मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला.
स्लेन्डरमन मर्डरस :
जास्त खोलांत जात नाही. अमेरिकेत विविध ठिकाणी आणि विविध काळांत पौंगडावस्थेतील मुली अचानक आपल्या मैत्रिणींचा खून करू लागतात. तापसांत ह्या मुली सांगतात कि हे खून त्यांनी एका व्यक्तीच्या प्रभावा खाली केले. सदर व्यक्तीच्या प्रेमात पडून त्या व्यक्तीचे प्रेम प्राप्त करण्यासाठी हे खून आवश्यक आहेत असे ह्या १२-१३ वर्षांच्या मुली सांगत असत. घटना वेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी त्या व्यक्तीचे वर्णन मात्र समान असे.
विकिपीडिया आर्टिकल नुसार किमान दोन सीलेंडरमॅन खून संदर्भ म्हणून उपलब्ध आहेत पण ज्या महिलेशी वार्तालाप झाला तिच्या मते ह्या साच्यातील अनेक खून विविध भागांत झाले असून बहुतेक वेळा पोलीस स्लेन्डरमन अँगल जाणून बुजून लपवतात कारण त्यामुळे लोकांत भीती पसरण्याची शक्यता असते.
एका केस मध्ये मुलीने चक्क आपल्या बापावर रेप चा आरोप टाकला होता. काही वर्षांनी चौकशीद्वारे स्पष्ट झाले कि बापाने असे काहीही केले नसून हि मुलगी स्लेन्डरमॅन च्या नादात अडकली होती.
स्लेन्डरमन एक प्रकारचा Schizophrenia असावा अशी मनोचिकित्सकांची धारणा आहे.
तुलपा :
हा एक तिबेटियन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो "घडवणे". संस्कृत शब्द आहे "निर्मिती". [१] जास्त माहिती साठी कृपया विकी आर्टिकल वाचा. हिंदू शास्त्रा नुसार एकूण ८ प्रकारच्या सिद्धी आहेत. पण ह्यांत निर्मिती चा समावेश होत नाही. निर्मिती कदाचित प्राकाम्य ह्या सिद्दीशी निगडित असावी.
तुलपा हा प्रकार अमेरिकेतील तरुण मुलांत प्रचंड लोकप्रिय झाला आणि Reditt ने त्याला विशेष प्रसिद्धी दिली. तुलपा चा आभास करणारे लोक स्वतःला "Tulpamancers" असे म्हणतात.
नक्की प्रकार काय आहे:
तुलपा मध्ये आपण ध्यान करून एक काल्पनिक व्यक्ती तयार करतो. काळाप्रमाणे ह्या काल्पनिक व्यक्तीला आपली एक अशी पर्सनॅलिटी मिळू लागते. काही काळाने ह्या काल्पनिक व्यक्तीला स्वतःची ओळख आणि विचार उपलब्ध होतात. त्यानंतर हि व्यक्ती आपल्याशी इतर माणसा प्रमाणे बोलू लागते. आपण तिच्याशी संवाद करू शकता.
पुढे पुढे ह्या व्यक्तीची एकूण ओळख इतकी वाढते कि आपण आपल्या शरीराचा ताबा ह्या काल्पनिक व्यक्तीला देऊ शकता.
तुलपा हा प्रकार अलेक्सान्द्र नील ह्या महिलेने पाश्चात्य जगा पुढे आणला. ह्या महिलेचा आणि माझा फार जुना संबंध आहे.
माझ्या प्रथम निरीक्षणा प्रमाणे हि सगळी Schizophrenia ची लक्षणे आहेत. A Beautiful Mind हा चित्रपट पहिला असेल तर मी नक्की काय म्हणतेय हे आपण समजू शकता. Schizophrenia एक फार गंभीर मनोविकार असून ध्यान किंवा इतर कुठल्याही मार्गाने हा विकार आपण स्वतःहून ओढवून घेऊ शकत नाही. ड्रग्स इत्यादी वापरून आपण भ्रम निर्माण करू शकता पण हा विकार त्यामुळे होत नाही.
माझे अनुभव :
एका भारतीय योगीने बऱ्याच प्रयत्नान्ती मला ह्या मार्गावर चालायला मदत करण्यास होकार दिला. सदर योगी एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस आपल्या फावल्या वेळांत योगाभ्यास करतो. मागील किमान ५० वर्षां पासून ह्यांचा अनुभव योग क्षेत्रांत असल्याने मी बहुतेक वेळा ह्यांचा सल्ला घेते. सल्ले वगैरे देण्यास त्यांना अत्यंत संकोच वाटतो पण वडिलांची ओळख असल्याने मी विना संकोच चिवटपणा दाखवते.
त्यांच्या मते तुलपा हि अतिशय निकृष्ट दर्जाची सिद्धी आहे. इतकी निकृष्ट कि कुठलाही खरा योगी ह्याच्या कडे सिद्धी ह्या दृष्टिकोनातून पाहणार सुद्धा नाही.
