arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
प्रतिक्रिया
1 Feb 2017 - 3:34 pm | चिनार
संदीपभाऊ...त्याच्यातही आधी चित्पावन,मग देशस्थ,यजुर्वेदी,ऋग्वेदी अशी उतरती क्रमवारी केली नाही हे नशीब समजा की राव!!
1 Feb 2017 - 3:42 pm | संदीप डांगे
हायला!! खरंच की....
1 Feb 2017 - 3:53 pm | चिनार
तुम्हाला मुळी कश्या कश्याच म्हणून कौतुक नाही...
आले लगे त्रिशतकी धागा घेऊन...
1 Feb 2017 - 5:16 pm | arunjoshi123
कौतुकबुद्धी असलेला एक पुरे.
1 Feb 2017 - 5:15 pm | arunjoshi123
चला, आता ती उणिव भरून काढतो. माझ्यामते कोकणस्थ (चित्पावन? सारस्वत? लै घोळै राव) ब्राह्मण हे त्यातल्या त्यात सर्वात प्रखर राष्ट्रवादी असतात.
2 Feb 2017 - 10:58 am | अप्पा जोगळेकर
माझ्या मते कोकणास्थांमध्ये अरुण जोशी हेच तकोकणास्थांमध्येप्रखर राष्ट्रवादी असतात. बाकी सगळे पानी कम आहेत.
1 Feb 2017 - 3:56 pm | नितिन थत्ते
पंचाइत अशी आहे की आर्यांचे मूळ स्थान कुठेतरी आर्क्टिक भागात होते असं लोकमान्य म्हणाले.
एकतर "प्रत्यक्ष लोकमान्य चुकले" असं म्हणायला हवं नाहीतर इथे राहणारे -म्हणजे आपण सगळे- आर्य नाहीत असं म्हणायला हवं.
:)
1 Feb 2017 - 5:21 pm | arunjoshi123
सायबेरियामधल्या गुफांमधे जे फॉसिल्स मिळाले आहेत त्यामुळे "इथिओपियामूलम अन्यत्रशाखम" असा मानववंशशास्त्राचा वृक्ष उन्मळून पडला आहे. तेव्हा खोट्यारड्यांची लिस्ट बनवण्यासाठी थोडा दम धरा.
1 Feb 2017 - 4:26 pm | विशुमित
<<<<ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.>>>
-- विशेष म्हणजे ह्या प्रतिक्रियेला जातीने ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरानी (बऱ्याच लोकांनी तसा उल्लेख केला आहे की मी जातीने ब्राह्मण आहे) बिलकुल आक्षेप घेतला नाही की तुटून पडले नाहीत. गडकरी पुतळा प्रकरणी सगळेच हताश होऊन व्हिक्टिम कार्ड खेळत होते. कालच्या मराठा चक्का जामचा अजून कोणी धागा काढला नाही हे नशीब.
जो पर्यंत असा सुलेमानी किडा वळवळत राहणार कथित सुशिक्षित लोकांना ब्रिगेडिंना हिणवायचा नैतिक अधिकार राहणार नाही. असो...
1 Feb 2017 - 4:52 pm | खेडूत
तिथे वाक्यरचना गंडली आहे. पूर्ण चर्चा वाचलीत तर लक्षात येईल की नंतरची दोन वाक्ये द्रविड किंवा अन्य कुणासाठीतरी आहेत.
मग कुणी कशाला तुटून पडेल?
1 Feb 2017 - 4:58 pm | फेदरवेट साहेब
घ्या समजून, एरवी जोशींच्या वक्तव्यात 'म रा ठा' असा शब्दही दिसून आलेला नसताना मधेच चक्काजामचे शेपूट जोडले की डांगेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बार काढताच येतो, कसं?
;)
1 Feb 2017 - 5:23 pm | विशुमित
कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे विधान मी केले नाही. मराठा मूक मोर्चा निमित्ताने भरभरून मराठा जातीचा माज उद्घृत करताना मजा घेणारे ह्या वेळेस पुढे नाही आले याचे आश्चर्य वाटले.
1 Feb 2017 - 5:26 pm | विशुमित
मी पूर्ण चर्चा तेव्हाच वाचली होती.
2 Feb 2017 - 12:59 pm | arunjoshi123
मेलो.
1 Feb 2017 - 6:22 pm | arunjoshi123
होय, संपूर्ण संदर्भाशिवाय हा धागा वाचणे चूक आहे.
=========
संदिप साहेबांच्या प्रश्नात वा धाग्यात कोणतीही "तांत्रिक" चूक नाही.
1 Feb 2017 - 5:57 pm | हतोळकरांचा प्रसाद
"ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते." या जोशींच्या वाक्याशी पूर्ण सहमत नाही. खासकरून "सर्वात" या शब्दाशी. पण, इथे ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरांनी ती प्रतिक्रिया वाचलीच होती हे तुमचे गृहीतक कशासाठी? शिवाय तुटून पडण्याचा काय संबंध? गडकरी पुतळा प्रकरण आणि ब्राम्हण याचा संबंध काय? त्या प्रकरणाला विरोध करणारे सगळेच जण ब्राम्हण होते असे आपल्याला म्हणायचे आहे का?
बाकी ते वरील वाक्य संदर्भविरहित दाखवून सोयीस्कर अर्थ काढला गेला आहे असे मला वाटते.
1 Feb 2017 - 6:26 pm | arunjoshi123
मंजे मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लिबरल थॉट्स, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, इ इ विषयांच्या बर्याच अस्पेक्टांबाबत फार कंफ्यूजने आहेत, पण तो सर्वात शब्द सर्वमान्य असावा असे मला अभिप्रेत नव्हते.
1 Feb 2017 - 6:12 pm | arunjoshi123
संदीप डांगे जातीने ब्राह्मण नाहीत सुस्पष्ट अर्थ या विधानावरून निघतो. माझ्यामते त्यांनी लै जबर्या आक्षेप घेतला आहे आणि तुटून पडले आहेत.
===============
का हो, यावर ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांची रिअॅक्शन वेगवगळी राहावी (किमान हिरीरी वेगळी राहावी) असे तुम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे लोकांना जातीची जातीने जाण आहे.
=============
मला अस्सं अजिबात लिहायची इच्छा नव्हती पण लिहितो. मराठी आंतरजालावर (वा कुठेही) असं लिहू नये वा लिहायला लागू नये. माझं राष्ट्रवादावर प्रेम पातळ आणि ब्राह्मणवादावर घट्ट असा अर्थ का काढला जातोय. "ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी" या फ्रेजचा अर्थ निगेटिवच असायला पाहिजे का? "भारत सर्वात महान" हे देखिल असंच क्षुद्र विचार करणं आहे का? हे नेसेसरीली निगेटेवच असतं का?
1 Feb 2017 - 6:27 pm | सूड
पॉझिटिव्ह अर्थ समजावून सांगा बरं?
2 Feb 2017 - 12:58 pm | arunjoshi123
"एवरेस्ट सगळ्यात उंच पर्वत शिखर" चा निगेटिव अर्थ सांगा तुम्ही.
2 Feb 2017 - 10:55 am | अप्पा जोगळेकर
म्हणजे ब्रिगेड वर टीका केली म्हणून सतत अरुण जोशींच्या लिखाणावर लक्ष ठेवत बसायचे असे आहे का काही ?
कैच्या कैच अपेक्षा आहे.
अरुण जोशी काहीबाही बाता मारत असतात बर्याचदा. तो त्यांच्या अजेंड्याचा भाग असावा.
पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये त्यांची जी दहशत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते.
2 Feb 2017 - 12:55 pm | arunjoshi123
कृतकृत्य झालो. जीवन सार्थकी लागलं. इ इ भाव उमाळून आले.
1 Feb 2017 - 4:41 pm | सूड
तुम्हाला ते लोक सुशिक्षित आहेत असं का वाटलं बुवा?
1 Feb 2017 - 4:58 pm | वरुण मोहिते
प्रश्न आहे . ते सुशिक्षित का वाटले याचे डांगे सरांनी पहिले उत्तर द्यावं :)))))
1 Feb 2017 - 6:29 pm | arunjoshi123
त्यांना असं वाटलं कारण डांगे सज्जन आहेत. त्यांना इतरांच्या अभिव्यक्तिचा सन्मान आहे. इतरांचे विचार सरळ आणि जमान्यास धरून असे सुयोग्य असायला हवेत अशी अपेक्षा/कळकळ (कैतरी) आहे. शिवाय त्यातली चूक दाखवायची खुमखुमी पण असेल.
नैतर तुमच्यासारखं नाही. "सर्वात"-वर-आपण-भाव.
1 Feb 2017 - 6:35 pm | सूड
अरे वा!! माझ्याबद्दल फारच लवकर निष्कर्षाप्रत पोचलात आपण. तस्मात आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. आपण लवकर मोठे व्हाल हीच त्या आकाशातल्या बापाचरणी प्रार्थना.
॥ इति लेखनसीमा ॥
1 Feb 2017 - 9:12 pm | arunjoshi123
सुरुवातीला असं होतं. म्हणजे लोक अशिक्षित आहेत असा निष्कर्ष काढायची आपली घाई पाहून ते विधान केले गेले होते. ते असो.
==========
तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर जरूर मांडा, मी सन्मानपूर्वक उत्तर देईन.
1 Feb 2017 - 4:55 pm | फेदरवेट साहेब
तुमचा बहुतेक 'सुशिक्षित' अन 'साक्षर' ह्या दोन संकल्पनांत गोंधळ उडालेला दिसतो आहे.
मनुष्य साक्षर असू शकतो मग तो फक्त नाव लिहू शकणारा ते पीएचडी सगळे काही असू शकतो. तो फक्त कमी जास्त अक्षरओळख असलेला एक साक्षर प्राणी असतो.
'सुशिक्षित' असणे हा एक चॉईस आहे म्हणजे पर्याय आहे, साक्षरतेला सुशिक्षिततेपर्यंत नेता न येणे ही खरी भारतीय शिक्षणपद्धतीची शोकांतिका आहे. अजून बोलण्यासारखे काही नाही.
जोशींना त्यांच्या अडनावावरून जोखण्याइतके हलके माझे संस्कार नाहीत, तरीही एक सेकंदभर मी जोशींचे वक्तव्य ग्राह्य धरतो की 'ब्राह्मण सर्वाधिक देशप्रेमी जमात होती'. मी अर्ध्या वक्तव्यावर परिस्थितीक सहमती दर्शवतोय. ब्राह्मण देशप्रेमी 'होतेच' कारण एकंदरीत आधीपासून राज्यसत्ता अबाधित राहणे किंवा राजाश्रय असणे ह्यावरच ब्राह्मणांचे अस्तित्व अन उपजीविका आधारित होती. आता राजाश्रय असायला राज्य सुस्थापित हवे. त्यामुळे राज्यनिष्ठा ह्या गुणाला थारा देणे सोडून ब्राह्मणांकडे पर्याय नव्हता. हे झाले प्राचीन. आधुनिक काळात फिरंगी जेव्हा भारतात आले तेव्हा सर्वप्रथम पाश्चात्य शिक्षणपद्धती अंगिकारणारा आद्य समाज म्हणजे ब्राह्मण समाज त्यामुळे साहजिकच आधुनिक राज्यशास्त्रातल्या राष्ट्र (नेशन स्टेट) अन राष्ट्रवाद (नॅशनलिझम) ह्या संकल्पनांना जेव्हा ब्राह्मण समजून घेत होते किंवा त्यांना समजून घ्यायचा मौका मिळत होता तेव्हा बरीच जनता गावकुसाबाहेर राहायला भाग होती. आज जेव्हा शिक्षण खुले झाले आहे तेव्हा सगळे समसमान येत आहेत. अश्या काळात जर आधी ब्राह्मण देशभक्त होते म्हणले तर पटायला हरकत नाही (ते ही त्या काळी ब्राह्मणांना वाढीव संधी होत्या हे ध्यानात ठेवुन) पण जर आजही ब्राह्मणच सर्वात जास्त देशभक्त आहेत(च) असे कोणी म्हणत असले तर नारायणदत्त तिवारी नाव असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व कसली देशभक्ती दर्शवते? असा प्रश्न विचारवा वाटतो.
1 Feb 2017 - 7:05 pm | arunjoshi123
प्रथमतः इतक्या चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी देखिल डिट्टो हेच विचार मांडलेत (अन्यायी व्यवस्था चालू ठेवणे म्हणजे राष्ट्रवाद अशी वेगळी फोडणी मी दिली आहे, पण म्हणायचं तेच आहे.)
राष्ट्रवाद हा अंततः सामाजिक , आर्थिक, इ इ स्वार्थांतून प्रेरित होतो का? मंजे मागे ब्राह्मणांचे प्रभुत्व होते नि स्वार्थ होता म्हणून ते सर्वात राष्ट्रवादी? मग आज अब्राह्मणी जातींचा जो राष्ट्रवाद आहे तो देखिल स्वार्थप्रेरित आहे?
मला वाटतं परिस्थीत काही फरक नाही. उलट हा देशच नाही (बल्कि आप पुरुषही नही हो टाईप), तो उगाच बनवला आहे, त्याच्यात कॉमन असं कुठे काही नाही, इंग्रजांनी तो बन्वला आहे, इ इ विचार भयंकर बळावला आहे. देशात ब्राह्मण ही एकच जात सर्वत्र (गुजरात ते मणिपूर, काश्मिर ते तामिळ नाडू) आहे. दुसरे आहेत ते मुस्लिम पण त्यांनी एकदा फाळणी केली आहे. आज ब्राह्मणद्वेष भारतात शिगेवर आहे. तरीही मी भारताचा द्वेष करणारे ब्राह्मण पाहिले नाहीत. असे लोक असण्याची कल्पना देखिल मला विचित्र वाटते.
शिवाय ज्या ज्या अन्य जाती आहेत त्यांनी आपापले स्वार्थ थेट मांडले आहेत. आदिवास्यांचे म्हणाल तर भारतातले ४०० जिल्हे लाल होते. (आता ३०-४० झालेत, पण त्यांना भारतातून फूटून निघायचं होतं हे विसरायचं कसं?). दलितांचे म्हणायचे तर एका अत्यंत प्रभावी नेत्याने पाकिस्तानात जायचा प्रयोग झालाय. https://en.wikipedia.org/wiki/Jogendra_Nath_Mandal ईशान्येतले राज्ये तर आजही फक्त नकाशावर भारतात आहेत. काश्मिर आणि पंजाबचे प्रोब्लेम होतेच. द्रविडस्तानी लोक होतेच. मुस्लिमांचा पाकिस्तान झालाच.
ब्राह्मणांच समाजातलं स्थान गेलं, पैसे गेले (मागे अन्यायी होते असं नै म्हणायचं मग), इज्जत गेली, लोक दूषणं द्यायला लागली, कशाचाही दोष त्यांच्यामाथी फोडू लागली, तरी या लोकांना भारताबद्दल आणि इथल्या सगळ्या लोकांबद्दल प्रेम असलेले "मला" दिसते. आदित्य कोर्डे चा लेख मी नीट वाचला असेल तर असेच वैतागून दुसर्या महायुद्धाआधी ज्यूंनी इस्त्रायल बन्वला होता. भारतात ब्राह्मणांना मार बसायची वा जिनोसाइड व्हायची शक्यता अगदी शून्यच आहे असं म्हणता येत नाही. पण मंडळी कूल आहेत.
दलितांबद्दल जेव्हा जागॄती वाढली, तेव्हा त्यांनी अगोदर फक्त ब्राह्मणांवर टिका केली. पण एवढं काही झालं नाही. पण दलितांना आपल्यात पुरेशी ताकद आली आहे असे वाटून त्यांनी जेव्हा क्षत्रियांबद्दल बोलायला चालू केले तेव्हा देशाचा माहौलच गरम झाला आहे.
अशा काही कारणांनी मी ब्राह्मणांना आजही सर्वात राष्ट्रवादी म्हणतो.
2 Feb 2017 - 10:21 am | विशुमित
स्व जातीचं व्हिक्टिम कार्ड खेळून बघा आलेच का नाही दलित आणि क्षेत्रियांवर ? माझा हाच आक्षेप होता. बाकी चालू द्या.
2 Feb 2017 - 12:12 pm | arunjoshi123
पक्षभार (फेदर्वेट) साहेबांना मी ब्राह्मण हे आज हायड्रोजन आणि नायट्रोजन अणूंपेक्षा राष्ट्रवादी आहेत हे सिद्ध करून पाहिजे होते का?
1 Feb 2017 - 5:08 pm | arunjoshi123
आजही सुशिक्षितांत संदीप डांगे यांच्यासारखे लोक, विचार आहेत? मला देखिल कमाल वाटते.
===============
आता मला कमाल का वाटते ते सांगतो. तुम्हाला मी ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे म्हणालो याचे नवल वाटले तर ते ठिक आहे. माझ्यासारखे असे मानणारे लोक (सुशिक्षित ब्राह्मण वैगेरे?) आहेत ही गोष्ट नवलाचीच आहे. ते मिसळपाववर सांगणे अजूनच नवलाचे आहे. तर तुमचे हे नवल मला मान्य आहे.
या नवलात एक निगेटिवपणा आहे. तो मला १०% मान्य आहे, ९०% नाही. १०% यासाठी मान्य आहे कि राष्ट्रवादाची माझी जी आकलन पद्धती आहे ती चूक असू शकते. शिवाय अभ्यास कमी असू शकतो. ९०% यासाठी नाही कि मला यात अन्य जातींबद्दल काहीही म्हणायचं नाही.
