कुठली कार घेऊ?

खग्या's picture
खग्या in काथ्याकूट
20 Mar 2017 - 8:32 pm
गाभा: 

मला माझ्या आई बाबांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ची कार घ्यायची आहे.
बाबांचं वय ६० च्या आस पास असल्याने त्यांना मॅन्युअल गिअर बदलण्याचा त्रास नको असं वाटत. शिवाय ते अलीकडेच गाडी शिकले आहेत.

त्यांना जवळपास फिरण्यासाठी कार घ्यायची आहे.
शहरात किंवा फार फार तर २-३ महिन्यातून एकदा मुंबई - पुणे इतका प्रवास होईल.
शिवाय जवळपास ट्रिप वगैरे साठी सुद्धा ते जातील.

मुख्य कारण म्हणजे मला टू व्हीलर पेक्षा कार सुरक्षित वाटते.
मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे.

कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

20 Mar 2017 - 8:55 pm | अत्रन्गि पाउस

आधी बजेट ठरवा गाडीची किंमत, रनिंग कॉस्ट वगैरे चे

बेसिक अल्टो ऑटोमॅटिक पासून ते सेडान पर्यंत ऑप्शन्स आहेतच पण ६०व्या वर्षी त्यांना त्रयल रन घेऊन कोणती गाडी 'आवडते' ठरवा ...

कोणत्याही बजेट मध्ये त्या त्या सेगमेंटच्या गाड्या ह्या तशा १९ २० च असतात ..त्यामुळे त्यांना कोणती गाडी रुचते हेच महत्वाचे ...

मारुतीच्या गाड्यांचा मेंटेनन्स अतिशय माफक असतो, सहज होतो, आणि चालवायला तशा सोप्या गाड्या हा स्वानुभव ...

सुखी's picture

20 Mar 2017 - 9:13 pm | सुखी

मारुतीच्या गाड्यांचा मेंटेनन्स अतिशय माफक असतो

हे आता आताशा खरं राहिला नाहीये

शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार घ्यायची आहे

पगला गजोधर's picture

21 Mar 2017 - 6:13 pm | पगला गजोधर

e20

महिंद्रा इ२ओ घ्या.. फक्त लांबचा/दुर्गम घाट प्रवास नको ..

मारुतीची Ignis ऑटोमॅटिक व्हर्जन पहा. कॉम्पॅक्ट आहे आणि परफॉर्मन्स चांगला आहे.

पुणे आणि मुंबई मध्येच राहणार असाल तर बजेट प्रमाणे,
१. टाटा टिआगो AMT (<6lacs)
२. टाटा झेस्ट AMT (<8lacs)
३. पोलो TSI (<10lacs)
४. वेंटो TSI (<15lacs)
५. फोर्ड इकोस्पोर्ट (<15lacs)
>15lacs बरेच ऑपशन्स आहेत, बजेट परवानगी देत असेल तर सांगा बोलू आपण.....

हे सगळं सेफ्टी हा फॅक्टर मॅक्सिमम पकडून सांगत आहे..... मारुती बद्दल सेफ्टी ची शाश्वती वाटत नाही (S-Cross हा एकमेव अपवाद सोडून)

सुखी's picture

20 Mar 2017 - 9:30 pm | सुखी

टिआगो 6lac
झेस्ट ८
पोलो १०
वेंटो १५
इकोस्पोर्ट 15

शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार घ्यायची आहे

सुखी's picture

20 Mar 2017 - 9:43 pm | सुखी

टिआगो 6lac
झेस्ट ८

या बघा मग...

टाटा ना quality मध्ये खूप जास्त सुधारणा केल्या आहेत...

हे सुद्धा पहा

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 10:50 pm | संजय क्षीरसागर

सगळ्यात बेस्ट गाडी. माझा मित्र अमेरिकेला चाललायं त्याची फक्त तीन हजार किमी चाललेली गाडी त्याला घाईमुळे एजंटला ४ लाखात विकायला लागली. इट वॉज द बेस्ट बाय. तुमचं, माझं आणि त्याचं बॅड लक !

सुखी's picture

20 Mar 2017 - 10:55 pm | सुखी

i10 बंद झाली आता

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 11:10 pm | संजय क्षीरसागर

.

आहे ना !

जिन्क्स's picture

20 Mar 2017 - 11:05 pm | जिन्क्स

पोलो १०
वेंटो १५
इकोस्पोर्ट 15

कोनसे देश मे??
पोलो : ८ लाख
https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5Pvod...

वेंटो : १२ लाख
https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5Pvod...

इकोस्पोर्ट : १० लाख
https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=VgXZfxXmV/+fz9RIjNb5Pvod...

ह्या किमती टॉप एंड मॉडेल (पेट्रोल) च्या आहेत

सुखी's picture

21 Mar 2017 - 12:33 pm | सुखी

1. गरज ऑटोमॅटिक ची आहे त्याप्रमाणे variants चेक करा.
2. मी < च्या पेक्षा कमी असं वापरलं होते, ते गायब झाले, म्हणून रफ estimate दिलं

कपिलमुनी's picture

20 Mar 2017 - 11:27 pm | कपिलमुनी

Please take a car variant with safety features like airbags and others.

औरंगजेब's picture

21 Mar 2017 - 8:16 am | औरंगजेब

Suzuki celerio पण चांगला आॕप्शन आहे.

नीळा's picture

21 Mar 2017 - 9:46 am | नीळा

परवाच celerio vxi AMT घेतली आहे.
डाव्या पायाचा थोडा problem असल्याने आता मस्त वाटते आहे.
Automatically gear अचुक पडतायत
शीवाय क्राऊल function पण ऊत्तम आहे

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 10:17 am | संजय क्षीरसागर

आणि क्राऊल function हे काय असतं ?