आपली ओळख "मी" म्हणजे आपले "मन" नाही. अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा "मन" म्हणजे मेंदूतील चेमिकल लोचा आहे. मेंदूला इजा झालेल्या लोकांचा स्वभाव आणि मन पूर्णपणे बदलून जाते ह्यातून "मन" हा एक "शारीरिक" भाग आहे असे आपण म्हणून शकतो. [२]
पण मन सोडून "मी" हे अस्तित्व आहे हे विज्ञानाला मान्य नाही. योग अभ्यासांत आपण मन शरीर आणि आत्मा ह्या तिन्ही घटकांचा शोध घेतो. शारीरक अनुभव हे सर्वांत खालच्या पातळीचे अनुभव मानले जातात पण हे अनुभव घेणे सर्वांत सोपे असतात. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीला हे अनुभव एकाच प्रकारे मिळू शकतात. आमचिये सर्वांची शारीरिक ठेवणं जवळ पास एकाच प्रकारची असल्याने आधुनिक साधने वापरून आम्ही योगाभ्यासाचे शारीरिक बदल सहज सिद्ध करू शकतो.
मानसिक अनुभव हे थोड्या वरील पातळीचे असतात. "मन" शरीरा प्रमाणे प्रेडिक्टॅबल नसल्याने ह्याचे अनुभव सुद्धा प्रेडिक्टॅबल नसतात. त्यामुळे एकच प्रकारचा ध्यानाभ्यास करणाऱ्या माणसाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. तुलपा हा मानसिक स्तरावरील अनुभव आहे.
आत्मिक अनुभव ह्या विषयावर माझे ज्ञान शून्य असल्याने आणि माझ्या मनात फार शंका असल्याने मी त्यावर बोलायला जात नाही.
मी एकूण ९ दिवस अभ्यास केला. अनुभवाने मला घाबरवून सोडल्याने त्या दिशेने आणखीन प्रवास करण्याचा प्रयत्न तूर्तास तरी मी करणार नाही.
अभ्यासक्रम :
दिवस १ ते ३:
डोळे बंद करून बसावे. ध्यानमग्न होऊन आपल्या कल्पना शक्तीने एक काल्पनिक जागा निर्माण करावी. एक छोटीशी खोली पासून प्रचंड मोठे पॅरलल युनिव्हर्स पासून आपलय कुवती प्रमाणे आपण काहीही कल्पना करू शकता. पाहिजे असेल तर आपण लेगो प्रमाणे विटा मनात घेऊन त्यापासून एक छोटी खोली बनवू शकता.
इथे सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे डिटेल. प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने बनवली गेली पाहिजे आणि तुम्हाला आपल्या मेमरी मधून त्या जागेचा कुठलाही भाग अगदी स्पष्ट पाने ओळखता आला पाहिजे. माझ्या जागेंत मी एक चाळीतील खोलीची कल्पना केली होती. हि खोली एका वाळवंटातील ४०० माजली इमारतीतील ३०० व्या मजल्यावर होती. वर चढायला एक गंजलेला जिना होता (fire escape) आणि एक जुनाट लिफ्ट. फ्लॅट नंबर होता ३११. फ्लॅटचे दार निळे पत्र्याचे.
भिंतींचे रंग पिवळे होते पण तो रंग उडून सिमेंट दिसायालाल लागले होते.
आंत १००चा एक दिवा एक जुनाट टीव्ही. एक जुनाट सोफा. एक छोटा बाथरूम इत्यादी. एक खिडकी ज्यातून बाहेरील वाळवंट दिसत होते आणि उघडली तर प्रचंड गरम हवा आंत येत असे.
अनेक तास लागून मी अक्षरशः ह्या खोलीत राहिले. सोफ्यावर कपड्यांचा ढीग, टीव्हीच्या रिमोटवर झिजलेली बटणे. शेजारच्या खोलीतून येणाऱ्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज. इत्यादी इत्यादी गोष्टीत अत्यंत बारकाईने मी डिसाईन केल्या होत्या.
दिवस ४ - ६:
ह्या तीन दिवसांत काल्पनिक व्यक्ती निर्माण करण्याचे काम हाती होते. वेगळ्या लिंगाची व्यक्ती निर्माण करणे सोपे होते म्हणून मी एका पुरुषाची निवड केली. पहिल्या दिवस मी प्रयत्न करून सुमारे १५-१६ वर्षांच्या लहान मुलाला डिसाईन केले. चेहरा, कपडे, डोळे, इत्यादी सर्व काही मी कल्पना केली होती. बहुतेक वेळा आपल्या जीवनातील एक कमी महत्वाचा भाग घेऊन त्याला तो दिला तर प्रगती जास्त चांगली होते. तर ह्या मुलाला मी धार्मिक प्रवृत्तीचा बनवले.
ह्या काल्पनिक व्यक्तीला नाव देणे आवश्यक असते. त्याला मी नाव दिले अभय. अभय ला बोलून अनेक गोष्टी सांगाव्या लागली. गुरूच्या मते हे एखाद्या रोबोट ला सुपरवाइस्ज्ड लर्निंग द्वारे ट्रेन करतात त्याच प्रकारचे होते.
