आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी केलेली कविता....
टिप :- ही कविता कोणाची टिंगल टवाळी किंवा भावना दुखावण्यासाठी लिहिलेली नसून "अंगारकीच्या या पवित्र दिनी" माझ्या मनःपटलावर उमटलेले तरंग आहेत. तोच शुध्द सात्विक भाव कवितेतून वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या मधून कोणताही इतर अर्थ जर कोणत्या वाचकास दिसला तर तो केवळ माझ्या प्रतिभेचा दोष समजून वाचकांनी उदार मनाने मला क्षमा करावी. गजाननाची आसिम कृपा सर्वांवर सदैव राहो...
श्री गणेशायनमः
आज अंगारकीच्या सणा
चापून खाउ साबुदाणा
घंटा बडवू घणाघणा
स्पिकर लावूया ठणाणा
आज अंगारकीच्या दिनी
माझा मारुती उदास
शनिवारी मात्र त्याला
घेता येत नाही श्वास
आज अंगारकीच्या दिशी
देव गणेश पावतो,
दर्शनाने मिळे मुक्ती
पापे सर्वांची धुवतो,
आज अंगारकीच्या सणी
उशीराने चंद्रोदय,
पोटी कोकलती काउ
येते बिर्याणीची सय
नामांकीत ( खारी बटर)
अंगारक संकष्ट चतुर्थी
प्रतिक्रिया
7 Nov 2017 - 9:50 am | नाखु
बुवा
गणेश पावतो,
दर्शनाने मिळे मुक्ती
पापे सर्वांची धुवतो
याने पुन्हा नव्या जोमाने पापं करण्यासाठी प्रोत्साहन मिळते काय? यावर जाणकारांनी प्रकाश विजेरी टाकावी
अंधारात दिपलेला नाखु
काव्य फर्मास
7 Nov 2017 - 11:29 am | प्रचेतस
अगगगगगागागागागा
अशीच एक कविता उद्या कार्तीक कृष्ण पंचमीचे निमित्त येऊ द्यात.
7 Nov 2017 - 2:16 pm | सूड
मला आतापासूनच त्या कवितेच्या प्रसवकळा सुरु झाल्यात. उद्यापरेंत येईल मिपाच्या पाळण्यात. ;)
7 Nov 2017 - 3:22 pm | अनन्त्_यात्री
|| कार्तिक कृष्ण पंचमीचा पाळणा || अशी कविता रचणे क्रमप्राप्त आहे ! आजकाल कवितेच्या शीर्षकात ४ इक्षुदण्ड दिसले की सरळ कालनिर्णय बघायला घेतो. :)
7 Nov 2017 - 11:49 am | झेन
तरंग आमच्या अंतरंगापर्यंत पोचले भावनांंना गुदगुल्या झाल्या :)
7 Nov 2017 - 11:57 am | अनन्त्_यात्री
जयदेव जयदेव जय पैबु मूर्ती
वाचनमात्रे वाट हसून पुरती
7 Nov 2017 - 12:15 pm | माम्लेदारचा पन्खा
तो पूर्णपणे जाणवला बरं का !
7 Nov 2017 - 2:18 pm | सूड
क्या बात !! जमली एकदम.
बाकी पावतो ला धुवतोचं यमक वाचून माझ्या डोळ्यांना पोटदुखी झाली.
7 Nov 2017 - 2:19 pm | खेडूत
:))
हभप.. __/\__
7 Nov 2017 - 5:36 pm | चौथा कोनाडा
महोदय ज्ञा पै _/\_
आमची ही पुरवणी म्हंजे ...
ताजमहाला वीटाच !
अंगारकी, अंगारकी ..... अंगार्की
भक्तोंको प्यारी ये अंगार्की || धृ ||
हो, बाप्पा तुझपे कुर्बा मेरी जान,
मेरा दिल पुजा का सामान,
भक्ती मेरी केहती हैं
बाप्पापे केलं सब कुर्बान की !
अंगारकी, अंगारकी ..... अंगार्की
भक्तोंको प्यारी ये अंगार्की || धृ ||
चाणाक्ष मिपाकर मुळ रचना ओळखतीलच !
( डिस्क्लेमर : बेबी झीनत आठवल्यास आम्ही जबाबदार नाही)
सु़ज्ञ भक्तांनी भर घालून ही अंगारकी सार्थकी लावावी !
7 Nov 2017 - 6:14 pm | पगला गजोधर
यावर्षीचा मिपावरील 'बहिणाबाई चौधरी स्मृतीपुरस्कार'
सलमान सोळा ... चे मानकरी आहेत .... ..... ज्ञापैजी