बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
प्रतिक्रिया
14 Jan 2017 - 8:15 pm | lakhu risbud
माझं काही मत नाही हो! मी फक्त निरीक्षण करतो ,
तसेही, माझा जन्म 2014 नंतर नाही झाला! ;)
खरंय तुमचे ! जन्म आधीच झालाय, पण आयुष्या चे ध्येय तर २०१४ नंतरंच मिळालेय असे वाटते .
त्यात पण ८ नोव्हेंबर २०१६ नंतर तर enlighten झाल्या सारखेच वागताय .
14 Jan 2017 - 8:45 pm | संदीप डांगे
संकुचित मनाची आणि अर्धवट डोक्याची लोकं माझ्या बद्दल असाच विचार करतात! तेव्हा ते काय विचार करतात याची काळजी मी करत नाही, तेही मी करत बसलो ते जॉबलेस होतील.. तेवढं एकच काम करायची बिचार्यांची लायकी आहे, काय करणार...?
14 Jan 2017 - 8:55 pm | lakhu risbud
काय म्हणता? पण मग तुमचा वरचा आणि इतर खंडीभर प्रतिसाद म्हणजे "मौनाचे महत्व" या विषयावर १ तासभर भाषण दिल्यासारखा का वाटतोय ?
14 Jan 2017 - 9:18 pm | संदीप डांगे
आपल्या आवडत्या पक्षाविरुद्ध येणाऱ्या खंडीभर प्रतिसादांचा त्रास होतोय हे वदवून घेण्यासाठी... त्यामुळे लोक कसे विखारी व्यक्तिगत होतात हे दाखवण्यासाठी बोलावं लागतं. मौन धरले तर फावते कुजकट लोकांचे असा अनुभव आहे.
पण तुम्हाला का हो इतकी काळजी माझी? कुठे शेपटीवर पाय पडला का कुठं मिरच्या लागल्या? सारखा आपला वैयक्तिक प्रतिसाद देताय ते!
14 Jan 2017 - 11:19 pm | lakhu risbud
तुम्हाला प्रश्न करणाऱ्या आयडीनां डुप्लिकेट आयडी म्हंटले तर चालते, त्यांनी काही म्हंटले तर ..मिरची लागली का ?? वा वा
असो ...
14 Jan 2017 - 11:21 pm | lakhu risbud
मौन धरले तर फावते कुजकट लोकांचे असा अनुभव आहे.
मी काय म्हणतो अनुल्लेखाने मारायचं असतं या अशा लोकांना. आपली प्रखर बुद्धिमत्ता इतर constructive कामात वापरली तर भले होईल समाजाचे.
14 Jan 2017 - 9:45 pm | निष्पक्ष सदस्य
ट्रुमनजी,
नाही हो,मी कामात आहे.
मी हा धागाच उघडला नाही,
बाकि व्हाटसअॅप फाॅरवार्डस वगैरे काही असूदे,फेसबुकवर अमेय तिरोडकरने शेअर केलं होतं ते.
आणि व्हाटसअॅप फाॅरवार्डस कुणाच्या आणि कोणाबद्दल जास्त प्रमाणात फिरत असतात हे वेगळं सांगायची गरज नाही.
बाकि नोटबंदी निर्णय गंडलेला आहे हे मात्र नक्की.
अवांतर: ( टी स्ट्रक्चरमुळे मोबाईलवर प्रतिसादाचे एकाखाली एक असे एक-एक अक्षर दिसत आहे,काही प्रतिसाद तर मोबाईलच्या बाहेरच गेले आहेत,खाली तळापर्यंत यायला बोटाचा चांगलाच व्यायाम होतोय.)
16 Jan 2017 - 12:12 pm | संजय क्षीरसागर
आणि
बाकि नोटबंदी निर्णय गंडलेला आहे हे मात्र नक्की.
हे कुणी म्हटलंय ?
16 Jan 2017 - 12:17 pm | संदीप डांगे
त्यांचं व्यक्तिगत मत आहे जे त्यांनी जाड ठशात मांडलंय...
16 Jan 2017 - 2:07 pm | संजय क्षीरसागर
पण कुठे झालायं हा संवाद ? हे ट्रुमन कोण ? ते निष्पक्ष सदस्याला पक्ष बदलाला का ? असं का विचारतायंत ? अमीत तिरोडकर कोण ? कुणाच्या कुठल्या पोस्टस कुठे फिरतात ? आणि या सगळ्याचा सद्य पोस्टशी संबंध फक्त लास्ट कमेंटपुरताच आहे का ? तसं असेल तर हा सगळा प्रतिसाद कशाला टाकला आहे ?
16 Jan 2017 - 9:05 pm | हतोळकरांचा प्रसाद
नाही हो इथेच या धाग्यावरचा संवाद आहे, खालील कंमेंटपासून सुरु झाला.
http://www.misalpav.com/comment/911665#comment-911665
16 Jan 2017 - 10:47 pm | संजय क्षीरसागर
हे रिपीट कशाला केलं उगीच ?