माझा वस्तरा हरवला आहे म्हणून
उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
तसंही चंद्राला भिंगातून पाहताना
मला ओतावे लागते घागरभर पाणी
मग छाटलेली काठी घेऊन
हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल
बघून घेईन मी एकेकाला
ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर
पेन्सिलीला टोक करून
माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी
कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख
आता चाललोच आहे तर
जरा फाट्यावर जाऊन येतो
बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून
रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
-रानातला वेडा
प्रतिक्रिया
5 Sep 2017 - 2:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
बर झाल राव तुमचा वस्तरा हरवला,
चंद्राच्या पृष्ठ्भागावर ससा जाउन बसला,
ट्रंप तात्यांना टोचली पराणी
ढोनुल्याने गायली गोडगोड गाणी,
पैजारबुवा,
5 Sep 2017 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
बरं झालं, हरवला आहे तुमचा वस्तरा ।
नाहीतर झाली असती बिनपाण्याने खराखरा ॥
5 Sep 2017 - 3:21 pm | अभ्या..
अन घरची अस्तुरी ठसक्यात म्हणली असती,
टराटरा आन फराफरा
5 Sep 2017 - 3:38 pm | ज्योति अळवणी
काय म्हणावं याला?
5 Sep 2017 - 4:31 pm | सस्नेह
हेच का नवलेखकुंना प्रोत्सा हाण ??
=))
5 Sep 2017 - 5:08 pm | तृप्ति २३
छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita
7 Sep 2017 - 8:38 am | चांदणे संदीप
अरे कुणीतरी आवरा यांना!
Sandy
5 Sep 2017 - 5:32 pm | प्राची अश्विनी
:)
7 Sep 2017 - 10:12 am | रुपी
=)
7 Sep 2017 - 5:32 pm | नाखु
इतकी चंपी चकोट,तर सापडला तर काय?
अखिल मिपा हंगामी (पावसाळी ) काव्य साथ नियंत्रण संघ,व वाचक वाचले तरच वाचाल समिती संयुक्त प्रकल्प
7 Sep 2017 - 8:44 pm | धर्मराजमुटके
अरेरे ! मला भादरायची होती उद्या !