क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की गाडी एक्सेलेटर न देताही हळूहळु पुढे जाते
बंपर टु बंपर मध्ये एकदम आराम

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 1:10 pm | संजय क्षीरसागर

हे फिचर वापरुन पाहीन.

हे क्राउल फन्क्शन नवे आहे ?
माझी इन्डिका डिझेल आहे , फर्स्ट गेअर टाकुन क्लच सोडला की अक्सिलेटर न दाबता गाडी हळुहळु पुढे जाते - चढ नसेल तर
हे क्राउल फन्क्शन वेगळे काही आहे का ?

लई भारी's picture

31 Mar 2017 - 12:05 pm | लई भारी

माझ्या माहिती परिमाणे हे फिचर ऑटोमॅटिक गाडयांना जास्त लागू पडते.
क्लच नसल्यामुळे आपण ब्रेक सोडून ऍक्सिलरेटर वर पाय ठेवेपर्यंतच्या क्षणभरात गाडी मागे जाऊ शकते(उतारावर असल्यावर). त्यामुळे हॅन्डब्रेक वापरण्याचा सल्ला दिला जातो.
क्राउल किंवा हिल-असिस्ट मुळे ड्राइव्ह मोड मध्ये ब्रेक सोडला तरी minimum acceleration मिळते, जेणेकरून गाडी मागे जाणार नाही.
AMT असलेल्या गाडयांना सुरुवातीला हे फंक्शन नव्हते(त्यामुळेच मी झेस्ट AMT घेतली नाही) नंतर नॅनोसकट सगळ्या गाड्यांमध्ये टाकलंय बहुधा.
टेस्ट ड्राइव्ह घेऊन बघणे उत्तम उपाय. सुरुवातीला सेल्स च्या लोकांना पण माहीत नव्हतं नीट आणि ते सांगायचे एकाच वेळी डाव्या पायाने ब्रेक आणि उजव्या पायाने ऍक्सिलरेटर दाबा; जे माझ्या माहिती प्रमाणे अतिशय चुकीचे आहे.

सस्नेह's picture

21 Mar 2017 - 11:11 am | सस्नेह

मारुती celerio zxi टॉप एंड पेट्रोल, वर्ष झालं वापरते आहे. दि बेस्ट पफॉर्मन्स.
गावाबाहेर २२-२४ अ‍ॅव्हरेज. स्मूथ फॉर ड्रायव्हिंग. ड्रायव्हर धरून ५ जणांसाठी पुरेशी स्पेशस.
लो मेंटेनन्स. आणखी म्हणजे मारुतीची सर्व्हिस स्टेशन्स सगळीकडे आहेत आणि सर्विस क़्विक.
मी विथ गिअर मॉडेल वापरते. ऑटो मॉडेल टॉप एंड साडेसहा पर्यंत येईल.

ओलाचे अ‍ॅप डाऊनलोडायला सांगा. पेमेंटला तुमचे वॅलेट अ‍ॅट्च करा.
नंतर वाटल्यास एखाद्या ओळख झालेल्या ओला ड्रायव्हराला घरासमोर पॉइंट घ्यायला सांगत जा.
सगळ्यात सेफ, गाडी चालवायचा त्रास नाही, दारासमोर गाडी पण उभी राहील, स्वस्त पण पडेल, मॉडेल चेंजचा ओप्शन आहेच.

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 1:14 pm | संजय क्षीरसागर

पण `आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री हट्टापुढे श्रीराम नमला, तिथे आपली काय कथा ?

`आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री हट्टापुढे श्रीराम नमला,

बरोबरे, नाही म्हणले तरी पुष्पक रावणाचेच होते. उद्या बिभीषणाने परत मागितले म्हणजे.. ;)
असो...
मला वाटले ओला बेस्ट. हे तुम्हीपण म्हणालात म्हणजे बेस्टच.

संजय क्षीरसागर's picture

21 Mar 2017 - 1:42 pm | संजय क्षीरसागर

सीतेला ऑलरेडी विमानाची राइड मिळालीये म्हणून एखादी राइड मागेल, पण विमान रा-१चंच राहाणार ना ?

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 1:18 pm | सुबोध खरे

ओला/ उबर -- मुंबई पुण्यात राहत असला तर हा सर्वात चांगला पर्याय आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 1:14 pm | मराठी कथालेखक

मायलेज कमी चालणार असेल तर i10 Grand ची Automatic बघा मला सेलेरिओच काय , बलेनो पेक्षाही उजवी वाटली, गिअर शिफ्टिंग खूप स्मूद आहे.
अलिकडेच मी सहज म्हणून काही Automatic गाड्यांची टेस्ट ड्राईव घेतली. त्याबद्दल थोडक्यात
१) पोलो - महाग (दहा की अकरा लाख आहे), अत्यंत स्मूद गिअर शिफ्ट, पण गाडीत स्पेस कमी , बूट स्पेससुद्धा कमी
२) i10 Grand - स्मूद गिअर (पोलो पेक्षा डावे, मारुतीच्या दोन्ही गाड्यांपेक्षा उजवे) , पोलोपेक्षा स्पेस चांगला, किंमत मध्यम (आठ लाख)
३) Baleno - गिअर शिफ्ट फारसा चांगला नाही, स्पेस सर्वात चांगला , किंमत मध्यम (आठ-नऊ लाख)
४) सेलेरिओ - गिअर शिफ्ट फारसा चांगला नाही, स्पेस सर्वात कमी , किंमत कमी (पाच-सहा लाख) , फीचर्सचे कॉम्बिनेशन फारसे आवडले नाही.

