नमस्कार मंडळी,
अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :)
अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः
सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे:
वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.
नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.
सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्यातले असेल.
तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 1:49 pm | संदीप डांगे
दुसर्या उमेदवारांना मिळालीत ती मते.
9 Nov 2016 - 1:56 pm | पाटीलभाऊ
पण अण्णा बाकीचे उमेदवार तर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झाले होते ना ?
9 Nov 2016 - 2:48 pm | संदीप डांगे
https://www.google.co.in/search?q=american+election&ie=utf-8&oe=utf-8&cl...
गूगल मधे अमेरिकन एलेक्शन टायप करुन सर्च करा.
Donald Trump
Republican Party
48%
5,81,17,798
Hillary Clinton
Democratic Party
47%
5,76,36,328
Gary Johnson
Libertarian Party
3%
39,13,912
Jill Stein
Green Party
1%
11,42,521
Other candidates
0.7%
7,65,971
9 Nov 2016 - 3:01 pm | पाटीलभाऊ
अच्छा...मला आधी वाटलं होतं कि हे बाकीचे उमेदवार आधीच बाद झाल्याने लढत फक्त या दोघांमध्येच आहे.
9 Nov 2016 - 4:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे उमेदवार रिपब्लिकन किंवा डेमोक्रटिक पक्षांचे उमेदवार नसून "अपक्ष" किंवा इतर लहान पक्षांचे असू असतात.
9 Nov 2016 - 1:44 pm | संदीप डांगे
एन्जोय युअर स्टे अॅट व्हाईट हाउस. जस्ट चील आउट!
9 Nov 2016 - 2:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रम्पला म्हणा भो, भारताला काय नै दिलं तरी चालेल पण पाकड्यांच्या बाजूने कौतुकं नका टाकू.
एवढं झालं तरी पुष्कळ आहे.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2016 - 2:50 pm | नाखु
पाकड्यांना भेटही देऊ नये आणि भेटवस्तूही !!!!
9 Nov 2016 - 2:40 pm | जानु
+ १
9 Nov 2016 - 3:21 pm | गॅरी ट्रुमन
मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेन्सिल्वेनिया या राज्यांनी अगदीच अनपेक्षित कौल दिला. या राज्यांमधून आपण जिंकू हा ट्रम्प यांचा दावा स्वतः ट्रम्प सोडून इतर कोणीच गांभीर्याने घेतला नसेल. व्हर्जिनियामध्येही ट्रम्पनी अगदी जोरदार टक्कर दिली. फ्लॉरीडामध्येही त्यांनी विजय मिळवला.
एकूणच ट्रम्पनी इतिहास घडवला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडता आले नव्हते. पण मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेन्सिल्वेनिया ही राज्ये जिंकून नेमके तेच ट्रम्पनी करून दाखविले.
या क्षणी ट्रम्पना ५ कोटी ८२ लाख तर हिलरींना ५ कोटी ७७ लाख मते आहेत. म्हणजे ट्रम्पना ५ लाखांची आघाडी आहे. कॅलिफॉर्नियातील मतमोजणी अजूनही चालू आहे. हे लिहिता क्षणी कॅलिफॉर्नियातील ५४% मते मोजून झाली आहेत आणि त्यात हिलरींना तब्बल १९ लाखांची आघाडी आहे. उरलेल्या ४६% मतांमध्ये हिलरींना आणखी ५ लाखांची आघाडी कॅलिफॉर्नियात मिळणे शक्य आहेच. तसेच वॉशिंग्टनमध्येही मतमोजणी चालू आहे आणि तिथे हिलरी आघाडीवर आहेत. तेव्हा असे दिसते की पॉप्युलर व्होटमध्ये हिलरींना ट्रम्पपेक्षा जास्त मते मिळतील. २००० साली जॉर्ज डब्ल्यू बुशनंतर पॉप्युलर व्होटमध्ये हरूनही ट्रम्प अध्यक्ष बनतील. अमेरिकेतल्या पध्दतीतील ही त्रुटी १६ वर्षात दुसर्यांदा बघायला मिळणार असे दिसते.
9 Nov 2016 - 6:50 pm | गामा पैलवान
गॅरी ट्रुमन,
मिशिगन, व्हिस्कॉन्सिन आणि पेनिसिल्व्हेनिया यांच्या बाबतीत एक स्वैर अंदाज वर्तवतो. तसंही पाहता ट्रंप मूळचे डेमोक्रॅटच आहेत. बहुधा या तीन राज्यांत अगोदरपासून त्यांचे जाळं तयार असावं. किंवा त्यांना इथल्या डेमोक्रॅट्सच्या कच्च्या दुव्यांची महत्वपूर्ण अशी 'आतली माहिती' असावी.
असो.