===============
आपल्या जातीचा उल्लेख करणे, तिच्या बद्दल काहीतरी चांगले वा वाईट वा सुधारात्मक बोलणे यावर कोणतेही घटनात्मक बंधन नाही. शिवाय लिबरल जमाने के नॉर्म्स के हिसाब से यात काही प्रोटोकॉलच्या विरुद्ध नाही.
====================
ब्राह्मणांचे "सर्वात" (वा कितीही) प्रखर राश्ट्रवादी (ते शरद पवार वाले नै) असणे, तथ्यहिन असेल तर मागे. उगाच व्यक्तिगत बायस ऐतिहासिक सत्यांच्या कुरगोडिला पाठवू नये. (पण लिबरल लोकांना एक प्रश्न आहे. मला असे मत ठेवायचा अधिकार आहे का नाही? शिक्षित असलो तरी? मी समजा असं लिहिलं की ब्राह्मणांनी दलितांवर फार अन्याय केले तर माझं शिक्षण काढलं जात नाही. अहो पण असं अन्याय करत राहाण्यासाठी लागणारी व्यवस्था एत्तद्देशियांच्या हाती ठेवणे (मंजे राष्ट्रवाद!) यासाठी देखिल प्रयत्न केलेच असतील ना त्यांनी असं लिहिलं तर माझं शिक्षण काढलं जातं! यार या तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो, ये घोडा चतुर घोडा चतुर क्या है?)
=========================
आता दुसरा भाग.
"हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते." हा तिथल्या चर्चेचा मूळ विषय होता. हे कशाला बोल्ड केलेत? हे ऐतिहासिक सत्य आहे. पेरियार शुद्ध ब्राह्मणद्वेष्टा तर होताच होता "पण म्हणून" त्याला वेगळा द्रविडस्तान पाहिजे होता. https://en.wikipedia.org/wiki/Dravida_Nadu वाचा. (वाटल्यास इथल्या लिंका आणि उपलिंका चाळा.). त्याच्यात आपला महाराष्ट्रही होता थोडा थोडा.
लॉजिक काय होतं त्याचं? आर्य , ब्राह्मण या अन्यायकारी लोकांपासून विमुक्त असा वेगळा देश हवा. मग द्क्षिन भारत्तीय ब्राह्मणांचं काय करायचं? आणि उत्तर भारतातले दलित गेले का वार्यावर उडत?
भारतीय समाज तेव्हा आजच्यासारखा खरोखरीच विभागलेला नव्हता (ब्राह्मण -अब्राह्मण या लाइनवर), नैतर आज बेळगाव काश्मिर राहिला असता.
=================
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही? ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का? डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का? ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय?
============
आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. पण जाताना त्याचे नुकसान नै केले. म्हणून त्यांना धर्मद्रोही म्हणता येत नाही. पेरियार आणि कं बनिया होती. आंबेडकरांसारखा त्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झालाच नाही. आपल्या जातबांधवांचे दु:ख पाहून आंबेडकर कधी दलितस्थान नै मागून राहिले (जसे त्यांचे स्पर्धक जोगेंद्रनाथ मोंडोल मागून राहिले.). म्हणून धर्मद्रोही वा देशद्रोही हे शब्द आंबेडकरांना लागू पडत नाहीत. (उलट त्यांना ब्रह्मसुधारक ही पदवी देता येईल.) पेरीयारचं काय? ब्राह्मणद्वेषजनित देशद्रोह ही वाक्यरचन्ना मी अशा कारणाने लिहिली आहे.
==============
अजून शिक्षण घ्यायला मी ओपन आहे.
============
मी अभ्यासू नाही. "अरुण जोशी नावाचा कोणी राजकीय सामाजिक विचारवंत ऐकून आहे का? आय हॅव नथिंग टू लूज" असं मी लिहिलेल्या धाग्यावर तुम्हीपण होतात.
==========
इतरांनी उगाच हवे तसे निष्कर्ष काढून तमाशा करू नये. पेरियार माणूस ड्यांजर होता. नशीबानं देश वाचला त्याच्यापासून. जिन्नापेक्षा मोठ्ठा जमिनीचा लचका तोंडात धरून होता.
1 Feb 2017 - 5:23 pm | वरुण मोहिते
आणि खाली तिवारींचं नाव घेणं हा विरोधाभास नाही का??
राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का? अशिक्षितांना अजूनही राष्ट्रभावना कळलीच नाही असे म्हणावे लागेल म्हणजे.किंवा फिरंगी येण्या आधी राष्ट्रभावना नव्हती किंवा स्वतंत्रलढ्यात काही कमी शिकलेले, अशिक्षित होते त्यांची राष्ट्रभावना कमी होती असे म्हणावे का??साहेब शिक्षणाने राष्ट्रभावना येत नसते .
राज्यशास्त्रासोबत नागरिकशास्त्र हि शिकले असतील आधीच तर मग रूढी परंपरा जायला इतका वेळ का लागला बरे ? असाही प्रश्न उद्भवतो . गावकुसाबाहेर होते बाकीचे त्यामुळे विचारलं आपलं. राज्य सुस्थापित असायला सैन्य लागत होतं प्राचीन काळात .नुसती राजनिष्ठा नाही .कारण राजनिष्ठेने राज्य अबाधित राहत असत तर तर इतिहासच बदलला असता कि हो .असो
प्राचीन काळात आधुनिक राज्यशास्त्र नव्हतं मग राज्य निष्ठा कशी आली ?आणि आधुनिक काळात जे पहिले शिकले त्यांच्यात राज्यनिष्ठ आली म्हणजे काय ?
1 Feb 2017 - 5:58 pm | फेदरवेट साहेब
'ब्राह्मण सर्वात प्रखर ....' मध्ये मला 'सर्वात' हा शब्द खटकला आहे, त्यावर जोशी काही बोलले नाहीत तिथेही अन आता इथेही. त्या सर्वात ह्या शब्दाचा फोलपणा दाखवायला मला ब्राह्मण जातीची असलेली अन प्रस्थापित नियमानुसार देशभक्त नसलेली एक व्यक्ती वानगीदाखल देणे क्रमप्राप्त होते, असे मी समजतो. माझे संस्कार अजूनही मी म्हणले तसेच आहेत. 'सर्वात' म्हणले की श्रेष्ठत्वाची फालतू भावना येते. जात्यांतर्गत उच्चनीच 'सर्वात - कमी/जास्त' ह्या मूर्खपणामुळेच एकंदरीत देशाचे किती नुकसान झाले आहे हे मी तुम्हाला सांगू नये, नाहीका?
राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का?
पुन्हा तिसरंच समजला तुम्ही. मी राष्ट्रभावना नव्हती असे म्हणत नाहीये तर तेव्हा 'राष्ट्र' ह्या संकल्पनेचा अर्थच आपण आज ग्राह्य धरतो तसा नव्हता हे म्हणतोय त्याकाळी आधुनिक राष्ट्र ही पोस्ट रेनेसंस संकल्पना विकसित झाली नव्हती. ती कळायला आधुनिक राज्यशास्त्र शिकावे लागते म्हणजे नेशन स्टेट उर्फ 'राष्ट्र' ही आधुनिक व्याख्या स्पष्ट होते.
बाकी इतर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांनी ज्यांनी राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवलाय त्यांच्याबद्दल आदरच आहे. प्रसंगोद्भव नेत्यांनी आधुनिक राष्ट्रवाद सोपा सुलभ करून जनतेला शिकवला होता. म्हणजे एकार्थाने जनतेला आधुनिक संकल्पनांना एक्सपोजर मिळालेच होते.
1 Feb 2017 - 6:43 pm | अनुप ढेरे
सर्वात शब्द वापरला की इतर तेवढे नाहीत हे अध्यारूत होतं. जोशींचा प्रतिसाद पटला नाही. निषेध!
1 Feb 2017 - 7:38 pm | arunjoshi123
सोन्याची वाहकता सर्वात जास्त आहे म्हटले तर बाकी सगळी मूलद्रव्ये फेकून द्यायची असं होतं का? रँकिंगच करणं चूक आहे असं म्हणायचं आहे का? का? माझं रँकिंग चूक आहे तर बरोबर काय ते सांगा. मला तुमच्या मतांचा आदर असेल.
==============
मोजमापातच काय चूक आहे? आणि मी असं म्हटल्यानं अहमहमिका चालू झाली, तर मी (खोटं का होईना) तोच माझा उद्देश होता असं सांगेन. राष्ट्रवाद को बढावा देना हर भारतीय का कर्तव्य है.
1 Feb 2017 - 7:14 pm | arunjoshi123
संवाद करणारांमधे भाव कसा आहे यावर हे अवलंबून आहे. एकतर अशा गोष्टींची मोजमापं करता येत नाही. ही व्यक्तिगत मत असतात, काहीशा माहितीवर आधारित. कधी खरी असतील खरी नसतील. पण माझ्या संवादात काहीतरी फालतू आहे का नाही हे सर्वस्वी आपले डीसीजन आहे. श्रेष्ठत्वात काय गैर आहे? समजा चुकून ब्राह्मण?सर्व अब्यासाअंती सर्वात राष्ट्रवादी निघाले तर माझ्या श्रेष्ठत्वाच्या भावनेत (मंजे तसे ब्राह्मण श्रेष्ठ मानण्याच्या भावनेत, मी श्रेष्ठ असण्याच्या नाही) चूक काय?
============
सरळ सांगा ना हे नै वाटत हे वाटतात म्हणून.
3 Feb 2017 - 1:23 pm | arunjoshi123
या धाग्यावर हे विधान मला सर्वात अगम्य वाटले. मोहिते म्हणतात त्याच्याशी मी १००% सहमत आहे. शिक्षण आणि "राष्ट्राची आधुनिक आयडिया" यांचा काही संबंध नाही राष्ट्रवादी असण्याशी. सामाजिक स्वार्थ, शिक्षण, राष्ट्र शब्दाची व्याख्या (जी मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नसल्याने अद्यापि वाचलेली नाही), इ इ चा देशप्रेमाशी संबंध नाही. उलट स्वार्थ हिच ज्यांची प्रेरणा आहे ते लोक गद्दार निघण्याची जास्त संभावना आहे.
=========
राज्यशास्त्रः
अॅनि वे, असा व्याख्या शिकलेल्या लोकांच्या आणि न शिकलेल्या लोकांच्या देशप्रेमात काय फरक आहे ते उदाहरणाने, इ सांगाल काय?
=========
शिक्षणः
उद्या भारतावर संकट आले. एका सिक्षित माणसाने (ज्याला संकट इ इ खरेच डिटेल मधे कळते, किंवा संकट नसेल तर एखाद्या गोष्तीत देशाचे भले आहे हे कळते.) एका अशिक्षित माणसाला आवाहान केले. दोघांनी आपापल्या परीने सेवा केली तर केवळ ज्याला जास्त जाण आहे तो मोठा देशप्रेमी नसेल. मदतीची कळकळ कोणाला आहे हे महत्त्वाचे.
1 Feb 2017 - 9:07 pm | arunjoshi123
मोहिते साहेब, राष्ट्रवादाचा उद्गम कधी नि कशामुळे झाला (नाही) याबद्दल माझं मत आपणाशी बरंच जुळतं.
================
फेदरवेट यांना "होता" हे मान्य पण "आहे" हे अमान्य आहे. आपणांस "होता" हे देखिल अमान्य आहे असे दिसते. पण मग माझी तशी भावना का आहे असं विचारायचं आहे का?
1 Feb 2017 - 6:16 pm | मोदक
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते.
तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे.
अपवाद असला तरी, कांही उच्चविद्याविभूषीत लोकं आर्थिक गुन्ह्यांमध्ये सापडतात, टॅक्स वगैरे चुकवून किंवा सरकारात चांगल्या पदावर असली तर देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट आणि जिहादबद्दल तर बोलायला नको. मग अशावेळी अरूण जोशींच्या एका विधानाला खास धागा काढण्याइतके महत्व तुम्हाला का द्यावेसे वाटले हे जाणण्यास उत्सुक.
अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच तसेच (माझ्यासह) कोणीही (विशिष्ट विचारसरणीचा चष्मा न घातलेली) सुजाण व्यक्ती अशा विधानाला सहमत होणारही नाही हे उघड आहे.
अशा अनेक पुड्या मिपावर सोडल्या जातात. आपल्या मुद्द्याची भलामण करण्यासाठी वाट्टेल ती काल्पनीक उदाहरणे दिली जातात, एक थिअरी सांगून त्याच थिअरीने निघणारे दुसरे (स्वतःला गैरसोयीचे) निष्कर्ष नाकारले जातात, मग अशावेळी अशा एका विधानासाठी पेश्शल धागा काढून काय साध्य करत आहात ते कळाले नाही.
1 Feb 2017 - 7:19 pm | arunjoshi123
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे? उद्या मी खीर हेच सर्वात चविश्ट अन्न आहे असे म्हणालो तर गुंड, मवाली, विकृत, दुष्ट, इ इ लोक खीर चवीने खातात असा प्रतिसाद लिहाल कि काय? अवघड आहे बाबा.
========
गर्दी बघून हात मोकळा करून घ्यायची प्रवृत्ती बरोबर नाही हो.
1 Feb 2017 - 7:53 pm | मोदक
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे?
सार्वजनिक ठिकाणी विचार मांडले तर त्यावर प्रतिवाद येणारच. त्याचा आणि गर्दी बघून हात मोकळा करून घेण्याच्या प्रवृत्तीचा काय संबंध कळाला नाही.
1 Feb 2017 - 8:59 pm | arunjoshi123
आपली प्रवृत्ती तशी नाही याचा आनंद आहे.
==============
प्रतिवादाचं स्वागत आहे. पण फक्त फेदरवेट या एकाच माणसाने प्रतिवाद केलाय. बाकी हात धूवून घेत आहेत असं मला तरी वाटतंय.
1 Feb 2017 - 6:59 pm | धोणी
काही सुशिक्षित दिवस दिवस इथे वांझोटे धागे चर्चा काढतात आणि बिझनेस मध्ये यश नाही म्हणून रडतात, कठिणे
1 Feb 2017 - 7:32 pm | arunjoshi123
संदीप भाऊ, तुम्ही असं ढोलकी घेऊन धागा काढायच्या आधी मला लिहायला हवं होतं. पण बरं केलंत धागा काढलात ते. मला खालील गोष्टींची माहिती होइलः
१. ब्राह्मणांनी भारतात नेहमी पोलिटिकली करेक्ट आणि सांभाळून सांभाळूनच बोलावे का?
२. ब्राह्मण लोकांना एखाद्या सब्जेक्टीव गोष्टीत सुपरलेटिव डीग्री वापरणे देशात बॅनच आहे का?
३. माझे (किंवा कोणाचेही) प्रतिसाद माझे आडनाव डोळ्यासमोर ठेउनच वाचले जातात का? मंजे ब्राह्मणांची अशी येडीवाकडी स्तुती जर एखाद्या अब्राह्मण माणसाने मिसळपाववर केली तर तर त्यालादेखिल अस्साच विरोध व्हायला पाहिजे. तो होतो का? का फक्त स्वतःच्या जातीची स्तुती करणे (आता अभ्यासापोटी एखादे स्तुतीपर वाक्य पडणे असं म्हणणे असू देत.)
४. लोक जनरली समोरच्याला किती मागास वा मूर्ख वा संकुचित मानून चालतात.
५. ब्राह्मणांवर टिका करणे हे फॅशनेबल आणि उपयुक्त आणि त्यांच्याबद्दल काही चांगले बोलणे तोट्याचे असा कै जगाचा ट्रेंड आहे का? शक्यतो लोक ब्राह्मणांबद्दल चांगले बोलणे टाळतच असतील का?
1 Feb 2017 - 8:33 pm | सुबोध खरे
एखाद्याने आपले मत मांडले किंवा तसा त्याचा ग्रह आहे यात वेगळा धागा काढण्यासारखे काय आहे हे कळत नाही.
सुशिक्षित असला म्हणजे सुविचारी असतो असे कुठे लिहिलेले आहे?
मी १९९४ साली एक डॉक्टर पाहिला आहे ज्याने आपल्या बायकोचा पहिलाच गर्भ मुलीचा असल्यामुळे गर्भपात करवून घेतला होता. तेंव्हा सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत सुविचारी असतोच असे नाही.
( ता. क. यात मला श्री डांगे अथवा श्री अरुण जोशी यांच्या बद्दल काहीच म्हणायचे नाही कृपया व्यक्तिगत घेऊ नये)
मत हे घड्याळासारखे असते आणि प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर म्हणून त्यावर वितंडवाद घालणे हा शुद्ध कालापव्यय आहे.
देशभक्ती हि कोणत्याही जातीची( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र) धर्माची किंवा व्यवसायाची (डॉक्टर वकील लष्करी अधिकारी) मक्तेदारी नाही.
तसेच हरामखोरी आणि देशद्रोह हि सुद्धा कोणत्याही जातीची किंवा धर्माची व व्यवसायाची मक्तेदारी नाही.
यात काथ्याकूट करण्यासारखे काय आहे?
उगाच रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी
1 Feb 2017 - 8:56 pm | arunjoshi123
अन्य सगळे म्हणने मान्य आहे.
मी आणि डांगेसाहेबांनी right to patriotism हा विषय चर्चिला नाही. ऑर्डर ऑफ पॅट्रिऑटिझम हा चर्चिला आहे.
