सचिन ए बिलियन ड्रीम्स ..हा फक्त सचिन चा चित्रपट नाही तर सचिन आणि क्रिकेट सोबत आपण जे क्षण घालवले त्याची उजळणी आहे.
क्रिकेट समजण्याआधी सचिन समजला होता, त्यामुळेच की काय सचिन बद्दल जरा जास्तच आकर्षण होते. आपल्या देशातील करोडो लोकांमध्ये २५ लाख लोकांचे नाव तरी सचिन असण्याला हाच कारणीभूत असावा असे मला वाटते. त्याने घातलेल्या जर्सीवरील १० नंबर पण इतका आकर्षित करायचा की मी खो खो खेळताना पण माझ्या जर्सीवर १० नंबर हवा असा आग्रह धरायचो. शाळेत असताना मॅच सुरु आहे म्हटल्यावर सुट्टीमध्ये शेजारील घरी जाऊन सचिन कितीवर खेळतोय याची पहिली चौकशी करायचो. सचिन मैदानावर आहे म्हटल्यावर कोणतीही काळजी नसायची आणि जसा तो आऊट झाला की वाटायचं संपलं सगळं..सचिन म्हणजे एक भरवसा होता इंडियन क्रिकेट चा जसा देवावर आपण भरवसा ठेवतो तसा म्हणूनच कदाचित त्याला क्रिकेट मधील देव मानत असतील.
लहानपणीच एक आवडता उद्योग म्हणजे वेगवेगळ्या क्रिकेटर्स चे पेपर मधील चित्रे कापून एका वहीत चिटकवून ठेवायची. पण या सर्वात जास्त मला आवडायचा सचिनचा एका हातात बॅट आणि एका हातात हेल्मेट घेऊन दोन्ही हात वर करून नजर आभाळाच्या दिशेने करून शतक पूर्ती नंतर देवाला अभिवादन करताना चा फोटो आणि माझ्या सारखच सर्वानाच त्याची हि स्टाईल नक्कीच आवडत असावी.
चित्रपटामध्ये सचिन सांगतो की देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे हि त्याची इच्छा होती तर सचिन ला वर्ल्ड कप सोबत पाहणे हि त्याच्या चाहत्यांची इच्छा होती.
इंटर नॅशनल क्रिकेट मध्ये सर्वात जास्त रन्स असो किंवा शतक किंवा वन डे मध्ये २०० रन्स एक एक रेकॉर्ड बनवताना त्याला पाहिलंय आणि त्यावेळी केलेला जल्लोष या चित्रपटाच्या रूपाने पुन्हा आठवला.
सचिन मैदानात असताना स्टेडियम वरील लोकांनी "सचिन सचिन " या नावाचा केलेला घोष टीव्ही वर मॅच पाहणाऱ्याच्या पण अंगावर काटा आणतो आणि मनातल्या मनात आम्ही पण म्हणतो " सचिन सचिन "
लेखक - मीच
प्रतिक्रिया
1 Jun 2017 - 10:35 am | प्रसन्न३००१
खरं आहे... हा चित्रपट पाहताना आपलं अक्ख बालपण डोळ्यांसमोर तरळून जातं.
1 Jun 2017 - 4:41 pm | amit१२३
आपलं बालपण पुन्हा आठवते चित्रपट पाहताना
1 Jun 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी
४ दिवसांपूर्वीच हा चित्रपट पाहिला (मराठीत). हा चित्रपट नसून एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा आहे. चित्रपट चांगला आहे परंतु जरा संक्षिप्त वाटतो. साहजिकच आहे. सचिनची तब्बल २४ वर्षांची, जवळपास ७०० आंतरराष्ट्रीय सामन्यांची प्रदीर्घ कारकीर्द जेमतेम २ तासात दाखविणे खूप अवघड आहे. सचिनच्या बालपणापासून निवृत्तीपर्यंतचा कालखंड चित्रपटात दाखविलेला आहे. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनसुद्धा जमिनीवरच पाय असलेला सचिन, सचिनच्या कारकीर्दीत त्याच्या कुटुंबियांचा असलेला सहभाग, सचिनची क्रिकेटविषयी असलेली पराकोटीची तळमळ चित्रपटात चांगल्या पद्धतीने दाखविली आहे. सचिन मैदानात येताना प्रेक्षकांमधून होणारा "सचिन", "सचिन" हा जयघोष अंगावर रोमांच उभे करतो. भारतातील कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला सचिनइतके चाहते मिळालेले नाहीत. वाद, शिवीगाळ, अहंकार इ. पासून दूर असलेला, अजूनही नम्र व जमिनीवर पाय असलेला, निर्व्यसनी, गाजावाजा न करता समाजकार्य करणारा सचिन भारतातील अनेकांचा आदर्श आहे.
चित्रपट सर्वांनी एकदा तरी नक्की बघावा.
1 Jun 2017 - 4:44 pm | amit१२३
त्याचा नम्र स्वभाव आणि फालतू गोष्टींपासून दूर राहणे यामुळेच मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा तो एक उत्तम खेळाडू आणि माणूस म्हणून ओळखला जातो
1 Jun 2017 - 2:48 pm | जागु
छान लिहील आहे.
1 Jun 2017 - 4:39 pm | amit१२३
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तुम्हाला आवडला ऐकून छान वाटले
1 Jun 2017 - 4:16 pm | सच्चिदानंद
तरीपण सचिनने स्वतःच्याच आयुष्यवरच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम करत फिरणे तितकेसे पटले नाही.. तरीपण ज्याचा त्याचा चॉइस. :|
2 Jun 2017 - 11:17 am | नि३सोलपुरकर
सच्चिदानंद ह्यांच्याशी १००% सहमत .
2 Jun 2017 - 11:41 am | मराठी_माणूस
चित्रपटाचे प्रयोजन काय ?
5 Jun 2017 - 12:46 pm | अगम्य
चित्रपट खूपच आवडला. श्रीगुरुजींनी म्हटल्याप्रमाणे थोडा संक्षिप्त वाटला. पण आम्हा चाहत्यांना कितीही मिळालं तरी कमीच वाटेल. खूपच नॉस्टेल्जीक वाटलं. आपल्या आयुष्यात किती भरभरून आनंद दिला आहे ह्या माणसाने. त्यामागचे कष्ट, यातना चित्रपटातून कळून येतात. ध्येयासाठी अपार मेहनत करण्याची प्रेरणासुद्धा कुठलीही लेक्चरबाजी न करता मिळून जाते. सचिन ही काय चीज होती ह्याचं अतिशय सुंदर documentation पुढच्या पिढ्यांसाठी केलं गेलं आहे. तो निवृत्त होऊन साडेतीन वर्षे झाली तरी त्याला "माजी" खेळाडू म्हणायला मन मानत नाही. पण हा ऐतिहासिक दस्तऐवज पाहताना आता सचिन युग खरोखरच इतिहासजमा झालं आहे अशी जाणीव होऊन उगीचच गलबलायला झालं.
मी पहिला त्या चित्रपटात narration इंग्रजीमध्ये होतं, जिथे पात्रांनीं अभिनय केला होता ते संवाद हिंदीत होते, घरच्या मंडळींच्या मुलाखती काही हिंदीत आणि बऱ्याच मराठीत होत्या. मराठी चित्रपट हे डबिंग नसून पुनर्चित्रिकरण आहे असे ऐकले आहे. जर पूर्ण चित्रपट मराठीत बघायला मिळाला, ज्यात सचिनचे निवेदन मराठीत असेल, तर पुन्हा पाहायला आवडेल.