अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
7 Nov 2016 - 2:49 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :)

अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः

Electoral College

सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे:

Projections

वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.

नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.

सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अ‍ॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्‍यातले असेल.

तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

7 Nov 2016 - 6:22 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

कोणीही येवो, रिपब्लिकन मतदारांची निराशाच होणार आहे. ट्रंप नावापुरतेच रिपब्लिकन आहेत.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2016 - 11:44 pm | गॅरी ट्रुमन

ट्रंप नावापुरतेच रिपब्लिकन आहेत.

हो डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन असले तरी फ्री ट्रेडचा विरोध करत आहेत. तसेच इमिग्रेशनच्याही विरोधात आहेत.

यापूर्वी रिचर्ड निक्सन हे मध्याच्या उजवीकडच्या लोकांच्या गळ्यातले ताईत होते. पण त्यांनीच किंमतींवर नियंत्रण लावण्यासारखे उजवे लोक कडाडून विरोध करतात ते निर्णय घेतले होते. ट्रम्प निवडून आले तरी रिपब्लिकनांपेक्षा अपेक्षित असलेले निर्णय ते घेणे कठिणच आहे.

रॉनाल्ड रेगन यांची अफगाणिस्तानप्रकरणातील भूमिका कितीही पटत नसली तरी त्यांच्यानंतर हाडाचा रिपब्लिकन अध्यक्ष झाला नाही असेच म्हणायला हवे.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2016 - 9:20 am | llपुण्याचे पेशवेll

निक्सन हे प्रचंड भारतद्वेष्टे होते आणि त्यांच्या सगळ्या निर्णयांमध्ये या त्यांच्या वैयक्तीत द्वेषाची मोहोर उमटत असे. हिलरी देखील तशाच प्रतीच्या भारतद्वेष्ट्या असल्याने अमेरीकेतील हिंदू असोसिएशनने ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2016 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

गॅरी ट्रुमन यांच्या या धाग्याची अपेक्षा होतीच.

प्रायमरीपासून घडलेल्या अनेक अनपेक्षित घटनांनी आणि उमेदवारांबद्दलच्या सतत येणार्‍या बर्‍यावाइट बातम्यांमुळे ही निवडणुक माध्यमांत सतत खळबळजनक राहिली आहे. प्रत्यक्षात काय घडते आहे (निकालाइतका मतदान-ते-निकाल हा प्रवासही इव्हेंटफुल असेल असा अंदाज आहे ;) ) ते बघायला पुढचे दोन-तीन दिवस (कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यास अजून काही दिवस) माध्यमांना आणि या धाग्याला चिकटून न राहणे अशक्य आहे ! :)

रमेश आठवले's picture

7 Nov 2016 - 9:33 pm | रमेश आठवले

एका अमेरिकन प्राध्यापकाने केलेले हे भाकित बहुतेक मिपाकरांनी वाचले असेल . त्याच्या मॉडेल प्रमाणे ट्रम्प विजयी व्हायला हवेत. त्याला स्वतःला हे आवडत नाही पण त्याचे मॉडेल गेल्या १०० वर्षांच्या निवडणुकीच्या बाबतीत खरे उतरले आहे.
http://www.ndtv.com/world-news/this-election-keeps-me-sleepless-top-poli...

माझ्या माहितीनूसार त्यांचे भाकित गेल्या ३४ वर्षात ८ वेळा बरोबर आले आहे. लिन्क शोधत आहे.

अगोचर's picture

8 Nov 2016 - 3:38 am | अगोचर

दर चार वर्षान्नी होतात निवडणुका !

वैभव पवार's picture

8 Nov 2016 - 2:20 pm | वैभव पवार

शंभर नाही ३०

विकास's picture

7 Nov 2016 - 9:49 pm | विकास

जर विविध सर्वेक्षणे पाहीली तर हिलरी क्लिंटन निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. पण जर मतदारांनी मनातले सांगितले नसले तर गोष्ट वेगळी आहे! आणि या वेळेस ती देखील एक शक्यता होऊ शकते कारण हिलरी आवडत नाही म्हणून भले ट्रंपना मत देयचे ठरवले तरी ते तसे जाहीर सांगणे हे ट्रंपच्या इतर वागणुकीमुळे अनेकांना लाजिरवाणे वाटत आहे.

टिव्हीवर पाहीलेल्या रँडम कार्यक्रमात अलिप्त/स्वतंत्र "तज्ञांनी" हिलरीला २९० पासून ते ३२५ पर्यंत मते मिळतील म्हणून सांगितले आहे. ट्रंपच्या बाबतीत कुणालाच कुठलाच विश्वास नाही. म्हण जे ते निवडून येऊ शकतात पण का ते माहीत नाही. फक्त त्यांना निवडून येण्यासाठी हिलरीपेक्षा अधिक आव्हानात्मक परीस्थिती आहे हे नक्की!

रमेश आठवले's picture

7 Nov 2016 - 9:56 pm | रमेश आठवले

या प्राध्यापकाने त्याचे मॉडेल तयार केल्या नन्तर मॉडेलच्या आधीच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या बाबतीत वापरून पाहिले आणि त्यात ही ते खरे उतरले असे माझ्या वाचनात आले आहे.

John McClain's picture

7 Nov 2016 - 11:05 pm | John McClain

धन्यवाद साहेब.
तुमचे मेहनत आणि analysis छान आहे.
निकाल 1 दिवसातच कळणार का?
औपचारिक निकाल आणि अनौपचारिक असे काही असते का?
म्हणजे मी असा वाचल्याचं ऐकलेल कि निकाल डिसेंबर मध्ये आहेत म्हणून.

  1. जर सगळे सुरळीत पार पडले तर मंगळवारच्या (नोव्हेंबर ८ च्या) रात्रीच्या बारापर्यंत (बॉस्टन टाईम) राष्ट्राध्यक्षिय निवडणुकीचा निकाल लागला असेल. काँग्रेस आणि सिनेटचे निकाल कळायला बुधवार सकाळ उजाडेल.
  2. पण जर का काही गडबड झाली: म्हणजे कुठल्याही राज्यात दोघांमधील इलेक्टोरल कॉलेज मधला फरक नगण्य असेल, तर निवडणुक प्रक्रीयात आपोआप फेरमोजणी करावी लागते. तसे झाले तर निकाल लागायला उशीर होऊ शकतो.
  3. त्याही पुढे जर कुठल्याही बाजूमुळे न्यायालयीन युद्ध सुरू झाले तर कितीही रेंगाळू शकते. कारण त्यामधे खालच्या कोर्टापासून सुरवात होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला सरकत जाणार. तिथे रिपब्लिकन पक्षाने ओबामाला न्यायाधिश नेमून न दिल्याने ८ न्यायाधिश आहेत. त्यातील चार हे उजव्या विचारांचे अथवा रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमलेले आहेत तर ४ डेमोक्रॅट राष्ट्राध्यक्षांनी. परीणामी जर त्यांच्यातले मत टाय झाले तर बोंब!
  4. ते काही झाले तरी घटनेनुसार २० जानेवारी २०१७ हा ओबामाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस आहे. जर तो पर्यंत राष्ट्राध्यक्ष ठरला नाही, तर अमेरीकन काँग्रेसचा सभापती हा राष्ट्रध्यक्ष होतो. तो कोण असेल हे उद्याच्या निवडणुकीत बहुमत कुणाला मिळते यावर आणि पक्षांतर्गत राजकारणावर अवलंबून राहील!

यातील १ आणि २ इतकेच मुद्दे अपेक्षित आहेत. पण तसे काय ट्रंप राष्ट्राध्यक्षिय उमेदवार होणे पण अनपेक्षित होते आणि तरी झाले! तेंव्हा काही बोलता येत नाही! ;)

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2016 - 1:06 am | पिवळा डांबिस

शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे.

बाकी निवडणुकीच्या निकालाचं सोडा पण निवडणुकीवर लिहिण्यासाठी एक दिवस रजा घेणार आहे हे वाचून ड्वाले पानावले! :)
इथं शिंदळीचं सर्कार मतदानाच्या दिवशीदेखील सुट्टी देत नाही. कामाअगोदर, नंतर, किंवा लंचटाईममध्ये मतदान करावं लागतं!! :(
त्या पार्श्वभूमीवर मतदानावर लिहिण्यासाठी सुट्टी घेण्याचा बेत् वाचल्यामुळे मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद दिला.
लगे रहो..

अनुप ढेरे's picture

8 Nov 2016 - 11:55 am | अनुप ढेरे

आमचा एक दोस्त लोकांनी गेल्या वीकांतालापण मत दिलं असं म्हणत होता. ही काय भानगड आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2016 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकन निवडणूकीत मतदानाचा दिवस म्हटला जाणारा दिवस (उदा, आताचा ८ नोव्हेंबर) हा खरेतर "मतदानाचा शेवटचा दिवस" असतो. तेथे मतदान एकाच दिवशी न होता या शेवटच्या दिवसाच्या अगोदरच्या काही दिवसांच्या कालखंडात करता येते. हा "अर्ली वोटींग" नावाने ओळखला जाणारा कालखंड दर राज्याने ठरवलेला असल्याने वेगवेगळा असू शकतो.

यावेळच्या अर्ली वोटींग कालखंडाची काही राज्यांची उदाहरणे अशी आहेत :

१. अरिझोन : १२ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर;

२. अर्कान्सा : २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर (संघ्याकाळी ५ वाजेपर्यंत)

३. कॅलिफोर्निया : प्रत्येक विभागात वेगळे कालखंड आहेत (जागेवर चौकशी करा), पोस्टाने आलेल्या मतपत्रिका ११ नोव्हेंबरपर्यंत स्विकारल्या जातील;

४. कोलोराडो : २४ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर;

५. फ्लोरिडा : २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर;

६. सेम डे रजिस्ट्रेशन अँड वोटींग : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर;

७. नेवाडा : २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर; इत्यादी

प्रत्येक राज्याची सविस्तर माहिती येथे मिळेल. भारतीय मतदाराला ही माहिती आश्चर्यकारक आणि मनोरंजक वाटेल ! :)

वैभव पवार's picture

8 Nov 2016 - 2:22 pm | वैभव पवार

धन्यवाद

चौकटराजा's picture

8 Nov 2016 - 3:13 pm | चौकटराजा

अहो त्याना काळजी निवडणुकीची नाही हिलरीची वाटतीय !

