arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2017 - 4:41 pm | arunjoshi123
मी ब्रिगेडच्या अभिमानी वा अनुयायी नाही असं मी पहिल्याच प्रतिसादात लिहिलं आहे. त्यांच्या काही कृतींना माझं समर्थन आहे.
================
बीजेपीसारख्या तथाकथित ब्राह्मणप्रेमी, हिंदूप्रेमी पक्षानं खेडेकरांच्या पत्नीस २-३ दा आमदार केलेले. मी त्यापेक्षा तरी कमीच समर्थन करत आहे.
6 Feb 2017 - 4:50 pm | बॅटमॅन
ब्रिगेडच्या कुठल्या कृतीला समर्थन आहे?
बाकी बीजेपी आणि एनसीपी, ब्रिगेड इ. तळ्यातमळ्यात चालू आहेच, पण तुमच्यासारखे सरळ मनाचे लोक अशा कोलांट्या घेऊ लागले की अंमळ रोचक वाटते. लिबरलांना श्या घालता घालता तुम्हीही तेच बनून गेलेला आहात.
6 Feb 2017 - 5:06 pm | हतोळकरांचा प्रसाद
हे आणि
हे विरोधाभासी होतंय का?
6 Feb 2017 - 6:15 pm | arunjoshi123
तसं दिसतंय खरं. पहिल्या वाक्यात जेम्स लेन्सची चर्चा चालू होती. दुसर्या वाक्यात "जनरली" मी कै त्यांचा सक्रीय इ इ माणूस (मलाही मोप कामं आहेत )नाही असं म्हणायचं आहे.
6 Feb 2017 - 11:28 am | संदीप डांगे
इतके मेगाबायटी झाले पण अजूनही 'ब्राह्मण हे सर्वात राष्ट्रवादी' याची सेंट्रल आयिड्या काय मिळाली नाही, अजो इज जस्ट बिटिंग अराऊंड बुशेस! :-)
6 Feb 2017 - 11:42 am | arunjoshi123
डांगे अण्णा, धागा तुम्हीच काढला आहे आणि धाग्याचा विषय काय आहे याची कल्पना देखिल तुम्हाला दिसत नाही.
=================
ब्राह्मण "सर्वात ....." हे सिद्ध करा असं मला कोणी म्हटलंच नाही. मी तसं म्हणायचं आहे का म्हणून एकाला विचारलं देखिल आहे.
==========
मी ब्राह्मण "सर्वात ..." असं लिहिणं उचित कि अनुचित , हा विषय घेणं, मांडणं, अश्या म्हणण्याला अर्थ असणं नसणं, याचे परिणाम, इ इ विषय आहे.
=============
माझ्या आणि गॅरि ट्रुमन यांच्या प्रतिसादांत सेंट्रल आयडीया पण चर्चून झालीय. राष्ट्रवादीपणाचा निकष फार आखून मांडता येत नाहीत, त्यातून अर्थाचा अनर्थ होतो असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच माझं म्हणणं विपरित आहे.
6 Feb 2017 - 5:17 pm | पैसा
हहपुवा! एव्हाना संदीप डांगे विसरला असणार की धाग्यात आपण काय लिहिले होते. हा धागासुद्धा मिपा इतिहासात अजरामर होणार आहे! =))
6 Feb 2017 - 5:34 pm | गॅरी ट्रुमन
हो ना. सुरवात ब्राह्मणांपासून झाली. मग गाडी देशद्रोहावर घसरली. त्यानंतर आता ब्रिगेडवर. यापुढे कशावर गाडी जाईल काय माहित!!
6 Feb 2017 - 5:46 pm | बॅटमॅन
अरुणजोशी असले तर गाडी कुठेही जाऊ शकते.
6 Feb 2017 - 6:08 pm | संदीप डांगे
हा हा हा! असं आहे होय? असो.... :-)
जाउद्या! मी सध्या साबणाचे फुगे उडतांना बघत आहे... वरच्या वर हवेत उडतांना किती छान दिसतात ना! कशावर बसायला गेले टचकन अदृश्य होऊन जातात...