आहे हो. कालच आदित्य कोर्डे म्हणाले कि भारतीय ज्यू देश बनवण्यासाठी ईस्रायलला गेले. मी वर उदाहरणे दिली आहेत. (नक्षली, मुस्लिम, द्रविड, ईशान्य भारतीय, कास्मिरी, खलिस्तानी, इ इ. काही उत्तर भारतीयांना "जय महाराष्ट्र" मध्ये देखिल तसा वास येतो. ) लोकांच्या अस्मिता काय आहेत, त्या कोणत्या वारश्याशी निगडित आहेत, विद्यमान राष्ट्र त्याची काळजी घेत आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. असं झालं नाही तर एखादा अरब स्प्रिंग इथल्या व्यवस्थेची वाट लावू शकतो.
1 Feb 2017 - 9:02 pm | धोणी
=))
1 Feb 2017 - 10:20 pm | गॅरी ट्रुमन
सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?
मलाही नेमका हाच प्रश्न हा लेख वाचूनही पडला होता.
1 Feb 2017 - 10:36 pm | संदीप डांगे
आणि लेखकाने आपले मत शेवटी बदलले हे सांगायचे विसरलात काय ट्रु'मन साहेब?
1 Feb 2017 - 10:42 pm | arunjoshi123
डांगे साहेब, तुम्ही अजून प्रतिसाद द्यायची बरीच वाक्ये धाग्यावर आहेत.
1 Feb 2017 - 11:04 pm | संदीप डांगे
येतो, येतो! सध्या तुंबड्या लावायला रिकामा वेळ सापडत नाहीये.... ;-)
बाकी.. मतभिन्नता असली तरी संयमित व संतुलित चर्चा करायची पद्धत आवडली.. ह्या चर्चेतून कोणाचेही काहीच मतपरिवर्तन होणार नाही अशी बहुतांश शक्यता असली तरी आपल्याला तुमचा स्वभाव लै आवडला... त्यामुळे चर्चा करूयात. आयमिन तुंबड्या लावूयात :-)
3 Feb 2017 - 2:41 pm | arunjoshi123
अशी फस्टक्लास दाद दिल्याबद्दल अनेक अन्यवाद. एक तारखेला रात्री अकरा वाजता लिहिलेला हा प्रतिसाद मी तीन तारखेला दुपारी दोन वाजता वाचून इतक्या काळातल्या आनंदाला फुकटच मुकलो.
===========
माझ्यामते चर्चेतून धान्नकन मतपरिवर्तन होत नसते. आपल्या इतक्या विरुद्ध विचारांचा (शेमलेस!.?!) माणूस जगात आहे ही भावनाच परिवर्तनाचा पाया खणायला चालू करते. तुम्ही प्रामाणिक असा नाही तर नसा, संवेदनशील असा नाहीतर नसा; हा किडा त्याच्या गंतव्याला मार्गस्थ होतो.
==============
मी एक खेड्यात वाढलेला माणूस आहे. आम्ही एकच ब्राह्मण कुटुंब आणि इतरांना आमच्या ब्राह्मणत्वाचा फार आदर या वातावरणात वाढलेला. शहरात ब्राह्मणांवरची टिका ऐकून (आईच्या संस्कारांमूळे) आपली जात फार सात्विक आहे असे मानणार्या (दुसरीकडे मी तेव्हा स्वतःला क्वाझी-नास्तिक मानत असलो तरी) माझ्या मनाला ताप होई. आजही मी वैचारिक रित्या बराच तसाच आहे तरी मला अनेक ब्रह्मपापे मान्य आहेत. तो किडा पान्थस्थ आहे. याचं मुख्य कारण माझ्या जातीवर टिका करणारे संयमी सवर्ण, दलित , नास्तिक, पुरोगामी, इ इ मित्र, शिक्षक, लोक, इ. भाषा (अॅज अॅन अर्लि ह्यूमन डीस्कवरी) ही एका लूज कॅरॅक्टरच्या बाईसारखी* असते. एका विधानात एक विश्व प्रकट करून जाते. त्यात वास्तवाचे आणि कल्पनेचे काहीही रंग भरते. परंतु तिच्या वापरात वापरकर्त्याचा सहसा मैत्रभाव असला पाहिजे. समोरच्या वाचकाचा मैत्रभाव नसेल तर एक डाव तर एखादा चान्स अवश्य दिला पाहिजे. (कधी कधी हवापालट म्हणून मांडी ठोकली पाहिजे.)
=============
भाषा स्त्रीलिंगी आहे म्हणून बाई. (टरकून राहावं लागतं बाबा स्त्रीवाद्यांना.)
3 Feb 2017 - 2:56 pm | हतोळकरांचा प्रसाद
यासाठी +१००००.
1 Feb 2017 - 11:05 pm | गॅरी ट्रुमन
मत बदलले असेल तर वरील प्रतिसाद लिहिल्याबद्दल १००% दिलगिरी. मलाही एकेकाळी गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जात असे. पण एकेकाळची अशी एक्स्ट्रिम मते बदलू शकतात. त्या धाग्यात साडेतीनशेच्याही वर प्रतिसाद आहेत. सुमारे पहिले १०० प्रतिसाद झाल्यानंतर पुढचे प्रतिसाद बघितले नव्हते त्यामुळे तुमचे मत बदलले असेल याची कल्पना नव्हती. परत एकदा १००% दिलगिरी. मिपा-१०१ कोर्समधील हा एक धडा या निमित्ताने मिळाला.
1 Feb 2017 - 11:15 pm | संदीप डांगे
इट्स ओके सरजी, मला पुसट शंका होतीच कि आपण कदाचित शेवटपर्यंत वाचले नसावे! त्यामुळे चिंता नाही.
मी माझा मत बदलल्याचा प्रतिसाद नंतर शोधून देतो. एकूण कारणमीमांसा संदर्भ लक्षात येईल त्यामुळे. दमदार तर्क असेल तर माझे कितीही हट्टी मत असले तरी 180 डिग्रीत फिरवायला सदैव तयार असतो त्याचा हा एक छोटासा पुरावा. ;-)
2 Feb 2017 - 1:41 am | कपिलमुनी
http://www.misalpav.com/comment/653104#comment-653104
2 Feb 2017 - 1:49 am | संदीप डांगे
अरे! अनेक धन्यवाद मुनिवर! :-)
1 Feb 2017 - 11:22 pm | अनरँडम
ब्राह्मणद्वेष्टेपणा म्हणजे भारतद्वेष्टेपणा हे त्यांनी एक लांबलचक प्रतिसाद लिहून माझ्यासारख्या वाचकांना उपकृत करावे.
अवांतर: अरूण जोशींची सामाजिक निरीक्षणे बर्याचदा चोख (लक्ष देण्यासारखी)असतात पण ते त्यावरून जे तात्पर्य काढतात ते मात्र फारच विपरीत असते.
2 Feb 2017 - 12:06 am | arunjoshi123
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही? ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का? डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का? ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय?
================
वरचेच खाली पेस्ट केले आहे. तो प्रतिसाद पूर्ण वाचा. प्रश्न संदीपजींस आहेत.
2 Feb 2017 - 2:22 am | अनरँडम
समजा भारतात पाच प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारचे लोक फार थोडे आहेत (१% पेक्षा कमी) आणि तिसर्या प्रकारचे लोक बरेच आहेत (४०%). पहिल्या क्रमांकाच्या लोकांकडे भारतातील ४०% मालमत्ता आहे तर तिसर्या क्रमांकाकडे फक्त १%. तिसर्या प्रकारचे लोक अतिशय देशभक्त (सैन्यात यांचा वाटा समजा ६०% आहे) आहेत पण ते पहिल्या प्रकारच्या लोकांचा द्वेष करतात. त्यांना पहिल्या प्रकारचे लोक भारतात नसावे असे वाटते. इतर प्रकारच्या ४९% (म्हणजे एकूण ९९% लोकसंख्येवर) त्यांचे प्रेम आहे. तिसर्या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येईल का?
(जातींचे नाव जाणुनबुजून टाळलेले आहे. उदाहरणातल्या टक्केवारीचा संबंध वास्तव जातींशी कृपया लावू नये.)
2 Feb 2017 - 10:45 am | arunjoshi123
उत्तम प्रश्न आहे.
=========
समजा भारतात पाच प्रकारच्या स्त्रीया राहतात. पहिल्या प्रकारच्या फार थोड्या आहेत (१% पेक्षा कमी) आणि तिसर्या प्रकारच्या बर्याच आहेत (४०%). पहिल्या क्रमांकाच्या १००% पटाखा आहेत तर तिसर्या क्रमांकाच्या एकदम सुमार. तिसर्या प्रकारचे नवरे अतिशय देशभक्त (सैन्यात यांचा वाटा समजा ६०% आहे) आहेत पण ते पहिल्या प्रकारच्या नवर्यांचा द्वेष करतात. त्यांना पहिल्या प्रकारचे नवरे भारतात नसावे असे वाटते. इतर प्रकारच्या ४९% (म्हणजे एकूण ९९%) लोकसंख्येवर, स्त्रीयांवर त्यांचे प्रेम आहे त्यांचे सर्व वैवाहिक इ अधिकार मान्य आहेत. मात्र पहिल्या प्रकारच्या स्त्रीयांना वैवाहिक अधिकार नसावेत आणि त्यांनी इतर ९९% च्या वासना पुरवाव्यात असे त्यांचे द्वेष्टे मत आहे. यात तिसर्या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येईल का?
==========
मला नक्की काय म्हणायचं आहे? देशभक्ती ही संख्यात्मक का गुणात्मक?
========
ज्या एक टक्क्यांचे उरलेल्या ९९% टक्क्यांवर (४०% पैसे असले तरी) अपार प्रेम आहे त्यांना अकारण का हाकलायचं? काश्मिरी पंडितांना हाकललं त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवताय कि काय?
===========
मी कधीही कोनाला असले साधर्म्य पाहू नये, तसले पाहू नये असं लिहित नाही. ते पाहायचेच नसते. (सध्याला स्त्रीवाद्यांनी सोडून द्यावे अशी विनंती. विषय वा वृत्ती ती नाही.)
2 Feb 2017 - 11:06 am | शब्दबम्बाळ
तुमची मानसिकता बघून खरंच कीव येते.
नुसत्या शिक्षणाने माणूस सुसंकृत होऊ शकत नाही कदाचित...
2 Feb 2017 - 11:43 am | arunjoshi123
माझ्या मानसिकतेचं आकलन करणं सोडा. माझ्या प्रतिसादाचं आकलन केलंत तरी फार उपकार होतील.
2 Feb 2017 - 11:18 am | अप्पा जोगळेकर
पटाखा, सुमार, हल्क किंवा अशा कुठल्याही पद्धतीने स्त्री किंवा पुरुष यांचे वर्गीकरण करणे हे त्यांना वस्तू समजण्यासारखे आहे.
जर हे वस्तूकरण नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची पत्नी /आई / वडील/मुलगा/मुलगी यांना कुठल्या गटात टाकाल ते कळू शकेल का.
2 Feb 2017 - 11:52 am | arunjoshi123
मी विषय तो नाही असं लिहिलं आहे. वृती नाही असं पण लिहिलं आहे.
==================
असू देत. स्त्रीयांच्या लैंगिक आकर्षकतेत फरक असतो कि नसतो? त्याच्या दोन टोकांना तुम्ही जी नावे वापरता ती सांगा. त्या शब्दांत काही चूक असेल तर मागे. तुमचे शब्द वापरायला मी तयार आहे.
================
प्रश्न आहे - देशभक्ती गुणात्मक असते कि संख्यात्मक. दुसरे उदाहरण दिले असते तर माझा भाव पोचला नसता याची मला खात्री आहे.
========
कमी अधिक लैंगिक आकर्षकता माझ्या सगळ्या नातेवाईकांना आहे.
2 Feb 2017 - 12:05 pm | अप्पा जोगळेकर
उगाच व्यक्तिगत स्तरावर कोणाचा अपमान करण्याची इच्छा नाही. निव्वळ याकरता तुमच्या दाव्याचा प्रतिवाद करता येत नाही. इत्यलम.
2 Feb 2017 - 8:14 pm | अनरँडम
संख्यात्मक देशभक्ति: तिसर्या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येणार नाही. ते बहूसंख्य भारतीयांवर प्रेम करतात पण सर्व भारतीयांवर नाही. उदा. काही (सर्व नाही याची नोंद घ्यावी) कट्टर हिंदुत्ववादी लोक भारतातल्या इतर धर्मियांचा द्वेष करतात. पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक असल्याने हिंदूंवर प्रेम करणारे हे लोक भारतद्वेष्टे नाहीत.
गुणात्मक देशभक्ति: देशाची अशी काही किमान मूल्यप्रणाली असते. तिला न पाळणार्या लोकांना राष्ट्रद्वेष्टे म्हणावे. या अर्थाने तिसर्या प्रकारातले लोक हे भारतद्वेष्टे आहेत.
तुम्हाला 'संख्यात्मक' देशभक्ति अपेक्षित नसावी. तुम्हाला 'गुणात्मक' राष्ट्रभक्ति अपेक्षित असल्यास स्वातंत्र्यपूर्व काळात भारत या देशाची किमान मूल्यं काय होती हे सांगता यावे. समजा नाही जमले तरी कुठल्याही समाजघटकाचा द्वेष न करणे हे लक्षण 'गुणात्मक' देशभक्तिचे प्रतिनिधीत्व करते असे समजले जावे. या अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातला ब्राह्मणच काय कुठलाही भारतीय समाजघटक राष्ट्रभक्त समजता येणार नाही.
3 Feb 2017 - 11:25 pm | arunjoshi123
लोकशाही नावाचा प्रकार राज्यशास्त्रात समाविष्ट झाला तेव्हापासून अशी विधाने करणे सुसंगत मानायला चालू झाले असावे. कितीही प्रमाणात असलेल्या अल्पसंख्यांक लोकांचा द्वेष करणे हे राष्ट्रद्रोही लोकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मुस्लिमांचा द्वेष करणारे हिंदुत्ववादी लोक हे क्लिअर भारतद्वेष्टे आहेत.
आपल्या समाजात अनंत गट असू शकतात. त्या गटात अनेक प्रकारच्या भिन्नता, भेद, वाद आणि संघर्ष असू शकतात. यात वावगं काहीच नाही. परंतु या वादांचा आणि संघर्षांचा मूलाधार काय असायला हवा? तर न्यायाची मागणी.
मुसलमान राममंदिर देत नाहीत? ते देत नाहीत हे चूक आहे, त्यांनी द्यायला पाहिजे, त्याकरिता आम्ही आवश्यक त्या गोष्टी न्याय्य पद्धतीने करू असे म्हणणारे राष्ट्रवादी. पण त्यांना मारून टाकले पाहिजे, पाकिस्तानात पाठवले पाहिजे इ म्हणणे मग ते दुसरीकडे हिंदूंसाठी सर्वस्व्वाचा त्याग करत का असेना, राष्ट्रद्रोही आहे.
आपण राष्ट्र बनून का राहतो? कदाचित १ माणसाने सवते राहणे वा ७२५,००,००,००० माणसांनी एकत्र राहणे असंभव असावे. स्पेक्ट्रमच्या काही संलग्न भागाला आपण राष्ट्र मानणे पसंद करतो. त्या सीमांत आपण फार हिशेब करत नाही. परंतु तरीही त्या सीमांत देखिल हितसंबंध संघर्षाची पाळी आणतात. शक्यतो व्यवस्थेच्या आत संघर्ष मिटवायची तयारी दाखवली, किंवा व्यवस्थेत काही हलके फुलके बदल करायचे ठरवले तर ठिक असते. कधी कधी संघर्ष नच मिटणारा असा निष्कर्ष निघाला तर सीमा वळणे बदलतात. पण त्यात देखिल तारतम्य हवे. पण ज्यांजेशी संघर्ष आहे त्यांचे अस्तित्वच नको असणे हे न्याय हवे असण्यापेक्षा फार वेगळे आहे. म्हणून पेरियार हे राष्ट्रद्रोही आहेत. ते अहिंसावंत आहेत, मानववंशशास्त्राच्या हिशेबाने इथलेच आहेत आणि सैन्यात पराक्रम करून आलेत या गोष्टी दुय्यम आहेत. मुस्लिमांनी भारतात कसे राहावे, हिंदूशी कसे वागावे याच्या रास्त अपेक्षा असलेला हिंदुत्ववादी हा राष्ट्रवादी, नाहीतर राष्ट्रद्रोही. तसेच ब्राह्मणांनी भारतात कसे राहावे ते मागणारे आणि नाही राहिले तर काय करू याची धमकी देणारे आणि ती प्रत्यक्षात उतरावण्याची धमक असलेले आणि आजच्या गतकालापराधजनितन्यूनगंडग्रस्त ब्राह्मणांचे जन्मदाते बनलेले (म्हणजे ब्राह्मणांचे उद्धारक) आंबेडकर हे सच्चे राष्ट्रभक्त आहेत.
लातूरला माझ्या घरात चांगला पिता बनण्यासाठी लागणारे गुण आणि गोंदियाला संपतरावांच्या खानदानात चांगला पिता बनायला लागणारे गुण हे सारखेच असावेत. म्हणून या विधानातला भारत शब्द रिडंडंट आहे. उदा. लातूरची आणि गोंदियाची संस्क्रूती वेगळी असेल, पण 'संस्कृतीचा सन्मान असणे' असले कि खूप झाले.
