बर्यााच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा तांबड्या लोकांचे तांबडे प्रश्न (अॅज इन मंगळवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं मंगळा वर जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, मंगळाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण मंगळ ओरियंटेड वगैरे नाही. एनटी (न्यूरो टेक्नॉलॉजि) मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही मंगळा वर पोहचलो. पासप्लॅनेट वर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण १ वर्षा साठी आलो ते गेले ५ वर्ष झाले (पृथ्वी वरचे) इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे स्पेस स्टेशन मध्ये राहिल्यासारखं स्पेस शटल मध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या स्पेस शाळेत जायला लागला. पहिले काही दिवस विषेश काही घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्या चालण्यातला बदल, शाळेत नॉलेज ट्रान्स्फरच्या KT (शिकवण्याच्या) पद्धतीतला फरक इ. गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली मंगळी पद्धत जास्त आवडली. इथे इ-लिखाणावर किंवा इ-पुस्तकातून शिकण्यावर, घोकंपट्टीवर, पुस्तकी किडा करण्यावर आणि परीक्षेत मिळालेल्या गुणांवर भर दिला जातो. पृथ्वीवरील भाषेची मुळाक्षरे किंवा अंक, पाढे, कविता याच्या पाठांतरावर भर दिला जातो. इतर ग्रहांशी संबंध ठेवण्याची पद्धत, इतर ग्रहांची साधन सामुग्री आपल्याला जास्तीत जास्त कशी मिळवता येईल इ. शिकवण्यावर भर आहे. जे काही शिकवले जाते ते इंटर प्लॅनेटरी स्पेस सिलॅबस मधुनच. इ-पुस्तकं, इ -नोटबुक्स भरपूर, घरचा (म्हणजे स्पेस घरचा) अभ्यासही भरपूर, अगदी मान मोडेस्तो. इथल्या शाळेत वर्गात १५० मुलं आणि १ कॉम्पुक्षक. वर्गाचे प्लॅनेट्स-स्पेस सायन्स-गॅलॅक्सी-नेब्युला-डार्क मॅटर-डार्क एनर्जी- कृष्णविवर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी दंगा करत असतात. म्हणजे प्रत्येक मुलगा आपापल्या स्पेस स्टेशन मध्येच असतो. प्रत्येकाला एक स्वतंत्र, सुसज्ज रूम म्हणजे त्याची शाळा. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं व्ही आर रिऍलिटी गेम मधनं मारामारी करत होती. कॉम्पुक्षक त्यांना प्रोत्साहन देत होता.
आधी मला वाटलं की हा निव्वळ मंगळपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या काही महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात ग म भ न, पाढे, अडीचकी, निमकी पासून मारामाऱ्या कशा कराव्यात, कुठल्याही गोष्टीत दुसऱ्या पेक्षा जास्त कसे मिळवावे इत्यादी पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पृथ्वीवर न्यू जर्सीला असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. होम वर्क कधीच नसायचा. घरात अभ्यासाचे कोणीही नाव काढता नसे. इथे मात्र इतका अभ्यास आणि होम वर्क करून मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक मंगळी तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं स्पेस स्टेशन असावं असं काही वाटत नाही. मला उलट पृथ्वीवर रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील भारत सोडुन अमेरिकेत आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला पृथ्वीवरून मंगळावर आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या् गोष्टी अनेकविविध असतील. पृथ्वीवरच्या शाळेत त्याच्या आजुबाजुला त्याच्याच सारखी मुलं नव्हती "माझ्या ग्रुपमध्ये गुरुनाथ-हर्षद-शनाया आणि मी आहोत" हे वाक्य मला पृथ्वीवर ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्याव बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या ग्रहा पासून दूर आहे. हळूहळू त्याची पृथ्वी बद्दलची ओढ मारली जाईल. सावत्र आणि मानलेली नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी मानलेली नाती मिळतील. इकडे फक्त सख्खीच. शिवाय पृथ्वीवर हि आता शेवटच्या अणू युद्धाचे दुष्परिणाम आणि प्रदूषण कमी झालेले आहे आणि इतर कुठल्याही ग्रहाच्या तोडीस तोड उपलब्धता, सुविधा, वस्तू, जीवनमान आहे. मंगळावरच्या सोयी आणि पृथ्वी वरची संस्कॄती असे दुहेरी फायदे न्यू जर्सीत राहुनही मिळु शकतात. मग राहेना का अनुभवविश्व जरा सीमीत आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित.