अभय ला मी सोफ्यावरील कपड्यांची घडी घालून ठेवण्याची विनंती करून मी ती खोली बंद करून जिना उतरायला सुरवात केली आणि ध्यानातुन बाहेर आले.
सहाव्या दिवशी ध्यान मग्न होताना गुरूंनी सांगितले कि जर प्रयोग सफल झाला असेल तर माझ्या कुठलाही हस्तक्षेपाशिवाय त्या खोलीतील वस्तूंत बदल घडलेला असेल. कदाचित अभय ने कपड्यांची घडी सुद्धा करून ठेवली असेल.
मी ध्यानात गेले तेंव्हा ह्या प्रकारचे काहीही घडले नव्हते. आन खोलीत अभय सोफ्यावर ना बसता खुर्चीवर बसला होता आणि सोफ्यावरील कपडे, टीव्ही रिमोट, खिडकी इत्यादी गोष्टी मी जश्या ठेवून दिल्या होत्या तश्याच होत्या. मी खोलीतून बाहेर जाताना अभय उभा होता आणि आता तो खुर्चीवर बसला होता.
मी अभय शी बोलण्याचा प्रयन्त केला तर त्याचा चेहरा १००% निर्विकार होता. मी काय बोलतेय हे त्याला कदाचित समजत नसावे. पण एका लेव्हल वर अभय हे माझे क्रिएशन नसून वेगळे काही तरी असावे से मला हळू हळू वाटायला लागले होते. मी खूप काही बोलले तरी अभयवर त्याचा परिणाम झाला नव्हता. मी खोलीत पुन्हा फिरून सर्व गोष्टी जाग्यावर आहेत ह्याची खात्री केली. एक ग्लास शेल्फ वरून काढून त्यात पाणी भरून मी तो अभय पुढे ठेवला. त्याला पाणी पिण्याचा आग्रह केला. पण तो काही हलला नाही.
अजून पर्यंत अगम्य असे काही घडले नव्हते तरी निव्वळ दिवा स्वप्नांच्या द्वारे मी एक छोटेसे का असेना पण काल्पनिकजग निर्माण करू शकत होते हीच एक आश्चर्याची गोष्ट होती. ६ दिवसांत माझ्या कल्पनाशक्तीने बरीच मोठी झेप घेतली होती.
दिवस ७-८ :
दोन्ही दिवस ६ व्या दिवसा प्रमाणेच वाटले. ग्लासमधील पाणी कमी झाले नव्हते. काहीही वस्तू हल्ल्या नव्हत्या. अभय सुद्धा हलला नव्हता. टीव्ही बंद होता आणि खिडकीतून बाहेरील गरम हवा येत होती. ७व्या दिवशी मी ६व्य दिवस प्रमाणेच अभयशी बोलले. म्हणजे रम मध्ये काय काय आहे, तो कपड्यांची घडी कशी करू शकतो. आणखीन पाणी पाहिजे तर कसे घेऊ शकतो इत्यादी गोष्टी मी त्याला सांगितल्या. थोडे रिवर्स सायकोलोजि म्हणून खोली बाहेर पडू नको नको इत्यादी बंधने सुद्धा घातली.
८व्या दिवशी मात्र मला संपूर्ण प्रकारचा थोडा कंटाळा आला. अजून पर्यंत सर्व काही एखाद्या मनोचिकित्सास्कच्या खोलीत व्हावे असेच सर्व काही घडले होती. ८व्य दिवशी मी ठरवले कि अभय कडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही. मी जाऊन टीव्ही लावला, स्वतःच कपड्यांची घडी लावली आणि लावता लावता मी माझा दिवस आज कसा गेला, माझी गाडी कशी जुनाट झाली आहे, इत्यादी इत्यादी पूर्णपणे वेगळ्या अश्या पर्सनल गोष्टी केल्या.
दिवस ९:
ध्यानमग्न होताना मी खोलीत आत गेले. अपेक्षे प्रमाणे अभय खुर्ची मध्येच होता. मला थोडी चीड आली. मी सोफ्यावर ठेवलेले कपडे उगाच जमिनीवर फेकून दिले आणि अभय समोरील ग्लास उचलून मी मोरीत नेवून ठेवला स्वतःसाठी दुसरा ग्लास कडून ओट्यावर ठेवला आणि जग शेल्फ वरून काढून मी परत फिरले आणि दचकळेच. अभयने ओट्यावरील ग्लास उचलून तो त्यांत मोरीतील नळाने पाणी भरत होता.
इतके दिवस मी स्वतःला त्याचा जनक समजत होते पण अभय आता स्वतःहून काम करत होता. त्याच्या चेहेऱ्यावर भाव विशेष दिसत नसले तरी तो थोडक्यांत पुटपुटत होता असे त्याच्या ओठावरून वाटत होते.