प्रत्येक समाजघटक किमान एका अन्य समाजघटकाचा द्वेष करत होता असे म्हणायचे आहे का? अहो, ऑफिसमधल्या मार्केटींग डिपार्ट्मेंट मधल्या एका माणसाचं प्रॉक्यूरमेंट मधल्या एका माणसाशी पॉलिटिक्स चालत असेल तर ही कंपनी अस्तित्वातच नाही असं म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि कोणते हे म्हणे समाजघटक द्वभारतातल्या) उदाहरण मिळेल? हे द्रविड बनिया पेरियार जेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मणांना हाकला म्हणायचे तेव्हा त्यांचे जातबंधू कोमटी लोक आमच्या लातूरच्या (मंजे उ. भारतातल्या) ब्राह्मण आजोबांना पोटभर जेवणे घालायची नि नमस्कार करून १.२५ रु द्यायचे.
अहो सक्रीय प्रेम करणे वेगळं आणि द्वेष न करणं वेगळं.
उलट आपल्या देशात उलटा प्रकार आहे. कोणाला कोणाचा द्वेष नसल्यामुळे सगळे कामापेक्षा जास्त कूल असतात. भारतात आपल्या जातीच्या माणसाला मत देणे राष्ट्रद्रोह (अन्य जातींचा द्वेष) नाहीच असे मानत असल्यामुळे लोक जातीय मतदान करतात.
4 Feb 2017 - 12:20 am | हतोळकरांचा प्रसाद
सुंदर प्रतिसाद! आवडला!
4 Feb 2017 - 1:41 am | अनरँडम
होय.
'न्यायाची मागणी' किंवा 'देशात राहणार्या इतर जातीयांना न्यायाने वागवणे' ही राष्ट्रभक्ती असल्यास दलितांवर झालेल्या अन्यायास अंशतः (सर्वच जातींतले लोक या अन्यायास जबाबदार आहेत) जबाबदार असलेला ब्राह्मण समाज हा 'सर्वात जास्त राष्ट्रभक्त' कसा होता बरे? (येथे ब्राह्मण जातीचे नाव घेतले आहे ते फक्त जोशींचे विधान ब्राह्मणसापेक्ष आहे म्हणून. अन्यथा दलितांवर अन्याय होण्यासाठी इतर जातीतल्या लोकांचाही सहभाग आणि पाठींबा होता. फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण करण्याचा उद्देश नाही.)
4 Feb 2017 - 4:51 pm | arunjoshi123
उत्तर द्यायला हे वाक्य मी का कोट केलं आहे? फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण करण्याचा उद्देश नाही हे का तुम्हाला सांगावं वाटतं? कारण तुमच्या विचारसरणीचा मूलाधार "जाती या द्वंद्वनिमग्नच असतात" असा आहे. तुम्ही "फक्त" ब्राह्मणांवर दोषारोप करायचा उद्देशच ठेवत नाहीत हेच मूळात चूक आहे. अन्य जातींचा सहभाग मान्य केला तरी तुम्ही फक्त ब्राह्मणांवर टिका करू शकता. समाजघटकांची समीकरणे अशीच आर्बिट्ररी असतात, पण मर्यादित.
आधुनिक सर्वधर्मसमानांतर राज्यप्रणालीमधे अशा समतेला (म्हणजे सर्व जाती धर्मांना आम्ही सारखेच दूर आणि बिनकामी मानतो अशी भावना) कामापभावना)जास्त महत्त्व आहे. आणि हे इतिहासाचे चूक मूल्यांकन होण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यात पुढच्या प्रश्नाचा गर्भ आहे.
=========================================
या प्रश्न कळीचा आहे आणि व्यवस्थित प्रकारे देणं आवश्यक आहे. तुमचं असं गृहितक आहे कि मी दलितांवर अन्याय करणे ही एकूण व्यवस्थेतील एक गौण बाब आहे असं मानून ब्राह्मणांना सर्वोच्च देशभक्तीचा पुरस्क्कार दिला आहे, पण तसं अजिबात नाही. काळ आजचा असो वा मागचा, ब्राह्मणांनी दलितांवर अन्याय केलेला नसणे हा खूप मोठा फॅक्टर आहे याची मला कल्पना आहे.
या करिता काही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे:
१. ब्राह्मण, इतर सवर्ण आणि दलित कसे एकत्र आले? उद्या मी मिसळपावचे (समजा एकूण) १०० आयडी घेतले. त्यातले ५ जज, ५ व्यापारी, ४० सैनिक आणि ५० कामगार असतील असे (रँडमली?) सांगीतले, आणि कायनू बायनू नियम टायपून ठेवले तर ते किती लोकांना मान्य असेल? नसेलच ना! जर ब्राह्मण आणि क्षत्रिय इथले खूप जुने जेते असतील तर सत्ता, संपत्ती, सामाजिक अधिकार त्यांनी आपल्याकडे व्यवस्थेचा भाग म्हणून ठेऊन घेतले असतील. ब्रिटिश आणि मोघलांनी हे केले पण ते हाकलून दिले गेले. ब्राह्मणांनी ज्या प्रकारे विशेषाधिकार आपल्याकडे ठेवले ते बलःपूर्वक असते आणि तारतम्याच्या पलिकडचे असते आणि क्रूर असते तर त्यांचें आणि दलितांचे संघर्षांचे कितीतरी इतिहास पिढीन पिढ्या चालत आले असते. पण भारतात दलित संघर्षाचा इतिहास नाहीच. हे कसे काय? सलग ५००० वर्षे लोकांना बुद्धिभ्रष्ट करून त्यांच्यावर अन्याय करता येतो कि काय? सगळ्या जगाचं इस्लामीकरण आणि ख्रिश्चनीकरण झालं, भारताचं नाही. का झालं? तर त्यांची त्या त्या देशातल्या वंचितांनाना केलेली समतेची (त्या विशेषाधिकरांची) ऑफर. भारतात का नाही झालं? ऑफर केलेली गोष्ट एवढी महत्त्वाची नव्हती की काय? कदाचित तिची इतकी वाणवा नव्हती. हिंदू धर्म बाटणार्यांना झिडकारण्यासाठी अतिउत्साही असायचा. आणि बाहेरून इतक्या ऑफर्स. ७० कोटी दलित असलेल्या भारतात ज्या आंबेडकरांच्या धर्मांतराचा इतक्यांदा दाखला दिला जातो त्या बुद्ध धर्माचे (आता तो पंथ , धर्म, इ इ वाद असू द्या) अनुयायी, १९५६ पूर्वीचे ओरिजन्ल बुद्ध धरून, १ कोटी नाहीत. सलग ५००० वर्षे (तोच जेनेटिक मेकअप असलेल्या) लोकांना बुद्धिभ्रष्ट करून त्यांच्यावर अन्याय करता येतो कि काय?
२. व्यवस्थेचा उद्देश काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय धार्मिक व्यवस्थेचा उद्देश दलितांचे शोषण करून ब्राह्मणांची घरे भरणे असा होता का? याला ग्रंथजन्य आधार आहे का? ब्राह्मणांचे काम पुस्तकांत ईश्वराची आराधना करणे असे लिहिले आहे कि कारण असो वा नसो दलितांचे आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक शोषण करणे आहे असे लिहिले आहे? जास्तीत जास्त पोथ्यांचा फोकस काय आहे? आज खरं पाहिलं तर प्रशासनात "सिस्टेमिक" भ्रष्टाचार आहे, मग घटनाकारांचा उद्देश प्रशासकीय अधिकारी या जातीने अन्य समाजास लुटावे असा होता मानावा का? असाच युक्तिवाद कल्याणकारी ब्रिटिशराज्याच्या समर्थनासाठी केला गेलेला बरेचदा पाहतो, तरीही त्यांना जनतेने हाकलून लावले. म्हणून व्यवस्था आणि व्यवस्थेत टाळताच येत नाही अशी मानवी गुन्हेगारीता यांना वेगवेगळं पाहिलं पाहिजे.
३. अन्याय आणि काम यांत फरक आहे. बायकांना फक्त चूल आणि मूल बघावे लागे असा कांगावा बरेच स्त्रीवादी करतात. पण काम वेगळे आणि अन्याय वेगळा हे विसरतात. पुरुषांना देखिल फक्त शेत आणि सरपण पाहावे लागे हे विसरतात. दलितांना एक विशिष्ट काम करावे लागले हा अन्याय असू शकत नाही. त्यांना एक विशिष्ट काम करता आले नाही हा असू शकतो.
४. युरोपचा प्रभाव हा पण एक मुद्दा आहे. चर्च जितकं वाइट होतं किमान तितके इथली पीठं देखिल असावीतच असा एक पुरोगामी मूर्ख समज आहे. हे लोक इस्लमिक पाकिस्तानची वाट लागली आहे म्हणून हिंदू भारत महाभयानक गोष्ट असेल अशा मोनोक्रोम विचारसरणीवर विश्वास ठेवतात. "जगातील धार्मिक अन्यायाची पातळी" आणि "भारतातील जातीय अन्यायाची पातळी" यांना समान लेखण्याची इच्छा आवरणे ही पण एक गरज आहे.
५. जगातील सर्व अन्य लोकसमूह अभिस्सरणशील होते काय हा एक मुद्दा आहे. म्हणजे जन्माधारित जात नसून देखिल अम्रिकेत काळे लोक पहिलेपासून मागे आहेत. आजही आहेत. सामाजिक अवस्था आणि त्याच्याशी निगडीत अन्याय केवळ भारतातच जन्माने मिळालेला असे मानायची प्रवृत्ती अकारण तीव्र आहे. http://www.skwirk.com/p-c_s-14_u-173_t-471_c-1707/social-hierarchy/nsw/s... चीन मधे देखिल हे जन्मजात होतं.
आणि अंततः ---
------------------------
व्यवस्था हाच अन्याय आहे हा दुराग्रह हा एक मुद्दा आहे. ब्राह्मण राष्ट्रद्रोही कारण ते व्यवस्थेचे कॉपिराइट सांभाळून होते? आजची लोकशाही (एकूण राज्यव्यवस्था) हा एक अत्यंत घाणेरडा प्रकार होता असे अजून ५००-१००० वर्षांनी आरामात म्हणता येईल, अगदी प्राचीन काळाच्या तुलनेत!
हे लोक काय म्हणतील? एक उदाहरण देतो -
प्राचीन काळात:
दलित लोक सवर्णांच्या विहिरीवर इ पाणी भरू शकत नसत. परंतु दलितांच्या विहिरी त्यांच्या गरजेपेक्षा कमी पाण्याच्या असाव्यात असं काही नव्हतं. या प्रकारात सवर्ण दोन-तीन प्रकारचा विशुद्ध मूर्खपणा करताना दिसतात. १. फक्त दलितांच्या विहिरीत पाणी उरले तर ती काबीज न करता दुसरा स्रोत पाहणे. २ दलिताना पाणी पाजवताना आपले श्रम वाया घालवणे. ३. त्यांचेकडून(पिण्याचे, पूजेचे) पाणी भरून घेण्यासारखे कष्टप्रद काम न करून घेणे.
२०१७ च्या लोकशाहीतः
सरकारच्या मते किमान पाणी देण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशीलता दाखवली जायची. अगदी अनधिकृत बांधकामाला (तिथल्या लोकांना) देखिल प्यायला पाणी (नळाचे अधिकृत कनेक्शन) देणे भाग होते. दलित वा सवर्ण असा भेद अजिबात नव्हता. इतर अन्य कोणता भेद नव्हता. वास्तविक चित्र मात्र अत्यंत वाईट होते. शहरातील/गावांतील सर्वात मागास भागांत राहणारे लोक सर्वसाधारणपणे पूर्वाश्रमीचे दलित होते हे दुर्लक्षिले तरी ... १. सर्व जलस्रोतांवर सरकारचा ताबा होता, आणि सारे पाणी मुख्यतः सधन लोकांच्या शेतीसाठी आणि उद्योगांसाठी राखून ठेवलेले असे. २. पाण्याच्या जाळ्याने न कवर झालेला खूप भाग झोपडपट्टीचा असे. ३. झोपड्यांत पाण्याचे दिवस, तास आणि वारंवारिता शहराच्या अन्य भागांपेक्षा फार नीच प्रतीची असे. ४. नळ नसलेल्या भागासाठी असलेले टँकर श्रीमंत माफिया वळवून नेत. ५. पाण्याचे बिल व्हॉल्यूमेट्रिक असे म्हणून लोकांत पाणी देण्याची प्रवृत्ती नव्हती. ६. सारे नैसर्गिक स्रोत श्रीमंतांच्या उद्योगांच्या सांडपाण्याने इतके नासले होते त्यात कपडे धुणे, वा नाहणे सोडाच पाय टाकून उभे राहणे संभव नव्हते. ७. सरकारचे सारे बजेट प्रामुख्याने श्रीमंत लोक असलेल्या शहरांच्या पाणीव्यवस्थेसाठी असे. ८. या व्यवस्था इतक्या किचकट होत्या कि कोणता प्रयत्न वा आंदोलन करून त्या ७० वर्षांत तरी सुटल्या नव्हत्या आणि पुढल्च्या ७० वर्षांत सुटायचं लक्षण नव्हतं. ९. पाणी देणे हे सरकारचे काम मानले गेल्यामूळे (जे त्याला जमत नव्हते) मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांत एक अक्षम्य उदासिनता होती. १०. श्रीमंतांची पाण्याची गरज दरडोई अन्य लोकांपेक्षा खूप जास्त होती.
एकूणात पाहता आज २६१७ मधे असे दिसते प्राचीन काळात सवर्णांना दलितांप्रति हिनभाव होता हे नि:संशय आहे. त्यांच्या वागण्यात बराच मूर्खपणा देखिल होता पण पाण्याच्या मूलभूत अधिकाराबद्दल एक किमान मर्यादा होती. परंतु २०१७ मधे जिथे शहरी, श्रीमंत वा चांगल्या उपनगरांत राहणारे लोक जे जनरली पूर्वाश्रमीचे सवर्ण होते
असे पाहू गेल्यास या लोकांची इतरांच्या पाण्याच्या अधिकाराबद्दल उदासिनता अक्षम्य होती. प्राचीन काळातले ब्राह्मणांचे इतरांना हिन मानणे हिन होतेच पण २०१७ मधले असेच वागणे त्याही पेक्षा जास्त अन्याय करून गेले नि म्हणून अजूनच जास्त हिन म्हणायला हर्कत नाही.
================
आजही आपण वय, परीक्षेतले मार्क, मेडिकल चाचण्या इ इ अनेक आधारांवर अनेक गोष्टी लोकांना नाकारतो. ३० वर्षांनंतर परीक्षा का देऊ शकत नाही? इथे वय अस्साच उचलेला पॅरामीटर आहे. कधी काळी हा जन्माचे खानदान असावा. हे सगळं हिनच आहे. पण आपल्या काळातल्या गोष्टी आपल्याला सामान्य वाटतात.
5 Feb 2017 - 11:15 pm | अनरँडम
कारण माझा प्रतिसाद सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. माझ्या शब्दांमुळे गैरसमज होऊ शकत असल्यास शक्य असेल तर ते टाळता यावेत म्हणून सांगावेसे वाटते. यामागे निव्वळ संवादात फाटे फुटण्याची शक्यता कमी करणे एवढाच उद्देश आहे.
माझे इतिहासाचे ज्ञान फारच तोकडे आहे. पण मला खात्री आहे की ५००० वर्षांपुर्वी काही जातीव्यवस्था अस्तित्त्वात असल्यास तिचे स्वरूप आणि १९व्या शतकातल्या जातीव्यवस्थेचे स्वरुप यात बरेच वेगळेपण असावे. जातीव्यवस्था कायमच अन्याय्य होती का? जन्माधारीत होती का? हे प्रश्न महत्त्वाचे असतील पण या चर्चेसाठी गौण आहेत. मागील दोन-एकशे वर्षांच्या इतिहासात (म्हणजे आर्यन इन्वेजन थियरी अस्तित्त्वात आल्याच्या नंतरच्या काळात) जातीव्यवस्थेचे स्वरुप कसे होते? त्यात ब्राह्मण (पुन्हा एकदा चर्चा ब्राह्मणसापेक्ष आहे) आणि इतर जातींमधल्या लोकांमध्ये 'राष्ट्रभक्ति' या गुणाबद्दल काही मूल्यमापन करणे शक्य आहे का? हे या चर्चेत प्राथमिक मुद्दे आहेत.
तुमच्या मताप्रमाणे व्यवस्था पूर्णपणे अन्यायकारक नव्हती. तुमचे मत योग्य आहे. कुठलीही व्यवस्था पूर्ण न्याय्य किंवा अन्याय्य नसते. प्रत्येक व्यवस्थेत काही समाजघटकांवर अन्याय होतो हे तुम्हीही मान्य कराल. (तुम्ही सांप्रत काळात शहरांमध्ये झोपडपट्ट्यांत राहणार्या लोकांचे उदाहरण दिले आहे.) तुम्ही पुढे जाऊन 'सामाजिक न्याय' मागण्यासाठी समाजात मतभेद असणे हे पूर्णपणे न्याय्य नसले तरी ते प्रगल्भ न्यायाभिमुख व्यवस्थेचे लक्षण मानता. तेही योग्यच आहे. पण लगेच 'सामाजिक न्याय' वगैरे मागण्यासाठी समाजात काही सोय होती हे दाखवण्यासाठी भारतीय व्यवस्थेत अन्यायाविरुद्ध काही व्यापक संघर्ष न झाल्याचे सांगून भारतीय समाज न्यायाभिमुख असल्याचे ठरवता. मला वाटतं हा बौद्धिक आततायीपणा आहे. अमेरिकेत गुलामगिरी १७व्या शतकात अस्तित्त्वात आली आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याविरुद्ध काही व्यापक चळवळ सुरू झाली नव्हती याचा अर्थ दिड-दोनशे वर्षं गुलामांवर अन्याय होत नव्हता का?
