बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
प्रतिक्रिया
6 Jan 2017 - 9:56 pm | पिलीयन रायडर
मला हा निर्णय चुक की बरोबर ते अजुनही समजलेले नाही. माझा कल "चुक" कडेच आहे. आधी मला आजवर जी मोदींची प्रतिमा होती, त्याप्रमाणे हा निर्णय अनेक लोकांच्या विरुद्ध जाऊन देशहितासाठी घेतलाय असं वाटत होतं. पण अजुन काळा पैसा असणार्यांना काही दणका बसलाय असं वाटत नाही. अर्थात मी नेट वर वाचुनच मत बनवतेय. मला प्रत्यक्षात काय चालु आहे ह्याची कल्पना नाही. पण एकंदरित रागरंग पाहुन असं वाटतंय खरं.
३१ तारखेच्या भाषणातुन मला बर्याच अपेक्षा होत्या. हा जो काही त्रास नोटाबंदीमुळे लोकांना होत आहे, त्यावर सरकार काही उपाय्योजना करेल असं वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र एखादे अर्थसंकल्पाचे भाषण ऐकल्या सारखे वाटले. एरवी अशा घोषणा केल्या असत्या तर काही वाटलं नसतं. पण खास करुन तुमचा प्लान फसलाय, खुप सारे प्रश्न आहेत आणि तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात, असे असताना योजना जाहिर करणे म्हणजे दिशाभुल करण्या सारखे वाटले.
ही एक निव्वळ हिरोगिरी होती की काय अशी शंका बळावत चालली आहे.
भिम अॅपसुद्धा ज्या गडबडीत लाँच झाले, त्यावरुन तर "कॅशलेस" हा हेतु कधीच नव्हता हे स्पष्ट आहे. तसं असतं तर ८ नोव्हेंबरलाच हे सगळं यायला हवं होतं. त्या तयारीनेच सरकारने उतरायला हवं होतं
एकंदरित काळा पैसा बाहेर काढायचा म्हणुन हे नोटाबंदी प्रकरण केलेलं असलं तरी काळा पैसा नसलेल्या सर्वसाधारण जनतेला जे प्रॉब्लेम्स येऊ शकतील त्यांचा विचार केलेला नव्हताच फारसा असं आता मलाही वाटतंय. भारतीय जनता "अॅडजस्ट करलो" टाईप आहे म्हणुन भागलं. लोक उभी राहिली रांगेत वेड्यासारखी. पण १-२ महिने ठिक आहे. हे अजुनही चालु असेल तर मात्र हा प्लान फसलेला आहे.
तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर मला समजेल अशा भाषेत कुणी पॉईंटर्स मध्ये सांगु शकेल का?
अवांतर - खरंच गाईंना आधार कार्ड देणारे का हे सरकार?? की फेक न्युज होती ती?
7 Jan 2017 - 12:26 am | संजय क्षीरसागर
१५.४० लाख कोटी रकमेच्या नोटांपैकी ५ लाख कोटी रकमेच्या नोटा, ब्लॅकमनी बँकेत भरता न आल्यानं, केवळ दहशतीमुळे, चलनातून बाद होतील असा सरकारचा अंदाज होता. ३०डिसेंबर पर्यंत १४.९७ लाख कोटी रुपये बॅकात भरले गेले आहेत, असा ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे.
अरुण जेटलींना मेडीयानं हे दाखवून दिलं आणि यात तथ्य असेल तर नोटबंदीचा निर्णय फसलायं का विचारलं. त्यावर जेटलींनी, शरद पवारच काय ५६ इंच वाल्यांची सुद्धा छाती होणार नाही असं उत्तर दिलं.... `मला माहित नाही" !
7 Jan 2017 - 12:30 am | पिलीयन रायडर
म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते सगळं जवळपास बँकेत परत आलं. मग काळा पैसा कुठे गेला?
काळा पैसा तर आहेच ना लोकांकडे. म्हणजे सरकारच्या ह्या निर्णयावर सुद्धा लोकांनी पळवाट शोधुन काढली तर..
7 Jan 2017 - 12:39 am | संजय क्षीरसागर
तो परत नव्या नोटात रुपांतरीत झाला !
काळा पैसा तर आहेच ना लोकांकडे.
येस. तो कॅशसोडून इतर फॉर्ममधे आहे.
म्हणजे सरकारच्या ह्या निर्णयावर सुद्धा लोकांनी पळवाट शोधुन काढली तर..
हे अजून मोदींना आणि जेटलींना कळत नाहीये.
7 Jan 2017 - 10:01 am | गॅरी ट्रुमन
या विषयावर लेख आणि प्रतिसाद लिहिणार्याचे नाव बघितले की नक्की काय म्हटले जाणार याची कल्पना येतेच. त्याच त्याच चर्वितचर्वण झालेल्या मुद्द्यांवर काही लिहित नाही. तरीही या विषयावरील अनेक चर्चांमधील शेकडो प्रतिसादात न आलेले (किंवा माझ्या नजरेतून निसटलेल्या मुद्द्यांविषयी लिहित आहे):
१. ५०० आणि १००० च्या नोटा केवळ बँकांमध्येच नाही तर पोस्ट ऑफिसांमध्येही भरता येत होत्या. पोस्ट ऑफिसातही सेव्हिंग्ज अकाऊंट, रिकरींग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट इत्यादी गोष्टी असतात याचा माझ्या पिढीतल्याही अनेकांना पत्ता नसतो तेव्हा माझ्याहून १०-१२ वर्षांनी लहान असलेल्यांना हे माहित नसेल याची कल्पना येते. या डिपॉझीटवरील व्याजाचे दर बँकांमधील व्याजाच्या दरापेक्षा काकणभर जास्तच असतात. या डिपॉझीटमध्ये नक्की किती पैसे गुंतवले जातात? इथे दिलेल्या बातमीप्रमाणे २०१५-१६ या वर्षात नोव्हेंबर पर्यंत २ लाख १५ हजार ८०२ कोटी रूपये इतके 'ग्रॉस सेव्हिंग' पोस्टात झाले होते तर नेट सेव्हिंग त्यापेक्षा बरेच कमी २१ हजार ४१ कोटी होते. ग्रॉस आणि नेटमधला फरक म्हणजे मी समजा १०० रूपये १० वेळा भरले आणि भरलेल्या १००० पैकी ९०० रूपये काढून घेतले तर ग्रॉस सेव्हिंग झाले १००० रूपये तर नेट सेव्हिंग झाले १००० वजा ९०० = १०० रूपये. ही बातमी गेल्या वर्षीची आहे. यावर्षी सुकन्या समृध्दी योजना ही नवी योजना पोस्टात सुरू झाली आहे. त्यामुळेही आणखी डिपॉझिट पोस्टात नक्कीच झाले आहे.
८ नोव्हेंबरनंतर पोस्टात डिपॉझिट झालेली रक्कम नक्की किती? मला माहित नाही. पण पोस्टात झालेल्या डिपॉझिटचे पुढे काय होते? पोस्टाने बँकिंग लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. तो अजून मंजूर झालेला नाही. तेव्हा पोस्ट हे पैसे स्टेट बँक किंवा अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवते.
माझा प्रश्न: पोस्टात भरलेले पैसे आणि पोस्टाने बँकेत भरलेले पैसे हे डबल काऊंटिंग होत आहे का? होत आहेच किंवा होत नाहीच यापैकी मला काहीच म्हणायचे नाही तर केवळ शक्यता व्यक्त करत आहे.
२. काळा पैसा नुसता कॅशमध्येच नसतो हे कोणीही सांगू शकेल.पण म्हणून कॅशमध्ये असलेल्या काळ्या पैशावर कारवाई करायची नाही याचे ते समर्थन होऊ शकत नाही. ३० सप्टेंबर पर्यंत आय.डी.एस अंतर्गत काळा पैसा जाहिर करायची मुदत दिली होती. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याचवेळी मोदी म्हणत होते की ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मी कठोर पावले उचलीन आणि त्याबद्दल मला दोष दिला तरी मला त्याची पर्वा नाही. इतका विरोध होत असूनही मोदी नोटबंदीच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर अजून कठोर पावले उचलू अशाप्रकारच्या बातम्याही पेरल्या गेल्या.तेव्हा आता आय.डी.एस सारखी गरीब कल्याण योजना आली आहे त्याला जास्त प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे. प्रत्यक्षात काय होते ते बघू. तेव्हा तो पैसा इतके दिवस काळा होता तो टॅक्सच्या नेटमध्ये आल्यामुळे फायदा होणार नाही का?
एकूणच काय की या प्रकारावर बहुसंख्य लोक त्यांच्या राजकीय भूमिकेतून (मोदी समर्थक/विरोधक) टिका करत आहेत असे दिसत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगल्या पध्दतीने करायला हवी होती यात काहीच वाद नाही.पण या निर्णयामुळे स्वर्ग भूतलावर अवतीर्ण झाला आहे असे म्हणणे आणि नरकपुरी माजली आहे हे म्हणणे या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आहेत हे इथे नमूद करू इच्छितो.
7 Jan 2017 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
ट्रुमनजी, हे वागणं बरं नव्हं !
एकदा आपलं ठरलं ना की "कालआजच परिक्षा संपली तरी रिझल्टपर्यंत वाट बघायचे कारण नाही... उमेदवार परिक्षेच्या अगोदर एक महिना फेल झालाय असा गदारोळ करायचा". मग वरच्यासारखे काहीच्या काही समतोल, विचारी काही मुद्दे आपण मांडायचे नाहीत आणि दुसर्यांनी मांडले तरी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे किंवा ते तसे नाहीच्च असे म्हणायचे, हे तुमच्या अजून कसे ध्यानात येत नाही ?! यापुढे फक्त बिनापुराव्याची मुद्दे भरकटवणारी विधाने, जोक आणि इनोदी गाणी हेच्च सबळ पुरावे समजायचे ठरलेय... बाकी सगळे फाऊल !!! काय समजलात ?! ;) :) =))
7 Jan 2017 - 12:38 pm | संदीप डांगे
ह्यालाच विक्टिम कार्ड का काय म्हणतात कायहो हातोळकरसाहेब? आणि ट्रोलभैरवांच्या मते जिथे तिथे गळे काढणे...? ;-) =))
बाकी, व्हॉट्स्प जोक चिकटवणारांना आता जोक्स बोचायला लागलेत... ही एक गंमत आहे निष्पक्षपणाची... =))
7 Jan 2017 - 1:08 pm | हतोळकरांचा प्रसाद
म्हणत असतील बुआ, मला अजून नक्की व्याख्या मिळाली नाही! मागे एकदोनवेळा विचारली होती पण काय उत्तर मिळालं नाही! मिळाली कि सांगेन तुम्हाला! बाकी ते जोक बोचणे वगैरे मला असेल तर....जोकमध्ये काय होते बरे जरा सांगाल का इथे? म्हणजे तुमच्याकडून तरी असल्या टेस्टलेस जोकची अपेक्षा नाहीये हो डांगेंजी!
7 Jan 2017 - 1:15 pm | संदीप डांगे
जोक्स ज्यांनी टाकलेत त्यांच्यासाठी, तुम्ही टाकलेत का?
बाकी इथे तुमच्या आवडीची काळजी घ्यावी, तुमचे मनोरंजन व्हावे अशी अपेक्षा ठेवून येता का?
7 Jan 2017 - 1:59 pm | हतोळकरांचा प्रसाद
मी इथे कशासाठी येतो वगैरे थोडं वैयक्तिक होतंय आणि त्याच्याशी तुमचा काहीएक संबंध नसावा. तुम्ही टाकलेला एक जोक टेस्टलेस आहे असं माझं मत मी सांगितलं शिवाय त्यात या एका ठराविक विषय असलेल्या धाग्यावर टाकण्यासारखं काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला त्या जोक मध्ये काय चांगला वाटलं हे सांगावं वाटत नसेल तर तसं सांगावं, उगाच त्या फालतू जोक (वैयक्तिक मत) ची भलामण करण्यासाठी वैयक्तिक कशाला व्हायचं?
