अविनाश ओगल्यांनी केलेले अप्रतिम विडंबन 'चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी ' वाचून आम्हाला ही स्पुरण चढले आणि मग तात्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ही चार ओळी खरडल्या..
आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता भातुकलीच्या खेळामधली
तीन पत्तीच्या खेळाची ही माझी कर्म कहाणी
होते नव्हते सगळे गेले , वरती झाली देणी
'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी
खूप दिसांनी जमले सगळे, भरला कोरम सारा
कुणी म्हणाले वाटा पत्ते , वाजून गेले बारा
वाहत होती दारू आणिक जसे वाहावे पाणी
कुणी विचारी तेव्हा, "सांगा आज कसे खेळावे ?"
पत्ते पिसण्या आधी थोडे, नियम जरा बोलावे
बीना लिमिट ने खेळू ठरले, शुद्धीत नव्हते कोणी
हा दैवाने बघा आज मज डाव असा वाटावा
ज्या खेळीवर मी ही माझा प्राण पणा लावावा
हाती माझ्या आले होते, एक्का राजा राणी
का माझा हा श्वास कोंडला घोट एक घेताना?
का माझे हे फिरले डोळे ते पत्ते पाहताना ?
तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी !!
प्रतिक्रिया
31 Jan 2008 - 1:40 am | चतुरंग
जोरदार टाळ्या!!
अरे गुलामा! तीन एक्क्यांनी तुझा जोकर केला काय?:}}
चतुरंग
31 Jan 2008 - 2:03 am | ऋषिकेश
टाळ्या टाळ्या टाळ्या!!!!! (एकदम कडकडाट!!!! ;) )
अतिशय सकस विडंबन जाम मजा आली... (म्हणजे तुम्हाला आलेली देणी वाचून नाहि विडंबन वाचून जाम मजा आली :) )
31 Jan 2008 - 11:10 am | सहज
वा भाई वा!!
कडकडाट!!!!
रेशमाच्या बाबांनी नंतर आवडलेले नंबर २ सकस विडंबन!!
मजा आ गया!!!
31 Jan 2008 - 5:21 am | पिवळा डांबिस
वाहवा, वाहवा केशवसुमारजी,
क्या गजब की शायरी लिखी है|
तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी !!
हाये! दिल फटा तो क्या फटा....
कसं काय सुचतं बुवा तुम्हाला, कमाल आहे. ती प्राजु ही तशीच!
नाहीतर आमचं बघा, देवानं कविता करण्याची कला वाटली तेंव्हा बहुतेक आम्ही तांब्या घेउन माडाच्या मुळाशी बसलो असणार! असतं एकेकाचं नशीब!! :((
आपला ढ रांडेचा (यालाच पुस्तकी भाषेत "रसिक वाचक" म्हणतात)
पिवळा डांबिस
31 Jan 2008 - 2:25 pm | केशवसुमार
नाहीतर आमचं बघा, देवानं कविता करण्याची कला वाटली तेंव्हा बहुतेक आम्ही तांब्या घेउन माडाच्या मुळाशी बसलो असणार! असतं एकेकाचं नशीब!! :((
आपला ढ रांडेचा (यालाच पुस्तकी भाषेत "रसिक वाचक" म्हणतात)
डांबिसशेठ,
ह. ह. पु. वा
विडंबना पेक्षा आपला प्रतिसाद जास्त भारी आहे..जबरा..
केशवसुमार
31 Jan 2008 - 6:02 am | बेसनलाडू
बरेच दिवसांनी वाचनात आलेले आणखी एक मस्त विडंबन. आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
31 Jan 2008 - 5:43 pm | स्वाती दिनेश
बरेच दिवसांनी वाचनात आलेले आणखी एक मस्त विडंबन. आवडले.
असेच म्हणते,
स्वाती
31 Jan 2008 - 6:30 am | प्राजु
केशवा,
कशाला रे स्वतःला सुमार म्हणवून घेतो? काय झक्क्क्क्क्क्क्क्क्क्कास विडंबन आहे हे.