हा प्रश्न आता बराचसा सार्वत्रिक होतो आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही मंगळयांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या पृथ्वी वरच्या अनुभव प्रमाणे निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे वेगवेगळ्या ग्रहांवर असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण ग्रह करतो, ते तेवढं काही वर्षांनी गृहीत रहात नाही. त्यामूळे पृथ्वी सोडताना जितके वेगवेगळे ग्रहवासियांचे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं मंगळ. जशी इथे संस्कृती बाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला ग्रह सोडणे, आपली ग्रह संस्कॄती-पद्धती दुसऱ्या ग्रहावर रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या ग्रहावर राहुन काम करणे ही ग्रहभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परग्रही असणाऱ्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परग्रहाचीची संधी नाकारुन पृथ्वीला निवडणाऱ्यांनी .. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना पृथ्वी सोडण्याचा फायदा होऊ शकतो.
डिस्क्लेमर:
या लिखाणा मध्ये वरिजनल धागाकर्तीच्या भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.
लिखाणा मध्ये काही साम्य स्थळे आढळली तर योगायोग समजावा.
प्रतिक्रिया
20 Feb 2017 - 8:26 am | स्रुजा
मोठा विषय आहे, सवडीने उत्तर देते. तूर्तास, मला शनी आणि गुरुवरुन चांगल्या संधी आल्या होत्या. त्या मी नाकारल्या. उगा कशाला त्यांच्या मागे साडेसाती लावा? ओझोन लेयर न सोडण्याचा स्वभाव असणारी मी त्या संधी का नाकारल्या याचं उत्तर देते, आणि आज त्याबद्दल, तुमच्या प्रश्नाबद्दल विचार करतांना काय वाटतं तेही सांगते.
-स्रुजा (परलोकापेक्षा पृथ्वीचेच कौतुक) सांगे
20 Feb 2017 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला पण खूप संधी आल्या, अजून एक संधी हाताची घडी आणि तिरपा कटाक्ष टाकून माझ्याकडे पाहात आहे, तिला पाहून आमची ही म्हणत होती इकडे बाजरीच्या भाकरी चुलीवर थापू थापू कंटाळा आलाय, परग्रहावर ही भानगडच नै म्हणे.. नुस्तं डोळ्यांनी मळलेल्या उंड्याकड़े पाहिलं की कड़क भाकर तयार, एवढ्यासाठी तरी जानू चल ना रे... असा हट्ट लावलाय. बघू कसं जमतं ते... ;)
-दिलीप बिरुटे
20 Feb 2017 - 8:48 am | एस
त्रागा आणि सल्ले-वाद वाचत आहे.
20 Feb 2017 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त, मलाही दोन दिवसांपासून या विषयावर खाज येत होती. बाकी, पृथ्वी सोडून कोणत्याही ग्रहावर जा, दिल्या घरी सूखी राहा पण पृथ्वीबद्दल चांगले वाईट गळे काढू नका, एवढीच प्रामाणिक मागणी आहे.
''बस एक करवट ज्यादा ले लूं किसी रोज़ सोते वक़्त..
माँ आज भी आकर पूछ लेती है बेटा,तबियत तो ठीक है..''