माझ्या मते अमेरिकी संयुक्त संस्थानांचा नागरिक हा प्रथम घटकराज्याचा नागरिक असतो. मगंच देशाचा नागरिक असतो. त्यामुळे लोकमतसंख्येविरुद्ध प्रतिनिधीमतसंख्या असणे ही त्रुटी नाही.
आ.न.,
-गा.पै.
9 Nov 2016 - 9:31 pm | गॅरी ट्रुमन
सुरवातीच्या काळात ट्रम्प आणि क्लिंटन कुटुंबियांचे कसे सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि हिलरींचा विजय निश्चित करण्यासाठी बिल क्लिंटन यांनी ट्रम्पना पडद्याआडून कसे प्लॅन्ट केले वगैरे वगैरे गोष्टी बोलल्या जात होत्या.पण ट्रम्प भलतेच बेरकी निघाले असे म्हणायला हवे. हा डाव पुरताच क्लिंटन कुटुंबियांवर उलटवला :)
शक्य आहे.
9 Nov 2016 - 8:27 pm | विकास
एन पी आर वर आत्ताच (९:५० स्थानिक वेळ/ बॉस्टन) वाचल्याप्रमाणे:
As of 9:39 a.m. ET, Clinton had amassed 59,238,524 votes nationally, to Trump's 59,088,024 — a margin of 150,500 that puts Clinton on track to become the fifth U.S. presidential candidate to win the popular vote but lose the election.
9 Nov 2016 - 10:11 pm | पिलीयन रायडर
हिलरीचे स्पीच आता होत आहे. ती आली स्टेजवर. अत्यंत आत्मविश्वास आणि तेच खतरनाक स्माईल!
9 Nov 2016 - 10:23 pm | पिलीयन रायडर
अत्यंत अप्रतिम भाषण! मला तरी फार आवडलं! हिलरी पहिल्यापासुनच "प्रेसिडेन्शियल" वाटते. ट्र्म्प कधीच वाटला नाही. पण आता पर्याय नाही. तरी त्याने पहिलं भाषण चांगलं दिलं. पण हीच जास्त भारी वाटते बोलताना.
ट्र्म्प निवडुन आला ह्याचे मला फार काही विशेष वाटत नाही. पण पहिला महिला प्रेसिडेन्ट होऊ शकली नाही आणि ते ही ट्र्म्प सारख्या माणसामुळे, ह्याचे वाईट वाटले.
9 Nov 2016 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर भाषण !
भारतीय विरोधी पक्षांनी खर्या लोकशाहीत पराभव कसा स्विकारावा याचा वस्तूपाठ म्हणुन ते भाषण १०० वेळा पहायची गरज आहे.
9 Nov 2016 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
ट्रंपचे विजयी भाषणही "स्टेट्समनलाईक" होते.
9 Nov 2016 - 10:53 pm | स्रुजा
अगदी खरं... सोनिया गांधीनी रागाला हात धरुन बाहेर काढलं माईक समोरुन !
हिलरी चं आजचं भाषण पहिल्यांदा मनापासून आलेलं आणि हृदयस्पर्शी वाटलं. पूर्ण कँपेन मध्ये पहिल्यांदाच ती इतकं "कँडिड" बोलली. १० वर्षं , कदाचित जास्तच काळ ती या पदासाठी प्रयत्न करत होती. खासकरुन पोल्समध्ये मिळालेल्या अंदाजांनंतर असा निकाल लागणे हे कदाचित अजुनच अवघड असेल. पण, या सगळ्या गदारोळात, काल साधारण पहाटे दिडला जॉन पोडेस्टाने एनवायसी ची पार्टी बंद केली , तेंव्हा डेमोक्रॅट्सना वस्तुस्थितीचा अंदाज आला होता. त्यानंतर आज सकाळी तिच्या कन्सेशन स्पीच पर्यंत जो काही तुटपुंजा वेळ मिळाला त्यात तिने स्वतःला चांगलं सावरलं. एवढ्या मोठ्या पदासाठी उमेदवार असलेली लोकं सहजासहजी आपल्या भावना समोर येऊ देत नाहीत पण त्या लपवणं ही इतकं सोपं नसतं. फार कौतुक वाटलं त्यामुळे तिचं.
9 Nov 2016 - 11:15 pm | श्रीगुरुजी
हिलरी हरावी अशी इच्छा होती. ती पूर्ण झाली.
या निवडणुकीत अगदी सुरवातीपासून माध्यमांचा हिलरीच्या बाजूने पक्षपातीपणा स्पष्ट दिसत होता. भारतातील वाहिन्यांप्रमाणेच अमेरिकेतील वाहिन्यांनी सुद्धा ओपिनिअन पोल्स मॅनेज केलेले दिसतात. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हिलरीच जिंकणार असेच पसरवले जात होते.