6 Feb 2017 - 6:24 pm | arunjoshi123
आणि याचा मला अभिमान आहे. माणसाने स्वच्छंदी गप्पा माराव्या. विषयांचे कोंडवाडे तयार करणारी मंडळी जगाला अर्धी कच्ची खिचडी खाऊ घालतात आणि उन्मत्तपणा वाढतो.
======
तरीही, चर्चिलेले सारे विषय संबंधित आहेत.
===============
मिसळपावर जोशी आडनावाच्या माणसाने "ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी आहेत" असे म्हटल्यामुळे ब्रिगेडी विचारसरणीचे लोक मिसळपावचे सर्वर जाळून टाकतील, अरुण जोशींना हार्म करतील वा कोण्या असंबंधित ब्राह्मणाला त्रास देतील असे मानणारे लोक सदस्य आहेत याची नोंद घेत डांगे अण्णांनी अजून धागे (अख्खा सुतळीचा गठठा) काढायलाच पागठठा) अशी मागणी मी या निमित्ताने करतो.
6 Feb 2017 - 6:49 pm | बॅटमॅन
मूर्खपणाचा इतका कट्टर अभिमान विरळाच.
6 Feb 2017 - 7:55 pm | arunjoshi123
काहीही न वाचता, कळून न घेता समोरच्यास मूर्ख मानणे ही एक सुप्रमॅसिस्ट टेंडेन्सी आहे. चर्चा कोठून, कोण्या संदर्भात सुरु झाली आहे याची माहिती घ्या अशी विनंती.
========================
"ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी ..." हे विधान चूकच असेल, चूकच निघणार असेल तर मागे घेत आहे असं मी फार पूर्वी (अगदी आरंभीच) लिहिलं आहे, ते आपण वाचलं नसण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला वाटणारं असं विधान अगदी निक्षून टाळलंच पाहिजे असं का, त्याचा फक्त वाईटच अर्थ होता का इ इ चर्चा होताना तुम्ही भाग घेतला नाही.
==============
अॅनि वे, मूर्खांना फार महत्त्व देत नाहीत तर ती कृपा आपण माझ्यावर कराल तर आभारी असेन.
6 Feb 2017 - 7:01 pm | माहितगार
6 Feb 2017 - 7:57 pm | arunjoshi123
विषयाची चर्चा सर्वांगिण व्हावी. ती न झाल्यास लोक एककल्ली विचार करतात. दोन्ही बाजूच्या चांगल्या वाईट गोष्टी कळल्या तर उन्माद कमी राहतो.
6 Feb 2017 - 7:06 pm | बॅटमॅन
चार लोक जमाव घेऊन येतील म्हणून चूक नव्हे तर हे मत मुळातच चूक आहे. ते इतके चूक आहे की उपमा देववत नाही. असली अडाण** विधाने करण्याचा अभिमान बाकी रोचक आहे.
ब्रिगेडला पाठिंबा म्हणजे उन्मत्त जातीयवादाला पाठिंबा. लिबरलांच्या अर्धकच्च्या खिचडीचा हवाला देणार्यांची खिचडी पार करपून काळवंडलेली आहे.
शिवाय ब्राह्मण सुप्रीमसिस्ट वृत्तीचा निषेध.
6 Feb 2017 - 8:07 pm | arunjoshi123
मोर्चात शेवटी शेवटी घुसुन (विषयाची कल्पना नसताना) घोषणा देणे ही वृत्ती मी समजू शकतो. माझ्या विधानाला पार्शल सहमती काही प्रतिसादकांनी दाखवली आहे. गोरखे सर्वात विश्वासू सैनिक असतात असं माझं पुढचं विधान आहे आणि अरुण जोशी "गोरखा सुप्रिमॅसिस्ट आहे" अशा आपल्या आरोपाचा मला स्वीकार आहे.
6 Feb 2017 - 8:17 pm | arunjoshi123
कोणत्याही विषयावर शांतपणे आणि सन्मानाने चर्चा करणार्या सदस्यांमुळे मिसळपावची शोभा वाढणारच आहे. संदीप डांगे (ज्यांचा प्रखर रडार आमच्या विधानावर पडला) धरून ५-६ सदस्यांनी विषयाच्या विविध पैलूंवर काहीही हंगामा न करता अतिशय स्तुत्य अशी चर्चा केली आहे.