-दिलीप बिरुटे
(मूल निवासी)
20 Feb 2017 - 9:50 am | सतिश गावडे
ज्यांची मंगळावर जायची औकात* नसते ते असे मंगळावर जाऊन तांबड्या नोटा कमवणार्या लोकांवर जळतात असं एक मत प्रचलित आहे ;)
*हा शब्द विदर्भेतर महाराष्ट्रातील "लायकी" अशा नकारात्मक अर्थी न वाचता विदर्भातील "क्षमता" अशा सकारात्मक अर्थाने वाचावा.
20 Feb 2017 - 10:21 am | इरसाल कार्टं
हा हा हा
20 Feb 2017 - 9:50 am | गवि
मंगळावर गेलेले लोक पृथ्वीवर नाताळच्या सुट्टीत आले की लगेच इकडे गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, धूळ आहे आणि मुख्य म्हणजे फार गुरुत्वाकर्षण आहे अशी रडगाणी सुरु करतात.
20 Feb 2017 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा आम्ही ऐकून घेणार नाही की "जगात कुठेही गेलो तरी गड्या आपलाच गाव बरा म्हणून...."
-दिलीप बिरुटे
20 Feb 2017 - 10:03 am | सतिश गावडे
यावरुन माझ्या कार्यालयीन चमूमध्ये घडलेली घटना आठवली. जेमतेम वर्षभरापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण संपलेल्या एका सहकारीणीचे लग्न ठरले. तिचा होणारा नवरा मंगळावर एका आस्थापनेत कार्यरत होता. त्यामुळे ही तरुणी लग्नानंतर त्याच्यासोबत परावलंबी पारपरग्रहखतावर मंगळावर जाऊन राहणार होती. तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असताना तिच्याबरोबरच आस्थापनेच्या सेवेत रुजू झालेले तिचे समवयीन सहकारी मात्र कुजबुजत होते, धुसफुसत होते.
मी मग ती तरुणी प्रकल्प भागात नसताना त्यातल्याच एका तरुण सहकार्यास त्यांच्या कुजबुजीचे आणि धुसफुसण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणाला, "ह्यांचं बरं असतं राव. एखाद्या वर्षात लग्न करुन ह्या मंगळावर जातात. आम्ही मात्र अजून कितीही घासलं (आणि अजून बरंच काही केलं) तरीही पुढची तीन चार वर्ष तरी आम्हाला कुणी मंगळावर जाण्याबद्दल साधं विचारणारही नाही."
मी काहीच बोललो नाही. :)
22 Feb 2017 - 11:01 pm | बॅटमॅन
मेलो, खपलो, वारलो. =))
20 Feb 2017 - 10:10 am | अॅस्ट्रोनाट विनय
सगळे ग्रह इथून तिथून सारखेच असतात हो. मी अॅस्ट्रोनाट आहे मला विचारा. शिक्षणाचं म्हणाल तर पृथ्वीवर राहूनही तुमच्या मुलाला तुम्ही मंगळाची व्हर्च्युअल ट्युशन लावू शकता. वाटल्यास उच्च शिक्षणासाठी पाठवा परत मंगळावर किंवा चंद्रावर.
( सावधानतेचा इशारा: मंगळावरच्या शाळांमध्ये सध्या मुलांना गे बनवणारी टोळी आली आहे. त्यापासून सावध रहा.)
शक्य झाल्यास उद्या संध्याकाळी मंगळावरच्या स्टार ल्याब मध्ये याल का? जरा गप्पा मारूयात. मूलनिवासी भेटले की आनंद वाटतो.
खालील मजकूर अॅस्ट्रोकोड मध्ये लिहला असल्याने फक्त तुमच्याच आयडीला दिसेल-
चिवडा येतो का हो तुम्हाला ? ( क्याप्सूल नव्हे, खराखुरा पोह्यांचा) जमलं तर बनवून आणाल का? खुप दिवसांपासून मंगळ शनी स्पेक्झरीवरच ड्राइव्ह करतोय म्हणून न्यू पृथ्विवर जाणं झालच नाही
21 Feb 2017 - 5:41 am | लीना कनाटा
अॅवि दादा,
चिवडाच काय खाऱ्या बुंदी पासून फाफड्या पर्यंत आणि सोनपापडी पासून गाठी शेवे पर्यंत सगळं सगळीकडे मिळतं.