Tiago Automatic ची test अजून घेतली नाही. (ही कधी लाँच झाली तेच माहित नाही), पुर्वी मॅन्युअलची घेतली होती. स्पेस थोडा कमी आहे पण गाडी स्मूद वाटली. पण इंजिनिअरिंगच्या बाबतीत टाटा मारुतीपेक्षा नक्कीच उजवी आहे आणि मारुतीपेक्षा कमी किमतीत मारुतीपेक्षा चांगली गाडी देतात, पण टाटाच्या गाडीची रिसेल किंमत कमी असते. बाकी रीसेल, इंजिनिअरिंग आणि किंमत ई सगळा विचार करता ह्युंदाईचा पर्याय सध्यातरी जास्त आकर्षक ठरतो.

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 1:31 pm | सुबोध खरे

आजमितीला स्वतःची गाडी घेऊन फिरणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे.
वर म्हटल्याप्रमाणे पोलोचे उदाहरण घेऊ
८ लाख रुपये किंमत त्यात २८००० विम्याचे असे पाच पैकी चार वर्षे म्हणजे ११२,००० म्हणजे ९.१२ लाख झाले. पाच वर्षात सरासरी पाचशे किमी महिन्याला प्रमाणे ३०,००० किमी गाडी चालवली आणि फुकून टाकली तर त्याचे ३ लाख रुपये मिळतील.
उरले ६.१२ लाख
३०००० किमी ला साडेतीन रुपये किमी ( २१ किमी ऍव्हरेज धरून) प्रमाणे एक लाख रुपयाचे पेट्रोल लागेल.
म्हणजे एका किमी ला २४ रुपये पडतील.
यात गाडीच्या मेंटेनन्स चे पैसे धरलेलेच नाहीत.
या ऐवजी ओला उबर म्हणाल तेथे आणि म्हणाल तशी घेऊन गेला तरी स्वस्त पडते. शिवाय मागच्या सीट वर हात डोक्यामागे ठेवून शांत बसता येते. पंक्चर झाली बंद पडली कुणाला ठोकली तर घेणे नाही आणि देणं नाही.
ड्रायव्हर चा पगार १५,०००/- महिना प्रमाणे धरला तर ९ लाख रुपये अजून होतील
या पैशात आयुष्यभर वातानुकूलित गाडीने फिरता येईल.
पण त्यांना हौस म्हणून गाडी घ्यायची असेल तर गोष्ट वेगळी
कारण हौसेला मोल नाही

खेडूत's picture

21 Mar 2017 - 1:58 pm | खेडूत

:))
सहमत!
घराचं पण तसंच आहे. पण इथे अवांतर नको म्हणून खाली बसतो...
'
'
'
'
बाकी आनंदाचं झाड लावायचंय घरी, सध्या बिया शोधतोय कुठे मिळतात!

आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे,
दुसर्‍याच्या आनंदात सावली शोधायला शिका, बिया आपोआप टकुर्‍यावर पडतील.
.
.
.
खेडूतकाका, हल्के हल्के बरका. ;)

खेडूत's picture

21 Mar 2017 - 2:07 pm | खेडूत

हे हे.. सोप्पय की राव!
आपलं टक्कुरं न बगताच चाल्लो की फुडं वर तोंड करून! :((

राजाभाउ's picture

21 Mar 2017 - 6:51 pm | राजाभाउ

काय बोल्लास अभ्या. एकदम षटकारच मस्त आवाडेश.

कपिलमुनी's picture

21 Mar 2017 - 5:27 pm | कपिलमुनी

घराचं तसं नाहीये

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 7:04 pm | सुबोध खरे

खेडूत साहेब
कार आणि घर यांची अजिबात तुलना होणार नाही.कारण घर हे अत्यावश्यक गोष्ट आहे. एक महिना कार दुरुस्तीला गेली तर आपल्या आयुष्यात फार फरक पडणार नाही. पण एक महिना सोडाच एक आठवडा सुद्धा घराशिवाय राहणे शक्य नाही.
तीन वर्षांनी कारची किंमत ५० % हुन कमी झालेली असेल याउलट तीन वर्षांनी घराची किंमत अगदी काही नाही तरी १५-२० % वाढलेलीच असेल.( मग ते अगदी दुसरे घर असेल तरीही.
आमचे एक मेंदूविकार तज्ञ सर म्हणत
सर्वात स्वस्त कार विकत घ्या आणि परवडेल असे सर्वात महाग घर घ्या
कारण कारची किंमत कधीच वाढणार नाही.
आणि (भारतात तरी) घराची किंमत कधीच कमी होणार नाही.

साहेब नका म्हणू हो क्रुपया..
मला दुसर्‍या घराबद्दल म्हणायचं होतं. येणारे भाडे आणि ईएमाय वगैरे...पण त्यावर भरपूरच काथ्या कुटला गेलाय आधीच.

प्रसाद गोडबोले's picture

22 Mar 2017 - 10:42 am | प्रसाद गोडबोले

डॉक्टर , एकदम परफेक्ट कॅलक्युलेशन आहे !

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 4:56 pm | संदीप डांगे

खरे साहेबांशी सहमत,
मी नाशिकमध्ये आता ओला रिक्षा/कॅब वापरतो आहे, स्वस्त आणि मस्त. थोडा त्रास आहे पण स्वतःची कार मेंटेन करण्यापेक्षा कैक पट चांगले...

अभ्याच्या सजेशन ला अनुमोदन!

खग्या's picture

21 Mar 2017 - 6:07 pm | खग्या

सुन्दर मार्गदर्शना बद्दल सर्वान्चे मनापासुन आभार!