जातीव्यवस्थेचे आजचे स्वरुप हा पूर्वग्रहरहित अभ्यासाचा विषय आहे. जातीय अस्मिता पूर्णपणे बाजूला ठेऊन यावर विचार केला गेला पाहीजे. पारंपरिक जातीय उतरंड आणि आधुनिक राष्ट्रभक्ति वगैरे संकल्पना यांना एकत्र आणतांना पूर्वग्रहांच्या रास्तपणाविषयीच जास्त चर्चा होते. तुम्ही जेव्हा 'ही जात सर्वात राष्ट्रभक्त' असे म्हणता तेव्हाच 'ही जात सर्वात राष्ट्रद्वेष्टी' असे म्हणणार्या समाजविरोधी (मुख्य म्हणजे सामाजिक न्यायविरोधी) विचारांना प्रोत्साहन देण्याचे काम करता हा अनपेक्षित दुष्परिणाम (unintended consequence) हे लक्षात ठेवावे.
5 Feb 2017 - 11:49 pm | arunjoshi123
सहमत.
तुम्ही पुढे जाऊन 'सामाजिक न्याय' मागण्यासाठी समाजात मतभेद असणे हे पूर्णपणे न्याय्य नसले नव्हते तरी ते प्रगल्भ ठिकठाक न्यायाभिमुख व्यवस्थेचे लक्षण मानता.
पेरियारने राष्ट्रद्रोह ५००० वर्षांचा (कपोलकल्पित) अन्यायी इतिहास हे निमित्त सांगून केला होता हे निमित्त आहे.
राष्ट्रभक्ती फक्त असते वा नसते असेच असते का? त्यात कमी जास्त असेल की! ब्राह्मण हा आयडेंटिफयेबल ग्रुप आहे. मोजणं (किंवा माझ्याप्रमाणे मत मांडणं) का अशक्य मानलं जावं?
हा मुद्दा आहे खरा. अनपेक्षित दुष्परिणाम असू शकतो. पण मिसळपावर असे लोक असायची संभावना मला वाटत नाही. "ब्राह्मण ही जात सर्वात राष्ट्रद्वेष्टी आहे" असा धागा निघाल्याचं मला माहित नाही. किंवा तसा प्रतिसाद देखिल मी कधी वाचला नाही.
पण माझ्या मतानं डायरेक्ट ब्राह्मण जातीच्या आजच्या लोकांचा द्वेष करणारे लोक अत्यल्प आहेत. आजच्या आपल्या (वाईट) परिस्थितीला (ब्राह्मणी) इतिहास कारणीभूत आहे म्हणून त्यास नाव ठेवणारे खूप आहेत पण सुखासुखी आजच्या ब्राह्मण जातीचा द्वेष करणारे लोक न के बराबर आहेत असे माझे व्यक्तिगत (भैतिक नि माध्यमांमधले ) निरीक्षण आहे.
कोण कोणास का नाव ठेवत आहे, याचा घोळ होताना दिसतोय, म्हणून लोक फार संवेदनशील बनलेत म्हणून आणि असंच गृहित धरत असं "सर्वात प्रखर" टाईप लिहिणं आपण शेवटपर्यंत टाळू लागलो तर ते देखिल योग्य नाही. लोक चांगले असता , चांगला विचार करतात हेच डीफॉल्ट गृहितक असायला पाहिजे. ते खरं ममत्व आहे.
==================
मला कोणी चॅलेंज का दिला नाही वा मत का व्यक्त केलं नाही (ब्राह्मणाने दुसर्या जातीला "सर्वात " सिद्ध करायला, किंवा अन्य कोण्या दुसर्या जातीच्या माणसाने त्याच्या वा तिसर्या जातीची) याची मला कमाल वाटते. उलट सगळे मी जे करतोय ते काहीतरी भयंकर अब्रम्हण्यम आहे असं करताहेत.
===============
थोडक्यात मूल्यमापन शक्य आहे नि ते आरामात करावं.
6 Feb 2017 - 7:42 am | अनरँडम
'मोजणं' हे तुम्ही कसे करता हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. म्हणजे लातूर-गोंदिया अशा वैयक्तिक किश्श्यांना (म्हणजे तुमचे किस्से, निरीक्षणे सांगणे योग्य आहे पण तात्पर्यकिर्तन टाळायला पाहीजे.) टाळून जातींबद्दल काही संख्यात्मक (गुणात्मक गोष्ट असली तरी तुम्ही उतरंड (order) लावून त्याबद्दल संख्यात्मक भाष्य केलेलेच आहे.) मूल्यमापन करण्याची तुमची पद्धत सांगा. (हे तुम्हाला पेचात पकडायला सांगत नाही. उत्तर द्या असे काही गरजेचे नाही.)
तुम्हाला तुमचे मत 'मांडण्याचा' अधिकार मी प्रथमच स्वीकारलेला आहे. त्या मताचा प्रतिवाद करण्याचा माझा अधिकारही मी तत्परतेने वापरला आहे. पण मला आता कंटाळा येऊ लागला आहे (म्हणजे हा कंटाळा तुमच्या प्रतिसादांमुळे नाही तर या विषयाबद्दल जनरली.) म्हणून मी थांबतो.
6 Feb 2017 - 6:43 pm | arunjoshi123
धागा २-३ महिन्यांनी वर काढू.
https://blogs.chapman.edu/wilkinson/2015/10/13/americas-top-fears-2015/
इथे एक आउटपुट आहे. मेथड नाही. पण मेथड बनवता येते. अगोदर नीट व्याख्या करायची मग पॅरामीटर ठरवायचे. मग विदा कसा जमवायचा नि अनालिसिस कसा करायचा.
बरच्या बातमी अमेरिकन लोकांची "सर्वात" मोठी भिती काय आहे ते लिहिले आहे.
4 Feb 2017 - 11:10 pm | गॅरी ट्रुमन
प्रॉब्लेम इतकाच की रास्त म्हणजे नक्की काय हे ठरविणार कोण आणि कसे आणि कुठच्या आधारावर? तुम्हाला जे रास्त वाटते ते इतर कोणाला मर्यादा ओलांडणारे वाटू शकते. आता उद्या कोणी म्हटले की तुम्ही उठल्यासुटल्या कोण राष्ट्रवादी आणि कोण राष्ट्रद्रोही ही सर्टिफिकिटे वाटत फिरत आहात असे करायची कोणाही भारतीय नागरिकाकडून अपेक्षा नाही आणि तसे कोणी करू नये. आणि तुम्ही तसे करत आहात या कारणास्तव तुम्हालाही कोणी राष्ट्रद्रोही म्हटले तर?
तुमचे प्रिस्क्रिप्शन लावायचे म्हटले तर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक देशद्रोही निघतील की काही विचारायची सोय नाही. राज ठाकरेंचे राजकारणच आणि म्हणून मनसेचे अस्तित्वच युपी-बिहारच्या 'भय्यांच्या' द्वेषावर अवलंबून आहे. असा द्वेष राज ठाकरे करत असतात म्हणून राज ठाकरे आणि यच्चयावत मनसे समर्थकही देशद्रोहीच म्हणायला हवेत. शिवसेनेनेही सुरवातीच्या काळात असाच द्वेष दक्षिण भारतीयांचा केला होता.म्हणजे शिवसेना समर्थकही देशद्रोही म्हणायला हवेत. बेळगावमधील कन्नड वेदीकेही देशद्रोही आणि वेळ पडली तर बेळगाव प्रश्नासाठी कर्नाटकला महाराष्ट्रातून जाणारे नद्यांचे पाणी अडवा म्हणणारेही देशद्रोही. कावेरीप्रश्नी असाच वाद कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आहे म्हणून ते पण देशद्रोही. असाच वाद पंजाब आणि हरियाणामध्ये सतलज यमुना कालव्यावरून आहे म्हणून ते पण देशद्रोही. उत्तर पूर्व भारतात असे कित्येक देशद्रोही असे असे निघतील. आणि ही यादी मारूतीच्या शेपटासारखी कधी संपायचीच नाही. आणि हो. स्वतःला देशभक्त म्हणवणारे लोक ते ज्यांना देशद्रोही मानतात त्यांचा द्वेष करत असतील तर त्याच न्यायाने ते पण देशद्रोही झाले. कारण प्रत्येकाच्या दृष्टीने बघितले तर दुसरी बाजू थोड्याबहुत प्रमाणावर रास्त पध्दतीच्या अपेक्षा ठेवत नाही!!
उठल्यासुटल्या अशी देशभक्त-देशद्रोही अशी सर्टिफिकिटे वाटत सुटल्यामुळेच राष्ट्रवादाचे समर्थक स्वतःचेच हसे करून घेतात हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
4 Feb 2017 - 11:16 pm | गॅरी ट्रुमन
अरे हो. काही महत्वाची उदाहरणे कशी विसरलो?
मुंबईत अनेक मराठी लोक गुजराथ्यांचा उल्लेख 'गुजर**' या शेलक्या विशेषणाने करतात तर अमराठी भाषिक मराठी भाषिकांना घा* म्हणतात. म्हणजे एका समाजातील काही लोक 'रास्त' नसलेल्या पध्दतीने वागतात. चला झाले ते देशद्रोही. कट्टर स्त्रीमुक्तीवाल्या (ज्यांना फेमिनाझी असे म्हटले जाते) पुरूषांविषयी असाच 'रास्त' नसलेला दृष्टीकोन ठेवतात. चला समस्त 'फेमिनाझी' झाल्या देशद्रोही. अनेक पुरूष स्त्रिया अमुक एका मर्यादेपलीकडे काम करायला सक्षम नाहीत असे मानतात (अनेक लोक म्हणतात की स्त्री आय.ए.एस अधिकार्यांना आरोग्य, कुटुंबकल्याण अशीच खाती मिळतात पण अर्थ, संरक्षण अशा महत्वाच्या खात्यांमध्ये काम करायला मिळत नाही त्याचे कारण हे आहे-- खरेखोटे मला माहित नाही). म्हणजे असे पुरूष स्त्रियांविषयी 'रास्त' नसलेला दृष्टीकोन ठेवतात. चला ते पुरूष झाले देशद्रोही.
इत्यादी इत्यादी
4 Feb 2017 - 11:31 pm | संदीप डांगे
दोन्ही प्रतिसाद प्रचंड आवडले.... चर्चेला योग्य मार्गावर आणण्यासाठी शब्दच सुचत नव्हते... ते आपण अचूक मांडले आहे.
जोशींचा 'देशद्रोह' आणि 'समाजांतर्गत कलह' ह्यात अंमळ गोंधळ झालेला वाटत आहे किंवा माझा त्यांचे विचार समजण्यात झाला आहे.
जोशींसाठी काही नवे प्रश्न.
१. देशभक्ती व राष्ट्रवादी असणे ह्या दोन वेगळ्या संकल्पना समजाव्या का?
२. भारतद्वेष्टे आणि राष्ट्रवादी असणे हे परस्परविरोधी आहे काय?
३. राष्ट्रवादी असणे आणि देशद्रोही असणे ह्या दोन बाबी एकत्र असू शकत नाही काय? (याचे उदाहरण द्यावे लागेल, पण ते राष्ट्रवाद म्हणजे जोशींना काय अभिप्रेत आहे ते कळल्याशिवाय शक्य नाही.)
वरील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास पुढे जात-धर्म इत्यादी चर्चा करण्यास नेमकी बैठक मिळेल...
(मला जरा शंका आहे की देशभक्त व राष्ट्रवादी यात काहीतरी मूलभूत फरक असावा. कॄपाया जाणकार, अभ्यासूंनी शंका दूर करावी.)
5 Feb 2017 - 1:22 am | arunjoshi123
राज्यशास्त्रात लोकांनी बरेच घोळ घातलेत पण साधारणतः संस्कृतीचा संदर्भ असेल तर राष्ट्र म्हणतात आणि सरकारचा संदर्भ असेल देश म्हणतात. माझ्यामत्ते आपल्याला फार फरक पडत नाही. जे लोक देशाला संस्कृतीच नाही, एक संस्कृती नाही, हा देश इंग्रजांनी बनवला, इ इ म्हणतात त्यांना पडत असेल.
--------------------------
राष्ट्रवादी देशद्रोही असू शकतात ना. पण कुंपणाच्या दुसर्या बाजूनं पाहायला लागेल. ( पण वरच तर गॅरी साहेब म्हटले पोलिस हा चोराच्या नजरेत एक गुन्हेगार असतो तसं काहीही म्हणायचं असलं अवघड आहे.)
-----------
राजदीप सरदेसाई चावलेल्या बर्याच लोकांना हे कळत नाही कि कुंपणाच्या एका म्हणजे एकाच बाजूनं विचार करायचा असतो. कुपणांच्या सगळ्या बाजूला व्हर्च्यूअल व्हिजन चे गॉगल लावून नसतं पाहायचं.
5 Feb 2017 - 1:08 am | arunjoshi123
तो रास्त शब्द (काही देशातल्याच लोकांचा) द्वेष या शब्दाच्या संदर्भाने , अनुषंगाने आहे. जनरल रास्त शब्दाची व्याख्या धुंडाळन्यासाठी नाही.
-----------------
जे लोक मराठी लोकांना घाटी म्हणतात ते त्यांचा आपण म्हणतोय त्या अर्थाने (हे लोक जगातच नसले पाहिजे होते, भारतातच नसले पाहिजे होते, किंवा भारतात कोनताही हक्क नसलेले गुलाम असायला पाहिजे होते, इ इ) . बायकांना पुरुषांना कापायचे नसते वा पाकिस्तानात पाठवायचे नसते.
--------------------
आपल्या नावडत्या लोकांची यादी बनवली तर ९९% भारतीय असतील, आणि बहुतेक कोनीच पाकिस्तानी नसेल. याचा अर्थ आपण पाकिस्तानवर जास्त प्रेम करतो असा होत नाही. तेव्हा चर्चेच्या संदर्भात उदाहरणे द्या.
5 Feb 2017 - 12:59 am | arunjoshi123
आय रिपिट. आपल्या समाजात अनंत गट असू शकतात. त्या गटात अनेक प्रकारच्या भिन्नता, भेद, वाद आणि संघर्ष असू शकतात. यात वावगं काहीच नाही. परंतु या वादांचा आणि संघर्षांचा मूलाधार काय असायला हवा? तर न्यायाची मागणी. याला राष्ट्रद्रोह म्हणत नाहीत.
ठरविणार कोण - प्रत्येक गोष्ट ठरवायला फोरम आहेत. कसे ठरवायचे त्याची फ्रेमवर्क्स आहेत. प्रशासकीय आहेत. धार्मिक आहेत. नैतिक आहेत. ज्यूडिशिअल आहेत. सोशल आहेत. आंतरराष्ट्रीय आहेत. अजूनही असतील. नसतील तर बनवता येतील. लोकांना समस्या सोडवता येत नाहीत म्हणायचं कारण काय?
परिणामशून्य व्यक्तिस्वातंत्र्य वेगळे आणि मानवसमूहांच्या बद्दल निर्णय घेणारे विचार वेगळे. उगाचच प्रत्येकाला वाटते ते वाटू द्यावे. नेत्यांनी मात्र सरळच असले पाहिजे.
हे ठरवण्याचा मेकॅनिझम आहे. उगाच राष्ट्रद्रोही म्हणून पिंक टाकून जायचे असेल तर भाग वेगळा.
===============
१. राज ठाकरे यांना यू पी भारतातच हवा. यू पी च्या लोकांचे यू पी त (च) भरपूर कल्याण होवो असे देखिल ते म्हणतात. द्वेष तुम्हाला दिसतो कारण तुमच्या विचारसरणीचा मूलाधार राजदीप सरदेसाई टाइप असावा. अर्थातच 'भिन्न भिन्न परिस्थिती असलेल्या प्रांतातील मायग्रेशन्स आणि स्थानिकांवरील अनिष्ट परपरिनाम असा त्याचा मुद्दा आहे. असा कोणता विषय घटनेत नाहीच. पूर्वोत्तरेत आय पी एल आणि काश्मिर हिमाचल मधे काही बंधने सोडली तर मुक्त संचार स्वातंत्र्य असं लिहिलं आहे. ठाकरेला शिव्या घालायचा अधिकार त्यालाच आहे ज्याला हे इंटर्नल इमिग्रेशनचं फ्रेमवर्क माहित आहे.
नक्की काय प्रकरण आहे मला कल्पना नाही. पाहून सांगतो.
यात द्वेष यत्किंचितही नाही.
----------
यातलं कोणीही देशद्रोही नाही.
----------------------------
आहेतच. खूप आहेत. राजकीय पक्षांत देखिल्खूप लोक देशद्रोही आहेत. पेरियार टाइप.
-----------------------------
हो ना. स्वतःला पोलिस म्हणवणारे लोक ते ज्यांना चोर मानतात त्यांना शिक्षा करत असतील तर त्याच न्यायाने ते पण क्रिमिनल झाले. बरोबर?