7 Jan 2017 - 2:23 pm | संदीप डांगे
अरे बापरे, आता जोक पण समजावून सांगायला लागतील काय?
7 Jan 2017 - 2:26 pm | हतोळकरांचा प्रसाद
काय करणार महोदय, सामान्य मिपाकर आम्ही! करत जावा कवा कवा मदत! एवढं काही बिघडणार नाही त्याने आपलं!
7 Jan 2017 - 2:36 pm | संदीप डांगे
माझं काय बिघडेल, नाही याची तुम्ही चिंता करणं हे आता वैयक्तिक होत नाही काय?
7 Jan 2017 - 2:44 pm | हतोळकरांचा प्रसाद
मदतीची याचना करताना लिहितात बुवा तसलं! वैयक्तिक होत असेल तर आपली सपशेल माफी! "काय करणार महोदय, सामान्य मिपाकर आम्ही! करत जावा कवा कवा मदत! ते जोकचं तेवढं बघा काही मदत करता आली तर!" हे चालेल का?
7 Jan 2017 - 3:05 pm | मार्मिक गोडसे
या विषयावर लेख आणि प्रतिसाद लिहिणार्याचे नाव बघितले की नक्की काय म्हटले जाणार याची कल्पना येतेच.
स्पष्ट बोला की.
7 Jan 2017 - 11:55 pm | Nitin Palkar
माझ्या घरात ५००/१००० च्या ज्या नोटा होत्या त्या मी १५ नोव्हेंबर पूर्वीच बँकेत भरून टाकल्या (तुम्ही टाकल्या असतीलच). कारण आपण (मी तरी) त्याचा हिशेब देऊ शकतो. पण सर्वचजण असा हिशेब देऊ शकत नाहीत. कारण त्याला अडीच लाखाची मर्यादा होती. हा साठवून ठेवलेला पैसा, ज्यांच्याकडे असेल त्यांनी कुठेतरी गुंतवायचा प्रयत्न नक्की केला असेल, तरी, ८ नोव्हेंबर ते ३० डिसेम्बर या दरम्यानच्या सर्व व्यवहारांची तपासणी होणे/करणे शक्य आहे. उरलेला काळा पैसा केवळ बाद झाला ना?
स्विस बँकेतील पैशाबद्दल जे लोक गळे काढतायत ते हे विसरातायत की हा पैसा स्विस बँकेत गेला कधी? गेल्या अडीच वर्षात?
आज आत्ता काळा पैसा उत्पन्न होऊ न देणे हे चुकीचं आहे का?
8 Jan 2017 - 12:08 am | संदीप डांगे
मस्त प्रतिसाद आहेत तुमचे, आवडत आहेत.
८ नोव्हेंबर ते ३० डिसेम्बर या दरम्यानच्या सर्व व्यवहारांची तपासणी होणे/करणे शक्य आहे.
>> त्याला किती वेळ लागेल, किती खर्च येईल काही अंदाज? किती व्यवहार झालेत ह्याची काही प्राथमिक माहिती+अंदाज? कोणाकडे किती ब्लॅकमनी आहे ह्यासाठी नोटाबंदीच एक इलाज राहिला होता? आपले पंप्र तर म्हणाले की तुमच्या आजूबाजूलाच बघा, कितीतरी लोक बंगले गाड्या उडवणारे कर भरत नाहीत. जे तुम्हा-आम्हाला बघायला सांगतात तेच सरकारी अधिकार्यांना का सांगत नसावे आपले लाडके पंप्र? त्यासाठी नोटाबंदी का?
उरलेला काळा पैसा केवळ बाद झाला ना?
>> कधी? कसा? किती उरलेला, कुठे उरलेला?
स्विस बँकेतील पैशाबद्दल जे लोक गळे काढतायत ते हे विसरातायत की हा पैसा स्विस बँकेत गेला कधी? गेल्या अडीच वर्षात?
>> हे बाकी बोलले खास तुम्ही. जे लोक स्विस पैशाबद्दल सदानकदा गळे काढत होते त्यांनाच तो पैसा परत आणायला सत्तेवर बसवले बघा. आता त्यांनी तो अडीच वर्षात आणला की नाही असे विचारणे हे गळे काढणे म्हणणार असाल तर ह्या म्हणण्याला चाइल्डिश म्हणावे का?
आज आत्ता काळा पैसा उत्पन्न होऊ न देणे हे चुकीचं आहे का?
>> अजिबात नाही. कोण म्हणतोय की काळा पैसा उत्पन्न झालाच पाहिजे? असे म्हणणार्याला तर किसीभी चौराहे में खडा करके जो चाहे वो सजा दो.
7 Jan 2017 - 12:32 am | संजय क्षीरसागर
"मला माहित नाही"
7 Jan 2017 - 1:39 pm | हतोळकरांचा प्रसाद
संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला असला ना, बातम्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने वाचता येतात याचे तुमचा प्रतिसाद एक उदाहरण म्हणता येईल. ज्या "मला माहित नाही" वाक्याला तुम्ही ५६ इंच वगैरे विशेषणे लावून ऐतिहासिक वाक्य बनवायचा प्रयत्न करत आहात ते संभाषण खाली देत आहे आणि त्याचा विडिओ देखील.
पत्रकार : सर, ३१ डिसेम्बर उलटून गेला आहे आणि आता असं ऐकायला मिळतंय कि जवळजवळ १५ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा!
https://www.youtube.com/watch?v=1Rk4T-GA-Kc
शिवाय तुम्ही दिलेल्या बातमीतच या पंधरा लाखांच्या रिपोर्टवर आरबीआयने काढलेल्या निवेदनाचाहि उल्लेख आहे ज्यात आरबीआयने स्पष्ट केले आहे कि जुन्या नोटांचे तपशील देशभरातील बँकांकडून अजूनही येत आहेत आणि त्याची मोजदाद अजून सुरूच आहे. शिवाय ती कधी संपेल हे अजून स्पष्ट नाही. हे नमूद करणे तुम्ही वरचा प्रतिसाद लिहिताना (जाणूनबुजून?) टाळले. हे असे का बरे?
7 Jan 2017 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
हल्ली अर्धसत्य (जे बहुदा पूर्ण असत्यापेक्षा जास्त भरकटवणारे आणि म्हणुनच जास्त धोकादायक असते) पसरवून लोकांची दिशाभूल करणार्या तथाकथित "तज्ज्ञांची" बरीच चलती आहे................. लेकीन, ये जनता चूप है, पर वह सब जानती है । ;) :)
7 Jan 2017 - 2:21 pm | संदीप डांगे
सत्यवचनी प्रतिसाद, संपूर्ण सहमत!
8 Jan 2017 - 1:09 am | संजय क्षीरसागर
आकडा जर अपेक्षेपेक्षा कमी असता (समजा १० लाख कोटी) तर एव्हाना सरकार क्रेडीट घेऊन मोकळी झाली असती. कारण मोदी क्षुल्लक गोष्ट फुलवण्यात माहीर आहेत आणि ही तर मेजर स्टोरी होती. त्यांनी `मित्रों' करत सतरा ठिकाणी बोलून दाखवलं असतं की किती ग्रेट निर्णय घेतला. ५ लाख कोटी चलनातून बाद झाले! पण आकडा अपेक्षेपेक्षा बराच मोठा आहे त्यामुळे गोची झाली आहे.
२५ डिसेंबरला खुद्द जेटली म्हणाले होते की बँकेत भरलेल्या पैश्याची निनांवेगीरी आता संपली आहे आणि अशा पैश्यामुळे बँकीग सिस्टम मजबूत होईल
When this money comes into the system, the banking system becomes stronger and there are funds available for rural development, social welfare programmes," he said. बघा
म्हणजे सरकारनी दोन्ही बाजूनी टिमकी वाजवून पाहिली. (म्हणजे जास्त पैसा जमा झाले असतील, तर काळा पैसा चलनात आला.) पण जेटलींना केवळ एका आठवड्यात आपल्या चुकीचा उलगडा झाला. १५ कोटी जमा झाले असतील तर नोटबंदी फेल गेली असा अर्थ निघतो. मग यू टर्न मारुन ते म्हणातायंत. `मला अजून आकडा माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा!
आता इतकी साधी गोष्ट जर कळायला `तज्ञ' असावं लागतं असं वाटत असेल तर हद्द झाली.
8 Jan 2017 - 10:00 am | हतोळकरांचा प्रसाद
बरोबर आहे, अंदाजपंचे धागोदरशे करण्यासाठी काही तज्ज्ञ असावं लागत नाही. मोदींनी असं केलं असतं तसं केलं असतं वगैरे सगळं अंदाजपंचे! पैश्याची निनावेगिरी संपणे = १५ लाख कोटी (किंवा सर्वच्या सर्व पैसे) बँकेत परत येणे, हे भारी आहे. मी वैयक्तिकरित्या सरकारचा अधिकृत आकडा येण्याची नक्की वाट बघेन.
बाकी वरच्या प्रतिसादाचा मुद्दा असं होता कि, बातमी तुम्ही मांडली कशी आणि ती आहे कशी! तुमच्या दृष्टिकोनातून आरबीआयचं निवेदन वगैरे खिजगिणतीतही नाही हे पाहून आश्चर्य वाटलं!
8 Jan 2017 - 10:56 am | संजय क्षीरसागर
नीट वाचा म्हणजे मुद्दा कळेल.
१. १० लाख कोटी जमा झाले असते तर ५ लाख कोटी चलनातून रद्द झाले असते आणि मोहीम यशस्वी झाल्याचा डांगोरा मोदींनी लगेच पीटला असता. आणि ते योग्य ही झालं असतं कारण एका बजेटच्या डेफिसिट इतकी रक्कम चलनातून बाद होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सरकारचं दायित्व कमी होऊन नव्या नोटा १० लाख कोटींच्याच छापाव्या लागल्या असत्या. परिणामी महागाई कमी झाली असती. इन फॅक्ट डिमनीटायझेशनचा मूळ उद्देशच तो होता. म्हणजे ब्लॅक मनी चलनातून साफ होईल आणि खोट्या नोटाही बाद होतील.
२. जास्त रक्कम जमा होतेयं म्हटल्यावर मोदींची गोची झाली. आणि त्यांनी शेवटी केलेल्या भाषणात, आता बेनामी संपत्ती विरोधात मोहिम उघडतो म्हणून पुन्हा ढुशी मारायचा प्रयत्न केला. बेनामी संपत्ती विरोधात कारवाई डिमनीटाझेशन व्यतिरिक्तही करता येत होती.
३. प्रकरण अंगलट येतंय म्हटल्यावर २५ डिसेंबरला जेटली म्हणाले, जितका जास्त पैसा बँकेत जमा होतोयं तितकी बँकींग सिस्टम स्ट्राँग होतेयं आणि निनांवी पैसा बँकेत येतोयं. हे एका अर्थानं बरोबर होतं पण याचा उघड अर्थ, अपेक्षेपेक्षा जास्त पैसा बँकेत येतोयं. आणि काळा पैसा मूळात बँकेत भरलाच जाणार नाही हा मोदींचा ओरिजीनल प्लान, त्यासाठी निर्माण केलेली दहशत , आणि सामान्यांची अपेक्षा याचा फज्जा उडाला.
४. ब्लूमर्गचा रिपोर्टवर मिडीयानं घेरल्यावर जेटलींना स्वतःची चूक कळली. आकडा १५ लाख कोटीच्या जवळपास आहे (निदान १० लाख कोटी पेक्षा बराच मोठा आहे) . आणि आपण उगीच काही तरी बोललो हे उमगल्यावर, ते `मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल ते सांगा' अशी फिरवाफिरवी करतायंत.
पण मोदी गप्प आहेत आणि त्यांनी होरा फिरवलायं (बेनामी संपत्ती), जेटली आकडा नक्की माहित नाही म्हणतायंत याचा अर्थ, काळा पैसा मूळात बँकेतच येणार नाही आणि तो चलनातून बाद होऊन फार मोठी बाजी मारली जाईल हा सर्जिकल स्ट्राईल बोंबलला आहे.