धर्मराजमुटके's picture

21 Mar 2017 - 6:23 pm | धर्मराजमुटके

मग गाडी घ्यायचा बेत कॅन्सल करणार ना ?
:)

खग्या's picture

21 Mar 2017 - 7:00 pm | खग्या

ती तर घेनारच

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 6:31 pm | मराठी कथालेखक

माझ्या मते ओला उबेर घरातल्या दूसर्‍या कारला पर्याय असावेत
मात्र कुटूंबाकडे एक कार असणं गरजेचं आहे. वेळी अवेळी, अडीअडचणीला स्वतःची कार असलेली जास्त चांगलं.
प्रश्न खर्चाचा असेल तर स्वस्तातली (नॅनो, अल्टो ई) किंवा चांगल्यपैकी जुनी कार (वर खरे साहेब म्हणतात तशी तीस हजार किमी चाललेली पोलो तीन लाखाला मिळाली तर :) असावी.
ओला /उबेर नेहमीच उपलब्ध होतात असं नाही.
माझी पत्नी नागपूरहून विमानाने रात्री येते (वेळ : दहा-साडेदहा , बहूधा रविवार) तेव्हा तिला अनेकदा कॅब मिळत नाही असा अनुभव आहे , किंवा बरीच वाट पाहून मिळते. एकदा बराच वेळ वाट बघून, अ‍ॅपवर सातत्याने प्रयत्न करुनही तिला कॅब मिळाली नाही शेवटी मी चिंचवडहून माझ्या कारने तिला आणायला गेलो.
सणाच्या दिवशी (खासकरुन दसरा /दिवाळी) कॅब लवकर मिळत नाहीत.
याखेरीज peak hour charges मुळे कधी कधी कॅब अतिशय महाग पडते ते वेगळं. शिवाय घरी एकच कार असेल तर सुमारे १००० किमी प्रति महिना म्हणजे १०-१२ हजार किमी प्रतिवर्ष चालवली जाते. खरे साहेब म्हणतात तसं हौसेला मोल नाही हे खरचं आहे पण आठ लाखांची कार पाच वर्षात ते ही फक्त तीस हजार किमी चालवून फुंकून टाकणं हे साधारणपणे हौशी मनुष्यच करतो, बाकी खर्चाचा विचार करणारे , पैसा जपून वापरणारे लोक नवीन कार लाखभर किमी तरी चालवतात.
ज्यांचा प्रवास अगदीच कमी असणार आहे (महिन्याला पाचशे किमी पेक्षाही कमी), किंवा स्वतःला चालवायची नाही त्यांनी मात्र कार घेणं पुर्ण टाळून ओला, उबेर, ओळखीतले ड्रायव्हर यांचा पर्याय अवलंबणं ठीक राहू शकेल,

स्वामी संकेतानंद's picture

21 Mar 2017 - 7:33 pm | स्वामी संकेतानंद

मात्र कुटूंबाकडे एक कार असणं गरजेचं आहे. वेळी अवेळी, अडीअडचणीला स्वतःची कार असलेली जास्त चांगलं.

सहमत! ग्रामीण/निमशहरी भागात राहत असाल तर खरंच गरजेचं आहे. आमच्या गावी ओला/उबर्/कुठलीही टॅक्सी नाही. घरी स्वस्तशी अल्टो घेतली आहे. ती फार चालत नाही, पण तिने केलेली सोय पैशात मोजता येत नाही. बाबांनी कार घेतलीही नसती, इतकी वर्षे काम चालत होतेच. पण एका वैद्यकीय आणीबाणीनंतर चटकन बाबांनी कार बुक केली. त्या दिवशी निव्वळ योगायोगाने एक नातेवाईक कार घेऊन घरी आले होते, त्यामुळे पेशन्टला लगेच हॉस्पीटलात हलवणे शक्य झाले होते. याखेरीज इतर फायदे म्हणजे आमचे बव्हंशी नातेवाईक आडवळणाच्या खेड्यापाड्यांमध्ये राहत असल्याने त्यांच्याकडे जायला कुणावर विसंबून राहायची गरज नाही. दिवसातून एकदाच जाणारी यस्टी सुटली म्हणून प्लान रद्द करायची गरज नाही आणि कित्येक गावांत तर यस्टी पण जात नाही. माझ्या दोन मावशांच्या गावी मी आयुष्यात पहिल्यांदा कार आल्यावर गेलो. आता एका दिवसात चार गावी भेटीगाठी घेऊन रात्री परत आपल्या गावी येणे शक्य होते. सिझनमध्ये भाड्याने कार मिळेल याचीही शाश्वती नसते. सोयीच्या दृष्टीने तरी कार असणे परवडत आहे.

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 7:41 pm | संदीप डांगे

तुमच्याशी सहमत आहे, मी वर जो थोडा त्रास बोललो तो हाच! घरी एक चारचाकी असावीच. ती ओला उबेर च्या सथीने वापरल्यास मेन्टेनन्स बोकांडी बसत नाही व अडीअडचणीला हाताशी असते. बाकीचे फायदे तर मिलतात. घरात गाडीच नको हे भारतात (मेट्रोजमध्ये) अजून पाचेक वर्षे जरा कठिण आहे.

माझे कारबाबत नेहमी हेच मत आहे की तीनेक वर्षाच्या आतली, चांगली, वरच्या सेगमेंटची पण सेकंड हॅन्ड कार घ्यावी. सुरुवातीचा बम्प पहिल्या ओनरने घेतलेला असतो. किमान ५०% कमी किंमतीत मिळते.