एव्हडेच नव्हे तर पृथ्वीवरील भारत नामे देशातील पुनवडी नगरातील श्रीयुत पितळे यांची खास, अखिल ब्रह्मांड प्रसिद्ध बाकरवडी देखील मिळते. मात्र स्थानिक ग्रहीय वेळे प्रमाणे दुपारी १ ते ४ हि वेळ सोडून ! आणि त्या बाकरवडीच्या पॅकिंग वरचा पितळे असा अनुनासिक आवाजातला ३D ऑडिओग्राम ऐकून बाकरवडीच्या अस्सलपनाची खात्री करून घेता येते.
23 Feb 2017 - 3:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ शनी, मंगळावरच नव्हे तर तिथे जायला-यायला असलेल्या स्पेसरूटवर दर १०,००० किमीवर "पटेल ब्रदर्स"ने स्टोअर्स उघडली आहेत. परवाच मंगळावरून शनीकडे जाताना माझ्या सहायक्काने तेथू शेवग्याच्या शेंगा घेतल्या.
20 Feb 2017 - 10:25 am | इरसाल कार्टं
शेवटच्या अणुयुद्धाचं माहित नाही पण मिपावर वाकयुद्ध सुरु हणारे लवकरच....
20 Feb 2017 - 10:50 am | पिलीयन रायडर
ख्या ख्या ख्या!! आज नाही आलोय मिपावर! मस्त लिहीलय! चालु द्या!!
20 Feb 2017 - 12:08 pm | माझीही शॅम्पेन
खर तर ह्या विषयाला परग्रह ह्या वर मर्यादित न ठेवता इतर आकाशगांगेत राहण किती कठीण आहे , जागो जागी खोदून ठेवलेल्या कृष्ण विवरांमुळे प्यायला पाणी पण मिळत नाही असो , विषय वैश्विक आहे सावकाशिन लिहीन (म्हणजे काशी करीन) :)
21 Feb 2017 - 12:07 pm | आदूबाळ
आर्थर सी क्लार्क आणि आशा बगे यांचं लेखन एकत्र करून वाचल्यासारखं वाटलं!
21 Feb 2017 - 1:17 pm | वरुण मोहिते
क्लार्क आणि बगे .. काय निरीक्षण आहे :))))))
22 Feb 2017 - 4:59 am | लीना कनाटा
हि हि हि ...
आबा साहेब भलतेच इनोदी.
कुठे इस्रोचे पीएसएलव्ही आणि कुठे नासाचे एसटीएस लॉन्चर.
22 Feb 2017 - 11:17 pm | बॅटमॅन
=)) =)) =)) =))
मेलो मेलो मेलो =)) =)) =))
21 Feb 2017 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परग्रहावर महिला घरीच पोळ्या करतात की बाहेरुन विकत आणतात ?
-दिलीप बिरुटे
21 Feb 2017 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या पृथ्वीवरची पोरं पोरी वरण भात, देव धर्म, शिक्षण बिक्षण, लग्न बिग्न, किरकोळ लफडी बिफडी याच्या पलिकडे फार विचार करत नाही. (संस्कृती, संस्कार, असं काही नै पण एक प्रेशर असतं इकडे) तिकडे परग्रहावर डेटींग- बीटींग, सेक्स-बीक्स, चुंबन बिंबनाच्या कल्पना कशा आहेत ? च्यायला, आमची पोरं बिगडायची नाय तर... ! ;)
-दिलीप बिरुटे
21 Feb 2017 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं जमलंय ! =)) =)) =))
22 Feb 2017 - 1:07 am | अभिदेश
पण काय हो..मंगळावर मंगळागौर साजरी केली कि नाही? ...