मी त्याला ओब्सर्व करत असताना अचानक तो माझ्या बाजून वळला. त्येच ओठ हलत नसले तरी त्याचा आवाज माझ्या डोक्यांत मला ऐकू आला. मी कपडे खाली फेकून दिले म्हणून तो चिडला होता. तो चालत गेला आणि त्याने कपडे उचलून सोफ्यावर ठेवले. काहींची घडी विस्कटली होती ती त्याने पुन्हा घातली.
मी अवाक होऊन पाहत होते. त्याने पुढे बरेच काही संभाषण केले पण ते एका आपातळीवर असंबंध वाटत होते त्याच वेळी तो मला "मॉक" करतोय असाही भास होता.
मी फोन वाजल्याचे निमित्त करून खोलीतून बाहेर गेले दरवाजा बंद केला आणि ध्यानातून बाहेर आले.
एकूणच अनुभव फार भीतीदायक होता. गुरुदेवांच्या मते माझ्या मनाच्या खोलीत अभय आणि त्याचे जग मी मरे पर्यंत राहील. कदाचित मी झोपेत वगैरे असताना माझ्या सुप्त मनाचा वापर करून अभय त्या खोलीतून हालचाल सुद्धा करेल. पण अभयच्या वाढीसाठी माझे अटेन्शन महत्वाचे असून जो पर्यंत मी त्याला ते देत नाही तो पर्यंत त्याच्यापासून मला कसलाही धोका किंवा फायदा नाही.
गुरुदेवांनी आधीच सिद्धी म्हणजे एक side-इफेक्ट असून अभुतेक योगी त्यांच्या कडे थोड्या "विकृती" ह्याच दृष्टीने पाहतात असे सांगितले होते. आता मला ते पटले सुद्धा.
[१] https://en.wikipedia.org/wiki/Tulpa
[२] https://en.wikipedia.org/wiki/Phineas_Gage
[3] https://www.reddit.com/r/Tulpas/
[4] http://philosophycourse.info/lecsite/lec-tulpas.html
[5] https://www.youtube.com/watch?v=z3j5gtUCkJg [तुलपाशी संवांद]
प्रतिक्रिया
31 Dec 2016 - 5:50 am | शिवोऽहम्
'फाईट क्लब' आठवला.
31 Dec 2016 - 5:57 am | अनन्त अवधुत
एक्स फाइल्स मध्ये तुलपाशी संबंधित एपिसोड पहिला होता. काहीतरी बेक्कार प्रकार आहे तेव्हा पण असेच वाटले होते.
तुमचा अनुभव वाचून खात्री झाली. जपून प्रयोग करत जा इतकेच म्हणेन.
31 Dec 2016 - 8:26 am | अनिरुद्ध.वैद्य
ही माणसे प्रत्यक्षात येऊ शकतात काय?
31 Dec 2016 - 8:47 am | प्रकाश घाटपांडे
पुर्वी श्री नावाचे एक साप्ताहिक येत असे. त्यात अशा अदभूत स्टोर्या येत असत. सुरवातीला लेखक आपला स्वतःचा अनुभव सांगतो आहे असे वाचकाला वाटे. त्यानंतर शेवटी ती एका पिक्चरची स्टोरी आहे असे ओझरते लिहिलेले असे. त्याची आठवण आली. बाय द वे यातला मी म्हणजे साहना आहे का?
13 Jan 2017 - 8:26 pm | Nitin Palkar
श्री साप्ताहिकात अरुण ताम्हनकर 'स्पेशल रिपोर्ट' नावाचे सदर लिहीत असत. त्यात इंग्लिश फिक्शन/फिल्म्स मधून उचललेले असे उतारे नकलून छापलेले असत.
31 Dec 2016 - 8:48 am | संदीप डांगे
Interesting!!
31 Dec 2016 - 8:52 am | टवाळ कार्टा
योग सामर्थ्य वापरायला चांगल्या गोष्टी मिळाल्या नाहीत? चायला मी प्लेबॉय मॅनशन मध्ये राहायला गेलो असतो =))
31 Dec 2016 - 10:51 am | साधा मुलगा
+11111111 =)=)
31 Dec 2016 - 9:01 am | सिरुसेरि
हा तो कमल हसनचा अभय तर नव्हे ना ?
31 Dec 2016 - 10:14 am | पिलीयन रायडर
हा "तुमचा" अनुभव आहे का? मागे एकदा तुम्हीच असं लिहीलं होतं ना की तुमची एक वेबसाईट आहे जिथे जे लिहीलं जाते ते तुम्ही कॉपी पेस्ट करु शकता? मला नक्की आठवत नाही पण तुमच्या "भारतीय संस्कृती, गांजा, ब्रिटीश आणि ख्रिस्ती संस्कृती" ह्या लेखात तुम्हीच म्हणलंय की तो लेख कॉपी पेस्टेड आहे. म्हणुन ते वेबसाईट वरुन दुसर्याचे लिखाण आणणार्या तुम्हीच असा माझा बर्याच दिवसांपासुन समज आहे. चुकीचाही असु शकतो.