---------------
या चर्चेतून काही निघालं नाही असं बर्याच लोकांना वाटलं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी अशा विधानावर शांतपणे चर्चा झाली, होउ शकते हा खूप मोठा निष्कर्श आहे. आपण मिपाकर किती स्पोर्ट आहोत हे कळणं कमी नाही.
----------------------------
अॅनि वे, तुम्हा सर्वांना मी माझी पोझिशन अवाजवी रित्या खेचून घरतोय असं वाटतंय. म्हणून मी सर्वांच्या आग्रहाखातर इथे थांबतो. चांगल्या गोष्टीचा पण अतिरेक टाळावा मग संदिग्ध गोष्टीचा तर अवश्यच!!
6 Feb 2017 - 8:25 pm | संदीप डांगे
धन्यवाद! मी परत सवडीने सर्व प्रतिसाद वाचेन (अर्थात जमलं तर) आणि आपल्याशी अशीच चर्चा पुन्हा करेन.. संयत चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद!
6 Feb 2017 - 8:57 pm | arunjoshi123
डांगे साहेब, खास तुमच्यासाठी - मी माझी मते बदलत आहे.
१. ब्राह्मण सर्वात प्रखर देशभक्त जात आहे असे विधान करणे चूक आहे.
२. ब्राह्मण सर्वात प्रखर देशभक्त जात आहे हे विधान चूक आहे.
---------
आप भी क्या याद रखोगे.
6 Feb 2017 - 8:25 pm | माहितगार
अजो थांबू नका थांबू नका, मी तर आताशीक सुरवात करतोय तुम्हीच नसाल तर चर्चा कुणाशी करणार ?
6 Feb 2017 - 8:23 pm | माहितगार
अजो, सर्व चांगल्या गोष्टी सर्वांमध्ये असावयास काय हरकत आहे, सर्वांनीच राष्ट्रभक्ती, विश्वासूपणा शक्यतोवर वचनपालन करावे, त्यास समुह विशेषाचे नरेटीव्ह लावण्यातून त्या समुहाचे घटक आपल्या कथित वैशिष्ट्यासाठी प्रयत्न करतील नाही असे नाही; पण सर्वच मानवांमध्ये सर्व चांगल्या गोष्टी ग्रहण करण्याचे पोटेंशीअल आहे हे अधिक सार्वत्रिक नरेटीव्ह का देऊ नये ?
6 Feb 2017 - 8:53 pm | arunjoshi123
हे कोणाला अमान्य असायचं कारणच नाही. योग्य पोषण, योग्य वातावरण , योग्य नशीब इ इ मिळाले कोणताही मानवसमूह (किंवा पृथ्वीवरची पूर्ण मानवजात) कितीतरी चांगल्या गोष्टी ग्रहण करेल.
=================
परंतु संभावनेचे वर्णन आणि परिस्थितीचे वर्णन या वेगळ्या गोष्टी आहेत. जपानी लोक सर्वाधिक निष्ठेने आपले काम करतात असे आपण म्हणतो. हे कल्चर अन्यत्र येऊ शकते हे मानले तरी आज जे आहे ते आहेच. जैन लोक दलितांपेक्षा खूप जास्त शिकलेले आहेत (भारतात सर्वात जास्त शिकलेले आहेत इ इ) आणि मुस्लिम लोक सर्वात कमी शिकलेले आहेत ही विधाने जातीवाचक नाहीत. http://www.thehindu.com/news/national/Muslims-least-Jains-most-literate-...