पिलीयन रायडर's picture

8 Nov 2016 - 1:53 am | पिलीयन रायडर

आज मुलाच्या शाळेतही काही पत्रकं वाटत होते. त्यावरुन कळालं की उद्या बर्‍याच निवडणुका एकदम असतात. लोकल लेव्हलच्या सुद्धा.

मुलगा आज अचानक मला सांगत होता की उद्या आपण प्रेसिडेन्टला बघणार आहोत.. कोणे प्रेसेडेन्ट? तर म्हणे डोनाल्ड ट्रम्प! का तर त्याला ट्रंप नाव आवडलंय! पण म्हणजे शाळेतही आज ह्या निवडणुकीविषयी माहिती दिली असेल.

एकंदरित इथं तेच सगळं वातावरण आहे! अगदी लहान पोरं पण सोडली नाहीत.

हिलरी येईल असं वाटतंय.. इथे सगळी सोशल मिडीया पेजेस विकत घेतल्यासारखी तिची तारिफ करत आहेत. त्याही पेक्षा जास्त ट्रंपची बदनामी करत आहेत. अगदी चेपु वरच्या एका सायन्स पेजने सुद्धा "ट्रंप कोणकोणत्या वेज्ञानिक गोष्टी मानत नाही" असे आर्टिकल परवा टाकले. ह्युमन्स ऑफ न्युयॉर्कनेही एक मोठ्ठा उतारा टाकला होता की कसं वाटोळ्ळं होईल ट्रंप आला तर! हिलरीच्या टिव्हीवरच्या अ‍ॅड्स सुद्धा ट्रंप कसा वाईट आहे ह्यावर आहेत. ट्रंपच्या अ‍ॅड्स मला तुलनेनेन कमी दिसल्या सगलीकडेच. पण अर्थात त्याही मी कसा भारी आहे आणि हिलरी वाट लावेल तुमची अशाच आहेत.

पण हिलरी मी काय करु शकते ह्यापेक्षा ट्रंप कशी बरबादी आणेल आणि तो कसा हुकलेला आहे हेच सांगत आहे. विकासाचे मुद्दे वगैरे फार ऐकायला मिळाले नाहीत. डिबेट्स मध्ये जे काही थोडं फार बोललं गेलं तेच.

टिव्हीवरही बिल माहेर (असाच ना उच्चार?) आणि जॉन ऑलिव्हर उघडपणे हिलरीला सपोर्ट करत आहेत. लास्ट वीक्स टुनाईट मध्ये तर जॉन हात धुवुन ट्रंपच्या मागे लागलाय!!

एकंदरित वातावरण पहाता हिलरी येईल असे वाटते.

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 7:59 am | शाम भागवत

मला अस वाटतय की मतदानाच्या प्रमाणात ७ ते ८ टक्के वाढ होईल व भल्याभल्यांचे अंदाज चुकतील. वाढते मतदान काय करू शकते याचा विचार फारसा झालेला नाही असे वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 12:01 am | गॅरी ट्रुमन

मतदानाच्या प्रमाणात ७ ते ८ टक्के वाढ होईल व भल्याभल्यांचे अंदाज चुकतील.

मतदानाला सुरवात झाली आहे. सध्या मतदानाचा वेग किती आहे याविषयी माहिती नाही.तेव्हा त्याविषयी काही लिहित नाही.

तरीही समजा मतदानाचे प्रमाण वाढले तरी भारतात किंवा इंग्लंडमध्ये जितका फायदा मिळाला असता तितका अमेरिकेत मिळेल असे नाही. याचे कारण इलेक्टोरल कॉलेज हा प्रकार. दोन्ही कोस्टवर तसेच मिशिगन आणि मिन्नेसोटा सारख्या राज्यांमध्ये अध्यक्षीय निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष खूपच प्रबळ आहे. तर मधल्या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे ठळकपणे बघायला मिळाले आहे. रिपब्लिकन पक्षाने कॅलिफॉर्निया शेवटचे जिंकले होते ते १९८८ मध्ये थोरल्या बुशनी तर न्यू यॉर्क शेवटचे जिंकले होते १९८४ मध्ये रॉनाल्ड रेगन यांनी.तर अमेरिकेच्या मध्य भागातील कॅन्सस हे राज्य डेमॉक्रॅटिक पक्षाने शेवटचे जिंकले होते १९६४ मध्ये लिंडन जॉन्सन यांनी (आणि त्यापूर्वी १९३६ मध्ये फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी).

एकंदरीत रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली राज्ये जिंकण्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष अधिक यशस्वी झालेला आहे पण रिपब्लिकन पक्षाला मात्र डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्राबल्यक्षेत्राला खिंडार तितक्या सहजपणे पाडता आलेले नाही. उदाहरणार्थ १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली लुईझियाना, अरकॉन्सॉ, टेन्नीसी, मोन्टाना इत्यादी राज्ये जिंकली होती.पण कोस्टवरील राज्ये जिंकणे रिपब्लिकन पक्षाला गेल्या काही निवडणुकांमध्ये शक्य झालेले नाही.

त्यातच इलेक्टोरल कॉलेजमुळे अजून गुंतागुंत वाढेल असे वाटते. अमेरिकेच्या मध्य भागातील परंपरावादी लोकांना एक स्त्री अध्यक्ष झालेली आवडेल असे वाटत नाही.तसेच ओबामांच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या 'व्हाईट सुप्रीमसी' ला काही प्रमाणावर तरी धक्का बसला असेल असे वाटते. त्यातून रिपब्लिकन पक्ष मुळात प्रबळ आहे अशा राज्यांमधून (टेक्सस,ओक्लाहोमा,कॅन्सस इत्यादी) ट्रम्पना जोरदार विजय मिळाला तरी त्यातून इलेक्टोरल कॉलेजमध्ये आणखी मते मिळणार नाहीत.

मला वाटते की ट्रम्पची उघडपणे बाजू घेणे हे 'पोलिटिकली इनकरेक्ट' आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी मतदानपूर्व चाचण्यांना आम्ही हिलरींना मत देऊ असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ते ट्रम्पना मत देतील असे घडले तरच ट्रम्प जिंकतील. अन्यथा हिलरींचे पारडे जड आहे. असो. पुढील काही तासातच नक्की काय ते समजेल.

मराठी कथालेखक's picture

8 Nov 2016 - 12:04 pm | मराठी कथालेखक

एकूणातच यावेळी अमेरिकी नागरिकांना 'चांगला उमेदवार' निवडण्यापेक्षा 'कमी वाईट' उमेदवार निवडायचा आहे.

गामा पैलवान's picture

8 Nov 2016 - 1:18 pm | गामा पैलवान

लोकहो,

हिलारीवर खटला दाखल करणार म्हणून एफबीआय संचालक कोमीने मोठा गाजावाजा केला खरा, पण ऐन वेळेस शेपूट घालून माघार घेतलीच. यावरून प्रस्थापितांना हिलरीची किती नितांत गरज आहे हे दिसून येतं. लोकांनी कशाला तिला मतं द्यायची? अशाने हिलरीची स्वीय सहायिका हुमा अबिदीन ही दहशतवादी बाई सेक्रेटरी ऑफ स्टेट होईल. युरोपात निर्वासितांनी जो उच्छाद मांडलाय त्याची अमेरिकेत पुनरावृत्ती होईल. शिवाय हिलरी = तिसरं महायुद्ध हे समीकरण आहेच.

एकंदरीत मतं चोरण्यावाचून हिलरीकडे दुसरा मार्ग नाही. आता ही हिलरी खरी आहे की तेरेसा बार्नवेल आहे हा प्रश्न कृपया कोणी विचारू नका! ;-)

आ.न.,
-गा.पै.

विकास's picture

8 Nov 2016 - 8:46 pm | विकास

समर्थकः हिलरीचा समर्थक नाही पण आत्ता हिलरीच हवी ट्रंप नको असे अनेकांप्रमाणे वाटणारा आहे.

अशाने हिलरीची स्वीय सहायिका हुमा अबिदीन ही दहशतवादी बाई सेक्रेटरी ऑफ स्टेट होईल.

मला असलेली हुमा अबेदीनबद्दलची काळजी मी इतरत्र मिपावर व्यक्त केली आहेच. पण ती अजूनही दह्शतवादी ठरलेली नाही त्यामुळे तसे म्हणून उपयोग नाही. तसेच ती सेक्रेटरी ऑफ स्टेट होण्याची शक्यता नाही. पण ती जर चीफ ऑफ स्टाफ झाली तर अधिक काळजी करण्यासारखे राहील कारण ती प्रेसिडंटची अधुकृत सावली होईल. आय होप तसे होणार नाही.

हिलारीवर खटला दाखल करणार म्हणून एफबीआय संचालक कोमीने मोठा गाजावाजा केला खरा, पण ऐन वेळेस शेपूट घालून माघार घेतलीच.

हिलरीचे इमेल पुराण - म्हणजे खाजगी सर्वर वापरणे हे तो पर्यंत अधिकृत होते. त्यात तिने कुठलाही कायदा मोडला नव्हता. पॉवेल, राईस आदींनी पण कमी अधिक प्रमाणात असलेच प्रकार केले आहेत. चेनींच्या लाखावर इमेल्स या "गहाळ" झालेल्या होत्या... त्यामुळे ती काही सद्गुणाची पुतळी असली-नसली तरी तीने काहीतरी भयानक केले आहे असे ब्रँडींग झालेले आहे ते एकेरी आहे.