22 Feb 2017 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंगळागौर-बिंगळागौर काय नसतं. परग्रह नावाचं तिकडे एक मंडळ असेल तिकडे सर्व प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतील. एक दिवस खास "आठवणीचे कढ" नावाचा प्रकार असतो, सर्वांनी मिळून आपल्या पृथ्वीवरच्या आठवणी काढायच्या, डोळे बिळे भरले पाहिजे या टाइपचे... आणि समारोप आयुष्यात काही करायचे असेल तर बाई हे स्वीकारावच लागतं असं म्हणायचं. हे आणि असे काही कार्यक्रम तिकडे आयोजित केले जातील. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
(संयोजक,आठवणी मित्र मंडळ.परग्रह)
22 Feb 2017 - 10:51 pm | अभिदेश
उपवर मुलगा किंवा मुलगी पृथ्वीक असेल तर काय उपाय...
23 Feb 2017 - 2:57 pm | इरसाल कार्टं
हा हा हा
23 Feb 2017 - 7:04 am | लीना कनाटा
अभिदेश दादा,
पृथ्वी ग्रह सोडताना आपल्या जुन्या माईंड सेट मधनं बाहेर पडावे हे उत्तम.
इकडे हळदी कुंकू (हे सध्या हक्कु या नावाने आंजा वर प्रसिद्ध आहे), मंगळागौर असं काही नसतं .
पृथ्वीवर कसं बायकांचं हक्कु तसं इकडे पुरुषांचं गुब्बु (म्हणजे गुलाल-बुक्का बर का) असतं. याचा एकंदरीत ढाचा हक्कु सारखाच फक्त फरक एव्हढाच कि सडाफटिंग पुरुष देखील गुब्बु ला उपस्थित राहू शकतो. याला वेळ काळाचे बंधन नाही. गुलाल-बुक्का केव्हाही वीक डेज, विकांत, लॉन्ग विकांत, मंगळावरच्या एमपीएल, सुप्प बोल स्पर्धा इत्यादींच्या निमित्ताने करता येतो. असे समजले जाते कि बायको माहेरी गेली असेल तर गुब्बु साठी उत्तम मुहूर्त असतो. आणि ती जर पृथ्वी गेली असेल तर सर्वोत्तम सोडा-व्हिस्की योगच (म्हणजे तुमच्या पृथ्वीकरांच्या भाषेत तो दुग्ध-शर्करा कि काय तो). विशेष म्हणजे गुब्बु हा घरीच करावा असे बंधन नाही. तो अगदी ऑफिस पासून बार पर्यंत ते अगदी लीला सह सहलीला जाऊन देखील करता येतो.
याचा थोडक्यात विधी खालील प्रमाणे:
स्वागत
एक एका श्रीमद्योपतीचे गुब्बु स्थानी आगमन झाल्यावर हॅन्ड शेक करून पाठीत प्रेमाने बुक्का घालून स्वागत करावे. यामुळे श्रीसुरा देवाची अप्रकट शक्ती जागृत होते आणि त्याची कृपादृष्टी प्राशन करण्याची उत्सुकता लागते.
पूर्व तयारी
जर श्रीमद्योपतीने काही मटेरियल म्हणजे लुटायचे वाण, चखणा वगैरे आणला असेल तर एकत्र ठेवणे. वेगवेगळी पेय्य पात्र, डिशेस, बोल, चमचे तयार ठेवणे. काही श्रीमद्योपतीना गुब्बु विधी मध्ये धूम्र कांडीचा नैवेद्य लागतो त्याची सगळी पूर्वतयारी करणे. या गुब्बु विधीमध्ये कधीकधी रतीचित्रफितीचा उप विधी असतो त्याची देखील तयारी करणे.
ओठी भरणे
आता सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे ओठी भरणे.
प्रत्येक श्रीमद्योपतीला स्थानापन्न करून जे काही त्याच्या आवडिचे वाण उपलब्ध असेल ते यथोचित पेय्य्यात मिसळून अथवा त्याच्या मर्जी नुसार नुसतेच त्याच्या ओठी भरावे.
