आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? आम्ही असू लाडके-
"श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया
पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया
दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके //
सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे
हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया
अस्थैर्यातिशया अशी वसंतसे जादू करा॑माजि या
पोटार्थी प्रति-सूर्य पाळु पदरी - सत्तेपुढे जे फिके //
सत्तेमाजि वसाहती वसविल्या गु॓डा॑च्या कोणी बरे?
सत्तेला घरची मिरास करण्या सा॑गा झटे कोण ते?
ते आम्हीच, क्षुधा अनन्त अमुची - मरणोत्तरेही उरे
ते आम्हीच, दरिद्र-दैन्य तुमचे ज्या॑पासुनी जन्मते//
आम्हाला निवडा, पुनश्च फ़ुगवू आम्ही स्वतःचे खिसे,
आम्हाला निवडा- पुनश्च उडवू "डेमॉक्रसी"चे हसे //
प्रतिक्रिया
19 Feb 2017 - 8:26 pm | अनन्त्_यात्री
दुसऱ्या ओळीत एक सुधारणा - टायपो बद्दल वाचकांनी क्षमा करावी
"श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावाया
20 Feb 2017 - 7:46 am | माहितगार
=)) सुरेख ! :)
20 Feb 2017 - 9:32 am | पैसा
मस्त लिहिलंय!
21 Feb 2017 - 7:10 am | अत्रुप्त आत्मा
जबराट!
21 Feb 2017 - 7:23 am | एस
झेंडूचं हे फूल आवडलं. भलतंच सुगंधी आहे! ;-)
22 Feb 2017 - 9:52 am | अनन्त्_यात्री
माहितगार, पैसा, आत्मबन्ध, एस....धन्यवाद!