एफबीआय ने जे काही ८-१० दिवसांपुर्वी केले, ते त्यांना दोन्ही पक्षांच्या सरकारांकडून असलेल्या अनेक दशकांच्या पायंड्याच्या विरुद्ध होते. एफबीआय ने गुप्तपणे विश्लेषण करून, खात्री करून मग जाहीरपणे अ‍ॅक्शन घेणे अपेक्षित असते. येथे काहीच माहीत नसताना आधी जाहीर केले आणि ते देखील अशा वेळेस जेंव्हा त्याचा निवडणुकीवर परीणाम होऊ शकतो तेंव्हा, जे त्यांच्या आचारसंहीतेच्या विरोधात गेले.

दुसरे म्हणजे ट्रंप सपोर्टर आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी ज्युलिआनी हे एफ बी आयच्या या निर्णयाच्या आधी दोन दिवस मुलाखतीत म्हणाले होते की दोन दिवसात काय गंमत होणार आहे ते पहा म्हणून. चौकशी होणार म्हणून जाहीर झाल्यावर पण स्वतःचा शहाणपणा दाखवायला म्हणून म्हणाले की मला एफबीआय एजंट्स नी हे आधीच सांगितले होते. जर तसे झाले असेल तर गोपनियतेचा भंग हा राष्ट्रीय गुन्हा आहे. त्यात एफबीआय मधील फूट दिसते तशीच जुलियानींनी (गुन्ह्याला) दिलेला पाठींबा पण दिसतो. त्यामुळे अमेरीकन काँग्रेस मधील काही डेमोक्रॅटीक सदस्यांनी लगेच आवाज उठवून त्याची चौकशी करायला हवी म्हणून जाहीर केले. हे प्रकरण जुलिआनी आणि एफबीआय मधील काही फुटीरांमुळे सगळ्यांना महागात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे देखील असेल की तात्काळ एफबीआय ने जे होणारच नव्हते त्यातून माघार घेतली असेल... अर्थात त्याचा हिलरीला होयचा तो तोटा झाला कारण प्रचारातील शेवटचा आठवडा जेंव्हा मिलियन्स नी मते दिली तेंव्हाच त्यांची चौकशी होणार म्हणून जाहीर केले होते.

शिवाय हिलरी = तिसरं महायुद्ध हे समीकरण आहेच.

तसे होणार नाही. गेल्या दशकात अमेरीकेला युध्दाच्या खाईत रिपब्लिकन बूश नी लोटले होते. त्याआधी नव्वदच्या सुरवातीस मोठ्या बुशनी...बिल क्लिंटनच्या काळात युगोस्लावियामुळे अमेरीका युद्धात होती पण ते नेटो चा भाग म्हणून. ओबामाच्या काळात जे काही (युद्ध) चालले आहे ते बुशच्या काळातल्या गोष्टींचा परीणाम आहे. आता त्याने इराक-अफगाणिस्तानातून अमेरीकन सैन्य मागे घेयला हवे होते का? तसे घेतले नसते तर आयसीस तयार झाले नसते वगैरे वेगळ्या चर्चेचे आणि जर-तर चे मुद्दे आहेत. पण एकूण युद्धखोरीची भाषा सध्याच्या काळातले डेमोक्रॅट्स करत नाहीत.

ट्रंप यांनी सरळ सरळ अण्वस्त्रे वापरीन म्हणून सांगितले आहे. ते होईल का नाही ते माहीत नाही. आय होप नॉट (जर ट्रंप अध्यक्ष झाले तर). मात्र, जी व्यक्ती सॅटरडे नाईट लाईव्ह मधे झालेल्या थट्टेला पहाटे तीन वाजता व्टिटरवर चिडून उत्तरे देत बसते आणि तेच इतरांच्या बाबतीत करते, इतके की त्याच्या सल्लागारांना त्याच्या व्टिटर वापरण्यावर बंदी आणावी लागली, त्या व्यक्तीकडे अण्वस्त्रांच्या चाव्या गेल्या तर काय होईल?

अजून एक हिलरीविरोधातील मुद्दा - भारताशी आणि विशेष करून मोदी सरकारशी संबंध...

मला ती दोन मुद्द्यांमुळे काळजी वाटत नाही. एक म्हणजे आपले सरकार आत्ता अधिक प्रबळ आणि धोरणी आहेत. (इथल्या काही जणांना ते पटणार नाही. पण त्यांच्याशी आदरपूर्वक असहमती...). दुसरा भाग म्हणजे हिलरीबद्दल बोलले जाते की ती चुकीतून शिकते. हे अगदी रिपब्लिकन्स पण बोलले आहेत. याचा अर्थ सगळे सुरळीत होईल असा नाही. पण त्याची काळजी करायची गरज नाही जितकी ट्रंपच्या हातात अण्वस्त्रांच्या चाव्या देण्याची गरज आहे - सगळ्या जगासाठीच.

आज माझ्या मित्राने सांगितलं कि स्पेस मध्ये असलेल्या माणसाने पण वोट केलं. हे खरा कि खोटं. जो नासा मध्ये कामाला आहे त्या माणसाने सांगितलं. बाकी ट्रम्प आणि हिलरी साठी भारतात यज्ञ केलं हे पाहून डोळे पाणावले. असो . लक्ष आहे धाग्यावर

वरुण मोहिते's picture

8 Nov 2016 - 2:00 pm | वरुण मोहिते

मी पण महारष्ट्रातले किंवा देशातले निकाल असले कि सुट्टी घेतली आहे फक्त काही लिहायचा कंटाळा .

वैभव पवार's picture

8 Nov 2016 - 2:23 pm | वैभव पवार

धन्यवाद

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी

ही निवडणुक म्हणजे मुलायम वि. मायावती किंवा करूणानिधी वि. जयललिता अशा स्वरूपाची निवडणुक आहे.

न्यू हँपशायर मधील निकाल जाहीर झाला असून हिलरीला ४ तर ट्रंपला २ मते मिळाली आहेत.

मराठी_माणूस's picture

8 Nov 2016 - 3:06 pm | मराठी_माणूस

ह्यांच्याकडे फक्त दोनच पक्ष का ? प्रादेशिक, अपक्ष , धर्मावर आधारलेले?, युती केलेले असे पक्ष नसतात का ?

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी

तसे बरेच लहान पक्ष आहेत. त्यांचे अध्यक्षपदाचे उमेदवारही असतात. परंतु हेच दोन मुख्य पक्ष ९०% जास्त मते घेतात. काही अपक्ष सुद्धा अध्यपदाची निवडणुक लढवितात. युती वगैरे नसते. कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगूलचालन होत नसल्याने धम्रावर आधारीत पक्ष नसतात. अध्यक्षीय पद्धतीमुळे प्रादेशिक पक्ष (असल्यास) राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

अनुप ढेरे's picture

8 Nov 2016 - 3:13 pm | अनुप ढेरे

कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगूलचालन होत नसल्याने धम्रावर आधारीत पक्ष नसतात.

हे नक्की खरं आहे का?

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 3:20 pm | संदीप डांगे

=))

हिलरी आणि ट्रंप इतके नालायक आहेत तर मतदारांनी अपक्षांपैकी एकाला का निवडू नये? की त्यांना पैशाचे पाठबळ नसल्याने ते आव्हान निर्माण करू शकले नाहीत? जर बर्नी सँडर्स अपक्ष म्हणून लढले असते तर निकाल काय लागला असता?

अध्यक्षीय पद्धतीमुळे प्रादेशिक पक्ष (असल्यास) राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

असा नियम आहे का?

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2016 - 4:34 pm | गॅरी ट्रुमन

असा नियम आहे का?

असा नियम नाही. पण अध्यक्षीय निवडणुक असल्यामुळे निवडणुक व्यक्तिकेंद्रीत बनते. अशा परिस्थितीत पक्षाच्या पाठबळाशिवाय किंवा प्रादेशिक पक्षाच्या प्रादेशिक पाठबळावर पूर्ण देशात अध्यक्ष म्हणून निवडून जाता येणे कठिणच आहे. भारतातही देवेगौडा संसदीय पध्दत आहे म्हणून पंतप्रधान झाले. पण देवेगौडांनी अध्यक्षपदाची निवडणुक लढवली असती तर कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये त्यांचे काय झाले असते याची कल्पना करणे फारसे अवघड नाही.

तरीही एखादा तगडा उमेदवार असेल तर अध्यक्षीय निवडणुकांमध्ये बर्‍यापैकी मते घेऊ शकतो. पण अध्यक्षपदावर निवडून जाणे अर्थातच कठिण असते.उदाहरणार्थ १९९२ मध्ये रॉस पेरॉ यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवून सुमारे १८-१९% मते घेतली. थोरल्या बुशचा १९९२ मध्ये पराभव झाला त्याला ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीबरोबरच रॉस पेरॉ हे पण जबाबदार होते. यापूर्वीचे उदाहरण घ्यायचे तर १९०१-१९०९ या काळात थिओडोर रूझवेल्ट अध्यक्ष होते.त्यानंतर १९०९-१९१३ या काळात विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे अध्यक्ष होते. १९१२ च्या निवडणुकांमध्ये लढत होती रिपब्लिकन टाफ्ट आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन यांच्यात. पण माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि बर्‍यापैकी मते घेतली (किंबहुना टाफ्ट यांची मते फोडली). त्यातून टाफ्ट यांचा दणकून पराभव झाला. टाफ्ट यांनी केवळ युटा आणि व्हरमॉन्ट ही दोनच राज्ये जिंकली तर रूझवेल्ट यांनी सहा राज्ये जिंकली. विद्यमान अध्यक्षांचा निवडणुकीत इतका प्रचंड मोठा पराभव त्यानंतर झालेला नाही. तसेच १९६८ च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन रिचर्ड निक्सन यांनी डेमॉक्रॅटिक हर्बर्ट हम्फ्रे यांचा पराभव केला. त्या निवडणुकांमध्ये जॉर्ज वॉलेस या तिसर्‍या उमेदवारानेही १२-१३% मते घेतली होती आणि ५ राज्ये जिंकली होती.