तेव्हा प्लिझ आधी हा लेख नक्की तुमचाच आहे ना हे स्पष्ट कराल का? (फॉर दॅट मॅटर, तुमचे सर्वच लेख..)
31 Dec 2016 - 10:31 am | पैसा
हा तुमचा अनुभव आहे का उगाच लोकांना मोठमोठ्या कथा सांगताय? स्वतः नास्तिक असताना हे सगळे करायचे कारण काय? सिगरेट कशी वाईट आहे हे अनुभव घेऊन बघू म्हणून सिगारेटची सवय लावून घेतल्यासारखा प्रकार वाटला. मनाशी खेळ करू नका. हा काल्पनिक किंवा आभासी अनुभव आहे त्याला मी ध्यानसुद्धा म्हणू शकणार नाही. कारण तेव्हा काय झाले ते तुम्ही तपशीलवार सांगता आहात. मन शांत करणे हाच कोणत्याही ध्यानाचा एकमेव उद्देश असू शकतो. उलट हा स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजाराचा प्रकार वाटतो आहे. तुम्ही त्या अभयचे काय झाले एकदाच बघून येतो/येते म्हणून परत हे प्रकार करायला जाणार नाही याची काय गॅरेंटी आहे?
असल्या नसत्या प्रयोगाच्या मागे लागून खर्या जगाशी नाळ तुटून दुर्दैवी शेवट झालेले काही अभागी लोक माहीत आहेत. कृपया हे वेळीच थांबवा. खरे तर मनोरोग तज्ञाची मदत घ्या असे सुचवले असते. पण तुमची इतर काही माहिती नसल्याने त्याच्या अलिकडे थांबत आहे.
31 Dec 2016 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा काल्पनिक किंवा आभासी अनुभव आहे
विचाराने आपल्या मनात आधी नसलेल्या कल्पना तयार करणे जगावेगळे नाही... यातूनच कल्पनारम्य लिखाण (Fiction) तयार होते. स्वपनातही आपल्याला अनपेक्षित वागणार्या व्यक्ती दिसतात.
फरक इतकाच की फिक्शन लिहिणारा लेखक किंवा स्वप्न पाहणारा या गोष्टी कल्पनाशक्तीची देणगी समजतो... त्या खर्या आहेत अशी समजून मनात ठाम बसली की इल्युजन (मनोव्यापाराने मनात तयार झालेली पण प्रत्यक्षात आस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट किंवा गोष्टीसंबंधीची समजूत) या मानसिक विकृतीकडे वाटचाल सुरू होण्याची शक्यता वाढते... विशेषतः कमकुवत मन असलेल्या लोकांची. स्वतःच्या मनावर असे प्रयोग करण्याबद्दल, सावधान !
31 Dec 2016 - 10:40 am | कंजूस
उत्सुकता म्हणून त्रयस्थपणे जाणून घेत असाल तर ते खरे अनुभव हवेत. सांगोवांगी नको. उडत्या तबकड्या दिसण्याच्या खरडा अजूनही फेबुवर येतात.
31 Dec 2016 - 10:40 am | एस
मानसोपचारतज्ज्ञाची हा प्रयोग ज्या कोणी व्यक्तीने केला असेल त्याला नितांत गरज आहे असेच सुचवेन. अशा चुकीच्या मार्गावर जाऊन स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायच्या भानगडीत पडू नये.
31 Dec 2016 - 2:09 pm | रातराणी
अर्र्रर्र मला वाचूनच भीती वाटली, असलं काही करत जाऊ नका.
31 Dec 2016 - 2:20 pm | Ram ram
मी तुम्हाला काय समजत होतो आणि तुम्ही तर? साहना ही आयडी एक हुशार, तल्लख व्यक्ति ची आहे असे मला वाटत होतं.
31 Dec 2016 - 2:35 pm | सतिश गावडे
याला योग म्हणतात? अवघड आहे.
1 Jan 2017 - 12:13 pm | सविता००१
अहो, हे काय? विकृतीच आहे ही. थाम्बवा हे सगळं.
1 Jan 2017 - 6:57 pm | संजय क्षीरसागर
अभयच्या वाढीसाठी माझे अटेन्शन महत्वाचे असून जो पर्यंत मी त्याला ते देत नाही तो पर्यंत त्याच्यापासून मला कसलाही धोका किंवा फायदा नाही.
पण अवधान ताब्यात आलं तर मन ताब्यात आल्यासारखं आहे आणि मन ताब्यात येणं ही सर्वोच्च सिद्धी आहे.
1 Jan 2017 - 9:16 pm | फेदरवेट साहेब
हाईट हाय हे तर! जस्ट लाइक द शिद्धारुड स्वामी ऑफ पेस्टनजी हुबलीवाला साला १००% डिव्हाईन , १००% गॉड पांढुरंग ध्यानी!
ज्यो , ए वन परकाया प्रवेश करे छे.
