‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’
डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’ हे पुस्तक नुकतेच वाचले. भारतासारख्या देशाचा मोहेंजोदडो - हडप्पा काळापासून मुसलमान आक्रमक भारतात येईपर्यंतच्या विशाल कालखंडाचा अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सरांनी या पुस्तकात मांडलाय. विशेषतः अतिशय तुटपुंज्या ऐतिहासिक साधनांची उपलब्धता आणि ऐतिहासिक काळापासूनच एकंदरीत भारतीय समाज इतिहासाविषयी आणि त्याच्या नोंदी करण्याविषयी उदासीन असताना परिश्रमपूर्वक, विविध संशोधनातील तुकडे जोडत जोडत, शक्य तेवढा एकसंध इतिहास मांडायचा हे फार महान काम आहे.
पुस्तक वाचल्यानंतर काही गोष्टी मांडाव्याशा वटतात. यामध्ये काही नवीन विचार मांडतोय असे नाही, केवळ नोंद घ्यावी एवढेच आहे. ज्याला रस असेल त्याने घ्यावे, नाही त्यांनी सोडून द्यावे.
1. भारतीय संस्कृती (सध्याच्या प्रचारकी अर्थाने हिंदू संस्कृती) फार महान होती, पुढारलेली होती, अतिप्रगत होती असे दावे आजचे अतिराष्ट्रवादी करतांना दिसतात. या विषयी असे म्हणता येईल की अध्यात्मिक विचार, तत्वज्ञान आणि आरोग्य (आयुर्वेद आणि योग) या क्षेत्रात भारतीय संस्कृती तत्कालीन जगाच्या तुलनेत नक्कीच महान होती, एवढेच ऐतिहासिक पुराव्यांवर मान्य करता येईल.
2. या व्यतिरिक्त विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत पुढारलेपणाचे, प्रगतीचे काहीच विशेष पुरावे सापडत नाहीत. धातूशास्त्र महान होते आणि अशोक स्तंभ अजूनही न गंजता (२३०० वर्षे) उभा आहे हे जरी खरे असले तरी ती धातुविद्या इतरत्र कुठेही दिसत नाही, आढळून येत नाही, पुढे अजून प्रगत झाली नाही अथवा कोणतेही लिखित पुरावेही नाहीत. या उलट अधिक चांगल्या धातूंच्या शस्त्रास्त्रांनी युक्त परकीय आक्रमकांनी हलक्या धातूंच्या शस्त्रास्त्रांनी लढणाऱ्या भारतीयांचा पराभव केला असाच मागील बाराशे वर्षांचा इतिहास आहे.
3. मुसलमान आक्रमकांनी सगळे ज्ञान नष्ट केले असे सांगितले जाते. तरीही सदर आक्रमणाच्या आधीच्या महत्वाच्या विद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची तपशीलवार माहित अनेक ग्रंथात उपलब्ध आहे, त्यामध्येही महान ज्ञानाचे पुरावे सापडत नाहीत. मूळ संस्कृत ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित होत होते आणि शेकडो वर्षे दक्षिण भारतात आणि जावा सुमात्रा वैगेरे पूर्व आशियात नेले जात त्यामध्ये देखील असे पुरावे सापडत नाहीत.
4. आधुनिक शास्त्रांपैकी खगोल आणि गणित एवढीच महत्वाची शास्त्रे शिकवली जायची (आयुर्वेद सुद्धा). परंतु मानवी जीवन ज्या क्रांतिकारी शोधांमुळे झपाट्याने मध्ययुगातून आधुनिक युगात प्रगत झाले त्या वाफेचे इंजिन, वीज, भौतिकशास्त्र, यंत्रशास्त्र, जंतूसंसर्ग आणि आरोग्य शास्त्र यांचा भारताला ना तेव्हा शोध लागला होता ना नंतर लागला. बाकी महान ज्ञानाचे इतर सर्व विषय म्हणजे वेद-पुराणे-उपनिषदे-महाकाव्ये-मीमांसा, धर्मचर्चा, वेदपाठशाळेतील शिक्षण आणि थोडे भाषा व्याकरण आणि कला विषय एवढेच होते.
5. तक्षशिला हे वैदिक धर्माचे मोठे विद्यापीठ आणि ग्रंथालय होते (सध्याच्या पाकिस्तानात) आणि ते हुण आक्रमकांनी नष्ट केले, मुसलमानांनी नाही.
6. नालंदा हे बौद्ध धर्म आणि तत्वज्ञानाचे विद्यापीठ होते, वैदिक हिंदूंचे नव्हे. ते मुसलमान (बखत्यार खिलजी) आक्रमकांनी नष्ट केले, जाळून टाकले.
7. भारतीय संस्कृतीवर बौद्ध धर्माचा आणि बौद्ध तत्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव आहे. किंबहुना सध्याची भारतीय म्हणवली जाणारी संस्कृती ही वैदिक, इस्लाम, जैन आणि बौद्ध संस्कृतीचा मिलाफ आहे.