=================
तुमच्या विचारसरणीचा मूलाधार (ही माझी लाडकी फ्रेज) मनुष्यसमूह अंततः अनस्क्रूपूलसली स्वार्थी असतात आणि त्यांची चांगले वागायची अजिबातच इच्छा नसते असा असावा. पण असं नाही. लोकांमधे जे पॉइंट्स ओफ अॅग्रीमेंट आहेत ते अनंत आहेत आणि पोइंट्स ऑफ डीसअॅग्रीमेंट मर्यादित आहेत. (म्हणून तर चांगले १२५ कोटीचे ढोलेच्या ढोले देश आहेत.). प्रश्न मानवसमूहाच्या रास्त काय ते ठरवण्याच्या क्षमतेचा नाही.
5 Feb 2017 - 10:10 pm | गॅरी ट्रुमन
एकूणच कोण राष्ट्रभक्त आणि कोण राष्ट्रद्रोही याची सर्टिफिकिटे वाटत तुम्ही सुटला आहात म्हणून एकच प्रश्न-- अशी सर्टिफिकिटे वाटायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही न्यायाची मागणी या आधारावर इतरांना राष्ट्रद्रोही ठरवत असाल तर इतरही तुम्हाला त्याच आधारावर राष्ट्रद्रोही ठरवू शकतातच की. अर्थात इतरांना अशी सर्टिफिकिटे वाटत फिरण्यात तुमच्याइतका इंटरेस्ट असेल असे वाटायचे काही कारण नाही पण ती एक शक्यता आहेच की.
हे कसे झाले-- मुळातच युपी-बिहारच्या लोकांचा विरोध करायचा, म्हणजे ते 'आपल्या' राज्यात नकोतच. ते असतील तिथेच असूदेत (म्हणजे आपल्या डोक्याला कटकट नको). असे असेल तर शहाजोगपणे त्यांचे 'युपीमध्ये' भरपूर कल्याण होवो असे म्हणायला काय बिघडते? म्हणजे याचा अर्थ राज ठाकरेंना खरोखरच त्यांचे कल्याण व्हावे असे वाटते असे म्हणणे कितपत बरोबर आहे याचा निर्णय मी वाचकांवरच सोडतो.
अर्थातच राज ठाकरेंना युपीमधल्या लोकांविषयी प्रेम वाटलेच पाहिजे असा आग्रह नक्कीच नाही. पण मुद्दा हाच की आपल्या देशातील एखाद्या दुसर्या व्यक्तिसमूहाविषयी 'रास्त' अपेक्षा न ठेवणे हा एखाद्याला देशद्रोही ठरविण्याचा निकष असेल तर राज ठाकरे तो निकष पूर्ण करत आहेत (आणि रास्त म्हणजे नक्की काय हे ठरवायचा अधिकार अरूण जोशींना असेल तर तो इतरांना नसायचे काही कारण नाही). बाकी अशी देशभक्त-देशद्रोही ही सर्टिफिकिटे वाटत फिरण्यात मला तरी काडीमात्र इंटरेस्ट नाही. मुद्दा एवढाच की या निकषावर एखाद्याला देशद्रोही ठरवायचे तर देशद्रोह्यांचीच बहुसंख्या देशात होईल आणि मग देशद्रोही या शब्दाला काही अर्थच राहणार नाही तो शब्द अत्यंत बुळबुळीत बनून जाईल.
कर्नाटकात तामिळ लोकांविरूध्द आणि तामिळनाडूत कन्नड लोकांविरूध्द हिंसाचारही झाल्याचे वाचल्याचे आठवते. तरीही द्वेष नाही?
आय.टी क्षेत्रात एक SCJP (Sun Certified Java Programmer) हे सर्टिफिकेशन असते. त्याच धर्तीवर कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त या सर्टिफिकेशनचे कोर्सेसच सुरू करावेत का? :)
5 Feb 2017 - 11:14 pm | arunjoshi123
म्हणजे कोणत्याही देशात राष्ट्रद्रोही लोक नसतातच असे तुम्हाला म्हणायचे आहे का? राष्ट्रद्रोह म्हणजे काय, त्याचे कायदे काय, त्याची खाती कोणती आणि त्यांनी कोणते लोक आयडेंटिफाय केलेत असं काहीही कुठेही जगात नसतं का?
असा अधिकार कोणी माझ्यापासून काढून घेतल्याचं मला आठवत नाही.
पुन्हा तेच. ज्या कायद्याच्या आधारावर पोलिस चोराला गुन्हेगार ठरवतो त्याच कायद्याच्या आधारे चोर देखिल पोलिसाला गुन्हेगार ठरवू शकतात? टिपिकल राजदीप लॉजिक.
मनसेने मुंबईबाहेर भैया लोकांना त्रास दिला असेल तर राज ठाकरे नक्कीच राष्ट्रद्रोही आहे. मुंबईबाहेर म्हणजे जिथे लोकसंख्या विस्फोट होत नाहीय. देशातल्या अतिमागास भागातून अतिप्रगत भागात जाणार्या लोकांमुळे अतिप्रगत भागातल्या सामान्य कुवतीच्या लोकांना अतित्रास होतो. याच हिशेबाने ट्रम्प जगद्द्रोही नाही. हिमाचल, काश्मिर, पूर्वोत्तर भागात अशी बंधने आहेत. मणिपूर मधे राज्यातल्या राज्यात राजधानीतले लोक पर्वतांवर मालमत्ता घेऊ शकत नाहीत (उलटे अलाउड आहे.). सबब अशी/असली, इ मागणी त्याची असेल तर ती चर्चा करण्याच्या लायकीची आहे.
राजकारणी लोक नीचच असतात असे वाटणे हे देखिल राजदीप विचारसरणीचा भाग आहे. माध्यमांनी नेत्यांना नावे ठेवलेली आवडतात म्हणून नेत्यांची नीचोत्तम प्रतिमा बनवत राहणारी माध्यमे पाहणे सोडून द्या असे मी म्हणेन.
=========
ज्या देशात आपण राष्ट्रद्रोही लोकांना राष्ट्रद्रोही म्हणू शकत नाही तो देश देशच नव्हे. माझं जाऊ द्या. तुमचा एक निकष ठेवा. त्यात जेवढे केवढे राष्ट्रद्रोही निघतील त्यांना स्पष्त तसे म्हणा. कारण एक प्रकारे तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रद्रोह, वा अन्य राष्ट्रीय जाणिवा या इतक्या बायनरी देखिल नसतात आणि स्थिर देखिल नसतात. म्हणून किती पराकोटीचा भारतद्वेष, किती सातत्याने, किती प्रमाणात, किती हिंसेने, किती नुकसानदायक, इ इ अनेक हिशेब मांडता येतील.
तुम्ही वापरलेला "या निकषावर" शब्द पण ड्यांजर आहे. हिंदू मुस्लिमांचे दंगे होतात म्हणजे ते एकमेकांचा द्वेष करतात असे होते का? सगळेच? सदैव? फक्त? ? ? इ इ आई बाळाला चिडून धपाटा घालते. बाळ आईने नंतर प्रेमाने जवळ आणलेला चमचा धुत्कारते. ही उदाहरणे देखिल तुम्ही पुढच्या प्रतिसादात हे दोघे राष्ट्रद्रोही आहेत हे सिद्ध करण्यासाठी देणार आहात का?
आणि तुम्हाला देशद्रोही शब्द बुळबुळित बनण्याची भिती वाटते? राष्ट्रवादाची धग, रग जाणवून दिली नाही तर राष्ट्रद्रोही बनणे फॅशनेबल बनून जाते. भारत याचा बळी आहे. लिबरलांना तर ही धग अधिक प्रखरतेने जाणवून द्यायची असते. कारण व्यवस्था न्याय देण्यासाठी आपल्या परीने झटते आहे याची त्यांना अजिबात चाड नसते. लिबरलांचा स्वतःचा रेप रेट (प्रति १००० लोकांत झालेले बलात्कार) हा सैन्याच्या रेप रेट पेक्षा २५ पट असला तरी ते सैन्य आणि सरकार यांची अपरिमित हानी करतात.
---------
बाय द वे, मी खालील लोकांना स्पष्ट राष्ट्रद्रोही म्हणतो-
१. पंडितांना हाकलून देणारे(च) काश्मिरी फुटीरवादी.
२. व्यवसाय म्हणून नक्षलवाद करणारे नक्षली
३. खलिस्तानी अतिरेकी.
४. हिंदूचा काफिर म्हणून द्वेष करणारे मुस्लिम
५. मुस्लिमांना घाण, नको मानणारे हिंदू
६. भारताचा एक घाण जागा म्हणून द्वेष करणारे एन आर आय
७. ईशान्य भारतातले अतिरेकी
८. भारतातल्या कायदेशीर राजकीय विचारसरण्यांचे असणेच मान्य नसलेले राजकारणी
यांची बेरीज किती होते ते महत्त्वाचे नाही. हे सगळे अॅड्रेस करणे महत्त्वाचे आहे. लिबरल बनून राष्ट्रप्रेमाचे, जगद्प्रेमाचे सर्टीफिकेट देणे घातक आहे.
------------------
कोणतेही कोर्सेस करू नयेत. कोण्याही गाढवाला हातोडा देऊन काँप्यूटरसमोर बसवावे. कंपनीचे कल्याण होईल.
6 Feb 2017 - 10:20 am | गॅरी ट्रुमन
काश्मीरमधील किंवा पंजाबातील दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना ठार मारणे, देशातून फुटून निघायच्या मागणीवरून हिंसाचार करणे इत्यादी प्रकार केले होते. हे प्रकार आणि 'दुसर्या समुदायाने कसे वागावे याच्या रास्त मागणीची पूर्तता न होणे' या दोन गोष्टी एकच आहेत का? तुम्ही जे 'रास्त मागणीची पूर्तता न होणे' वगैरे लिहिले आहेत त्यातून देशभक्त-देशद्रोही या संकल्पनेचेच क्षुल्लकीकरण (ट्रिव्हियलायझेशन) होत आहे. असो.
2 Feb 2017 - 12:26 am | संदीप डांगे
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही?
>> ते कसे तेच समजले नाही, समजल्यास आहे की नाही ते सांगता येईल. धागा काढण्याचा तुंबड्यालावी प्रकार त्याच करता आहे, ते समजले असते तर धागा काढलाच नसता.
ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का?
>> माझ्यासाठी भारतात फक्त भारतीय राहतात. ब्राहमण, दलित, मराठा वगैरे यांना ब्राह्मण, दलित मराठा असण्यासाठी भारताची गरज नाही. ज्या भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले ते अमेरिकन नागरिक झाले पण त्यांनी भारत सोडला म्हणून त्यांची जातही इथेच सुटून गेली काय? तुमचाच प्रश्न समजा असा विचारला की बुवा जे भारतीय मुस्लिमांचा द्वेष करतात ते भारतद्वेषी आहेत तर तुमचा तर्क इथेही लागू पडेल काय? ते राष्ट्रद्रोही आहेत असे समजावे काय?
डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का?
>> असे कोणत्या जाती २०१७ साली म्हणत आहेत काय? मला खरंच माहिती नाही. तसेच आम्हाला जातीयवादामुळे, आरक्षणामुळे त्रास होतो म्हणून आम्ही भारत सोडून आलो, भारतात परत जाणार नाही असे काहीसे प्रतिपादन आदित्य कोरडे साहेबांच्या लेखात त्यांच्या कोणा ब्राह्मण मित्राने केले होते व तेही एक ब्राह्मण मुलांच्या एका भागाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे असे समजले गेले. तर माझी शंका अशी की अशा परिस्थितीचे कारण देऊन भारतदेश सोडून जाणार्यांना राष्ट्रद्रोही म्हणावे की कसे? इन अदर वे, त्यांनी त्यांच्यासाठी दुसरा देश निवडलाच आहे ना?
ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय?
>> अहो मलाच समजून घ्यायचे आहे, ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे असणे हे काय आहे ते, ते आधी समजवा, मला ते समजल्यानंतर ते कसे नाही हे समजवू शकेन की नाही ते बघू...
2 Feb 2017 - 1:13 am | arunjoshi123
चला, "तुमच्यासाठी" एकवेळ ठिक आहे. उद्या "भारतीय" सवर्णांनी एक डाव टाकला आणि "भारतीय" दलितांना पिडित केले. समजा त्याविरोधात "भारतीय" दलितांनी आवाज उठवला तर तुम्ही अजिबात त्यांची साथ देणार नाही. कारण? तुमचा मॉनिटर मोनोक्रोम आहे. त्यात कोनताही कॉट्रास्ट नाही. मला तर "दलित" दिसतच नाहीत ही भाषा अशावेळी अयोग्य असेल.
2 Feb 2017 - 1:37 am | संदीप डांगे
येस, माझा मॉनिटर मोनोक्रोम आहे. (त्यात वाईट काय आहे?)
आणि त्यात माणसाने माणसावर केलेले अन्याय स्पष्ट दिसतात, त्या अन्यायांना सवर्ण-दलित असे रंग नसतात. कोण्या एका जातीचा, धर्माचा एकच (बरा-वाईट) असा विशेष गुण नसतो. ते तुम्ही मानता त्यामुळे तुम्हाला सवर्ण-दलित, वगैरे असे वेगवेगळे लोक दिसतात. तुमचा भारत असा वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी रंगबेरंगी (जे रंग तुम्हीच दिलेत) भरलेला असा दिसत असेल. तर कोणाच्या विरोधात कोणाला साथ द्यायची ह्यासाठी रंग बघायची जरूर मला भासत नाही. :-)
2 Feb 2017 - 3:38 am | गामा पैलवान
लोकहो,
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती, असं मूळ विधान लेखात आहे. त्यातल्या आहे बद्दल वाद उपस्थित होऊ शकतो. मात्र होती हे निर्विवाद सत्य आहे. इंग्रजांनी लढाऊ जाती आणि बिनलढाऊ जाती असा सरळ जातीभेद मांडला होता. फक्त लढाऊ जातींनाच सैन्यभरतीसाठी प्रवेश होता. ब्राह्मण बिनलढाऊ जातींत समाविष्ट होते कारण इंग्रजांना ब्राह्मणांपासून राज्यास सर्वाधिक धोका वाटंत असे. म्हणून ब्राह्मण ही सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात होती असं मानायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
2 Feb 2017 - 3:45 am | संदीप डांगे
माझ्या मते, लढाऊ गुणविशेष (शारिरीक, वांशिक) असणे आणि राष्ट्रवादी (बौद्धिक, भावनिक) असणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
2 Feb 2017 - 11:01 am | अप्पा जोगळेकर
लढाऊ गुणविशेष तरी इंग्रजांनी ठरवले म्हणून खरे मानायचे का ?
2 Feb 2017 - 11:17 am | संदीप डांगे
इंग्रजांनी ठरवले म्हणून मानायचे असे मला अभिप्रेत नव्हते. किंवा एखादी जमात (वंश, रेस ह्या अर्थाने, जात या अर्थाने नव्हे) लढाऊ, बाकीचे बिनलढाऊ असं सरळ विभाजनही मंजूर नाही. त्यातही लढाऊ म्हणून श्रेष्ठ आणि व्यापारी म्हणून कमअस्सल असे समजणे गैर. मुळात शारिरीक गुणवैशिष्ट्यांमुळेही 'श्रेष्ठ-कनिष्ठ' असा काही भाव नैसर्गिक नाही. प्रत्येक वंशाला, शरीराला आपले असे गुण-अवगुण असतात. पण जमात आणि जात यांत बेसिक अंतर आहे. माझं आकलन चुकत असेल तर नक्की कळवा.
2 Feb 2017 - 7:02 am | फेदरवेट साहेब
बिन लढाऊ मध्ये ब्राह्मणच नाही तर तथाकथित गुन्हेगार जाती सुद्धा होत्या. उद्या त्यांनाही 'लढाऊ मध्ये नाव नव्हते म्हणजे ब्रिटिश त्यांना घाबरायचे म्हणुन ते सर्वात देशभक्त' म्हणाल!. हा एकंदरीत तर्क म्हणजे पेरवाच्या झाडाला 2 बादल्या पाणी घातल्यामुळे फ्रीज मध्ये ४ आंबे आहेत कारण पेट्रोल ज्वलनशील असते सारखा आहे.
2 Feb 2017 - 7:43 am | शब्दबम्बाळ
आणि म्हणून मी डब्यात पोहे आणलेत!
2 Feb 2017 - 9:27 am | साहेब..
_/\_
2 Feb 2017 - 6:47 am | सुखीमाणूस
ही चुकीची समजूत आहे.
तसे असते तर स्वतन्त्र भारतात मोठ्या सन्ख्येने ब्राह्मण सैन्यात गेले असते.
इन्ग्रजान्मुळे ब्राम्हणी व्यवस्थेला धोका पोहोचत होता म्हणून त्यानी कडवा विरोध केला.
प्रत्येक जातितले नेत्रुत्व हे आपली जात श्रेष्ठ, जातिवर अन्याय होतोय आणि इतर जाती त्याला कारणिभूत आहेत ह्याच आधारावर फोफावते.
त्याना जर खरच स्वजातीतल्या लोकाना वर आणायचे असेल तर असे सगळे राजकारण न करता स्वजात सुधारणेच्या मागे लागतिल.
जात श्रेष्ठ ह्या दुराभिमानात वेळ न घालवता प्रगती करुन दाखवतिल.
आज जो काही उफाळून आलेला ब्राह्मणविरोध आहे तो केवळ BJP सत्तेवर आहे आणि त्यान्चा mastermind RSS आहे यामुळे आला आहे.
2 Feb 2017 - 11:30 am | arunjoshi123
ओके.