५. महागाई हटली नाही हे संसारात थोडं फार जरी लक्ष असेल तर कुणाही दत्तूला मान्य होईल. याचा अर्थ दुकानदारांची आणि व्यावसायीकांची होल्डींग कपॅसिटी मजबूत आहे आणि त्यांनीही डिमनीटायझेशनला भीक घातली नाही. आता तर महागाई घंटा कमी होत नाही.
६. कार्ड चार्जेस आणि नेट बँकींग चार्जेस या दोन गोष्टी इकॉनॉमी कॅशलेस करायला महत्त्वाच्या आहेत पण त्याबद्दल सरकार काहीही करत नाही.
७. अजूनही व्यावहार पूर्ववत होत नाहीत याचा अर्थ सरकारची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ आहे. आणि नक्की किती चलन पुरवायचं याबद्दल निर्णय होत नाही असा होतो.
आता बहुदा तुम्हाला प्रकाश पडेल.
8 Jan 2017 - 11:06 am | संजय क्षीरसागर
१५ लाख कोटी (किंवा सर्वच्या सर्व पैसे) बँकेत परत येणे, हे भारी आहे. मी वैयक्तिकरित्या सरकारचा अधिकृत आकडा येण्याची नक्की वाट बघेन.
सर्वच्या सर्व पैसे बँकेत आले तर मग सगळा प्रकार, झक मारली आणि मुंबई पाहिली असा होईल. त्याचा साधा अर्थ, फक्त जुन्या नोटा बदलून नव्या नोटा चलनात आल्या इतकाच होतो. मग या प्रकरणासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरायची गरजच नव्हती. भरपूर वेळ देऊन लोकांनी यथावकाश १००० आणि ५०० च्या नोटा बँकेत भरल्या असत्या आणि सरकारनी आरामात नव्या नोटा छापून एटीममधून वितरीत केल्या असत्या.
तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला, डिनीटायझेशन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय इतकी बेसिक माहिती सुद्धा नाही हे लक्षात आलं.
8 Jan 2017 - 11:45 am | हतोळकरांचा प्रसाद
हे बाकी बरोबर ओळखलं बघा तुम्ही! मी "तज्ज्ञ" नाहीच, हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही. "तज्ञ" असल्याच्या थाटात चुकीची आणि आकडेरहित माहिती ठासून सांगायला मला आवडणारही नाही.
8 Jan 2017 - 11:41 am | हतोळकरांचा प्रसाद
संक्षी, इतर धाग्यांवर शंभरवेळा चर्वण झालेलेच मुद्दे तुम्ही सांगत आहात, काही नवीन नाही. तुम्हाला ब्लूमबर्गचा रिपोर्ट विश्वसनीय आणि ऑथॉरेटीव्ह वाटतो तर मला आरबीआयकडून आलेली माहिती. कार्ड चार्जेस (जे एका धाग्यात चावून चोथा झाले आहेत), महागाई, ब्लॅकमनी वगैरे सगळं हे फक्त येणारा काळ सांगेल. नोटबंदी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळे उद्देश सिद्ध होणार आहेत हे मोदींनी सांगितल्याचं मला तरी कुठे दिसलेलं नाही आणि ते समजण्यासाठी "तज्ज्ञ" असण्याचीही गरज नाही. कुठलेही अधिकृत आकडे नसताना योजना फेल झाली आहे हे एवढंच सिद्ध करण्याचा खटाटोप कशाला बुवा? बेनामी संपत्ती, कॅशलेस याला तुम्ही होरा बदलणे (कदाचित पूर्वग्रहदूषित असण्यामुळे) म्हणत आहात तर मला त्या फौलोअप कृती वाटतात. त्यामुळे तूर्तास तरी तुमच्या प्रतिसादाची पोचपावती (प्रकाश पडलेलाच नाही, ट्यूबलाईट थोडी डिम आहे),
8 Jan 2017 - 1:02 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे तुम्हाला डिमनीटायझेशन हा विषयच समजलेला नाही . तरीही तुम्ही बिनधास्त प्रतिसाद ठोकतांय हे कौतुकास्पदे!
त्यामुळे इतर अनुषंगिक मुद्दे तर कळण्याची शक्यताच नाही. सो मी थांबतो . एंजॉय ! बघा वाट आकडा फुटण्याची .
8 Jan 2017 - 1:21 pm | हतोळकरांचा प्रसाद
हो ते मी वर मान्य केलं आहेच की, तुम्हाला जुन्याच गोष्टी सांगण्यात इंटरेस्ट दिसतोय! बिनधास्त प्रतिसाद ठोकण्यापेक्षा बिनधास्त चुकीचे आणि तथ्यराहित प्रतिसाद ठोकून वर स्वतःला "तज्ञ" म्हणवणे जास्त कौतुकास्पद आहे. आकडा फुटण्याची तुम्हाला प्रतीक्षा नाहीच आहे कारण ते तुम्हाला महत्वाचं वाटत नाही (कल आधीच ठरला असल्याने), त्यामुळे तुमचे "अनुषंगिक" मुद्दे तुम्हालाच लखलाभ!
बाकी, मी वाट बघेणंच आकड्यांची! चुकीचे निघाले तर सरकारवर टिका करायला आणि चांगले निघाले तर भलामण करायला मला अजिबात अवघडंत नाही. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
9 Jan 2017 - 12:37 pm | मराठी कथालेखक
+१
7 Jan 2017 - 11:21 pm | Nitin Palkar
सामान्य पापभिरू/सरकारभीरु माणूस सर्व कर भरतो(माझं मत). त्यांना सर्व अधिदाने बँकेद्वारे (Payments through bank) करायला लावली तर त्यात काय बिघडलं?
सर्वांनी स्वतःच्या हक्कांकारता जागरूक व्हावं, आपल्याला मिळणारे पैसे आपल्याच खात्यात जमा होतायत की नाही हे काय वाईट आहे?
तुम्ही स्वतः साक्षर व्हा, स्वतःचे बँक खाते उघडा, स्वतःचे व्यवाहार बँक खात्या मार्फत करा, हे सांगणं चुकीचं आहे का?
"जनसामान्यांना सज्ञान करू नका, जर ते सज्ञान झाले तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसतील" अशी जी मनोभूमिका होती ती बदलण्याचा प्रयत्न करणे चुकीचा आहे का?
6 Jan 2017 - 10:21 pm | राघवेंद्र
मला तरी पुणे - सोलापूर मध्ये कॅशलेस व्यवहार करता आले. सोलापूरच्या कामत हॉटेल प्रसिद्ध असूनही कार्ड नाही घेतले.
सामान्य लोक नोटबंदी खुष आहेत कारण त्यांना माहिती कोणाकडे किती काळा पैसा आणि आता कसा प्रॉब्लेम झाला.
सामान्य लोक नव्या गोष्टी शिकत आहेत.
6 Jan 2017 - 10:37 pm | हतोळकरांचा प्रसाद
कुठलीही नवी माहिती किंवा प्रश्न नसलेला व तेच तेच इतर धाग्यांवर चर्चिलेले मुद्दे असणारा लेख आहे! तरीही काही नवीन अँगलने चर्चा होईल अशी अपेक्षा धरून रुमाल टाकून ठेवतो.
अवांतर : भेंड्या खेळण्यासाठी किंवा जिलेबी या सदरात टाकायला एखादा धागा ठरवण्यासाठी साधारणपणे काय निकष लावले जात असतील बरे?
6 Jan 2017 - 11:36 pm | संदीप डांगे
नेता - मित्रों मेरे गुजरात मे गाय तो गाय; बैल भी दूध देता है
अधिकारी पीछे से -सर बैल दुध नही देता है
नेता- मित्रों गाय घास खाती है कि नही खाती है. खाती है कि नही खाती है ?
जनता - खाती है
नेता- गाय घास खाती है तो दुध देती है; तो बैल भी घास खाता है. तो उसे भी दुघ देना चाहिये कि नही देना चाहिये ?
जनता- देना च़ाहिये
नेता- दोनो हाथ उठाकर बताइए देना चाहिये की नही?
जनता- देना ही चाहिए
नेता- मित्रों जब सवासौ कराेड जनता का आशिर्वाद मेरे साथ है तब बैल काे दूध देने से दुनिया की काेई ताकत नही राेक सकती !
6 Jan 2017 - 11:39 pm | हतोळकरांचा प्रसाद
जोकच्या भेंड्या खेळायच्या म्हणता कि काय? काय आलंय अक्षर?
7 Jan 2017 - 11:28 pm | Nitin Palkar
Childish! कावीळ झालेल्याला सर्व जग पिवळ दिसतं!
8 Jan 2017 - 1:51 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
तुम्हाला एक फुकट सल्ला देतोय. त्याचं काय आहे की तुम्ही चुकूनसुद्धा गुजरातचा आसपास फिरकू नका. अचानक पान्हा फुटला तर. नकोच ते.
आ.न.,
-गा.पै.
9 Jan 2017 - 1:09 pm | संदीप डांगे
गा मा स्वअनुभवाच्या आधारे सल्ला देत आहात वाटतं... :) ;)
10 Jan 2017 - 2:45 am | गामा पैलवान
संदीप डांगे,
मी नाही हो, तुम्हीच इथे स्वानुभवकथन करताय : http://www.misalpav.com/comment/911444#comment-911444
आ.न.,
-गा.पै.
11 Jan 2017 - 8:43 am | साहेब..
+१
9 Jan 2017 - 12:42 pm | मराठी कथालेखक
हा हा... गोबेल्सचे तंत्र वापरुन सारं काही सिद्ध होवू शकतं.
7 Jan 2017 - 12:22 am | संदीप डांगे
7 Jan 2017 - 6:54 am | ओम शतानन्द
चावून चावून चोथा झालेला विशय
7 Jan 2017 - 8:39 am | योगेश कोकरे
मोदींनी हा निर्णय फारसा विचार करून घेतला असेल असा मला वाटत नाही .एकंदर सध्याच्या त्यांच्या देहबोलीवरून हा निर्णय पूर्णतः फसलेला आहे असे दिसत आहे. त्यांनी हा निर्णय घेताना त्यांना आपल्या देशाचा आवाका लक्षात आलेला दिसत नाही . ज्यांचा कला पैसे होता त्यांनी नातेवाईक, मित्र, सोने या मार्फत तो पंधरा करून घेतलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ३१ सप्टेंबर पर्यंत काळा पैसे जमा करण्याचा आदेश होता तो पर्यंत बऱ्याच लोकांनी आपला काळा पैसे जमिनी खरेदी करणे ,शेतीमध्ये बागायती मोठ्याप्रमाणात लागवड केली आहे , लहान मोट्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. म्हणजे ८ नोव्हेंबर ला कलेपैसे वाले रडायला लागले ,रांगेत मोठी गर्दी केली ,त्यांची खूप वाट लागली असे बोलणे मूर्खपणाचे ठरेल. आणि जे लोक सापडले ते एकंदर देशाचा विचार केला तर मूठभर म्हणणे पण ज्यास्त होईल इतके आहेत . आणि मोदींचे काही मुखवटे या काळात लक्षात आले. जस कि ते लोकांच्यासमोर भावनिक होणे हि फक्त आणि फक्त धूळफेक होती . कारण भावनिक होताना तुमचे एकंदर हावभाव असे वाटत होते कि जाणून बुजून तसे भाव आणले जात होते ,शिवाय लोकांनां स्वतःहून सांगणे कि मला तुम्ही लोक टाळ्या वाजवून साथ द्या ,शिवाय असे म्हणणे कि ८ नोव्हेंबर च्या आधी ५० , १०० ला काही किम्मत नव्हती .त्यांचे लोकसभेत व राज्यसभेत गप्प बसने .त्यांना जर उत्तर द्यायचे होते तर लोकसभेत द्यायला हवा होता. मोदींच्या भाषणात फक्त आणि फक्त जुमलेच येत आहेत. आणि जे लोकांचे नुकसान झाले आहे ,ऑटोमोबाईल कंपन्यांचे विक्री घटली आहे', किरकोळ विक्रेत्यांचे उत्पन्न घटले आहे. जरी लोक साथ देत असले तरी हे नुकसान विसरून चालणार नाही . आणि भाषणबाजी करणे हा काही त्यावर उपाय नाही . एकंदर काय तुम्ही कितीही म्हणालात कि" मला तुम्ही म्हणाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे" आणि आमची कितीही इच्छा असेल कि "तुम्हाला पोकळ बांबू चे फटके madison square मध्ये द्यावेत" तरी ते प्रॅक्टिकली शक्य नाही..........
