!! जीवना.. !!
जीवना....तू फार मज छळले,
कधी निवांत जगलो नाही
तू फुलात दिलेस काटे,
मी तरी ही रडलो नाही !!
कस लावून मी जीवाचा,
दर पाऊल टाकत गेलो,
तू क्षणात न्हेले मागे,
मी तरी ही दमलो नाही !!
कधी दिलेस ऋतू तू हिरवे,
मग माझी बहरली पाने,
कधी दिलेस वादळ वारे,
मी तरी ही पडलो नाही !!
तू अमृत देऊन जन्माचा,
मज फार लावली आशा,
मग दिलेस शाप मरणाचा,
पण मी तरीही घाबरलो नाही
जीवना....तू फार मज छळले,
कधी निवांत जगलो नाही !!
प्रतिक्रिया
19 Nov 2016 - 3:12 pm | प्राची अश्विनी
छान आहे.
20 Nov 2016 - 2:13 am | कवि मानव
धन्यवाद... आभारी आहे !!