==========================
इंटेरेस्टिंगली, मला एन आर आय लोकांचा बर्यापैकी मत्सर आहे. त्याला मी मधे मधे देशप्रेमाची झालर द्यायचा प्रयत्न करत असतो. (एक महत्त्वहिन, तसेच काहींच्या मते मूर्ख मनुष्य असल्याने ही विधाने कोणी रडारावर आणू नयेत अशी विनंती.) खूप जास्त शिक्षित लोक देश सोडणे ( कधीच भारतात परत न येणारे म्हणतोय मी.) म्हणजे नेहमी बिनासायीचे दूध घेतल्यासारखे असते. माझ्या मते त्यांच्या अभावाने देशाचे होणारे नुकसान देशद्रोहाइतके जास्त असते. (निष्कारण फार हार्ड शब्द वापरला आहे. आय नो.) हे कमी कि काय म्हणून हे लोक तिथून भारताच्या सामाजिक नको त्या दिशेने प्रभाव टाकतात. एन आर आय मधे ब्राह्मण फार असतात. उद्या हा प्रकार अति ला पोचला तर आणि लिबरलांचा उपद्रव असह्य झाला तर मी माझे विधान फिरवून डायल्यूट वा उलटे करू शकतो.
6 Feb 2017 - 9:41 pm | संदीप डांगे
जैन लोक दलितांपेक्षा खूप जास्त शिकलेले आहेत (भारतात सर्वात जास्त शिकलेले आहेत इ इ) आणि मुस्लिम लोक सर्वात कमी शिकलेले आहेत ही विधाने जातीवाचक नाहीत.
>> बरोबर कारण ती 'जातीनिहाय वस्तुनिष्ठ आकडेवारी' आहे. 'जातीयवादी सुपरइम्पोझ्ड भावना' नाही. ब्राह्मण हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी असल्याचा काही सर्वे इत्यादी झाला असल्यास आकडेवारी लागेल. जसे जापानी सर्वाधिक निष्ठेने काम करतात असे म्हणणे सुपरफिशियल आहे.... कामाच्या बाबतीत निष्ठामापक चाचण्या घेतल्याचे माहिती नाही.
आपल्या धरतीतले उदाहरण दिले तर जास्त चांगले समजेल. सामान्यपणे मुंबईत भैय्या लोक (युपि-बिहारी) जास्त वेळ, कमी पैशात, भयंकर मेहनतीची कामे करण्यात सर्वोत्तम आहेत. व तीच कामे करण्यास मराठी मुले कचखाऊ. आता बघितले तर ह्यात भैय्या लोकांचे काही विशेष गुण किंवा मराठी मुलांचे काही अवगुण नाहीत. ते सर्व संधींची व पर्यायांची उपलब्धता यावर अवलंबून आहे. बिहारीला दुसरा पर्याय नाही म्हणून जे आहे जितके आहे तितक्यात काम करावेच लागते, ही वेळ मुंबईतल्या मराठी मुलांवर येत नाही. हा स्वभावविशेष नीट बघितला तर परिस्थितीजन्य आहे, कुठल्या जाती,भूभागाचा विशिष्ट गुण नव्हे. म्हणून 'अन्यत्र सिद्ध झालेले परिस्थितीजन्य तथ्य' आपल्या प्रखर राष्ट्रवादी ह्या विधानास पुरावा किंवा आधार म्हणून वापरले जाऊ शकत नाहीत. आपल्या विधानासाठी विशेष पुरावा लागेल.
6 Feb 2017 - 10:47 pm | arunjoshi123
https://brahminsexposed.wordpress.com/2016/01/17/list-of-brahmins-those-...
आता मी जे विधान केलं आहे ते करण्यापूर्वी मी सर्वे केलेला नाही. किंवा जी मी विधानं करतो त्या प्रत्येक विधानासाठी मी सर्वे करत नाहीत. जनरल माहिती वापरतो. वरच्या लिंकेत फक्त प्रसिद्ध लोकांचा विदा आहे. त्यात देशभक्त कोण (अर्हता १-०) हे तुम्हीच ठरवा. आणि ० ते १०० (स्कोर) च्या स्केलवर किती प्रखर ते लिहा. (मला मान्य असेल.). आपण टोटल स्कोअर काढू. तुम्हाला काय अॅड करायचं तर करा. प्रखर देशभक्तीचा काय संबंध असे वाटल्यास सरळ अर्हता ० घ्या.
जे नेत्यांचे ते लोकांचे असे आपण मानू.