एकदम आवडलं.
अहो डांबिसकाका,
माझ्याकडे नाही हो केशवासारखी प्रतिभा. बाकी तुमच्या या..
आपला ढ रांडेचा (यालाच पुस्तकी भाषेत "रसिक वाचक" म्हणतात)
पिवळा डांबिस
..
या स्वस्तुतीने खूपच हसले मी.
- प्राजु
4 Feb 2008 - 4:32 pm | आनंदयात्री
कशाला रे स्वतःला सुमार म्हणवून घेतो? काय झक्क्क्क्क्क्क्क्क्क्कास विडंबन आहे हे.
म्हणुनच आम्ही एकदा यांना आगंतुक सल्ला दिला होता की आपले नाव केशवसुमार एवजी केशवटुकार असे करुन घ्या म्हणुन !!
आपलाच नाम्-विडंबक,
आनंदयात्री.
31 Jan 2008 - 8:48 am | प्रमोद देव
केशवसुमारशेठ विडंबन बाकी झकास जमलंय!
31 Jan 2008 - 9:01 am | विसोबा खेचर
केशवा,
बाबारे तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा फोटो काढून, स्कॅन करून प्लीज मला विरोपातून पाठव. त्याचा प्रिन्ट आऊट (म्हर्हाटी सबुद?) काढून घरात लावीन म्हणतो! :)
फारच सुंदर विडंबन, क्या बात है! तुझ्या प्रतिभेला आपला सलाम!
का माझा हा श्वास कोंडला घोट एक घेताना?
का माझे हे फिरले डोळे ते पत्ते पाहताना ?
तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी !!
वा वा वा! तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी!! काय साली ओळ आहे! खल्लास..
या एका ओळीत तीनपत्तीचं सारं मर्म तू सांगितलं आहेस! व्वा!......
'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी
क्या केहेने! तरी केशवा तुला दहा दहा वेळा बजावून सांगत होतो की त्या धोंड्याचं ऐकत जा म्हणून! :)
'गूढ अटळ ती वाणी!' वा! हे शब्द फार आवडले...!
अवांतर - धोंड्या माझीही पत्रिका जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा "तात्या, बायकांपासून जरा सावध रहा आणि तुझे षौक जरा आवरते घे!" असं नेहमी बजावून सांगत असतो! केशवा, आता वरील विडंबनातून तुझी कर्मकहाणी वाचल्यावर मीही जरा धोंड्याचं म्हणणं सिरियसली मनावर घेणार आहे! :))
खरंच सांगतो केशवा, असं काही छान वाचलं की खूप बरं वाटतं रे बाबा! अगदी निखळ करमणूक होते..! तुझी अजूनही अशीच उत्तमोत्तम विडंबने मिपावर येऊ देत...!
नाहीतर आमचं बघा, देवानं कविता करण्याची कला वाटली तेंव्हा बहुतेक आम्ही तांब्या घेउन माडाच्या मुळाशी बसलो असणार! असतं एकेकाचं नशीब!! :((
पिवळ्या डांबिसा, मीही हेच म्हणतो रे बाबा! :)
आपला,
(घाईत असलेला!) तात्या.
31 Jan 2008 - 9:33 am | विद्याधर३१
वा:
सुरेख विडम्बन..
नाहीतर आमचं बघा, देवानं कविता करण्याची कला वाटली तेंव्हा बहुतेक आम्ही तांब्या घेउन माडाच्या मुळाशी बसलो असणार! असतं एकेकाचं नशीब!! :((
....ह. ह. पु. वा.
विद्याधर
31 Jan 2008 - 10:10 am | धोंडोपंत
केशवा,
ह्या विडंबनाचे कौतुक करायला आमच्याकडे शब्द नाहीत ही वस्तुस्थिती आहे. इतके ते अप्रतिम आहे की काही बोलण्यासारखेच नाही.