या ओठी भरण्याच्या क्रिये मुळे गुब्बु विधीच्या यजमानास परम पुण्य लाभते व त्याच्या वर मित्र देवाची सदैव कृपा राहते असे समजले जाते.
वाण लुटणे
ओठी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला कि सगळे श्रीमद्योपती एकमेकांना आपण आणलेले वाण आणि चखणा घ्यायचा आग्रह करतात. काही श्रीमद्योपती स्वतःहून वेगवेगळे वाण आणि चखणा फस्त करतात तर काहींना आग्रह करावा लागतो असे निरीक्षण आहे.
मात्र या गुब्बु मध्ये कधी एखाद्या श्रीमद्योपतीवर श्रीसुरा देवाची जरा जास्तच कृपा होऊन यजमानास त्रास होऊ शकतॊ किंवा यजमानांचे नशीब फारच वाईट असेल तर ऐन गुब्बु समारंभात गृहलक्ष्मीचे आगमन होऊन हा समारंभच उधळला जाऊ शकतो आणि त्याचे महा भयंकर परिणाम होऊ शकतात. तेव्हा योग्य ती काळजी घेऊन हा गुब्बु केला जातो.
इति गुब्बु विधी समाप्तम.
मंगळागौरी (आम्ही पृथ्वी गौर म्हणतो) बद्दल नंतर कधीतरी.
24 Feb 2017 - 2:01 am | अभिदेश
हा योग आम्हा पृथ्वी वासियांना वरचेवर मिळतो. पण काय हो सगळे On the Rocks वाले का? नाही म्हणजे मंगळावर पाणी कमी म्हणून विचारले....
24 Feb 2017 - 7:03 am | सचिन काळे
वा: गुब्बूविधी जबर लिहिलाय. लिखाण आवडलं.
22 Feb 2017 - 4:49 pm | सिरुसेरि
फॉर हिअर ऑर टु फ्लाय - हे प्रा. बुधेश मंगळकर (धी शुक्रा ब्रम्हांड विद्यापीठ ) यांचे पुस्तक जरूर वाचाच (अजून पर्यंत वाचले नसल्यास ) . या धाग्यावरील सर्व मुद्द्यांचा ( आणी झालंच तर गुद्द्यांचा) या पुस्तकात व्यवस्थित उहापोह केला आहे .
22 Feb 2017 - 5:02 pm | गवि
"उहापोह" शब्दाने मला भूक लागते.
गरमागरम कांदेपोहे (विथ सम बटाटा, टोमॅटो, मटार इन्क्लुडेड) बशीत काठोकाठ भरुन वर ओलं शुभ्र खोबरं, कोथिंबीर पेरुन डोळ्यासमोर येते.
मंगळावर विश्वातभारी उत्तम पोहे मिळतात का? कुठेशी?
22 Feb 2017 - 11:16 pm | वेशीवरचा म्हसोबा
"मी ५ वर्ष मंगळावर राहते" एव्हढं सांगण्यासाठी केव्हढा मोठा लेख लिहीलात तुम्ही.
बाय द वे, तुम्ही डीपेंडंट व्हिजावर गेला असाल ना?
26 Feb 2017 - 8:37 am | लीना कनाटा
वेसोबा काका,
तुम्ही भलतेच मनक वडे दिसता. कसं बरोब्बर ओळखलंत :)
बाकी तुमचा रोख वरिजनल जिल्बी कडे दिसतो आहे.
रच्याकने ... वरती सगा सरांनी म्हटल्या प्रमाणे मी इकडे मंगळावर परावलंबी पारपरग्रहखतावर आहे.
त्यांचा वरचा
सागा ऑफ सगा
हा प्रतिसाद वाचणे.23 Feb 2017 - 12:56 am | आदूबाळ
आजच नासाने अशी सोय भविष्यात उपलब्ध करून द्यायचं आश्वासन दिलं आहे.