आता मला सांगा
१. प्रत्येक व्यक्तिठायी राष्ट्रवाद समान प्रखरतेचा असतो काय?
२. प्रत्येक समाजात वा जातीत वा स्थानात राष्ट्रवाद समान प्रखर असतो ककाय?
३. पुणे शहरात आणि इम्फाळ शहरात राष्ट्रवाद समान प्रखर आहे काय?
४. पुणे शहर आणि इम्फाळ शहर यांचे जातीय कंपोझिशन सेम आहे काय?
५. मग पुणे शहरातल्या जातींना इंफाळ शहरातल्या जातींपेक्षा कमी वा अधिक राष्ट्रवादी मानता येते काय?
६. राष्ट्रवादीपणाचे कोणते एकक नाही, पण त्याची तीव्रता भिन्न भिन्न असते कि नसते? (कि फक्त बायनरी प्रकारअसतो?)
७. विविध लोकसमूहांच्या राष्ट्रवादीपणाचा आपला अभ्यास झाला आहे काय? (मंजे तुमचा ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी आहेत हे चूकच आहे हा डाय्लॉग कुठून आहे? किमान ते प्रथम नाहीत इतकी रँकिंग तुम्ही केली आहे. मग कोण आहे प्रथम?)
८. ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी असण्याची शक्यता शून्य आहे याची कारणे काय?
=================================
मी म्हणतो ते (सर्वात प्रखर इ) पोलिटिकली इनकरेक्ट असू शकतं पण फॅक्च्यूअली करेक्ट असू शकतं.
==============
एकतर खूप ब्राह्मण सैन्यात आहेत. शिवाय बायका सुद्धा प्रखर राष्ट्रवादी असतात.
==============
१००% ++
आपलं ते श्रेष्ठ यात काही दुर (दुराभिमानमधलं दुर) आहे असं मला वाटत नाही. आपलं ते श्रेष्ठ अशी भारतीयांत कमी असल्यामुळे आपण अंडरविअर सुद्धा अमेरिकी लोकांना रॉयल्टी दिल्याशिवाय घालू शकत नाही (बाकी तंत्रज्ञान जाऊच द्या असं म्हणायचं आहे.).
===============
वरील वाक्य आजच्या इस्लामच्या अधोगतीला कारणीभूत आहे. बुद्धींमंत लोक इस्लामच श्रेष्ठ म्हणून तिथेच राहिले असते तर धर्म कट्टरांच्या हाती पडला नसता. पण शिक्षित मुसलमानांना आपल्या धर्माचा असा काँप्लेक्स आला श्रेष्ठ तर असोच, नॉर्मल म्हणायला देखिल लाज वाटू लागली. आत्मश्रेष्ठत्व हे वाईटच असतं असं कोण शिकवलं कोण जाणे.
2 Feb 2017 - 8:12 pm | सुखीमाणूस
आणि त्याचे प्रदर्शन हे तर देशासाठी त्याहुन घातक आहे.
त्याअर्थाने आजच्या काळातले ब्राह्मण हे राष्ट्रप्रेमी म्हणायला हवे. कारण शिकुन शहाणे झाल्यामुळे ते जात मिरवत नाहित किवा भीतीमुळे किवा पुर्वजान्च्या क्रुत्याच्या लाजेमुळे... पण जात मिरवत नाहित हे खरे {हे मत मी माझ्या शहरात रहाताना आलेल्या अनुभवातुन बनवले आहे.}
तसे पाहिले तर भारतिय सन्विधान आणि कायदा याचे पालन जो करतो तोच खरा राष्ट्रप्रेमी....
जातिपाती जर सगळ्यानी स्वताच्या घरापुरत्या मर्यादित ठेवल्या तर राष्ट्रप्रेमाचा क्रम लावावा लागणार नाही
2 Feb 2017 - 9:54 am | चिनार
खरं म्हणजे या धाग्यावर चर्चा होण्याऐवजी खालील दोन वाक्यांपैकी जास्त मोठा विनोद कोणता यावर चर्चा व्हायला हवी...
पहिले वाक्य :
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
दुसरे वाक्य:
शरद पवारांच्या पक्षाचे नाव "राष्ट्रवादी" आहे .
"भोलानाथ, मी डोळे मिटण्याआधी या प्रश्नाचे उत्तर मिळू दे रे बाबा...
2 Feb 2017 - 10:46 am | विशुमित
<<<<"भोलानाथ, मी डोळे मिटण्याआधी या प्रश्नाचे उत्तर मिळू दे रे बाबा...
-- हसून हसून जबडा दुखायला लागला राव
2 Feb 2017 - 11:00 am | arunjoshi123
अश्या विनोदांची तुलना करण्याऐवजी खालील विषयांवर गंभीर अशी चर्चा करावी.
१. संदर्भ माहित नसल्याने माणूस कुठेही काहीही कसा बरळतो.
२. आपल्या स्वतःच्याच विनोदबुद्धीची किव कशी करावी.
३. स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य लोक महामूर्ख असतात अशा भ्रमातून कसे बाहेर यावे.
४. एखाद्याला जातीयवादी ठरवण्याची घाई कशी टाळावी.
५. सामाजिक विषयांवर चर्चा करताना एखाद्या बिनमहत्त्वाच्या व्यक्तिच्या मताची चिरफाड करणे कसे अनावश्यक असते.
६. मिसळपावचा उपयोग विधायक कामांसाठी कसा जास्त करता येईल.
७. संक्षेप कसे वापरावेत.
८. मधेच येऊन कुठेही काहीही बरळलो तर आपल्याला शहाणे समजले जाण्याची श्यक्यता सर्वत्र असते काय.
2 Feb 2017 - 11:31 am | पुंबा
ह्या प्रश्नाचे उत्तर लवकर शोधा बरं.. गरज आहे तुम्हाला.
2 Feb 2017 - 11:56 am | arunjoshi123
चेन ऑफ रिस्पॉन्सेस वूड गो इनटू डायवर्जेंट सर्क्यूलर रेफरेन्सेस.
2 Feb 2017 - 11:32 am | विशुमित
चला मूळ स्वभावावर आले म्हणायचे.
पूर्ण प्रश्नांमागचा अप्रोच एकच "सर्वात प्रखर"...!!
2 Feb 2017 - 9:30 pm | arunjoshi123
सर्वात प्रखर लोक आपल्या मतावर कायम आहेत. ते परतून येत नाहियेत. आणि अप्रोच काय आहे हे सर्वांना सांगायचं काम नका करू. ते सर्वांना दिसत आहे आणि जी काय मंत्रपुष्पांजली माझ्या अंगावर टाकायची ती टाकताहेत.
2 Feb 2017 - 12:49 pm | चिनार
जोशी साहेब , आपल्यासहीत सर्व मिपाकरांच्या अभ्यासू वृत्ती विषयी मला अतिशय आदर आहे हे नमूद करू इच्छितो.
१. संदर्भ माहित नसल्याने माणूस कुठेही काहीही कसा बरळतो.
>> माझ्या मते,मी अमुक एका जातीचा आहे म्हणून मी राष्ट्रवादी हा विचार राष्ट्रविघातक आहे. तसेही राष्ट्रवादी असण्यापेक्षा राष्ट्रोपयोगी असणं उत्तम. मी अमुक एका जातीचा आहे ह्याचा मला अभिमान नाही आणि खेदही नाही. पण माझ्या मात्यापित्यांच्या पोटी भारतभूमीत जन्मलो याचा अभिमान आहे आणि राहील.
२. आपल्या स्वतःच्याच विनोदबुद्धीची किव कशी करावी.
>> ज्या परमेश्वराने विनोदबुद्धी दिली त्यानेच तिची कीव न करता जास्तीत जास्त उपयोग करून आपले आणि इतरांचे आयुष्य सुखकर कसे करता येईल हा विचार करण्याची सद्बुद्धी दिली आहे.
३. स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य लोक महामूर्ख असतात अशा भ्रमातून कसे बाहेर यावे.
>> माझे थोडेबहुत लिखाण वाचल्यास, मला स्वतःच्या असलेल्या आणि नसलेल्या अकलेची जाणीव आहे हे दिसून येत असावे. अर्थात तसे दिसत नसल्यास लेखनाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करेल. माझे लिखाण वाचावे असा आग्रह नाही.
४. एखाद्याला जातीयवादी ठरवण्याची घाई कशी टाळावी.
>> जाता जाता जात काढतो (आपली आणि समोरच्याची) तो जातीयवादी असे माझे मत. आपल्याशी जास्त संपर्क नसल्यामुळे आपण तसे आहेत का हे सांगू शकत नाही आणि सांगितलेही नाही.
५. सामाजिक विषयांवर चर्चा करताना एखाद्या बिनमहत्त्वाच्या व्यक्तिच्या मताची चिरफाड करणे कसे अनावश्यक असते.
>>व्यक्ती महत्त्वाची की बिनमहत्त्वाची हे त्याच्या मतांवरून आणि आचरणावरून कळते. मत महत्त्वाचं की बिन महत्त्वाचं हे व्यक्ती बघून ठरवू नये. अर्थात हे माझं मत.
६. मिसळपावचा उपयोग विधायक कामांसाठी कसा जास्त करता येईल.
>> विधायक कामासाठी पूर्ण शक्तीनिशी कायम उपलब्ध असेल, विघातक कार्यांसाठी नाही.विधायक की विघातक हे ठरवण्यासाठी अंतर्मनाचा कौल घेण्यात येईल.
७. संक्षेप कसे वापरावेत.
>> संक्षेप या शब्दाचा अर्थ माहिती नसल्यामुळे या मुद्द्यावर पास.
८. मधेच येऊन कुठेही काहीही बरळलो तर आपल्याला शहाणे समजले जाण्याची श्यक्यता सर्वत्र असते काय.
>> शहाणं समजणं आणि शहाणं असणं ह्यात फरक आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे. शहाणपणचे सर्टिफिकेट मिपावर वाटले जाते का ह्याविषयी कल्पना नाही.
2 Feb 2017 - 11:27 am | जानु
एक मात्र नक्की या धाग्यावर काही नेमक्या प्रश्नांची होऊ शकते आणि भविष्यातील काही मोठ्या चर्चांचे बीजारोपण पाहूया काय होते ते ....तसे अजो ची मते आणि काही प्रश्न विचार करावयास लावतात. आण्णा तुम्ही त्यांच्या वाक्यात काय चुक आहे त्याचे विवेचन केले तर अधिक योग्य होईल असे वाटते.
2 Feb 2017 - 12:46 pm | arunjoshi123
इथे या फार लोकांचा फार गोंधळ होत आहे.
"ब्राह्मण ही सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात होती आणि आहे" हे सोडून त्या धाग्यावरचे अन्य लेखन त्या संदर्भात योग्य होते हे जितक्या लोकांना कळू शकते तितक्या लोकांना कळले आहे. फक्त इतकचे विधान उरले आहे.
यात खालील उपचर्चा आहेतः
१. मला जात हीच संकल्पना अमान्य आहे म्हणून हे विधान चूक आहे. (इति धागाकर्ते डांगे)*
२. आम्हाला राष्ट्रवाद हीच संकल्पना मान्य नाही म्हणून हे विधान चूक आहे. (हे लोक अजून तरी विहिरीच्या कठड्याला थांबलेत. पन मारतील उडी. )
३. आम्हाला श्रेष्ठत्व हीच संकल्पना अमान्य आहे. (असे म्हणणारे बरेच आहेत वर. एखाद्या परिमाणाचा गणितीय क्रम लावताच येत नाही म्हणून मी लावलेला क्रम नक्कीच चुकिचा आहे.)
४. धागापात्र (मंजे मी) एक नीच, संकुचित, जातीयवादी, असंस्क्रूत, बेशिक्षित , आणि विशेषतः निर्बुद्ध इ इ मनुष्य आहे असं म्हणायची घाई झाली आहे म्हणून हे विधान चूक आहे.
५. या धाग्यात इतर जातींची तुलना आहे, तुलना ही फक्त श्रेष्ठ आणि नीच अशी बायनरीच असते, म्हणून हे विधान करणेच चूक आहे, विधान चूक आहे का नाही ते असोच.
६. एखाद्या सामाजिक मंचावर (मंजे मिसळपावर) आपल्या सब्जेक्टिव मतांची अभिव्यक्ति करणेच चूक असते म्हणून हे विधान चूक आहे. (मंजे मी राष्ट्रवादाची व्याख्या, एकक, निकष, त्यांची गनिते, इ इ साभ्यास मत मांडलेले नाही. एक गट फिल टाकलेला आहे. मला जबर्या किंवा साधेही दाखले दिले तर मी अन्य मते स्वीकारायला तयार आहे हे त्यांना कळत नाही.)
७. बर्याच लोकांना ब्राह्मणांच्या बाजूने बोलणे कालसुसंगत वाटत नसावे. (१९८० मधे मी काही दलित साहित्य वाचले होते. त्यात ब्राह्मणांसाठी बरीच स्तुतिपर वाक्ये देखिल असायची जी अशीच मोघम स्वरुपाची होती. आता तो ट्रेंड बंद झाला आहे.)
===================
या उपचर्चा धाग्याचा विषय नाही.
=================
काही लोकांनी मात्र विधानाचा उत्तम प्रतिवाद केला आहे. राष्ट्रवाद, जात आणि श्रेष्ठत्व आणि तिन्ही व्हॅलिड संकल्पना मानून हे विधान कसं चूक वा बरोबर आहे यावर दुसरी मुख्य चर्चा होऊ शकते.
====================
संदीप डांगे आणि मी काही जालशत्रू इ नाहीत. मी त्यांचे काही धागे नि प्रतिसाद वाचलेत. मला त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय नाही. त्यांच्या मनात आलेला "असे विधान लिहिणारे लोक कशा मानसिकतेचे असू शकतात" याला काहीतरी आधार असू शकतो. मला ते विधान का लिहावं वाटलं आणि डांगेंना हा धागा का काढावा वाटला यावर विचार केला तर हे भारतीय समाजाबाबत बरंच काही बोलून जातं. ही पहिली मुख्य चर्चा असू शकते.
==================
बाकी ज्यांना बेसिक मॅनर नाहीत त्यांनी तरी किमान डिस्टर्ब करू नये.
2 Feb 2017 - 2:43 pm | विशुमित
<<<<बाकी ज्यांना बेसिक मॅनर नाहीत त्यांनी तरी किमान डिस्टर्ब करू नये.>>>
-- पुन्हा तेच "सर्वात प्रखर". बाकीच्यांचा नंबर त्या खालोखाल लागतो.
2 Feb 2017 - 9:27 pm | arunjoshi123
अहो, पुन्हा तेच मंजे काय? मी गप्प कधी बसलोय?
2 Feb 2017 - 1:45 pm | गामा पैलवान
सुखीमाणसा,
जुलमी इंग्रजी राजवटीस प्रखर राष्ट्रवादी ब्राह्मणांचा धोका वाटायचा. म्हणून ब्राह्मणांना मुद्दाम सैन्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र स्वतंत्र भारतात राष्ट्रवाद दाखवण्यासाठी सैन्यात जायची गरज नाही.
आ.न.,
-गा.पै.
2 Feb 2017 - 8:16 pm | सुखीमाणूस
जो सैन्यात जातो तो राष्ट्रवादी नम्बर १.
2 Feb 2017 - 8:37 pm | मोदक
3 Feb 2017 - 9:08 am | साहेब..
हा फोटो एकदम कहर आहे.
2 Feb 2017 - 1:49 pm | गॅरी ट्रुमन
काश मी हा प्रतिसाद लिहिला नसता आणि काश अनुप ढेरेंनी नायकर म्हणजे केवळ रामद्वेष्टे होते असे नाही असे म्हटले नसते!!
2 Feb 2017 - 2:42 pm | पैसा
अब पछताए का होत! पण एका मनोरंजक चर्चेबद्दल सर्व चर्चाकर्यांचे आभार!
2 Feb 2017 - 8:18 pm | सुखीमाणूस
मस्त चालली आहे कि चर्चा...
2 Feb 2017 - 9:24 pm | arunjoshi123
ट्रुमन साहेब, इतिहासातल्या कोण्याही माणसाला कोणाच्याही सोबत बसवायचं (आंबेडकराशेजारी पेरीयार) आणि केवळ ऐतिहासिक आहे म्हणून कोणीही देशद्रोही नव्हता म्हणत सुटायचं ही एक घातक सोय होत चालली आहे.
===========
भारतात देशद्रोही भारंभार होते आणि भले भले लोक काही बाबतीत देशद्रोही भूमिका घेऊन राहिलेत. त्यांच्यावर खणखणित टिका नाही केली तर देशद्रोह करणे आणि वर स्तुति मिळवणे फॅशनेबल बनून जाईल.
============
इथे प्रतिक्रिया देणे टाळू शकता.
2 Feb 2017 - 9:54 pm | अनुप ढेरे
खरं!
2 Feb 2017 - 2:55 pm | फेदरवेट साहेब
वरती जुन्या दिल्लीत म्हणजेच दिल्ली-६ मध्ये इलेक्ट्रिसिटीच्या तारांचे असते तसे प्रतिसादांचे जडजांबल झालेले आहे. तरी मी इथून सुरुवात करतोय.
++++++++++++++++++++++
तुमच्या एकंदरीत लिखाणाचे स्वरूप पाहून माझे काही आडाखे तयार झाले (आडाखेच, स्टीरिओटाईप नाही, गैरसमज नसावा) .