माझे सुचवणे असे आहे की आपली ऐपत १ कोटीची कार घ्यायची असेल तर ज्या गाडीची ऑनरोड किंमत ५० लाख आहे अशी गाडी २५ लाखापर्यंत मिळत असेल तर घ्यावी. दहा लाखाची ऐपत असेल तर ८ लाख वाली गाडी सेकंड मध्ये ३ लाखात मिळेल अशी बघावी. उरलेले पैसे फिक्स मध्ये टाकावे व्याजातून तिचे मस्त ओरिजनल स्पेअरपार्ट आणि उच्च दर्जाचे सर्विसिंग, मेन्टेनन्स होऊ शकते. ह्यात जीवनशैलीचा दर्जा कायम राहतो, तुम्ही एक कोटीची ऐपत वाले आहात हे पन्नास लाखाच्या (दर्शनी) गाडीवरुन दिसुन येते, पन्नास लाखाच्या गाडीचा आरामही मिळतो, आणि पैसेही वाचतात. पांचो उंगलिया घीमें और सर कढाईमें.

मानले
क्या दिमाग है यार?

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 6:59 pm | सुबोध खरे

लाखभर किमी चालवायचे तर त्याच्या देखभालीचा खर्च पकडून कमीत कमी ५ रुपये किमी पडते. म्हणजेच पाच लाख रुपये अतिरिक्त खर्च आहे.
अगदी आपण दहा वर्षात जरी एक लाख किमी चालवली तरी पाच लाख रुपये वरील खर्च. आठ लाख रुपये कारचा खर्च अधिक पुढच्या नऊ वर्षाचा विमा अडीच लाख मिळून साडे पंधरा लाख रुपये होतात म्हणजेच दर वर्षी दीड लाख किंवा महिना साडे बारा हजार. किंवा रोजचा ३०० रुपये.
म्हणजे तुम्ही रोज ओला/ उबर ची एक ट्रिप केली तरीही पैसे वसूल होतात. राहिली गोष्ट विमानतळावर टॅक्सी न मिळण्याची. त्यासाठी तुम्ही स्वतःची कर घेऊन चक्कर मारण्यापेक्षा घरूनच एखादी टॅक्सी परत येण्याच्या बोलीवर( दुप्पट भाडे देऊन) आणलीत तर उत्तम. दोघांना छान मागच्यां सीट वर बसून गप्पा हि मारता येतील.
लक्षात घ्या या दहा वर्षात ड्रॉयव्हरचा खर्च पकडलेला नाहीच. १५,०००/- रुपये महिना प्रमाणे १८ लाख रुपये होतील दहा वर्षांचे.
कसाही हिशेब केला तरी कर हि ओला/उबर किंवा टॅक्सी शी तुलना करूच शकत नाही.
परत सांगतो हौस म्हणून घ्यायची असेल तर त्याची किंमत करता येत नाहीच.
साठ वर्षे वयाचे वडील हौस म्हणून किती कार चालवतील ? हा एक वेगळा प्रश्न आहे. जर ती कार अजून कोणी तरुण वापरणार असेल तर गोष्ट वेगळी.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 7:11 pm | मराठी कथालेखक

तुम्ही फक्त आठ लाखाच्या कारचा विचार करत आहात.
ज्याला पैशांचा हिशेब जास्त महत्वाचा आहे तो आठ लाखाची कार घेईल असं नाही ना. तीन लाखाची नॅनो घेईल वा चार-साडेचार लाखांची वॅगन आर घेईल, तिचा इन्शुरन्सपण स्वस्त असेल , चाके लहान असल्याने ती पण स्वस्त , देखभालीचा खर्च कमी , रिसेलमध्ये होणारा तोटाही कमी.
तसेच इन्शुरन्सचा खर्च दरवर्षी सारखा नसतो, नवीन गाडीचा जास्त असतो तो हळूहळू कमी होतो. जसे २०१२ साली सहा लाखाला घेतलेल्या इंडिका विस्टाचा इन्शुरन्स पहिल्या वर्षी वीस हजार तर चौथ्या वर्षी बारा हजारांचा होता.

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 7:27 pm | सुबोध खरे

वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५,७३,५११/- आहे यात विमा २२४०० आहे.
https://www.carwale.com/new/quotation.aspx?pqid=WYYXd+fWmV/d8Aa8GjAPyQOd...
या प्रमाणे हिशेब कमी होईल
वर केलेल्या हिशेबाच्या ७०% गृहीत धरा
हाकानाका
बाकी पाच वर्षे जुन्या वॅगन आरची रिसेल किंमत पण कमी येईल हेही गृहीत धरायला लागेल.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 7:57 pm | मराठी कथालेखक

इथे मी लेखकाच्या वैयक्तिक बाबीबद्दल बोलत नव्हतो.
कारपेक्षा कॅब परवडते हे जे तुम्ही सर्वसाधारण मत मांडले त्याबद्दल म्हणालो.
बाकी 'time is money' या उक्तिप्रमाणे काम करणार्‍या (म्हणजे कमावत्या) व्यक्तीला जर बराच प्रवास करायचा असेल, कंपनीकडून प्रवासाची योग्य सोय नसेल तर वेळ , सुरक्षितता आणि सोय यांचा एकत्रित विचार करता कॅबपेक्षा कार खूप योग्य ठरते.
कॅब बुक करणे, ती येईपर्यंत वाट बघणे, चालक नेहमीच GPS नीट वापरतात असे नाही, त्यामुळे कधी ते फोन करुन पुन्हा पुन्हा कुठे यायचे ते विचारतात, कधी काही चालक येतच नाहीत ई ई अनेक गोष्टी घडत असतात.
मी मध्यंतरी सुमारे चार महिने रोज ऑफिसला ओला-उबेरने ये जा केलीय. माझी कार माझी पत्नी वापरते (तिचा प्रवास माझ्यापेक्षा खूप जास्त असतो आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मी तिला दुचाकी चालवू देत नाही ) , दूसरी कार घेणे परवडणार नाही, पार्किंग नाही वगैरे कारणामुळे मी कॅबने ये जा करत होतो. त्यामुळे माझा ओला-उबेरचा खूप अनुभव घेवून झालाय. आता पुन्हा दुचाकी वापरतोय. पावसाळ्यात पुन्हा ओला-उबेर वापरेन.
तुमच्या वरच्या हिशेबात तुम्ही देखभाल खर्च पाच रुपये प्रति किमी गृहीत धरलाय, तो खूप जास्त आहे. इतका खर्च खरच आला तर ओला-उबेरच्या कॅबमालकालाही ते परवडणार नाही.