9 Jan 2017 - 12:45 pm | मराठी कथालेखक
चांगला प्रतिसाद
11 Jan 2017 - 1:54 pm | चौकटराजा
डिसेंबर महिन्यात वाहनविक्री वर्षात सर्वात कमी असते. मग कोणतीही कंपनी असो. हा अलिखित नियम आहे. त्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही. लोकाना चेकद्वारे खरेदी
करायला कोणी बन्दी केली होती ? डीलरने ..... ? खरे कारण नव्या सालचे रजिस्ट्रेशन आर सी वर आले की गाडी विकताना बरी किंमत येते हे आहे. हे २२ वर्षाचे निरिक्षण जवळूनचे आहे.
11 Jan 2017 - 2:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
याशिवाय...
डिमॉनेटायझेशनमुळे, नकदीने (आणि बहुदा काळ्या पैश्याने) होणारी खरेदी, उदा...
(अ) लक्झरी गाड्या,
(आ) लक्झरी सदनिका किंवा गुंतवणूक म्हणुन घेतलेल्या अतिरिक्त सदनिका,
(इ) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेली जमीन,
(ई) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेले सोने,
(उ) भरमसाठ किमतीच्या आणि/किंवा चैनिच्या वस्तू,
इत्यादींची विक्री कमी होणार हे नक्की होतेच.
अश्या विक्रीने होणार्या जीडीपीतील वाढीला वाढ न म्हणता सूज म्हणतात. कारण त्यामुळे फक्त काळ्या संपत्तीचे व्यवहार वाढतात, पण त्याचा नोकर्या वाढण्यावर किंवा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात लक्षणिय फायदा होण्यावर काहीच सकारात्मक फरक पडत नाही... किंबहुना अश्या व्यवहारांत भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याने देशावर नकारात्मकच परिणाम होतात. गेली काही वर्षे जीडीपीचा दर सतत वर असूनही अनेक रेटिंग एजन्सीज भारताच्या पतीचा दर त्या प्रमाणात वाढवत नव्हत्या त्यामागे हे महत्वाचे कारण होते.
त्याविरुद्ध, आता बँकात जास्त पैसा खेळू लागल्याने सरकारी प्रकल्प, उद्योगधंदे आणि व्यवसाय इत्यादींना तो सुलभ दराने उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे नवीन नोकर्या निर्माण होतील व जास्त पैसा खेळता राहील. त्यातच सर्वसामान्य माणसांना मिळणार्या कमी दराच्या सुलभ कर्जाची भर पडली आहे/पडत राहणार आहे. अर्थातच, छोट्या/मध्यम आकाराच्या गाड्या, कमी/मध्यम किमतीची घरे, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातल्या वस्तू, इत्यादींची विक्री वाढेल. लक्झरी गाड्या/सदनिका/वस्तू यांच्यापेक्षा नवीन विक्रीची "दर नग किंमत" कमी असली तरी एकूण नगांची संख्या अनेक पटींनी जास्त असेल. याचा (किंमत X नग) परिणाम म्हणून, येत्या ३ ते ४ तिमाहींत, जीडीपीत "वाढ" (सूज नव्हे !) होण्यात होईल.
यामध्ये अजून एक महत्वाचे परिणाम विसरले जात आहे. असंघटीत असलेले व्यवसाय आणि छोटेमोठे उद्योग यांच्या उत्पादन/सेवेचा अंदाज लावणे शक्य नसल्याने जीडीपी ठरवताना एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते किंवा त्यांच्या उत्पादन/सेवेची अंदाजपंचे कमीत कमी किंमत धरली जात असे. आता, डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या उत्पादन/सेवेची खरी किंमत जमेस धरणे जास्त सुलभ होईल. वर म्हटल्याप्रमाणेच, अश्या प्रत्येक व्यवसाय/उद्योगाचे उत्पन्न तुलनेने कमी (वार्षिक काही लाख) असले तरी भारतभरचे असे सर्व व्यवसाय दशलक्षांच्या संखेत आहेत... जीडीपीतले त्यांचे योगदान लक्षणिय असणार आहे.
मुख्य म्हणजे, यापुढची नवीन वाढ सर्वसामान्य लोकांच्या हाती जास्त पैसा खेळू लागल्याने होणार आहे... श्रीमंत जास्त श्रीमंत झाल्यामुळे नाही. अर्थातच, ही वाढ लोकाभिमूख आणि म्हणुनच निरोगी वाढ असेल. किंबहुना, अश्या वाढीचा दर पूर्वीच्या सूजेपेक्षा कमी असला तरी तो देशाच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचाच राहील. आणि त्यामुळे भारताची पत रेटिंग एजन्सींनी पूर्वीपेक्षा जास्त वाढवली तर आश्चर्य वाटायला नको.
11 Jan 2017 - 3:26 pm | गॅरी ट्रुमन
मस्तच. हे कारण नक्कीच समजण्यासारखे आहे. फ्रिकॉनॉमिक्समधील आकड्यांच्या विश्लेषणाप्रमाणे हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल.
7 Jan 2017 - 11:51 am | गॅरी ट्रुमन
ही बातमी चुकीच्या वेळी आली की हा लेख चुकीच्या वेळी लिहिला आहे हे समजेना झाले आहे :)
7 Jan 2017 - 12:35 pm | मार्मिक गोडसे
दहशतवादी हिंसाचार ६०% आणि हवाला व्यवहार ५०% नी कमी झाला असं बातमी सांगते. ह्याचा अर्थ नवीन बनावट नोटा बाजारात आल्या असाव्यात आणि नवीन ५०० व २००० च्या नोटांनी हवाला व्यवहार सुरळीत चालू झाला असावा आणि तोही नोटाबंदी चालू असताना. नोटाबंदी हा यावर जालीम उपाय होता ना? मग का फक्त ५०% च्या आसपास यश मिळाले?
7 Jan 2017 - 12:39 pm | गॅरी ट्रुमन
याला म्हणतात शिफ्टिंग द गोलपोस्ट. समजा दहशतवादी हिंसाचार आणि हवालामध्ये अजिबात फरक पडला नसता तर म्हणायचे "बघा आम्ही सांगत होतो काहीच फरक पडलेला नाही" आणि आता हे आकडे आल्यावर "५०% किंवा ६०% च का आणि १००% का नाही" हे विचारायचे. एकूणच काय की बॉल कोणत्या दिशेने मारायचा आहे हे आधीच ठरवून ठेवायचे आणि मग गोल झालाच पाहिजे अशा पध्दतीने गोलपोस्ट बदलायचे.
चालू द्या.
7 Jan 2017 - 1:41 pm | संदीप डांगे
ट्रुमन साहेब, शिफ्टींग गोलपोस्ट तर भाजपसरकार करत आहे.
स्वत: मोदींनी नोटाबंदी ही 'भ्रष्टाचार, आतंकवाद व खोट्या नोटा' यांसाठी असल्याचे ८ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितले. म्हणजे गोलपोस्ट तर त्यांनीच डिफाईन केला ना? तो काही विरोधकांनी डिफाईन केला नाही. आता जी चर्चा होईल ते मोदींनी केलेल्या भाषणातल्या मुद्द्यांसंबंधीच होईल. त्यालाच केंद्र समजून केली पाहिजे.
हवाला ५०% आणि हिंसाचारात ६०% ही उपलब्धी असल्याचे सांगीतले जात असेल तर उरलेल्या ५० आणि ४० चे काय? असा प्रश्न येईलच. त्यात उखडण्यासारखे काय आहे? ५० टक्केही होत असेल तर होत आहेच ना? त्यात कोणता गोलपोस्ट शिफ्ट होतोय? १०० टक्के बंद व्हावे अशी इच्छा असणे चुकीचे नसावे बहुतेक.
एक उदाहरण देतो. समजा एखाद्या शहरात रोज शंभर चोर्या होत आहेत. आणि पोलिसांनी धाडसी कारवाई करुन त्याचे प्रमाण ५० वर आणले तरी पोलिस यशस्वी झाले असे म्हणता येत नाही, ५० टक्के चोर्या कमी झाल्या ही उपलब्धी नाही. अजूनही पन्नास होत आहेत ही जबाबदारी आहे.
उपलब्धी कशाला म्हणावे. जर एखाद्या शहरात शंभर बेरोजगार असतील आणि त्यातल्या पन्नास लोकांना काही कामधाम मिळाले तर ती सरकारप्रशासनाची उपलब्धी समजली पाहिजे. आता उरलेले पन्नास जरी जबाबदारी असले तरी पहिल्या पन्नासांचे रोजगारक्षम होणे यश साजरे करायला पात्र आहे.
कसं आहे, गोलपोस्ट आहे तिथेच आहे पण सरकारसमर्थक 'आम्हाला पाहिजे तसेच खेळा म्हणत आहेत' त्यामुळे समस्या होते.
9 Jan 2017 - 12:48 pm | मराठी कथालेखक
मुख्य म्हणजे हवाला वा दहशतवादी कारवाया कमी झाल्या हे ठीक.. पण हा तात्पुरता परिणाम नाही तर दीर्घकालीन परिणाम आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. कदाचित असेही असेल की कमालीची थंडी, हिमवर्षाव ई मुळे दहशतवादी कारवाया काही काळ थंडावल्या आणि श्रेय नोटाबंदीला जात आहे.
7 Jan 2017 - 11:30 pm | Nitin Palkar
पूर्णपणे सहमत!!!
7 Jan 2017 - 12:41 pm | संदीप डांगे
भक्तांना असे काही समजत नसते हो. त्यांना हवे ते बोला बघू. म्हणा अर्धा ग्लास भरलेला आहे. बी ऑप्टिमिस्टिक... नकारात्मकता नको. सकारात्मकता दाखवा.
7 Jan 2017 - 12:45 pm | गॅरी ट्रुमन
डांगे, तुमच्याकडून जी अपेक्षा होती ती अगदी पूर्ण केली आहेत. इतरांनी मोदींचे समर्थन कधीही केले तरी बिनदिक्कतपणे भक्त म्हणून मोकळे व्हायचे. अशा माणसांशी कसे डिल करायचे हे मला माहित आहे आणि मी तसेच आता तुमच्याबरोबर करणार आहे.
7 Jan 2017 - 12:59 pm | संदीप डांगे
माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाखाली आला त्याल कारण बहुधा दोघांनी एकावेळेस टाकले म्हणून असेल. मी माझा प्रतिसाद देईपर्यंत तुमचा वाचला नव्हता.
तुम्हाला उद्देशून किंवा अपरोक्ष भक्त म्हटलेले नाही. तुम्ही भक्त पद्धतीचे वर्तन आजवर तरी दाखवलेले नाही. नोटाबंदीवरचे तुमचे आतापर्यंतचे प्रतिसाद एकमेव म्हणता येतील असे संतुलित, निष्पक्ष, आस्तेकदम आहेत. सो नो गैरसमज प्लीज.
तुम्ही टाकलेली बातमी अर्धसत्य आहे. अशा बातम्यांनी भक्तलोक हुरळून जातात आणि जितंमया करत सुटतात असं निरिक्षण आहे. त्याला लॉजिकल काउंटरअर्गुमेंट केले तरी उपयोग होत नाही असे दिसून येते. त्यादृष्टीने माझे विधान आहे.
7 Jan 2017 - 1:12 pm | हतोळकरांचा प्रसाद
...
याबद्दल जरा विस्ताराने टाकाच राव! म्हणजे जाणतेअजाणतेपणी आपण काय तसलं वर्तन वगैरे करत आहोत का ते कळेल आणि मग कोण भक्त आणि कोण नास्तिक वगैरे असलं वर्गीकरण सहज करता येईल, कसे?