इतर प्रतिसादांना वेळ मिळेल त्याप्रमाणे उत्तर देतोच.

विकास's picture

8 Nov 2016 - 8:09 pm | विकास

अमेरीकेतील कुठल्याही निवडणूकीत उभे रहायचे असेल तर आधी सह्या गोळा कराव्या लागतात. जशी निवडणू़क मोठ्या पदासाठी तशी ही पद्धत अतिशय क्लिष्ट होत जाते. तुर्तास राष्ट्राध्यक्षिय पद्धतीबद्दल बोलूयात.

(त्यात आत्ताचे हिलरी आणि ट्रंप पण आले, पण त्यांचे पक्ष राष्ट्रीय असल्याने जरा सोपे-वेगळे होते त्यामुळे त्यांना वगळून इतरांचा विचार करूयात.. )

प्रत्येक इच्छूक उमेदवाराला सर्व (५०) राज्यांच्या विविध पद्धतींनुसार निवडणूक अर्ज भरावा लागतो. उदा. फ्लोरीडात रजिस्टर्ड व्होटर्सच्या १% सह्या गोळा कराव्या लागतात म्हणजे या वेळेस त्या जवळपास १२०००० इतक्या होत्या तर आयडॅहो मधे १००० अथवा न्यू जर्सी मधे ८०० कायम (% वगैरे नाही!). सर्व मिळून जवळपास ८ ते १० लाख सह्या गोळा कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात इच्छूक उमेदवाराची स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा लागते. ते अपक्षांना शक्य नसते अथवा लहान पार्ट्यांना पण शक्य नसते. आणि केले तरी नंतर प्रचार यंत्रणा आणि त्या साठी लागणारा पैसा नसतो. त्याही पुढे अनेकदा हे उमेदवार टोकाचे असतात. या वेळेस एक ग्रीन पार्टीची उमेदवार आहे (पार्टीच्या नावावरून समजले असेलच) तर दुसरीकडे लिबर्टेरीअन पक्ष (जरा जास्तच सामाजिक-आर्थिक कारणांसाठी उजवा) आहेत.

रविकिरण फडके's picture

8 Nov 2016 - 4:11 pm | रविकिरण फडके

दोन्हीपैकी कुणीही निवडून आले तरी जगाला काही फरक पडत नाही.
व्हाट्सअपवर एक मेसेज फिरतोय तो उद्बोधक आहे. Trump निवडून आलाय आणि ओव्हल ऑफिसमध्ये बसलाय; आपली सर्व वचने अंमलात आणण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतोय. पण अधिकारी त्याला पटवून देतात की तो म्हणतोय त्यातील काहीच प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कारण जे काही राडे करायचे ते कसे करायचे हे FBI, CBI, आदि खात्यांनी ठरवून टाकलेले आहे व प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहे. मग तो हताश होऊन विचारतो की मी करायचे तरी काय? उत्तर? Enjoy your time in white house!
आणखी एक असाच मेसेज: Trump आणि हिलरी क्लिंटन ह्यातील निवड म्हणजे मायावती आणि मुलायम सिंग ह्यातील निवडीसारखीच आहे.
अमेरिका हे विनाशाकडे निघालेले राष्ट्र आहे. त्याची फार चिंता करू नका. अर्थात, स्वतःबरोबर ते इतरांना खड्ड्यात घालताहेत हे दुःख. आपण कसे वाचतो हे पाहायचे जमले तर व तेव्हढे.

मराठी कथालेखक's picture

8 Nov 2016 - 5:14 pm | मराठी कथालेखक

प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहे

हं... शक्य आहे.. कारण ओबामा तसा भला माणूस. पण काही विशेष उजेड पाडलाय त्याने असं वाटत नाही. युद्धखोरी न करण्यासाठी / किंबहूना गप्प राहण्यासाठी शांततेचं नोबेल पदरात पडलंय.

अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर माणणीय डोनाल्ड ट्रंप भाऊसाहेब विजयी भाषण करताना ...

माझ्या प्रिय बंधू भगिणीणो,

आज म्हंजी माझ्या आयुक्षातला एक लई म्हतवाचा दिवस हाय. जसा आणेक वर्सापूर्वी लांब तिकड भारतात रामान रावणाला बान मारून त्येच्याकडून विजय मिळवला तसाच विजय आज देवी यमाई कृपेन आमालाबी मिळाल्येला हाय. त्या हिलरी बाईनं मायंदाळ परयत्न क्येला आमाला हरविन्याचा पण त्येला ठाव नाय की आमी बी लाल मातीत लंगोट लावून कुस्ती खेळल्याल पैलवान हाये. असा पट काढून दीन व्हय सुखासुखी....

बर त्ये सम्द जाऊद्या. आज मी हित तुमा समद्यानचे आभार मानायला आलेलू हाय. तुमी समद्यानी माज्यासाठी आपलेपनान वोटिंग क्येलत, काहीकाही ठिकाणी दोनदोनदा तीनतीनदा बी क्येलत त्याबद्दल मी तुमचा लई आभारी हाय. मायला, आता बगा मी तुमचा गाव कसा बदलून टाकतो. आज हितच या शुभमुहूर्तावर तुमच्या गावासाठी मी पंधरा संडास मंजूर करतोय. आजपासून या गावातला येक बी मानूस रस्त्यावर बस्नार न्हाई म्हंजे न्हाई. थांबा थांबा, इतक्यात टाळ्या नका वाजवू. अजून बाकी हाय. आज रोजी खास तुमच्यासाठी मी येक धरन बी हितल्याहित शांक्शन करतूय. गावात नदी नसली तर काय झालं? धरन पायजेल म्हंजे पायजेल. फूडल्या येळी निवडून आलो की नाय गावात नदी आणली तर नाव बदलून दीन.

बराय मंडळी आता रजा घ्येतो तुमची. असाच लोभ ठ्येवा गरिबावर. फूडच्या गावात जायचं हाय. तिथ बी लोक खोळंबलीयात......

संन्यस्त खड्ग's picture

8 Nov 2016 - 6:20 pm | संन्यस्त खड्ग

देवा आकाशातल्या वडीला
आमचे टृम्प_भौ बहुमताने इजयी होऊन पांढऱ्या घरात जाऊ दे रे महाराजा!!
मी स्टेचूऑफलिबर्टी ला अकरा नारळाचा हार घालीन!
लंडनच्या पवित्र थेम्स नदीच्या पाण्याने अभिषेक करिन रे महाराजा!!
-आपला कॅलिफोर्निया (बुद्रुक)चा सरपंच

टिवटिव's picture

9 Nov 2016 - 5:35 am | टिवटिव

केंटाकी आणी इंडियाना ट्रंप जिंकेल...१९ वोट्स

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 5:38 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी सुरू झाली आहे. पुढील कल उपलब्धआहेतः

१. केंटकी (८ मते): ११% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प सुमारे ३५% मतांनी पुढे
२. इंडियाना (११ मते):९% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प सुमारे २७% मतांनी पुढे

सी.एन.एन ने केंटकी आणि इंडियानामध्ये ट्रम्पना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे. तर व्हरमॉन्टमध्ये हिलरी क्लिंटनना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे.

आताची प्रोजेक्शनः
ट्रम्पः १९
क्लिंटनः ३

केंटकी आणि इंडियाना ही दोन्ही राज्ये रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले आहेत आणि तिथून ट्रम्प विजयी होणे अपेक्षित होते.

आनंदयात्री's picture

9 Nov 2016 - 6:04 am | आनंदयात्री

>>केंटकी आणि इंडियाना ही दोन्ही राज्ये रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले आहेत आणि तिथून ट्रम्प विजयी होणे अपेक्षित होते.

हेच जाणून घ्यायचे होते. धन्यवाद.

फ्लॉरीडामधून (२९ मते) २% मते मोजून झाली आहेत. त्यात ट्रम्प पुढे आहेत.पण मते वकुला काऊंटी (टॅलाहास्सीजवळ) मधून मोजून झाली आहेत. तिथे रिपब्लिकन बालेकिल्ला आहे. त्यामुळे ट्रम्प २८% ने पुढे असले तरी ते अपेक्षितच आहे.

व्हर्जिनिया (१३ मते): १% मते मोजून झाली आहेत. त्यात हिलरी क्लिंटन ४% मतांनी पुढे आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 5:59 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडामध्ये (२९ मते) ३१% मते मोजून झाली आहेत आणि त्यात हिलरी ०.५% मतांनी पुढे आहेत. हिलरींनी आपली स्ट्राँगहोल्ड असलेली राज्ये जिंकली आणि फ्लॉरीडासारखे मोठे रिपब्लिकनकडे झुकणारे राज्य जिंकले तर हिलरी अध्यक्षपदी नक्की.

व्हर्जिनियामध्ये ३% मते मोजून झाली आहेत आणि त्यात ट्रम्प २०% ने पुढे आहेत.
जॉर्जियामध्येही पहिल्या कलांमध्ये ट्रम्प पुढे आहेत. पण जॉर्जिया हा रिपब्लिकनांचा बालेकिल्ला आहे तेव्हा हे अनपेक्षित नाही.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:04 am | गॅरी ट्रुमन

सी.एन.एन ने वेस्ट व्हर्जिनिया (५ मते)मधून ट्रम्पना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे.

फ्लॉरीडामध्ये चुरस चालू आहे. ४३% मते मोजून झाली आहेत आणि आता ट्रम्प १% ने पुढे आहेत. फ्लॉरीडामधील चुरस २००० च्या निवडणुकांची आठवण करून देत आहे. फ्लॉरीडा जिंकल्याशिवाय ट्रम्पना व्हाईट हाऊस गाठणे कठिण आहे.