हे आडाखे बरोबर वाटल्यास तशी पावती द्या किंवा मला तुमची नरेटिव्ह परत एकदा समजवून सांगा अशी आगाऊ विनंती करतो तुम्हाला. तर...
तुमच्या हिशोबे
१. क्रमवारी लावणे वाईट नाही (चढती भाजणी असो वा उतरती)
२. ब्राह्मण 'सर्वात' देशभक्त म्हणले तरी त्यात इतर देशभक्त नाहीतच हे अध्याहृत नसते, तर लोक तसा समज करून घेतात (का ह्यावर आपण बोलायला नको, जाणतेअजाणतेपणी आपल्या हातून नवे stereotype तयार व्हायला नको)
हे आडाखे जर बरोबर असलेच तर ते आधारभूत म्हणून वापरून मी नवे वाक्य रचतो
'*क्ष' ही जात भारतात सर्वात अप्पलपोटी अन हलकट आहे
ह्यात क्ष जातीला मनापासून राग येण्यासारखे काही नाही असे आपण मानाल का? कारण
१. क्रमवारी लावलेली आहे
२. क्ष जात हलकट आहे म्हणजे अ,ब,क,ड,ई जाती हलकट नाहीत हे अध्याहृत असेलच
तुमचे मत जाणून घ्यायला उत्सुक आहे, कारण माझा पुढला मुद्दा तुमच्या उत्तरावर आधारित असेल असे म्हणतो.
-फेदूदा
* क्ष च्या जागी ज्याने त्याने आपापले बायस, वातावरण, सोय, वगैरेंच्या अनुषंगाने काय वाटेल ती जात लावून घ्यावी, ऑप्टिमिस्ट असाल तर आपल्या नावडत्या जातीचे नाव त्यात घालून क्षणभर आनंद घ्या, पेसिमिस्ट असाल तर त्यात स्वजातीचे नाव घालून विकटीम कार्ड खेळा रडा, छातीपिटून काय वाटेल ते करा, प्रॅग्मॅटीक असाल तर चर्चेत भाग घ्या.
2 Feb 2017 - 9:17 pm | arunjoshi123
ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रभक्त म्हटल्यावर ब्राह्मणांना बरे, दुसर्या जातींना इर्ष्या वाटेल. तसेच वरच्या आपल्या विधानाने क्ष जातीला राग येईल. इतर जातींना हायसे वाटेल.
2 Feb 2017 - 9:07 pm | गामा पैलवान
ए फेदरवेट शायेब, स्साला तू बी आसा उफराटा लोजीक लावते नी. तू म्हन्ते :
स्साला मी काय बोलते की क्रिमिनल लोगांनला आर्मीमंदी परवेस दिला नाय. बिकॉज ते लोगां गुनहगार होते. एकदम चोक्कस? पछी, गुनहगार नवते तरीबी बामनलोगला एण्ट्री का नाय?
आनी बाय द वे, तो फडके याद हाय तुला? आपनो वासुदेव बळवंत फडके? एमने रामोशी लोगां साथ मळवे मोटो धमाको उडाव्यो नी. अंग्रेजी बुकमां आं रामोशी बद्धू क्रिमिनल जाती छे. तरीपन हाय का नाय देशभक्त? तूच सांग.
आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2017 - 12:20 am | nanaba
Not read and not commenting on any other factors.. but have read a book by American archeologist "debunking Aryan invasion theory".
Tevhaa tari patalele pustak.
http://world.time.com/2011/12/15/the-aryan-race-time-to-forget-about-it/
http://www.dnaindia.com/india/report-new-research-debunks-aryan-invasion...
Can't remember exact name of book
3 Feb 2017 - 11:42 am | सतिश गावडे
मिपावर अशा "चर्चा" होऊ लागल्या आहेत हे एक छान झाले.
आता करमणुकीसाठी विशिष्ट ब्लॉग्ज वाचायची गरज उरली नाही.
3 Feb 2017 - 11:49 am | पैसा
यू सेड इट! पण चर्चा मुद्द्यावरून गुद्द्यावर येत नाहीत हे फार छान झालं बघ!
3 Feb 2017 - 12:33 pm | arunjoshi123
त्याचं श्रेय मला द्यायला हवं. मला ज्या उपाध्या इथे बर्याच लोकांनी दिल्यात त्या मी शांतपणे ऐकून घेतल्यात.
==========
(विशुमितच्या वतीनं मीच लिहितो) सर्वात प्रखर पुन्हा एकदा.
3 Feb 2017 - 12:38 pm | पैसा
तुमच्या लिखाणाच्या स्टाईलची मी फॅन झाले आहे. शप्पत!
3 Feb 2017 - 1:17 pm | संदीप डांगे
+११०००००
3 Feb 2017 - 1:23 pm | हतोळकरांचा प्रसाद
१००% सहमत! याचं श्रेय तुमच्या संयत प्रतिसादांना द्यावेच लागेल.
3 Feb 2017 - 7:28 pm | अनरँडम
तुम्ही या प्रतिसादावर काही मत नोंदवलेले नाही. असो.
जात या गोष्टीबद्दल मोकळेपणाने चर्चा करता येत नाही याची खंत वाटते. जातीची अस्मिता विसरून चर्चा करणे काही कदाचित कठीणच असावे. सामान्यपणे अशा संवेदनशील विषयांवर चर्चा करतांना शब्दांचा वापर जपून केला जावा असे वाटते. अरूण जोशींना काही सल्ला देण्याची माझी पात्रता नाही पण त्यांनी आपली भुमिका थोडी विस्ताराने आणि काळजीपूर्वक मांडली तर त्यांना हवी असलेली फलदायी चर्चा होऊ शकेल.
5 Feb 2017 - 2:53 pm | निष्पक्ष सदस्य
6 Feb 2017 - 12:06 am | बॅटमॅन
ब्राह्मणांना श्या घातलेल्या बघून यदा यदा हि धर्मस्य वगैरे उबळ येऊन त्यातून हे असले प्रतिसादमुक्ताफळ प्रसवले गेले असावे. अजोला अशी अस्ताव्यस्त बेशिस्त विधाने करायची खोडच आहे. पण असे विधान केल्याची लाज वाटली पाहिजे. अशा विधानांमुळे ब्रिगेड्यांचे फावते हे एखाद्या ब्राह्मण सुप्रीमसिस्ट माणसालाही सहज लक्षात येईल, पण मुक्ताफळप्रेमाच्या भरात हे अजोला कळणार नाही, कळालं तरी प्रतिष्ठेचा मुद्दा करून किल्ला लढवत बसवायचा हा मूर्ख प्रकार आता थांबवला पाहिजे.
6 Feb 2017 - 11:34 am | arunjoshi123
असं नाही.
मला अजिबात नाही.
मूळात ब्रिगेडी लोकांचे का फाववू नये असा माझा प्रश्न आहे.
http://sambhajibrigade.blogspot.in/
http://www.sambhajibrigade.in
यांच्याबद्दलच बोलत आहात ना? मी त्यांच्या तत्वज्ञानाचा सक्रिय पुरस्कर्ता, अनुयायी, इ इ नसलो तरी मला त्यांच्या चळवळीत काही चूक वाटत नाही. मूळात "ब्रिगेड्यांचे" हा शब्द फार द्वशात्मक आहे आणि डांगे अण्णा तुम्ही याच्यावर पण धागा काढायला हवा. काय मंता?
(अवांतर - लिबरलापणाच्या नावाखाली भारताच्या मानबिंदू असलेल्या महतींना काहीही संबोधनाणारांना हिसका दाखवायची इच्छा असलेल्या लोकांचे मला कौतुकच आहे. सबब माझ्यामुळे ब्रिगेडचे फावले तर मला आनंद आहे. )
असं काही नाही. उलट ग्रामीण, गरीब, बाहेरचा, इ इ म्हणून अप्रतिष्ठित राहण्याची, टोमणे खाण्याची मला आयुष्यभराची सवय आहे.
=========================
माझं चरित्र वर्णन थांबवून विषय पाहाल तर काही बोलता येईल.
6 Feb 2017 - 3:03 pm | बॅटमॅन
ऑ अच्चं जालं तल. ब्रिगेड्यांशी पाला पडला नाही म्हणून कौतुक सुचतंय. चालायचंच, उदगीरमध्ये ब्रिगेड नव्हती तेव्हाच्या काळात. तुम्हांला ते कधीच समजणार नाही. घरातली पाल मरते म्हणून सर्वांच्या जेवणाखाणात विष टाकण्याला समर्थन करण्याच्या गोष्टी तुम्ही करताहात ते पाहणं बाकी तुफान मनोरंजक आहे.
6 Feb 2017 - 3:34 pm | arunjoshi123
तुमचा पाला पडला असेल आणि कोणी तुमच्याशी दुर्व्यवहार केला असेल तर मी त्याचा निषेध करतो. मात्र संभाजी बिग्रेडच्या अधिकृत भूमिकेत काहीच चूक नाही असे माझे मत आहे. विशुद्ध गांधीवाद सार्याच्या सार्या जगाने एकत्र स्वीकारला तर अतिशय मनोहर बाब असेल मात्र फक्त भारतातच आणि ते ही व्यक्तिगत स्वार्थासाठी गांधीवादाचे ढोंग करणारे लोक असतात म्हणजे गांधावाद कौतुक करायच्या लायकिचा नाही असं होत नाही.
=============
माझ्या लहानपणी उदगीरला अपवादात्मक प्रसंग सोडले तर सर्व जाती आणि धर्मांत खूप सख्य होते. त्याचा माझ्या विचारसरणीवर परिणाम झाला असण्याची शक्यता मान्य आहे.
6 Feb 2017 - 3:51 pm | बॅटमॅन
अधिकृत भूमिकेच्या प्रेमात पडणे म्हणजे भोळसटपणाची हद्द झाली.
तुमचे शत्रू म्हणजे पुरोगामी. ब्रिगेडवाल्यांचे शत्रू म्हणजे ब्राह्मण. त्याकरिता ते पुरोगाम्यांची मदत घेतात. तेव्हा एकदा नक्की काय भूमिका आहे ते ठरवा.
हो ना, आम्ही स्ट्रिक्टली ब्राह्मण घेट्टोमध्येच वाढलो. आम्हांला काही माहितीच नसेल कारण उदगीर पृथ्वीवर नव्हतेच.
6 Feb 2017 - 4:17 pm | arunjoshi123
भूमिका म्हणून भूमिका छानच आहे. पण दाखवायचे दात वेगळे अशी ती संघटना असेल असं मी का मानू? इतकी आयवोरी टोवर भूमिका सामान्य कार्यकर्त्याला सांगता , पाळता येत नाही हे सर्वत्र असतेच.
---------
दुसरं जगाला उदाहरण मिळेल इतके व्यवस्थित ब्रिगेडी मोर्चे झालेत. म्हणून त्यांनी काही मूर्खपणा केला तर त्यांनाच्यावरही टिका करेन असं म्हणायच्या मूडमधे सध्याला नाही.
6 Feb 2017 - 4:25 pm | बॅटमॅन
तुम्ही काहीच मानू नका कारण तुम्ही पृथ्वीवर राहत नाही. टिपिकल फुरोगामी. शहराला शिव्या द्यायच्या आणि खेड्यांचे गोडवे गायचे पण रहायचे मात्र शहरातच. तद्वतच ब्रिगेड्यांबद्दल शष्प माहिती नसताना त्यांचे गोडवे गायचे. तुम्ही उच्च दर्जाची पुरोगामी कौशल्ये बाळगून आहात.
6 Feb 2017 - 4:42 pm | arunjoshi123
यू गॉट मी राइट.
6 Feb 2017 - 4:49 pm | बॅटमॅन
येस, ज्या पुरोगाम्यांना तुम्ही शिव्या घालता त्यांचीच कौशल्ये इन केस आय वॉजंट क्लिअर इनफ.
6 Feb 2017 - 4:53 pm | बॅटमॅन
ज्या पुरोगाम्यांना तुम्ही शिव्या घालता त्यांच्यासारखेच आहात तुम्ही. =))
6 Feb 2017 - 12:08 am | बॅटमॅन
आणि हो, रच्याकने मला माझ्या ब्राह्मण असण्याची लाज आजिबात वाटत नसली तरी निव्वळ त्या जातीत जन्माला आलो म्हणून बिनकामी अभिमान बाळगावा असे वाटत नाही. हिंदू धर्माच्या ब्राह्मण जातीच्या कलेक्टिव्ह हेरिटेजशी संबंध आहे म्हणून या दोहोंबद्दल आत्मीयता आणि तज्जन्य थोडा फार अभिमान आहे. बिनकामाचा बिनडोक अभिमान नाही. बहुतेकदा कशात काही संबंध नसलेल्यांनाच अभिमान जास्त असतो.
6 Feb 2017 - 11:18 am | संदीप डांगे
+1111111
6 Feb 2017 - 11:25 am | संदीप डांगे
खरे तर, स्वतः चे काहीही कर्तृत्व नसलेल्याना जातीच्या आधारावर फुकटच्या अभिमानाचे झेंडे मिरवायचे असतात, ह्यात कोणीही चुकलेले नाही... शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, अशी लिस्ट मोठी आहे, महापुरुष जातिवार विभागले जाण्यामागचे कारण येनकेनप्रकारेन भासमान पेडिग्री सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
6 Feb 2017 - 12:37 pm | arunjoshi123
तुमच्या सगळ्या विधानांशी प्रचंड असहमत आहे.
शिवाजी महाराज हे (महान) शिवाजी महाराज असण्यात त्यांच्या जातीच्या गुणांचा अजिबात काही संबंध नव्हता आणि ते गुण आपल्यात आहेत असं मानणं चूक, मिथाभिमानी आहे ही फार केविलवाणी विधाने आहेत.
6 Feb 2017 - 3:07 pm | बॅटमॅन
ब्रिगेडचा अभिमान बाळगणे आणि नाझींचा अभिमान बाळगणे सारखेच. यू आर साउंडिंग लाईक टिपिकल फुरोगामी. कीटकभृंगन्याय झालाय. =))
6 Feb 2017 - 11:46 am | arunjoshi123
मी मराठा म्हणून जन्मलो नाही पण मला ब्रिगेडचा अभिमान आहे. "सर्वात प्रखर ..." विधानाचा आणि "मी" कोण्या जातीत जन्म घेतला आहे त्याचा संबंध न जोडण्याची विनंती.
-------------------
मला आदर आहे आपल्या भावनांचा.
असं नाही.
6 Feb 2017 - 3:05 pm | बॅटमॅन
ब्रिगेडचा इतकाच अभिमान आहे तर ब्राह्मणांबद्दल त्यांनी काय मुक्ताफळे उधळलीत तेवढे बघा. म्हणे अभिमान. =))
तुमच्या तर्कशून्य मनःपूत मुक्ताफळांचा बाकी मी फ्यान आहे हे मात्र नमूद केलेच पाहिजे.
6 Feb 2017 - 4:00 pm | arunjoshi123
आपण जातीनिरपेक्ष आहोत, जात मानत नाहीत असे म्हणत लिबरल मंडळींनी (जी लोकांच्या मते प्रामुख्याने ब्राह्मण वा तत्सदृश असतात.) काय म्हणावे व काय म्हणू नये याला मर्यादा असाव्यात. इतिहासाचा अभ्यास हा निर्दय आणि संवेदनाशून्य नसावा.
लिबरल लोक कसे विचार करतात?
१. विवाहसंस्था अनावश्यक आहे.
२. लैंगिक निष्ठा मूर्खपणा आहे.
३. वयात आलेल्या सुज्ञ लोकांत असलेले विवाहबाह्य संबंध उगाचच मूर्खपणे इ अनैतिक इ मानले जातात.
आता असे विचार असलेले लोक काय करतात?
मग उचला इतिहासतली पात्रे आणि लावा काहीही जोडया. या पात्रांचे लिबरल नसलेल्या लोकांच्या हृदयात काय स्थान आहे त्याचे काय? ते मूर्ख, गेले उडत. लोकवड्म्ता इतिहास म्हणून लिहिल्या असे नसले तरी, लोकवदंतांचा इतिहास लिहिण्यासाठी पाश्चिमात्य इतिहासकाराला भेटेलेले भारतीय लोक कोण? असो.
त्या मुक्ताफळांना संदर्भ आहे. त्या संदर्भात ती मला योग्य वाटतात.
आपला मी फॅन आहेच, त्याचा पुनरुच्चार देखिल आवश्यक नाही.
6 Feb 2017 - 4:08 pm | बॅटमॅन
ब्राह्मण पुरुषांना ठार मारून त्यांच्या स्त्रियांना बहुजनांमध्ये वाटून घ्या वगैरे मुक्ताफळांना कसला शाट्टाचा संदर्भ आहे ते सांगा की. तुमचे ब्रिगेडप्रेम निव्वळ अज्ञानमूलक आहे इतकेच मला फक्त सांगायचे आहे. एवढे करूनही ब्रिगेड्यांना गोंजारायचे असेल तर खुशाल गोंजारा. उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला आपल्या संविधानाने आवरलेले नाही.
तुमचे ब्रिगेडप्रेम अज्ञानमूलक, हास्यास्पद आणि तितकेच अर्थहीन आहे. लिबरलांना काय द्यायच्या त्या शिव्या द्या. ब्रिगेडला जवळ करतो आहोत म्हणजे नक्की काय करतो आहोत याची तुम्हांला थोडीही कल्पना नाही हे मला अधोरेखित करून सांगायचे आहे. बाकी मला कशाची काहीही पडलेली नाही. चालूद्या उदगिरीलाल के हसीन सपने.