10 Jan 2017 - 3:52 am | संदीप डांगे
10 Jan 2017 - 10:42 am | हतोळकरांचा प्रसाद
व्वा छान आहे की!
आता या चार्ट नुसार खालील प्रतिसादात कुणाकुणाला तुम्हाला भक्त म्हणायचे होते तेही जमले तर सांगून टाका, उगाच सरसकटीकरण करून संभ्रम कशाला? तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही गॅरींना म्हणत असाल असेच वाटले, पण तुम्ही स्पष्टीकरण दिलात. मग कोण?
http://www.misalpav.com/comment/911499#comment-911499
आणि दुसरं म्हणजे ते भक्त च्या ऐवजी तुम्ही (किंवा कोणीही नॉन-भक्त) चा मेंदू असता तर त्याच सिनॅरिओज मध्ये मेंदूने कसे काम केले असते तेही जमले तर सांगून टाका म्हणजे भक्तांना कसा मेंदू चालवायचा तेही कळेल, कसे?
10 Jan 2017 - 11:05 am | संदीप डांगे
भक्तांना कसा मेंदू चालवायचा तेही कळेल,
^^ विनोद जमला बरं का! ;-)
10 Jan 2017 - 11:43 am | हतोळकरांचा प्रसाद
ते विनोद-बिनोद जाऊद्या हो, भक्त कोण-कोण तेवढं कळलं तर बरं होईल!
10 Jan 2017 - 1:27 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
चार्टवर तेच लिहिलंय. भक्ताचा मेंदू कसा चालतो ते. मग विनोद कसला?
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2017 - 1:40 pm | संदीप डांगे
लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा मेंदू चालणे / भक्तांनी मेंदू चालवणे, इनोद हिथं हाय सायबा! =))
10 Jan 2017 - 1:56 pm | मोदक
खाली माझ्या प्रतिसादांना उत्तरे देणार आहात ना..?
10 Jan 2017 - 2:05 pm | संदीप डांगे
एकदा ठरवा नक्की की मी महत्त्वपूर्ण आहे की नाही.
तुम्हीच म्हटल्याप्रमाणे मी महत्त्वपूर्ण नाही ना? मग संपला विषय. कशाला मागेमागे फिरायचं उगाच, द्याना उत्तर द्याना उत्तर करत?
बाकी जो काय विचार करायचा असेल, वाटून घ्यायचे असेल ते वाटून घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात.
सुखी राहा.
धन्यवाद!
10 Jan 2017 - 2:36 pm | हतोळकरांचा प्रसाद
तो विनोद आणि चमचाफीडिंग दोन्ही ओढूनताणून वाटलं! पण तरीही अजून एक चमचाफिडींग : मेंदू चालवणे पक्षी डोकं चालवणे, ते स्वतःच चालवायचं असतं!
जोक्स अपार्ट, पण ते भक्त कोण-कोण तेवढं सांगितलंत तर वर्तुळ पूर्ण होईल. बाकी जोक्स काय ते तर नेहमीच चालत राहतील.
10 Jan 2017 - 3:01 pm | संदीप डांगे
बाकी लक्षणं दिलीत वर, तेवढ्यावरुन कोण भक्त ते कसं ओळखावं हेही समजत नसेल तर.... असो!
10 Jan 2017 - 5:19 pm | हतोळकरांचा प्रसाद
ते आम्ही सामान्य मिपाकर....कवा कवा मदत...वगैरे...बघा जमलं तर करा मदत! असा नेहमी नेहमी मदतीसाठी याचना करायला लावणे बरे नव्हे!
10 Jan 2017 - 10:27 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
मग उरलेल्या चार्टचा फापटपसारा कशाला?
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2017 - 12:48 pm | मार्मिक गोडसे
मग काय आता १०० % यश मिळवण्यासाठी परत नोटाबंदी करणार का?
7 Jan 2017 - 1:12 pm | संदीप डांगे
काहीतरी सबळ पुरावे हवेत नै...? खाली काही देतोय, बघून घ्या सबळ आहेत की नाही ते.
मोदींच्या ३१ डिसेंबरच्या भाषणातले काही खोटे दावे. https://thewire.in/91122/modi-fact-check/
7 Jan 2017 - 1:22 pm | वरुण मोहिते
अजून खूप वेळ जाणारे निश्चित कळायला . नोटबंदी नंतर पण दहशतवाद्यांकडे २ हजाराच्या नोटा सापडल्या होता ,
त्यामुळे नोटबंदी हा पर्याय नाही दहशतवादाला मानलं कि १-२ महिने थोडा फरक पडला असेल तर सारखी नोटबंदी करणार का ?? नोटा चलनात आल्यावर परत होणारे ते .त्यामुळे दहशत वाद संपला हा मुद्दा हास्यास्पद आहे . आज बिटकॉइन सारखा चलन आहे वेगवेगळे उपाय आहेत . सध्यातरी दहशत वाद कमी झाला म्हणून ग्रेट असं म्हणता येणार नाही
7 Jan 2017 - 2:21 pm | निष्पक्ष सदस्य
कुठे कमी झालाय??
फक्त त्याच्या बातम्या येत नाहीत.
7 Jan 2017 - 1:27 pm | निष्पक्ष सदस्य
वर कोणीतरी रिझल्ट येईपर्यंत वाट पहावी म्हणत आहेत,
पण परिक्षाच झाली नाही तर कसल्या रिझल्टची वाट पहायची?
बोकीलांच्या एबीपी माझावरच्या दोन मुलाखती तर निवळ्ळ अभिनिवेशी अन् हास्यास्पद आहेत.
7 Jan 2017 - 1:44 pm | संदीप डांगे
आणि रिझल्ट आधीच मेरिटमधे आल्याच्या थाटात पेढे वाटायला सुरुवात केली आहे त्याकडे बघायचे नसते. =))
7 Jan 2017 - 2:02 pm | हतोळकरांचा प्रसाद
परीक्षा झाली कि नाही यावर तुमचे मत काय?
7 Jan 2017 - 3:48 pm | गामा पैलवान
पिरा,
हा सगळा काळा पैसा नष्ट झाला आहे. काळ्या पैशाची नोंद नसते. याउलट बँकेत जमा झालेल्या पैशाची नोंद असते. हा पैसा उजेडात आलेला आहे. सबब तो काळा राहिलेला नाही. मात्र जरी तो पैसा पांढरा असला तरी त्याच्या मालकांना आयकर विभागास उत्तरे द्यावीच लागतील. किंबहुना मालकाचे उत्तरदायित्व हाच काळ्या आणि पांढऱ्या पैशातला फरक आहे.
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2017 - 3:55 pm | संदीप डांगे
गैरसमज आहे.
ह्याद्वारे फक्त इन्स्पेक्टर राज आले आहे. आधी बॅन्कवाल्यांनी मजा केली आता आयकरवाले करतील.
ज्यांनी अडीच लाख च्या आत भरलेत त्याची चौकशी करणार? आधी सरकार ते करणार नाही असं बोलले होते. म्हणजे सरकार आपल्या वचनाला कलटी मारणार?
ज्यांनी चार चार हजार बदलून नेलेत त्यांना कुठे शोधणार?
ही शोधमोहिम किती वर्षे चालणार?
7 Jan 2017 - 3:49 pm | संदीप डांगे
गुजरात ग्रामपंचायत निवडणूकीत काय झालं ते नगरपालिकांच्या निकालांवर खुश होणार्यांनी टाकले की नाही कुठे??
7 Jan 2017 - 7:20 pm | हतोळकरांचा प्रसाद
मला हे काही धागे मिळाले गुगल्यावर, अजून कोणाकडे काही जास्त माहिती असेल तर टाकावी -
http://indianexpress.com/article/india/gujarat-panchayat-polls-bjp-felic...
"Gujarat panchayat polls: BJP felicitates 8,000 new सर्पांचेस"
http://indianexpress.com/article/india/gujarat-rural-polls-una-village-e...
http://indianexpress.com/article/cities/ahmedabad/gujarat-gram-panchayat...
हि मध्यप्रदेशची एक बातमी -
http://zeenews.india.com/madhya-pradesh/good-news-for-bjp-party-sweeps-m...
8 Jan 2017 - 1:02 pm | संदीप डांगे
ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या जातात काय? मला माहित नाही म्हणून विचारतोय.
अवांतरः अनेक पक्षातले प्रस्थापित लोक (भ्रष्ट+गुंड+आरोपी) आपले पक्ष सोडून भाजपमधे प्रवेश करत आहेत, बहुतेक त्यांचे अच्छे दिन त्यांना मिळाले असावेत. अशा तर्हेने कॉन्ग्रेसमुक्त भारत झाला तर काय मजा येईल? =))
8 Jan 2017 - 1:35 pm | हतोळकरांचा प्रसाद
माझ्या माहितीनुसार, अशी निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही पण लढवणारे लोक कुठल्यातरी पक्षाशी निगडित असतातच! त्यामुळे अशा निवडणुकांमधून पक्ष ग्राउंड लेवल ला पोहोचवणे शक्य होत असावे! तुम्ही वर नोटबंदीसंदर्भात त्याचा उल्लेख केला म्हणून वरील लिंका टाकल्या.
बाकी, भ्रष्ट + गुंड + आरोपी हे सरसकट विधान न करता केस बाय केस बघुयात ना! असे हे कोण लोक भाजपमध्ये येत आहेत ते निश्चित करून त्याबद्दल चर्चा शक्य आहे. भाजप पूर्णच्या पूर्ण धुतल्या तांदळासारखा पक्ष आहे हा गैरसमज आहे. निष्ठवंतांच्या जोरावर सत्तेत येण्याइतका बेस तयार झाला की असले झुगाड बंद करतील अशी अपेक्षा आहे.
7 Jan 2017 - 4:05 pm | खटपट्या
पण आता अचानक रांगा बंद का झाल्या?
आता शेतकरी काय करतायत? व्यवहार चालू झाले ना सर्व?
देशात अराजक माजेल वगैरे अंदाज होता. अजून कुठे अराजक माजले नाही ते?
काळा पैसा बाहेर आला की नाही हा मुद्दा आहे. त्याबद्दल सरकारचे निवेदन येइपर्यंत थांबूया.
7 Jan 2017 - 4:46 pm | संदीप डांगे
असे असेल तर दरवर्षी अधून मधून करत राहावी नोटबंदी!
9 Jan 2017 - 9:03 am | खटपट्या
काय हो डांगे साहेब उगाच उत्तर द्यायचं म्हणून देताय काय ?
7 Jan 2017 - 5:06 pm | सुखीमाणूस
विरोधक फारच रडतायत. मला तर परवा एक रिक्शावाला "मोदीना अजून १० वर्ष द्यायला हवी तरच सुधारणा होतील" अस म्हणणारा भेटला! खुश होता एकंदरीत मोदींवर
म्हणजे नोकरदार खुश आणि गरिब खुश कारण काहीतरी पावल उचलली गेली.....
हल्ली फ्लेक्स पण रोडावले आहेत......
7 Jan 2017 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
हल्ली फ्लेक्स पण रोडावले आहेत.
चपखल निरिक्षण !
7 Jan 2017 - 10:53 pm | Nitin Palkar
व्यर्थ उधळायला पैसा बंद झाला!
8 Jan 2017 - 11:31 am | सतिश गावडे
फ्लेक्स प्रिंटींगचा एंट्री लेवलचा पर स्क्वेअर फुटचा दर वडापावच्या किंमतीइतका कमी असतो.
9 Jan 2017 - 11:35 am | गणामास्तर
नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ?
बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.
9 Jan 2017 - 11:36 am | गणामास्तर
नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ?
बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.
7 Jan 2017 - 7:10 pm | मार्मिक गोडसे
GDP चे आकडेही रोडावतील. जे जे काही रोडावलं जाईल ते नोटाबंदीच्या निर्णयामुळेच ना?
7 Jan 2017 - 9:35 pm | सुखीमाणूस
छापल्यामुळे मिळालेली वाढ आहे का?