हिलरीची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. २००८ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत पाठिंबा ओबामाला मिळाल्याने हिलरीला उमेदवारी मिळविण्यात अपयश आले होते. आता २०१६ मध्ये उमेदवारी मिळूनसुद्धा जनतेचा पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने अध्यक्ष होता आले नाही. आता पुढील संधी २०२० मध्ये मिळू शकेल, परंतु त्यावेळी तिचे वय ७३ असेल व प्रकृतीच्या समस्या अजून वाढलेल्या असतील. तसेच पक्षांतर्गत उमेदवारीही पुन्हा एकदा मिळवावी लागेल. एकंदरीत तिची राजकीय कारकीर्द संपलेली दिसते.
ट्रंप आता नक्की काय करेल ते बघणे रोचक ठरेल. रॅडिकल इस्लामच्या विरूद्ध त्याने काहीतरी भरीव पावले उचलून पाकिस्तान व सौदी अरेबियाला कह्यात ठेवायला हवे.
9 Nov 2016 - 11:29 pm | श्रीगुरुजी
गेल्या काही वर्षांपासून जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये जनता उजवीकडे वळताना दिसत आहे. २०१४ मध्ये मोदी निवडून आले, २०१६ मध्ये ब्रिटिश जनतेने ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिला आणि आता अमेरिकेत ट्रंप निवडून आला आहे. जेव्हा जेव्हा उदारमतवाद, धर्मनिरपेक्षतावाद, मानवता इ. इ. साठी देशहिताचा बळी देणे सुरू होते तेव्हा तेव्हा जनता उजवीकडे वळते.
युपीएच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. पण त्याबरोबरीने मुस्लिम दहशतवाद्यांविषयी बोटचेपे धोरण, पाकिस्तानची मुजोरी सहन करणे, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे लांगूलचालन व चुकीच्या गोष्टींचे समर्थन इ. देशहितविरोधी गोष्टीही जोमात सुरू होत्या. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून काँग्रेसचा दारूण पराभव होऊन उजवे समजले जाणारे मोदी निवडून आले.
मागील काही वर्षांपासून ब्रिटनने मध्यपूर्वेतील स्थलांतरीतांना आश्रय देण्याविषयी उदार धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या रोजगाराच्या संधीवर परीणाम झाला आहेच, परंतु दहशतवादाचा धोका अधिक वाढला आहे. ब्रिटन युरोपिअन युनियनचा सदस्य असल्याने स्थलांतरीतांना आश्रय देणे त्या देशावर बंधनकारक होते, परंतु त्याचा जाच सामान्य जनतेला व्हायला लागला होता. त्यामुळेच ब्रेक्झिटला बळ मिळाले.
अमेरिकेत ट्रंपने मुस्लिम दहशतवाद्यांविरूद्ध उघडउघड भूमिका घेतली. डेमोक्रॅट्स तशी भूमिका घेण्यास कचरत होते. ट्रंपच्या विजयामागे हा एक मुद्दा होताच.
मला वाटते आता पुढील क्रमांक जर्मनीच्या अँजेला मेर्केल यांचा लागेल. देशातील जनतेचा विरोध झुगारून त्या हिरिरीने मध्यपूर्वेतील निर्वासितांना जर्मनीत आश्रय देत आहेत. जर्मनीतील समाजजीवन यामुळे अस्वस्थ झाले असून दहशतवादाचा धोका वाढलेला आहे. शेजारील फ्रान्स, बेल्जियम व टर्की या देशांमध्ये दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत अँजेला मेर्केलना जर्मन्स नक्कीच नाकारतील असा माझा अंदाज आहे.
10 Nov 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी
मागील वर्षी आचरटशिरोमणी श्रीपाल सबनीस यांनी काढलेल्या 'मोदी माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही' या उद्गारांची आठवण झाली. मोदी निवडून येऊन पंतप्रधान झाल्यावर यू आर अनंतमूर्ती (देवाच्या मूर्तीवरील लघुशंका फेम) यांनी 'मला मोदी पंतप्रधान असलेल्या देशात रहावेसे वाटत नाही' असे उद्गार काढले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतातील निधर्मांधांनी आता जणू काही नवीन हिटलरच सत्तेवर आला अशा तर्हेच्या प्रतिकिया दिल्या होत्या. ट्रंपविरूद्ध बहुधा तसेच होणार असे दिसते.
ट्रम्प यांच्या निवडीच्या विरोधात न्यूयॉर्क, सिअॅटेल, बोस्टन इ. ठिकाणी हिलरी समर्थकांनी मोर्चे काढले असून 'ते आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत' अशा घोषणा दिल्या गेल्याच्या बातम्या आहेत. निवडणुक प्रचाराच्या काळात ट्रंपचे नग्न पुतळे उभे करून प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठलेल्या हिलरी समर्थकांना ट्रंपचा विजय अत्यंत झोंबलेला आहे असं दिसतंय.