बाकी प्रस्तुत लेखकाच्या वैयक्तीक बाबीत बोलायचं तर त्यांच्या वडीलांना कारचा नेमका काय उपयोग करायचा आहे , त्यांची अर्थिक क्षमता ई मुद्दे मी विचारात घेतले नाहीत कारण लेखकाने फक्त कार घेण्याचे बजेट आणि ऑटोमॅटिक कार हवी इतकं सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना मी चार कारबद्दलची माहिती दिली... 'कार घ्यावी की नाही' असा प्रश्न नव्हताच. झालंच तर नॅनोची पण ऑटोमॅटिक वर्जन आहेच,

अभ्या..'s picture

21 Mar 2017 - 8:04 pm | अभ्या..

मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे.

मला फक्त हा महत्त्वाचा मुद्दा वाटला म्हणून मी ओलाचा पर्याय सुचवला.

यसवायजी's picture

21 Mar 2017 - 11:10 pm | यसवायजी

Grand i10. Rs. 6,05,000 ची.
आताच १ वर्ष झालं. Renewal @Rs. 14500/-. Hyundai assured insurance.

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 7:16 pm | सुबोध खरे

शेवटी अजून एक हिशेब
खरं तर हा मी टाकणार नव्हतो नवीन कार घेणाऱ्या माणसाला नाउमेद करायचे नाही म्हणून.
पण विषय ऐरणीवर आलाय म्हणून
३०,००० किमी आपण कार चालवता तेंव्हा कारचा वेग ३० किमी ताशी पकडला (रहदारी गृहीत धरून) तर आपण सरासरी १००० तास कार मध्ये बसता.
एक हजार तासांसाठी आपण ७ लाख २० हजार रुपये खर्च करतो म्हणजेच तासाला सातशे वीस रुपये खर्च करतो. म्हणजेच २४ तासाला रुपये १७६८०/-
(आणि जर ६० किमी वेगाने गेलो तर ५००च तास म्हणजे ताशी रुपये १४४० /- फक्त )
अरे बापरे
हा दर तर सप्ततारांकित हॉटेलचा होतो.
यात झोपणे गृहीत नाही नाष्टा, जेवण हि नाही.
पहा विचार करून.
यात कर्जावर घेतलेल्या कारच्या व्याजाचा हिशेब नाही
आणि नवीन कार असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च काहीच येणार नाही हे गृहीत आहे.

स्वामी संकेतानंद's picture

21 Mar 2017 - 7:39 pm | स्वामी संकेतानंद

तासाला सातशे वीस रुपये

पण हा खर्च करून मी दिवसाला तीन हजार कमावायला किंवा एखादी दहा लाखाची डील फायनल करायला जात असेन तर??

स्वामी संकेतानंद's picture

21 Mar 2017 - 7:47 pm | स्वामी संकेतानंद

कारमध्ये कुणी नुसताच बसत नसतो हो! कुठेतरी जात असतो, कुठूनतरी येत असतो, त्यामुळे कारची किंमत तिच्यात बसून घालवलेल्या तासात मोजण्याचा हिशोब कळला नाही. मी अधिक वेगात जातोय तर तुमच्या हिशोबाप्रमाणे मी अधिक तोट्यात आहे! पण मी वेगात जातोय याचा अर्थ कुठेतरी लवकर पोचतोय. मी तो वाचलेला वेळ कुठेतरी जास्त परतावा देणार्‍या कामात वापरू शकतो. जर कारमध्ये जास्त वेळ बसणे म्हणजे कारवर केलेला खर्च कमी करणे असेल तर मी माझी कार नेहमी ताशी पाच किमी वेगानेच चालवायला पाहिजे! मी शंभरच्या सरासरीने पुणे-पनवेल जाऊन एक महत्वाची मिटिंग पूर्ण करून परत येऊन माझ्या मुलांसोबत खेळायलाही वेळ काढू शकतो. पण जर कारचा खर्च काढायला मी तीच कार पाच किमी वेगाने हाकत पनवेलला न्यायचे ठरवले तर???
कार हे घर नाही, हॉटेल नाही, लॉज नाही, दळणवळणाचे साधन आहे.

माझ्या मित्रमंडळात असे तिघे चौघे तरी आहेत की एका फोनवर म्हणेल तिथे फुल्ल डिझेल भरलेली स्वतःची गाडी घेऊन ड्रायव्हरसह्/नसल्यास स्वतः यायला तयार असतात. पैसे दिले तर नाही म्हणत नाहीत पण परतफेडीची अपेक्षा नाही.
अर्थात ही व्यक्तीगत बाब झाली,

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 8:03 pm | सुबोध खरे

ओला उबरचे मालक आणि चालक तेच करतात हो .
गाडी धंद्याला हवी असेल तर गोष्ट अगदीच वेगळी आहे. मग तेथे हिशेब नाहीच.