8. शिल्लक प्राचीन मंदिरे, धर्म, चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्था एवढेच आपल्या महान संस्कृतीचे अवशेष आज शिल्लक आहेत.
9. महानतेचा केवळ बाता करत राहणे ही स्वतःशीच नव्हे तर राष्ट्राशी केलेली प्रतारणा आहे. तुटपुंज्या, क्षूद्र आणि तात्कालिक स्वार्थासाठी असा प्रचार करत रहाणे म्हणजे पुढच्या पिढीची ठरवून केलेली दिशाभूल आहे, फसवणूक आहे. या उलट खरे मानवतावादी आचार-विचार काय, त्यापैकी आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला कुठे जायचे आहे याची जाणीव पुढील पिढीला करून देणे जास्त महत्वाचे वाटते.
PS: - बाकी सर्व राजवंश आणि घराण्यांचा तपशीलवार इतिहास पुस्तकात आहे पण ज्या 'भोज राजाने' महाराष्ट्रातील सगळे किल्ले बांधले असे सांगितले जाते त्याचा मात्र कुठेच उल्लेख नाही हे खटकते.
प्रतिक्रिया
19 Feb 2017 - 1:44 pm | कंजूस
वृत्तीही बदलायला हवी. सगळ्या गुंफा पांडवांनी बांधल्या असं जेव्हा जवळपासचे गाववाले सांगतात तेव्हा त्यांची चूक सांगायला हवी.
19 Feb 2017 - 6:57 pm | शशिकांत ओक
पांडवांच्या, रामाच्या नावे अनेक ठिकाणे निर्माण झाली.. असे अतिशयोक्तीपूर्ण दावे करून पर्यटकांना इंप्रेस करायची हौस!
19 Feb 2017 - 5:20 pm | माहितगार
मी सदर पुस्तक वाचलेले नाही त्या शिवाय धागा लेखक विशीष्ट दृष्तीकोणाचा पाठपुरावा करणारे असून त्यांनी पुस्तकातील भाग निवडक पद्धतीने मांडले आहेत का त्या बद्दलही कल्पना नाही जे काही असेल ते असो, पण उपरोक्त विधानातून काही निस्टत नाही आहे ना ?
सकाळी किंवा विशेष प्रसंगी घरा पुढे काढलेली रांगोळी आहे, रांगोळी काढणे या कृत्याला संकुचितपणात बांधणे संकुचितपणा होणार नाही का ? रांगोळी एक उदाहरण म्हणून दिले काही सासंकृतीक खुणा काळा सोबत मागे पडतात नव्या येतात ती काळाची महती असते.
घरात सुन पहिल्यांदा येते तेव्हा घराच्या उंबरठ्यावर धान्याने भरलेला कलश पायाने उधळण्यास सांगितले जाते, सांस्कृतीक खूण आहे, अगदिच खोडी काढायची झाली तर धान्याची नासाडी म्हणून टाहो फोडता येऊ शकतो, पण घरात नव्याने पदार्पण करणार्या व्यक्तिकडून कळत न कळत काही सांडले जाईल तरी सुद्धा येणार्या नव्या व्यक्तिला तिच्या चुकांसहीत सामावून घेतले पाहीजे हा चांगला संकेत/संदेश या सांस्कृतीक परंपरेतून जातो. हि सुद्धा आमची संस्कृती नाही का ?
पोळ्याच्या दिवशी अॅटॉरी़षावाले आपापल्या रिक्षांना धुऊन फुलांच्या माळांनी सजवताता ही आमच्या संस्कृतीत परिवर्तन होतानाही शिल्लक असलेली खूण नाही का ?
आत्ता विवाद्य होऊ शकणार नाहीत असे जेवढे सांस्कृतीक पुरावे सुचले तेवढे उदाहरणा दाखल दिले. विशीष्ट संस्कृतीवर टिका करायची म्हणून त्यातले सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असे काही नसावे विवेकाची गरज असावी विवेक सुटलेल्यांवर अविवेकी टिका करतात ते टिकाकारही अविवेकाच्या रिंगणात असू शकतात किंवा कसे?
21 Feb 2017 - 5:20 pm | दिगोचि
सुनेने उधळल्या धान्याच्या कलशातुन सान्डलेले धान्य हे सासूने भरायचे असते अशि वर सान्गितलेल्या परम्परेची सान्गता आहे. याचा अर्थ सुनेची चुक सासुने सुधारायची असते. हे किती सासवा करतात?
21 Feb 2017 - 4:04 am | सचु कुळकर्णी
जब झिरो दिया मेरे भारत ने...भारत ने मेरे भारत ने.... हे गाण ऐकलय का हो ताम्हनकर ? आर्यभट्ट हे नाव ऐकलय का....नाहि नाहि मि कुठलेहि व्हॉट्सॅपिय दाव्यांबद्द्ल नाहि बोलत आहे...म्हणण एव्हढच आहे कि तुम्हि एक पुस्तक वाचुन जे कमि लेखताय तसे करु नका.