सध्या--

ट्रम्पः २४
क्लिंटनः ३

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:11 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडामध्ये (२९ मते) मतमोजणी जोरात चालू आहे. आता ४७% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प २.५% मतांनी पुढे आहेत.

व्हर्जिनिया (१३ मते) ट्रम्प पुढे आहेत. पण व्हर्जिनियाच्या रिपब्लिकन स्ट्राँगहोल्ड असलेल्या भागांमधून आकडे आले आहेत त्यामुळे त्यात अनपेक्षित काही नाही.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:20 am | गॅरी ट्रुमन

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): १०% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प ११% ने पुढे.

फ्लॉरीडा (२९ मते): ६५% मते मोजून झाली आहेत. आता हिलरी १.३% ने पुढे.

न्यू हॅम्पशायर (४ मते): १% मते मोजून झाली आहेत. हिलरी क्लिंटन ४% ने पुढे

ओहायो (१८ मते): ट्रम्प १०% ने पुढे

फ्लॉरीडा खरोखरच २००० च्या निवडणुकांची आठवण करून देत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:25 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडा खूपच इंटरेस्टींग आहे. ७२% मते मोजून झाली आहेत. त्यात आता हिलरी क्लिंटन २.६ % मतांनी पुढे आहेत. उरलेल्या २९% मतांमधून ही पिछाडी ट्रम्पना भरून काढता आली नाही तर त्यांना व्हाईट हाऊस गाठणे कठिण आहे.

आता नॉर्थ कॅरोलायनामधूनही हिलरी पुढे आहेत.

फ्लॉरीडा आणि नॉर्थ कॅरोलायना जिंकले नाही तर ट्रम्पना व्हाईट हाऊस विसरायला हवे.

आनंदयात्री's picture

9 Nov 2016 - 6:29 am | आनंदयात्री

>>फ्लॉरीडा आणि नॉर्थ कॅरोलायना जिंकले नाही तर ट्रम्पना व्हाईट हाऊस विसरायला हवे.

एनबीएसी वरच्या अनालिस्ट्सच्या मते फ्लॉरीडा जर ट्रम्प च्या हातातून गेले तर त्याला पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन हि दोन्ही राज्ये जिंकावी लागतील.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:33 am | गॅरी ट्रुमन

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ३६% मते मोजून झाल्यावर आता हिलरी क्लिंटन ६% पुढे आहेत. पण सी.एन.एन वर असे म्हणत आहेत की शारलट या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बालेकिल्ल्याच्या भागातून मते मोजून झाली आहेत. मागच्या वेळी ओबामांनी या भागातून भरपूर मते घेऊनही हे राज्य गमावले होते.

ओहायोमध्येही आता हिलरी पुढे आहेत. बहुतके ट्रम्पना व्हाईट हाऊस गाठता येणे कठिण आहे.

सी.एन.एन ने मॅसॅचुसेट्स, मेरीलंड, र्‍होड आयलंड, इलिनॉय, डेलावेअर, डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया मधून हिलरी तर ओक्लाहोमा, टेनीसी, मिसीसीपी मधून ट्रम्प ना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे.

न्यू हॅम्पशायर, पेन्सिल्वेनिया मध्ये चुरस होईल अशी अपेक्षा आहे.

आता--

हिलरी क्लिंटन-६८
डॉनल्ड ट्रम्प- ४८

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:41 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडामध्ये ८२% मते मोजून झाली आहेत. आता हिलरी क्लिंटन १.४% मतांनी पुढे आहेत.

त्यापेक्षाही हिलरींनी ओहायोमध्ये जवळपास ९% आघाडी घेतली आहे तर नॉर्थ कॅरोलायनामध्ये ६% आघाडी घेतली आहे.

हिलरी अलाबामामध्ये आघाडीवर आहेत. तसे असेल तर ते खूपच आश्चर्यकारक असेल. बहुदा खूपच कमी मते मोजून झाली असावीत.

अनन्त अवधुत's picture

9 Nov 2016 - 6:44 am | अनन्त अवधुत

तुम्हाला धाग्यावर एकटे एकटे वाटायला नको म्हणून हा प्रतिसाद.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:46 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडामध्ये ८६% मते मोजून झाली आहेत. आता ट्रम्प ९१८ मतांनी (०.१% पेक्षा कमी) आघाडीवर आहेत. आणि हे पोस्ट करता करता हिलरींना ४,२९० मतांची आघाडी मिळाली आहे.

हे राज्य म्हणजे रोलरकोस्टर आहे.

अनन्त अवधुत's picture

9 Nov 2016 - 6:48 am | अनन्त अवधुत

फ्लोरिडा मध्ये जो जिंकेल त्याला सगळे (म्हणजे 29 इलेकट्रोल मते) मिळतील का?

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:50 am | गॅरी ट्रुमन

केवळ मेन आणि नेब्रास्कामध्ये इलेक्टोरल कॉलेजमधील मते स्प्लीट होतात. इतर सर्व राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल'

अनन्त अवधुत's picture

9 Nov 2016 - 6:51 am | अनन्त अवधुत

.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:51 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडात ८८% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प अवघ्या २८ मतांनी आघाडीवर आहेत. फ्लॉरीडामध्ये पुनर्मतमोजणी होणार का?

विशाखा पाटील's picture

9 Nov 2016 - 6:56 am | विशाखा पाटील

आता फ्लोरिडात ट्रम्प पुढे दिसतायेत. दोघांमधला फरक फारच कमी असेल एवढे नक्की.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 6:57 am | गॅरी ट्रुमन

फ्लॉरीडामध्ये आता ट्रम्प ०.२% मतांनी आघाडी घेतली आहे. तरीही सी.एन.एन वर दाखविले की मायामी या मोठ्या शहरात हिलरींनी २८% ची आघाडी घेतली आहे. तिथे अजूनही २०% मते मोजून व्हायची आहेत. त्यामुळे ही ०.२% ची आघाडी बदलू शकते.

फ्लॉरीडातील निकाल छत्तिसगड विधानसभा निवडणुकांची आठवण करून देत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:01 am | गॅरी ट्रुमन

टेक्ससमध्ये ४६% मते मोजून झाली आहेत आणि तिथे हिलरी क्लिंटन ०.५% ने आघाडीवर आहेत. तिथे जर ट्रम्प मागे असतील तर त्यांनी बॅग भरून परत जावे :)

विशाखा पाटील's picture

9 Nov 2016 - 7:08 am | विशाखा पाटील

:) बालेकिल्ल्याला भगदाड...

सी.एन.एन ने साऊथ कॅरोलायना, ओक्लाहोमा, मिसीसीपीमध्ये डॉनल्ड ट्रम्पना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे.

आता--

हिलरी क्लिंटनः ६८
डॉनल्ड ट्रम्पः ६६

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2016 - 7:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण जिंकेल ते सांगा आता ?

-दिलीप बिरुटे

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:12 am | गॅरी ट्रुमन

मला वाटते हिलरी जिंकतील-- इलेक्टोरल कॉलेजमध्ये साधारण ३०० मते घेऊन. एकदा न्यू यॉर्क आणि कॅलिफॉर्नियातील आकडे आले की हिलरींची आघाडी वाढलेली दिसेल. त्यातही ट्रम्प ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायनामध्ये सध्या मागे आहेत. ही दोन राज्ये जिंकणे त्यांना महत्वाचे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2016 - 7:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण येतंय निवडून ?

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

9 Nov 2016 - 7:08 am | पिलीयन रायडर

वाचतेय.. टिव्हीवर पहातेय!

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:10 am | गॅरी ट्रुमन

व्हर्जिनियामध्ये ५३% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ६% ने आघाडीवर आहेत. या राज्यात हिलरी जिंकणे अपेक्षित होते. जर ट्रम्पनी व्हर्जिनिया जिंकले तर कदाचित नॉर्थ कॅरोलायनामधील पराभवाची भरपाई होईल.

तरीही वॉशिंग्टन डी.सी पासून जवळ असलेल्या फेअरफॅक्स शहरात हिलरी पुढे आहेत आणि तिथून बरीच मते मोजून व्हायची आहेत.

हे पोस्ट करता करता फ्लॉरीडामध्ये ट्रम्प १.१% मतांनी पुढे आहेत. आणि राज्यातील ९१% मते मोजून झाली आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:14 am | गॅरी ट्रुमन

टेक्ससमध्ये ५०% मते मोजून झाली आहेत आणि आता ट्रम्प २.३% मतांनी आघाडीवर आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:23 am | गॅरी ट्रुमन

अरकॉन्सॉमध्ये (६ मते) १५% मते मोजून झाली आहेत आणि तिथे डॉनल्ड ट्रम्प ९% ने पुढे आहेत. अध्यक्ष होण्यापूर्वी बिल क्लिंटन या राज्याचे गव्हर्नर होते. पण अध्यक्षीय निवडणुकांमध्ये हे राज्य रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे.

पूर्व किनार्‍यावरील न्यू जर्सी, डेलावेअर, मेरीलँड, डीसी, मॅसॅचुसेट्स या राज्यांमध्ये सी.एन.एन ने अपेक्षेप्रमाणे हिलरींना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे. मिशिगनमध्ये ९% मते मोजून झाली आहेत आणि हिलरी ४.६% मतांनी पुढे आहेत.

ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायनामध्ये हिलरी अजूनही पुढे आहेत. पण आघाडी कमी झाली आहे. ६१% मते मोजून झाल्यानंतर हिलरी नॉर्थ कॅरोलायनामध्ये २.३% मतांनी तर ३५% मते मोजून झाल्यावर ओहायोमध्ये १.७% मतांनी पुढे आहेत. काही वेळापूर्वी हे आकडे ६% आणि ८% असे होते.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:32 am | गॅरी ट्रुमन

डॉनल्ड ट्रम्प नॉर्थ डॅकोटा (३ मते), साऊथ डॅकोटा (३ मते), कॅन्सस (६ मते) आणि नेब्रास्का (५ मते) यातून जिंकतील असे सी.एन.एन ने जाहिर केले आहे. तर हिलरी क्लिंटन त्यांच्या न्यू यॉर्क राज्यातून (२९ मते) जिंकतील असे जाहिर केले आहे.

