनेमामध्ये येण्यास तयार केले आणि "ऑल द बेस्ट " सिनेमा मध्ये घेतले. NSD मध्ये असताना तुटणाऱ्या नातेसंबंधाबद्दल अनेक कथा ऐकल्यामुळे तो लग्नापासून लांब होता .पण वडिलांच्या मृत्यनंतर आलेल्या एकाकीपणामुळे त्याच्या आईने त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २००९ मध्ये उत्तराखंडच्या किरण सोबत लग्नच्या बेडीत अडकला .जेवण बनवणे संजयला खूप आवडते आणि त्यामुळेच जिथे कुठे शूटिंग असेल तिथे तो गॅस सिलेंडर घेऊन स्वतःचे जेवण स्वतः बनवतो . असे असाल तरी स्वतःच्या दोन मुलींसाठी(पल ५वर्षे आणि लम्हा २ वर्षे ) तो मात्र जेवण बनवत नाही .कारण त्याच्या दोन्ही मुलींना जॅम रोटी आवडते आणि संजयच्या मते जरी आपल्या मुली असतील तरी सुद्धा तुम्ही बनवलेल्या जेवणाचा आदर राखला गेला पाहिजे .

"ओह्ह डार्लिंग ये हैं इंडिया " मधून पदार्पण करणाऱ्या संजयने सत्या ,दिल से , बंटी बबली ,गोलमाल ,साथिया ,गुरु ,धमाल,वेलकम सारख्या बिग बजेट मुख्य प्रवाहातल्या सिनेमामध्ये काम केले. तसेच त्याने अनेक सारे सिनेमे फक्त काम करायला मिळतंय ह्या भावनेनं केले आहेत त्यातले अनेक सिनेमे प्रदर्शित सुद्धा झाले नाहीत . फस्स गये ओबामा ,मसान ,दम लगा के हैशा ,सारे जहाँ से मेहेंगा ,मिस तानाकपुर हाजीर हो , न्यूटन सारख्या लो बजेट सिनेमातल्या कामाचं समीक्षकांनी नेहमीच कौतुक केलं आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला आँखो देखी हां संजयच्या अभिनयच उत्कृष्ट नमुना आहे . ऑफिस ऑफिस मालिकेटमधील शुक्लाच पात्र संजयने छान रंगवलं होत .

संजय नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत आहे आणि त्या अपेक्षांना खरा ठरत आहे . बॉलीवूड च्या चमचमत्या दुनियेत असे तारे त्यांच्या अभिनयक्षमतेने नेहमी झळाळून निघू देत ..

२४ नोव्हेम्बर ,२०१७ रोजी ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा बॉलीवूडमधला पहिलाच सिनेमा "कडवी हवा" येत आहे आणि ह्या सिनेमामध्ये संजय मुख्य भूमिकेत आहे. त्यासाठी संजयला खूप खूप शुभेच्छा !!!!

Kadavi Hawa

कलालेख

प्रतिक्रिया

babu b's picture

20 Nov 2017 - 2:32 pm | babu b

छान

माझा फार आवडता अभिनेता आहे हा. फार जबरदस्त जाण आहे या माणसाला मध्यमवर्गिय जीवनाची. आंखो देखीत तर काय कमाल करतो हा!
यथोचीत ओळख करून देणारा तुमचा एल्ख आवडला.
संजय मिश्राची ओल्ड मंक नावाची शॉर्ट फिल्मसुद्धा मस्त आहे.

नि३सोलपुरकर's picture

20 Nov 2017 - 3:37 pm | नि३सोलपुरकर

छान , आवडला लेख .

पुलेशु .

मित्रहो's picture

20 Nov 2017 - 4:45 pm | मित्रहो

त्याची छोटी कामे पण लक्षात राहतात. फस गये रे ओबामा, आखो देखी मधे तर तो जबरदस्त होताच पण जॉली एलएलबी मधला हवालदार सुद्धा लक्षात राहतो. दम लगाके मधला त्याचा बाप पण जबरदस्त होता.

मराठी कथालेखक's picture

20 Nov 2017 - 5:00 pm | मराठी कथालेखक

छान..

तिथे एका धाब्यावर तो ऑम्लेट बनवण्याचं काम करत होता .तिथल्या सरदार मालकाने त्याला ओळखले नाही पण तिथे येणारे ग्राहक त्याला ओळखत आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेत

ही केव्हाची गोष्ट आहे ?

छान लेख. संजय मिश्रा यांच्या अभिनयाची रेंज जबरदस्त आहे.

धर्मराजमुटके's picture

20 Nov 2017 - 6:41 pm | धर्मराजमुटके

मस्त लेख ! वेगवेगळ्या आणि नव्या वाटा चोखाळणार्‍या कलाकारांच्या मुलाखती बघण्यासाठी "राज्यसभा टिव्ही" चा "गुफ्तगु" हा कार्यक्रम बघावा असे सुचवितो.
संजय मिश्रांची मुलाखत "इथे"

रेवती's picture

20 Nov 2017 - 7:38 pm | रेवती

मलाही हा अभिनेता आवडतो, अर्थात त्याच्या आयुष्याबद्दल इतके माहित नव्हते.

उपेक्षित's picture

20 Nov 2017 - 8:44 pm | उपेक्षित

जबरदस्त आणि माझा खूप आवडता अभिनेता, आखो देखी मध्ये तर सगळेच अभिनेते जबरदस्त आहेत.

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2017 - 10:32 pm | स्वाती दिनेश

संजय मिश्रा आवडता अभिनेता आहे,
ओळख आवडली.
स्वाती

जव्हेरगंज's picture

20 Nov 2017 - 11:09 pm | जव्हेरगंज

+1

रुपी's picture

23 Nov 2017 - 2:53 am | रुपी

छान लेख.
योगायोगाने अगदी मागच्याच आठवड्यात त्याच्याबद्दल कुतूहल वाटले म्हणून शोधाशोध करुन थोडीफार माहिती वाचली होती. तेव्हाच त्याला 'आंखों देखी'साठी अ‍ॅवॉर्ड मिळालेले वाचले आणि तो चित्रपट बघायच्या यादीत टाकला. यूट्यूबवर सापडलाही आणि आज बघणारसुद्धा :)

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 3:30 pm | रंगीला रतन

चांगला कलाकार... ऑल द बेस्ट मधला "धोंडु जस्ट चिल" हा त्याचा डायलॉग फार आवडतो मला.