तुझ्या प्रतिभेला आम्ही नेहमीच दंडवत घालतो. आज तिला दंडवतासोबत प्रदक्षिणाही.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
हे विडंबन तात्याचा फोन आल्यावर आम्ही संगणक उघडून वाचले. ते पंतीणबाईंना दाखवले त्यांना ते फारच आवडलेले आहे. तुझी सर्व विडंबने त्यांना आवडतात. त्यांनी त्यांचा अभिप्राय तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सांगितले आहे.
नंतर त्यांनी ताबडतोब त्याचा प्रिंट आउट काढून देण्याचा हुकूम सोडला. आज त्यांच्या कार्यालयात तुझे विडंबन गाजणार आहे.
आपला,
(मध्यस्थ) धोंडोपंत
तात्या,
'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी
क्या केहेने! तरी केशवा तुला दहा दहा वेळा बजावून सांगत होतो की त्या धोंड्याचं ऐकत जा म्हणून! :)
'गूढ अटळ ती वाणी!' वा! हे शब्द फार आवडले...!
अवांतर - धोंड्या माझीही पत्रिका जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा "तात्या, बायकांपासून जरा सावध रहा आणि तुझे षौक जरा आवरते घे!" असं नेहमी बजावून सांगत असतो! केशवा, आता वरील विडंबनातून तुझी कर्मकहाणी वाचल्यावर मीही जरा धोंड्याचं म्हणणं सिरियसली मनावर घेणार आहे! :))
तात्या,
त्या अनुष्काच्या नशेतून तू बाहेर येशील असे वाटत नाही. आणि खरं तर येऊच नये अशी ती आहे. आणि आजपासून तुझ्या राशीतला (मिथुनेतला) वक्री मंगळही मार्गी होतो आहे. त्यामुळे आता
लढं .....बाप्या लढ....!!!
हाच तुला संदेश.
आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
31 Jan 2008 - 11:40 am | प्रशांतकवळे
केशवा, तुझ्या काव्यात रे गोडवा! धन्य ते केशवसुमार आणी धन्य ती मिसळ्पाव
प्रशांत
31 Jan 2008 - 1:26 pm | सर्वसाक्षी
अफलातुन आणि अत्यंत चपखल विडंबन. मानले बुवा.
अवांतरः आपले धोंडोपंत ज्ञानी दिसतात, एकदा भेटले पाहिजे.
मागे एकदा एका ज्योतिषाने हात पाहिला आणि म्हणाला 'हात बुद्धिमान माणसाचा आहे, उच्चपदाचे योग दिसतात' - झाले! सगळे (माझ्यासकट) फिदीफिदी हसले आणि तेव्हापासुन माझा ज्योतिषावरचा विश्वास उडाला तो कायमचाचः))
31 Jan 2008 - 3:13 pm | विसोबा खेचर
मिसळपावच्या ग्रामस्थांनो,
हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळांवर इतक्या सुंदर विडंबनाला एकही प्रतिसाद मिळू नये हे पाहून खरेच वाईट वाटले. माझ्या मते एखादे संस्थळ जिवंत असल्यचे हे लक्षण नव्हे!
त्या पार्श्वभूमीवर, इतर संस्थळांसारख्या काही सो कॉल्ड तांत्रिक सुविधा नसूनदेखील, अवघ्या साडेचारशेच्या आसपास सभासद संख्या असलेल्या आपल्या मिसळपावच्या टपरीवर या विडंबनाला चांगले दहा बारा मनमोकळी दाद देणारे प्रतिसाद मिळावेत याचे खरेच खूप कौतुक वाटते.
लोकहो, ही दाद आपल्या रसिकतेची आहे आणि आपल्या रसिकतेमुळेच मिसळपावची जिन्दादिली कायम राहील असा विश्वास वाटतो!
असो, सुंदर विडंबनाकरता केशवाचे पुन्हा एकदा आभार.. मिपा केशवाचे ऋणी आहे!
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
1 Feb 2008 - 7:43 am | धोंडोपंत
तात्याशी आम्ही सहमत आहोत.
याचे कारण मिसळपाव हे खर्या अर्थाने खुले व्यासपीठ आहे. इथे मुक्तपणे वावरायला मिळते.