हे पोस्ट करता करता ३७% मते मोजून झाल्यावर डॉनल्ड ट्रम्प आता ०.१% मतांनी पुढे आहेत.

आतापर्यंतचे आकडे:
हिलरी क्लिंटनः ९७
डॉनल्ड ट्रम्पः ८४

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:37 am | गॅरी ट्रुमन

ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायना फ्लॉरीडाप्रमाणेच इंटरेस्टींग वाटत आहेत.

ओहायो (१८ मते): ४०% मते मोजून झाल्यावर ट्रम्प २.६% मतांनी पुढे आहेत.
नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ५९% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.५% मतांनी पुढे आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 7:46 am | गॅरी ट्रुमन

सी.एन.एन ने टेक्ससमध्ये (२९ मते) डॉनल्ड ट्रम्पना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे.

आताचे आकडे:

डॉनल्ड ट्रम्पः १२८
हिलरी क्लिंटनः ९७

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2016 - 7:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जोर लावा भाऊ ! हिलरी निवडून आल्या पाहिजेत. :)

-दिलीप बिरुटे

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:01 am | गॅरी ट्रुमन

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ७४% मते मोजून झाल्यावर ट्रम्प १.३% मतांनी पुढे.
ओहायो (१८ मते): ५०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ७.४% मतांनी पुढे
फ्लॉरीडा (२९ मते): ९४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १.५% मतांनी पुढे
व्हर्जिनिया (१३ मते); ७५% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २% मतांनी पुढे
कोलोरॅडो (९ मते): ३८% मते मोजून झाल्यानंतर हिलरी क्लिंटन ८% मतांनी पुढे
न्यू हॅम्पशायर (४ मते): २१% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.५% मतांनी पुढे
पेन्सिल्वेनिया (२० मते): १४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २०% मतांनी पुढे

डॉनल्ड ट्रम्प व्हर्जिनियातील आघाडीमुळे नक्कीच खुषीत असतील. कारण हिलरींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टिम केन व्हर्जिनियाचे आहेत.

पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्पना मोठी आघाडी दिसत असली तरी रिपब्लिकन स्ट्राँगहोल्ड असलेल्या भागांमधून आकडे आले आहेत. फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, हॅरीसबर्ग या डेमॉक्रॅटिक भागातील आकडे अजून आलेले नाहीत.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 8:13 am | श्रीगुरुजी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2016 - 8:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

-दिलीप बिरुटे

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:13 am | गॅरी ट्रुमन

कनेक्टिकट (७ मते): हिलरी क्लिंटन प्रोजेक्टेड विनर (अपेक्षेप्रमाणे)
लुईझियाना (८ मते): डॉनल्ड ट्रम्प प्रोजेक्टेड विनर (अपेक्षेप्रमाणे)

आताचे आकडे:

डॉनल्ड ट्रम्पः १३६
हिलरी क्लिंटनः १०४

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:22 am | गॅरी ट्रुमन

मिशिगन (१६ मते): २०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ४% मतांनी पुढे
ओहायो (१८ मते): २०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १०% मतांनी पुढे
नॉर्थ कॅरोलायना (१५ मते):७९% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प २.४% मतांनी पुढे
विस्कॉन्सिन (१० मते):२४% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ५.५ % मतांनी पुढे
व्हर्जिनिया (१३ मते): ८०% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.३ % मतांनी पुढे
फ्लॉरीडा (२९ मते): ९५% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प १.२ % मतांनी पुढे
न्यू हॅम्पशायर (४ मते): ३२% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.९% मतांनी पुढे

व्हर्जिनिया प्रचंड इंटरेस्टींग वाटत आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 8:23 am | श्रीगुरुजी

floridaest. 95% in
trump
49.0%
clinton
47.8%

north carolinaest. 79% in
trump
50.1%
clinton
47.3%

virginiaest. 80% in
trump
47.6%
clinton
47.3%

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:24 am | गॅरी ट्रुमन

ओहायो- मिशिगन ही राज्ये बराक ओबामांनी दोनदा जिंकली होती. त्या राज्यांमध्ये सध्या ट्रम्प पुढे आहेत.

ही निवडणुक एकतर्फी असेल असे चित्र उभे केले गेले होते तितकी एकतर्फी निवडणुक ही नाही हे नक्की.

हे लिहिता लिहिता हिलरी क्लिंटन व्हर्जिनियामध्ये ०.१% मतांनी आघाडीवर आहेत.अजूनही हिलरींचेच पारडे जड आहे पण ३०० पेक्षा कमी मते इलेक्टोरल कॉलेजमध्ये मिळतील असे दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:31 am | गॅरी ट्रुमन

आणखी काही प्रोजेक्शनः

मोन्टाना (३ मते): ट्रम्प

आताचे आकडे:

ट्रम्पः १३९
क्लिंटनः १०४

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:42 am | गॅरी ट्रुमन

व्हर्जिनियामध्ये हिलरी क्लिंटन आरामात जिंकतील असे मतदानपूर्व चाचण्यांमधून भाकित वर्तवले होते. ८३% मते मोजून झाल्यानंतर हिलरी अवघ्या ०.५% मतांनी पुढे आहेत. सी.एन.एन वर चाचण्या 'सुप्त लाटेचा' अंदाज घेण्यात अपयशी ठरल्या असे म्ह्णू लागल्या आहेत.

मिशिगनमध्ये ट्रम्प पुढे आहेत, विस्कॉन्सीनमध्ये, अ‍ॅरिझोनामध्ये, न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प पुढे आहेत. अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प जिंकतील हे अपेक्षित होते. पण मिशिगन, विस्कॉन्सीन आणि पूर्वेकडच्या न्यू हॅम्पशायरमध्येही ट्रम्प पुढे आहेत म्हणजे ही निवडणुक बरीच चुरशीची आहे. अजूनही मिशिगन, विस्कॉन्सीन या राज्यांमध्ये ट्रम्प जिंंकतील असे नाही तरीही हिलरींना 'रन फॉर मनी' मिळणार हे नक्की.

आता कॅलिफॉर्नियातले आकडे आले की हिलरी आघाडीवर दिसतील.

व्हर्जिनिया चे रीझल्ट्स आलेत, क्लिंटन पूढे आहेत. फ्लॉरिडा मध्ये मँडेटोरी रीकाऊंट सुरु झालाय.. दोघांच्या मतांमध्ये ०.५ % चाच फरक आहे. मला एक कळत नाही , रिकाऊम्ट ने काय होणार? मशिन च मोजणी करतंय ना नाहीतरी? मग कितीही वेळा मोजा.. मतं कशी बदलतील?

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:48 am | गॅरी ट्रुमन

व्हर्जिनियामध्ये मतमोजणी चालू आहे. ८४% मते मोजून झाली आहे. तर फ्लॉरीडामध्ये १.५% मते मोजून झाली आहेत. कदाचित फ्लॉरीडामधील काही काऊंटीमध्ये रिकाऊंट चालू आहे. एका अर्थी फ्लॉरीडातील पाम बीच काऊंटीमुळे जॉर्ज डब्ल्यू बुश २००० साली अध्यक्ष झाले होते.

रिकाऊम्ट ने काय होणार? मशिन च मोजणी करतंय ना नाहीतरी? मग कितीही वेळा मोजा.. मतं कशी बदलतील?

हो ना. आणि यावेळी कोणाही उमेदवाराचा भाऊ पण फ्लॉरीडाचा गव्हर्नर नाही :)

स्रुजा's picture

9 Nov 2016 - 8:51 am | स्रुजा

लोल ..

रच्याकने, आता केव्हिन स्पेसीचा रीकाऊंट लागलाय एका चॅनलवर. स्पेसीने गोअरचं काम केलंय. भारी आहे सिनेमा.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:45 am | गॅरी ट्रुमन

आणखी काही प्रोजेक्शनः

न्यू मेक्सिको (५ मते): हिलरी क्लिंटन
मिसॉरी (१० मते) : डॉनल्ड ट्रम्प

डॉनल्ड ट्रम्पः १४९
हिलरी क्लिंटनः १०९

स्रुजा's picture

9 Nov 2016 - 8:54 am | स्रुजा

ट्रंप ने ओहायो घेतलं.

आत्ताचे नंबर्सः

ट्रंप १६८, क्लिंटन १०९

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 8:56 am | गॅरी ट्रुमन

मिशिगनमध्ये ट्रम्प ५% मतांनी आघाडीवर आहेत. २०१२ मध्ये ओबामांनी हे राज्य ९% मतांनी जिंकले होते. डिट्रॉईटच्या वेन काऊंटीमध्ये हिलरी आघाडीवर आहेत पण २०१२ मध्ये ओबामांना मिळालेल्या मतांपेक्षा बरीच कमी मते हिलरींना मिळत आहेत.

विस्कॉन्सीनमध्ये ट्रम्प १.८% मतांनी आघाडीवर आहेत. मागच्या वेळी ओबामांनी हे राज्य ७% मतांनी जिंकले होते.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:01 am | गॅरी ट्रुमन

डॉनल्ड ट्रम्पने ओहायो घेतल्यानंतर आता ट्रम्प १६७ आणि क्लिंटन १०९ मतांवर आहेत. आता खरी मजा येणार आहे. कारण हिलरींनी कॅलिफॉर्निया (५५ मते) घेतल्यानंतर दोन्ही उमेदवार साधारणपणे एकाच पातळीवर येतील. पण हिलरी क्लिंटनसाठीची वाईट बातमी म्हणजे हक्काचे मिशिगन आणि विस्कॉन्सिन गमावले असेल तर मात्र हिलरींच्या हक्काची राज्ये फार राहणार नाहीत.