शब्दबम्बाळ's picture

21 Mar 2017 - 7:17 pm | शब्दबम्बाळ

Ignis भारी वाटली मला तरी!
कोणी घेतलीये का? लैच आवडली मला, एकदम प्रॅक्टिकल मॉडेल आहे!
car

car1

सुबोध खरे's picture

21 Mar 2017 - 7:32 pm | सुबोध खरे

घेऊन टाका
मारुती कार भरवशाच्या असतात / आहेत .
कार विकत घेणे हा "हृदयाचा" निर्णय असतो डोक्याने विचार करायला गेलात तर जमत नाही.

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 7:45 pm | संदीप डांगे

मला वाटतं, ना डोक्याचा, ना हृदयाचा, हा 'आराम का मामला' है :-)

रुस्तम's picture

21 Mar 2017 - 9:57 pm | रुस्तम

क्विड कोणी घेत्तली आहे का?

सतिश पाटील's picture

23 Mar 2017 - 11:40 am | सतिश पाटील

माझ्या मित्राने घेतलीये ती गाडी.

बारीक़ अंगकाठी आणि उंचीने जेमतेमच असलेले ४ जण त्यात बसु शकतात.
ड्रायवर शेजारी बसलेल्या माणसाचे गुडघे हमखास गियरला टेकतात.
खड्ड्यात किंवा स्पीडब्रेकरला गाडी थोडीशी उडाली तरी मागे बसलेल्यांचे डोकी छताला आपटतात

बाकी पर्फ़ोमंस अणि सर्विस चांगली आहे.

क्विड नाही पण DATSUN Redi-Go वापरतोय , सहा महिन्या पुर्वी घेतली. 10,000 Km रंनिंग झालेय, सिटी साठी मस्त आहे. ट्रॅफिक मधे कंट्रोल साठी मस्तच. मला उंच आणि जास्त लेग स्पेस वाली कार हवी होती, 800 सीसी .

Alto बेस्ट . पण Nissan च ईंजीन म्हणून आणि स्पेस बघून घेतली.
रोज ऑफीस ला वापरतो. 50% कॅश दिली. EMI पण जास्त नाही. हॅपी :) ..

देशपांडे विनायक's picture

22 Mar 2017 - 1:06 pm | देशपांडे विनायक

वयाच्या ७५ ला
मी भूगाव ला राहण्यास आलो आहे . पुण्यातल्या चांदणी चौवकापासून ५ किलो मीटर अंतरावर
येथे येण्यापूर्वी
मेलबोर्नला पाच महिने राहून आलो तेव्हा तेथे चार चाकी गाडी चालवणारे काही जेष्ठ आणि काही अति जेष्ठ चालक पाहून चार चाकी वाहन घेऊन स्वतः चालवावे असा विचार व्यक्त करताच
वरील गोष्टीवर चर्चा झाली . आणि
ओला उबेर रिक्षा यांचा मुक्त वापर करण्याचे ठरले
येऊन चार महिने झाले . फक्त चार वेळा ओला / उबेर भूगाव मधून जाण्यास मिळाली
ओळखीचा एक रिक्षावाला एकदा आला [ तो बावधनला राहतो ]
बाकी प्रत्येक वेळी ६ आसनी रिक्षा किंवा जीप यांचा उपोयोग करणे भाग पडत आहे
पुण्यातून भूगावला येताना मीटर वर येणारे रुपये अधिक २०/ ३० रुपये देताना विचार करणे बंद केले आहे
मला ओला उबेर यांचे अँप नीट वापरता येत नाही
आठ तास ८० किलोमीटर ला १५०० रुपये अशी एक टॅक्सी मिळते परुंतु ती प्रत्येक वेळी available असत नाही
नाटक सिनेमा पाहुणचार या गोष्टी रात्रौ आठ पर्यंत संपत नाहीत आणि आठ नंतर भूगावला येणारे रिक्षावाले सापडत नाहीत
सहा आसनी रिक्षा आणि जीप यांचा अत्यंत चांगला गूण म्हणजे ते नाही म्हणत नाहीत . त्यात बसलेले १५/१६ प्रवाश्यापैकी एखादा म्हणतो
मला भूगाव ते कोथरूड बस डेपो पर्यंत तरी नेणारा आणि रात्रौ पुण्यातून भूगावला आणणारा रिक्षावाला टॅक्सिवाला
मिळवून देण्यास मदत करा

स्वतःची कार घ्या आणि ओलाला/उबेरला लावा.
एखादा गरजू पोरगा ड्रायव्हर म्हनून ठेवा. पॉइंट भूगावचाच ठेवायचा. तुमच्यासारखे अजून काही असतीलच ना?
तुमच्या गरजेच्या वेळी बाहेरचे कॉल रिजेक्ट करायला पोराला सांगायचे.
बिझनेसला बिझनेस. गाडीला गाडी, पैशाला पैसा.
अजून काय पाह्यजे?

संदीप डांगे's picture

22 Mar 2017 - 3:20 pm | संदीप डांगे

उत्तम सल्ला!

अभिजीत अवलिया's picture

22 Mar 2017 - 10:13 pm | अभिजीत अवलिया

ओला उबर ला जी गाडी भाड्याने लावली जाते त्यांना प्रती ट्रिप पैसे मिळत नाहीत. दिवसाला ठराविक ट्रिप (माझ्या माहितीप्रमाणे किमान १॰) केल्या तरच पैसे मिळतात. एवढ्या ट्रिपा भुगाव परिसरात नाही मिळायच्या.