21 Feb 2017 - 11:08 pm | सागर
संस्कृत ग्रंथ हे प्रामुख्याने प्राकृतावरून अनुवाद केलेले आहेत. उदाहरणार्थ बृहत्कथा ... सिंहासन बत्तीशी... गाथा सप्तशती
हे पुस्तक अलिकडेच घेतले आहे. वाचून भाष्य करणे अधिक संयुक्तिक होईल
21 Feb 2017 - 11:08 pm | सागर
संस्कृत ग्रंथ हे प्रामुख्याने प्राकृतावरून अनुवाद केलेले आहेत. उदाहरणार्थ बृहत्कथा ... सिंहासन बत्तीशी... गाथा सप्तशती
हे पुस्तक अलिकडेच घेतले आहे. वाचून भाष्य करणे अधिक संयुक्तिक होईल
21 Feb 2017 - 11:09 pm | सागर
संस्कृत ग्रंथ हे प्रामुख्याने प्राकृतावरून अनुवाद केलेले आहेत. उदाहरणार्थ बृहत्कथा ... सिंहासन बत्तीशी... गाथा सप्तशती
हे पुस्तक अलिकडेच घेतले आहे. वाचून भाष्य करणे अधिक संयुक्तिक होईल
22 Feb 2017 - 12:39 am | गामा पैलवान
संदीप ताम्हनकर ,
Who the buck told you all that crap?
भारद्वाजऋषींनी लिहिलेल्या विमानविद्येच्या ग्रंथानुसार श्री. शास्त्री नामक धातुशास्त्रज्ञाने संशोधन करून अनेक स्वामित्वाधिकार (पेटंट) मिळवले आहेत. अधिक माहिती : http://theinnerworld.in/spirituality/vedic-pathshala/the-vedic-nanotechn...
डॉक्टर शास्त्री यांच्याविषयी : http://www.srivt.org/abssastry.php
डॉक्टर शास्त्री चालवत असलेली धातुशाळा : http://www.aarshadhaatu.com/
डोळे उघडे ठेऊन वेद वाचणाऱ्यांना भरपूर काही सापडतं, असा सार्वत्रिक अनुभव आहे.
आ.न.,
-गा.पै.
22 Feb 2017 - 3:46 am | आषाढ_दर्द_गाणे
छान हसवलेत!
धन्यवाद!
22 Feb 2017 - 11:18 am | डँबिस००७
===== बाकी सर्व राजवंश आणि घराण्यांचा तपशीलवार इतिहास पुस्तकात आहे पण ज्या 'भोज राजाने' महाराष्ट्रातील सगळे किल्ले बांधले असे सांगितले जाते त्याचा मात्र कुठेच उल्लेख नाही हे खटकते. ======
भोज राजाने किल्ले बांधले असे सांगीतले जाते !! जर सरांनी पुस्तकात किल्ल्या बद्दल, भोज राजा बद्दल लिहीले नाही मग त्यावर अविश्वास ? बात कुछ हजम नाही हुई !!
;-)
22 Feb 2017 - 3:19 pm | llपुण्याचे पेशवेll
1. भारतीय संस्कृती (सध्याच्या प्रचारकी अर्थाने हिंदू संस्कृती) फार महान होती, पुढारलेली होती, अतिप्रगत होती असे दावे आजचे अतिराष्ट्रवादी करतांना दिसतात. या विषयी असे म्हणता येईल की अध्यात्मिक विचार, तत्वज्ञान आणि आरोग्य (आयुर्वेद आणि योग) या क्षेत्रात भारतीय संस्कृती तत्कालीन जगाच्या तुलनेत नक्कीच महान होती, एवढेच ऐतिहासिक पुराव्यांवर मान्य करता येईल.
तुटपुंजी साधने असे म्हटले आहे म्हणजे आधी उपलब्ध साधने कमी असणे म्हणजेच सगळ्या विषयांचा स अंग उपांग अभ्यास् करण्यास आवश्यक साहित्य नसणे असा आहे. असे असताना येवढेच 'उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवरून मान्य करता येईल' असे म्हणणे उचित. बाकी अकारण अतिराष्ट्रवादी वगैरे वाचल्यावर कल लक्षात आल्याने सगळी मते सिरियस्ली घेतलीच नाहीयेत.
बाकी आमची संस्कृती होतीच श्रेष्ठ आणि कुठलीहि संस्कृती चक्रनेमीक्रमेण उर्जितावस्था आणि विपन्नावस्था अनुभवतच असते. त्यामुळे आमची संस्कृती थोर होती हे मानण्या न मानण्याकरिता या लेखनाचा उपयोग तसाही शून्यच आहे.