2 Jan 2017 - 10:51 am | अर्जुन
आपण एका मंदीराचा देव्हारा कल्पून आणि अभयच्या जागी एखादा महात्मा व्यक्ती तयार करु शकतो. मोहिनी विद्येच्या उपचाराप्रमाणे[हिप्नोटीझम ट्रीटमेट ] प्रमाणे फायदा होऊ शकतो. अर्थात योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने....................
2 Jan 2017 - 11:34 am | संजय क्षीरसागर
तुलपा मध्ये आपण ध्यान करून एक काल्पनिक व्यक्ती तयार करतो. काळाप्रमाणे ह्या काल्पनिक व्यक्तीला आपली एक अशी पर्सनॅलिटी मिळू लागते. काही काळाने ह्या काल्पनिक व्यक्तीला स्वतःची ओळख आणि विचार उपलब्ध होतात. त्यानंतर हि व्यक्ती आपल्याशी इतर माणसा प्रमाणे बोलू लागते. आपण तिच्याशी संवाद करू शकता.
पुढे पुढे ह्या व्यक्तीची एकूण ओळख इतकी वाढते कि आपण आपल्या शरीराचा ताबा ह्या काल्पनिक व्यक्तीला देऊ शकता.
तुलापामधे आपण `दुसरी' काल्पनिक व्यक्ती निर्माण करतो. पण मुळात आपण प्रत्येकानं, स्वतःच एक काल्पनिक व्यक्ती निर्माण केली आहे. ती मानसिक निर्मीती असल्यानं सर्वस्वी मनाच्या ताब्यात आहे. आणि आपण तीला सतत अवधान देत राहातो त्यामुळे मनाच्या मर्जीनं जगत राहातो ! आणि हेच तुमच्या गुरुजींनी तुलापा निर्मीत व्यक्तीबद्दल म्हटलंय :
एकूणच अनुभव फार भीतीदायक होता. गुरुदेवांच्या मते माझ्या मनाच्या खोलीत अभय आणि त्याचे जग मी मरे पर्यंत राहील. कदाचित मी झोपेत वगैरे असताना माझ्या सुप्त मनाचा वापर करून अभय त्या खोलीतून हालचाल सुद्धा करेल. पण अभयच्या वाढीसाठी माझे अटेन्शन महत्वाचे असून जो पर्यंत मी त्याला ते देत नाही तो पर्यंत त्याच्यापासून मला कसलाही धोका किंवा फायदा नाही.
गुरुदेवांनी आधीच सिद्धी म्हणजे एक side-इफेक्ट असून अभुतेक योगी त्यांच्या कडे थोड्या "विकृती" ह्याच दृष्टीने पाहतात असे सांगितले होते. आता मला ते पटले सुद्धा.
वास्तविकात एका शरीराचा जन्म होतो. मग त्या शरीराला काही तरी वेगळी ओळख हवी म्हणून देहानुरुप एक नांव ठेवलं जातं. उदा. साहना ! खरं तर `साहना' असं कुणीच नसतं किंवा कधीही असण्याची शक्यताही नाही. पण देहातली जाणीव `साहना' अशी हाक मारली की तिकडे अवधान देऊ लागते. `साहना इकडे ये' असं म्हटल्यावर देह इकडून तिकडे जातो, पण अचल जाणीवेला आपणच इकडून तिकडे गेल्यासारखं वाटायला लागतं !
पुढे पुढे इतरांची ओळखही `आई', `बाबा', `दादा' , `मामा' , `काका' `काकू' अशी करुन दिली जाते त्यामुळे मुळातच अस्तित्वात नसलेल्या साहनाला; आपण अमक्याची मुलगी, तमक्याची बहिण, फलाण्याची भाची किंवा पुतणी आहोत, असं वाटायला लागतं.
यथावकाश साहना जेंव्हा शाळेत जायला लागते, तेंव्हा अॅकॅडेमीक बुद्धीमापनापरत्वे नवा काँप्लेक्स तयार होतो. म्हणजे आपण हुशार, `ढ', किंवा सामान्य बुद्धीचे !
ही व्यक्ती निर्मितीची तिसरी पायरी असते. म्हणजे प्रथम सत्रात, आपण मुलगी, द्वितीय सत्रात, आपल्या रुपाविषयी दृढ धारणा, जसे की आपण रुपवान किंवा यथातथा आणि तृतीय सत्रात, आपण हुशार किंवा सुमार !
पुढे लग्न वगैरे झाल्यास हा गुंता कमालीचा वाढतो! म्हणजे आपणच निर्माण केलेल्या काल्पनिक साहनाला; आपण अमक्याची पत्नी, तमक्याची आई, फलाण्याची सून...... अँड सो ऑन असं वाटायला लागतं !
आता तर हे लफडं, तुमचे गुरुजी म्हणतात त्याही पुढे जाऊन, मृत्योत्तरही चालू राहाण्याची शक्यता निर्माण होते कारण ब्रेन पुरता धारणायुक्त झालेला असतो. मृत्यूनंतर जर डिस्क प्रॉपर फॉरमॅट झाली नाही तर याच धारणा पुढे कॅरी फॉरवर्ड होतात, त्याला आपण पुनर्जन्म म्हणतो !