अर्थात अजूनही मिशिगनमध्ये ३२% आणि विस्कॉन्सिनमध्ये ४२% मते मोजून झाली आहेत. तेव्हा चित्र अजूनही पालटू शकते.

यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने ओहायो जिंकले तरीही व्हाईट हाऊस गमावले असे यापूर्वी १९६० मध्ये रिचर्ड निक्सन यांच्याबरोबर झाले होते.

त्यातल्या त्यात हिलरींसाठी चांगली बातमी म्हणजे व्हर्जिनियामध्ये त्यांना आता १.५% मतांची आघाडी आहे. व्हर्जिनिया पण गमावले असते तर मात्र हिलरींना फारच कठिण गेले असते.

पण व्हर्जिनिया मध्ये पण ४८% - ४७% अशी विभागणी आहे. या बाबाने तोंडचं पाणी पळवलं डेमोक्रॅट्सच्या.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:10 am | गॅरी ट्रुमन

व्हर्जिनियामधून हिलरी क्लिंटनना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले गेले आहे. हिलरी नक्कीच हुश्श असे म्हणाल्या असतील.

आताचे आकडे:

ट्र्म्पः १६७
क्लिंटनः १२२

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:12 am | गॅरी ट्रुमन

ट्र्म्पः १६८
क्लिंटनः १२२

असे आकडे हवेत.

स्रुजा's picture

9 Nov 2016 - 9:15 am | स्रुजा

१३१ वर आल्या क्लि.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:18 am | गॅरी ट्रुमन

अजून कुठले राज्य हिलरींनी जिंकले? सी एन एन वर दाखवत नाहीयेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:19 am | गॅरी ट्रुमन

हो कोलोरॅडो हिलरी जिंकतील असे प्रोजेक्शन आहे.

ट्रम्पः १६७
क्लिंटनः १३१

कोलोरॅडो चे ९ व्होट्स अ‍ॅड झाले क्लि साठी. एबीसी किंवा सीबीसी लावा, तिथे लॅग नाहीये.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:14 am | गॅरी ट्रुमन

विस्कॉन्सिनमध्ये अजूनही ट्रम्प आघाडीवर आहेत. या राज्यात रिपब्लिकन पक्ष जिंकला होता १९८४ मध्ये-- रॉनाल्ड रेगन जिंकले तेव्हा. त्यानंतर एकाही अध्यक्षीय निवडणुकांमध्ये या राज्यात रिपब्लिकन पक्ष जिंकलेला नाही. या राज्यातही ट्रम्प आघाडीवर असतील तर मात्र हिलरींसाठी ही फार चांगली बातमी नाही.

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 9:24 am | उपाशी बोका

फ्लोरिडा ट्रंपकडे.

ट्रम्पः १९७
क्लिंटनः १३१

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:31 am | गॅरी ट्रुमन

हिलरी अपेक्षेप्रमाणे कॅलिफॉर्निया आणि हवाई जिंकणार तसेच ट्रम्प आयडॅहो जिंकतील असे प्रोजेक्शन आहे.

आताचे आकडे:

हिलरी क्लिंटनः १९०
डॉनल्ड ट्रम्पः १७१

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 9:33 am | श्रीगुरुजी

trump 171 (49.3%) votes40,279,237
clinton 190 (46.4%) votes37,969,444

270 electoral votes to win

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 9:33 am | उपाशी बोका

ट्रम्पः २०१
क्लिंटनः १९०

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:35 am | गॅरी ट्रुमन

अजूनही नॉर्थ कॅरोलायना आणि जॉर्जियामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत (एकूण ३१ मते). जॉर्जिया रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे तर नॉर्थ कॅरोलायनामध्ये ९३% मते मोजून झाली आहेत. तेव्हा ही ३१ मते ट्रम्प यांच्या पारड्यात आली की सध्या हिलरींची आघाडी दिसत आहे ती पिछाडीत बदलेल. तसेच ट्रम्प अजूनही मिशिगन आणि विस्कॉन्सिन (एकूण २६ मते) आघाडीवर आहेत. या दोन राज्यांवर बरेच काही अवलंबून असेल.

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 9:40 am | उपाशी बोका

नॉर्थ कॅरोलायनामध्ये ट्र्म्प विजयी.

भुमन्यु's picture

9 Nov 2016 - 9:40 am | भुमन्यु

नॉर्थ कॅरोलायना ट्रम्प विजयी 186 वि 190

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 9:47 am | उपाशी बोका

ट्रम्पः २१६
क्लिंटनः १९०

पेन्सिल्वेनियात क्लिंटन आघाडीवर

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 9:50 am | गॅरी ट्रुमन

ऑरेगनमध्ये हिलरी क्लिंटन अपेक्षेप्रमाणे विजय मिळेल असे प्रोजेक्ट केले गेले आहे. ट्रम्पना नेब्रास्कामध्ये आणखी एक मत मिळेल असे प्रोजेक्शन आहे आहे.

सी.एन.एन वर पुढील आकडे दाखवत आहेतः

क्लिंटनः १९७
ट्रम्पः १८७

अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत, फ्लॉरीडामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत (एकूण ४० मते). तसेच मिशिगन-विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प २-२.५% मतांनी आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये ट्रम्पना अजूनही प्रोजेक्टेड विनर म्हणून सी.एन.एन ने जाहिर केलेले नाही. हे पोस्ट करता करता मिशिगनमध्ये ट्रम्प आता ०.८% मतांनी आघाडीवर आहेत.

नुस्त्या उचापती's picture

9 Nov 2016 - 9:55 am | नुस्त्या उचापती

ट्रंप : -222
हिलरी : -2O2

नुस्त्या उचापती's picture

9 Nov 2016 - 9:55 am | नुस्त्या उचापती

ट्रंप : -222
हिलरी : -2O9

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:02 am | गॅरी ट्रुमन

पेन्सिल्वेनियामध्ये ८१% मते मोजून झाली आहेत आणि हिलरी क्लिंटन १.५% मतांनी आघाडीवर आहेत. हिलरींची पेन्सिल्वेनियामधील आघाडी कमी झाली आहे. चुकूनमाकून ट्रम्पनी हे राज्य जिंकले तर मात्र पूर्ण हॅवॉक होईल. आणि ट्रम्प जिंकले नाही तरीही हिलरींना या राज्यात इतक्या कडव्या प्रतिकाराची अपेक्षा नसावी.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:05 am | गॅरी ट्रुमन

सी.एन.एन ने फ्लॉरीडामधून ट्रम्प जिंकतील असे जाहिर केले आहे.

आता

ट्रम्पः २१६
क्लिंटनः १९७

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:08 am | गॅरी ट्रुमन

हिलरी मिशिगनमध्ये पिछाडी कमी करत आहेत. विस्कॉन्सिनमध्ये अजूनही ट्रम्प आघाडीवर आहेत. जर हिलरींनी मिशिगन जिंकले आणि ट्रम्प यांनी विस्कॉन्सिन जिंकले तर २००० सालप्रमाणे चुरस बघायला मिळेल आणि विजयी उमेदवाराला २७० च्या आसपास मते मिळतील असे सी.एन.एन वर बोलायला लागले आहेत.

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 10:09 am | उपाशी बोका

ट्रम्पः २३२
क्लिंटनः २०९

अंदाजः
पेन्सिल्वेनिया - क्लिंटन
वैस्कॉन्सिन, आयोवा - ट्रम्प

संग्राम's picture

9 Nov 2016 - 10:12 am | संग्राम
संग्राम's picture

9 Nov 2016 - 10:13 am | संग्राम

ट्रम्प 232
क्लिंटन 209

नुस्त्या उचापती's picture

9 Nov 2016 - 10:15 am | नुस्त्या उचापती

ट्रंप = २५४
हिलरी = २०९

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:15 am | गॅरी ट्रुमन

सी.एन.एन ने अपेक्षेप्रमाणे हिलरी क्लिंटन वॉशिंग्टन राज्य जिंकतील असे प्रोजेक्ट केले आहे.

आताचे आकडे:

ट्रम्पः २१६
क्लिंटनः २०९

ट्रम्प मिशिगनमध्ये १.३% मतांनी तर विस्कॉन्सिनमध्ये ३.५% मतांनी आघाडीवर आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:18 am | गॅरी ट्रुमन

ट्रम्प जॉर्जिया जिंकतील असे सी.एन.एन ने जाहिर केले आहे.

आता--

ट्रम्पः २३२
क्लिंटनः २०९

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 10:20 am | उपाशी बोका

आता सी.एन.एन.वर अ‍ॅण्डरसन चर्चा करत आहे what did everybody get it wrong?

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:24 am | गॅरी ट्रुमन

काल म्हटल्याप्रमाणे अनेकांनी "आम्ही डॉनाल्ड ट्रम्पना मत देणार" असे चाचण्यांना सांगणे अप्रशस्त वाटल्यामुळे पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी "आम्ही हिलरींना मत देऊ" असे म्हटले पण प्रत्यक्षात त्यांनी ट्रम्पना मते दिली असे दिसत आहे.

२००४ मध्ये भारतात लागला तसा दणका २०१६ मध्ये अमेरिकेत जनमतचाचण्यांना लागताना दिसत आहे. अजूनही निवडणुकीचा निकाल लागलेला नाही.पण हिलरी आरामात निवडून येतील असे वातावरण सगळ्या चाचण्यांनी उभे केले होते ते मात्र चुकीचे ठरले आहे हे नक्कीच. ही निवडणुक वाटली होती तितकी एकतर्फी नक्कीच झालेली नाही. हिलरी जिंकल्या तरी त्या थोडक्यात जिंकतील.