आता समांतर दुसरी जातीची लिस्ट (जात अ) जी ब्राह्मणांपेक्षा (जात ब) जास्त प्रखर आणि प्रमाणात आहे त्याची लिस्ट तुम्ही द्या. त्याचं पण स्कोरींग तुम्ही केलेलं मला चालेल.
समजा जात अ चे टोटल क्ष आले आणि जात ब चे टोटल य आले तर --(त्यांची लोकसंख्या अ% आणि ब्राह्मण ब% आहेत समजून -
य आणि क्ष*अ%/ब% यांची तुलना करा/करू.
-----------------------
मेथडमधे काय दुरुस्ती सांगायची असेल तर सांगा. दुसरी मेथड सांगायची असेल तर सांगा.
--------------------
बॅक ऑफ द ऑन्वलप कॅल्क्यूलेशन्स केली तर असा ब्राह्मण सर्वात राष्ट्रप्रेमी, इ इ ठरतात असे वाटते.
------------
मी काय अस्ले प्रकार करत नै. पण आजकाल वस्तुनिष्ठतेचा आडोसा धरून पोलिटिकली करेक्ट राहायचे म्हटले तर या पद्धतीला पण १०० चूका काढून धुडकावून लावायला येते.
6 Feb 2017 - 11:26 pm | संदीप डांगे
सॉरी टू से.. पण असले फडतूस, बिनकामी सर्वे करायचेच कशाला? काय सिद्ध होते त्याने, त्याचा उपयोग काय?
येस. करेक्ट. आता खरा आणि 'सर्वात' महत्त्वाचा प्रश्न.... ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी आहेत हे सिद्ध केल्याने, मानल्याने, प्रसारित केल्याने नेमका काय परिणाम अपेक्षित आहे, उपयोग अपेक्षित आहे?
जपानी सर्वाधिक निष्ठेने काम करतात म्हणून मी सगळ्या जगातले देश सोडून जपान्यांना काम देईल, भैय्या लोक कमी पैशात जास्त काम करतात म्हणून इतर सर्वांना डावलून त्यांना काम देईन... गुरखे सुरक्षाव्यवस्थेत अव्वल आहेत म्हणून मी सुरक्षा त्यांचे हवाले करेन.... सो आता ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी आहेत असे सिद्ध झाल्याने (तूर्तास मानूया) काय केले पाहिजे ह्या सर्वात प्रखर राष्ट्रवादींचे..... ?
8 Feb 2017 - 6:46 pm | arunjoshi123
धन्यवाद.
१. ब्राह्मणविरहित नविन द्रविडस्तान बनवणे,
२. ब्राह्मणांना तेथून विस्थापित करणे
या कार्यवाही रोखण्यासाठी या सिद्धतेचा उपयोग करावा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आवश्यक वाटल्यास........
३. लोकांनी पेरियारचा अनुनय करू नये याची व्यवस्था करण्यास करावा.
=========================================
संदीप डांगे यांची मानसिक स्थित्यंतरे - (ब्राह्मण सर्वात राष्ट्रभक्त...)
१. असा विचारच करू नये.
२. या वाक्याचे लॉजिक चूक आहे.
२. हे विधान सिद्ध करता येत नाही.
३. या विधानाचा उपयोग काय?
पुढचा विचार अध्यात्मिक प्रतलावरचा मांडणार वाटतं डांगे साहेब....
8 Feb 2017 - 7:42 pm | संदीप डांगे
>> ओ नो!! ;-)
>> हा धागा ह्या चारही विधानांच्या एकत्रित उहापोहासाठी आहे. ही स्थित्यंतरे नव्हेत, विचारांच्या बाजू आहेत. सर्व बाजूंनी विचार करणे माझ्यालेखी महत्त्वाचे, काही लोक एकाच दिशेने विचार करतात आणि रेटतात, ते मला काही जमत नाही.
>> नो चान्स ब्रो! इट्स इनफ फार द डे! =))
8 Feb 2017 - 8:34 pm | arunjoshi123
व्हेरी हॅपि टू सी द वर्ड ब्रो हेअर.