मग ती फसवीच की?
7 Jan 2017 - 9:46 pm | संदीप डांगे
हव्या तशा नोटा छापल्याने हवी तशी जिडीपी मिळते हे ज्ञान नवीनच...! आमच्यासारख्या अजाण बालकांवर अजून असे ज्ञानकण उधळावे ही विनम्र प्रार्थना.
7 Jan 2017 - 11:20 pm | सुखीमाणूस
नोटा कमी छापल्यामुळे जिडीपी कमी होतो, तर उलट पण होत असेल का?
7 Jan 2017 - 11:55 pm | संदीप डांगे
आधी हे सांगा की नोटा 'कमी छापल्याने' जीडीपी कमी होतो हे कसे कळले तुम्हाला?
8 Jan 2017 - 7:41 am | सुखीमाणूस
नोटबन्दीमुळे मन्दी आली
8 Jan 2017 - 7:47 am | सुखीमाणूस
मार्मिक गोडसे पण म्हणतायत तसे...
की आता जिडीपी पण कमी होइल
8 Jan 2017 - 12:17 pm | मार्मिक गोडसे
मार्मिक गोडसे पण म्हणतायत तसे...
GDP चे आकडे आल्यावर नोटाबंदीच्या समर्थकांचे जिमनॅस्ट बघायची ईच्छा आहे.
7 Jan 2017 - 7:22 pm | वरुण मोहिते
रिक्षावाला खुश म्हणून सगळं ओके. चालुद्या .गरिबी हटाव पण आलेला मागे त्यावेळी पण लोक खुश होती .
बाकी फ्लेक्स दिसत नाहीयेत ते मोदींमुळे असे अर्थ मस्त असतात . पंतप्रधानांना फ्लेक्स हटवा असा आदेश देण्याइतका वेळ असतो काय ???लोल
7 Jan 2017 - 7:35 pm | मार्मिक गोडसे
पंतप्रधानांनी एकदा झाडू मारल्यापासून संपूर्ण भारत स्वच्छ झाला. नवीन नोटेवरच्या चष्म्यालाही 'स्वच्छ भारत'चा वायपर लावला आहे.
7 Jan 2017 - 11:26 pm | सुखीमाणूस
हे सगळे उद्योग रोखीने होत असणार ते तुर्तास कमी झाले असावेत.
7 Jan 2017 - 8:03 pm | सुबोध खरे
मोदी भक्त आणि मोदी रुग्ण या भांडणात न पडत मी एकच म्हणेन
स्वच्छ भारत असावा आणि त्यासाठी मोहीम चालवणे यात गैर काय आहे हेच कळत नाही. शौचालये बांधणे किंवा स्वच्छते बद्दल स्वातंत्र्याला होऊनही ७० वर्षे जनजागृती करायला लागणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नसेल. स्त्रियांना देहधर्मासाठी रात्रीपर्यंत वाट पाहायला लागणे या सारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसावी.
स्वच्छ भारत मोहिमेवर टीका करणार्यांनी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे आणि त्याची खिल्ली उडवावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नसावी.
https://www.cdc.gov/healthywater/global/sanitation/toilets.html
7 Jan 2017 - 8:09 pm | संदीप डांगे
स्वच्छ भारत मोहिमेवर टीका करणार्यांनी "या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे आणि त्याची खिल्ली उडवावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नसावी."
>>> कुणी खिल्ली उडवली आहे काय इथे किंवा इतर कोणत्या धाग्यावर?
7 Jan 2017 - 9:00 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
तुम्हाला इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते ठाऊक नाही. बरं ते जाउद्या.
बँकवाल्यांनी अगोदर अशी काय मजा केली होती, जी आता आयकरवाल्यांकडे वर्ग झालीये? जरा समजावून सांगणार का?
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2017 - 9:17 pm | संदीप डांगे
तुम्हाला इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते ठाऊक नाही
^^^ कृपया तुम्ही सांगा... ज्ञानदान हे पुण्यकर्म...
7 Jan 2017 - 9:53 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
इन्स्पेक्टर राज ही संज्ञा तुम्ही पहिल्यांदा वापरली आहे. ती तिच्या पारंपरिक अर्थाशी जुळंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2017 - 10:01 pm | संदीप डांगे
शब्द माझा आहे ना? मग मला ठावूक नाही असं कसं म्हटलंत?
मी कोणत्या अर्थाने वापरला तो अर्थ सांगा व तुम्हाला अचूक कसं कळलं तेही. तसेच ते पारंपरिक अर्थाशी कसं जुळत नाही हे सांगा.
7 Jan 2017 - 10:12 pm | jp_pankaj
दु:खेष्वनुव्दिग्नमना: सुखेषु विगतस्प्रुह: |
वीतरागभयक्रोध: स्थितधीम्रुनिरुच्यते ||
;)
7 Jan 2017 - 10:20 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
बेअकलीपणाचं सोंग घेताय खरं, पण मुखवटा चेहऱ्याचा भाग बनू घातलाय.
इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते इथे आहे : https://www.quora.com/What-is-the-Inspector-Raj-and-what-are-benefits-of...
आता हे राज नोटाबंदीशी कसे संबंधित आहे ते कृपया सांगावे.
आ.न.,
अ.पै.
7 Jan 2017 - 11:02 pm | संदीप डांगे
टॅक्स इन्स्पेक्टरच्या (आयकर अधिकारी) हातात खरे, खोटे ठरवण्याची सत्ता दिल्यावर इन्स्पेक्टरराज येणार नाही तर काय रामराज येणार?
http://indianexpress.com/article/business/business-others/demonetisation...
8 Jan 2017 - 2:46 am | गामा पैलवान
संदीप डांगे,
तुम्ही दिलेल्या लेखात इन्स्पेक्टर राज येण्याची शक्यता आहे असं अत्यंत मोघमपणे सूचित केलं आहे. पूर्ण लेख वाचल्यावर कळून येतं की मोठे मासे पकडण्यासाठीही आयकर विभागाकडे मनुष्यबळ तोकडं आहे. तर छोट्या प्रामाणिक करदात्यांकडे ढुंकूनदेखील बघायला वेळ मिळणार नाहीये. तुम्ही उगीच पराचा कावळा करंत आहात.
आ.न.,
-गा.पै.
8 Jan 2017 - 12:44 pm | संदीप डांगे
बात को घुमा रहे हो मियां! =))
8 Jan 2017 - 1:56 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
अहो, मी नीतिमत्तेचा महामेरू आहे. मी कशाला घुमवाघुमवी करेन?
हे इन्स्पेक्टर राज तर आयकरविभागात फार पूर्वीपासून चालू आहे. नोटाबंदीमुळे याला परत उधाण कसं येईल ते कृपया समजावून सांगावे. तसेच बँकांनी काय मजा मारली होती हेही सांगावे.
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2017 - 10:58 pm | Nitin Palkar
ग्लास अर्धा रिकामा आहे हे बघणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असते असं फ्रोइड म्हणून गेलाय...
7 Jan 2017 - 10:41 pm | Nitin Palkar
अनेक प्रतिक्रिया वाचल्या....
नोटाबंदी मुळे मला स्वतःला काय त्रास झाला हे कोणी म्हटल्याचे दिसले नाही. आपण संगणक साक्षर आहोत का ? आपण डिजिटल व्यवहार करु शकतो का? या बद्दल कुणीच काही बोलत नाही.
परदेशस्थ भारतीयांच्या अडचणींची मला कल्पना नाही, परंतू भारतीय सामान्य नागरिकांच्या काय अडचणी आहेत मला समजू शकले नाही.
सर्व भारतीयांनी साक्षर व्हावे, सर्वांनी कर भरावेत अशी अपेक्षा शासानाने, प्रशासनाने, सरकारने करावी यात गैर काय?
हम नाही सुधरेंगे असं म्हणून आम्ही शेतात किंवा नदीकाठीच बसणार हे म्हणण्यात जसा अर्थ नाही, तसा आम्ही सर्व व्यवहार रोखीनेच करू यात आहे.
आज आपण आपला वाणी, डॉक्टर, दुधवाला, आणि असे अनेक यांना आपण रोख पैसे देतो; हे लोक कर भारतात का...? याचा विचार करायला नको का? माझा घामाचा पैसा ज्यावर मी सर्व करांसह आयकर भरतो, त्यावर हे सर्व करबुडवे ईमले बांधतात हे योग्य आहे का?
7 Jan 2017 - 11:51 pm | संदीप डांगे
सर्व भारतीयांनी साक्षर व्हावे, सर्वांनी कर भरावेत अशी अपेक्षा शासानाने, प्रशासनाने, सरकारने करावी यात गैर काय?
>> कोण म्हटले ह्यात काही गैर आहे म्हणून? साक्षर होउ नये, कर भरु नये असे इथे कोणी म्हणत आहे काय? पण त्याचा नोटाबंदीच्या निर्णयाशी काय संबंध ते तर त्याशिवायही होऊ शकते, नाही होऊ शकत काय?
हम नाही सुधरेंगे असं म्हणून आम्ही शेतात किंवा नदीकाठीच बसणार हे म्हणण्यात जसा अर्थ नाही, तसा आम्ही सर्व व्यवहार रोखीनेच करू यात आहे.
>> रोखीने व्यवहार म्हणजे मागासलेपण हा एक 'आधुनिक' विचार ह्या नोटबंदीमुळे दिसला. विकसित व पुढारलेल्या देशातल्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण बघितले तर ते सुधरलेले लोक अजून नदीकाठीच बसत असावे असे वाटते. उदा. जर्मनी.
खालील ओळी ओळखीच्या वाटतील.
Governments have been increasingly pushing for a cashless society. Ostensibly, by having a paper trail for all transactions, such a move would decrease crime, money laundering, and tax evasion. France’s finance minister recently stated that he would “fight against the use of cash and anonymity in the French economy” in order to prevent terrorism and other threats.
पण १७ मे २०१६ चं आर्टिकल आहे हे. http://www.visualcapitalist.com/shift-cashless-society-snowballing/
(ही सरकारे अचानक कॅशलेसच्या मागे लागण्याची काय कारणे असावीत ह्याचा शोध घेतला पाहिजे. काय शिजत असावे?)
While there are certainly benefits to using digital payments, our view is that going digital should be an individual consumer choice that can be based on personal benefits and drawbacks. People should have the voluntary choice of going plastic or using apps for payment, but they shouldn’t be pushed into either option unwillingly.
आज आपण आपला वाणी, डॉक्टर, दुधवाला, आणि असे अनेक यांना आपण रोख पैसे देतो; हे लोक कर भारतात का...? याचा विचार करायला नको का?
>> ह्याचा विचार करायलाच तर सरकारला बसवलंय. कोण कर भरतं, नाही भरत ह्याची जबाबदारी सरकारवर आहे. बॅन्क ट्रान्झॅक्शन झाले तर करचोरी पकडलीच जाईल हा स्वप्नवाद आहे. त्यासाठी सरकारी कररचना, कायद्यांची सुसूत्रता, आणि योग्य व परिणामकारक अंमलबजावणीची गरज असते. नाही तर सत्यम सारखी उदाहरणे आहेतच समोर.
माझा घामाचा पैसा ज्यावर मी सर्व करांसह आयकर भरतो, त्यावर हे सर्व करबुडवे ईमले बांधतात हे योग्य आहे का?
>> तुमच्या घामाच्या पैशावर हे लोक मजा मारतात असे म्हणायचे आहे का? अंमळ गैरसमज. तुमचा घामाचा पैसा काही सेवा-वस्तू घ्यायला तुम्ही त्यांच्याकडे देता तेव्हा ती लूट नसते, व्यवहार असतो. जेव्हा तुम्ही त्यांच्या हातात सोपवता तेव्हा तो 'त्यांच्या घामाचा' पैसा होतो, तुमचा राहत नाही. तेव्हा ते त्या पैशातून कर भरतात की मजा मारतात याच्याशी कीतीही वाटले तरी तुमचा संबंध राहत नाही. जो कर बुडतो तो सरकारचा पैसा असतो, तुमचा-माझा वैयक्तिक नाही. सो डोन्ट गेट इमोशनल अबाउट इट. सरकार कर नीट गोळा करतं की नाही, गोळा झालेल्या कराचा योग्य वापर करते की नाही, मधल्यामधे मंत्री-अधिकारी-कंत्राटदार आपल्या करांचा पैसा खाऊन इमले बांधतात का यावर लक्ष ठेवणे व आवाज उठवणे हे नागरिकांचे काम. काय वाटतं?