माझ्या माहितीप्रमाणे असं नसतं..
दिवसभरातल्या कलेक्शन मधलं १५ टक्के हे ओलाचं कमिशन आहे. त्यासाठी मिनिमम इतक्या इतक्या ट्रिप असं बंधन नाहीये. मी चार -पाच ओला चालकांशी यावर बोललो आहे. दिवसातल्या प्राईम टाइममध्ये (सकाळी ८-१२ आणि रात्री बहुधा पाच-दहा) या वेळात काही ठराविक ट्रिप्स केल्यावर ओलाकडून ५०० ते ८०० रु. पर्यंत रिवॉर्ड मिळतो. हा रिवॉर्ड मिळवण्यासाठी सगळेच धडपड करतात. नाहीतर मिनिमम ट्रिप्स असा काही नियम नाही.

मी हे पुण्याविषयी बोलतोय. इतर शहरामध्ये ओलाची पॉलीसि वेगळी असू शकेल. अर्थात फक्त भूगाव हे केंद्रस्थानी ठेऊन ओलाचा व्यवसाय करू नये या मताशी मी सहमत आहे.

असं माझं मत आहे. पण परवडत नाही म्हणून कॅब कंपनीला गाडी लावणं तितकंस कधीच पटलं नाही. अर्थात, मला याचं लॉजिक वगैरे काही देता येणार नाही किंवा कुणीही काहीही लॉजिक दिलं तरी मला पटणार नाही. इट इज रिअली अ‍ॅबसर्ड, बट कांट हेल्प !

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2017 - 12:01 pm | मराठी कथालेखक

तुमचं म्हणणं बर्‍यापैकी पटलं
दुसरे लोक आपल्या गाडीतून फिरले तर गाडीची बॅकसीट खराब /घाण करण्याची शक्यता असते. झालंच तर जंतुसंसर्ग वगैरे पण.
म्हणूनच एकवेळ तरुण वयात ठीक आहे पण उतारवयात तर टॅक्सीने फिरु नये असे मी म्हणेन, ड्रायव्हर ठेवला तर तो ही स्वच्छतेच्या काटेकोर सवयी असणारा असावा, गाडी आतून चांगली स्वच्छ असावी.

वरुण मोहिते's picture

22 Mar 2017 - 1:23 pm | वरुण मोहिते

सरांच्या अनुभवाशी सहमत . माझ्याकडे आता ३ गाड्या झाल्या . मागच्या महिन्यात XUV ५०० पण घेतली . त्या आधी होंडा सिटी नवीन, आय १० ह्या पण गाड्या आहेत . पण आता मुंबईत इतकं बोरं होतं ना चालवताना काही विचारू नका . मुलुंड ते विटी कोण गाडी घेऊन जाईल रोज . कोणाला दाखवायचं .. बस ओला ट्रेन खरंच परवडते पण आणि निवांत पणा मिळतो . बाकी घरी एक गाडी असावी ह्याच्यासाठी सहमत .
अवांतर _आय १० ग्रँड ऑटो घ्या . ५ वर्ष तरी चिंता नाही .

त्रिवेणी's picture

22 Mar 2017 - 2:51 pm | त्रिवेणी

आम्ही झेस्ट ए एम टी घेतलीय गेल्या गणपतीत.मस्त चालतेय. टाॅप एंड साडेनऊ दहा लाख‍ाला जाते.

प्रसन्न३००१'s picture

23 Mar 2017 - 10:52 am | प्रसन्न३००१

स्विफ्ट डिझायर वापरतोय गेली ७ वर्ष... मस्त गाडी आहे एकदम, उत्तम पिकअप, चांगला मायलेज आणि कमी मेंटेनन्स... सध्या फोर्ड इकोस्पोर्ट घ्यायचा विचार चालू आहे... कोणाकडे असल्यास रिव्ह्यू कसे आहेत ?

वरीलपैकी आय१० ग्रँडला मत दिलेल्यांशी सहमत. त्यात एक स्पोर्टस व्हेरियंट आहे. तो आणखी भारी.

अमर विश्वास's picture

23 Mar 2017 - 12:16 pm | अमर विश्वास

मागच्या आठवड्यातच मारुती इग्निस ची डिलिव्हरी घेतली

पेट्रोल ऑटोमॅटिक ...

पहिल्या आठवड्याचे रिझल्ट उत्तम. टोटल ऑन रोड ७.५ लाख ...

General observations :
1. overall comfort is good
2. Powerful AC
3. Steering wheel is responsive
4. good leg room for back sets as well
5 small turning radius (as compare to Vista with approx same dimensions)
6. as auto gears are AMT, there is standard lag but its quite manageable in city. (this is my first automatic car so feeling the difference)

So overall happy to recommend

प्रसन्न३००१'s picture

23 Mar 2017 - 12:27 pm | प्रसन्न३००१

ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर - हा फिचर आहे का ?

कमी उंची असलेल्या सगळ्या गाड्यांसाठी हा फिचर अत्यावश्यक आहे असं मला वाटतं

अमर विश्वास's picture

24 Mar 2017 - 2:47 pm | अमर विश्वास

मारुती इग्निस मध्ये ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर नाही ...

मारुतीच्या कुठल्याच गाडीत हा स्टॅंडर्ड असेसरी नसतो

बाहेरून बसवून घ्यावा लागतो

लई भारी's picture

30 Mar 2017 - 4:49 pm | लई भारी

दिसायला बेश्ट आहे. रिव्यू पण चांगले आहेत.

मी २ वर्षांपासून झेस्ट(मॅन्युअल) वापरतोय. ४५,००० किमी एकदम झक्कास चालू आहे. त्यामुळे टाटा ब्रँड विषयी काही शंका ठेवायची गरज नाही आहे असे वाटते.
मला हा पर्याय value for money वाटतो.