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 10:28 am | उपाशी बोका

सिनेट आणि हाउस सुद्धा रिपब्लिकन्सच्या ताब्यात जाणार अशी लक्षणे दिसत आहेत. हिलरी प्रेसिडेण्ट झाली तरी फार काही करू शकेल अशी लक्षणे दिसत नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:27 am | गॅरी ट्रुमन

पेन्सिल्वेनियामध्ये हिलरींची आघाडी आता ०.८% इतकीच राहिली आहे. तर युटामध्ये ट्रम्प अपेक्षेप्रमाणे मोठी आघाडी घेऊन आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:39 am | गॅरी ट्रुमन

डॉनल्ड ट्रम्प आयोवा जिंकतील असे सी.एन.एन ने प्रोजेक्ट केले आहे.

आता--

ट्रम्पः २३८
क्लिंटन: २०९

आयोवा ट्रम्प जिंकतील हे अनपेक्षित नव्हते. पण इतर काही कल नक्कीच अनपेक्षित आहेत.

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 10:39 am | उपाशी बोका

ट्रम्पला अजून २६ वोट हवी आहेत. अरिझोना तर रेड स्टेट आहे (११).
मिशिगन (१६), विस्कॉन्सिन (१०) मध्ये ट्रम्प अघाडीवर आहे. सी.एन. एन. ने आत्ताच सांगितले की तो आयोवा जिंकेल.
It is only matter of time for Trump to be next president.

मंदार कात्रे's picture

9 Nov 2016 - 10:40 am | मंदार कात्रे

ट्रम्प - २५४
हिलरी - २०९

फॉक्स न्यूज

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:41 am | गॅरी ट्रुमन

आता पेन्सिल्वेनियामध्येही ट्रम्प ०.२% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये त्यांनी आघाडी ४% पर्यंत नेली आहे आणि मिशिगनमध्ये १.९% मतांनी ते आघाडीवर आहेत.

पेन्सिल्वेनियामधून हिलरींचा पराभव झाला तर मी ऑफिसला जायला मोकळा होईन :)

शाम भागवत's picture

9 Nov 2016 - 10:46 am | शाम भागवत

:))

पैसा's picture

9 Nov 2016 - 10:44 am | पैसा

President
85 electoral votes still available

Clinton
209
Trump
244

-------------
72% reporting Votes

Donald Trump
Republican Party
48%
5,10,61,310

Hillary Clinton
Democratic Party
47%
4,98,95,788
-------------------------------------
US Senate
34 of 100 seats up for election

Democrats
46 - 5 needed
Republicans
48 - 3 needed

51 to win majority
---------------------------------
US House
435 seats up for election

Democrats
157 - 61 needed
Republicans
213 - 5 needed

218 to win majority

उपाशी बोका's picture

9 Nov 2016 - 10:59 am | उपाशी बोका

हाउस जिंकले रिपब्लिकन पक्षाने.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:48 am | गॅरी ट्रुमन

युटा आणि अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. ती आणखी १७ मते ट्रम्पच्या पारड्यात गेली तर सी.एन.एन च्या आकड्यांप्रमाणेही ट्रम्प २५५ वर जातील. तसेच अलास्कामधील ३ मते पण ट्रम्पना मिळतील अशी चिन्हे आहेत. तेव्हा होतील मते २५८.

मिशिगन, पेन्सिल्वेनिया, विस्कॉन्सिन आणि न्यू हॅम्पशायरवर सगळे काही अवलंबून आहे. हे लिहितालिहिता पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्प २,८५७ मतांनी (०.१% पेक्षा कमी) आघाडीवर आहेत. ही निवडणुक २००० सालच्या निवडणुकीपेक्षाही चुरशीची होताना दिसत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:50 am | गॅरी ट्रुमन

नेट सिल्वरने ट्रम्प जिंकायची शक्यता ८४% दाखवली आहे. काल हा आकडा २९% होता!!

अनुप ढेरे's picture

9 Nov 2016 - 10:51 am | अनुप ढेरे

गॅरी जॉन्सन आणि ती दुसरी बाई यांनी बरीच मतं खाल्ली म्हणे फ्लोरिडात. हिलरी समर्थक त्यांना खूप श्या घालतायत.

पैसा's picture

9 Nov 2016 - 10:59 am | पैसा

ट्रम्प आणि हिलरी यांच्यात आता १ टक्क्याचा फरक दिसतो आहे तर त्या दोघानी मिळून आतापर्यंत ४% मते खाल्ली आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 10:57 am | गॅरी ट्रुमन

न्यू हॅम्पशायरमध्ये हिलरी क्लिंटन १८ मतांनी आघाडीवर!!

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 11:05 am | गॅरी ट्रुमन

सी.एन.एन ने नेवाडामधून हिलरी क्लिंटन जिंकतील असे प्रोजेक्ट केले आहे.

आताचे आकडे:

ट्रम्पः २३८
क्लिंटनः २१५

विशाखा पाटील's picture

9 Nov 2016 - 11:10 am | विशाखा पाटील

ट्रम्पभौ जिंकतायत - पेनसिल्व्हानियासह उरलेल्या राज्यांमध्येही आघाडीवर आहेत. हिलरीबाईनी दोन भाषणं तयार ठेवली आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 11:11 am | गॅरी ट्रुमन

पेन्सिल्वेनियामध्ये ९३% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.५% मतांनी तर मिशिगनमध्ये ७५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.९% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये ८४% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ३.५% मतांनी आघाडीवर आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 11:17 am | गॅरी ट्रुमन

आता पेन्सिल्वेनियामध्ये ९५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ०.६% मतांनी तर मिशिगनमध्ये ७५% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प १.१% मतांनी आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये ८४% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ३.४% मतांनी आघाडीवर आहेत.

या तीनपैकी दोन राज्ये जरी ट्रम्पनी जिंकली तरी ४५ वे अध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी शपथ घेतील.

बोलबोलेरो's picture

9 Nov 2016 - 11:31 am | बोलबोलेरो

अरिझोनाची सुध्दा 11 निवडणूकीय मते आहेत ना?

गॅरी ट्रुमन's picture

9 Nov 2016 - 11:35 am | गॅरी ट्रुमन

नाही. सी.एन.एन ने अ‍ॅरिझोनाची ११ मते अजून ट्रम्पच्या पारड्यात धरलेली नाहीत. थोड्याच वेळात अ‍ॅरिझोनामधूनसुध्दा ट्रम्प प्रोजेक्टेड विनर म्हणून सी.एन.एन जाहिर करेल.

स्रुजा's picture

9 Nov 2016 - 12:43 pm | स्रुजा

विस्कॉन्सिन्स , मिशिगन, अ‍ॅरिझोना तिन्ही मध्ये ट्रंप भाऊ पुढे...

अब की बार , ट्रंप सरकार !

आत्ताचा नंबर : ट्र २४४/ क्लि २१५

बोलबोलेरो's picture

9 Nov 2016 - 12:10 pm | बोलबोलेरो

टाइम्स ऑफ इंडिया ची बातमी ट्रम्प 264 (AP )

संजय पाटिल's picture

9 Nov 2016 - 12:43 pm | संजय पाटिल

ट्रम्प ३०४+ ने जिंकण्याची शक्यता आहे.

रविकिरण फडके's picture

9 Nov 2016 - 1:03 pm | रविकिरण फडके

एक मूलभूत (किंवा बावळट) प्रश्न विचारतो जाणत्या लोकांना, मला माहीत नाही म्हणून. 'इथे इतकी मते मोजून झालीयेत' असे विधान वाचल्यावर मनात येते, जर लोक electronically मत देत असतील तर मते मोजणे म्हणजे काय? चुटकीसरशी (क्लिक ऑफ द बटण) मोजणी व्हायला हवी ना?

हुप्प्या's picture

9 Nov 2016 - 2:08 pm | हुप्प्या

निदान कॅलिफोर्नियात (तंत्रज्ञानाचे माहेरघर!) इलेक्ट्रॉनिक मतदान नाही. साधी कागदी मतपत्रिका आणि आवडीच्या उमेदवाराच्या नावापुढे बॉलपेनने रेघ ओढायची. बाकी अनेक राज्यातही तीच परिस्थिती आहे. तेव्हा क्षणार्धात निकाल देणे शक्य नाही.

वामन देशमुख's picture

9 Nov 2016 - 1:05 pm | वामन देशमुख

अब की बार, ट्रंप सरकार!

Trump

गामा पैलवान's picture

9 Nov 2016 - 1:12 pm | गामा पैलवान

दादा जिंकले : http://www.bbc.co.uk/news/election-us-2016-37920175

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 1:13 pm | श्रीगुरुजी

Trump 268, Hillary 215

बापू नारू's picture

9 Nov 2016 - 1:16 pm | बापू नारू

यूएस हाऊसच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन विजयी झाले
यूएस सिनेटच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन विजयी झाले
डॉनल्ड ट्रंप अध्यक्षपदावर विजयी झाले

या लोकसत्ता वाल्याच्या थोतरीत बसली. काय समजतात हे लोकमताला? यांच्या लेखी लोकांना त्यांच्या भविष्याची काही काळजीच नाही . लोकांना आता सुरक्षा महत्वाची वाटायला लागली आहे. इस्लामी दहशतवाद हा मुख्य मुद्दा आहे.

प्रान्जल केलकर's picture

9 Nov 2016 - 1:39 pm | प्रान्जल केलकर

मोडून पडले ट्वीन टॉवर तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठिवून , ट्रम्पभाऊ फक्त लढ म्हणा

माझ्यासारख्या पामरांकडून अभिनंदन म्हणणं कै च्या कै त्यामुळे फक्त "ट्रम्पभाऊ अभिनंदन"

पाटीलभाऊ's picture

9 Nov 2016 - 1:44 pm | पाटीलभाऊ

ट्रम्प - 276
हिलरी - 218
पण मग बाकीच्या 46 मतांचं काय ?? कि अजून मतमोजणी सुरु आहे?