"प्रशासक" नावाचा भिकार** प्राणी येथे नाही. ही गावाची चावडी आहे. इथे सरपंच आहे. आणि इथे येणारे गावकरी आहेत.
दादा म्हणतात,
सोबतीला बरे लोक साधेसुधे
तारकांनी मला हाक मारू नये....
हा इतर संस्थळातला आणि मिसळपावमधला मुख्य फरक.
हे असेच चालू राहिले पाहिजे. यात बदल होता कामा नये.
आपला,
(ग्रामस्थ) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
1 Feb 2008 - 2:04 pm | केशवसुमार
तात्याशेठ..
माझे कसले आभार मानताय..
ऋणी तर आम्ही आहोत तुमचे.. मिसळपाव सारखे जिंदादिल व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल !!
(ऋणी )केशवसुमार
31 Jan 2008 - 5:49 pm | विवेकवि
झ्क्कास बाकी.
आवडले बुवा आपल्याला..
मिनु जोशी.
31 Jan 2008 - 5:58 pm | धनंजय
वाटले. वाहावा
1 Feb 2008 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे
'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी
बेष्टच. केशवखुमार. मम हातीच्या रेषांमध्ये काही गूढ दडले आहे काय? तळ हातीच्या रेषा म्हनला न्हाई म्हनून म्हन्ल हो. दुसरीकं कुठ उमाटल्या आस्तीन. खॅ खॅ खॅ
प्रकाश घाटपांडे
2 Feb 2008 - 2:11 am | इनोबा म्हणे
परकासराव,
तुमाला काय म्हनायचं हाय ते कळलं बरं का! केश्याची इश्टायल केश्यालाच वापरताय राव. हे मंजी बुमरँगच झालं....
('अंदर की बात'चा जाणकार) -इनोबा
2 Feb 2008 - 9:36 am | केशवसुमार
अहो नीळा कोल्हाच तो त्याला सगळ नीळच दिसायचं..
परकाशराव चालायचं व्हत अस कधी कधी..
(राखाडी कोल्हा) केशवसुमार..
2 Feb 2008 - 9:27 pm | इनोबा म्हणे
च्यामारी केशवा...! इनोबाचा 'ज्ञानोबा' कवा झाला? आणि हा वारकरी इनोबा 'शेठ' कसा काय झाला.
(गोंधळलेला) -इनोबा
4 Feb 2008 - 2:45 pm | केशवसुमार
'ध' चा 'मा' झाला खरा..
(त्याच आस झालः जरा जुनपुराण वाचित बस्लो होतु.. मळमळ
विनायक -वारकरी -माऊली- इनोबा करता करता तुमासनी ज्ञानोबा म्हनुन शान बसलो.. चुक झालि एकडाव माफि करा)
(वेंधळा) केशवसुमार
बाकी आम्हाला सगळे 'शेठ' आणि 'ताई'
1 Feb 2008 - 12:50 pm | नंदन
विडंबन. अतिशय आवडले.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
1 Feb 2008 - 2:00 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार
केशवसुमार
2 Feb 2008 - 2:02 am | वरदा
आणि काही शब्दच नाहीयेत्...सहीच आहे एकदम
3 Feb 2008 - 10:11 pm | अविनाश ओगले
केशव म्हणतो सुमार तरीही खुमार त्याचा भारी
प्रसन्न त्याला प्रतिभा राणी अन् एक्केही चारी
विडंबनाची धमाल तर्री, सुटते तोंडा पाणी
जास्त काय लिहू?
आपला,
(रेशन'कार्ड' सोडून कुठल्याच 'कार्डा'ला हाती न धरणारा)
अविनाश ओगले
4 Feb 2008 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केशवसुमार किती बेसुमार हसवणार राव !!!
बाकी आपल्या प्रतिभेला आमचा सलाम, फारच खत्रा विडंबन आहे.
7 Feb 2008 - 3:27 pm | ॐकार
मान गये भिडू! पुस्तक कधी काढताय? विडंबन फर्मास आहे!