कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल. कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय. पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार.
या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.
एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'. फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात. आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो.
हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.
प्रतिक्रिया
6 Sep 2017 - 8:38 pm | कपिलमुनी
चेपूचे तेल मिपावर !
6 Sep 2017 - 8:49 pm | सोमनाथ खांदवे
मिसळपाव ची क्वालिटी डावून व्हतीय ना राव !
6 Sep 2017 - 9:04 pm | जेम्स वांड
तुमची रुपकं कधीच कळत नाहीत, त्यातही तुम्ही मराठी भाषा ते शुद्धलेखन पारच चिरफाड करून टाकता, बाकी डिस्क्लेमर नको, त्याच्याजागी एखाद आयोडेक्स बाटलीचा फोटोच लावत जा, डोकेदुखीला उतार पडेल.
6 Sep 2017 - 9:39 pm | मामाजी
अच्छा म्हणजे आपल्या समजतील, आवडतील व पटतील अशीच रूपके फक्त यावीत अशी अपेक्षा आहे का?
7 Sep 2017 - 12:53 am | माईसाहेब कुरसूंदीकर
वाचतेय.
१९४७ ते १९६४ ह्या काळात अशा अनेक अफवा हत्तीविषयी पसरवल्या जायच्या .सध्या हत्ती असल्याच्या थाटात काही जण वावरत आहेत.
7 Sep 2017 - 10:58 pm | गामा पैलवान
माईसाहेब,
तो अंदमानात जाऊन काळ्या पाण्याची जन्मठेप भोगून बाहेर जिवंत सहीसलामत आलेला हत्ती कोण हो? तुमच्या ह्यांना जरा विचारा ना. त्यांच्यावरंच काय त्यांच्या वारसांवर भुंकणारे कुत्रेही आहेत आजूनसुद्धा. आहात कुठे!
आ.न.,
-गा.पै.
7 Sep 2017 - 9:59 pm | कंजूस
व्यंगोक्ती असावी परंतू शेवटची सूचना हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावरच आहे हे वाचून बरे वाटले. अभ्यास भारी आहे.
पुर्वी आपल्याकडे सुरवंटाचेच फुलपाखरू होते याकडे कुणा कवीचे लक्ष गेले नाही का? सगळे कमलिनि-भ्रमर-मयुर-हंस-गज-शुक-सारिका यांच्या निरिक्षणांतच दंग होते.
7 Sep 2017 - 10:15 pm | पैसा
ओके. चालायचेच हो. आपला स्वभाव कोणी सोडत नाही.
10 Sep 2017 - 11:11 am | विवेकपटाईत
इतका स्पष्ट लेख लिहिला आहे, कागदावर भुंकणारे कुत्रे - वर्तमान पत्र, दृश्य व श्रव्य -म्हणजे टीवी समाचार वाले, आणि बेगानी शादी में अब्दुला दीवाना - व्हाट्सअप व् फेसबुक वाले. त्यांना मेहनताना हि मिळत नाही. आत्ताच पहा १५ दिवस झाले एकाच व्यक्ती बाबत सनसनीखेज बातम्या. च्यायला जेंव्हा तो बाहेर होता, तेंव्हा तुमाला काय बी माहित नव्हते. का? हत्तीची भीती कुत्र्यांना वाटायची. मिडिया आणि सोशल मिडीया वर वावरणाऱ्या कुत्र्यांचा बाबत हा लेख आहे.
10 Sep 2017 - 12:48 pm | जेम्स वांड
आपणही, फेसबुक ते मिसळपाव सोशल मीडियावर वावरताच न साहेब?
उत्तर हो असल्यास, आपणही......?