आता मुळात सहाना ही मनोनिर्मीत व्यक्ती असल्यानं तिला मनाच्या आदेशानुसारच वागावं लागतं. हे लेखातल्या `अभय'ला शरीराचा ताबा देण्यासारखंच असतं. पण आपण सगळ्यांनीच आपापल्या परीनं एक काल्पनिक व्यक्ती निर्माण केल्यानं तो युनिवर्सल फिनॉमिना असतो, नव्हे आहेच . पण त्यामुळे कुणालाच त्यात काहीही वावगं किंवा थरारक वाटत नाही.
अर्थात, साहना असं कुणीच नाही हा अनुभव मात्र हादरवून टाकणारा असू शकतो. पण तो कुणालाच नको असतो. म्हणून प्रत्येक जण आपल्या मनोनिर्मित व्यक्तीमत्त्वात सुखेनैव जगत असतो ! आणि जगरहाटी चालू राहाते.
13 Jan 2017 - 8:35 pm | Nitin Palkar
"तुमचे गुरुजी म्हणतात त्याही पुढे जाऊन, मृत्योत्तरही चालू राहाण्याची शक्यता निर्माण होते कारण ब्रेन पुरता धारणायुक्त झालेला असतो. मृत्यूनंतर जर डिस्क प्रॉपर फॉरमॅट झाली नाही तर याच धारणा पुढे कॅरी फॉरवर्ड होतात, त्याला आपण पुनर्जन्म म्हणतो "!
संक्षी तुम्हीपण जपून राहा! योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं केव्हाही योग्य. Better late than never.
2 Jan 2017 - 11:47 am | प्रान्जल केलकर
ए साईडने वाघ ने बीजा साईडने सिंव्ह बसते तुलपा करते वक्ताले. चोक्कस प्रयोग छे.
अनिस चे हमीद भाईले बोलवनी. ए साईड तू बस नि बीजा साईड तेला बसवून तुलपा कर.
2 Jan 2017 - 2:55 pm | चिनार
तुम्ही लिहिलंत ते सगळं खरं असेलही साहनाताई. आमचं एकंदरीतच ज्ञान कमी असल्यामुळे खरं-खोटं या भानगडीत पडत नाही...
पण मी काय म्हणतो, ते अभयराव आधी तुमचं ऐकत नव्हते म्हणून तुम्ही चिडलात. मग ते स्वतःच्या मनाने वागायला लागले तर तुम्हाला भीती वाटली. एवढा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळ स्वतः: च्या नवऱ्याची प्रतिमा तयार करायची ना..तुम्ही म्हणेल तसं वागला असता पहिल्या दिवसापासून !!
कृ.ह.घ्या.
2 Jan 2017 - 3:39 pm | अप्पा जोगळेकर
अभयला संपादक का नाही करत
2 Jan 2017 - 6:06 pm | ज्योत्स्ना
या आधी मिपावर असच लेखन वाचलय ज्याच स्मरण नको वाटत. असल्या प्रयोगाचा बळी भयाण होऊ शकतो. ह्या असल्या प्रयोगाबद्दल अजिबात सहानुभुती नाही. एखादा फाजिल उत्सुकता असलेला व्यक्ती नाही ते प्रयोग करुन नुकसान न करुन घ्यावा.
2 Jan 2017 - 7:17 pm | Ram ram
संजयजी क्षीरसागर +१११
3 Jan 2017 - 7:15 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला प्रतिसाद कळला हेच खूप झालं ! कारण व्यक्तिमत्व म्हणजेच अहंकार हे जन्म संपला तरी लोकांना कळत नाही .
3 Jan 2017 - 4:50 pm | वेल्लाभट
तुलपा ठेवा कुलपामध्ये
भूलथापांना भुलू नका
उलथापालथ उलटीसुलटी
मनात तुमच्या करू नका
कल्पना नको वल्गना नको
अर्चना नको विषाचिया
अंतरातल्या मंथनातले
तुम्ही हलाहल पिऊ नका
बाकी वरच्या प्रत्येक सूचक प्रतिसादाशी सहमत. आवरा.
4 Jan 2017 - 3:42 am | प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यात काही विशेष वाटले नाही , योग बिग तर करायची मुळीच गरज नाही हे तुलपा करायसाठी ! तेही ९ दिवस म्हणजे काहीच्या काही कहर झाला!
हॉस्टेलवर रहात असताना चलचित्रांवर त्राटक करुन ,ध्यान लाऊन १५-२० मिनिटे बसलो की लगेच अखंड चि.सौ.का सन्नीताई लिऑन ह्यांची काल्पनिक प्रतिकृती निर्माण करायचो . त्यांना स्वतःची ओळख आणि विचार आधी पासुन आहेतच , मग पुढे १५-२० मिनिट त्या दर्शन द्यायच्या , संवाद साधायच्या आणि शरीराचा ताबाही घ्यायच्या .
