बोलू नकोस काही
मज कळतात भावना त्या
नको आठवू पुन्हा
मज स्मरतात यातना त्या
तू शब्द होवूनी यावे
मजसंगे बोलायाला
मी स्तब्ध उभा केव्हाचा
तूजसंगे चालायाला
तू गीत होवूनी यावे
त्या माझ्या वाटेवरती
मी आतूर उभा केव्हाचा
अन काटे अवतीभवती
मी झिजलो आहे येथे
भिजण्याच्या त्या आशेने
मी रडलो आहे येथे
विरहाच्या त्या भाषेने
येणा-या झुळकेपाठी
मी असाच का मग फसतो
पाहूनी माझी प्रतिमा
मज भास तूझा हा असतो
आता उगाच क्षणभर
मी डोळे मीटूनी बसतो
ह्रदय खोलूनी माझे
मी तूला भेटूनी हसतो
प्रतिक्रिया
11 Jan 2017 - 1:24 pm | चांदणे संदीप
ॲनी वे, छान कविता!
या कडव्यात...
.
.
.
असा बदल करून पहा...नॉट जबरदस्ती!
Sandy
12 Jan 2017 - 2:47 pm | शब्दबम्बाळ
लिहीत राहा...
12 Jan 2017 - 10:54 pm | शार्दुल_हातोळकर
रचना आणि आशय दोन्ही खुपच छान आहे. नकळतच "मी झिजलो आहे येथे" या कडव्यामुळे मला कवीवर्य सुरेश भट यांच्या "इतकेच मला जाताना सरणावर कळले होते" या गझलची आठवण झाली!
13 Jan 2017 - 3:37 pm | एस
छान आहे कविता.
13 Jan 2017 - 6:25 pm | देशप्रेमी
मनाला स्पर्शुन गेली!!
13 Jan 2017 - 9:23 pm | हतोळकरांचा प्रसाद
नितांत सुंदर रचना, खूप आवडली. सौमित्रच्या "पाऊस पडून गेल्यावर.." च्या चालीवर म्हणून पहिली:)...व्वा!
14 Jan 2017 - 10:19 am | मदनबाण
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Iuliana Beregoi - Vina mea (Official Video 4K)
16 Jan 2017 - 1:55 am | ज्ञान
सुंदर !!!
16 Jan 2017 - 2:16 pm | केडी
किरण अरे तझ्या सगळ्या कविता टाकत जा रे इथे....सुंदर आहे हि सुद्धा (आधी बऱ्याच वाचल्या आहेत, त्या पण टाक रे...)
18 Jan 2017 - 4:52 pm | किरण कुमार
मिपा कुटूंबात मी नविनच आहे, सांभाळून घ्या , सर्वांचे मनापासून आभार