बाकी, कॅशलेस होण्यास माझा वैयक्तिक कोणताही विरोध नाही, फक्त जबरदस्ती ढकलल्या जाणे, त्यासाठी जनतेला आपल्या पैशापासून वंचित करणे अयोग्य आहे एवढेच माझे मत.
8 Jan 2017 - 1:04 am | Nitin Palkar
पण त्याचा नोटाबंदीच्या निर्णयाशी काय संबंध ते तर त्याशिवायही होऊ शकते, नाही होऊ शकत काय?
कसे? ते सांगा... आज कुठेही "कागदावर वजन ठेवणे" म्हणजे लाच देणे हे नोटांच्या माध्यमाशिवाय कसे करता येईल?
तुम्ही जर्मनी चे उदाहरण देताय...
Top 5 Cashless Countries - Total Payments
www.totalpayments.org/2013/07/08/top-5-cashless-countries/
Jul 8, 2013 - Here's a look at some countries that are really making a move toward becoming cashless: Sweden. The number of bank robberies in Sweden plunged from 110 in 2008 to 16 in 2011—not because security has vastly improved, but because most Swedish banks simply don't handle cash anymore. ...
ही लिंक देखील एकदा बघा.
तेव्हा ते त्या पैशातून कर भरतात की मजा मारतात याच्याशी कीतीही वाटले तरी तुमचा संबंध राहत नाही. जो कर बुडतो तो सरकारचा पैसा असतो,
या तुमच्या विधानाचा अर्थ ' ज्यांना शक्य असेल त्यांनी कर बुडवावा' असं होत नाही का?
सो डोन्ट गेट इमोशनल अबाउट इट.
WHY SHOULDN'T I?
जर मी इमाने इतबारे सर्व कर भरत असेन तर मी तुमच्याकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे नक्कीच नाही.
लास्ट बट नॉट द लीस्ट ... ३१ डिसेंबरच्या मोदींच्या (आदरणीय पंतप्रधान वगैरे न म्हणता) भाषणातील एक महत्वाचे विधान, आयकर खात्याच्या माहितीनुसार 'संपूर्ण सव्वाशे कोटींच्या या देशात दहा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे केवळ ३४,००,००० चौतीस लाख लोक आहेत, '
थिंक ओव्हर इट संदीपजी .
8 Jan 2017 - 12:43 pm | संदीप डांगे
कसे? ते सांगा... आज कुठेही "कागदावर वजन ठेवणे" म्हणजे लाच देणे हे नोटांच्या माध्यमाशिवाय कसे करता येईल?
>> फार बाळबोध कल्पना आहेत भ्रष्टाचाराबद्दलच्या ह्या... सो चाइल्डिश! कसे करता येईल या प्रश्नाचे उत्तर: http://www.hindustantimes.com/india-news/gujarat-govt-staff-caught-takin...
तुम्ही स्वीडनचे उदाहरण देताय, अनेक समर्थक डोळे झाकून स्वीडन ची स्वीटडीश पुढे करतायत. अर्धसत्य मात्र. स्वीडनची लोकसंख्या एक कोटी आहे फक्त. पर कॅपिटा इन्कम सुमारे ५०,००० डॉलर, आपले किती १५०० डॉलर. स्वीडनपेक्षा तर मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. नगाला नग लावून तुलना करु नये. बाकी मी कॅशलेसच्या विरोधात नाही हे तर नेहमीच सांगत आलोय, पण काहीच्या काही विधाने येत असतील तर तपासून पाहावी असं म्हणालेत इथले दबंगगुरुजी... :-)
या तुमच्या विधानाचा अर्थ ' ज्यांना शक्य असेल त्यांनी कर बुडवावा' असं होत नाही का?
>> त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट पुढे-मागे दिलेला असतांना वाट्टेल तो अर्थ का बुवा काढायचा? सरकारचा कर बुडतोय तर सरकारने कर वसूल करायला अजिबात हयगय करु नये. कर हा सरकारचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे. त्याचा वापर करावा. तुमच्या घामाचा पैसा घेऊन कोणी इमले बांधत असेल तर तुम्हाला का जळजळ? तो इमले बांधणारा कर भरत नाही अशी तुमची धारणा असेल तर आयकरविभागला सूचना द्या. लोकांना घामाच्या पैशांनी इमले बांधता येत नाहीत, हरामाच्याच पैशांनी श्रीमंत होता येते ह्या जुनाट खोट्या समजूतीतून बाहेर या असं सुचवतो.
जर मी इमाने इतबारे सर्व कर भरत असेन तर मी तुमच्याकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे नक्कीच नाही.
मी जर तुम्हाला तुमच्याकडून सेवा-वस्तूच्या बदल्यात घेतलेल्या पैशाचं अधिकृत बील देत नसेल तर मागून घ्या. तो तुमचा हक्क आहे. त्याउपर तुमचा माझा संबंध नाही. मी कर भरतो, नाही भरत हा माझा आणि सरकारचा विषय आहे. मुळात मी कर भरतो की नाही ह्यात तुम्हाला नाक खुपसायची काय गरज असावी नै का? सरकारचे काम तुम्ही करणार तर मग सरकार काय करणार? :-)
लास्ट बट नॉट द लीस्ट ... ३१ डिसेंबरच्या मोदींच्या (आदरणीय पंतप्रधान वगैरे न म्हणता) भाषणातील एक महत्वाचे विधान, आयकर खात्याच्या माहितीनुसार 'संपूर्ण सव्वाशे कोटींच्या या देशात दहा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे केवळ ३४,००,००० चौतीस लाख लोक आहेत, '
>> ३४ नाही २४ लाख. हे काय नोटबंदीमुळे कळले काय?
8 Jan 2017 - 12:50 pm | मार्मिक गोडसे
आपण डिजिटल व्यवहार करु शकतो का? या बद्दल कुणीच काही बोलत नाही.
नोटाबंदीचा हा उद्देश होता का? असेल तर भारतीय जनतेचा 'गिनी पीग ' म्हणून वापर केला गेला काय?
8 Jan 2017 - 2:43 pm | सतिश गावडे
डिजिटल व्यवहार / कॅशलेस / लेस कॅश हा काळा पैसा नावाच्या वाघाच्या शिकारीला गेले असता अचानक समोर आलेला ससा आहे. आता असा आविर्भाव आणला जातोय की या सशाच्या शिकारीसाठीच आम्ही जंगलात आलो होतो ;)
8 Jan 2017 - 3:07 pm | संदीप डांगे
कदाचित उलटे असण्याची शक्यता आहे! :-)
8 Jan 2017 - 4:03 pm | सतिश गावडे
हो. ती ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र ते ही चांगलं आहे. करदाते वाढू शकतील त्याने :)
8 Jan 2017 - 3:20 pm | हतोळकरांचा प्रसाद
अहो तुम्ही सश्याची तरी शिकार होतेय हे मान्य करताय, हेही नसे थोडके! बाकी काही लोक तर मुद्दलात शिकारीला गेल्याचेच मान्य करत नाहीत आणि वरून शिकारीचं नाव सांगून शिनेमाला गेल्याचं ठोकून देतात! :):)
8 Jan 2017 - 4:09 pm | मार्मिक गोडसे
शिकारी गांगरला असल्याने सशाची शिकार होणे अवघड वाटते .
7 Jan 2017 - 10:50 pm | Nitin Palkar
अपरीक्व कसे हे तुम्ही विषद केले नाही. मनुष्य अथवा कोणताही प्राणी बदल सहज स्वीकारत नाही. कोणतीही राजकीय भूमिका न घेता, कोणताही राजकीय अभिनिवेश न अन्गीकारता हा निर्णय कसा अपरिपक्व/चुकीचा आहे ते तुम्ही सांगा.
निव्वळ चिखलफेक का करताय?
7 Jan 2017 - 11:09 pm | मार्मिक गोडसे
अपरीक्व कसे हे तुम्ही विषद केले नाही.
माफ करा, मला परिपक्व म्हणायचे होते. घ्या सांभाळून.
8 Jan 2017 - 12:17 am | संदीप डांगे
ह्या बॅन्केतून इतके पैसे मिळत आहेत की लोक आनंदाने वेडे होऊन दगडफेक करायला लागले. व्वा मोदीजी वाह!
http://www.dnaindia.com/india/report-gujarat-villagers-pelt-stones-at-ba...
8 Jan 2017 - 10:12 am | हतोळकरांचा प्रसाद
म्हणजे हेच भारतभर चाललं आहे तर! अजेन्डा क्लिअर दिसतोय! व्वा डांगेंजी व्वाह!
8 Jan 2017 - 11:57 am | संदीप डांगे
अरेवा! कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?
8 Jan 2017 - 11:59 am | हतोळकरांचा प्रसाद
द्या बरे दाखवून हे कुठे म्हणालो ते!
8 Jan 2017 - 12:01 pm | संदीप डांगे
जे लोक असं सांगतायत त्यांच्यासाठी आहे ते... तुम्ही का अंगावर ओढून घेताय प्रत्येकवेळी?
8 Jan 2017 - 12:05 pm | हतोळकरांचा प्रसाद
तसं तुम्ही स्पष्ट लिहिलं नाही म्हणून! माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना तुम्ही तसं म्हणत आहात! आणि तसंही सरसकटीकरण नको असं आधीपासूनच माझं मत आहे!
8 Jan 2017 - 11:10 pm | lakhu risbud
महामहिम डांगे यांच्या सहीशिक्क्याने आणि गोडसे यांच्या सहीने साक्षांकित असलेले *सदरहू इसम हा मोदी चा भक्त नाही. भाजपा या पक्षाशी त्याच्या दुरान्वये हि संबंध नाही.* हे प्रमाणपत्र आणून इथे त्याची छायाप्रत दिल्यावरच तुमचा प्रतिसाद ग्राह्य धरला जाईल
अन्यथा इथे हतोळकर,खरे,म्हात्रे आणि इथे ट्रुमन आणि गामा पैलवान नावाने वावरणारी व्यक्ती,तुमचे सगळे म्हणजे अगदी प्रत्येक प्रतिसाद हे पूर्णपणे पक्षपाती,आंधळे समर्थन करणारे,असंबद्ध आणि गैरलागू,आहेत.
8 Jan 2017 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
9 Jan 2017 - 5:02 pm | मोदक
कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?
मिपावर किंवा अन्य कोठे, कोण म्हणाले आहे की "कुठेही कोणाला काही त्रास नाही..?"
लिंका द्या.
नेहमी खोटे बोलून बोलून कंटाळा कसा येत नाही हो तुम्हाला..?
9 Jan 2017 - 5:31 pm | संदीप डांगे
आधी सांगा, तुम्हाला दुसर्यांवर पैसे खाऊन प्रतिसाद देतो असे खोटेनाटे आरोप करतांना व सतत खोटे बोलता म्हणतांना कसा कंटाळा येत नाही?
9 Jan 2017 - 5:43 pm | मोदक
तुम्हाला पैसे मिळत नाहीत..? मग इतके कोडगेपणाने खोटे बोलून नक्की काय मिळवता..?
तुमचे प्रतिसाद खोटे पाडायचा कंटाळा आला होता म्हणून थोडा ब्रेक घेतला होता. पण तुमची कावीळ बरी झाली नाही म्हणून अनिच्छेने परत खोटे प्रतिसाद उघडे पाडत आहे.
लिंका मिळाल्या का..? की नेहमीप्रमाणे पळ काढणार..?