पुढील योगिक अनुभव हदरवुन टाकणारे आहेत म्हणुन येथे शेयर करीत नाहीये =))))
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
असो .
4 Jan 2017 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ!! अच्चा सगला प्लकाल जाला तलं!!! =))!!!
बाकी इच्छाचिकन खायला जायचं का रे रानमळा ला पुढचा विकांत? इथे असलास तर.
13 Jan 2017 - 8:37 pm | Nitin Palkar
मार्कस ऑरेलियस,
सर्वोत्तम प्रतिसाद.
4 Jan 2017 - 5:57 pm | मराठी कथालेखक
रंजक आहे हे...
रोज किती तास ध्यान केलात ?
आणि ध्यानातली ती दूसरी व्यक्ती काल्पनिकच असायला हवी का ? भूतकाळात भेटलेली व्यक्ती चालू शकेल काय ?
9 Jan 2017 - 2:11 pm | संदीप डांगे
ती सध्या काय करते?
9 Jan 2017 - 5:37 pm | मराठी कथालेखक
ही ही ...ती सध्या काहीही करु देत (नवर्याबरोबर)...पण माझ्या तुलपात ती माझ्यासोबत असेल ना :)
9 Jan 2017 - 1:36 pm | गामा पैलवान
साहना,
उलट तुळपासुद्धा असू शकेल नाही? म्हणजे मला म्हणायचंय की स्वर्गातले देव ध्यान लावून बसंत असतील आणि त्यातून इथे पृथ्वीवर माणसांची उत्पत्ती होत असेल.
नवनाथ भक्तिसारात एक प्रकरण आहे. त्यात मच्छिंद्रनाथ एका पशुपतिराव नामे एका सूर्यवंशी राजाकडे आलेले असतात. त्याच्या विनंतीवरून त्याची आणि सूर्याची भेट करवून देतात. भेटीसाठी सूर्य खाली जमिनीवर येतो. त्यावेळी नाथ सूर्याकडे तक्रार करतात की राजा तुझ्या वंशातला असूनही तू त्याला दर्शन देत नाहीस. यावर सूर्यदेव अधून मधून दर्शन द्यायचं मान्य करतो. हा काहीतरी उलट तुळपाचा प्रकार असावसं वाटतं.
आ.न.,
-गा.पै.
9 Jan 2017 - 4:14 pm | कवितानागेश
नसते धंदे!
10 Jan 2017 - 9:47 am | nanaba
Tasach vatal!
9 Jan 2017 - 5:15 pm | अजया
+१०००००
13 Jan 2017 - 2:23 pm | विजुभाऊ
यक्कु चीआठवण झाली
13 Jan 2017 - 5:58 pm | गवि
चरचरली होती आठवण हे वाचताच. तुम्ही कशाला त्रास देताय आता? :-(
13 Jan 2017 - 8:22 pm | Nitin Palkar
अगदी सरळ सरळ स्कीझोफ्रेनियाची पाहिली अवस्था वाटते.... शांतपणे विचार करून, न लाजता मानसोपचार तज्ज्ञाची (योगी साधू वगैरेंच्या नादी न लागता) मदत घ्यावी...
13 Jan 2017 - 8:23 pm | Nitin Palkar
चांगली सूचना!
13 Jan 2017 - 8:26 pm | निष्पक्ष सदस्य
मायला!!! उगाचच वाचलो धागा..
तो अभय आता स्वप्नात येणार..
13 Jan 2017 - 8:40 pm | Nitin Palkar
निष्पक्ष सदस्य,
तुमच्या तुलपा मध्ये तुम्ही अभया (किंवा सनी लिओन) कल्पू शकता
23 Aug 2017 - 12:37 pm | मी निलेश
वेगळ्या विषयाला हात घातल्या बद्दल अभिनंदन !!!!!!
अनेक तास लागून मी अक्षरशः ह्या खोलीत राहिले. सोफ्यावर कपड्यांचा ढीग, टीव्हीच्या रिमोटवर झिजलेली बटणे. शेजारच्या खोलीतून येणाऱ्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज. इत्यादी इत्यादी गोष्टीत अत्यंत बारकाईने मी डिसाईन केल्या होत्या.>>>>>>>> ग्रेट ,ग्रेट,ग्रेट !!!!! हे स्किल तुम्ही अनेक ठिकाणी वापरू शकता उदा :सद्गुरू मानसपूजा यात असा सांगितलं जातं की सद्गुरुंना जे अत्तर लावला जात त्याचा सुगन्ध सुद्धा तुम्हाला फील झाला पाहिजे इतक बारीक आणि सखोल इमॅजिनेशन जमायला पाहिजे
law of attraction ,the secret याविषयी तुम्ही वाचलंय का ???वाचल असेल तर तुम्हाला कळेल या स्किल चा उपयोग किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो
पण अभयच्या वाढीसाठी माझे अटेन्शन महत्वाचे असून जो पर्यंत मी त्याला ते देत नाही तो पर्यंत त्याच्यापासून मला कसलाही धोका किंवा फायदा नाही.>>>>>>१००% बरोबर