9 Jan 2017 - 5:58 pm | संदीप डांगे
जर मी खोटे बोलतो आणि ते पब्लिकला सगळं कळतं असा तुमचा दावा आहे (कुठेतरी तुम्हीच केलाय बॉ, त्याच्याही लिंका मागाल नाहीतर) तर जिथेतिथे परत परत त्याच त्याच ओकार्या करायला का बरे यावे वाटते? स्वत:च्या सत्यावर (लोल!) भरोसा नाही काय?
हे लिंका द्या लिंका द्या काय लावलंय...? मी कधी म्हटलो लिंका देईन म्हणून...? स्वतःच आपलं कुस्तीसाठी षड्डु ठोकत फिरायचं आणि कोणी भाव देत नाही म्हटल्यावर बघा कसे घाबरले म्हणून मिशीला पीळ भरायचा... लगे रहो!
उद्या मी जर म्हटले की सुर्य पुर्वेकडून उगवतो तर त्याच्याही लिंका मागाल....!
9 Jan 2017 - 6:14 pm | मोदक
कसे असते.. तुमच्यासारखे नित्यनियमाने खोटे बोलणारे लोक दोन्हीकडून सोयीस्कर बोलतात म्हणून जिथेतिथे खोटे पाडायचे काम करावे लागते. दुर्लक्ष केले तर "बघा बघा प्रतिवाद नाही म्हणजे माझेच खरे आहे असे निलाजरेपणे नाचायला तुम्ही तयार असणारच."
बाकी मी जिथेतिथे ओकार्या काढतो म्हणजेच "जिथे तिथे तुम्ही खोटे बोलत आहात" हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
लिंका मागतो म्हणजेच पुरावे मागतो आहे. तुम्ही वाट्टेल त्या पुड्या सोडणार आणि त्या खोट्या ठरल्यावर असे पाठ दाखवून पळून जाणार याला काय अर्थ आहे. मी कुस्तीसाठी शड्डू ठोकलेला कुठे दिसला सांगा. मग भाव मिळतो की नाही याच्या चर्चा करूया.
वरून आदेश आल्यावर तुमच्यासारखे लोक सूर्याच्या उगवण्याची दिशा सोडा, चंद्रामुळे सूर्याला प्रकाश मिळतो असेही काहीतरी बरळतील ..आणि नंतर गोबेल्सलाही मान खाली घालायला लावतील.
9 Jan 2017 - 6:12 pm | संदीप डांगे
आणि एक... मी कुठे कुठे काय खोटे बोललो त्याच्या लिंका द्या बरं जरा. आणि ते खोटे आहे हे कसे सिद्ध झाले हेही. चला आता सोक्षमोक्षच लावूया.
9 Jan 2017 - 6:16 pm | मोदक
ओके.
>>>कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?
"कुठेही कोणाला काही त्रास नाही" हे कुणी सांगितले आहे..?
9 Jan 2017 - 7:39 pm | संदीप डांगे
वरिल विधान एक 'सामान्य निरिक्षण विधान' आहे हे समजायला फार सोपे आणि सुटसुटीत आहे. मात्र तुम्ही मला खोटे पाडण्याचा हट्ट धरुन बसल्याने तुम्हाला ते समजून घ्यायचेच नाही. आता त्याला मी काय करु शकतो?
जसं "विरोधक खोटे बोलतायत, दिशाभूल करतायत, राईचा पर्वत करतायत" अशा विधानांचा अर्थ "कुठेही कोणाला त्रास नाही" असा निघतो. पण एवढ्यासाठी 'अमूक हेच शब्द असेच्या असे कोण कोठे बोलले' ह्याचा पुरावा मागत आहात, असं नाही तर तसं म्हणून शब्दांत पकडू पाहत आहात, ह्यावरुन तुमची असहायता उघडी पडत आहे. काय मजबूरी आहे?
ह्याच धाग्यावर दोन-तीन जणांनी ह्या अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. तुम्हाला तर काविळ नाहीना, मग तुम्हाला ते का दिसले नाहीत?
अजूनही दिसले नसतील तर तुमच्या अजेंड्याबद्दल तर पक्की खात्री पटेल, पब्लिकला!
9 Jan 2017 - 8:16 pm | मोदक
कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?
हे 'सामान्य निरिक्षण विधान' हे वाचून ह ह पु वा. इतका शब्दच्छल करण्यापेक्षा "कुठेही कोणाला काही त्रास नाही" हे कोणी सांगितले आहे सांगा की.
जसं "विरोधक खोटे बोलतायत, दिशाभूल करतायत, राईचा पर्वत करतायत" अशा विधानांचा अर्थ "कुठेही कोणाला त्रास नाही" असा निघतो.
हा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला..? इटालियन डिक्शनरी असेल तर बरोबरच असेल. तुमची मजबुरी समजू शकतो.
ह्याच धाग्यावर दोन-तीन जणांनी ह्या अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. तुम्हाला तर काविळ नाहीना, मग तुम्हाला ते का दिसले नाहीत?
तुम्ही तुमच्यापुरते बोला हो. तुम्ही या धाग्यावर मत मांडणार्या सगळ्या आयडींचे प्रतिनिधीत्व करता का..? त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व विधानांची जबाबदारी घेता का..? जबाबदारी घेत असला तर असले युक्तीवाद करा नाहीतर असले घोळक्यात लपायचे उद्योग करू नका.
9 Jan 2017 - 6:18 pm | मोदक
www.misalpav.com/comment/900766#comment-900766
इथे वीस लाखाच्या ट्रक संबंधित माहिती न देता असंबद्ध लिंका देण्याचे काय कारण होते..?
9 Jan 2017 - 7:43 pm | संदीप डांगे
त्यात खोटे काय आहे? लिंक खोटी आहे?
बाकी, वीस लाखाच्या ट्रकचे तर ते विधान एक उदाहरण म्हणून दिले होते. त्यात भाजपची किंवा कोणाची कसलीही बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. दिशाभूल करायचीही गरज नव्हती. एका चांगल्या हेतूने धागा काढला होता. माती करणार्यांनी केली. माझी माहिती-खरेपणा माझ्याजवळ. तुम्हाला खोटे वाटते ना? ठिक आहे मग. तरी धाग्यावर असे होण्याची शक्यता आहे असे सांगणारे काही प्रतिसाद आले होते. आता तर मला त्यामागचा खरेपणा उलगडून दाखवण्याचीही इच्छा राहिली नाही. गरजही वाटत नाही. कोणी वीस लाख रुपये (नवीन नोटांत) देत असेल तर त्याला मात्र सांगेन हां!
मोठ्या रकमांमधे कॅश ट्रॅन्झॅक्शन होतं ह्यासाठी ते उदाहरण होते. अशी अनेक उदाहरणं असतात. पण एखाद्याला अडकवायचे ठरवलेच तर.....ज्याची त्याची मर्जी.
एक लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आंतरजालावर होत नसते. आणि आंतरजालावर झालेली प्रत्येक नोंद खरी नसते. तसेच आंतरजालावर आली म्हणजेच घटना घडली असे समजायचे नसते. एवढे साधे ज्ञान तरी जालावर वावरणार्यांना असायला हवे. मी नोटाबंदीबद्दल विरोधी मत व्यक्त करतो एवड्यासाठी ट्रोलींग करुन मला बदनाम करण्याचे घाट घातले जात आहेत.
सगळं कळतं की...पब्लिकला!
9 Jan 2017 - 8:32 pm | मोदक
तो धागा आणि मी लिंक दिलेला प्रतिसाद आणखी एकदा वाचा मग असंबद्ध लिंका देवून दिशाभूल केल्याचा आरोप का झाला ते लक्षात येईल.
...शक्यतो चष्मा काढून वाचा म्हणजे तुम्ही दिलेले प्रतिसाद आणि त्याचा तुमच्याच धाग्याच्या विषयाची काय संबंध आहे ते ही कळेल.
एक लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आंतरजालावर होत नसते. आणि आंतरजालावर झालेली प्रत्येक नोंद खरी नसते. तसेच आंतरजालावर आली म्हणजेच घटना घडली असे समजायचे नसते. एवढे साधे ज्ञान तरी जालावर वावरणार्यांना असायला हवे.
आंतर्जालावर दिशाभूल करून वातावरण खराब करणार्या आयडींचा प्रतिवाद होतोच होतो. आपण दुसर्यावर प्रछन्न आरोप केले तर आपल्यावरही तसेच आरोप होतील याचेही भान आणि ज्ञान तुम्हाला असेलच. नसेल तर नवीन गोष्ट शिकत आहात असे समजा.
मी नोटाबंदीबद्दल विरोधी मत व्यक्त करतो एवड्यासाठी ट्रोलींग करुन मला बदनाम करण्याचे घाट घातले जात आहेत.
ट्रोलिंगचा तुमच्या डिक्शनरीमधला अर्थ सांगा बघू. तुमच्या सतत खोटे बोलण्याला उघडे पाडले जाणे म्हणजे ट्रोलिंग असे असेल तर बरोबर अर्थ आहे. फक्त ती इटालियन डिक्शनरी बाजुला ठेवून खरा अर्थ समजुन घ्या. तसेच तुमच्यासाठी ट्रोलिंगचा घाट घालावा इतकेही स्वतःला महत्वाचे वगैरे समजुन नका.
"मी खोटे बोलतो आणि डुआयडी पण खोटे बोलतात मग फक्त मलाच का झोडता..?" छाप रडारड जुनी झाली आता.
9 Jan 2017 - 6:21 pm | मोदक
www.misalpav.com/comment/900686#comment-900686
इथे तुमच्याकडे नेमक्या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत, ती चार दिवसांनी देतो असे म्हणाला होतात. याला आणखी ३ दिवसांनी बरोब्बर दोन महिने पूर्ण होतील.
9 Jan 2017 - 7:43 pm | संदीप डांगे
तुम्ही विचारलेल्या ह्या प्रश्नांमुळे मी खोटं बोलतोय हे कसे सिद्ध झाले?
तिथे स्पष्ट लिहिलंय मी:
हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस असा झालेला आहे, चार दिवसात व्यवहार ठप्प राहून किती नुकसान झालंय व हे नुकसान काळ्या पैशाच्या प्रमाणात किती आहे याची आकडेवारी येईल तेव्हा बोलता येईल. सविस्तर प्रतिसाद किंवा लेख चारपाच दिवसांनी लिहितो, बघूया!
इथं काय लिहिलंय की आकडेवारी आली की बोलता येईल! आली काय आकडेवारी? मी वाट बघतोय आकडेवारीची. सरकारने अजून जाहीर नाही केलंय नोटाबंदीचे उद्देश होते ते सफल झाले व त्याची आकडेवारी काय ती? किती काळापैसा मिळाला हे अजून जाहीर व्हायचेच आहे.
तसेच परत कुठेतरी तुम्हाला हे ही बोललो होतो की रोज नवेनवे नियम येत आहेत, परिस्थिती बदलत जात आहे, सरकारचे नॅरेटीव व उद्देश बदलत जात आहेत. एकदा ही सर्कस थांबली की नीट आढावा घेऊन लिहिणार आहे. सदर विषयाचा आवाका इतका मोठा आहे की चार परिच्छेदांत हे सगळे मांडता येणे व तेही भाजपविरोधात असलेल्या प्रत्येक शब्दाचे पोष्टमार्टम करायला बसलेल्यांच्या समोर शक्य नाही.
तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे:
मोदक - Fri, 11/11/2016 - 19:02
>>>>बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?
तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..?
^^ ह्यात माझं मत काय महत्त्वाचं, लोक आपल्या जवळचे पैसे बॅन्कखात्यात भरायला व बदलून घ्यायला उभे होते. त्यात वरीलपैकी लोक नव्हते. आता ह्यात काय खोटे बोललोय?
>>>>सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत.
हे कशावरून ठरवलेत..?
^^ काळापैशावाल्यांनी कसे शांतपणे बॅन्कांना आणि कोणाकोणाला हाताशी धरुन कसे पैसे बदलून घेतले हे तर आता तुम्हालाही कळलं असेलच.
******
अजून काही नेमके प्रश्न राहिले असतील तर घ्या इथेच विचारुन...